Sunday, May 15, 2016

e (ए)




.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
eDavaTa~एडवट॑.adj.half or partially done in an imperfect manner.अर्ध केलते पणीं बरोर करनास्क॑ सोडलते. अर्धवट॑. अर्धगच्छ. अर्धम-पर्द (kannada). पूर्त झाल नाहीते.तिरुपतींत॑ नवसून केंस क्षवर॑ कराला हजामाच समोर बसल तर॑, तो एडवट॑ काम करून जायनास्क पाह्यींगाम॑. कारण, अम्हाला तसेच बसिवूनटाकून तो एक नव ग्राकीला हुडुकींगून गेल तर॑, तो परतून या पर्यंतीन तिकडच बसामते पडेल॑.
ekएक.a.one.पहिलच संख्या.
ek donएक-दोन.fig.very few (in numbers).उदंड उणे संख्याच.(1) गेल महिना पूरा फार ऊब होत॑. आज कायकी एक-दोन बूंदाच शिंतोडे पडले. (2) अम्च खेडेगामाच साळेंत॑ बरोर शिकिवनात॑ म्हणून अग्गिदनालीं कळले. हे वर्षाच एस.एस.एल.सी परीक्षांत॑ कायकी एक-दोन लेंकरे जिंतलतर तेच जास्ति म्हणूया.
ek ek dapaaएक-एक दपा.adv.once in a while.once in a while. एक-एकदा. केम्हा तरीन एकदा.फार श्रद्धांत॑ एक काम कराम॑ म्हणूम अम्ही म्हणींगटलतरीन एक-एक दपा ते चुकून जात॑.
ek soDoon ekएक सोडून एक.adv.one after the other.एकाच नंतर॑ एक.
ek soDoon ekएक सोडून एक.adv.alternately.पहिलच॑, नंतर॑ दुसरच॑ परतून परतून आवृत्ति होत असणे. हिंदू देऊळाच भोंताल॑-भिंतांत॑ काषाय अणी पंढ्र॑ रंगाच पट्टी एक सोडून एक ओढलसाच पाव्हूया.
ek-donएक-दोन.n.very few (in numbers) उदंड उणे संख्याच.(1) गेल महिना पूरा फार ऊब होत॑. आज कायकी एक-दोन बूंदाच शिंतोडे पडले. (2) अम्च खेडेगामाच साळेंत॑ बरोर शिकिवनात॑ म्हणून अग्गिदनालीं कळले. हे वर्षाच एस.एस.एल.सी परीक्षांत॑ कायकी एक-दोन लेंकरे जिंतलतर तेच जास्ति म्हणूया.
ekaadashiएकादशि.n.eleventh day after full or new moon.पौर्णमि अणी अमावस्या झाल॑ नंतरल॑ अक्रावां दिवस.
ekaadashi braahmaNएकादशि ब्राह्मण॑.fig.a term of ridicule or otherwise to indicate a niggardly brahman. एक कंजूस ब्राह्मणाला मष्किरींतून सांगाच गोष्ट. मझ॑ चुलतभाऊला उदार मन्न॑ थोड पणीं नाही. अम्च सोयरीकां मध्ये तला एक एकादशि ब्रह्ममण॑ म्हणून सांगणे आहे.
ekaadashi karNeएकादशि करणे.vt.to observe a day of fasting on ekadasi day.एकादशि दिवस उपवास करणे.अम्ही एकदपा पणीं चुकनास्क॑ एकादशि करणे आहे. ते मुळे मनाला शांत मात्र न्हो, आंगाल पणीं चोखोट वाटते.
ekaalekएकालेक.adj.mutually one upon another (entangled).तेपटीस-हेपटीस (सांपडींगटलते).ते दोघीन चोखोट उद्योग सोडून त्यंचच बिसिनस आरंभ केले. ते बरोर चालत नाही वाटत॑. अत्ता एकालेक सांपडींगून अवस्था भोगत आहेत॑.
ekaanthएकांत.n.solitudeकोणाचीं संबंध नसाच ठिकाण/स्थिति.
ekaapakShaa ekएकापक्षा-एक.u.one over another (viewpoint, attributes etc).एकापक्षा-एक.गेल वार॑ अम्च सभेंत यात्राला जायाच विषयावर चर्चा झाल॑. एकेकदनीं त्यंच-त्यंच अभिप्राय सांगाच ऐकलतर॑ एकापक्षा-एक विचित्र होत॑ अस॑ मला वाटल॑. शेवटी ते सभेंत काहींनच निर्णय कराला झाल नाही.
ekachnighaaएकचनिघा.n.focus on only one thing. concentration. one track mind.एकाचवर निघा ठिवणे.एकचनिघा ठिंगून वाचलतर कोण्त्येक विषयांत पणीं अम्ही पंडित होऊया. कारण अम्च बुद्धीच पूरा शक्ति तजवर सोडाला होईल.
ekadaaएकदा.u.once. one time.एकदपा. एकदफा. एकवेळ.(1) एकदा अम्हि बद्रीनाथाला गेलतम्हा भूकंपामुळे डोंगूराच वर जायाच वाटेला फार नाश होऊन अम्च बंडि एक रात्रि पूरा तिकडच राहूनगेल॑. (2) वय होतां-होतां जेवण॑ उणे करण॑ सहजच॑. पाष्टे एकदा जेवलतर॑-पणीं आंगाला पुरे होईल॑.
ekadaaNeएकदाणें.n.a necklace with one prominent gold bead in the middle of other different beads.दुसर॑ विधाच पोतीच मध्य एकच सोनेच पोति ओवलते माळ॑.
ekadanthएकदंत.n.Lord Ganesha.गणपति.गणपति त्यंच एक दंत मोडून तजांतून व्यासऋषीच महाभारत लिव्हले म्हणून हिंदु पुराणांत॑ आहे. हेजनंतर॑ एकच दंत उरल॑ते-करतां गणपतीला एकदंत म्हणून नाव आल॑.
ekalaaएकला.pron. a single person.एकटा. एक मनुष. एक पोर.गेलंदपा पाकिस्थानांत॑ पेषावरांत॑ झालते विस्फोट एकच एकलाच काम होत॑ म्हणून नंतर केलते अन्वेषणांत कळ्ल॑.
ekaleeएकली.pron.a woman or girl.एक बायको/एक पोरी/पोरे.जातकाच प्रश्नामुळे, ते पोराच वराड उदंड दिवसा-पसून झाल॑ नाही. शेवटी, एकच एकलीच जातक तज जातकाच बरोर मिळून अल॑ अस॑ मी ऐकलों.
ekarएकर.n.acre.जमीनाच विस्तार सांगाच एक माप.चार-पांच वर्षांत॑ जमीनाच मोल उदंड वाढलाहे. एकराला दहा हदार रुपे होतते जमीन अस्कीन अत्ता दहा लाखाला पणीं ध्याला लोक तय्यार आहेत॑.
ekaska~एकस्क॑.adj.identical.एकसार्ख. एकसारख॑.
ekaTएकट.adj.alone.दूसर॑/वेगळ॑ कोण्तीन नाहीस्क॑ असाच स्थिति.अट्लांटिक महासमुद्र विमानांत॑ एकट वलांडलते पहिलेच मनुष चार्ल्स लिन्डबर्ग होते.
ekaTएकट.adj.solitary. single.दूसर॑/वेगळ॑ कोण्तीन नाहीस्क॑ असाच स्थिति.मैसूराच जवळ असाच नागरहोळे र्राणावाटि मी रात्रि बंडि पळींगून जात होत तम्हा वाटेच बाजु एक हत्ति एकट होटाकलोतते पाहलों.
ekaTaaएकटा.pron.a single person.एकला.
ekavachana~एकवचन॑.n.(gram) singular. (व्याकरणांत॑) एकच असाच स्थिति.दक्षिणी-मराठींत॑ एकवचन॑ अणी बहुवचन॑ अस॑ दोन विधाच वचन॑ आहे.
ekeeएकी.n.urine.मूत.एकीच वास येईनास्क असाला परसाकडेच खोलि बेष फिनैल घालून धुवाम॑.
ekeeएकी.n.urination.मुतणे.आठ वर्षाच वय झालतरीन तो अत्ता पणीं अंथरूणांत॑ रात्रीच वेळ एकी करतो.
ekekएकेक.ul.one by one.एक झालानंतर॑ अण्खीन एक. एका मागे एक. एक-एक. (1) तळून काढताना तीन-चार कच्चा पापड एकदम तावलते तेलांत घालाचपक्षा एकेक होऊन घाटलतर॑ ते करपनास्क॑ पाहींगुया. (2) पाणीच तान वाटलते कावळाच खाणींत॑ ते कावळा एक-एक धोंडा मडकेंतल॑ पाणीच आंत घालून, पाणी वर आणिवल॑.
eksaarakhएकसारख॑.adj.identical in all respects. एकस्क॑. एकसार्ख. अस्कि प्रकारीं तुल्य असाच॑. विषय कळनाते लोकांस॑ वज्रहीं अमेरिकन डयमंडीं पाह्याला एकसारख॑ असेल॑, थोड पणीं व्यत्यास दिसना.
eksaarkhएकसारख॑.adj.in a uniform manner without variation. एकस्क॑. एकसार्ख. व्यत्यास काहीं नाहीस्क॑. समान एक वारा पसून डोंगूर प्रदेशांत चोखोट पाऊस झाल होत-ते-मुळे यंदा कुत्तालमांत॑ पाणी एकसार्ख पडाच अम्हि पाह्यलों.
eksaarkhएकसार्ख.adj.identical in all respects.एकस्क॑. एकसारख॑. अस्कि प्रकारीं तुल्य असाच॑.
eksaarkhएकसार्ख.adv.in a uniform manner without variation.एकस्क॑. एकसारख॑. व्यत्यास काहीं नाहीस्क॑. समान.
ekveLएकवेळ.n.one time. once.एकदा. एकदपा. एकच वेळ. अत्ता अस्कीन मी एकवेळच जेवतों.
ekveLएकवेळ.n.a probability. maybe.एकवेळ.हे वर्ष दीपावळीला मझ॑ लोंकीं सूनीं अमेरिकांतून कंडिप-होऊन येतील म्हणून मला सांगाला होयना. एकवेळ आलतरीन येतील॑.
eLakkaaramएळक्कारम.n.disdain.उण॑ अभिप्राय. उणीवता.from Tamil.
elamएलम.n.auction.लोकांमद्ये पोटि करिवून कोण जास्ति मोल देतातकी त्यांस॑ विकाच एक व्यवस्था.गेल वर्ष चाललते आइ.पी.एलाच एलमांत॑ एक दोन खेळणारांस॑ उदंड जास्ति रोक्कमांत॑ कित्येक फ्रांचैसी लोक॑ घेटलेतरीन, त्यंच खेळ उदंड मामूली होत॑.from Tamil.
emaarivaNeएमारिवणे.vt.to deceive.वंचना करणे. मोस करणे.घरांत॑ येऊन जुने पेपर घेणार लोकांकड॑ वागताना अम्ही दत्तन/जत्तन असाम॑. कां म्हणजे, तूक्कम करताना एमारिवाला पाह्तील॑.from Tamil. फसविणे in sm
emaaththamएमात्तम.n.deception. cheating.वंचना. मोस॑.from Tamil.
eNiएणि.n.ladder.शीडि. अत्ता अस्कीन घराच आंत वापराला अलुमिनियमाच एणि मिळते.from Tamil.
eranDaleएरंडेल.n.castor oil.एक प्रकारच॑ तेल. पोट शुद्ध करिवाला मद्य-मद्य एरंडेलाच तेल पीणे आहे.
eriएरि.n. lake.सरोवर. तडाग. पाणीच कुंड.from Tamil.
erpaaDएर्पाड.n.arrangement.व्यवस्था.तमिल-नाडाच मुख्य मंत्रि जयलळिताच दत्त लोंकाच वराडाच एर्पाड ब्रह्मांड होते म्हणून थोर आरोप झाल॑.from Tamil.
ethheएथे.adv.here. this side. in this place.हे ठिकाणि. इकडे. यथे. इथे.अम्च घरच प्रश्न फार अवघड स्थितींत॑ जाऊन पावलाहे. ते बरोर कराला म्हणून तू एथे आलास म्हणजे पणीं प्रयोजन काहीं होईना.
ethhe-thathheएथे-तथे.adv.hither and thither.इकडे-तिकडे. यथे-तथे. इथे-तथे.मझ॑ जेबांत ठींगटल होतते वज्राच तोडाच फिरकी कसकी खाले पडल॑. एथे-तथे हुडुकून पणीं ते मिळ्ल॑ नाही.
ethheleएथेले.adj.relating to this side.हे पटीसच॑. इकडच॑. यथेल॑. इथेल॑. हे बाजूच॑.आजू-बाजू घरांत॑ एकच कामवाले असताने. कां म्हणजे, अम्च एथेले एक-एक विशेषीं बाजु घराला तेनी कंडिप कळिवतील॑.
ethhele-thathheleएथेले-तथेले.adj.of various places.इकडच॑-तिकडच॑. यथेले-तथेले. इथेले-तथेल॑.
ethhoonएथून.adv.from here.इकडून. यथून. इथून. एथसून. यथसून. इथसून. एथून चेन्नै सुमार दोनशे मैल दूर आहे.is एथून चेन्नै सुमार दोनशे मैल दूर आहे.
eva~एव.n.income.आदाय. वरुमानम (tamil).मझ॑ बापाला ते काळांत अधीक एव न्होत॑. तजांतच अम्हाला (अम्ही सहा लेंकरे) वाचीवून वर आणीवले. तेनाला किती कष्ट असलासाम॑ म्हणून मला अत्ता अर्थ होत आहे.
evaDa~एवढ॑.adv.this much, so much (implying magnitude or quantity).येवढ॑. यवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑.(1) तला पैसाच कष्ट आहे म्हणून उदंड दिवसा पसून मला कळ्ल॑ होत तरीन एवढ॑ कष्ट होत म्हणून म्हणींगटळोंच नाही.(2) सद्याला मझकड॑ पैसा एवढ॑च आहे. अण्खीन जास्ति पह्जतर॑ नंतर॑ पाठिवून देतों.
evaDa~एवढ॑.adv.this much , so much etc. (implying multitude or number).येवढ॑. यवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑.आजच कार्यक्रमाला अम्ही दोनशे दन येतील म्हणून तज जोक्त पल्हाराच व्यवस्था केलोतों. पण, योचना केलत्यापक्षा पन्नास जण अधीक आलेतेकरतां सद्याला आलते एवढ॑ लोकांस॑ पल्हार वाढलांपिरी आवश्या प्रकार केवढ पह्जकी तेवढ॑ पल्हाराच व्यवस्थाला पुन्हाहीं सांगून पाठिवलों.
evaDa~thevaDha~एवढ॑-तेवढ॑.adj.approximately. roughly.जवळ-जवळ. यवढ॑-तेवढ॑. तुला ते पूरा कळनातरीन, तज विषयीं एवढ॑-तेवढ॑ तरीन कळ्लासलतर॑ अम्च काम कसतरीन चालिवूया म्हणून मला वाटत॑.
evaDhooska~एवढूस्क॑.collo.very little.उदंड थोडक॑. उदंड नंखर॑. इतकूस्क॑. खीर फार बेष आहेतरीन मला एवढूस्क॑ वाढलर पुरे.

No comments:

Post a Comment