Saturday, March 22, 2014

u (उ) 1 (ubaaraa To uNepakShaa)




.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
ubaaraaउबारा.n.sultriness. ऊब. उष्ण.रात्रीच वेळ आकाश वांबाळा/वामाळा असलतर॑ उबारांत॑ घाम सुटून झोंपीला तंटा होईल.
ubbasउब्बस.n.overpowering and debilitating mental state.मनाला उदंड कष्टकी, संकटकी वाटणे. ऊर चेंपास्क॑ मनाला वाटणे. त्यंच लोंक पुन्हा परीक्षांत॑ हरला म्हणून ऐकून तेनी उब्बस करींगून बसले.
uchakaaउचका.n.hiccup.उचकी. गोचका. गुचकी. पोटांतूं आरंभ होऊन गळांतून अपाप एकदम याच एक शब्द. उचकाला शांत कराला एक घास पाणी सात दपा थोड थोड गिळून पीलतर॑ पुरे अस॑ सांगणे आहे.
uchakeeउचकी.n.hiccup. उचका. गोचका. गुचकी.चूळ भरींगून पाणी सात दपा थोडक थोडक॑ गिळलतर॑ उचकी राह्यील॑ म्हणतात॑.
uchalNeउचलणे.vt & vi.to lift up.वर करणे.मादसूळांत॑ अवस्था भोगत होतों ते मुळे मला ट्रैनांत॑ सामान उचलून व॑र ठिवाला झाल नाही.
uchaloon ghaalNeउचलून घालणे.id.to be shocked by sudden nasty surprise. एकदम भेहीं आश्चर्यहीं होणे. रालच झाल नाही.उदंड दिवसा पसून आंगाला बर॑ होत नाही म्हणून मला कळ्ल॑ होत तरीन तज रोडे झालते आंग पाव्हून मला उचलून घाटले. तो एवढ॑ मोस॑ झालाहे म्हणून मला विश्वास करालच झाल नाही.
uchaTaNeउचटणे.vt.to detach (anything stuck or fixed).(चिकटून, अथवा, घट्टि धरून असाच वस्तूला) उकरून काढणे.धिरडे उचटून काढला नंतर तवाच बुडांत चिकटून असाच करपलते पीट खायाला मला उदंड अवडल॑.
uchaTaNeeउचटणी.n.a wooden or iron ladle with a flat end used for turning around a dosa being cooked on a hot-plate.तवांत॑ धिरडे परतिवाला उपयोग कराच पळी सार्खल॑ एक उपकरण॑. हेज एक अग्र चपटा अस्त॑.टेफलोन लिंपलत॑ तवांत॑ धिरडेला उचटणींतून परतिवून घालताना धिरडे निसरून चूलीच व॑र पडाला साध्य आहे म्हणून दत्तन असांव॑.
uchchaarउच्चार.n.pronunciation.बोलाच रीती.तंजावूर मराठी बोलणरांच उच्चारांत॑ तमिलाच शैली फार मिळून आहे तरीन ते बरोर कराला कोणीं प्रयत्न करास्क॑ मला दिसत नाही.
uchchaaraNeउच्चारणे.vt.to utter. to pronounce.बोलून दाखिवणे.दक्षिणी मराठी लोके त्यंच भाषा बोलताना महाराष्ट्राच लोकांस ते बरोर समजनात्याला एक मुख्य कारण बोलाच रीती, म्हणजे उचारणे विचित्रविणी कानांत पडते म्हणाचच॑.
uchcHiShTa~उच्छिष्ट.adj.tasted food.उष्ट केलते पदार्थ. उष्ट॑. येतान येतान मला कोण्त होटलांतीन जायाला अवडना, कारण तिकडल॑ पदार्था उच्छिष्टका नाहीका म्हणून सांगाला होईना.
uchcHiShTa~उच्छिष्ट.n.a person who mixes up remains of a food partly taken with fresh food.उष्ट-खरकट पाह्यनाते लोक॑. हे काळाच पोर-पोरींला उष्ट-खरकट काय म्हणून कळत नाही. असल॑ उच्छिष्ट लोक खालते ताटांत उरलते पदार्थ बाकी खरकटा बरोर मिळवून "रेफ़्रिजिरेटरांत" ठिवतात॑.
uchithउचित.adj.proper.योग्य.अम्हाला एक विष्याच विषयीन बरोर कळनातर॑, तजव॑र चर्चा होत असताना तोंड झांकींगून उगे बसणे उचित.
udaaharaNe~उदाहरण॑.n.an example.दृष्टांत.बाळपणांत॑ माय-बापांच बरोर घरांत॑ वाढून त्यंच संरक्ष्ण॑ मिळ्ल॑ नाही तरीन, स्वंत श्रमांत॑ पुढ॑ याला होईल म्हणून करून दाखिवलते अमेरिकाच राष्ट्रपति बराक ओबामा हेला एक मोट्ठ॑ उदाहरण आहेत॑.
udaarउदार.adj.generous.थोर मनाच॑. धाराळ॑.मझ॑ पणजा उदंड उदार मनाच होते, ते करतां त्यांस॑ "उदार सिरोमणी" अस॑ एक बहुमानाच बिरुद ट्रावनकूर महाराजा 1924-आंत॑ देले.
udaasउदास.adj.depressed. dejected.मनाला वाटाच संकट. मनाला वाटाच दुख. एक कार्य झाल नाही म्हणून मन्न उदास करींगून बसापक्षा पुन्हा बेष प्रयत्न करून ते कार्य साध्य कराला पह्जे.
udalaadiwasउदलादिवस.n.birth day.उजलादिवस. उजलते दिवस. जन्म झालते दिवस.अम्च नातू जनुवरी पहिले दिवस उजला ते करतां, तज उदलादिवस कोणालीन विसराला होईना.
udanDe~उदंड॑.adj.a lot. उजंड॑. भरून. फार.भारताच संस्कृति उदंड॑ पुरातन आहे. पांच हदार वर्षाच पुढ॑ मोहन-ज-दारो, हडप्पा असल॑ ठिकाणांतून खोदून काढलते पुरावस्तांतून हे अम्हाला कळते.
udanDe~उदंड॑.adj.much.उजंड॑. भरून. फार.मी ल्हान असताना मझ॑ बापाकडून उदंड मार खालोहें.
udanDe~उदंड॑.adj.abundant. उजंड॑. भरून. फार.हे वर्ष अंबाच झाडांत॑ उदंड फूल॑ सोडलाहे.
uDaNeउडणे.vi.to fly. आकाशांत॑ संचार करणे. हुडणे.नव॑ होऊन अंडा तोडून बाह्येर आलते पक्षींला उडणे समेच येईना, पण थोड दिवस झालांपिरी येईल॑.
udaNeउदणे.vi.to be born.उजणे. जन्म होणे.मांदराच पिल्लू उदून सात आठ दिवसा नंतरच दोळे उघडेल॑.उपजणे in sm. uis
udaya~उदय nrising of Sun, Moon or stars. सूर्य, चंद्र अथवा नक्षत्र आकाशांत॑ व॑र येणे. ध्रूव प्रदेशांत॑ अस्तमन॑ झालांपिरी सुमार सहा महिनाला सूर्याच उदय होईना.
udbhavउद्भव.n.coming into being.उतपन्न होणे.हिमालया पर्वतांत गंगोत्रींतून गंगा नदीच उद्‌भव होत आहे.
uddeshउद्दे‌‌श.n.intention. purpose. मनांतल॑ आवश्य. तात्पर्य. उदंड दिवस मझकड॑ बोलानास्क असून अत्ता तो मला मिळाला आलाहे. तज उद्देश काय मणून कळत नाही.
uddhaarउद्धार.n.upliftment.उण॑ स्थितींतूं चोखोट स्थितीला आणणे. दलित वर्गाच लोकांला उद्धार कराला सरकार उदंड कार्यक्रम काढलाहे.
uddhaarउधार.n.transactions on credit or on trust.ऋणांत/रीणांत॑ कराच व्यापार. अम्च॑ घरच॑ बाजूच दाळ-तांदूळाच दुकानवाला सामान उधारांत देईनाच देईना.
uddhaarउधार.n.money owed on credit purchase.रीणांत घेट्लते सामानाच मोल.मझ॑ मामाकडे एक चोखोट गुण होत॑. महिना-महिना धर्मा मिळतानच कोणाला-कोणाला पैसे देमते आहेकी ते समच देऊनटाकतील॑. त्यांस॑ उधाराच पैसा हात्ति ठींगणे अवडनाच अवडना.
uddhaarउधार.n.goods held on credit purchase.रीणांत घेट्लते सामान. स्वंत बंडवाळ घालनास्क॑ उधाराच माल ठींगून व्यापर केलतर॑ तसल॑ माल देणार विपरीत बड्डि उप्पडतील॑.
uddhaaraNउद्धारण.n.restoration.जीर्ण झालते वस्तु बरोर कराच॑. उद्धरण.हे जवळ॑ बंगळूरच जवळ असाच रामूहळ्ळी म्हणाच खेडेगांवांत श्रीरामाच देऊळ उद्धारण केलते प्रकल्पाला अमच॑ विहीण अध्यक्ष म्हणून होते.
uddhaaraNeउद्धारणे.vt.to restore.जीर्ण झालते वस्तु बरोर करणे. उद्धरणे.रामूहळ्ळी श्रीरामाच देऊळ उद्धारणे कराला सुमार एक वर्षाच वेळीन वीस लाख रुपेहीं खर्च झाल॑, पण काम सार्थक झालकी म्हणून अग्गिदनासीन संतोष वाटल॑.
uddharaNउद्धरण.n.restoration.जीर्ण झालते वस्तु बरोर कराच॑.यंत्र, उपकरण॑, व्यवसाय/वाणिज्याला पह्जते सामग्रि वगैर निर्माण कराच कारखानांतून येत असाच धूपामुळे ताज-महळाच बाहेरच भाग पूरा पिवळ॑ रंगाच डाग झालते, उद्धारणाच नंतर॑ अत्ता पाह्याला थोड बर॑ झालाहे.
uddharaNeउद्धरणे.vt. to restore.जीर्ण झालते वस्तु बरोर करणे.कंबोडिया देशाच पुरातन हिंदु देऊळ, अंकोर-वात, तज जीर्ण स्थितींतून उद्धारण॑ करिवाला भारतांतून पुरावस्तु विभागाच अनेक लोक गेल्होते.
uddharaNiउद्धरणि.n.a small spoon used in pooja. पूजाला उपयोग कराच चमचा.दिवसोडीच पूजाला मी एक तांम्रेच उद्धरणीनिं सणाच दिवसी रुपेच उद्धरणीनिं उपयोग करतों.पंचपात्र and उद्धरणि form the set.
uDeeउडी.n.a leap. a jump. हुडी.ट्रिपल-जंप (म्हणजे हॉप-स्टेप अंड जंप) हेजांत दोन उडी अणी एक लांब पाऊल असते.
uDeedउडीद.n.a type of pulse.एक रीताच धान्य/धान. उडीदाच पीठाच बज्जि, नाहीतर॑, डांगर खायाला फार रूच अस्त॑.
udghaaTanउद्घाटन॑.n.inauguration.समारंभ आरंभ करणे. कार्यक्रम आरंभ करणे.अम्च॑ साळेच नव॑ मैदानाच उद्घाटन कराला अम्ही विद्याभ्यास मंत्रीला एक आमंत्रण पत्र पाठिवलों.
udhayउधय.n.white ant.पंढ्र मुंग्या.घरांत उधय वेघनास्क॑ असाला तम्ह-तम्हा नुस्त॑ व॑रून औषध (ओखद) बडिवलतर॑ पुरना, घरच॑ अस्तिवाराच (पायाच) खाले पर्यंतीन औषध पोंचास्क॑ भोई खोदून औषध घालाम॑.उधई/उधय in sm.
uDimaarNeउडिमारणे.vt.to leap. to jump.हुडिमारणे.दुपारच॑ झोंपीच वेळी इकडे तिकडे उडीमारून धिंगाणा करत होतते पोरांस बेष शिवा देवून त्यंच त्यंच घराला पाठिवूनटाकलों.
uDivaNeउडिवणे.vt.to fly.आकाशांत॑ सोडणे. दुसरे पोरे पतंग आकाशांत॑ उडिवताना तज दोरा कापाला कित्येक वक्र बुद्धीच पोरे प्रयत्न करतील॑. हे कामाला तेन्ही मांजाच दोरा प्रयोग करणे आहे.
uDivaNeउडिवणे.vt.to set off (an explosion).विस्फोट करणे. दीपावळीच सणांत॑ पटाकी उडिवणे म्हण्जे पोरांस॑ फार मजा येईल.
udyaaउद्या.n.tomorrow. आजच नंतरल॑ दिवस. उजा.काल मझ॑ मित्राला दुकान-बीदींत उदंड दिवसानंतर॑ मिळताना अमच॑ घराला कां अत्ताअग्गीन येतनाहीस म्हणून विचारत्याला बरोर बदिल देनास्क॑, उद्या कंडिप येतों म्हणून म्हणट्ला.
udyaa naahee paramaaउद्या-नाही-परमा.n.day after tomorrow.आज सोडून दोन दिवस नंतरल॑ दिवस. परमा दिवस. उद्या-नाही-परवा.उद्या-नाही-परमा गांधि जयंती असाकरतां बॅन्काला सुट्टी असेल॑.
udyaa naahee theramaaउद्या-नाही-तेरमा.n.the third day after today.आज सोडून तीन दिवस नंतरल॑ दिवस. तेरमा दिवस. उद्या-नाही-तेरवा.उद्या-नाही-तेरमा इषोबाच परीक्षा ठींगून आज तो एक सिनिमाला गेलाहे म्हणून ऐकून मला अस॑ वाटल॑, तला वाचणेंत तात्पर्य आहेकी नाहीकी म्हणून.
udyaanउद्यान.n.park. garden.बाग.गिरिनगरांत अमच॑ घराच दोन पटीसीन फार जवळ एकेक उद्यान आहे अणी दिवसोडी पाष्टे मी चालाल जाताना एक दिवस एक उद्यानाला जाणे अणी अण्किएक दिवस दुसर॑ उद्यानाला जाणे अस॑ करत असतों.
udyogउद्योग.n.employment. करेचीच काम. हे काळांत बेष वाचलतरच॑ एक उद्योग मिळल, अस॑ काहीं नाही. देश उदंड विकास झालाहे, ते करतां एक मादिरीच काम कोणालीं मिळल॑.
udyogउद्योग.n.occupation (for earning money).(पैसा संपादाला कराच) व्यापार-व्यवसायाच उद्योग.
udyogउद्योग.n.business.धंदा.
udyogacHedउद्योगछेद.n.suspension from service.उद्योगांतून सध्याला सरकिवणे.
udyoganivruththउद्योगनिवृत्त॑.n.retirement from employment.उद्योगांतून निवृत्त होणे.
udyogaraddउद्योगरद्द.n.dismissal from service.उद्योगांतून सरकिवणे.
udyogathyaagउद्योगत्याग.n.resignation from service.उद्योगविराम. उद्योग सोडणे.
udyogeeउद्योगी.n.employee.कामांत॑ असणार.केंद्र-सरकाराच उद्योगी लोकांस अग्गीन अत्ता चोखोट धर्मा अणी पेन्शन मिळते, जुने काळास्क॑ नोहो.
ugaadiउगादि.n.new year.गुढी पाडवा.उगादी सणाच दिवसी घराच बाह्येर गुढी बांधाच दंडक आहे.
ugaNeउगणे.vi.to bloom.(फूल)विकास होणे. मोहरणे.कीडा चावून हाळ होयनास्क॑ असाला मोहर॑ उगाच पुढेच अंबाच झाडाला वेळा-वेळी ओखद बडिवणे आहे.उगवणें in sm.
ugaNeउगणे.vi.to come forth (as when the day breaks ).प्रत्यक्ष होणे.दिवस उगतानच अवसर॑-अवसरांत॑ स्नान वगैरा करून लोक्कुर-लोक्कुर पल्हार खाऊन रेल-वे स्टेषनाला पळून गेल नाहीतर॑ मला ऑफीसाला बरोरल॑ वेळाला जाऊन पावाला होईना.उगवणें in sm.
ugaNeउगणे.vi.to come forth (as when the sun rises).प्रत्यक्ष होणे. पाष्टे पाष्टे दिवस उगताना बागांत चालाल जाणे आरोग्याला चोखोट म्हणतील, कारण ते समयांत बागांतल॑ वारेंत ऑक्सिजन भरून असेल॑ म्हणून.उगवणें in sm.
uge~उगे.adv.simply.नुस्त तसच.मला तुम्च घराला हे अयितवार याच उद्धेश आहे. काहीं नाही, उगे तसच !
uge~उगे.adv.without a purpose.आवश्य नाहीस्क॑. उद्धेश नाहीस्क॑.मी ओफीसाल जायाच अवसरांत॑ तो मझकडे उगे बोलून मझ वेळ हाळ केला.
uge~उगे.adv.still. without moving. हलनास्क॑. (1) मला तो उगे बसाला सोडना. कायतरीन काम सांगत असल॑. (2) कुत्र चावाला येताना अम्ही पळनास्क॑ उगे असणेच चोखोट.
uge~उगे.adv.at rest. at ease. आराम होऊन.पार्कांत॑ उगे बसाला मला उदंड अवडल॑.
uge~उगे.adv.silently. श्ब्द नाहीस्क॑. साळेंत॑ पोरे फार गलाटा करत होते. पण, पंतोजीला पाव्हूहून उगे झाल॑.
uge~उगे.adv.without reason, need, cause, grounds etc.कारण नाहीस्क॑.उगे मला तंटा कर नको.
uge~उगे.adv.free (without charging).पैसा घेनास्क॑.हे अंगी दुकानवाला मला उगे देला.
uge~उगे.adv.without working or doing.काहीं करनास्क॑.उगे बसल॑ तर कोण्हीं तुम्हाला परवा करनात॑.
uge~उगे.adv.without speaking.बोलनास्क॑. मी तिला हाक्कामारताना तिन॑ उगे बसल होती.
uge~उगे.adv.without a profession or business.काम नाहीस्क॑. स्वस्थ. रिकाम. रिटैर झाला नंतर मी अत्ता उगे बसलाहें.
uge~ uge~उगे-उगे.adv.simply. just like that.नुस्त तसच.उगे-उगे लटक॑ बोल नको.
ugechउगेच.adv.for no reason. उगोच. कारण नाहीस्क॑.तू घरांत असतोस म्हणजे तुला पाह्याला हेतों. विशेष काहीं नाही, उगेच. उगीच/उगाच in sm. All meanings of उगे given here would apply contextually in the adjective form of the word also.
ughaDe~उघड॑.adj.bare. naked.आंगाच व॑र कापड नाहीस्क॑ असणेहिंवाळाच कळांत॑ उघड आंगांत॑ असलतर॑ मला निश्चय होऊन पडसा येईल.उघडा in sm.
ughaDe~उघड॑.adj.of transparent (intentions etc).स्वच्छ (उद्देश etc).आजूबाजूच देशाच बरोर पाकिस्थानाच वागणे उघड॑ नाही म्हणून भारताच सांगण॑ अत्ता-अत्ता अमेरिकाला कळत येत आहे.
ughaDe~उघड॑.adj.open (land, space, things etc).उधड॑ स्थल, ठिकाण, साधन॑. मोकळ॑.अम्ही ल्हान असताना अम्च अम्मा घरच॑ मोट्टे-माडींत॑ उघड॑ ठिकाणी वडाम वाळिवाला घालून, ते कावळा काढींगून जायनास्क॑ असाला अम्हाला बसिवत होते.
ughaDNeउघडणे.vt.to open.उघडणे. मोट्ठ॑ वार॑-पाऊस येताना खिडकी उघड॑ ठिवलतर॑ कंडिप होऊन खोलीच आंत॑ पाणी बडिवल॑.
ughaDNeउघडणे.vt.to remove the cover.झांकून असलते उघडणे. साखरेच डब्बि उघड ठिवतर॑ मुंग्या येणेंत॑ अतिशय काहीं नाही.
ugochउगोच.adv.for no reason.उगेच. कारण नाहीस्क॑.जातां येतां उगोच तिला मष्किरी करत असतो तो. उगीच/उगाच in sm.
ugra~उग्र.adj.ferocious.भयंकर.हिरण्यकशिपूला वध करून भयंकर आवेशांत॑ होतते नरसिंह देवाच उग्र रूप शांत कराला प्रह्ळादाला विना वेगळ॑ कोणालीन झाल॑ नाही.
ugraaNaach kholiउग्राणाच खोली .n.store room.संपाकाच साधन (सामग्री) दत्तन ठिवाच खोली.जुने काळांत एक-एक घरांतीन उग्राणाच खोली होते, पण तज विषयीन अत्ता योचना करताना तज आवश्य होतका म्हणून वाटते.
ujaaउजा.adv.tomorrow.उद्या.उद्या म्हणाच गोष्ट भरून दक्षिणी मराठी लोके उजा म्हणून उच्चारण करतात॑, पण हेजांत चूक काहीं नाही, कां म्हणजे द अणी ज हे दोन शब्दीन एकालेक बदलिवून उच्चार कराच दंडक यांस आहे.
ujaaDउजाड.n.brightness. light.प्रकाश. दिवा.चोक्कोट उजाड असाच ठिकाणी रोवलतरच॑ झाड बरोर वाढल॑.उजाड in sm means desolate, barren.
ujaLउजळ adjfair. bright. light complexioned.पाह्याला बेष गोर॑ असाच॑. पोरे सावळे असल तरीन, तेनाला येणार नवरी उजळ असाम म्हणून आशा भोगतात॑.
ujalaadiwasउजलादिवस.n.birth day. उजलते दिवस. उदलादिवस. जन्म झालते दिवस.अम्च नातू जनुवरी पहिले दिवस उजला ते करतां, तज उजलादिवस कोणालीन विसराला होईना.
ujanDa~उजंड॑.adj.plenty.उदंड॑. भरून. फार. भारताच संस्कृति उदंड॑ पुरातन आहे. पांच हदार वर्षाच पुढ॑ मोहन-ज-दारो, हडप्पा असल॑ ठिकाणांतून खोदून काढलते पुरावस्तांतून हे अम्हाला कळते.
ujanDa~उजंड॑.adj.much.उदंड॑. भरून. फार. मी ल्हान असताना मझ॑ बापाकडून उदंड मार खालोहें.
ujanDa~उजंड॑.adj.abundant. plenty. very much. उदंड॑. भरून. फार. हे वर्ष अंबाच झाडांत॑ उदंड फूल॑ सोडलाहे.
ujaNeउजणे.vt.to be born.जन्म होणे. उदणे.मांदराच पिल्लू उजून सात आठ दिवसा नंतरच दोळे उघडल॑.उपजणे in sm. uis
ujava~उजव॑.adj.right side.उजवीकडे.राम निवासांत॑" अम्च घर सहावां माडींत॑ उजव॑ पटीसांत॑ आहे. उजवा in sm.
ujivaNeउजिवणे.vt.to give birth to. to procreate.जन्म देणे.बरोरल॑ समयांत, म्हणजे चाळीस वार झाल नंतर॑ नैसर्गीक होवून लेंकरू उजणेच चोखोट म्हणतात॑, कारण सिसेरियन ऑपरेशन करून वेळाच पुढे उजिवलतर॑ नंतर॑ उजाच लेंकरांसपणीन तसच सिसेरियन करून उजिवामते पडेल॑. उजवणे/उजविणे in sm means (1) 'to get one married' and (2) 'to attain safe deliverance'.
ukaD thaandooLउकड-तांदूळ.n.par-boiled rice.उक्कड-तांदूळ. हलक॑ होऊन कोंडानीशी शिजिवून काढलते साळी.नुस्त तांदूळांत॑ कराच पक्षा उकड-तांदूळांत इड्ळी केलतर॑ बेष मौ (मऊ) होऊन येईल॑.
ukaDNeउकडणे.vi.to be sultry.उष्ण होणे.गेल एक वारापसून ऊन उदंड जास्ति झालाहे. अण्कीन अस॑ उकडत असलतर॑ एक एर-कंडीष्णर घेऊनच सराम॑ वाटत॑.
ukaDoon bhaajaNeउकडून भाजणे.fig.to feel the oppressive sultriness of the Sun's heat.ऊभाच फार तंटा होणे.बांगळूराच हायशी असाच वातावरणांत एवढ॑ दिवस राहलांपिरी चेन्नैला जायाला मला भें वाटते. रात्रीं-दिवसीं तिकड उकडून भाजत अस्त॑.
ukalNeउकलणे.vt.to untie. to unpack.बांधलते उघडणे.दुकानांतून मी साखर॑ घेऊन आणलों की नाही, मझ॑ नातू ते पोट्लम समच उकलून साखर॑ पूरा खाले सांडला.
ukaloon soDlathe manuShउकलून सोडलत॑ गाढव.say.a person who has been let loose to his own wayward and irregular ways.अवघड वाटेला सोडलत॑ मनुष. ल्हान वये पसून तज बाप माय तला बरोर वाढिवल॑ नाही म्हणून अत्ता एक उकलून सोडलत॑ गाढवास्क॑ हिंडत पडलाहे.
ukarNeउकरणे.vt.to scratch or scrape with a slight incision.खाजिवून काढणे.ते लेंकरूला पांयेंच फोड येऊन दहा दिवस झालतरीन अण्खीन वाळल॑ नाही. केम्हाहीन फोडाला उकरून-उकरून वाळाला सोडतच नाही.
ukaroon kaaDhNeउकरून काढणे.id.to provoke or dig out a fight.आवश्य नाहीस्क॑ एक भांडणे आरंभ करणे.बाजू घरच॑ नव॑ सून एक चोखोट पोरी झालतरीन तिज सासू सदा तिला सळिवून भांडणे उकरून काढाला पाह्त असते.
ukhaLउखळ.n.a stone mortar for pounding rice, spices etc.उसळांत॑ साळी, धान्य/धान असल॑ पदार्थ कांडाच धोंडाच साधन॑. उरळ (Tamil). समीपांतपणीं एक ल्हान गावांला गेलस्ताना उखळांत साळी कांडाच मी पाह्यलों.
ukkaaDaaउक्काडा.n.sultriness. humid heat.उष्ण. ऊब. उबारा.उन्हाळाच महिनेंत॑ चेन्नैंत॑ सोसाला होईनाते एवढ॑ उक्काडा असत॑. समुद्राच जवळच ओल॑ वारामळ॑ असूया ते.
ukkaD basNeउक्कड-बसणे.vt.to squat with both feet touching the floor.पांयतळ दोनीं जमीनाला/भोईंला ठिऊन गुडिघा मुजलून खाले बसणे.उक्कडबसून जेवताने म्हणतील. कारण, ते लक्ष्मी देवीला अपमान केलास्क॑ होत॑ म्हणून.उकिडवा/उकुडवा-बसणे in sm.
ukkaD thaandooLउक्कड-तांदूळ.n.parboiled rice. rice that has been partially boiled in the husk.उकड-तांदूळ. कोंडानिशी अर्ध शिजिवून काढलते साळी. उक्कड-तांदूळीन हिरव॑ तांदूळीन मिळिवून रुब्बलते पीठांत इळ्ळग॑ करलतर॑ ते बेष मौ (मऊ) येईल.
ullaasउल्लास.n.delight.आनंद. मृगशालांत हरणाच ल्हान पिल्लू इकडे-तिकडे पळून उडीमाराच पाह्ताना काय उल्लासांत अस॑ उडीमारतका म्हणून अम्हाला वाटूनजाईल.
ulTaaउलटा. adj.reverse.उपराट.एकदपा मी कारांत॑ बांगळूराच बळेपेटाच ल्हान-ल्हान गल्लींत॑ जाऊन सांपडींगट्लों. वापस याला पूरा वाटीं उलटा पळिवत येमते पडल॑.
ulTaaउलटा. adj.obverse. उपराट.कंप्यूटरांत प्रीन्ट कराच कागदाच उलटा पटीस खालि असते म्हणून मी ते कागद फाटून टाकनास्क॑, पुन्हा तज उलटा भाग उपयोग करन॑.
ulTaaउलटा. adj.upside down.व॑र-खाले.विक्रम-वेताळ खाणींत॑ विक्रमादित्य वेताळ विचाराच प्रश्नाला अस्कीन बरोरल॑ उत्तर देतांतरूं ते समच उडून जाऊन स्मशानांतल॑ सिंसपा-झाडांत॑ उलटा लोंबून पडल॑.
ulTaaउलटा. adj.inside out. आंतल॑ बाहेर.ते ल्हान पोर केम्हाहीं बनियन उलटा घालतो.
ulTaa phulTaaउलटा-फुलटा.adv.topsy turvy.व॑र-खाले.खोलीच आंत॑ सामान बरोर जोडून ठिवाला तला सांगतल्होतों तरीन मी जाऊन पाह्ताना सग्ळीन उलटा-फुलटा पडलसाच पाह्यलों.उलटपालट/उलटापालट/उलटासुलटा in sm.
umaaTउमाट.adj.elevation. height. उंच ठिकाण. व॑रच स्थळ.अंदमान-निकोबार द्वीपांत सुनामीच पाणी येताना तिकडल॑ आदिवासी लोके पूरा उमाट प्रदेशाला पळूनजाऊन त्यंच जीवन रक्षा करींगट्ले.उमाठा/उमाट in sm.
umaaT badhkaLउमाट-बधकळ॑.adj.up and down.व॑र-खाले.अम्च देशांत पोणावांटा बीद॑ उमाट-बधकळ असते. पाह्यींगून चालल॑ नाहीतर॑ अम्ही तडकून पडओं.
umaTaNeउमटणे.vi.to feel like vomiting. to feel nauseating.वांति वाटणे. ओंकारा येणे. कोमटणे (Tamil). उमटास्क॑ वाटलतर॑ लिंबुपाणींत॑ मीठ घालून पीलतर॑ बर॑ होईल.
umbaLaNeउंबळणे.vt.to abort pregnancy.गर्भपात करींगणे. गर्भ राह्ते करणे. गर्वारपण॑ राह्ते करणेथोडक वर्षापुढे अयरलॅन्डांत भारत देशाच एक स्त्रीला स्वंत जीवन रक्षा करींगाला गर्वार राह्ते कराच आवश्य होत॑ तरीन तिकडल॑ सरकार गर्भ उंबळणे धर्म-विरुद्ध आहे म्हणून सांगून अनुमती देल॑ नाही अणी तजमळे शेवटी त्यंच जीवन बलि देमते अवस्थांत जाऊन पावल॑.
umbaraaउंबरा.n.threshold. कवाडाच खालच॑ अडव॑ लांकड.वराड करींगून नवरी पह्यिलंदा दाल्लाच घरच॑ उंबरा वलांडींगून आंत वेघताना उजव॑ पांय पह्यिल॑ आंत ठिवाम॑ म्हणून सांगणे आहे. उंबरटा in sm
uMDaasaaMbhaarउंडासांभार.n.a type of sambhar with steamed balls of pulses and cerels. शिजिवलते दाळांत केलते उंडा घालून केलते एक रीतीच सांभार.उंडासांभार तंजावूर मराठी लोकांच एक विशेष कालिवण॑ आहे.
ummaaउम्मा.n.kiss.मुक्का. चुंबन.ल्हान लेंकरांस॑ पाह्यिलतर॑ उम्मा द्याला वाटलतरीन अम्ही ते करताने. कां म्हण्जे, अम्हाला पडसा खोंकळा काहीतरीन असलतर॑ लेंकरांस ते येउया.
uNaakaउणाक.adj.of inferior (value/price).उणे स्थितीच॑.पाकिस्थानाच स्थिती पाह्ताना अत्तचपक्षा उणाक स्थितीला जाऊन पावताना ते देशाला काय होईल म्हणून अम्हाला योचना करून पाह्याला पणीन होत नाही.उणाख in sm.
unchउंच.adj.tall.गिड्ड॑ नाहीते.बास्कट-बाळ खेळणार अस्कीन साधारण होऊन उणेपक्षा सहा फ़ुट उंच असतील॑.
unchउंच.adj.heightened. उंच.हळ्ळु स्वरांत॑ आरंभ करामते गाण॑ उंच स्वरांत॑ आरंभ केलतर॑ ते ऐकाला बर॑ असना.
unchउंच.n.steep (ascent).उंच.जुन॑ काळांत॑ तिरुपतीच व॑र जायाच वाट फार उंच होत॑. ते करतां व॑र जायाला म्हणून वेगळ॑ वाट नंतर॑ केले. खाले येताना ते जुन॑ वाटा वाटी येउया.
unchउंच.n.height.उंच.(1) भूलोकांत एवरेस्ट शिखराच पक्षा उंच असाच शिखर वेगळ॑ कोण्तीन नाही. (2) पाणीच भारामळे पाऊसाच वांब॑ (मेघ) थोड खाले आसते. पण, साधारण मेघ पासुसाच वांबापक्षा उंचांत असते.
unchउंच.n.deep. depth. उंच.अम्च॑ घरच॑ आडांत पाणी पाह्मे म्हणजे लवून पाह्यलतरच होईल॑. तसलते उंच आडांत उतरताना जागृत होऊन असाम॑खोल in sm. Used in the reverse sense of "height". This usage is seen when telling about a well, pit etc.
unch karNeउंच करणे.vt.to raise. to lift.वर करणे.कवाडाच कोंडि घालाम म्हण्जे हात उंच केलतरच होईल॑.
unDaaउंडा.adj.ball shaped. spherical. गोळ आकाराच॑.बूंदि लाडू ऊंडा असाम॑-तरीन, उंडा धराच कामांतून चुकींगाला ते खारा-बूंदीस्क॑ उतिर-उतिर (मोक्कळ) करणेपणीं आहे.
undeerउंदीर.n.rat. mouse.एक ल्हान प्राणि. घरांत॑ उंदीराच तंटा उदंड झालाहे-ते-करतां अम्ही एक मांदर॑ वाढिवाला निश्चय केलों.
uNeउणे.adj.deficient. wanting. scanty. less.कम्मि.गेल वर्षाच पक्षा हे वर्ष पाऊस उणे होत॑.उणा in sm.
uNeउणे.adj.inferior (in value etc.).उणे.टाटा मोटर्साच एक लाख रुपेच बंडि घेणे कायकी उणे म्हणून कितिकी लोक म्हणींगतात॑.उणा in sm.
uNeउणे.adj.lowly. उणे.उणे जातीच लोकांला पुढे आणिवाला सरकार भरून कार्यक्रम आरंभ केलाहेत॑.उणा in sm.
uNeउणे.adj.less.कम्मि.(1) मझ॑ लोंक सहा फुट उंच आहे. पण, अम्च लेंकीच उंच पांच फुट सहा इंचच ; म्हण्जे, तिन॑ तिज भाऊच पक्षा सहा इंच उणे आहे. (2) अत्ता हैदरबादांत॑ ऊन उदंड आहे. ते पाह्ताना बांगळूरांत॑ ऊन फार उणे म्हणूण सांगूया.उणा in sm.
uNeउणे.adj.failing. imperfection.उणीवता.तुम्च मनांत॑ तुम्च लोंक वाचणांत॑ उदंड षाणा (शाहणा) म्हणून वाटूया. पण, अम्च लोंकपणीं वाचणांत॑ उणे काहीं नाही.उणा in sm.
uNeउणे.adj.minusएक संख्यांतून अण्खिएक संख्या कम्मि करणे.तो ल्हान पोर इषोबांत॑/हिषोबांत॑ उदंड षाणा (शाहणा). कित्ति थोर असाच दोन संख्या देलतरीन निमिषांत॑ एकांतून अण्खिएक उणे करून बरोरल॑ उत्तर देईल॑.उणा in sm.
uNe karNeउणे-करणे.vt.to reduce.कम्मि करणे.तो येतां-येतां विपरीत फुगत आहे. पथ्याच जेवण॑ करून जेड उणे-करींगणे तलाच चोक्कोट.
uNe karNeउणे-करणे.vt.to subtract. एक अंकांतूं वेगळ॑ एक अंक काढणे.श्रद्धा म्हणाच तला नाहीच नाही. इषोबाच (गणिताच) परीक्षांत एक प्रश्नाच उत्तर देताना अंक उणे कराच सोडून, जोडून सत्यनाश करला.
uNe saangaNeउणे-सांगणे.vt.to talk ill of. to find fault with. अपवाद बोलणे. अपवाद सांगणे. दोष सांगणे.काहीं आधार नाहीस्क॑ दुसरेंला उणे-सांगणे तज एक ओंगळ (वंगळ॑) स्वभाव आहे.
uNeevathaaउणीवता.n.deficiency. imperfection.कम्मीपण॑.वज्राच तोड घेताना वज्राला उणीवता कायतरीन आहेका म्हणून बरोर पाह्यींगून घेणे चोखोट॑.उणीव in sm.
uNeevathaaउणीवता.n.derisive or disdainful attitude.चिरड॑. एळक्करम (Tamil).अरुणोदि उठून दंडक झालते लोकांला उशीर होऊन उठाच लोकांना पाह्यिलतर उणीवता अस्त॑.
uNepaahNeउणेपाह्णे.vt.to find fault. चूक पाह्णे. मी कित्ति चोखोट काम केलतरीन मझ व॑र उणेपाह्यलतरच तला समाधान होईल॑.
uNepakShaaउणेपक्षा.n.at the least.कम्मिपक्षा. तला विसंबींगून मी मझ असाच काम सोडून तज बरोर बिसिनस आरंभ केलों. अत्ताच कळ्ल॑, तजकडे बंडवाळ सांगास्क॑ एवढ॑ काहीं नाही म्हणून. उणेपक्षा तो मला तज खर॑ स्थिति सांगट्लासलतर मी मझ काम सोडलासना.

No comments:

Post a Comment