Saturday, March 22, 2014

u (उ) 2 (unhaaLaa To uththreeya~)





.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
unhaaLaaउन्हाळा.n.hot weather. summer. ऊनाच वातावरण.उन्हाळांत उत्तर भारतांत बडिवाच उनू-उनू वार॑ मला सोसाला होईना.
unuउनु.adj.heated. hot. ऊन केलते.उनु भातांत तूप अणी मीठ घालून कालिवून खायाला लेंकरांस भरून अवडेल॑.
unu unooउनुउनू.adj.fresh and hot from the stove or oven.चूलांतून अत्ताच करून ठिवलते. खायाच पदार्थ उनु असल॑ नाही तरीन परवा नाही मला, कॉफी मात्र उनुउनू असांव॑ (असाम॑).ऊनऊन/ ऊन्हऊन्ह/ उन्हून/ उन्हन in SM.
unu unooउनुउनू.adj.quite recent.अत्ताच अलीकडे झालते. अत्ता उनुउनू आलते समाचारा प्रकार राहूल गांधी कॉनग्रस पार्टीच अध्यक्ष पदवींतून राजिनामा देले म्हणून ऐकलों.ऊनऊन/ ऊन्हऊन्ह/ उन्हून/ उन्हन in SM.
unupaaNeeउनुपाणी.n.hot water. ऊन केलते पाणी. उनुपाणींत आंघोळ/आंघोळी करून दंडक झलत्यांस॑ हिंस॑ पाणींत आंघोळ कराम॑ म्हण्जे थोड कष्ट होईल.
upaadhyaayaaउपाध्याया.n.a religious teacher.धर्मगुरू. धर्मपंडित.मझ॑ सासराच एक गाढमित्र थोर धर्मपंडित होते अणी आध्यात्मिक विषयांत फार पांडित्य घेट्लते उपाध्याया म्हणून त्यांस तिरुपति संस्कृत विश्वविद्यालयांत वैस-चान्सलर म्हणून नियुक्त करले.
upaadhyakSha~उपाध्यक्ष.n.a person who is second in command or charge.अध्यक्ष नसताना त्यंच जवाबदारी घेणार. मी वाचत होतते साळेच उपाध्यक्ष वीस वर्ष ते पदवींतच होते अणी अध्यक्षाच पदवी खाली झालकी-नाही वेगळ॑ कोणालकी नियुक्त केले म्हणून समेच राजिनामा देऊनटाकले
upaakarma~उपाकर्म.n.the ceremony of putting on a new sacred thread.नव॑ जानव घालाच सण. आवणी-अविट्टम (Tamil). मझ लोंक अमेरिकांत॑ उद्योगांत आहे तरीन वर्षा-वर्षी चुकनास्क॑ उपाकर्म करणे आहे.
upaasउपास.n.religious fasting.धार्मिक निष्ठाच उपवास करून अनशी पोटांत असणे. उपवास. शनिवार शनिवार मी उपास करून रात्रिच वेळ काहितरीन पल्हार खाईन.
upaasउपास.n.fasting.अनशी पोटांत असणे. उपवास.गुरुवार गुरुवार रात्रीच जेवणे नाही मला, उपास असतों.
upaasanaaउपासना.n.worship. पूजा. आराधना.उद्योगांत असताना त्यांस धार्मिक विषयांत श्रद्धा द्याला वेळ होत नाही, पण रिटैर झालानंतर॑ देवकार्य, पूजा-पद्धती अणी उपासना कर्म असलत्यांत फार उत्साह दाखिवाला आरंभ करले.
upaasheeउपाशी.adj.starving. empty stomach.उपासी. भूकांत॑ असाच स्थिति. खालि पोट. अनशी पोट.एकादशी दिवस पूरा उपाशी असून द्वादशी पाष्टे लोक्कर पारणे करणे आहे.
upaayउपाय.n.a plan. a scheme. an idea.योजना. युक्ति. बरोर योचना करून एक चोखोट उपाय निश्चय केलांपिरी आरंभ कराच कोण्त कार्यहीं पराजय होयना.
upaayउपाय.n.a remedy.एक वाट. कराच प्रयत्न पूरा करून अत्ता वेगळ॑ उपाय काहीं नाहीते करतां तो मझ॑ अभिप्राय विचाराला आलाहे.
upabhaaShaaउपभाषा.n.dialect.एक भाषाच॑ वेगळ॑ एक रूप. लोकबोली.तंजाऊर मराठी पुणे मराठीच एक उपाभाषा आहे.
upachaarउपचार.n.gracious treatment.आदरांत॑ वागणे. कित्येक लोकांच वागणांतून, तेनी तेवढदनालीं उदंड मर्यादांत॑ उपचार करणार आहेत म्हणून अम्हाला कळते.
upadeshउपदेश.n.advice. उपदेश.महाभारतांत॑ विदुर॑ धृतराष्ट्राला कित्ति उपदेश देवूनीं शेवटि ते कोण्तीन तेनी पालन केल नाहीते.
upadravउपद्रव.n.trouble.तंटा.भारतांत॑ जास्ति विकास झालनाहीते प्रदेशांत॑ माओवादींच उपद्रव उणे कराम॑ म्हण्जे तिकडल॑ लोकांच कष्ट काय म्हणून कळींगून ते प्रकारच विकासाच कार्यक्रम कराला पह्जे.
upadravउपद्रव.n.harassment.पीडा. तंटा. नच्च॑. ल्हान-ल्हान कामाच आवश्या करतां सरकारी आफींसांत॑ जाणार लोकांला तिकडले उद्योगी लोक उपद्रव करनास्क असाला लोकायुक्त नियोग कराविषयीं अत्ता एक थोर चर्चा देशांत॑ होत आहे.
upadravउपद्रव.n.nuisance.तंटा. नच्च॑.अम्च बाजु घरांत आलते नव॑ कुटुंबांत॑ दहा बारा लोके आहेत॑. रात्रि पूरा काय-कायकी शब्द होत असत॑. मला हे उपद्रव सोसाला होत नाही.
upadravउपद्रव.n.botheration.तंटा. नच्च॑. झोंपी जाताना थोर घुरका सोडाच दंडक मला आहे. मझमुळे दुसरांस॑ उपद्रव होताने म्हणून मी केम्हाहीं वेगळ॑ एक खोलींतच झोंपी जायाच.
upagraha~उपग्रह.n.satellite. ग्रहाला प्रदक्षिणा कराच एक ल्हान ग्रह. शनिग्रहाच उपग्रह "टैटान", हेच सूर्यमंडलांत॑ सगळांचीं पक्षा थोर उपग्रह.
upahaarउपहार.n.light refreshment.पलहार॑. फलहार॑. लघु आहार॑. लघु भक्षण॑.प्रयाण करताना पोट भरून जेवा पक्षा काहीतरीन उपहार खाणेच॑ चोखोट.उप+आहार=उपहार. फल+आहार=फलहार/पल्हार.
upahaasउपहास nridicule.परिहास. अपहास.वेगळांस पाह्यिलतर॑ उपहासांत बोलाच वंगळ॑/ओंगळ॑ दंडक तला आहे.
upajeevana~उपजीवन॑.n.subsistence.एकदम उणे पैसांत॑ (आदायांत॑) जीवन चालिवणे/काल कांडणे.एक चोखोट उद्योगांत होतते ते मनुष आवश्य नाहीस्क॑ ते काम सोडूनटाकला. अत्ता उपजीवनाला तिंडाट्टम झालाहे.
upakaarउपकार.n.help.सहाय. एक हातांत॑ लेंकरूहीं, अण्कीएक हातांत॑ दुकानांत घेट्लते सामानीं ठींगून बस्सांत॑ ओठाकलसाच बायकोला पाव्हून अम्च॑ ठिकाण त्यांस॑ सोडून देलतर॑ ते त्यांस॑ एक मोट्ठ॑ उपकार होईल॑.
upakaraNe~उपकरण॑.n.instrument.काम कराला उपयोग कराच आयुध.घरांत॑ ल्हान-ल्हान काम अम्ही स्वता करींगाला हातोडी, स्क्रू-ड्रैवर असल॑ उपकरण॑ केम्हाईं ठींगणे चोखोट.
upakaraNeeउपकरणी.n.small utensils used in Deva Pooja. देवपूजाच ल्हान पात्र.अम्च॑ आजी फार सोवळेच होते अणी देवघराच सगळ॑ उपकरणीं वेघळ॑ कोणालीन हात लावाला सोडनास्क॑ तेनीच स्वता शुद्ध करून ठिवत होते.
upakathhaaउपकथा.n.story within a story. sub-plot.एक खाणीच आंतल॑ अण्कीएक खाणि.उज्जैन साम्राट विक्रमादित्याच वीर कथा "सिंहासन द्वत्रिंसिका" हे अक्रावां शतकांत॑ कष्मीराच सोमदेव लिव्हलते "कथासरितसागरा" हेजांतल॑ एक मुख्य उपकथा आहे.
upamaanउपमान.n.an illustrative comparison.तारतम्य उदाहरण.अम्च जीवन कस॑ चालत आहे म्हण्जे, तज उपमान चार डोंगूरावर वेघून-उतराच कसकी तसच आहे. थोड वेळ व॑र वेघताना श्रम असत॑. नंतर उत्तराच वेळ सुख वाटते. वेघणे-उतरणे जीवनांत॑ बदलून-बदलून अस्त॑.
upanadiउपनदि.n.a tributary.मुख्य नदीच बरोर मिळाच नदि.यमुना नदि गंगा नदीच एक उपनदि झालतरीन, ते स्वता एक मोट्ठ॑ नदि आहे.
upanagarउपनगर.n.satellite town.मोट्ठ॑ नगराच बाजु असाच एक ल्हान गांव.थोर-थोर पट्णांत॑ जमीनाच मोल उदंड जास्ति असाकरतां पैसावंत नाहीत जन॑, म्हण्जे मध्य वर्गाच लोक॑, उपनगरांत॑ घर करणे आहे.
upanayana~उपनयन॑.n.thread ceremony.मुंज.उपनयन झाल-की-नाही, ब्रह्मचारींस॑ दिवसोडि संध्यावंदन करिवांमते जवाबदरि थोरळे काढींगणे चोखोट.
upanethra~उपनेत्र.n. spectacles. अयनक. अर्साअत्ता अस्कीन गाजाच उपनेत्र घालाच बद्दिल प्ळास्टिकाच (रेसी-लेन्साच) उपनेत्र घालणे प्रसिद्ध झालाहे.चष्मा in sm.
upaniShadउपनिषद.n.philosophical works forming an important part of Hindu scripture.आरण्यक॑. हिंदु तत्वज्ञानाच कित्येक मुख्य ग्रंथ. बृहदारण्यक उपनिषदांत॑ विदेह राजा जनकाच राजसदसांत॑ गार्गी वाचक्नावी, यज्ञवल्क्यांच बरोर कराच तत्वज्ञानाच तर्क ते उपनिषदाच एक मुख्य भाग आहे.
upanyaasउपन्यास.n.a religious discourse.तत्वज्ञानाच भाषण.रिटैर झालांपिरी वय झालते लोक सायंकाळी-सायंकाळी उपन्यासाच कार्यक्रमाला जाणे आहे.
uparaaTउपराट.n.reverse.वाम. उलटा.उर्दू, अरबी, फार्सी असल॑ भाषा उपराट लिव्हतील॑. म्हण्जे, उजवीकडून आरंभ करून डावीकडे संपवतील॑. उफराटा in sm.
uparaaTउपराट.n.obverse.मागे पटीस.हे कागदांत॑ दोन पटीसीं छापलाहे. मी मझ अर्सा आणाला विसरलों. तुला विरोध/आक्षेप नाहीतर॑ उपराट छापलते वाचून सांगशीलका ?उफराटा in sm.
uparaaTउपराट.n.contrary.विरुद्ध॑. उलटा.मझ॑ बहिणीच लोंकाला काय निर्देश देलतरीन उपराट कामच॑ करेल॑. टीनेजर पोरांस मानसिक विकास झाल नंतर॑ हे बरोर होईल म्हणून सांगतात॑.उफराटा in sm.
uparaNउपरण.n.cloth covering torso of a man.आंगाच वरच भागाव॑र पांघरून नेसाच कापड. उपरणी. अंगवस्त्र. अंगोस्त्र॑. अंगूस्त्र. अंगोस्तर॑. कोणालतरीन धोती दान देताना तज बरोर उपरण पणीं देणे आहे.उपरणे/उपरणा in sm.
uparaNeeउपरणी.n.cloth covering torso of a man. आंगाच वरच॑ भागाव॑र पांघरून नेसाच कापड. उपरण. अंगवस्त्र. अंगोस्त्र॑. अंगूस्त्र. अंगोस्तर॑.जुने काळांत केरळच॑ देऊळांत ब्राह्मण लोकांस मात्र उपरणी नेसींगून आंत जायाला सोडत होते, पण अत्ता कोणालीन सोडत नाहीत॑.उपरणे/उपरणा in sm.
upasarga~उपसर्ग.n. prefix.गोष्टाच पुढ॑ (आरंभांत॑) जोडाच अक्षर, नाहीतर॑, अक्षरसमूह.लोकांच नावाच पुढे "श्री" "श्रीमती" अस॑ जोडाच॑ उपसर्गाच उदाहरण आहे.
upavaasउपवास.n.religious fasting.धार्मिक निष्ठाच उपवास करून अनशी पोटांत असणे. उपास. अम्ही एकादशी दिवस पूरा उपवास करणे आहे.
upavaasउपवास.n.fasting. अनशी पोटांत असणे. उपास. उपाशी असणे.पोटाला बर॑ नाहीस्क॑ ढाळणे वगैना झालतर॑, एक दिवस उपवास बसणे चोखोट॑.
upayogउपयोग.n.use. कामाला याच॑.कसालतरीन उपयोग होईल म्हणून मझ आजा जुने रट्टाच डब्बा काहीतरीन मिळ्लतर॑ ते काढून परणेच व॑र घालतील॑.
upayogउपयोग.n.usefulness.उपयोग. तो अम्च काम करना म्हणून मला वाटते. तजकडे बोलून उपयोग नाही.
upekShaaउपेक्षा.n.abandon.आवश्य नाही म्हणून सोडूनटाकणे. करूनटाकल॑.वाघ, सिंह असल॑ राणाच मृगाला त्यंच पिल्लूंत कोण्त तरीन वांचना म्हणून वाटलतर॑ तला दूध पणीं देईनास्क॑ उपेक्षा करूनटाकल॑.
upekShaaउपेक्षा.n.neglect.पाह्यींगनास्क॑ सोडूनटाकणे. परवा करनास्क॑ सोडूनटाकणे. चोखोट स्थितींत असाच तीन लोंक असून पणीं वय झालते माय-बापाला बरोर पाह्यींगनास्क॑ उपेक्षा केले म्हणून तेनी एक वृद्धाश्रमांत॑ जाऊन मिळींगटले.
uppaDNeउप्पडणे.vi.to pluck out. to pull out.पिच्चणे (Tamil). ओढून/होढून काढणे.अम्ही दोघे बहिणीहीं ल्हान असताना भांडणे आरंभ करतानच एकालेक केंस उप्पडत होतों.उपटणे in sm.
uppaDoon kaaDhaNeउप्पडून काढणे.id.to ferret out (information etc. against one's wish).दूसरेकडून काहीं विवर॑की वेगळ॑ विषय कायतरीनकी निर्बंधांत॑ होढून/ओढून काडणे. ते बायकोकडे मात्र मी बोलाला जाईना. कां म्हण्जे, बोलाला आरंभ करतानच मझकडून अम्च घरच विवर पूरा उप्पडून काढणे विना तिला वेगळ॑ एक उद्देशीं नाही.
upperiउप्पेरि.n.fried vegetable chips.तळलते भाजीपालाच पत्तळ चीर.नेंद्रन केळेच उप्पेरीला बरोरल॑ रूच येम॑ म्हण्जे खोब्रीच तेलांत तळलतर॑ मात्र होईल॑. from Malayalam.
uppiTउप्पिट.n.a light refreshment made from rava. उप्पुमा (Tamil). रवांत॑ केलते एक पल्हार. मला सादा उप्पिटाच पक्षा कांदा घाटलते उप्पिट अवडल॑.from Kannada, उप्पु(salt)+हिट्टु(flour).
uraLegaDDeउरळेगड्‍डे.n. potato.आलू गड्‍डे.उरळेगड्डेच भाजि, उरळेगड्डे्च बोंडा, उरळेगड्डेच उप्पेरि, उरळेगड्डेच फ्रेंच-फ्रैस हे तेवढीन मला उदंड अवडल॑.
uraLiउरळि.n.a heavy large mouthed vessel with well rounded periphery but a small base, used for cooking kheer etc.खीर वगैरा कराला उपयोग कराच॑ थोर तोंड अणी ल्हान उंचाच॑ जेड/जड पात्र.मझ॑ आजीच घरांत॑ अप्पि पायसम उरळींतच करणे.from Malayalam.
urivaNeउरिवणे.vt.to save. to leave something aside (for a latter time).बाक्कि ठिवणे. नंतरशाला काढून ठिवणे.मझ॑ आजी बज्जि कराला कालिवलते उडिदाच पीठ थोडतरीन उरिवून नंतर॑ तजांतून डांगर करतील॑.उरवणे/उरविणे in sm.
urlatheउरलते.adj.that which remained unused.उपयोग करनास्क बाकी राहलते.उरलते adj that which remained unused. उपयोग करनास्क बाकी राहलते. uis संपाकीण॑ तिज काम पूरा करून गेलांपिरी उरलते काम कायतरीन असलतर॑ ते मझ बाईल करल॑.
urNeउरणे.vi.to remain unused. उपयोग करनास्क बाकी राहणे.अम्च रात्रीच जेवण॑ झालांपिरी भात काहीतरीन उरून असलतर॑ कुत्राला ते घालणे आहे.
usaleeउसली.n.green gram cooked with spices.सुंडल (Tamil).मला पाष्टेच पल्हाराच बरोर उसली खाणे अवडल॑.उसळ in sm.
usheerउशीर.n.delay.देर. वेळ होणे. जपानांत ट्रेन उशीर होऊन जाऊन पावलतर॑ तुम्हाला टिकटाच पूरा पैस वापस मिळल॑.
uShNa~उष्ण nheat (on account of Sun).(सूर्याच) ऊन.भूमध्यरेखाच जवळ असाच प्रदेशांत॑ सूर्याच उष्ण जास्ति अनुभव होईल.
uShNa~उष्ण nheat in the body's system.आंगात॑ उष्ण.कित्येकदनास॑ आंगांत जास्ति उष्ण झालतर॑ उष्णाच पडसा येईल.
uShTa~उष्ट॑.n.half eaten food left in the leaf or plate.पानांत॑, नाहीतर॑, ताटांत॑ अर्ध खाऊन सोडलते जेवण॑/पदार्थ/भात.कित्येक मठांत॑ जवणे झालांपिरी हात धुवाला जाताना उष्ट॑ तुडिवनास्क॑ पाह्यींगून जानतेस्क अस्त॑. उष्टा/उष्टें in sm.
uShTa~उष्ट॑.n.anything soiled or contaminated on account of it being kept in the mouth.तोंडांत लागीवून उष्ट॑ केलत॑ साधन॑.नंख उष्ट॑ करनको म्हणून कितीदपा सांगटल तरीन तो ऐकना. सदा बोट तोंडांतच असल॑.उष्टा/उष्टें in sm.
uShTa~उष्ट॑.adj.unwashed (mouth and hand after eating).(खालांपिरी) धुवनाते.तो उष्ट॑ हातांत॑ कोळाइ (नळ॑) फिरिवत असाच मी पाह्यलों. उष्टा/उष्टें in sm.
uShTa~उष्ट॑.adj.tasted and left portion (of food).थोड खाऊन सोडलते (पदार्थ/जेवण/भात).उष्ट॑ भात दूर टाकनास्क॑ कुत्राला देऊया. उष्टा/उष्टें in sm.
uShTa~ kharkaTa~उष्ट॑-खरकट॑ na general term for half-eaten foods and unwashed used plates or vessels.उष्ट॑ पदार्थ अणि खालानंतर॑ विसलनाते भांडि.हे काळाच पोरींस॑ उष्ट॑-खरकट॑ म्हणजे काय म्हणून कळना. सोवळे-ओवळे पाह्याच घरांत वराड करींगून गेलतर॑ कस॑ संसार कराला जातातकी.
uShTaavaNa~उष्टावण॑.n.feeding ceremony when solid food is given first to a baby.लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण.साधारण होऊन उष्टावण॑ होयापर्यंतीन ल्हान लेंकरांस॑ घट्टि पदार्थ काहीं द्याच दंडक नाही.उष्टावण/उष्टवण in sm.
uTHaNeउठणे.vi. to get up. to stand up.बसाच स्थितींतून ओठाकणे/होठाकणे. गुडिगा/गुडघा सूळामुळे, मला खाले बसलतर॑ लोक्कर उठाला होयना. काय तरीन धरींगून हळ्ळु उठालच होईल॑.the word ओठाकणे/होठाकणे appears to have either become extinct in sm, or it was never used in sm. The root may be उठणे, 'to stand up'.
uTHaNeउठणे.vi.to wake up from sleep.झोंपींतूं जागणे.पाष्टे सहा घंटेच पुढ॑ उठाला मला होईनाच होईना.
uthaNeउतणे.vi.to swell.सुजणे. फुगणे.आज पाष्टे तो अंबा तोडाला झाडाच व॑र वेघताना खाले पडला. घाव काहीं झालनाही म्हणून सांगट्ला. पण, अत्ता पाहताना हात उतून आहेस्क आहे. हड मोडलाहे वाटत॑.
uthaNeउतणे.vi.to boil and over flow.तावून पात्रांतूं बाहेर येणे. दूध तावताना उतून बाहेर येइनास्क असाला एक प्रत्येक विधाच पात्र अम्ही गेल वार घेटलों.
uTHaNebasaNeउठणेबसणे.id.to behave in a very humble or servile manner.स्वंत॑ अभिमान नाहीस्क॑ वागणे. जयललिता राज्य करताना तिज खाले काम करत होतते मंत्रीलोक तिन॑ सांगास्क॑ ऐकून उठणे-बसणे करणांत॑ पोटी घालत होते.
utharivaNeउतरिवणे.vt.to make one get down or come down. वरून खाले आणिवणे. हे पोराच चेष्टा सोसाला होत नाही. अंबाच झाडांतून उतरीवा पतोरी मला देव दिसून गेल॑.
utharivaNeउतरिवणे.vt.to set down or put down.खाले ठिवणे.अवसर॑ करनाका. बंडींतून सामान पूरा उतरिवला नंतरच मला घराच आंत याला होईल.
utharivaNeउतरिवणे.vt.to unload. सामान उतरिवणे. पूरा सामान उतरीवला नंतर मी कूलीवालाला पैसा देलों.
utharivaNeउतरिवणे.vt.to alight or disembark.(गाडींतून) खाले येणे.मझ मायेला चालाला होईना म्हणून कळींगूनीं मी त्यांस॑ गाडींतून उतरिवा पतोरी तुम्ही कां एवढ॑ आतर॑ भोगलांत॑ ?
utharivaNeउतरिवणे.vt.to make shorter. to reduce the height. उंच उणे करिवणे. घरच॑ भोंतालभिंतीच उंच जास्ति झालाहे. थोड उतरिवाम॑.
utharivaNeउतरिवणे.vt.to abate. to reduce.उणे करिवणे. कम्मि करिवणे.तज जेर जास्ति झालाहे. एक नव॑ ओखद देऊन उतरिवाला पाह्तों.
utharivaNeउतरिवणे.vt.to put down (tantrum, ego etc). उणे करिवणे. कम्मि करिवणे.तज अट्टहास जास्ति झालाहे. थोड उतरिवूंटाकून येतों.
utharivaNeउतरिवणे.vt.to doff. to strip. कापड काढिवणे. अट्टहास राहत॑ केल नाहीसतर॑ तुज कापड॑ उतरीवूनटाकन॑ !
utharNeउतणे.vi.to get down.व॑रून खाले येणे.तो नारळ॑ तोडाला झाडाव॑र वेघतानच मला कळ्ल॑, तला हे कामाच दंडक नाहीम्हणून. तो उतरून यापतोरी खाले पडलका म्हणून मला भें वाटत होते.
utharNeउतणे.vi.to abate or subside.उण॑ होणे. कम्मी होणे. गेल॑ दहा दिवसा नंतर॑ आज पाष्टे तज जेर उतरल॑. एक-दोन दिवसांत॑ आंग बर॑ होईल वाटते.
utharNeउतणे.vi.to go down (in level).कम्मी होणे. उन्हाळांतपणीं अम्च घरच॑ आडाच पाणी उतरना.
utharNeउतणे.vi.to look pulled down in health.आंग क्षीणहोऊन दिसणे.समीपांत मी राव-साहेबाना पाह्यलों. पाप, उजंड/उदंड उतरून गेलाहेत॑.
utharNeउतणे.vi.to decline or deteriorate.उण॑ स्थितीच होणे.दुसर॑ लोकयुद्धाच नंतर॑ अमेरिका एक "महाशक्ति" झाल॑. पण, अत्ता ते स्थिति उतराच लक्षण आहे.
uTHathaa* basathaa*उठतांबसतां.adv.at each and every stage.एक एक स्थितींतीन. एक एक वेळीं. उठतांबसतां अग्गिदनालीन कायतरीन आज्ञा देत असाच एक वंगळ॑ स्वभाव तिला आहे. उठताबसता in sm.
uthbhavउत्भव.n.origin.आरंभ.पावसाळाच वेळांत पाऊसाच पाणीहीं, उन्हाळाच वेळ हीम विघरून याच पाणीहीं असामुळे हिमालय पर्वतांत॑ उत्भव होयाच सगळ॑ नदींतीं वर्ष पूराईं पाणी असल॑.
uthirउतिर adjnot sticking together (eg, cooked rice).मोकळ॑. चिकटनास्क॑ वेगळ॑ वेगळ॑ असाच.नव॑ तांदूळांत भात करतम्हा उतिर-उतिर भात पह्जे म्हण्जे पाणी उणे घालाम॑. नाहीतर मुद्दा होईल. from Tamil.
uTHivaNeउठिवणे.vt.to wake someone up from sleep.झोंपींतूं जागिवणेझोंपींतून दिडीरशी उठिवलतर॑ लेंकरे रडणे साधारणच. उठविणे/उठवणे in sm.
uTHivaNeउठिवणे.vt.to cause to get up or stand up.उठिवणे.त्यंच घरच॑ कुत्र सदाहीं टीवीच समोरल॑ सेट्टींतेच निजून पडलसेल॑. तिकिडून तला उठिवणे म्हणजे ब्रह्मप्रयत्न करलतरीन होईना.उठविणे/उठवणे in sm.
uthivaNeउतिवणे vtto boil-over (eg. milk).ताविवून बाहेर आणिवणे. गृहप्रवेशाच वेळी दूध ताविवून उतिवाच एक पद्धत॑ आहे.
uthkanTHaaउत्कंठा.n. anxiety. मनाच गाढ चिंता.गल्फ देशांत उद्योग मिळ्ळ॑ म्हणून गेलते पोराकडून कागदकी ए-मेलकी येऊन उदंड दिवस झाल॑ म्हणून तज बापाला फार उत्कंठा झालाहे.
uTHoon basaNeउठून बसणे.id.a dormant thing becoming active again. re-emergence (of a situation).(एक कार्य) पुन्हा प्रत्यक्ष होणे. (एक कार्य) पुन्हा व॑र येणे.हैदराबादांत तेलेंगाणा विषय पुन्हा उठून बसलाहे. एकपठीस श्री कृष्णा कमीषण त्यंच रिपोर्टांत काय लिवणार की अम्हाला कळना. अण्खीएक पठीस 'गद्दर' (नाक्सलैट लोकाना प्रेरणा देणार) त्यंच नव पार्टी आरंभ केलाहे अणी त्यंच मुख्य उद्देश 'तेलेंगाणा' स्थापना कराचच॑.
uTHoon hoTHaakaNeउठून होठाकणे.vi.to stand up.बसाच॑ स्थितींतूं हो(ओ)ठाकणे. उठून हो(ओ)ठाकणे.बसलते ठामी बसींगून अग्गिदनालीन आज्ञा देत होतते मनुषाला उठून होठाक म्हणून सांगून दोन रपाट देलों मी.
uTHoon oTHaakaNeउठून ओठाकणे.vi.to stand up.बसाच॑ स्थितींतूं ओ(हो)ठाकणे. उठून ओ(हो)ठाकणे.घराला कोणतरीन अतिथीलोके आलतरे उठून-ओठाकून त्यांस स्वागत कराच दंडक अम्हास आहे.
uthoon yeNeउतून येणे.vi.to boil and overflow. उतून पात्रांतून बाहेर येणे.गृहप्रवेश सणाच वेळी दूध तावून भांडीच बाह्येर उतून येम म्हणून आहे.
uthpaadana~उत्पादन॑.n.creation. production. निर्माण.आर्सलर-मिट्टल स्टील कंपनि भूलोकांतच॑ सगळांचीन पक्षा जास्ति लोकुंडाच उत्पादन करते.
uthpanne~उत्पन्न॑.n.produce.उत्पन्न॑.हे वर्ष झालते चोखोट पाऊसामुळे शेतीच जमीनांत॑ उत्पन्न॑ बेष झालाहे.
uthpaththiउत्पत्ति.n.origin.आरंभ होणे. उरपत्ति (Tamil). विदेश व्यापार करताना सामग्रींच उत्पत्ति कोण्त देशांत॑ झाल॑, हे विषय अधिकारींस॑ लिव्हून कळिवाम॑, अस॑ एक नियम आहे.
uthpaththiउत्पत्ति.n.production. उरपत्ति (Tamil). भूलोकांतल॑ वेगळ॑ देशाच बरोर पाह्ताना दूधाच उत्पत्ति भारतांत॑ सगळ्यांच पक्षा जास्ति आहे.
uthsaahउत्साह.n.enthusiasm.उत्साह. चेन्नैच मेरीना बीचाला बलाईंगून जोतों म्हणून सांगटल की नाही, रडत होतते लेंकरू उदंड उत्साहांत॑ तिकड जायाला तय्यार होयाला आरंभ केला.
uthsaahउत्साह.n.delight.उत्साह.उदंड दिवसापसून पह्जे म्हणून विचारत होतते बावोली लोक्करच मिळाला जात॑ म्हणून ऐकून तिला फार उत्साह झाल॑.
uthsavउत्सव.n.festival.सण॑.वर्षा-वर्षी याच श्री राघवेन्द्रस्वामीच आराधना उत्सवाला मी मझ संभावना चुकनास्क॑ देणे आहे.
uthsav moorthiउत्सव-मूर्ति.n.God's idol used for puja outside the sanctum sanctorum.गर्भग्रहाच बाहेर पूजा कराला उपयोग कराच देवाच विग्रह॑.उडुपी क्षेत्रांत॑ रथोत्सवाच समय देवाच उत्सव-मूर्तीला अलंकार केलते रथांत॑ बसिवून मिरिवणे कराच पाह्याला गंभीर अस्त॑.
uththaana dwaadasheeउत्तान द्वादशी.n.the day of the religious festival conducted during Karthika month for celebrating the wedding of Tulasi with Lord Vishnu.कार्तिक महिनेंत कराच तुळसी-विवाह सणाच दिवस.उत्तान द्वादशीच सणांत तुळसीमंटपांत अवळाच काठी रोवून ठिवाच्याला कारण काय म्हणजे, विष्णूच सानिध्य असाच साळिग्रामशिलाच बदिल अवळा ठिवतों म्हणाचच॑.
uththamउत्तम.adj.very good. excellent. उदंड॑ चोखोट.दरएक मायबापीं त्यंच लोंक/लेंक वेगळे लेंकरांस एक उत्तम उदहरणास्क॑ असाम॑ म्हणून आशा ठींगणे सहजच॑.
uththappamउत्तप्पम.n.a dosa like preparation.धिरडेस्क॑ एक खायाच पदार्थ. उत्तप्पम कराला म्हणून पीठ कालीवून ठिवणे थोड अप्रूपच. कां म्हण्जे, नुस्त पीठांत॑ उत्तप्पमाला पह्जते कांदा मिळिवलतर॑, तेच दिवस चूलीच व॑र शिजिवून काढलनाहीतर॑, पीठ लोक्कुर विटून हाळ होईल.from Kannada/Tamil.
uththarउत्तर.n.North. उत्तर दिशा.महाराष्ट्रा राज्य कर्नाटका राज्याच उत्तर भागांत आहे.
uththarउत्तर.n.answer. बदिल. जवाब.इषोबाच/हिषोबाच परीक्षांत॑ मोत्तम पन्नास प्रश्नांत॑ मला अठ्ठेचाळीस प्रश्नाला बरोरल॑ उत्तर द्याला झाल॑.
uththaraaउत्तरा.n.name of a star or constallation in the Indian astrological system consisting of 27 such groupings in the zodiac. जोतिषशास्त्रांत एक नक्षत्राच नाव. उत्तरा नक्षत्राला उत्तरा-फलगुनी नक्षत्र म्हणूनपणीन सांगणे आहे.
uththaraayanउत्तरायन॑.n.movement of the sun towards north.सूर्य उत्तरदिशाला जायाच॑.अम्च देशाच उन्हाळाच ऋतु उत्तरायनाच वेळांत॑ होत॑.
uththathyaaउत्तत्या.n.dried dates.वाळलते खर्जूर. दुधांत दोन उत्तत्या, मिरे, हळेद/हळदी हे सर्वीं घालून कढिवून नित्य पीलतर॑ अम्च रक्तला पुष्टी मिळल॑. मात्र न्हो, पडसा-खोंकळा हे अग्गीन सुलुभांन॑ येईना.
uththreeya~उत्तरीय.n.upper cloth covering torso of a man.आंगाच व॑रच भागांत॑ पांघरिवून नेसाच कापड. अंगवस्त्र. अंगोस्त्र॑.तिरुवनंतपुरमाच अनंतशयन देऊळाच गर्भगृहाच जवळ जाताना उत्तरीय नेसींगटलसलतर॑ ते काढून हाती धरींगणे, नाहीतर॑ मादावर बांधणे विना देवाच दर्शन कराला सोडनाते.

No comments:

Post a Comment