Sunday, May 15, 2016

cH (छ)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
cHaaDee saangaNeछाडी-सांगणे.vt.to indulge in mischievous talk. to carry tales. वंब॑-बोलणेएक-एक आफीसांतीं दहा शक्के (10%) लोक॑ त्येंच काम काहींन करनास्क नुस्त छाडी सांगू्ण वांचणार असतील॑.
cHaaDiछाडि.n.mischievous talk. वंबु॑ (tamil)एक-एक आफीसांतीं दहा टक्के (10 %) लोक॑ त्येंच काम काहींन करनास्क नुस्त छाडि सांगून वांचणार असतील॑.
cHaandasछांदस.n.very specific on likes and dislikes. अवडणे न अवडणे हे विषयांत॑ दृढ मन्न असणे.म्हातारे लोकाना खाणे-जेवणाच छांदस जास्ति अस्ते. प्रति वेळीं प्रत्येक-प्रत्येक पदार्थ करांव॑(कराम॑), नीट तूप-तेल घालून तळलते भाजी असांव॑(असाम॑), दुपारच "टिफ़्फ़िनांत" गुळ्चीट ठिवाम॑, अस॑ विचारचाला अंतेच असना.
cHaapछाप.n.impression. stamp. मुद्रा. कित्येक लोकांना अधीक वाचणे नाहीं तरीन त्यंच हस्ताक्षर छापलास्क अस्ते !
cHaapaaछापा.n.stamping. मुद्रा घालाच. सर्व दुकानांतीं असाच झोकीच यंत्रीं / ’तरासीं’ सरकाराच नियमाजोक्त॑ प्रति वर्षीन ’इनस्पेक्शन’ करिवून छापा करीवाम॑.
cHaapaNeछापणे.vt.to print. मुद्रण करणे. मझ॑ लोंक ल्हान असताना नित्य एक वस्तु घ्याला नच्च करेल॑. तला मी सांगेन॑ "इतपर अम्ही पैसे छापल तरच वांचाला होईल॑".
cHaapaNeछापणे.vt.to stamp. मुद्रा घालणे. डाक घरांत अवसरान छापाच वेळी कित्येक तपाल-स्टॅम्पाच व॑र मुद्रा पडना. तसल॑ तपाल-स्टॅम्प ओल॑ करून काढून पुन्हा उपयोग कराला होईल.
cHaatheeछाती.n.chest. bosom. breast. थान. स्तन.
cHaayaaछाया.n.image.छायारूप॑.
cHaayaaछाया.n.reflection. प्रतिबिंब. पडसावळि. केरळ राज्यांत॑ आरनमुळा गामांत॑ लोहेंतून एक प्रत्येक रीतीच अरसा करतात॑. हेजांत॑ दिसाच छाया, गाजाच अर्सांत दिसाच छायास्क अस्ते.
cHakkaaछक्का.n.a playing card with a value of six. सहाच संख्याच खेळाच कार्ड (English).
cHakkaaछक्का.n.a dice with six on it. खेळाच डैसांतल॑ (English) सहाच चिन्ह.
cHakkaaछक्का.n.a hit for a six in cricket.क्रिकेट खेळांत॑ सहाच एक मार.हे काळांत॑ पोणावांटा घराला कॉण्क्रीटाच छप्पर घालतात तरीन, समुद्राच कांठशीच प्रदेशांतीं जाभाराताच॑ कॅपटन महेन्द्र सिंग धोनी गेल वर्ष पतोरी भरून छ्क्के मारत होता. पण अत्ता तज कॅप्टनसी छ्क्काला जायाच स्तिथींत आहे !
cHapparछप्पर.n.thatched canopy. पंदल. छप्पर बांधताना बरोर वाटम देनास्क॑ बांधल तर॑, पाऊसाच पाणी लोक्कुर गळून जायनास्क खोलीच आंत उतरेल॑.
cHapparछप्पर.n.roof. घर अथवा बांधणीच व॑र असाच बांधोटी. कूरै (tamil). हे काळांत॑ पोणावांटा घराला कॉण्क्रीटाच छप्पर घालतात तरीन, समुद्राच कांठशीच प्रदेशांतीं जास्ति पाऊसाच प्रदेशांतीं अत्ता पणीं ओडाच छप्पर घालतात॑.
cHapparpalangछप्परपलंग.n.a canopied cot. a four-poster cot.छप्पर/डांचपर्दा बांधाला सौकर्य असाच पलंग.
cHathछत.n.ceiling. घराच छप्पर॑.अधीक दिवस/महीने एक खोलि झांकून ठिवल तर॑ छताच खाले गरवसा बांधून असाच साध्य आहे
cHathछत.n.awning. canopyछप्पर॑.
cHathra~छत्र.n.a large hall for conducting marriages etc. वराड, मुंज असलते कार्यक्रम कराला उपयोग कराच एक मोट्ठ॑ बांधणि.चेन्नैंत वराडाच छत्र पह्जे म्हणजे सहा-नौ महिने पुढेच बुक/निश्च्य करामते पडते अणी दिवसाला तीन-चार लाख रुप्पे तज भाडे अस्ते.
cHathrapathiछत्रपति.n.emperor. साम्राट. छत्रपति शिवाजी महाराज नहोते मण्जे मुघल राजेलोक मध्य अणी दक्षिण भारत पूराहींन कब्ज़ा केलसतील॑.
cHathreeछत्रीumbrella. कोडे (tamil). उन्हाळा असून दे, पाऊसाळा असून दे, केरळांतल॑ लोक॑ बाहेर जायाच वेळ छत्री अवश्य घेऊन जातील॑.
cHedछेद. n.a gap. a break. a crack. a separation.छेद.
cHee cHeeछीछी. interj.an expression indicating vehement denial.जोरांत॑ निषेध करतां (ओपनास्क असतां) सांगाच एक गोष्ट. "छीछी, तो असल॑ मनुष न्हो. तो तज बायलीला कद्दीन दगा करून दूसरे बायकांच बरोर वागे ठींगना".
cHiछि. interj.an expression of denial in a manner of putting down.अवडनाते कायतरीन विषीं तुच्छ कळिवाच गोष्ट. तेनी मला विचारले "तू केम्हातरीं एकदा दारू पीशील न्हो का" ? ; मी म्हटलों "छि! मी सुद्ध म्हणून दारू शिवत नाही, तुला अस विचाराला धैर्य कस आल॑ ?".
cHinnaabhinna~छिन्नाभिन्न॑.adj.broken-up and scattered. चुक्कुनूरु. चूर-चूर होऊन एकडे-तिकडे होणे.मिरासदार आजोबा मेला नंतर त्यंच कुटुंब छिन्नाभिन्न॑ होऊन गेल॑. वडील लोंक बाहेर देशांत राहून गेला, दूसराला वाचणे नाही अणि पूर्त पैसे उडीवला, दोघ लेंकीनीं विधवा झाले. अस॑ त्यंच कुटुंब छिन्नाभिन्न॑ झाल॑.

No comments:

Post a Comment