Tuesday, April 1, 2014

TH (ठ)





.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
THaa*vठांव.n.place. location. position.ठिकाण. स्थळ. ठाम.
THaamठाम.n.place.ठिकाण. स्थळ. ठांव.एकदपा मी मैसूरांतून बांगळूराला ट्रैनांत येताना मला बसाला ठाम मिळ्लच नाही. तीन घंटे तसच ओठाकून आलों.
THaamठाम.n.location.ठिकाण. स्थळ. ठांव.एक ल्हान रोपाला/झाडाला एक ठामांतून वेगळ॑ ठामाला सरकिवून रोवलतर॑ बरोर वाढनास्क॑ मरून जाऊया.
THaamठाम.n.position.पदवी. स्थिति.(1) मझ मित्राला अदृष्ट बडिवले म्हणून सांगूया. कां म्हण्जे, उदंड हुडकला नंतर तज लेंकीला एक चोखोट ठामांत॑ वराड करून द्याला झाले. (2) एवढ॑ वर्ष कष्टि भोगलानंतर तला अत्ता एक चोखोट काम मिळ्ले. तज योग्यता पाह्यिलतर हेजपक्षा चोखोट ठाम मिळणे कष्टच॑.
THaaNaaठाणा.n.police station.पोलीसांच कचेरि.
THaskaaठसका.n.a sudden reaction from the nose, eyes or gullet due to wrongly swallowed food water etc.खायाच पदार्थ गळांत अडकताना होयाच तंटा.
THaskaa basNeठसका-बसणे.vi.to choke on food particles/liquid going into the wind pipe instead of the gullet.खायाच पदार्थ घसांत॑ अडकणे.लेंकर अवसरान॑ जेवताना त्यना ठसका बसूया. ते समयांत त्यंच पाठीवर थापटलतर॑ (थापडलतर॑) अण्खीं त्यना व॑र पाह्याला सांगीट्लतर॑ ठसका राहूंन जाईल॑.
THeekठीक.adj.correct. proper. right.चूक नाहीते.
THeekठीक.adj.okay.बर॑.
THeek THaakठीकठाक.adj.prim and proper. perfect.एकदम बरोर.
THeengaNeठींगणे.vt.to hold. to keep.धरींगून असणे. ठींगून असणे.अधीक पैसे घेऊन बाहेर जाताना हातांत ठींगून थोड दूर पणीं चालताने. काळ नासून गेलाहे.
THemठेम.n.a drop.(पाणीच॑) एक बूंद गेल वर्ष उन्हाळांत॑ अम्च "बोर-आडांत" एक ठेम पाणी पणीं न्होते. जूलै महीना पांच दिवस बेष पाऊस आलानंतरच आडांतून थोड तरीन पाणी "पंप" कराला झालते.थेम/थेमका/थेमटा/थेंब/थेंबका/थेंबटा/थेंबडा/थेंबुटा/थेंबोटा in sm.
THenchNeठेंचणे.vt.to pound in a mortar and pestle.चेंचणे. चेंचून रगडणे.पानकांत॑ वेळा नीट ठेंचून घाटलतर॑ चोक्कोट (चोखट) वास येईल॑. ठेचणे in sm.
THenchNeठेंचणे.fig.to give a hard time.कष्टि भोगिवणे. फार तंटा करणे.तो रिटैर होयाचपुढे तज वरला (एम.डी) तला फारच ठेंचला. शेवटीच तज कारण अम्हाला कळ्लते.
THikaaNठिकाण.n.place.ठाम. ठांव. स्थळ.अत्ता अम्च घर असाच ठिकाणांत्सून आंध्रप्रदेश विधान सौधा एक किलोमीटरच असल॑. असलतरीन वाहनांच गर्धीमुळ॑ (गुंपामुळ॑) मोटरांत याला दहा-पंध्रा निमिष होत॑.
THimakaaठिमका.n.drop of a liquid.द्रव्याच बूंद. थेंब. सार भात कालिवताना केत्येकदन॑ एक दोन चमचा तूप घालींगतील तरीन, मला एक ठिमका तूप पणीन बरोर पडना. ठिपका/ठिबका in sm.
THimakaaठिमका.n.dot in the forehead.बिंदीच ठिमका. पोट्टु (Tamil). पोरींना फ़ाषनाच बिंदी पह्जेस्क अस्त॑. त्यांस॑ कुंकु/चांद लाविंगे म्हणजे, अम्हाला रागिवताने म्हणून एक ठिमका ठींगतील॑ (ठिवींगतील॑). ते पणीं बरोर दिसनास्क असेल॑.
THimakaNeठिमकणे.vi.to drip. to trickle in small drops.थेंब थेंब गळणे. ठिबकणे / ठिपकणे in sm.
THivaNeठिवणे.vt.to keep. to place.एक ठिकाणि असाला सोडणे. ठिवणेलेंकरे असाच घरांत॑ ठिवलते सामान तज ठिकाणी असना. एक-एकीन तेरा-पेरा पडलसल॑.ठेवणे in sm. 

No comments:

Post a Comment