Sunday, May 15, 2016

j (ज) 1 (jaach to jaree)




.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
jaachजाच.n.harassment.नच्च करणे. सळिवणे.अगाऊ अस्गीन सासू घरचे सूनाला जाच करतात॑ म्हणून अम्ही ऐकलोहों. अत्तच काळांत उपराठ जालाहे. सून सासूला सळीवतात॑.
jaaDजाड.adj.thick.घट्टि. पत्तळ नसाच. फुड कॉरपरेषन ओफ इंदिया वर्षा-वर्षी घ्याच पीक दत्तन/जत्तन ठिवाला त्यंचकडे आवश्याप्रकार गोदाम नाही म्हणून मूटा मूटा तांदूळीं गेहूंहीं जाड टारपाळीनांत॑ झांकून उघड ठिकाणी ठिवतात॑.
jaaDजाड.adj.stout.घट्टि. बरीक नसाच.अम्ही गुरुवायूर देऊळाला गेलसताना तिकडल॑ हत्तीला मागल॑ दोन पांयेहीं जाड चरांटांत॑ बांधून एक झाडाच खाले होठाकिवलसाच पाह्यलों.
jaaDजाड.adj.obese.दांडग॑. अमेरिकांत॑ एरोप्ळेनांत॑ जाम॑ म्हण्जे उदंड जाड असणारजन॑ दोन-दोन टिकट घेटलतरच प्ळेनांत॑ वेघाला सोडतील॑.
jaadaaजादा.adj.extra. surplus more.जास्ति. अधिक. भरून.
jaaDiजाडि.n.a porcelain jar.बरणि.अगाऊच काळांत उन्हाळाच दिवसी बाज़ारांत॑ हिरव॑ अंबे याला आरंभ होतांत्सून एक वर्षाला पह्जेते लोणचे घालून जाडींत भरून ठिवत होते. अत्तलीकड॑ हे काम कराला कोणालाहीन समय की उत्साह की दिसत नाही.
jaaduजादु.n.magic.इंद्रजाल
jaadugarजादूगर.n.magician.जादु करून दाखिवणार ;जादूगार in sm.
jaaeeTaaजाईटा.n.jacket.जायीटा. from English.
jaagaaजागा.n.accommodation.राहाच ठिकाण.अम्ही असाच चुम्मण॑ घरांत अम्हालाच जागा पुरे होत नाही. तजामधे मझ चुलत बहीण कुटूंबासहीत गाम पाह्याला येऊनगेली.
jaagaaजागा.n.place.ठाम. ठांव. ठिकाण. अम्च॑ कुटुंबांत सहादन आहेत॑. ल्हान बंडींत जागा पुरे होतनाही म्हणून अत्ता-अत्ता मी एक टोयोटा इन्नोवा बंडि घेट्लों.
jaagaaजागा.n.location.स्थळ॑.हैदरबादांत॑ मझ॑ लेंक एक प्ळाट घेट्ली. ते जागा गच्चीबौळींत आहे अणि फार बेष आहे.
jaagaNeजागणे.vi.to awake.झोंपींतूं उठणे.रात्रि मला निजाला साडे अक्रा-बारा होत करतां मला पाह्टे (पाष्टे) सात घंटे पुढ॑ जागणे म्हणजे होत नाही (होतनी).
jaagapaNa~जागपण॑.n.state of wakefulness.जागे असाच स्थिति.
jaagaraNजागरण.n.wakeful state.झोंपी जाईनास्क असण॑.ल्हान असताना मी शिवरात्रीच जागरण करत होतों, पण मझान अत्ता ते होत नाही.
jaageerजागीर.n.hereditary rights for collection of tax from certain villages.कित्येल गांवांतून कर वसूल कराला परंपरांतून याच अधिकारजाहगीर in sm.
jaageerजागीर.n.villages and lands which are received as jagir.जागीर होवून मिळ्लते गावीं जमीनींवेदाजी भास्कर पंत यांस बिजापूर सुल्तान इसवी 1640 वर्षी आरणीच जागीर देले. तेम्हा पसून इसवी 1948 वर्षी मद्रास प्रांतांत केम्हा ज़मीनदारी/जागीरदारी व्यवस्था राहते केलेकी ते पर्यंत म्हणजे, जवळ-जवळ तीनशे वर्ष आरणी जागीर होत॑. जाहगीर in sm.
jaageerdaarजागीरदार.n.holder of a jagir.जागिराच आधिकार असणारआरणी जागीरदारांच वंश मध्व ब्राह्मणांच आहे. उत्तरादि मठाच तेवीसवां मठाधिपती म्हणून होतते श्री सत्य विजय तीर्थ यांच मूल ब्रिंदावन आरणींतल॑ सत्य विजय नगरमांत इसवी 1737 वर्षी आरणीच दहवां जागीरदार श्रीनिवास रावसाहेब स्थापना केले. जाहगीरदार in sm.
jaagejhompजागेझोंप.n.drowsiness.अडनीद॑.
jaagruthजागृत.adj.alert.श्रद्धांत असणे. हुशारांत॑ असणे.बाहेर देशाला प्रयाण करताना अम्च ’पासपोर्ट, क्रेडिट कार्ड’ हे सर्व जागृतान॑ पाह्यिंगाम॑.
jaagruthaaजागृता.n.alertness.श्रद्धांत असाच स्थिति. जाग्रतांत॑ असाच स्थिति.काय ’बरग्लरी इनसूरन्स’ केलतरीन अम्ही अम्च जागृता सोडून देनास्क॑ असाम॑.
jaagruthiजागृति.n.alertness.हुशारि.
jaaLजाळ.n.flame.ज्वाला.’होलीच’ पुढच दिवसी रात्री लोक त्येंच-त्येंच घरांतल उपयोग नाहीते सामान बिदींत ठिवून जळीवणे आहे. कित्येकदा ते जाळ॑ थोर होऊन शेदारी-पादारी असाच घरांतल वस्तूलापणीं पेटींगाच संभव असत॑.
jaaLजाळ.n.burning sensation.जळास्क वाटणे.(1) एक वये नंतर अधीक तळलते पदार्थ रात्रीच वेळ खायलतर पोटांत/ उरांत जाळ वाटल॑. तजकरतां पालाच भाजी (आलकलैन फुडस) खाणे चखोट. (2) कढत पाणी पडून आंग पोळींगटलतर॑ दोन-तीन दिवस पतोरी मल्लम लाहींगाम॑. तेम्हापणीं जाळ सुलभान (सुलूभांत॑) जाईना.
jaaLeeजाळि.n.grille. trellis.जालि. लोहेंच नाहीतर॑ लांकडाच पट्टी अडव॑-अडव॑ ठिवून करिवलते साधन॑.(1) फ्ळाटांत॑ राहणार कित्येक लोके घरांत॑ ठाम (ठांव) पुरना म्हणून त्यंच बाल्कनीला जाळि घालून झांकणे आहे. (2) पंध्रा-वीस वर्षाच पुढ॑ बांधलते कित्येक घरांत॑ परसाकडेच खोलींत॑ सिमेन्टांत केलते जाळीच खिडकी पाव्हूया.
jaaLeeजाळि.n.grating.जालि.केरळांत लांकडाच पुडीच सगडी उपयोग करतहोते. तजांतल जालि/जाळि कोळसाच सगडींतल जाली बरीस बारीक असत॑.
jaaLNeजाळणे.vt.to burn. to ignite.जळिवणे. विस्तू पेटिवणे.समाधानहोऊन हरताळ करतों म्हणून ’टी.आर.एस’ कार्यकर्ता पोलीसाकडून अनुमती घेतात॑ अणी तेंच लोकाना ’सिटीबस’ जाळाला सूचना देतात॑.
jaalraaजालरा.n.a musical accompaniment, shaped like a shallow circular tray with a set of jingles on it's brim.संगीताच एक वाद्य.
jaamजाम (telugu).n.guava fruit.जांब. पेरु.जाम पंडूंत ’वैटमिन सी’ भरून असत॑ अणी वेगळ॑ पंडूबरीस ते सवंग पणीं असत॑.
jaamaayeeजामाई.n.son-in-law.जावांई. लेंकीच दल्ला/दाल्ला ;जावई in sm.
jaambजांब.n.guava fruit.जामाच पंडू. पेरु.पाऊसाळाच काळांत हैदराबादांत चोखोट अणी थोर जांब/जाम पंडू मिळत॑. सवंग पणीं अस्त॑.
jaambhaayeeजांभाई.n.yawn.झोंप येताना तोंड उघडून सोडाच दीर्घ श्वासजाभई in sm.
jaambhaLजांभळ.n.dark purple colour.जांबळ रंग.जांभळा/जांबळा in sm.
jaambhaLजांभळ.n.a sweet and sour purple coloured fruit or it's tree.अंबटीं गुळ्चीटीं असाच जंबू झाडाच फळ.डैबटीस असणार जांभूळ/ जांबूळ पंडू खायलतर॑ रक्तांतल॑ साखर॑/ ग्लूकोस उण॑ करिवते.जंभूळ/जांबूळ in sm.
jaameenजामीन.n.cash security given to a Court for getting a release from arrest.कैदांतूं बाहेर उतराला कचेरींत॑ बांधाच पैसा. जाम्य.न्याय कचेरींत अपराधी म्हणून घोषणा केलत्यांस॑ पैसेच जामीन द्याला म्हणून बिसिनस कराच कित्येक लोके आहेत.
jaameenजामीन.n.personal security given to a Court for getting a release from arrest.कचेरीला द्याच मनुषाच जाम्य. कचेरीला द्याच मनुषाच वाग्दान. जाम्य.कित्येकदपा अपराधींस॑ पैसेच जामीनाच बद्दिल स्वंत वाग्दानाच जामीनांत पणीन बाह्येर सोडणे आहे.
jaameen hoTHaakaNeजामीन होठाकणे.vt.to stand as a surety.दूसरेला जाम्य मिळाला होठाकाच मनुष (जामीन). जाम्य ओठाकणे. जाम्य होठाकणे
jaamya~जाम्य.n. an order for a surety issued by a Court for release from arrest.कैदांतूं बाहेर उतराला कचेरीच निर्देश.
jaamya~जाम्य.n.cash security given to a Court for getting a release from arrest.कैदांतूं बाहेर उतराला कचेरींत॑ बांधाच पैसा. जामीन.न्याय कचेरींत अपराधी म्हणून घोषणा केलत्यांस॑ पैसेच जाम्य द्याला म्हणून बिसिनस कराच कित्येक लोके आहेत.
jaamya~जाम्य.n.personal security given to a Court for getting a release from arrest.कचेरीला द्याच मनुषाच जाम्य. कचेरीला द्याच मनुषाच वाग्दान. जामीन.कित्येकदपा अपराधींस॑ पैसेच जाम्याच बद्दिल स्वंत वाग्दानाच जाम्यांत पणीन बाह्येर सोडणे आहे.
jaamya~ hoTHaakaNeजाम्य होठाकणे.vt.to stand as a surety.दूसरेला जाम्य मिळाला होठाकाच मनुष (जामीन). जाम्य ओठाकणे. जामीन होठाकणे.
.
jaanavजानव.n.sacred thread worn after upanayana by brahmins signifying initiation into religious duties.उपनयनाच नंतर ब्राह्मण लोके नेसाच पवित्र दोरा. यज्ञोपवीत.नुस्त जानव घालींगतांतरून ब्राह्मण म्हणून सांगींगाच अधिकार येईना. ब्राह्मणाला तज नित्य अणी नैमित्तिक कर्म कराच निर्बंधन असत॑, अणी ते बरोर करणारांलाच ब्राह्मण म्हणूया.
jaanavजानव.n.sacred thread worn by the brahmin, kshatriya and vysya castes.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातींच लोके नेसाच पवित्र दोरा. (1) ब्राह्मण जातीच पद्धति प्रकार तीन दोरीच (एक ब्रह्मगांठाच) जानव ब्रह्मचारी घालींगाम॑, गृहस्त लोक॑ सहा दोरीच (दोन ब्रह्मगांठाच) जानव घालींगाम॑ अणी साठ वर्षावर असणार लोक॑ नौ दोरीच (तीन ब्रह्मगांठाच) जानव घालींगाम॑. (2) ब्राह्मण, क्षत्रिय अण्खी वैश्य हे तीघ्यालीं जानव आहेतरपणीं साधारणहोऊन ब्राह्मणांला मात्र "द्विज" म्हणून सांगतात॑.
jaaNeजाणे.vi.to go.पुढे सरकणे.बद्रीक आश्रमाला जाणे म्हणाच थोर यत्तन आहे. पण तेथ गेलावर परतून याला मन्न ओपना म्हणून लोक सांगतात(1) from 'यान' of Samskrith. (2) यत्तन is a morphed version of यातना, meaning torment.
jaangiriजांगिरि.n.a type of sweet preparation.खायाच एक गुळ्चीट पदार्थ.जांगीर in sm.
jaanhveeजान्हवी.n.Ganges.गंगा नदि.
jaanthजांत.n.a kitchen implement used for dry coarse grinding of pulses etc.जंत. जंतर. धान्य भरड पूड कराला धोंडांत॑ केलते संपाकघरच॑ एक ल्हान चक्कि.(1) दिवसोडि जांत॑ उपयोग केलतर॑ हातालीन तसेच आंगालीन व्यायाम मिळेल म्हणाचाला संशयच नाही. (2) रामदेव महाराज अत्ता पणीं त्यंच योगासनांत॑ "जांता वाटे दळाच आगम॑/कार्यक्रम॑" एक व्यायाम म्हणून ठिवलाहत॑(1) this is a two layered flat disc shaped hand grinder made of granite. The lower layer is stationary and the upper part is rotated around a vertical axis fixed in the center of the lower stone. (2) जंत, जांत, जंतर etc are vulgar (असंस्कृत) forms of यंत्र.
jaanvaasaaजानवासा.n.wedding ceremony performed before muhurtha by the groom's party.वराडाच मुहूर्ताच पुढ॑ नवराच लोके कराच एक कार्यक्रम. uisदक्षिण भारतांत अत्तपणीं प्रति वराडांत, मूल पाह्णे, जानवासा हे सर्व असत॑. पण मुंबई-पुणेच पटीस जानवासा करत नाहीत॑.
jaasthiजास्ति.adj.more.अधीक. अधिक. भरून.आजच॑ संपाकांत॑ अग्गि पदार्थांतीन मीठ जास्ति होत॑.
jaasthi-jaasthiजास्ति-जास्ति.ind.at the maximum. अधीकपक्षा.मझ भाऊ घेटलते घराला तो दोन कोटि रुपे देला. मला विचारलतर॑ ते घराला तेवढ॑ देमते होत नाही. जास्ति-जास्ति देड (दीड) कोटींत बेरम करून घेटलासूया.
jaaswandजास्वंद.n.hibiscus flower.तंबडकापूस. रक्तकापूस. दासवाला (Kannada).
jaataan yethaanजातां-येतां.adv.during (all) casual visits.येतां-जातां. उगे जात येत असताना.मझ लेंक तिज उजलादिवसाला म्हणून एक डब्बा चोक्लेट फ़्रिड्जांत॑ ठिवलोती. तिज भाऊ तिला कळनास्क॑ जातां-येतां 'फ़्रिड्ज' उघडून ते पूरा काढून खाऊनटाकला !
jaathजात.n.caste.वर्ग. जाति. (1) वेगळ॑-वेगळ॑ जात प्रारंभ केलते मूल कारण गामांत काम बरोर चालाम॑ म्हणून. पण, नेतालोके तज दुरउपयोग करत आहेत॑. (2) थोड वर्षानंतर वराड कराचा पुढ॑ जात-भेद पाह्यिनात॑. दादिगा पोराला बायको पोरे मिळलतर॑ पुरे म्हणतील.
jaathजात.n.race.वर्ग. जाति.भूलोकांत॑ गोरे, सावळे, मंगोळियन, नीग्रो अस॑ वेगळ॑-वेगळ॑ लोके असलतरीन मनुष वर्ग एकच म्हण्तात॑.
jaathaan-jaathaanजातां-जातां.adv.as it gets along. as things go by.पुढे जात/होत असताना.तो फार चोखोटा म्हणींगतीस तू. जातां-जातां तज स्वभाव कळताना तू मला विसंबशील॑.
jaathakजातक.n.horoscope.कुंडली.जातक पाव्हून वराड करून पणीं हे काळांत कित्येक दंपतींच वराड भ्रष्ट होऊन जात॑. तला एक मुख्य कारण, दाल्ला-बाईलीं मधे तेंच पदवी अणी तेंच धर्मा (मुशारा) हे सर्वावर गर्व येऊनजात॑.
jaathiजाति.n.species.प्रणींच अथवा वनस्पतींच वेगल॑-वेगळ॑ वर्ग.अम्च हिंदु धर्मानुसार हे भूमंडलांत॑ 86,00,000 जातीच प्राणि/जीवात्मा आहे.
jaathibhedजातिभेद.n.castism.जाताच आधारांत वेगळ॑-वेगळ॑ असणे.अम्च देशांत सर्व राष्ट्रीय पार्टीच नेतालोकीन जातिभेद करून पदवि धराला प्रयत्न करत असतात॑.
jaathibraShTजातिभ्रष्ट.adj.to excommunicate. to render one an outcaste.जातींतून बाहेर काढूनटाकणे.अत्तापणीं राजस्थानांत एक जातीच पोर दुसरे जातीच पोरीला वराड करींगटलतर॑ ’खाप पंचायत’ तेना जातिभ्रष्ट करतात॑.
jaathraaजात्रा.n.a religious fair in a village or town.गावांच देऊळाच उत्सव.बादामींतल॑ बनशंकरीदेवी देऊळांत॑ प्रतिवर्ष पुष्य महिना शुक्ल पक्षांत॑ होयाच नवरात्रि उत्सवाच वेळी चालाच जात्रांत॑ आजू-बाजूच खेडेंतून भरून जन येवून देवीला दर्शन करून जातात॑.
jaavaanyeeजावांई.n.son-in-law.जामाई. लेंकीच दल्ला/दाल्लातीस-चाळीस वर्ष झालानंतरपणीं कित्येक लोक तेंच (त्यंच) सासुरवाडी जाताना संपूर्ण जावांईपण॑ करींगतात॑ !जावई in sm.
jaavaLa~जावळ॑.n.baby hair before it is removed.चौळे. ल्हान लेंकरांच पहिलेंदा कढाच केंस.
jaavaLa~जावळ॑. n.tonsure ceremony.ल्हान लेंकराच केस पह्यिलेंदा कढाच सण॑.उजंड (उदंड) लोकांच घरांत लेंकर॑ एक-दीड वर्ष होतांत्सून (होतांतरून) तिरूपती, नाहीतर, वेगळ कोण्तीन क्षेत्रांत जावळ॑ दाखीवाच पद्धत/ दंडक असत॑.
jaavooजाऊ.n.husband's brother's wife.दल्लाच भाऊच बाईल. देराच बाईल. ते बायकोच जाऊ तिज सख्ख॑ बहिणी आहे म्हणून एवढ॑ (येवढ॑/यवढ॑) अन्योन्य आहेत॑.
jaavoon-jaavoonजावून-जावून.ind.at the end of it all.अस्कीन झालानंतर. माय-बाप नाहीत पोर म्हणून मी तला फार उपदेश देलों. पण, तीस वर्ष होयापुढे तो तज आस्त पूरा हाळ करूनटाकला. जावून-जावून असका करणे म्हणून तला विचारलतर॑ मझवरच र्राग करतो.
jaayeeTaaजायीटा.n.jacket. जाईटा.from English.
jaayphaLजायफळ.n.nutmeg.जाकायी.जायफळ आयुर्वेद औषदांत उपयोग करतात. ते ओघाळून थोड दुधांत मिळिवून पीलतर॑ आंगांतल दुखणे उणे होईल॑. तजांत॑ "'स्टीरोयड" काहींतरीन असुयाकी म्हणून मला संदेह आहे.
jabजेब.n.a pocket in a dress.जोब. खिसा. नेसाच कापडांत शिवलते पिशवी.कित्येक लोके ट्रैनांत प्रयाण कराला म्हणून तेंच पेंट-षर्टांत आंतलपटीस एक जेब शीविंगतात. तजांत पैसे-टिकट ठिवलतर॑ जत्तन (दत्तन) असत॑.
jabardasthजबरदस्त.adj. forceful. powerful. mighty.उदंड॑ शक्तीच॑.
jabardasthiजबरदस्ति.n.coercion. compulsion.जबरदस्तांतून कराच॑. दटावून करिवणे.
jaDa~जड.adj.heavy.भार. जेड.ज॑ड वस्तु अम्च मादावर (माजावर) उचलून ठिवलतर, मादाच लचक होऊया.
jaDa~जड.n.inanimate body. dead body.मृत देह. मड॑. मढ॑.
jaDa~जड.n.inanimate thing.जीव नाहीते वस्तु.श्री मध्वाचार्यांच द्वैत तत्वांत॑ जड, आत्मन् अणी ब्रह्मन् हे तीनाचीं मध्ये पांच विधाच भेद आहे.
jaDabharatha~जडभरत॑.fig.an extremely lazy person. an indifferent person.शोंबेरी (tamil). आलस मनुष.वयाच पोर/पोरी म्हणजे झट-झट काम शिकून काम नीट कराम॑. जडभरतास्क असलतर काहीं प्राप्त कराला होईना.
jagadaambaaजगदांबा.n.Goddess Durga.जगदांबिका. दुर्गा देवि. पार्वति देवि.
jagadaambikaaजगदांबिका.n.Goddess Durga.जगदांबा.
jagadeeshजगदीश.n.Lord Shiva.शिव. परमेश्वर. जगदीश्वर.
jagadeeshwarजगदीश्वर.n.Lord Shiva.जगदीश.
jagadoddhaarजगदोद्धार.n.salvation of the world.जगत्ताच मुक्तिजगदुद्धार in sm
jagannaathHजगन्नाथ.n.Lord of the Universe.जगत्ताच स्वामि.
jagannaathHजगन्नाथ.n.Lord Vishnu.महाविष्णु.ओडीस्सांत असाच पुरी गामांत श्रीजगन्नाथांचे जुन॑ देऊळ आहे. तेथ प्रति वर्ष कार्तिक मासांत थोर रथ यात्रा चालीवतात॑.
jagannivaasजगन्निवास.n.the Lord who is present everywhere in the universe.सर्वव्यापि भगवान.
jagathजगत.n.world.भूलोक
jagathजगत.n.Universe.विश्व. ब्रह्मांड.
jagathguruजगतगुरु.n.mentor of the world.जगत्ताच गुरू.
jagathguruजगतगुरु.n.a title by which Shri. Shankaracharya is known.श्रि. शंकराचार्याच पदवी.
jaijaisheeजैजैशी.adv.with pomp and gaiety.आर्भाटांत.
jalजल.n.water.पाणी. नीर(tamil)
jalaashayजलाशय.n.lake. pond. reservoir.तडाग. पाणीच कुंड.
jaladoShजलदोष.n.common cold. running nose.पडसा. नाकाला याच एक रोग. नाकांतून पाणी गळणे.
jalajanthuजलजंतु.n.a marine animal.पाणींत॑ राहाच प्राणि.समुद्र अणि नदीच कांठशी असाच फॅकटरींच पोल्लूषनामळे जलजंतू सर्वईं मरत आहे.
jaLakaaजळका.fig.a jealous person.पोट-जाळाच मनुष. मझ एक जवळच सोयरीक फार जळका मनुष. मझ "पर्सांतून" हदार रुपेच नोट चार काढलतर॑ तला पोटांत संकट होयाच अम्हाला सुलभान कळल॑.
jaLakapaNa~जळकपण॑.n.jealousy. पोटजाळ. असूया.बाजू घरचीच दल्ला बिसिनसांत॑ भरून पैसा करतो म्हणून तिला उदंड जळकपण॑ आहे तरीन बाह्येर सांगत नाहे, एवढच॑.
jaLaNeजळणे.vi.to burn. to be on fire. to blaze.विस्तु पेटणे.प्रतिवर्ष उन्हाळाच समय कॅलिफोर्णियांतहीं आस्ट्रेलियांतहीं र्राणाच प्रदेशांत॑ अपाप विस्तु पेटून जळाच समाचार अम्ही ऐकतों.
jaLaNeजळणे.vi.to have a burning sensation.जळास्क॑ (आंगांत॑) वाटणे. (1) विडाच पानांत॑ चुण्णा जास्ति लावलतर॑ जिव्ह॑ जळल॑. (2) आजच॑ जेवण॑ उजंड तिखट होत॑. जेवलांपिरी मझ पोट जळत आहे.
jaLaNeजळणे.vi.to give off light as in an electric bulb.जळून प्रकाश देणे. ते दिवा जळत नाही.
jaLaNeजळणे.vi.to rankle.गेलते विषय विसरनास्क॑ मनांतच अठींगून संकट भोगणे.पांच वर्षाच पुढ॑ मझ मित्र त्यंच घर विकले. घर घेट्लते मनुष एक वर्ष झालानंतर॑ तेच घर चार वांटा पैसेला विकले. हे ऐकून मझ मित्राला वाटलते जाळ हे पर्यंतीन संपल॑ नाही.
jaLaNeजळणे.vi.to be jealous.जळकपण॑ वाटणे. असूया वाटणे. पोटजाळ होणे.भाग्यवंत लोके वराडांत जेवणाकरतां एक प्लेटाला दोन-तीन हदार वेचतात॑ म्हणाच ऐकून मझ॑ मन्न जळते.
jalapraLayजलप्रळय. n.deluge.प्रळय क्रिस्तु धर्माच बैबिलांत॑ नोहाच खाणींत॑ एक मोठ॑ जलप्रळयाच विवरण॑ आहे.जलप्रलय in sm
jalasaaजलसा.n.a musical programme.गाणेच कार्यक्रम.
jalasamaadheeजलसमाधी.n.immersion of a dead body in water.पाणींत॑ समाधि होणे.दक्षिण देशांत मराठी भजन प्रसिध केलत॑ श्री हरिदासगिरी दहा वर्षाच पुढे बद्री यात्राला गेले अणि तिकडे त्यंच जलसमाधी झाले.
jalatharangजलतरंग.n.a percussion musical instrument with different levels of water in different containers.वेगळ॑ वेगळ॑ वाटींत॑ पाणी प्रत्येक प्रत्येक उंचांत॑ भरून वाजिवाच एक संगीताच वाद्य.जलतरंग दोन तराच असत॑. एकांत 22 वाटी असत॑ अणि कित्येकांत॑ 15 वाटी असत॑.
jaLivaNeजळिवणे.vt.to set fire.विस्तु लाविवणे. विस्तु लागिवणे.हैदराबादांत ’तेलेंगाणा’ पह्जे म्हणून हरताल करताना गुंडेलोके ’सिटीबस” जळीवून नष्ट करीवतात॑. तझमुळे लोकांस फार श्रम पणी होत॑ आहे.
jamaaजमा.n.collection.मिळिवणे.सहा महीनेला एकदपा अम्हि सर्वदनीं दहा घराला जाऊन जुन॑ फडकी, जुन॑ जमखाण, जुन॑ पांघरूण॑ (पांघरिवण॑) हे सर्वीं जमा करून भीकारी लोकांना/ उजंड गरीब लोकांना वांटाच समुदाय सेवा करूया.
jamaanaaजमाना.n.an era. a period.काल. काळ.
jamakhaaNजमखाण.n.a thick cotton floor spread.भोईच व॑र पसराच एक घट्टि कापडाच चदर.अम्च देशांत कित्तिकी गरीब लोकानकडे अंथरींगाला जमखाण पणीं असत नाही. हे पाव्हून माला फार दुक्ख वाटत॑.
jambhजंभ.adj.haughty. conceit. hypocrisy.दुरहंकार. ढोंग.पाह्याला सादारण म्हणून असलतरीन मनांत तला भरून जंभ आहे म्हणून मला कळल॑.morphs of दंभ or डंभ. (द and ज being inter-used in TM).
jambh baDivaNeजंभ बडींगणे.vt.to indulge in self praise.स्वताला थोर मनुष म्हणून सांगींगणे. चोक्कोट षाणपण॑ की सामर्थ्य की नाही तरीन जंभ बडिवणेंत मात्र थोडक पणी उणे नाही तो.
jambooजंबू.n.a plant yielding sweet and sour purple coloured fruit.जांभळ/जांभूळ/जांबूळ फळाच झाड.
jamboophaLजंबूफळ.n.a sweet and sour purple coloured fruit of jambu tree.अंबटीं गुळ्चीटीं असाच जंबू झाडाच फळ॑. जांभळ/जांभूळ/जांबूळ.डयबीटिस असणार जंबूफळ खाल्लतर॑ आंगाला चोक्कोट म्हणतात॑.
jambudweepजंबुद्वीप.n.a continental land mass referred in Hindu scriptures.हिंदु पुराणाप्रकारच एक भूखंड. (1) जंबुद्वीप सहित॑ भूलोकांत॑ सात द्वीप (म्हणजे, खंड) आहे. (2) कोण्त पूजा कराच पुढेहीं संकल्प करताना पूजा कराच ठिकाणाच विवरण देताना जंबुद्वीपाच नाव सांगणे (काढणे) आहे. बाकीच सहा आहे, क्रौंच द्वीप, प्लक्ष द्वीप, कुश द्वीप, शाल्मली द्वीप, शाक द्वीप अणी पुष्कर द्वीप.
jamedaarजमेदार.n.head constable.मुख्य सिपाहीजामदार in sm.
jamedaarजमेदार.n.head peon.मुख्य चप्रासीजामदार in sm.
jameenजमीन.n.land holdings.आस्ताच भूमि.जमीन-जुमला असणार पोणावांटा लोके जानव नाहीत लोकच॑ असतात॑. ब्राह्मण लोकांकडे वाचणे अस्त, पण पैसे-कास मिळिवाच शाणपण (षाणपण) तेवढ॑ असत नाही.
jameenजमीन.n.agricultural lands.क्रिषीच भूमि.आंध्रांत कृष्ण-गोदावरी नदींच कांठशी असाच (डेल्टा एरियासांत) जमीनांत साळीच पीक वर्षाला दोन-तीन येत॑.
jameenजमीन.n.ground.भूमि.चेन्नै, अहमदाबाद अस॑ कित्येक पट्णांत अत्ता जमीनाच मोल॑ पांच वर्षाच पुढ॑ होततेपक्षा तीन वांटा वाढलाहे.
jameendaarजमीनदार.n.land holder. landlord.जमीनाच आस्त असणार.हे काळांत अम्च नेतालोकेच जमीनदार जालाहेत॑. गरीब कुणबीलोकांस॑, नांगरणार लोकांस॑ अग्गीन उजंड (उदंड) जास्त व्याजांत॑ र्रीण (कर्ज) देऊन, र्रीण वारिवाला होयनास्क होताना अडमानम ठिवलते जमीन त्यंच नावांत करींगतात.
jana~जन॑.n.people.दन॑. जण॑. लोके.भगवान श्री क्रुष्ण यदुकुलांत तेवढ॑ लोकांच बरोरीं एकसार्ख खाऊन-जेऊन, खेळून, वाढलते पाह्ताना, जन जाती मत भेद-भाव पाह्ताने म्हणाचाला हेच एक उदाहरण॑ म्हणून अम्हाला कळते.
janaardanजनार्दन .n.Lord Vishnu.महाविष्णु.
janagaNanaaजनगणना.n.census survey. जनमोजी. लोकसंख्या किती आहे म्हणून पाह्णे. लोकांच संख्या काढणे. (1) भारतांत॑ प्रति दहा वर्षी जनगणनाच कार्यक्रम होत असत॑. (2) 2011 वर्षांचा जनगणना प्रकार अम्च जनसंख्या एकशेंवीस कोटी आहे म्हणतात॑.
janajaagruthiजनजागृति.n.public awareness.लोकांच चोक्कोट होणे विषीन जागृतांत असणे. अम्च देशांत लोके बीदींत थुंकणे, मुतणे असल॑ कंटाळा काम करनात असाला समाज सेवा संघटना जनजागृतीच कार्यक्रम आरंभ कराम॑.
janakathHaaजनकथा.n.folktale.लोक कथा.श्रीमति सुधामूर्ती कन्नडांत जनकथा पुस्तक लिव्हलाहेत॑. अत्ता तज इंग्रेजी अनुवादन (तर्जुमा) पणीं मिळते.
janana~जनन॑.n.birth.जन्म. उजणे.जनन॑-मरण हे चक्रव्यूहांतसून बाहेर पडाला एकच मार्ग आहे. सदाहीन देवाच नाम स्मरण करून अम्च देव भक्ति वाढींगणे.
jananeeजननी.n.mother.माय. अम्मा. माता.
janasahaayजनसहाय.n.people's help or assistance.लोकांच॑ सहाय.
janasankhyaaजनसंख्या.n.population.लोकसंख्या.2001 वर्षांत अम्च देशाच जनसंख्या शंभर कोटी होत॑.
janasevaaजनसेवा.n.service to the public.लोकांच सेवा. लोक सेवा.अम्च नेता लोके जनसेवा कराच वेष घालून एलक्शन जिंततात॑. पण, पदवि घेटला नंतर पैसे संपादाला काय-काय वाट आहे म्हणून पाह्त असतात विना, वेगळ॑ काहीनच करत नाहीत॑.
janashaktheeजनशक्ती.n.people's strength.लोकांच॑ शक्ती.
janasoukaryaजनसौकर्य.n.civic amenities.लोकांस सौकर्याकरतान असाच॑ व्यवस्था (संविधान).
janathaaजनता.n.the public.लोके.बीहार, उत्तर प्रदेश असलते राज्यांत पुन्हा-पुन्हा गूंडा लोके एलक्सन जिंतून याच पाह्ताना तिकडल॑ जनता शुद्ध मड्डि लोके म्हणूनच सांगाम॑.
janathaaजनता.fig.ordinary type.साधारण रीतीच. गरीब-रथ रेलबंडि जनता वर्गांच असलतरीन, तेजांतल॑ सौकर्य बेषच आहे.
janathanthra~जनतंत्र.n.democracy.लोकतंत्र.हे भूलोकांत॑ सर्व राज्याबरीस थोर जनतंत्र भारतांत॑ असून पणीं, येथ॑ गरीबपण॑ उजंड जास्त आहे. हेज एक मुख्य कारण अमच॑ देशांत॑ वाचणे-लिव्हणे नाहीते लोक अधीक असण्यामुळ॑ आहे.
jangalजंगल.n.forest.राण. अंदमान-निकोबार द्वीपांत राह्याच आदिवासी लोके तिकडल॑ जंगळाच फार आंत राह्या करतां उदंड अप्रूप होऊनच त्यांस पाह्याला होईल॑.
janmaजन्म.n.birth.प्रसव॑. जनन॑. उजणे.अमेरिकाच नियम प्रकार तिकड कोण जन्म होतातकी तेनि अग्गीन ते देशाच नागरीक होतील॑. अमच॑ देशांतून तिकडे कामाव॑र जायाच भरून दन॑ हे नियम उपयोग करींगून त्यंच लेंकरांस तिकड॑ जन्म द्याच सहज झालाहे.
janma janmaanthara~जन्मजन्मांतर॑ .adv.for all births to come. for ever. till eternity.काळांतर पर्यंतीन (पतोरीन/पावेतोरीन). अम्च हिंदु धर्मानुसार गायीला ’गोमाता’ म्हणतों. तजामुळ गोहत्या केलतर॑ तज पाप॑ अम्हाला जन्मजन्मांतर॑ गुंडाळत असेल.
janmaaShTamiजन्माष्टमि.n.festival celebrating the day of Lord Krishna's birth.श्रिक्रिष्ण उजलते दिवसाच पूजाच सण॑. क्रिष्णाष्टमि. गोकुलाष्टमि.जन्माष्टमीला दिवसाच वेळ उपवास करून रात्रि बारा घंटेला (अर्धरात्रि) पूजा करून अर्घ्य सोडाम॑. नंतरच नेवेद्य केलते पदार्थ फलार करुया. पण, अम्हि उजंड लोके दिवसाच उपवास करत नाही अणी रात्रि नौ-दहा घंटेलाच पूजा संपीवतों.
janmabharजन्मभर.adv.all through the life.जन्म पूरा. आजीव(वन॑).बरोर/पूर्त योचना करनास्क अम्हि एक वाईट काम केलतर॑ जन्मभर तज परिणाम अम्च मनाला टोंचत असेल॑.
janmabhoomiजन्मभूमि.n.native land.स्वंत देश. उजलते देश.स्वंत जन्मभूमीच व॑र प्रेम नाहीते स्वार्थ लोके पैसेला देशद्रोह कराला पणीन तय्यार असतात॑.
janmadivasजन्मदिवस.n.birth day.उजलादिवस. उजलते दिवस.श्री क्रिष्णाच जन्मदिवसाच सणाला अम्हि जन्माष्टमि म्हणतों.
janmasaaphalya~जन्मसाफल्य.n.fulfillment of one's objectives in life.जन्मांत॑ उद्धेश केलते सगळीन साफल्य होणे.
janmasthHaanजन्मस्थान.n.place of birth.उजलते गांव.(1) अमेरीकाचे अध्यक्ष बराक ओबामाच जन्मस्थान होनलुलू, हवाई आहे. (2) भूलोकांत कोठ॑ अम्हि उद्योग करून ’सेटल’ झालतरीन अम्च-अम्च जन्मस्थानाला परतून येताना एक प्रत्येक तृप्ति/संतोष वाटेल॑.
janmasvabhaavजन्मस्वभाव.n.inborn disposition.उजतान पसून आलते स्वभाव. अरवेंत, म्हणजे, तमिळांत एक वचन आहे, तज अर्थ आहे "पाळणांत दिसाच स्वभाव, अथवा जन्मस्वभाव स्मशान पतोरि (पावतोरि) असेल".
janthजंत.n.a kitchen implement used for dry coarse grinding of pulses etc.जांत. जंतर. धान्य भरड पूड कराला धोंडांत॑ केलते संपाक-घरच एक ल्हान चक्कि. (1) दिवसोडि जंत॑ उपयोग केल तर॑ हातालीन तसेच आंगालीन व्यायाम मिळेल म्हणाचाला संशयच नाही. (2) रामदेव महाराज अत्ता पणीं त्यंच योगासनांत॑ "जंतावाटे दळाच आगम॑/कार्यक्रम॑" एक व्यायाम म्हणून ठिवलाहत॑.(1) this is a two layered flat disc shaped hand grinder made of granite. The lower layer is stationary and the upper part is rotated around a vertical axis fixed in the center of the lower stone. (2) जंत, जांत, जंतर etc are vulgar (असंस्कृत) forms of यंत्र.
jantharजंतर.n.a kitchen implement used for dry coarse grinding of pulses etc.जांत. जंत. धान्य भरड पूड कराला धोंडांत॑ केलते संपाक-घरच एक ल्हान चक्कि.जंत, जांत, जंतर etc are vulgar (असंस्कृत) forms of यंत्र.
janthuजंतु.n.a living being. a creature.एक प्राणि.अम्च हिंदु धर्मानुसार सर्व जंतूहीं देवाच सृष्टी आहे, तजकरतां तेना एकविधाच हिंसाहीं देताने
japजप.n.silent prayer.मनांतच देवाला ध्यान करणे.संध्यावंदन कराच वेळी गायत्रि मंत्र जप कराच बरोर ’अष्टाक्षर मंत्र’ तज तीन वांटा जपाम॑ म्हणून थोरळे सांगतात॑.
japamaaLजपमाळ॑.n.rosary.जपाच आवर्तन संख्या मोजाला उपयोग कराच मणीच माळ॑. जपमाला. अम्च-अम्च जवाबदारि पूर्त केलावर प्रति निमिष देवाच नामस्मरण करत असाम॑. तेम्हा हातांत एक जपमाळ॑ उपयोग असेल.
japthजप्त.adj.attached by court.कचेरिवाटी जप्त होणे.किंग फ़िषर एरलैन्स’ हेना देलते कर्ज परतून येईनास्क, समीपांत सगळ॑ बॅन्कीन मिळून तज मुख्य मालक विजय मल्या हेंच आस्त/ पैसे-कास जप्त कराला कोर्टाला अर्जी (निवेदन) देलोते.
japthiजप्ति.n.attachment of assets.वस्तु विकाच निरोध करून कचेरिवाटि निर्णय होणे.
jarजर.n.fever.जेर. आंगाला बर नाहीस्क॑ असताना याच तापटैफोयिड आलतर॑, दिवसोडी दुपारच नंतर॑, म्हणजे, सायनकाळीच वेळ जर येईल. ज्वर in sm.
jaraaजरा.n.old age.म्हातारपण॑.
jaraaजरा.n.infirmity or debility on account of old age.म्हातारपणामळे याच आंगाच क्षीण.
jaraDiजरडि.n.kitchen sieve.झरडि. दाळ-तांदूळ, पीठ, धान्य असलत्यांतून कणे वेगळ॑ करून काढाच बरीक जाळीच उपकरण॑.जरडींत घालून प्रत्येक करलते साखरेच पूड चिरोटाच व॑र घालून खातों.
jareeजरी.n.gold or silver thread work.कापडांत॑ सोनेच, नाहीतर॑ (अथवा) रुपेच दोरांत॑ ओवून केलते अलंकार.अधीक जरी घाटलते लुगड॑ फार जड असत॑ अणी माघ पणीं असत॑.

No comments:

Post a Comment