Sunday, May 15, 2016

Foreword


For those not used to it, looking up a dictionary with words arranged in the alphabetical order of Devanagari script is always a daunting task. Most Dakshini Marathi speakers are not very familiar with Devanagari script. In this background, I felt it might be a good idea to re-cast my earlier work on Dakshini Marathi Dictionary by arranging the head-words in English Alphabetical order.

Thus was born "A to Z Dictionary of Dakshini Marathi " in www.vishnugharpk.blogspot.com,

Ananda Rao Vasishta.

a (अ) 1 (abaddha~ to ammaa)




.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
abaddha~अबद्ध॑.n.blunderचूक. ब्रिटिष राज्याच ईस्ट-इंडिया कंपनीला मुगळ साम्राट जहांगीर भारतांत॑ व्यापर कराला अनुमती देलते एक अबद्ध झाले म्हणून नंतरल॑ इतिहासांतून कळते.
abhangअभंग.nhymnदेवाला सांगाच भक्ति गाणे. एक रीतीच भजनपांडुरंग विठ्ठलाला स्तुती करून सांगट्लते अभंग फार लोकप्रीय होयाला एक मुख्य कारण तजांतल॑ भक्तीरस आहे.
abhayअभय.n.protectionशरण. रक्षा.परदेशांच अभयांत॑ असलते अनेक राज्य दुसर॑ लोकयुद्धाच नंतर स्वतंत्र झाल॑
abhayअभय (adj)fearless. braveधैरी. भें नाहीतेयुद्धभूमींत॑ शत्रूच समोर अत्यंत अभय होऊन राज्याच रक्षा करणार सैनिकाला केंद्र सरकार "परम वीर चक्र" पदक देतात.
abhimaanअभिमान॑.n.prideयोग्याच गर्वतंजाऊर मराठी भाषा पुढे सुधाराम॑ म्हण्जे हे भाषा बोलणार लोक त्यंच मातृभाशा वर अभिमान दाखिवाला पह्जे
abhinandanअभिनंदन॑.n.congratulations.प्रशंसा. स्तुति.सचिन टेंडूळकर सौत आफ़्रिकाच विरुद्ध 20-20 क्रिकेट खेळांत॑ 200 रण मारताना राष्ट्रपती अण्खी प्रधानमंत्री हेनी दोघीं त्यांस अभिनंदन॑ करले.
abhinayअभिनय.n.acting a part in a play, cinema etcनाटक नाहीतर सिनिमांत॑ एक पात्राच भाग करणेसिनिमांत॑ अभिनय कराला शिकिवाच एक संस्था पुणेंत॑ आहे
abhinayअभिनय.n.name of a concept in classical Indian danceनाट्यशास्त्रांत॑ एक कल्पनाच नावकथकळी नृत्य-नाटकांत अभिनय रसाच पक्षा मुद्राच उपयोगाला प्रामाण्य देतात॑.
abhipraayअभिप्राय.n.opinionविचार एक विषयाचवर चर्चा होत असताना अम्ही अम्च स्वंत॑ अभिप्राय व्यक्त॑ करलांपिरी तज वर दृढ असणेच चोखोट
abhiShekअभिषेक.n.pouring consecrated offerings on God's idolदेवाच विग्रहाच वरून पंचामृत॑/सोन॑ असले पदार्थ घालून पूजा करणेअम्च॑ घरांत कोणाच उजलादिवस आलतरीन ते दिवस पाष्टे श्रीराघवेंद्रस्वामी मठांत जाऊन पंचामृत अभिषेक करणे आहे.
abhivaadanअभिवादन.n.homage.आदरांत॑ कराच वंदन॑.डा. अब्दुळ कलाम देशाच राष्ट्रपती असताना त्यंच सरळ स्वभाव अणी देशाला विज्ञानांत॑ एक मोठ॑ नाव करीवाला युव जनाला प्रोत्साहन॑ कराच पाव्हून त्यांस॑ पूरा देशाच अभिवादन मिळत होत॑.
abhivriddheeअभिवृधी .n. improvement.उद्धार.भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष होताहे तरीन, अनेक विषयांत॑ अण्खीन अभिवृधी होयाच आहे.
abhyaasअभ्यास.n.practiceएक काम/कार्य पुन्हा-पुन्हा करून तज विषीं बेष/बेश कळींगणेकोण्त॑ विषय झालतरीन फार अभ्यास करनातर॑ ते पूरा स्वाधीन कराला होयना
achchअच्च॑.n.mould.अच्च॑.वराडांत नवरीला मूल-पाह्याच वेळी कट्टाच (लांकडाच) अच्चांत केलते विध-विधाच साखरीच-बावोली ठिवणे आहे.from Tamil.
achyuthअच्युत.n.Lord Krishnaश्रिक्रिष्णाअच्युत म्हणाच गोष्टाच अर्थ आहे, दृढ स्थनांत॑ अथवा स्थितींत असणार, म्हणजे, कद्दीन नाश न होणार.
aDabhinthअडभिंत.n.a parapetउंच उण॑ असाच भिंत.तिरुपति देऊळांत देवाला दर्षन करालाम्हणून होठाकाच (ओठाकाच) लोकांच पंक्ति नियंत्रण कराकरतां अडभिंत बांधून तज वर कांबाच जाळीच व्यवस्था केलाहेत॑.आडभिंत in SM
aDachaNअडचण॑.n.difficulty. constraintतंटा. कष्टपैसाच काहीं अडचण असलतर संकोच भोगनास्क॑ मला सांगा. मी तुम्हाला सहाय करतों.
aDachaNअडचण॑.n.congestionगुंपामळ॑ होयाच तंटापटणाच जनसंख्या भयंकर होऊन वाढलाहे. कित्येक बीदी वाटी चालाल पणीं होयनाते एवढे अडचण॑ झालाहे
aDakaNeअडकणे.vi.to snagसांपडींगणेपतंग उडिवत अस्ताना दोरी एक नारळीच झाडांत अडकल॑ अणी ते सुटिवाला प्रयत्न करताना दोरा तुटले.
aDakaraNeअडकरणे.vt.to block. to obstruct.अडव॑ करणे. मध्य येणे. अडव॑ येणे. कापड वाळिवाच कांब नंखर॑ व॑र बांधलनाहीतर॑ लेंकरे पळा-पळी करताना ते त्यांस अडकरून खाले पडतील॑.
aDakathyaaअडकत्या.n.a scissors like instrument to slice betelnutसुपारी कापाच उपकरण॑. अडकिता. अडिकित्याजुने काळांत एक एक घरांतीन अडकत्या होत॑तरीन अत्ता ते पाह्णे फार अप्रूप झालाहे.
aDake~अडक॑ na type of cooking vessel.संपाकाच एक विधाच भांडी. अडक॑ भरून सांभार करून पणीन पुरे-पुरनास्क॑ होईल म्हणून अमच॑ आजी अण्खी एक अडकेंत॑ कढी करून ठिवले.with it's diameter smaller than it's height.
aDakithaaअडकिता.n.betelnut slicerअडकत्या. अडिकित्या. सुपारी कापाच उपकरण॑मझ॑ लेंक तिज आजीच अडकिता कोठकी हरपूनटाकून काहीनच कळनात्यास्क॑ उगे बसूनगेली.
aDakivaNeअडकिवणे.vt.to hang someting (in a hook etc.)लोंबून घालणे. अडिकिवणे. लटकिवणे साळेंतून वापस घराला अलांपिरी भिंतींत॑ असाच खिळांत॑ अडकिवलते पुस्तकाच पिशवी पुन्हा साळेला जाया पर्यंतीं उघडाच दंडक तला नाही.अडकवणे/अडकविणे/अडिकिवणे in sm means 'to hinder', 'to stop'.
aDakivaNeअडकिवणे.vt.to fasten cross-wise (as an hindrance). अडव॑ बांधून ठिवणे. अडिकिवणे. कापड वाळिवाच कांब अडकिवून बांधनको म्हणून मी तला सांगट्लोंतरीन तसच बांधूनठिवलाहे तो.
adalaa badaleeअदलाबदली.n.mixed-up. swaped.एकालेक बदलणे.सरकारी हॉसपिटलांत उजलते लेंकरांना अदलाबदली कराच विषय पत्रांत फारदपा येऊन पणीं ते अक्रम अत्तपतोरी उण॑ झाल नाही. 
aDamaanअडमान॑.n.pledge. mortgage. pawnवस्तूच जाम्य देऊन रीण काढणे. अडमान ठिवलते घर त्यांस सुटिवाला झाल नाहीfrom Tamil.
aDaNeअडणे.vi.to boil to a thick consistancy.अटणे. तावून उणे होणे. दूधपेढा करताना दूधाच अडणे बरोर गवनांत ठीवींगाम॑, कां म्हणजे, जास्ती अटलतर॑ दूधपेढा करपून जाईल.
aDaraaNअडराण.n.barren wildernessविजन (काहीं नाहीते) ठिकाण. ओस बढिवलते ठिकाण अम्ही लेंकरे असताना एकदपा अनंतशयतांतून मद्रासाला जातम्हा कोठकी अडराणांत॑ बंडीच यंत्र नाश होऊन रात्री पूरा तिकडेच राह्मते पडले.आडरान in SM
aDavaaTअडवाट॑ .n.an ill prepared by-lane.उणे रुंदाच कच्चा वाट(1) अम्च घरांतून देऊळाला एक किलोमीटर आहे. अडवाटी गेल तर॑ अर्ध किलोमीटर पणीं नाही तरीन अंधार झालांपिरी सर्पांच तंटामुळे तस॑ चालणे चोखोट न्हो. (2) ते अडवाटांत॑ सर्पांच पुत्तु भरून असाकरतां अम्ही तस॑ जाणच नाही.आडवाट in SM
aDave~अडव॑ .n.across. crossवलांडून असणे. एक बाजूकडून अण्खी एक बाजूकडे असणे(1) उंबरांत॑ पांय अडव॑ ठिवून बसताने म्हणून थोरळे सांगतील. (2) मध्यच अडव॑ वाटांतून गेलतर लोक्कुर जाउयाअडवा in sm.
aDave~ paDaNeअडव॑-पडणे.vi.to interfereअडवे येणे. मध्य पडणेतो एक अवघड मनुष. अम्च सगळे कार्यालीं अडव॑ पडल तरच तला मनसमाधान होईल॑अडवणे in sm.
aDave~ thiDave~अडव॑-तिडव॑ .n.crooked. not alignedवंकड॑-तिंकड॑. वक्रमझ नातू तज स्नेहितांच बरोर खेळींगत असताना मी दोन दपा मागेसूं गेलों. तो समच "आजा, एक ठिकाणी बसा, उगच अडव॑-तिडव॑ येनाका. अम्ही खेळत आहों" अस वरडला
aDave~ yeNeअडव॑-येणे.vt.to cross one's pathवाटेंत॑ समोर वलांडून येणेघर सोडून बाह्येर जाताना काळ॑ मांद्र अडव॑ आलतर चोखोट शकुन नहो म्हणतील॑.अडवणे in sm.
aDave~ yeNeअडव॑-येणे.vt.to interfereमध्य पडणेमझ भाऊ त्यंच 'प्ळोटांत॑' घर बांधाला आरंभ करतानाच कोणकी चार लोक अडव॑ येऊन काम राहत कराला सांगीटले. विचारताना, जमीन त्यंच म्हणून बडिवून सांगीटले
aDaveLअडवेळ .n.odd time. सौकर्य नाहीते वेळ.अमच बाजू घरच मनुष केम्हा पाह्यलतरीन मी दुपारा झोंपी जायाच वेळच मझकड बोलाला येतील. अडवेळांत येईनाका म्हणून कित्ति दपा सांगटलतीर ऐकनात.आडवेळ in SM
adbhuthअद्भुत.adj.wondrousअद्भुतहे भूमींत॑ जीव अपाप उजलते/झालते एक अद्भुत विषयच॑
adbhuthअद्भुत.adj.wonderful.अद्भुत.दीपावलीला अत्तलीकडे विकाच नानाविध 'रोकेट' एकदम माघ असलतरीन आकाशांत अद्भुत रंगीं, डिसैनीं आणीवते. पाह्याला फार बेष/बश अस्ते.
adbhuthअद्भुत.adj.wonderअद्भुतप्रकृतीच सृष्टीपक्षा मोट्ठ॑ अद्भुत वेगळ॑ कोण्तीनच नाही
aDeechअडीच.adj.two and a halfदोनाच पक्षा अर्ध जास्तीएक किलो मीठ घेताना दुकानदाराला मी तीन रुपे देलों. तेनी मला पन्नास पैसे परत (वापस) देले. म्हण्जे, एक किलो मीठाला अडीच रुपे म्हणून जाल॑
adhairya~अधैर्य.adj.lack of courage. lack of confidence. diffidentस्वंत शक्तीवर धैर्य अथवा विश्वास नसाच॑. मझ॑ काकाला मध्य-मध्य मेन्टल-डिप्रेशन येताना त्यंच तोंडांत अधैर्याच लक्षण स्पष्ट होऊन दिसल॑.
adhalaamadheअधलामधे.adj.to come in between. to interfere. to intrudeमध्ये पडणेमीटिंग चालत असताना कित्येकदन॑ अधलामधे बोलून चर्चांला गोंधळ करतात॑. असल॑ समस्या अधीकीं समूह मंडळांत॑ अस्ते. ऑफीसांतल मीटिंगांत॑ जास्ती अस्त॑ नाही.
adhapathana~अधपतन॑ .n.downfallएक चोखोट स्थितींतूं नाश स्थिलीला येणे. अधोगत॑एक राज्यांत॑ अन्याय, अक्रम॑ असल॑ अधर्म वाढलतर तज अधपतन॑ फार दूर नाही म्हणूया
adharअधर॑.n.lower lipखालेच॑ ओंठपंध्रवां शतकांत श्री वल्लभाचार्या श्री क्रिष्णाला स्तुती करून लिव्हलते "अधरम मधुरम, वदनम मधुरम" म्हणाच मधुराष्टकमांत देवाच वर्णना अधरमांतून आरंभ होते.
adharmअधर्म.n.unrighteousnessधर्म, न्याय, नीती असल॑ गुणांच विरुद्ध गुण॑अधर्म अधीक होताना भगवान विष्णू अवतार काढून पुन्हा धर्म स्थापना करतील अस हिंदू धर्म विश्वास करते.
adharmअधर्म.n.(behaviour) contrary to religion or against accepted morality of societyधर्म अथवा समुदायाच विरुद्ध होयाच (कार्य)अत्ता समुदायांत॑ होत असाच अन्याय, अक्रम॑ हे सग्ळ॑ पाहताना अधर्म नियंत्रण॑ कराला होयनात एवढे वाढलाहे अस वाटते
adheekअधीक.adj.more.जास्ती. फार. उदंड. उजंडपोटसूळांतून कष्टी भोगत असताना आवश्यापक्षा अधीक जेवणे चोखोट नहो.अधिक in sm.
adheekaprasangअधीकप्रसंग.n.uncalled for utterances.आवश्यापक्षा अधीक बोलणे. अनावश्य बोलणे.अधीकप्रसंग करून करूनच तो तज नाव पूरा हाळ करींगट्लते. अत्ता कोणीन तला परवा करत नाहीत॑.
adheekaprasangeeअधीकप्रसंगी.adj.one who utters unnecessarily.आवश्यापक्षा अधीक बोलणार. अनावश्य बोलणार. तज गोष्ट ऐकाला कोणालीन इष्ट अस्त॑ नाही म्हणून कळींगूनपणीन अनावश्य बोलून बोलून तो एक अधीकप्रसंगी झालाहे.
adheekpakSha~अधीकपक्ष॑.n.mostlyपोणावांटामला पाह्याला आज तो येतो म्हणून सांगिटलहोता. पण, अत्ता रात्री होत आहे. अधिकपक्ष॑ येईना म्हणून वाटते.
adheekpakSha~अधीकपक्ष॑.n.at the mostजास्ती-जास्ती. तू तेच योचना करून अवस्था भोगनको. अधीकपक्षा तुजकडे असाचांत॑ अर्ध तला देमते पडले, एवढेच॑.
adheekuNeअधीकउणे.n.more or less. थोड जास्ती अथवा थोड उणे. जास्ती व्यत्यास नाहीतेहे वर्षाच पाऊस गेलवर्षाच बरोर तारतम्य करून पाह्ताना अधिकउणे तेवढेच होत॑ म्हणूया.अधिकाउणा in sm.
adheenअधीन॑.adj.subjugatedस्वाधीन झालते. अधिकारांत असाच॑. अम्च राज्य ब्रिटीषयांच अधीनांत॑ सुमार दोनशें वर्ष होत॑
adhikaarअधिकार.n.authorityहक्क॑. निर्णय कराच जवाबदारिएक राज्याच विषयांत॑ मध्यपडाला वेगळ॑ कोण्त राज्यालीं अधिकार नाही.
adhikaareeअधिकारी.adj.person with authority. officerअधिकार असाच मनुषसरकाराच विद्याभ्यास विभागाच अधिकारीलोक अम्च गांवाला येवून उदंड॑ दिवस झालतरीन, हे पर्यंतीन एक चखोट साळे उघडले नाहीत॑.
adhikamaasअधिकमास.n.an additional thirteenth month introduced every thirty-three months as a correction in the Hindu lunar calendar.प्रति तेहतीस महिने चंद्रमान पंचांगांत जोडाच तेरावां महिना.अधिकमासंत दान देलतर॑ उजंड पुण्य येईल म्हणून ते महिनेंत विध-विधाच साधन॑, तसच तेहतीस अपूप॑ योग्य लोकांला दान देणे आहे.
adhikavarShअधिकवर्ष.n.leap yearफेबृवरींत॑ 29 दिवस असाच वर्षभारताच प्रधान मंत्री म्हणून होतते श्री मोरारजी देसाई फेब्रुवरी 29 तारीखला उजले अणी त्यंच ऐंशीच उजलादिवस आघोष करत असताना "मझ॑ जन्म अधिकवर्षांत झालत्यामळे आज मझ॑ वीसवां उजलादिवस" अस॑ म्हणट्ले.
adhipatheeअधिपती.n. master. lord. राजा. स्वामी.लंकापुरीच अधिपती असुर राजा रावणाला युद्धांत॑ हरिवून श्रीराम सीतादेवीला मुक्त करले.
adhirasamअधिरसम.n.a sweet preparation made from rice flour.तांदूळाच पीठांतून करलते एक गुळ्चीट पदार्थ. अनारस॑. अपूप॑. अधिरसम खायाला मला फार अवडल तरीन तज वर शिंपडून असाच खसखस खाल्लतर॑ मला आंगाला होईना.from Tamil.
adhogatheeअधोगती.n. downfallदुर्गती. अधपतन॑चरस पीणे, भांग खाणे, मद्य पीणे सिगरट फुंकणे हे स्वभाव तेवढीन अत्ता तो नव होवून (नवविणी) आरंभ केलसाच पाव्हून तज कुटुंबाच अधोगती आरंभ झालाहे म्हणून सांगूया.
adholokअधोलोक.n.nether world. hellपाताळ. नरकरामायण युद्धाच समय एक रात्री श्रीरामालीन लक्ष्मणालीन अहिरावण विभीषणाच रूपांत येऊन अपहरण करून अधोलोकाला उचलींगून गेला.
adhyaapakअध्यापक.n.teacher. पंतोजी. विद्या शिकिवणार. विद्या शिकिवून देणार.हे वर्ष अम्च संस्थानांत॑ दोन हदार अध्यापक नव होवून नियुक्त कराच उद्धेश आहे म्हणून विद्याभ्यास मंत्री गेल वार केलते प्रसंगांत॑ सांगिट्ले.
adhyaapikaaअध्यापिका.n.lady teacher. विद्या शिकिवणारी. विद्या शिकिवून देणारी. पोरींच साळेंत॑ शिकिवाला अध्यापिका कोणीं नाही म्हणून तीन महिना पसून मोठ गलाटा होत असाच खाणी दिवसोडी टी.वींत॑ येत आहे.
adhyaathma jnyaanअध्यात्मज्ञान.n.knowledge of philosophy of soulअध्यात्माविषींच ज्ञानभारताच राष्ट्रपती म्हणून हेतते श्री सरवेपल्लि राधाक्रिष्णन एक थोर पंडित होते अणी आध्यात्मज्ञाना विषीन त्यनी लिव्ह्लते अनेक पुस्तक अत्तापणीन अनेक महाविद्यालयांत प्रचारांत आहे.
adhyaathma~अध्यात्म.n.philosophy relating to soulआत्मांच विषयींच तत्वज्ञानवय होतां-होतां अम्ही संसाराच विषय सोडून आध्यात्मिक विषया वर योचना करणे चोखोट
adhyaayअध्याय.n.chapterपुस्तकाच एक भाग. खंडमझ मित्र एक नव पुस्तक लिव्हत आहेत अस ऐकून एक वर्ष झाल॑. काल अकस्मात मी त्यांस॑ दुकानबीदींत मिळून बोलताना कळ्ळ॑, एक अध्यायपणीं पूर्त झाल नाही म्हणून.
adhyakShअध्यक्ष.n.main person.नेता. मुख्य मनुष. ब्रिटिषयांचकडून स्वतंत्र झाला नंतर अत्ता पर्यंतीन (पतोरी) पाकिस्थानाच अध्यक्ष ते राज्याच सेनापती लोकेच पुन्हा-पुन्हा होताहेत.
adhyakShअध्यक्ष.n.presiding officerमंडळीच प्रधानीpresiding officer. मंडळीच प्रधानी. uis एक ठिकाणी मला कार्यक्रमाच अध्यक्ष म्हणून बलावल्होते, पण बरोरल॑ वेळाला मी तिकड गेलतम्हा एक चिटपांखरूपणीं तिकड होत नाही.
aDi ghaalaNeअडि-घालणे.vt.scheming. plotting stealthilyरहस्यंत॑ वंगळ(ओंगळ॑) कामाच योजना तय्यार करणेमझ बरोर काम करणार एकला कंपनीच वाटेंतच अमेरिकाला जायाला अडिघालत आहे म्हणून मला आजच कळ्ल॑from Tamil.
aDikithyaaअडिकित्या.n.a hand held pincer like instrument for slicing betel nutअडकत्या. अडकिता. सुपारी कापाच उपकरण॑. सुपारी चूर-चूर कराच एक ल्हान उपकरण॑पान-सुपारीच पेटींतून त्यंच अडिकित्या काढतानेम्हणून मझ॑ अम्मा कित्ती सांगटलतरीन मझ॑ लोंक ऐकनाम्हणतो. ते काढून कोठतरीन लप्पून ठिवणेंत॑ तला संतोष वाटत॑की कायकी
aDikivaNeअडिकिवणे.vt.to hang someting (in a hook etc). अडकिवणे. लटकिवणे.पलंगाच चार पटीसीन भिंतींत खिळा बडिवून ठिवलतर॑ केम्हा पह्जेतरीन डांचाच पर्दा अडिकिवाला सौकर्य असल॑.
aDikivaNeअडिकिवणे.vt.to fasten cross-wise (as an hindrance). अडव॑ बांधून ठिवणे. अडकिवणे. रात्रीच वेळ गाईच गोठांतून वांसरू बाह्येर पळून जाईनाक॑ असाला एक बांबू अडिकिवणे बर॑.
aDivaNeअडिवणे.vi.to come in the way. to impedeअडव॑ येणेचूक असाच काम करताना अम्च मनसाक्षि अम्हाला अवश्य अडिवत अस्त॑ (अडिवते).अडवणे in sm.
aDnaavअडनाव.n.surname.उपनाव. कुलनाव.मराठी लोकां मध्ये अडनाव प्रति व्यक्तीनीं ठींगतात॑. पण, अनेक तंजाऊर मराठी कुटुंबांत॑ उदंड वर्षापसून त्यंच अडनाव विसरलामुळे/सुटलतामुळे अडनावाच बद्दल/भरती नुस्त "राव" म्हणून ठिवींगतात॑.आडनाव in SM
aDneedअडनीद.n.half sleep. half awake. drowsiness.अर्ध झोंप॑दुपारच वेळ मी अडनीदांत असताना मला उठीवून सिनिमाला येतांतका म्हणून विचारलतर॑ मी काय सांगू ?
adruShTअदृष्ट.n.luckभाग्यमझ॑ मित्राला अदृष्ट बडीवले. भूटान लाट्टरींत॑ त्यांस॑ पन्नास लाख मिळ्ले
adruShTअदृष्ट.n.fateगेत. गत. कपाळच विधी. कित्येकदन॑ अदृष्ट म्हणतात॑, कित्येकदन॑ कर्म म्हणतात॑, काय झालतरीन तेनी तेनी काय करलेकी, तज परिणाम तेनीच अनुभव कराम॑.
adrushya~अदृश्य.adj.invisibleदिसनास्क॑ (होणे)साळेंत॑ एक जादूगराच कार्यक्रम होत॑. त्यांत॑ तेनी एक ल्हान पोरीला अम्च डोळे समोरच अदृश्य करीवले.
adrushya~अदृश्य.adj.unseenदिसनातेरात्रीच वेळ आकाशांत॑ एक मनुषाला नुस्त दोळेंत तीन हदार नक्षत्र दिसेल॑. तजपक्षा कोटान-कोटी नक्षत्र अम्च डोलेला पडनास्क॑ अदृश्य होऊन हे ब्रह्मांडांत॑ आहे.
advaithअद्वैत.n.monotheismएकत्व. आदिशंकराचार्यांच सिद्धांतअद्वैत सिद्धांताप्रकार जीवात्म-परमात्म दोनीं एकच झाल तरीन अम्हाला वेगळ अस वाटते. शंकराचार्य हे सर्व ईश्वराच माया म्हणतात
agaadhअगाध॑.adj.profound. deepगाढ. तीव्रतत्वज्ञानांत॑ अगाध पांडित्य असाच व्यक्तींच भाषण ऐकलतर अम्च मनांत त्यंचवर अपाप मर्यादा वाढल॑.
agaavooअगाऊ.adj. in advance. beforehand. पुढेच॑बाह्येर गामाला कोठतरीन जायाच असलतर॑ वापस याच टिकट अगाऊ घेऊन ठीवींगणे चोखोट.अघाऊ in SM
agaavooch kaaLअगाऊचकाळ॑.n.earlier timesगेलते काळ॑पंतोजीलोकांना अगाऊच काळांत॑ मिळास्क॑ अत्ता मर्यादा मिळणे अप्रूप झालाहे.
agarbaththeeअगरबत्ती.n.incense stickऊदुबत्ती.अगरबत्तीच वास लागलतर॑ श्वास सोडणे कष्ट होईल म्हणून कित्येक लोकांस॑ ते बरोर पडना.
agathya~अगत्य.n.without failकंडिपमझ लेंकीच वराडाला तुम्ही येयीनास्क॑ असताने. अगत्य येऊनेच सराम॑
agathya~अगत्य.n.essential/necessary condition or requirement. imperativeअवश्यतुम्च नव॑ घराला याला वाट मला कळेल॑. वाट दाखिवाला म्हणून एक मनुषाला तुम्च कडून पाठिवून देवूनच सराम॑ अस अगत्य काहीं नाही.
agathya~अगत्य.n.required attention. concern.पह्जते एवढ॑ लक्ष्यउद्या शेवटीच परीक्षा आहे, तरीन, थोडपणीं अगत्य नाहीस्क॑ तो टी.वी. पाह्त बसलाहे
age~अग॑.ind.a manner of addressing a girl or a womanपोरींना/बायकांना बलावाच एक रीत॑मझ बाईलीला मी "अग॑" म्हणून बलावाच थोडकपणीं इष्ट नाही. "नाव सांगून बलावांत॑" अस सांगते.
aggeenअग्गीन.pron.everything. all.अस्कीन. अस्गीन. अग्गीं. सग्ळीन. पूराहीं. हे खोलि अत्ताच खालीकरून देम॑. आंत असाच सामान अग्गीन/अस्कीन काढून बाहेर ठिवांत॑.The word अग्गि/अग्गीं/अग्गीन appears to be a morphed version of अख्खि/अख्खीं/अख्खीन. अख्खा in SM means "full"/"entire".
aghorअघोर॑.adj.dreadfulघोर॑. भयंकर. भें वाटाच॑प्रेत पिशाचाच सिनिमा "ड्राकुळा" मला अघोर वाटल॑
agneeअग्नी.n.fireविस्तूअग्नी कस॑ करणे म्हणून आदि मनुषाला शिकाला झालते, मानव संस्काराच एक थोर विषय आहे म्हणून शास्त्रज्ञ लोक सांगतात॑.
agneeअग्नी.n.the fire-godअग्निदेवऋगवेदांत॑ विष्णू, शिव॑ ह्यांचपक्षा अग्निदेवाला स्तुती कराच श्लोकांच संख्या जास्ती आहे.
agnihothra~अग्निहोत्र.n.name of a Hindu religious ritual dating to the Rigvedic times.ऋग्वेद कालांतून आचरण कराच एक हिंदू यज्ञाच नावऋग्वेदाच अग्निहोत्र यज्ञालीन, अग्नील फार महत्व द्याच पारसी धर्म, म्हणजे, ज़रथुष्ट्री धर्मालीन संबंध आहे म्हणून धर्म पंडितांच एक अभिप्राय आहे.in this homa cow's milk or ghee is offered into fire every day at sunrise and sunset accompanied by the agnihotra slokas.
agnihothreeअग्निहोत्री.n.a priest who performs agnihothraअग्निहोत्र यज्ञ कराच पुरोहितअग्निहोत्र कराच कित्येक ब्राह्मणकुलांच लोक त्यंच अडनाव अग्निहोत्री म्हणून ठिवींगतात.
agnijwaalaaअग्निज्वाला.n.flameविस्तूच ज्वाला. विस्तूच पेटयंदा अम्च गांवांच जवळच राणांत॑ मोठ जाळ पेटून पूरा नाश झाल॑. दोन मैल दूरांत्सून अम्हाला अग्निज्वाला दिसत होत॑.
agnikaaShTअग्निकाष्ट.n.cinderपेटून उरलते कोळसा. पेटून उरलते लांकड॑होम झाल नंतर भोईं पुसताना आचारेच बोट अग्निकाष्ट लागून लासले
agnikunDअग्निकुंड.n.a fire-pit for performing sacred ritesहोम कराच अग्नीच कुंड. होमकुंडघरांत॑ होम करताना भोईं (भोए) हाळ होयनास्क॑ असाला वाळू घालून तजवर अग्निकुंड करणेच चोक्कोट.
agninakShathra~अग्नि नक्षत्र.n.a particular day in summer when the temperatures are very highसूर्याच ऊन भयंकर असाच उन्हाळाच दिवसहे वर्ष अग्निनक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत॑ जाऊन सांपडींगून तिकडल॑ भयंकर ऊबांत॑ तरपडून गेलों.
agniparavathअग्निपर्वत .n.volcanoज्वालामुखीभारताच एकच-एक अग्निपर्वत अंदमान-निकोबार द्वीपांत आहे.
agnipareekShaaअग्निपरीक्षा.n.extreme ordeal to prove veracityपवित्रता दाखिवाला कराच उग्रपरीक्षापैसा घेवून क्रिकेट मॅचाच परिणाम बदलिवाला प्रयत्न करलते अपवादांतून चुकाला कित्येक लोकांस॑ एक मोठ अग्निपरीक्षा करामस्क॑ झाल॑.
agnipraveshअग्निप्रवेश.n.walking over burning embers of coal or wood fire under a vow.नवस करून कोळसाच विस्तू नाहीतर॑ लांकडाच विस्तूच व॑र चालून जाणे.तमिलनाडांतल॑ कित्येक देऊळांत॑ अग्निप्रवेशाच नवस उदंड प्रसिद्ध आहे.
agnishamana~अग्निशमन॑.n.putting out the fireविस्तु विजिवणेफार उंच असाच बांधणींला/बांधोटींला विस्तू पेटलतर॑ ते शमन कराला पह्जते उपकरणीं अग्निशमनाच बंडीनीं अम्च गांवांत॑ (गामांत॑) आहेका, हे अम्हाला संदेहच.
agra~अग्र.adj.leading or top end or edgeपुढ॑च भाग. कोने भाग. शेवटीच भाग. अग्रभागमहाराष्ट्रांत॑ गोकुलाष्टमी दिवस ओठाकिवून/होठाकिवून ठिवलते एक मोठ काठीच अग्र भागांत॑ दहींच मडके बांधून तला फुटिवाच खेळ उदंड आवेशांत॑ खेळतील॑.
agra~अग्र.adj.foremost. bestस्रेष्टपंचपांडवांत॑ अर्जुनाला "अग्र" म्हणून सांगतात
agrabhaagअग्रभाग.n.leading or top end or edgeपुढ॑च भाग. वर्चभागसणाच दिवसी पान मांडून जेवण वाढताना पानाच अग्रभागांत मीठ वाढतील॑.
agragaNya~अग्रगण्य.adj.outstanding. counted amongst the best. principalमुख्य. प्रधान॑भूलोकांत एवढ॑पर्यंतीन जन्म झालते शास्त्रज्ञांत॑ अल्बर्ट ऐनस्टीन सगळ्याचीनपक्षा अग्रगण्य म्हणून सांगूया.
agrahaarअग्रहार.n.an enclave or a street in a village occupied by brahminsब्राह्मणलोक राहाच वाडा. ब्राह्मणलोक॑ राहाच बीद॑बंगळूराच जवळ तमिलनाडाच धर्मपुरी जिल्लांत श्री राघवेंद्रस्वामीच ब्रिंदावन पाप्परपट्टी अग्रहार म्हणाच ठिकाणी आहे.
ahambhaavअहंभाव.n.haughtiness. pride. conceit. egoism.अहंकार. स्वता गर्व वाटणे. स्वता मोठ॑ मनुष म्हणींगणे. अहंभाव असणार त्यंचस्कच॑ अण्कीन एक व्यक्तीला पाह्यलतर॑ लोक्कुरच वरडा-वरडी आरंभ होईल.
ahankaarअहंकार.n.haughtiness. pride. conceit. egoism.अहंभाव. स्वता गर्व वाटणे. स्वता मोठ॑ मनुष म्हणींगणे.अहंकार असाच मनुषाला दुसरेंच चोखोट उपदेशपणीं तज मनाला बरोर पडल॑ नाहीतर॑ इष्ट होईना.
ahankaareeअहंकारी.adj.one who is haughty, proud, conceited or egoistic. गर्विष्टरावण अण्खी हिरण्यकषिपु हे दोनीं मोट्ठ॑ अहंकारि राक्षस होते
aherअहेर.n.gifts given at a wedding etc. वराडांत॑ द्याच बक्षीस/दान. आहेरवराडाला बलावाला येतानाच (आमंत्रण पत्र द्याला येतानाच) अहेर पणीन द्याच संप्रदाय अत्ता हे काळांत आरंभ जालाहे.
ahimsaaअहिंसा.n.non-violenceहिंसा विरुद्ध. दुसरेंना हिंसा करनास्क॑ असणे, हे सिद्धांत.भारताच संस्कारांत॑ अहिंसा सिद्धांत॑ बौध अणी जीन धर्मांतून आलते अस एक अभिप्राय आहे. कां म्हाण्जे, हे दोन धर्म याच पुढे/स्थापना होयाच पुढे वेदकाळांत॑ हिंदू पूजा पद्धतींत मांस उपयोग करत होते.
ahoअहो (ind)a vocative used while addressing a person with respectमर्यादांतूं एक व्यक्तीला बलावाच एक गोष्टएक दोन पिढीच पुढे दल्लाला बाईल अहो म्हणून बलावाच सहज होत॑ तरीन, हे काळांत नाव सांगूनच बलवाच पद्धती आरंभ झालहे.
aikaNeऐकणे.vt.to hearश्रवण करणे. कानांत॑ शब्द पडणे. येतां-येतां मला कानाच ऐकणे उण॑ होत येत आहे.
aikaNeऐकणे.vt.to follow instructions(देलते) निर्देशाच प्रकार करणेथोरळे सांगाच ऐकणे म्हणाच चोक्कोट गुण॑ तला ल्हानपणांत पसून आहे.
aikaNeऐकणे.vt.to hear.श्रवण करणे. कानांत॑ शब्द पडणे.दिवसोडि पाष्टे सात घंटेला मी रेडियोंत भक्ति गाणे ऐकणे आहे.
aikyamathye~ऐकमत्य.n.unanimityअग्गि दनीं (अस्कि दनीं) एक होऊन/मिळींग्यून असणे.
aikye~ऐक्य.n.unityएक होऊन/मिळींग्यून असणे.अम्च मद्य ऐक्य असल तर॑ धैर्यान कोण्त प्रश्नीं सांभाळाला होईल॑.
ainsheeऐंशी.n.eighty.दहा गुणा आठ
airavatha~ऐरावत॑.n.celestial elephant of Indraइंद्राच हत्तिक्षीरसमुद्र मंथन करताना मिळ्लते पंढ्र रंगाच ऐरावताला चार दंत आहे म्हणून हिंदु संप्रदाय सांगते.
aise~ऐस.decl.waitथांब. राह.मी या पर्यंतीन अण्खीन थोड वेळ तिकडेच ऐस.the verb (intransitive) form being असणे.
ajayअजय.adj.unconquerable. one who cannot be defeatedहरिवाला होयनातेमल्लयुद्धांत॑ भीमसेन॑ अजय होते
ajeerNa~अजीर्ण.n.indigestionजीर्ण होयनास्क॑ असणे. दहन होयनास्क॑ असणेकित्येकदनास॑ कच्चा फणसाच भाजी खाल्लतर अजीर्ण होईल.
ajithअजित.adj.unconqueredहरनातेतज माय-बाप तला अजित म्हणून नाव बरोर ठिवलते, कां म्हणजे, हातांत कोण्त काम काढलरीन, कसलते कष्ट आलतरीन, ते अग्गीन समाळाच सामर्थ्य तला आहे.
ajnyaathअज्ञात.adj.incognito. anonymousस्वंत रूप कोणालीन दाखिवनास्क॑बारा वर्षाच वनवास झाल नंतर पांडव एक वर्ष अज्ञातवास विराटराजाच अधीनांत॑ केले.
ajoonअजून (adv)yet. stillएवढ॑ पर्यंतचार घंटेच पुढे येतों म्हणून तो सांगीट्ल्होता. अत्ता साडे चार होत आहे. अजूनीं तो आला नाही. उगेच थांबून प्रयोजन नाही, जावुम्हणे.
akaalअकाल॑ (adj)untimelyअवेळ॑मृकंडु ऋषी अणी मरुदमतीच लोंक होऊन उजलते मार्कंडेया सोळा वर्षांत अकाल मरण प्राप्त होईल म्हणून होत॑ तरीन, यमधर्माकडून ते बालऋषीला भगवान शिव वांचिवले.
akaala maraNa~अकालमरण॑.n.untimely deathल्हान आयुषांत॑ होयाच मरण॑. अकालमृत्यूतिला तीस वर्षपणीं झाल नव्हते. कॅनसर येऊन अकालमरण॑ झालते ऐकून मला संकट वाटले.
akaala mruthyuअकालमृत्यु.n.untimely deathल्हान आयुषांत॑ मरणे. अकालमरण॑गणित शास्त्रांत फार सामर्थ्य दाखिवलते स्रीनिवास रामानुजन बत्तीस वर्षांत अकालमृत्यू प्राप्त करले.
akaaraNa~अकारण॑.adv.without reasonकारण नाहीस्क॑. विना कारणतू कायतरीन खोडी केलासील॑. अकारण॑ तुला कोणीं हाक्का मारनात॑/शिवा देनात॑.
akarmak kreeyaapadअकर्मक क्रियापद.n.intransitive verb (gram).वाक्याच अर्थ पूरा कळिवाला कर्माच आवश्य नाहीते क्रियापद. निसरणे, हे एक अकर्मक क्रीयापद आहे.
akasmaathअकस्मात.adv.unexpectedly. suddenlyअसलास्क असून. दिडीरशी (Tamil). साळेंत॑ मझ॑ बरोर वाचलते मित्राला पाव्हून उदंड दिवस झाल॑ होत॑. काल दुकानबीदीला गेलास्ताना मी तला अकस्मात पाह्यलों.
akaTa vikaTa~ saamarthhya~अकटविकट सामर्थ्य .n.oversmart. extra cunningविपरीत॑ वक्रबुद्धीच॑पाकिस्थानाच नेतालोके भारताच विरुद्ध अकटविकट सामर्थ्य दाखिवून अत्ता त्यंच देश अधोगेतांत जात आहे.
akaTavikaTa~अकटविकट.adj.monstrously huge. hideously large.भें वाटाच एवढ॑ थोर. मोठ घोर आकाराच. यक्षराजा सुकेतूच लेंक ताडका एक सुंदर पोरी होती, पण अगस्त्य ऋषीच शापामळे तिन॑ अकटविकट रूपाच राक्षसी झाली.अकटोविकट in SM.
akhanDअखंड.adj.undivided. wholly in tact.सग्ळ॑होऊन असाच॑अखंड होऊन असलत॑ "यु. एस. एस. आर" 1996 नंतर॑ पंध्रा वेगळ॑-वेगळ॑ राज्य झाल॑.
akhanD divaaअखंड-दिवा.n.an oil lamp kept burning perpetually in front of gods' idolsदेवाच विग्रहाच समोर लावून ठिवाच निरंतर दिवा. नंदादीप॑अखंड दिवा लावाला तीळाच तेल श्रेष्ट म्हणून शास्त्र सांगते.
akhatheejअखतीज.n.the Hindu festival of Akshay-thriteeya falling on the third lunar day of the first half of Vaishákhaअक्षयतृतीया. अक्षतृतीया1) वैशख महिनेच शुक्लपक्षाच तृतीया दिवसी अक्कतीजाच सण येत॑. 2) अक्कतीजाच दिवसी चोखोट काय करलतरीन वर्ष पूरा अण्कीन ते वाढत जाईल म्हणून भरून लोके ते दिवसी सोनेच आभरण घेतील॑.from अक्षय+तीज (third day of the lunar fortnight).
akkaaअक्का.n.elder sisterवडील बहीण॑शेखराला धक्टी बहीण कोणी नाही. एक अक्का मात्र आहे.ताई/आक्का in sm.
akkareअक्करे.n.eagerness.अति आशाच विचार॑बाजू घरच॑ लोकांमध्य॑ कायतरीं भांडा-भांडी झालतर॑ अम्ही त्यंच विषयांत॑ तोंड घालून अक्करे दाखिवणे चोखोट न्हो म्हणतील. from Tamil.
akkatheejअक्कतीज.n.the Hindu festival falling next day to भाऊबीज (after Dipavali) when brothers honour sisters.दीपावली सण झाल नंतर॑ अणी भाऊबीजाच दुसर॑ दिवसी भाऊंडे बहिणींस आदर कराच सण.मझ॑ बहीण विदेशांत आहे-ते-करतां अक्कतीज सणाला वर्षा-वर्षी एक हदार रुपे तिज बॅन्क खातांत मी घालून टाकतों. अक्का (sister) + तीज (third day of the lunar fortnight).
akkiअक्कि.n.a type of pox.एक विधाच दीवी-रोग.अगाऊच काळांत लेंकरांस अक्कि आलतर कुंभाराकडे बलाईंगून जावून मंत्र करींगून हातांत यंत्र बांधींगून येतील.
akraaअक्रा.n.elevenदहाच नंतरल॑ संख्याक्रिकेट, फुटबाल, हॉकी असलते खेलांत एक एक पक्षांतीन अक्रा अक्रा दन अस्तील॑.अकरा in sm.
akramअक्रम.n.unlawful actनियमाच विरुद्ध कराच कामचोर्टेलोक अक्रमकार्य काहीं करनास्क॑ असाला अम्च गामच (गांवांच) पोलीस उदंड पाह्यींगतात॑.
akramअक्रम.n.disorderक्रमाच विरुद्ध॑मध्य-मध्य बंगळूराच पोलीस अक्रम पसराच गुंडा लोकांस धरून किलुपांत घालणे आहे.
akShaNa~अक्षण॑.n. arathi done by two ladies for bestowing blessings to people (not to gods) with haldi-kumkum-akshata mixed with water in a brass/silver plate but without a lamp/camphorहळदी-कुंकू अक्षताच पाणीच ताटांत॑ (विना वाताच/कापूराच दिवा) लोकांला आशीर्वाद कराच एक विधाच ओवाळणेअठांगुळाच वेळी गरवार बायकोला अक्षण करणे आहे.
akSharअक्षर .n.letter of an alphabetअक्षरमालांतले एक स्वर॑/व्यंजन॑कन्नड अणी तेलुगु लिपीच अक्षर पाह्याला जवळ जवळ एक सारख असत॑.
akSharaabhyaasअक्षराभ्यास.n.learning of the alphabets.अक्षरमाला शिकणे.सरकारी नियमाप्रकार लेंकरांला साळेंत मिळिवाला त्यांस उणेपक्षा सहा वर्षाच वय झाल असाम॑ म्हणून आहेतरीन, पोणावांटादनीन त्यंच लेंकरांला चार पांच वर्ष असतानाच अक्षरमाला शिकिवाला आरंभ करूनटाकतात॑.
akSharaabhyaasअक्षराभ्यास.n.the ceremony of initiating a child to education.लेंकरांस लिव्हणे-वाचणेंत॑ प्रारंभ करिवाच सण॑. विद्यारंभ.हिंदू धर्म संप्रदायाप्रकार नवरात्री सणाच शेवटल॑ तीन दिवस सरस्वतीपूजा आचरण करताना तज शेवटल॑ दिवसी, म्हणजे विजयदशमीच दिवसी लेकरांस अक्षराभ्यास शुभकार्य आरंभ करिवणे आहे.
akSharamaalaaअक्षरमाला.n.alphabetएक भाषाच स्वर/व्यंजन॑ लिपीच समूहदक्षिण-कन्नड जिल्लाच तुळु भाषा बोलणार॑ त्यंच मध्ये काहींतरीं लिव्हाला कन्नडा लिपी उपयोग करतात॑. कां म्हण्जे तुळु भाषाला प्रत्येक लिपी अणी अक्षरामाला नाही.
akShathaaअक्षता.n.a caste mark applied on the forehead by men of Madhwa sect.मध्व संप्रयादाच दादिगे/दाद्ग्ये कपाळांत॑ लावाच चिन्ह.(1) मध्व संप्रदायाच दादिगे त्यंच कपाळांत अक्षता घालींगट्लाहेत म्हण्जे त्यंच पाष्टेच पूजा झाल॑ म्हणून अर्थ. (2) वाळून पूड करलते केळीच फूलाच चिप्पाहीं हळेदहीं मिळिवून अक्षता कतात॑. (3) एकादशीच दिवसी अक्षता लावणे नही.
akShathaaअक्षता.n.the paste used for applying the caste mark of the same name.अक्षताच मिश्रण. अत्तच काळांत, म्हणजे शीघ्र-शीघ्र ऑफीसाला पळामस्क॑ असाच काळांत अक्षता कराला वेळ मिळना म्हणून पुढेच तयार करून ठिवलते अक्षताच मिश्रण दुकानांतून घ्या मिळते.
akShayअक्षय.adj.imperishable. perpetualकेद्धीहीं नासनाते. केद्धीहीं असाच॑त्यंच घरांत॑ दिवसाला कित्तीदन आलेतरीन जेवण॑ वाढतील. त्यंचकडे अक्षयपात्र आहेकी कायकी !
akShouhiNeeअक्षौहिणी.n.a huge army formation of foot, cavalry, chariots and elephants of ancient times.जुनेकाळच सैन्यांच एक महासंग्रह.महाभारत युद्धांत पांडवांच सैन्यांत॑ सात अक्षौहिणी अणी कौरवांच सैन्यांत अक्रा अक्षौहिणी होत॑ म्हणून महाभारत महाकाव्याच आदिपर्वांत आहे.according to Adi Parva 2.15-23 of Mahabharatha one akshauhini consists of 21,870 elephants, 21,870 chariots, 65,610 horses and 1,09,350 foot soldiers
aLaaअळा.n.worms that infest fruits and grainsफळ, धान्यांत॑ याच किडा. कृमि (1) उदंड दिवस तांदूळ, दाळ उपयोग करनास्क ठिवलतर तजांत अळा येऊनजाते. (2) चार मिर्सिंगा नाहीतर थोड करेपाकाच पान/पत्ता तांदूळाच डब्बांत॑ घालून झांकून ठिवलतर॑ अळा येईना.अळ/अळी/अळई in sm.
aLaaअळा.n.any maggot (in general)किडा. कृमी. पूचीगुलाबाच झुडूपाला अळा येईनास्क॑ असाला तम्हा-तम्हा औषद (ओखद) शिंपडत असाम॑.अळ/अळी/अळई in sm.
alakShya~अलक्ष्य.n. inattentionगवन॑ नाहीस्क॑ असणे. ध्यान देनास्क असणेगेलंदा मझ लोंक परीक्षांत॑ उणे मार्क घेटळा म्हणून साळेच प्रिन्सिपाल मला त्यांस॑ येऊन पाह्याला सांगून पाठिवले. मझ लोंक वाचणांत॑ उणावा दाखिवाच कारण॑ पंतोजी शिकीवताना अलक्ष्य होऊन बसतो अस तेनी मला सांगट्ले.
alamaareeअलमारी.n.cupboard.बीरो. कपाट. जुने काळांत लांकडाच अलमारी सुताराकडून करून घेत होतों, तज नंतर॑ गोदरेज अलमारी आल॑, पण अत्ताअग्गीन मलेश्यांतकी चैनांतकी करलते सवंग अलमारी मिळते.
alankaarअलंकार.n.adornment. beautificationपाह्याला/दिसाला बेष(सुंदर) करणे"अलंकार करींगट्लते पुरे, वराडाला निघला वेळ झाल॑"
aLasअळस.n.sloth. lazyness(शों)सोंबेरिपण॑तला काय काम सांगिटलतरीन अळस भोगींगून तजांतून चुकाच वाट पाह्त असतो
ale~अलें.n.ginger plant or its (undried) rootआलें. ओल॑/हिरव॑/वाळिवनाते सुंठे अलें वाळून असलतर॑ तला सुंठ म्हणतों.
aleekaDcha~अलीकडच॑.adj.belonging to recent timesथोड पुढ॑. थोड दिवसा पुढ॑च॑अलीकडेच अतीवृष्टीमळे पाकिस्थान अणी कॅष्मीरांत॑ भयंकर नाश-नष्ट झाल॑.
aleekaDcha~अलीकडच॑.adj.belonging to this sideहे बाजूच॑अलीकडच देऊळाला जायाला मला एक बीद॑ वलांडलतर॑ पुरे.
aleekaDeअलीकड॑.n.recentlyहे जवळ॑केंद्र उद्योगमंत्री अलीकडे एक नव उद्योग नियम॑ विधानसभांत॑ चर्चाल ठिवले.
aleekaDeअलीकड॑.n.on this sideहे बाजूकडे.कालवाच अलीकडे जमीनाच मोल अत्ता जास्ती झालाहे.
allaaDaNeअल्लाडणे.vi.to be forced to run from place to place.निर्बंधामळे पळापळी होणे. मझ॑ लोंक दहावा वर्ग संपिवून अक्रावा वर्गाला मिळाच समयांत मला वेगळ॑ गांवाला ट्रान्सफर झाल॑. नव साळेंत मिळिवाजोरी मी अल्लाडूनगेलों. from Tamil.
almaareeअलमारी.n.cupboardबीरो. कपाटजुने काळांत लांकडाच अलमारी सुताराकडून करून घेत होतों, तज नंतर॑ गोदरेज अलमारी आल॑, पण अत्ताअग्गीन मलेश्यांतकी चैनांतकी करलते सवंग अलमारी मिळते.
alpअल्प.adj.a littleथोड. थोडक॑. नंखर॑मला आंगाला बर॑ नस्ताना आयुर्वेद डोक्टर देलते ओखदाच चूर्ण जेवून अल्प वेळाच नंतर पाणींत॑ मिळिवून गिळाला सांगिट्ले
alpaayuShअल्पायुष.n.short-livedउणे आयुषाच॑स्वामी विवेकानंद, स्रीनिवास रामानुजन असलते महानलोके अल्पायुषाच होते.
alpaayuShअल्पायुष.n.short lifeउणे आयुष(1) रामक्रिष्ण मिषन असल॑ एक थोर संस्था स्वामी विवेकानंदाला त्यंच अल्पायुषांतच स्थापना कराला झाल॑. (2) मनुषांच जीव॑ सरासरि सत्तर वर्ष अस्ते. हेज बरोर पाह्ताना कुत्राच सरासरि बारा वर्षाच जीव अल्पायुषाच म्हणूया.
alpabuddheeअल्पबुद्धी.n.narrow-minded. mean minded ल्हान मनाच॑राष्ट्रीय कक्षींच अल्पबुद्धीच वागणांमळे समुदायांत॑ गोंधळ पसरते विना वेगळ॑ काहीं उपयोग होत नाही.
alpabuddheeअल्पबुद्धी.n.of limited intelligenceबुद्धिशक्ती उणे असणार.अल्पबुद्धीच लेंकरांस॑ शिकिवाला म्हणून अम्च गांवांत॑ नव होऊन आरंभ करलते साळेंते मझ लेंक उद्योगांत॑ आहे.
alpadrShTeeअल्पदृष्टी.n.not given to far sighted thinkingपुढे होयाच विषयावर जास्ती योचना नकरणार.अम्च नेतांच अल्पदृष्टीच व्यवहारामळे देशाच स्थिती हाळ होताहे.
alpasvalpअल्पस्वल्प.adv.whatever littleनंखर थोडक॑. uisआफ़्रिकाच सोमाळिया देशांत॑ भयंकर क्षाम झालतांमळे लोक जमीनांत॑ काय अल्पस्वल्प मिळाच धान्य (धान), वनस्पती हे सग्ळीन खावून पोट भरींगाच अवस्थाला आलाहेते.
aLuअळु.n.a variety of edible tuber. colocasiaअळूच गड्डे. मूळाच एक गड्डेअळु घेताना बरोर पाव्हून घेम॑, कां म्हणजे कित्येक वर्गाच अळु खाल्लतर॑ घसाला कंड (खाज) येईल.
alyaaअल्या.n.wormअळा. किडा. कीडा. कृमि. हे वर्ष अम्च॑ घरच॑ अंबाच झाडांत भरून पंडू झाल॑, तरीन ते पूरा अल्या खाऊन नाश होऊनगेल॑.
amaavasyaaअमावस्या.n.new moon day.क्रिष्णपक्षाच शेवट्ल॑ दिवस. अमावस्य दिवस॑ केळे संपाकांत वापरणे श्रेष्ट म्हणून सांगणे आहे.
amacha~अमच॑.pron.our. ours.अम्च. अम्हाला संबंध झालते. एवढे वर्ष अम्ही भाडेच घरांत राह्त होतो, अत्ता पुढच॑ महिनापसून अमच॑ स्वंत घराला घरप्रवेश करींगून सरकाला जातों.
amakkaLअमक्कळ॑.n. chaos. disorderगोंधळ॑अम्च वठारांत॑ राहणार लोक आजू-बाजूच कित्येक कार्य कस॑ सांभाळाम॑/समाळाम॑, हे निश्चय कराला एक सभा बलावून चर्चा करले. मझ बाजू घर्च मनुषाच मूर्खपणामळे सभांत॑ अमक्कळ होऊन एक निर्णयपणीं काढाला झाल नाहीस्क॑ झाले. from Tamil.
amarअमर.adj.immortalचिरंजीवीहे भूलोकांत॑ जन्म काढलतर एक दिवस मरामतेच. कोणालीन अमर असाला होयना
ambaaअंबा.n.mangoएक पंडूच नाव॑ हिरव॑ असताना, म्हणजे पिकनास्क॑ असताना फार अंबट असाच अंबाच वर्ग पिकलानंतर॑ फार गुळ्चीट अंबा होईल॑. आंबा in sm.
ambaaअंबा.n.Goddess Durgaदुर्गादेवीपार्वतीदेवीला, अंबा, दुर्गा, ललिता अस॑ अनेक रूपांत हिंदूलोक॑ आरधना करतात॑.
ambaareeअंबारी.n.caparisoned seat on an elephantहत्तीच पाठीवर बसाला बांधाच व्यवस्थामैसूर दस्सराच वेळी चामुंडीदेवीच विग्रह अंबारी बांधलते हत्तीच वर ठिवून जंबू-सवारी कराच॑ दृश्य तिकडल॑ उत्सवाच एक मुख्य भाग आहे.
ambaTअंबट.n.sourअंबट रूचबरोरल॑ अंबट असाच अंबांतून केलते लोणचे फार रूच अस्ते !आंबट in sm.
ambaTbhaajeeअंबटभाजी.n.a liquid preparation usually made of greens or cabbage or pumpkin eaten with cooked riceपाला अथवा कॉबेज अथवा भोंपळाच कालवण॑दक्षिणी मराठी लोकांला सगळ्यांचीनपक्षा अवडाच कालवण अंबटभाजी म्हणून संशय नाहीस्क॑ सांगूया.
ambaTkoLLIअंबटकोळ्ळि.adj.extremely sour.उदंड अंबटाच.हे दहीं मला वाढनको. उन्हाळांत॑ ते अंबटकोळ्ळि झालाहे !
amche~अम्च.pron.our. oursअमच. अम्हाला संबंध झालतेहे सोनेच माळ अम्च नहो. तिला ते परतून देवूनटाक.आमचा in sm.
amche~ amche~अम्च-अम्च.pron.belonging to each of usअम्ही एक-एक दनांचीं/व्यक्तींचींअम्च-अम्च काम व्यवस्थांत॑ करत गेलतर पुरे. तेवढीन बरोर होईल
amheeअम्ही.pron.weअम्हीआज संध्याकाळी सहा बडिवाच पुढे अम्ही तुला पाह्याला येतों.
amhee amheeअम्ही-अम्ही.pron.we by ourselvesअम्ही स्वता. अम्ही अपापअम्च देश उद्धार होम॑ म्हण्जे अमेरिकाकी वेगळ॑ देशकी अम्हाला सहाय करतील म्हणून बसलतर॑ होईना. अम्ही-अम्ही कायतरीन केलतरेच होईल.
ammaaअम्मा.n.motherमाय॑दक्षिणी मराठी बोलणार पोणावांटा लोकीन त्यंच मायाला अम्मा म्हणून बलवतात तरीन कित्येकदन॑ आई म्हणून बलावतात॑.