Sunday, May 15, 2016

n (न) 2 (navagrah To nyaayasthh)






.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
navagrahनवग्रह.n.the nine planets of Indian astrology (sun, moon, mars, mercury, jupiter, venus, saturn, rahu and ketu).जोतिषांतल॑ नौ ग्रह (सूर्य, चंद्र, मंगळ॑, बुध॑, गुरू, शुक्र॑, शनी, राहू अण्खी केतू).
navagrahनवग्रह.met.indication of discord amongst members of an organization or family.एक कुटुंब॑ नाहीतर एक संघटनांत॑ अभिप्राय व्यत्यास असाच स्थिति सांगाच गोष्ट.each member being in his own orbit, indifferent and maleficent to each other.
navamiनवमि.n.ninth day of a lunar fortnight.एक पक्षाच नव्वां दिवस॑.
navaraaनवरा.n.bridegroom.वराडाच॑ पोर.नवरा is normally used in sm to means 'husband', though it also means 'bridegroom' in sm.
navaraathriनवरात्रि.n.a Hindu festival of nine nights.नौ रात्रीच एक हिंदु उत्सव ;नवरात्र in sm.
navarathna~नवरत्न.n.the nine precious stones associated with the navagrahas (ruby, pearl, red coral, emerald, yellow sapphire, diamond, blue sapphire, hessonite and cat's eye).नवग्रहाला संबंधझालत॑ नौ रत्न (माणिक, मोती, पवळा, मरकत, yellow sapphire, वज्र, इंद्रनील, गोमेदक अण्खी cat's eye).
navariनवरि.n.bride.वराडाच पोरि.
navasनवस.n.a vow to God.कार्य साध्य होयाला देवला प्रर्थना करून, कार्य झाल नंतर॑ नवस केलते वस्तु अर्पणा कराच॑.
navathonDनव॑तोंड.n.new face. stranger.परिचय नाहीते मनुष. कळनाते मनुष.
naveenनवीन.adj.new. fresh.नव॑.
nawaabनवाब.n.Nawab.मुसलमान राजा.
neने.conj.a conjunction to a verb indicating imperative negation.नको' अस॑ अर्थ द्याला क्रीयापदाला जोडाच एक गोष्ट॑.eg. "should not do it" - करताने ; "should not talk" - बोलताने etc.
neecha~नीच.adj.base. low.एकदम उणे स्थितीच॑.
neechalनीचल.n.swimming. पोगणे. पोवणे. पोहणे.from Tamil.
neeghनीघ.imp.start.जायाला आरंभ होण॑. निघाला आरंभ होणे.
neelनील॑.n.blue colour.नील॑ रंग.
neerajaaनीरज.n.lotus.कमळीच फूल.
neereनीरे.n.pleats of a saree or dhoti.लुगडे अथवा कासोटा पदराच मुजल्लते घडी. कासोटा नेसताना लुगडेच कांठ बरोर दिसास्क॑ नीरे घाटलतर॑ पाह्याला बेष असेल. निरी in sm.
neerpaaNeeनिर्पाणी.adj.watery. very thin. dilute.नित्तळ.तुरीदाळीच मोल उदंड वेघला नंतर॑ होटेलांत अस्कीन सार/सांबार निर्पाणी करतात॑.
neeTनीट.adj.proper. योग्य. तुझ॑ वागणे नीट आहे म्हणून मला वाटत नाही.
neeTनीट.adj.correct.बरोर.कायतरीन विचारल॑तर॑ तो नीट उत्तर देईना म्हणून तला काहीं विचाराच मी सोडूनटाकलों.
neeTनीट.adj.straight.सरळ. बरोर. नीट बैस म्हणून तिला केम्हाहीं सांगत असाम॑.
neeTनीट.adj.orderly.क्रम प्रकार. ऊनांत वाळिवाला घाट्लत॑ कापड अग्गीन बरोर वाळल॑तर॑ एकएकदनांच कापड॑हीं वेगळ॑ वेगळ॑ विणी नीट मुजलून/मुदलून आंत ठिवूनटाक.
neeTनीट.adj.suitable.योग्य. मी रेडी-मेड दुकानांतून अंगी जास्ती घेईना, पण अपरूपांत॑ एक दोन नीट असलतर॑ घेईन॑.
neeT karNeनीट करणे.vt.to put in order. to repair.बरोर करणे.
neeT karNeनीट करणे.fig.to take a person to task. एकाला वाटेला आणिवणे.
neethiनीति.n.justice.न्याय.
negनेग.n.ornaments.नग. आभरण॑. वस्त. माल-मत्ता.
nendranनेंद्रन.n.a variety of banana.एक रीतीच केळ॑.तज बरोरल॑ रूच पह्जे म्हण्जे नेंद्रन केळेच उप्पेरि खोब्रीच तेलांत तळलतर॑ मात्र येईल.from Malayalam.
nesनेस.imp.wear (cloth).कापड॑ आंगा वर घालणे/गुंडाळणे.
nesaNeनेसणे.vt.to drape clothes on body (like saree, dhoti, kasota).कापड॑ आंगावर घालींगणे/गुंडाळींगणे.(लुगड॑, धोती, कासोटा अस॑).
nesivaNeनेसिवणे.vt.to drape clothes on another person.वेगळेंस॑ कापड॑ घालिवणे.नेसवणे in sm.
nethaaनेता.n.leader.नायक. लोकांच नेतृत्व घेणार.
nethhनेथ.n.nose ring worn by ladies.नथ. नाकाच आभरण॑. नथणी.
nethra~नेत्र.n.eye.डोळे.
nethrthva~नेतृत्व.n.leadership.नायकत्व॑.
nevedya~नेवेद्य.n.food offered to Gods.नैवेद्य. पूजाच वेळी देवाला अर्पण कराच पदार्थ.
nhaaNeन्हाणे.vtto take bath.नाहणे. स्नान करणे. आंघोल करणे.
nhaaNeeन्हाणी.n.bathroom.नाहणी. स्नानाच (आंघोळाच) खोलि.
nhoन्हो.adj.no.नोहो. नहो.
niनि.conj.also. and.पणीं.(1) तला काहीं कळना. तो त्यंचकडे बोलाला जाताना मीनि तज बरोर जातों. (2) बंडींतून उतरलोंकिनि मी तडकून पडलों.
nibandhanaaनिबंधना.n.a restraing or limiting condition or clause.अडचणाच अथवा निरोधाच गोष्ट.
nibbara~निब्बर॑.adj.grown hard.कोवळ॑ नाहीते.निबर in sm.
nibra~निब्र॑.adj.grown hard.निब्बर॑ कोवळ॑ नाहीते.निबर in sm.
nidaana~निदान॑.adv.slowly, not being in a hurry.सावकाश.
nidhanनिधन.n.death.मरण॑. मृत्यू.चुलत सोयरांचपटीस कोणाच तरीन निधन झालतर॑ अम्हाला दहा दिवसाच सूतक करामते पडेल॑.
nidhiनिधि.n.hidden or burried treasure.लप्पून ठिवलत॑ संपत्त॑.
nidhiनिधि.n.a Finance Company.पैसाच व्यवहाराच स्थापना.
nidra~निद्र॑.n.sleep.झोंप.
nigaaनिगा .n.attention. having an eye on. tending.श्रद्धा ठींगणे. गवन ठींगणे. बेष पाह्यींगणे. रोडावर भाजी-पाला, पंडू-फल अस विकणार बायके त्यंच ल्हान 3-4 वर्षाच लेंकराना पणीं बाजूला ठींगून बसलासतात॑. कोणतरीं ग्राहक आलतर त्यंचकडे व्यापार करेत॑ त्यंच लेंकरा वर पणीं एक निगा ठींगतात॑.
nighaNeनिघणे.vi.to start.जायाला आरंभ करणे. गावांला निघताना घरचकडे "जातों" म्हणून सांगताने. "जावून येतों" म्हणून सांगांव॑.
nighanTuनिघंटु.n.a dictionary.शब्दकोश. शब्द अथवा पदाच अर्थ द्याच ग्रंथ.
nijaarनिजार.n.shorts. knickers.विजार. गुडिघा पतोरी झांकाच पायजामाNote :- इजार in sm. (1) इजार indicates long trousers in sm. (2) निजार and विजार are considered as misspellings of इजार, arising out of their use amongst the ill-educated and rustic. It is also probable that such misspellings crept into the language before written Marathi was standardised in early 19th century. Other similar examples are विंगळा and इंगळा, meaning "live coal", लांदर and रांदल, meaning "hurricane lantern", नागवे and नावगे meaning, "naked" etc
nijaNeनिजणे.vi.to lie down.शयन करणे.सायंकाळीच वेळ निजणे आंगाला चोखोट न्हो.
nije~निज॑.adj.real. actual. true.खर॑. सत्य. वास्तव॑.
nijivaNeनिजिवणे.vt.to put to sleep.झोंपाला घालणे.निजवणे/निजविणे in sm.
nikaaTनिकाट.imp.get away ! get lost !ठिकाण सोडून जा !
nikaaTNeनिकाटणे.vi.to get away. to move out. to scram. to get lost.ठिकाण सोडून जाणेनिकटणे/निकाटणे in sm. Used when a person who is unwanted moves out.
nikShepनिक्षेप॑.n.deposit. placing.ठिवणे.
nilaanjana~नीलांजन.n. an oil or ghee lamp used in puja or for arathi.पूजाला अणी आरतीला उपयोग कराच तूपाच समी.
nimbनिंब.n.neem tree.कडुलिंबाच झाड. निंबाच झाड.
nimmathiनिम्मति.n.peace of mind. tranquility of the mind. मनाच शांति. मनाच समाधान॑. स्वस्थ. from Tamil.
nindaaनिंदा.n.condemn. censure.बरोर नाही म्हणून सांगणे.
nipaTaNeनिपटणे.vt.to apply by scraping or rubbing with fingers or hand.बोट अथव हाता वटे घासून लिंपणे.सरदारजी लोके त्यंच दाढी मीशाला मध्य मध्य तूपकी दहींकी निपटून पळपळा करींगतील॑.usually with reference to a liquid or a paste.
nippaTनिप्पट.adj.stark.पूराच-पूरा. एकदम.कित्येक लोक॑ त्यंच लेंकरांस॑ तीन-चार वये पतोरी (पर्यंतीन) कापड काईं घालनस्क॑ निप्पट नावगेंत (नागवेंत) हिंडाला सोडाच पाव्हून मला कंटाळा वाटते.
nipuNनिपुण.adj.skilful. expert.प्रवीण. कुशल.
niraadhaarनिराधार.adj.baseless. unsubstantiated.आधार नाहीते.
niraahaarनिराहार॑.adj.fasting.अनशे पोटाच॑.
niraasनिरास.n.despair. disappointment. feeling of let down. मनाला बेजार वाटणे. निराशा.
niraashaaनिराशा.n.despair. disappointment. feeling of let down.आशाठिवलते होयनास्क॑ असणे. विषाद. निरास. मनाला बेजार वाटणे.
niranthara~निरंतर॑.adv.constant. incessant. continual.शाश्वत॑.
niraparaadhiनिरपराधि.adj.innocent.अपराध॑ केल नाहीते.
nirbala~निर्बल॑.adj.weak. infirm. powerless.शक्ति नाहीते. बळ नाहीते. दुर्बल.
nirbandhनिर्बंध॑.n.compulsion.होवूनच सराम॑ अस असाच॑.तुम्ही ते कार्यक्रमाला जावूनच सराम॑म्हणून निर्बंध काही नाही. असौकर्य काही होयनातर॑ जांत॑, नाहीतर नोको/नको.
nirbandhनिर्बंध॑.n.resolution.दृढ मनाच.
nirbandhनिर्बंध॑.n.restrain. control.निर्बंध.
nirbandhनिर्बंध॑.n.enforcement.निर्बंध.
nirbhaagya~निर्भाग्य.adj.unlucky. unfortunate.भाग्य नाहीते.
nirbhaya~निर्भय॑.adj.fearless.भें नाहीत॑.
nirdaya~निर्दय॑.adj.cruel.दया नाहीते. क्रूर॑.
nirdeshनिर्देश.n.instructions. order.आज्ञा.
nirdhana~निर्धन॑.adj.impoverished.दरिद्र॑.
nirdoShनिर्दोष॑.adj. innocent.दोष नाहीते.
nirdoShiनिर्दोषि.adj.innocent (person).दोष नाहीते (व्यक्ति).
nireekShaNनिरीक्षणे.n.examining closely.सूक्ष्म होऊन पाह्णे.
nirguNa~निर्गुण॑.adj.attribute less.गुण काहीं नसाच॑.
nirmaalya~निर्माल्य॑.n.stale flowers and offerings which have been removed from the idol of a deity.देवाच विग्रहांतून काढलते फूलेहीं वेगळ॑ अर्पण॑ केलतेहीं.
nirmaaNनिर्माण.adv.create.उत्भव करणे.
nirmala~निर्मल॑.adj.pure.पवित्र. शुद्ध.
nirmoola~निर्मूल॑.n.eradication.पूरा नाहीस्क॑ करणे.
nirNaya~निर्णय.n.decision.निश्चय.
nirodhनिरोध.n.prevent.कराला सोडनास्क॑ देणे.
niropनिरोप.n.permission to leave.जायाला अनुमति.अम्च॑ ओफींसांत वर्लाच निरोप नाहीस्क॑ कोणीं बाहेर जायाल नाही.
nirundनिरुंद.adj.narrow. not broad.उणे रुंदाच.
nirvaahनिर्वाह.n.maintenance. to look after.सांभाळणे. राखून ठिवणे.नीस is the picked out good portions.
nisaarनिसार.adj.trivial.अल्प विषयाच.
nisaNeनिसणे.vt.cleaning and picking out the bad portions of vegetables or their skins.भाजीपालांतून शुद्ध॑/चोक्कट भाग वेंचून सोलणे.(1) थोर समारंभाच संपाक करताना पाला/शेंगा असल भाजी निसाला एक मनुषाला तीन-चार घंटाच वेळ होईल॑. (2) मझ॑ आजीच अम्माला (पणजीला) एक दंडक होत॑. दुकानांतून भाजीपाला आणल तर॑, तजांतून निसून काढलते अग्गीन परतून दुकानवालालेच वापस देऊन तेच वजनाला अण्खीन थोडक॑ दे म्हणून निर्बंध करतील॑.
nisaraNeनिसरणे.vi.to slip. to skid.(पांयें) चुकून पडणे.
nisarDaaनिसरडा.adj.slippery. निसरूडा. निसराच॑.
nisarga~निसर्ग.n.nature.प्रकृती.
nisarga~निसर्ग.n.natural state or form.प्रकृतींतल॑ मूल रूप॑.
nisarooDaaनिसरूडा.adj.slippery. निसरडा. निसराच॑.
nishaagandhiनिशागंधि.n.tube rose.रात्रि उगाच॑ एक फूलाच नाव.
nishabda~निशब्द॑.adj.silence.निश्शब्द॑. गुपचुप. शब्द॑ नाहीस्क॑ असणे.
nishchaya~निश्चय॑.n.certainty.निश्चय॑.तू मला पाव्हून बोलाच निश्चय म्हण्जे मी सांगाच ठिकाणि याला तय्यार असाम॑. तिकड बसून बोलुम्हणे.
nishchaya~निश्चय॑.n.determination.मनाच दृढपण॑.मझकडे काय बोलामते म्हणून तुज मनांत बेष निश्चय असलतर॑ मला येऊन पा.
nishchaya~निश्चय॑.n.agreement.ओप्पंदम.तज लेंकीच वराडाच गोष्टाचवर उदंड बोलणे होत होत॑. नंतर॑ वराडाच निश्चय झालकी नाहीकी, हे मला कळ्ना.
nishchaya~निश्चय॑ advcertainly. without fail. positively. surely.पक्का होऊन. कंडिप होऊन.(1) जास्ति योचना करनाका, गांव सोडून जायाच पुढ॑ निश्चय मी तुम्हाला येऊन पाह्तों. (2) मी सांगाच तुम्हाला विसंबाला होत नाही वाटत॑. संदेह काईं नोको, निश्चय होऊन देलते गोष्ट मी करून दाखिवतों. (3) अत्तलीकडे भरजरीच कांजीवरम लुगड॑ वराडा करतां घेम म्हण्जे, एकाला मात्र वीस-पंचवीस हदार रुपे निश्चय होईल॑.
nishchithaarthhनिश्चितार्थ.n.betrothal. wedding engagement. वराडाच पुढे करींगाच ओप्पंदम.
niShedhनिषेध.n.denial. prohibition. condemnation.विरोध. संमत करनास्क असणे.
nisheeनिशी.prep.along with. together with.concurrent with.बरोर. सह॑.(1) "श्राद्ध॑ करा पुढे नीट आंघोळी करींगून सोवळेनिशी या" अस आचारे मला सांगिटले. (2) सांभार वाढताना फोडीनिशी वाढाला तला सांग.
niShiddhनिषिद्ध.adj.prohibited. denied. disallowed.निषेध केलते. निषेध झालते.अम्च॑ संप्रदाया प्रकार सगोत्र वराड निषिद्ध आहे.
niShkalankनिष्कलंक.adj.spotless. stainless. pure.निर्दोष. निर्मळ. शुद्ध॑.
niShpakSha~निष्पक्ष.adj.impartial.पक्षपात नसाच॑.
niShphala~निष्फल॑.adj.fruitless. unproductive. futile.व्यर्थ.
nishshabda~निश्शब्द.adj.silent.निशब्द. गपचुप. शब्द॑ नाहीस्क॑ असाच॑.
niShTHaaनिष्ठा.n.firm adherence to integrity, faith, trust etc.गाढ श्रद्धा. गाढ अनुसरण॑.
niShTHoorनिष्ठुर.adj.cruel. hard-hearted.निर्दय. कठोर मनाच.
nithhaLNeनिथळणे.vi.to trickle. to drip.ओहळणे. नंखर-नंखर गळणे.रात्रि पूरा नाहणींतल॑ नाळांतून पाणी निथळाच शब्द ऐकून मला थोडकपणीं झोंप आल नाही.
nithhaLNeनिथळणे.vi.to ooze.ओहळणे. नंखर-नंखर गळणे.कर्ज/र्रीण देलते पठान घरांत घूसाच पाव्हून मझ॑ मित्राला दिग्भ्रम होऊन आंग पूराहीन घामांत निथळाला आरंभ झाले.
nithraaNनित्राण.n.drained out feeling. the feeling of exhaustion.फार श्रमामुळे होयाच सुस्त. शीणभाग. भाग होणे.त्राण means 'strength'/'stamina'
niththaLनित्तळ.adj.clear and dilute (liquid). non-turbid dilute (liquid).पत्तळ शुद्ध (द्रव्य).नितळ/निथळ in sm.
nithya pramaaNeनित्य प्रमाणे.adv.as per daily routine. दिवसास्क॑.
nithya~नित्य.adv.daily.दिवसोडि.
nithyaanandनित्यानंद.adj.ever-joyful.केम्हाहीं आनंद असणे.
nithyakarma~नित्यकर्म.n.daily duties. daily chores. दिवसास्क॑ असाच काम.
nivaaraNनिवारण.n.prevention.होयाला सोडानास्क॑ असणे. बाधा घालणे.
nivaasनिवास.n.dwelling place. abode.राहाच ठिकाण. आलय॑.
nivaasasthhaanनिवासस्थान.n.place of residence.राहाच ठिकाण. निवासस्थळ.
nivaasasthhaLनिवासस्थळ.n.place of residence.राहाच ठिकाण. निवास स्थान.
nivaasiनिवासि.n.one who resides.राहाच व्यक्ति.
nivalatheनिवलते.adj.that which has cooled down.निवून असाच॑.
nivaNeनिवणे.vi.to cool down.ऊन उणे होणे.
nivivaNeनिविवणे.vt.to allow a thing to cool down.ऊन उणे करिवणे. ऊन उणे होयाला सोडणे.निववणे/निवविणे in sm.
nivrththa~निवृत्त.adj.situation of inactivityप्रवृत्ति राहत॑ केलते.
nivrththiनिवृत्ति.n.situation of inactivityप्रवृत्तीच विरुद्ध॑.तला अहंकारीं झंपीं उदंड आहे-ते-करतां कोण्त उद्योगांत॑ असलतरीं थोड दिवसांतेच तला कामांतून काडूनटाकतात॑. वेगळ॑ निवृत्ति नाहीस्क॑ अत्ता भीक मागेत आहे.in conversations this term is normally used to indicate a situation where inactivity is not the option. eg. ते काम मी संतोषांत न्हो केलते. वेगळ॑ निवृत्ति नाही म्हणून करामते पडले.
niyama~नियम॑.n.rule. law.नियन॑.
niyanthraNa~नियंत्रण॑.n.control.नियंत्रण॑.
niyogनियोग.n.appointment.एक कार्याला निश्चय करणे.
niyojana~नियोजन॑.n.planning.योजना.
niyuktha~नियुक्त adjappointed.नियोग केलते.
niyuktha~नियुक्त adjauthorised.अधिकार मिळालते. अधिकार देलते.
nohoनोहो.adj.no.न्हो. नहो.
nokoनोको.imp.no. do not.नको.
nonDaNeनोंडणे.id.to meddle around.मध्य पडणे.(1) 'लीवाच' दिवस आलतर॑ मझ लोंक काहींतरीं नोंडेत॑ असतो. नाहीतर॑ तला वेळ जाईना. (2) दोघे पोरे खेळींगत असताना एकला दुसराकडे म्हणतो "तुज लेगो ठींगून तू खेळींगे. मझ लेगो काढून नोंडूको". from Tamil.
nonDaNeनोंडणे.id.to needle somebody.कोणालतरीन तंटा देणे.from Tamil.
nonDaNeनोंडणे.vt.to dig and scratch.उकरणे.from Tamil
noreनोरे.n.foam.फेंस.मीठ पाणींत सोप/साबून घालून फडकी धुवलतर॑ नोरे येईना. फडकी पणीं बरोर धुवलासना.from Tamil.
nouनौ.n.nine.आठाच नंतरल॑ संख्य.नऊ in sm.
nousheनौशे.n.nine-hundred.नौ गुणा शंभर.नऊशे in sm.
nrthya~नृत्य.n.dance.नाच.
nrthyaangaNa~नृत्यांगण॑.n.a stage for dance.नृत्याच वेदि. रंग मंच.
nungनुंग.n.palmyra fruit.पनै/ताडि झाडाच फळ॑/पंडू.नुंग॑ मला फार अवडल॑. तजांतल॑ रस गुळ्चीट अणी स्वाद अस्त॑.ताड गोळा in sm. from Tamil.
nustha~नुस्त॑.adj.mere. उगेनुसता in sm.
nustha~नुस्त॑.adv.merely.उगेच॑ नुसता in sm.
nyaahilन्याह्लि.n.a mattress.नाहलि. नायलि. अंथरूण. लेप.न्यहाली in sm.
nyaaya~न्याय.n.justice.नीति.
nyaayaadheeshन्यायाधीश.n.a judge.न्याय कचेरीच अध्यक्ष. जड्ज.
nyaayaneethiन्यायनीति.n.equity and justice.न्याय अणि नीति.
nyaayasabhaaन्यायसभा.n.electoral assembly where laws are passed. विधान सभा.
nyaayasthhन्यायस्थ.n.a just/upright person.थोर मनाच मनुष.कित्येक भाग्यवंत लोक॑ न्यायस्थ पणीं असतात. त्यंचकडे जमीनांत काम करणारांना, वराडाला म्हणून, लेंकरांना वाचीवाला म्हणून, व्याज घालनात॑ अणी जमीन अडमान॑ ठिवनास्क॑ कर्ज/र्रीण देतात॑. असलते चोखोट लोकांना ते गांवाच लोके देवाच समान म्हणींगतात॑.

No comments:

Post a Comment