Sunday, May 15, 2016

m (म) 4 (monDe~ To muyal)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
monDe~मोंड.adj.blunted (cutting edge of a knife etc.).मोंड. कापाच शक्ति उण॑ झालते.
monDe~मोंड.adj.unreasonably stubborn or obstinate.मनाच मूर्खपण॑.
moneमोने.n.a sharp point.कांटा अथवा सूईंच रुचाच अग्र भागास्क॑ असाच काहीं एक वस्तु.from मुनै of Tamil.
mooDhमूढ.adj.foolish. stupid.मुट्ठाळ (Tamil).
moogमूग.n.a type of pulse.एक रीतीच धान्य. मुगादाळ. मूंग.
mookमूक.adj.dumb. mute.बोलाला होयनाते.
mookaaमूका.n.a dumb man.बोलाला होयनाते मनुष.
mookeeमूकी.n.a dumb woman.बोलाला होयनाते बयको.
mookpaNe~मूकपण॑.n.dumbness.बोलाला होयास्क॑ असाच अवस्था.
moolमूल.n.the first or root (cause etc).पहिलच (कारणे).सभेंत तो सदस्य वरडा-वरडी केलत्याला मूल कारण अम्च अद्यक्षामळे म्हणुया. तेनी तला अवमान केलतामळे हे पह्जती झाले.
moolमूल.n.original.असल.
moolमूल.n.(financial) capital.बंडवाळ॑.भांडवल in sm
moolमूल.n.basis.आधार.
moolमूल.n.a child, either girl or boy.बाळ॑.
moolमूल.n.bride.वराडच नवरि.
moolaaमूला.n.the nineteenth birth star.एक नक्षत्राच नाव. मूला नक्षत्र.
moolaadhaarमूलाधार.n.main reference. original document. back document.मुख्य आधार.
moolasvabhaavमूलस्वभाव.n.original behaviour.पहिलेंत्सून असाच स्वभाव॑.
mooleमूले.n.corner.कोने.from Tamil.
mooLe~मूळ॑.n.root.भोईं खाले वाढाच झाडाच भाग.मूळ in sm.
moolgranthhमूलग्रंथ.n.the original text. source book.आधि ग्रंथ.संस्कृत कळनाते लोकांस॑ वेद अणी उपनिषद हेज मूलग्रंथ वाचाला होयनाते करतां हेज इंग्रेजींतल॑ तर्जुमा वाचून संतोष भोगाम॑. संस्कृतांतल॑ मूलग्रंथ वाचणांतीं इंग्रेजींतल॑ तर्जुमा वाचणांतीं उदंड व्यत्यास अस्ते म्हणून सांगाच आवश्येच नाही !
moolpaahNeमूलपाह्णे.n.one of the stages in a marriage during which the bride is seen and felicitated with gifts of colourful artifacts.वराडाच वेळी नवरीला पाव्हून तिला आदर कराच एक पद्धत॑.मूल means, 'child' and in मूलपाह्णे, it means 'the bride'.
moolpathra~मूलपत्र.n.original or primary document.मुख्य प्रमाण॑.अत्तलीकडे 'कलर फोटोकापी' कराच सौकर्य आलावर ब्रोकरलोके खोट॑ मूलपत्र तय्यार कराला आरंभ केलाहते. कोणालीन पाह्तेदयाला नाहीस्क झालाहे.
moolpeeTHमूलपीठ.n.original seat of a religious order.एक मठाच प्रधान स्थान॑.
moorcHमूर्च्छ.n.fainting. a swoon.मयक्कम. बोध नाहीस्क॑ होणे.
moorkhमूर्ख.adj.foolishly stubborn.हट्टाच मुट्ठाळपण॑.
moorkhapaNe~मूर्खपण॑.n.foolish stubbornness.हट्टाच मुट्ठाळपण॑.
moorthiमूर्ति.n.idol.देवाच विग्रह॑.
moorthiमूर्ति.n.statue.प्रतिमा.
mooShika~मूषिक.n.mouse. उंदीर.
mooShika~ vaahanaaमूषिक वाहना.n.Lord Ganesh.गणेश.
mooTaaमूटा.n.bundle.गांठोड॑.from Tamil.
mooTaaमूटा.n.heap.मूटा. गुंप. उन्हाळाच वेळ झाडाच वाळलते पान भरून पडून अम्च घरच भोंताले गलीज झाल होते. कामवालीला सांगून ते पूरा झाडून एक मूटा करिवून कुप्पा-लॉरि येताना काडींगून जायाला एर्पाड केलों.from Tamil. ढीग/ढिगर/ढिगार/ढिगारा in sm. In DM ढिगारा means a haystalk.
mooTaa baandhaNeमूटा बांधणे.fig.to wind-up.बंध करून संपिवणे.
mooTaa mooTaaमूटा-मूटा.fig.a large quantity.कुप्पा-कुप्पा (fig).दहा वर्ष एक कामपणीं नाहीस्क बसलते ते मनुषाला नंतर अदृष्ट बडिवल॑. कसकी गळ्फांत॑ जावून मूटा-मूटा पैसा करींगून आला.
mooTHमूठ.n.fist.बोट झांकलते हात. मुष्ठि.
mooTHमूठ.n.fistful (of grain etc). एक मूठ (भरून).
moothमूत.n.urine.मूत्र.
moothkhaDaaमूतखडा.n.kidney stones. calculus in the urine.मूत्रपिडांत होयाच ल्हान धोंडा सार्खल साधन. मूत्रखडा.कित्येक लोकांच आंगलक्षण॑ मूत्रखडा सुलभान उत्पत्ती होते. अस समस्य असणार टोमेटो अणी वाळूक खाणे उणे कराम॑
moothra~मूत्र.n.urine.मूत.
moothrapinDमूत्रपिंड.n.kidney.किड्नि.डैबेटिस अणी 'है बी.पी' उदंड वर्ष असलतर॑ मूत्रपिंड नासाल वाट आहे. हे विषयांत केम्हाईन जाग्रत होऊन असणे चोखोट.
morमोर.n.peacock.मयिल (Tamil). मयूर.
morachoon paahNeमोरचून पाह्णे.vt.to stare belligerently.र्रागांत॑ पाह्णे. रेल्वे स्टेशणाच प्ळाट्फोरमांत॑ एक खाली कुर्सींत॑ मी मझ पाड उगे बसलस्ताना एक मोट्ठ॑ पेटी उचलींगून येत होतता मला मोरचून पाह्त गेला.
morchaaमोर्चा.n.a (political or similar) procession.(जनतंत्राच, नाही असलते) मिरवणी.
morchangमोरचंग.n.a musical instrument played close to the mouth.मोरसिंग. ओंठाच जवळ ठिवून वाजिवाच एक वाद्य.मोरशिंग in sm.
moreeमोरी.n.a waste-water drain. gutter.उपयोग करून टाकाच पाणीच गट्टर.
morsingमोरसिंग.n.a musical instrument played close to the mouth.मोरचंग. ओंठाच जवळ ठिवून वाजिवाच एक वाद्य ;मोरशिंग in sm.
mosambiमोसंबि.n.a type of citrus fruit.सात्तुकुडि (Tamil).
mose~मोस॑.n.of inferior quality or type.चोखोट नाहीत॑.येतां-येतां राष्ट्रीयांत॑ मिळणारांच वागणे फार मोस॑ होत आहे. fromTamil.
mose~मोस॑.n.confidence trick. betrayal.एमात्तम (Tamil).मला कळ्लते एकला तज बरोर बिसिनस कराला मझ मागे उदंड दिवसा पसून हिंडत होता. शेवटी, मी मझ चोखोट कामांतून रिसैन करून, एक चोखोट बंडवाळानिशी तज बरोर मिळ्लों. सहा महिनाचांतच तो पूरा पैसेनिशी नापत्ता होऊन पळून गेला. मला एवढे मोस कधीनीं झालत नाही. Note :-from Tamil.
moTमोट.n.a load or a large bundle (of rice, grains, cotton etc).(तांदूळ, धान्य कापूस असल॑ साधनाच) एक थोर गांठोड/मूटा.
moTaarमोटार.n.a motor car.मोटार बंडि.
moTHapaNe~मोठपण॑.n.grandeur.थोरपण॑. थोरवी.
moTHapaNe~मोठपण॑.n.large heartedness.थोर मनाच॑.
moTHe~मोठ॑.adj.large. big.थोर.मोठा in sm.
motheeमोती.n.pearl.समुद्रांतल॑ चिप्पींतून मिळाच॑ एक गोळ रत्न.चिप्पी in Tamil means 'sea shell'.
motheebinduमोतीबिंदु.n.cataract of the eye.डोळेच एक रोग.अत्तलीकडे मोतीबिंदुच 'सरजेरी' उदंड सुलुभांत करतात॑. 'इन्ट्रा-ओकुलर लेन्स' घालनामळे 'सरजेरी' केलते डोळेला एक वारा नंतर॑ उपनेत्र/अर्सा नाहीस्क अथवा हेज पुढे घालिंगटलते अर्सा वाटे पाह्याला होते.
motheeshoorमोतीचूर.n.a sweet laddu similar to boondhi laddu but with smaller particles.गुंजालाडूस्क एक वेगळ लाडु. हेजांतल बूंदि गुंजालाडूंतल पक्षा ल्हान अस्ते.हैदराबादांतल॑ मोतीचूर लाडू फार विशेष आहे. यथे मिळाच लाडू नीट स्वादिष्ट असल॑ अणि दीपावळीला उदंड लोके ते घेतील॑.
moththa vyaapaarमोत्त-व्यापार.n.whole sale businessमोत्तम होऊन व्यापार करणे.from Tamil.
moththamमोत्तम.n.in total. in all.अग्गीन मिळून.from Tamil.
moTTeमोट्टे.n.bald head.केंस नाहीते/केंस पूरा झडलते डोस्के.from Tamil.
moTTeमोट्टे.n.fully shaved head.पूरा क्षौर केलते डोस्के.from Tamil.
moTTeमोट्टे.n.closely cropped head.फार ल्हान होऊन कापलते केंसाच डोस्के.from Tamil.
moTTe baDivaNeमोट्टे बडिवणे.vt. to crop the hair on the head closely.डोस्केंतल॑ केंस फार ल्हान होऊन कापणे.from Tamil.
moTTemaaDiमोट्टेमाडि.n.a terrace of a building.घरच नाहीतर, बांधणीच वरच माडीच वरल उघड ठिकाण. धाबें.from Tamil.
moTTuमोट्टु.n.bud of a flower. blossom.मोहर॑. मोग्गु (Kannada).from Tamil.
moulaviमौलवि.n.a Muslim jurist.मुस्लीम धर्मशास्त्राच पंडित.
mouna~मौन.n.silence.गुपचुप. बोलनास्क॑ असणे.
mounavratha~मौनवृत॑.n.vow of silence.मौनाच वृत.
mouvaaLikमौवाळिक.adj.soft spoken.सौम्यांत॑ बोलणार.अम्च आफीसांत एक षाणा "एनजीनीयर" आहेते. तेनी फारच मौवाळिक. तेवढे वरले असणारीं त्यंच वाटे झालतेएवढ॑ काम होडाला पाह्तील॑. तेनीहीं नित्य आठ/नौ घंटे पतोरी काम करत अस्तात॑. पाह्यलतर पाप वाटते.मवाळ in sm is a figure of speech meaning "of soft/ mild/bland demeanour or disposition" etc.
mowमौ.adj.soft.मृदु. मऊ. (1) मखमलाच नाहली-ऊंशीच॑ गौसण उदंड मौ अस्ते. (2) सहा, सात महिनेच ल्हान लेंकरे शिवाला फार मौ असतात॑.
mowमौ.fig.mild (mannered). tender (disposition).सौम्य (स्वभावाच). मऊ.
mridangमृदंग.n.a percussion instrument.एक वाद्याच नाव. मृदंगम.from Tamil.
mriduमृदु.adj.soft.मऊ.
mriduमृदु.adj.gentle. tender (natured).सौम्य.
mriga~मृग.n.animal.प्राणि.
mrigashiraaमृगशिरा.n.name of a star.एक नक्षत्राच नाव.
mriNaaliniमृणालिनि.n.lotus.कमळीच फूल॑. तामरै (Tamil).
mrithadeha~मृतदेह.n.dead body.मढ॑. शव. मृतशरीर.
mrithasanjeevaniमृतसंजीवनि.n.name of a mythical herb capable of bringing the dead to life.मेलत्यांस पुन्हा जीव द्याच शक्ती असाच एक वनस्पति. मृतसंजीवनि.
mrithashareerमृतशरीर.n.dead body.मढ॑. शव. मृतदेह.
mrithe~मृत.adj.dead.मरण॑ झालते. मेलते. मरलते.
mriththikaaमृत्तिका.n.earth/soil having (Hindu) scriptural significance.हिंदु शास्त्रा प्रकार महत्व असाच विशेष मातिश्री राघवेंद्रस्वामींच मृत्तिका घरांत असलतर॑ भूत, पिशाश, शत्रू यांच कोणाचीं उपद्रव असना.
mrithyuमृत्यु.n.death.मरण.
mrithyuमृत्यु.n.Lord Yama.यमदेव.
mrithyudanDमृत्युदंड.n.death penalty.मरण शिक्षा.
mrithyulokमृत्युलोक॑.n.Earth.भूलोक॑.
mrithyupathra~मृत्युपत्र.n.a will.मेलानंतर आस्त कस कस वाटाच हे लिव्हलते एक प्रमाण॑
mudaDaNeमुदडणे.vt.to fold.घडि घालणे. मुजडणे. मुजलणे.an example of inter-use of ज & द. दुमडणे in sm.
muddaaमुद्दा.adj.lump (usually roughly spherical in shape, like a lump of dough).सुमार गोळाकाराच आकार, पीठाच मुद्दास्क॑.
mudiमुदि.n.a ring worn in the finger.बोटांत॑ घालाच अंगोठि.
mudraaमुद्रा.n.a seal.मुद्रा. छाप.
mudraaमुद्रा.n.impression. stamp.छाप.
mudraaमुद्रा.n.caste marks placed on the face and torso by Madhwa brahmins using mudra seals.माध्वा ब्राह्मण तोंडांतीं आंगांतीं घालाच मुद्राच चिन्ह.
mudraaमुद्रा.n.expressions and emotions displayed through facial or hand movements in a classical dance.नृत्य अभिनयाच एक भाग.
mudraadhaaraNe~मुद्राधारण॑.n.the religious ritual in which the pontiff of a Madhwa mutt affixes "shankh" and "chakra" marks on the arms and torso of devotees.मध्वसंप्रदायाच मठाधिपति भक्तलोकांच हातांतीन आंगांतीन शंख चक्राच मुद्रा घालाच पद्धत॑.
mudraadhaaraNe~मुद्राधारण॑.n.affixing of caste marks of Madhwa Brahmins in their body.माध्वा ब्राह्मणांच आंगावर घालाच मुद्रा.
mudraNaalaya~मुद्रणालय.n.printing press.प्रिन्ट कराच प्रेस्स.
mudraNe~मुद्रण॑.n.printing.प्रिन्ट करणे. छापणे.
mudrikaaमुद्रिका na seal-ring.मुद्राच मुदि.
mugaTaaमुगटा.n.a cloth worn as part of ritual purity.सोवळेच कापड (वस्त्र). मुकटा.usually made of silk.
muggaTमुग्गट.adj.musty. damp and decayed.भिजून कुजलते.
muggaT ghaaNमुग्गट घाण॑.n.damp and musty smell.ओल॑-कुजक॑ वास.कॉरपरेषनाच कुप्पा-बंडी दोन दिवस र्रोडांतून कुप्पा/कचडा काढनास्क असलतर॑ वार्रेंत मुग्गट घाण येते.
muhoortha~मुहूर्त.n.the auspicious forty eight minutes while conducting a marriage or thread ceremony.एक वराड अथवा मुंज॑ करताना मुख्यहोवून असाच अठ्ठेचाळीस मिनिटाच/निमषाच वेळ॑.
muhoortha~मुहूर्त.fig.opportune time.संदर्भाच वेळ.तो केम्हाईं मी आफीसाला अवसरांत॑ निघाच वेळांतच मला पाह्याला/पायाला येईल॑. तला वेगळ॑ मुहूर्त मिळत नाहीका ? generally used in a derisive manner.
muhoortha~मुहूर्त.fig.fit time. most suitable time. संदर्भाच वेळ॑.एक नव काम आरंभ करणे म्हण्जे चोखोट मुहूर्त पाव्हून करणे बर असल॑.
mujaDaNeमुजडणे.vt.to fold.घडि घालणे. मुदडणे. मुजलणे.an example of inter-use of ज & द. दुमडणे in sm.
mujalaNeमुजलणे.vt.to fold.घडि घालणे. मुजडणे. मुदडणे.
mukaamमुकाम.n.a place of temporary residence. camp.मुक्काम. थोड काळ राह्याच ठिकाण. डेरा.
mukaTaaमुकटा.n.a cloth worn as part of ritual purity.सोवळेच वस्त्र. मुगटा.usually made of silk.
mukha~मुख.n.face.तोंड.
mukha~मुख.n.mouth.तोंड.
mukhaanthara~मुखांतर॑.adv.through or via a medium. through or via a third source.वेगळ॑ एकां वाटे. एवढ॑ दिवस मझ॑ भाऊ केलतते वंगळ काम मला कळ्ल॑ होत नाही. दोन दिवसाच पुढ॑ ते विषय मझ॑ लोंक मुखांतर॑ मला कळ्ल॑.
mukhasthuthiमुखस्थुति.n.flattery. sycophancy.स्वंत कार्य होया करतां तोंडा समोर प्रशंसा करणे. मस्का बडिवणे.मुखस्थुति करणाराना पातेदेताने. त्यंच काम झालवर अम्चविषीन लटक पणीं सांगतील॑.
mukhavaTaaमुखवटा.n.face of a deity drawn on a holy vessel, paper etc. for religious purposes.पूजाच कलशांतकी कागदांतकी होढलते देवीच नाहीतर॑ देवाच मुख॑. मुखोटा.
mukhavaTaaमुखवटा.n.mask.मुखोटा.
mukhavaTaaमुखवटा.n.countenance. facial features. facecut.तोंडाच रूप. मुखोटा.हे भूमंडलांत सात लोकांच मुखवटा एकसार्ख असल॑ म्हणून सांगण आहे. तीन वेगळ-वेगळ ठिकाणि मलाच कोणकी येऊन वेगळ लोकांच नाव सांगून ते मनुष मीचका म्हणून विचारलाहेत॑.
mukhoTaaमुखोटा.n.face of a deity drawn on a holy vessel, paper etc. for religious purposes.पूजा कराकरतां कलशांतकी कागदांतकी होढलते देवीच नाहीतर॑ देवाच मुख॑. मुखवटा.
mukhoTaaमुखोटा.n.mask.मुखवटा.
mukhoTaaमुखोटा.n.countenance. facial features. facecut. face of an idol.तोंडाच रूप. मुखवटा.
mukhya~मुख्य.adj.main.प्रधान. प्रमुख.
mukhyamanthriमुख्यमंत्रि.n.chief minister.मंत्रिमंडळांत॑ मुख्या.
mukhyapraaNaaमुख्यप्राणा.n.Vayu Dev. प्राणेश. वायु देव.
mukkaaमुक्का.n.kiss.उम्मा. चुंबन॑ ;मुका in sm.
mukkaamमुक्काम.n.a place of temporary residence. camp.मुकाम. थोड काळ राह्याच ठिकाण. डेरा.
mukthमुक्त.adj.liberated. freed.सुटलते.
mukthiमुक्ति.n.liberation. salvation.मोक्ष.
mukthimaargमुक्तिमार्ग.n.way to salvation.मोक्षाच वाट.
mukuTa~मुकुट॑.n.a crown.किरीट॑.
muLeमुळें.prep.on account of. because of.मळें. स्तव. करतां.
muLeeमुळी.n.root of a plant.झाडाच भोई खाले असाच भाग. वेर (Tamil).
muLLaaमुळ्ळा.n.a Muslim priest.मुसलमानांच धर्मगुरु.
muLLangiमुळ्ळंगि.n.radish.एक भाजीपालाच नावमुळ्ळंगीच पराठा फार रूच अस्ते. ते अम्च आरोग्याला पणीं चोखोटच, पण करणे थोड श्रमच॑ !मुळा in sm.
mummarमुम्मर adjintense.गाढ. तीव्र.
munD karNeमुंड करणे.vt.to shave the head.डोस्के क्षौर करणे. मोट्टे बडिवणे. मुंडन करणे.
munDaasमुंडास.n.turban.डोस्केला बांधलते कापडग्रामांत असणार लोक॑ ऊनामळे मुंडास बांधींगतील॑. कारण, तेनी दोन-तीन मैल जमीनाच मध्येसून चालताना सावली अस्त॑ नाही अणी दुपारच ऊन टाळू वर बलकट बडीवत अस्ते. मुंडासे in sm.
munDanमुंडन.n.shaving of the head.डोस्केच क्षौर.
mungoosमुंगूस.n.mongoose (which feeds on snakes etc.).(सर्प वगैरा प्रांणींला खायाच) एक ल्हान प्राणि. मंगूस.
mungyaaमुंग्या.n.ant.एक ल्हान प्राणिमुंगी in sm. In TM the plural form मुंग्या is used in place of the singular form मुंगी.
mungyaa yeNeमुंग्या येणे.fig.to have a tingling sensation of a limb.मुंग्या धरणे. हात नाहितर॑ पांयेला याच एक विधाच चुरचुरणे.उदंड वेळ पाल्कीमांडि (पाल्खीमांडि) घालींगून बसलतर॑ मला समच उठाला होयना. पांयेंला मुंग्या येते. थोड पांय लांब करून हलिवला नंतरच उठाला होते
muniमुनि.n.an ascetic.ऋषि. सन्यासि.
munjमुंज.n.thread ceremony of a Brahmin boy.उपनयनाच सण. मुंजी.
munjeeमुंजी.n.thread ceremony of a Brahmin boy.उपनयनाच सण. मुंज.
munkyaanमुंक्यान॑.adv.mutely. silently. without responding or uttering a sound. quietly.गपचुप. अम्ही अत्ता कहीं करनास्क॑ मुंक्यान॑ असून जाऊम्हण॑. ते संकट अपाप सरकून जाईल॑.मुकाट्यां/मुकाट्यानीं/मुकाट्यानें in sm.
munsifमुन्सिफ.n.a civil judge of lower rung. munsiff.मुनसिफ़ कचेरीच न्यायपालक॑ ;मुनसफ़ in sm.
muraariमुरारि.n.Lord Krishna.भगवान क्रिष्णा.
muraDमुरड.imp. twist.पीळ.
muraDaaमुरडा.n.griping colic pain in the stomach.पोटसूळ. पोटाच मुरडा.
muraDNeमुरडणे.vi.to twist and wriggle.पिळणे.
muragalNeमुरगळणे.vt & vi.to twist, wrench, wring, wriggle.मुरडणे.
muraleeमुरली.n.flute.मुरळि. वेणू. पुल्लांकुळल (Tamil)मुरली in sm.
muraLeeमुरळी.n.flute.मुरली. वेणू. पुल्लांकुळल (Tamil) मुरली in sm.
muraLeedharमुरळीधर.n.Lord Krishna.भगवान क्रिष्णा.मुरलीधर in sm.
muraNeमुरणे.vi.to mellow. to sober.नियंत्रण नाहीस्क॑ असला नंतर शांत होणे.शिवा देवून शिवा देवून अम्च कामवालि अत्ता थोड मुरलीहे. नाहीतर तिन॑ फारच नाचत होति.
murmuraaमुरमुरा.n.a preparation with parched and beaten rice.पोहेंत॑ केलते एक पदार्थ. चुरमुरा.
musakaNeमुसकणे.vt.to cover the face with sheet (while sleeping).मुस्कट घालणे. झोंपी जाताना पांघरुणंतून तोंड झांकणे.
musakaTमुसकट.n.muzzle.तोंडाच अग्र भाग. मुस्कट.
musakaT ghaalNeमुसकट घालणे.vt.to cover the face with sheet (while sleeping).पांघरुणंतून तोंड झांकींकून निजणे. मुस्कट घालणे.
musakeमुसके.n.a cloth guard for the mouth (of animals).प्राणींच तोंडाला बाधाच कापड.
musaLमुसळ.n.a long and thick pounding rod made of wood or iron used in a 'उख्खळ॑'.धान्य कांडाच लांकड. ओलक्के (Tamil).(1) अम्च घरांत असाच उख्ख्ळ लोखंडाच॑. तज मुसळ पणीं लोखंडच॑. मझ बाईल तजांत॑ अत्ता पणीं थोडम्हणून  पह्जेते मसाला कांडते. (2) फ्लाटांत॑ राहणार॑ उख्ख्ळीं मुसळीं उपयोग केलतर॑ खालच॑ घरच लोकांला घरांत॑ बसाला होयनास्क॑ तेवढ॑ तंटा होईल॑ !
mushaaraaमुशारा.n.salary. wages.धर्मा.प्रती वर्ष अम्ही कामवालीच मुशारांत दोनशें रुपे वाढिवतों. तस करून पणीं तिला काहीं तृप्त नाही.
muShaDuमुषडु.adj.uncommunicative and not sociable in nature.समुदायांत॑ वागणे जास्ति करनात॑ (लोके).अम्च 'बिल्डिंगांत' अर्ध लोक॑ मुषडु आहेते. बाकी अर्धदन जंभीष्ट लोके ! from Tamil.
muskaTमुस्कट.n.muzzle.तोंडाच अग्र भाग. मुसकट.
muskaT ghaalNeमुस्कट घालणे.vt.to cover the face with sheet (while sleeping).पांघरुणंतून तोंड झांकींकून निजणे. .मुसकट घालणे.
muskeमुस्के.n.a cloth guard for the mouth (of animals).प्राणींच तोंडाला बाधाच कापड. मुसके.
muslimमुस्लिम.n.Muslim. follower of Islam.इस्लाम धर्म आचरण करणार.
muthaNeमुतणे.vt.to urinate.मूत सोडणे.अम्च देशांत॑ लोक रोडांत॑/बीदींत॑ कोठ पाह्ल॑ तरीन मुताला संकोच भोगतेच नाहीत॑.
muTHkaaमुठका.n.fistful. the amount a closed fist would hold.एक मूटांत धराला होयाच एवढे.कंचि परमाचार्या सांगतील 'नित्य एक मुठका तांदूळ गरीब लोकां करतां वेगळ काढून ठिवून नंतर घरच॑ संपाक आरंभ करा'. हे संप्रदाय अत्तापणीं फार लोक॑ करताहते.
muTHTHaalमुट्ठाळ.adj.dull witted.बुद्ध नाहीते.from Tamil.
muTHTHaalpaNe~मुट्ठाळपण॑.n.foolishness. idiocy.बुद्ध नाहीस्क वागणे. from Tamil.
muththiमुत्ति.n.penis.दाद्ग्येंच मुताच अवयव.ल्हान पोरे चड्डीकी विजारकी नेसनास्क॑ नावगेन हिंडत असलतर अम्ही त्यांस॑ "तुझ मुत्ति कापूनटाकन" अस भें दाखिवून विजार नेसिवाला करिवतों.
muTmuTu basaNeमुटमुटु बसणे.vt.to wait silently.उगे (निशब्दांत॑) थांबणे/असणे.तीस वर्षा पुढल॑ गोष्ट हे. 'मंत्रालयमरोड' स्टेषनांत पाष्टे-पाष्टे उतरून श्री राघवेन्द्रस्वामीच ब्रिंदावनाला जायाच बस्सा करतां उदंड वेळ राखलों. एक झाडा खाले काय करणे म्हणून कळनास्क॑ मुटमुटु बसलोतों. जवळ एक मठ होते, पण तथे गेलतर॑ कोठ बस निघून जातकी म्हणून अम्हाला भें वाटत होते. दोन घंटा वेळ राखला नंतर अम्च बस आल॑ अणी अम्ही निघून गेलों.
muTmuTu paahNeमुटमुटु पाह्णे.vt.to gaze blankly in silence.उगे लक्ष्य देनास्क॑ पाह्णे.बाजू घरच एक पोराला वेड धरल॑. तला पाह्याला अम्ही हॉस्पिटलला गेलों. तिकडे तो खोलीच एक कोनेंतून अम्हाला उगे मुटमुटु पाह्त बसाच पाह्ताना मला फार संकट वाटले.
muTTeमुट्टे.n.egg.अंडा.दिवसोडि कोंबडेच एक मुट्टे खालतर॑ आंगाला चोखोट म्हणतात॑.from Tamil.
muyalमुयल.n.a rabbit. hare.एक ल्हान प्राणि.from Tamil.

No comments:

Post a Comment