Sunday, May 15, 2016

h (ह)


.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
haa*sहांस.n.laughter.हांसू. हास्य.
haa*saNeहांसणे.vt.to laugh.संतोष व्यक्त कराच क्रीयाहसणे in sm.
haa*saNeहांसणे.vt.to make fun of. to ridicule.मष्किरि करणे. परिहास करणेहसणे in sm.
haa*sivaNeहांसिवणे.vt.to make someone laugh.दूसरेला हांसू आणिवणेहसवणे in sm.
haa*sooहांसू.n.laughter.हांस॑. हास्य.
haakaaहाका.n.scoldings.शिवा.हाक in sm means 'a shout'.
haakaa maarNeहाका-मारणे.vt.to scold.शिवा देणे.
haaLहाळ.adv.spoil.नाश.
haaniहानि.n.damage. loss. harm. नाश. नष्ट.
haaniहानि.n.harm.अपाय.
haankaNaarहांकणार.n.driver.पळिवणार.
haankaNeहांकणे.vt.to drive.(बंडि) पळिवणे.आज मझ बंडि हांकणार ('ड्रैवर') आला नाही. अम्ही एक भाडेच बंडींत॑/आटोंत॑ जाऊया.
haankaNeहांकणे.vt.to drive away. to chase away.पळिवणे. भीकारींच तंटा फार झालाहे. कित्ति हांकून पाठिवल तरीन पुन्हा-पुन्हा येत असतात॑.
haarहार.n.garland.माळ.
haarहार.n.necklace.माळ.
haarहार.n.defeat.पराजय.
haasya~हास्य.n.laughter.हांसू. हांस॑.
haathहात.n.hand. arm.कर॑. भुज. हस्त॑.
haath guNa~हातगुण॑.n.luck associated with use of hands. Mida's touch.हातांत काढलते काम सार्थक होयाच भाग्य.त्यंच हातगुण॑ एवढ॑ चोखोट म्हणजे, तेनी कय काम आरंभ केल तरीन ते एक फार चोखोट स्थितींत जाऊन पावते.
haath haleengoon yeNeहात हलींगून येणे.id.to come unprepared.तय्यार होयनास्क येणे.
haath laab karNeहात लांब करणे.id.to beg.भीक मागणे.
haath mujaleengoon basaNeहात मुजलींगून बसणे.id.to sit still without helping.सहाय करनास्क॑ उगे बसणे.मी पूरा दिवस कष्टि भोगून काम कराच तो पाह्त बसलहोता. तला थोड तरीन मनांत॑ वाटलासलतर॑ हात मुजलींगून बसलासना.
haath THivaNeहात ठिवणे.id.to handle a thing.एक काम हाताला काढणे.(1) हे घडिगार बरोर चालत नाही. आवश्य नाहीस्क॑ तजवर हात ठिवून ते पूरा हाळ कर नको. (2) मोडलते खिडकी बरोर कराला एक सुताराला मी सांगिटलोहें. तला कित्ति पैसे देम॑ म्हणून अण्खीन निश्चय झाल नाही. मी बाहेर गेलसताना तो आलतर॑ मी परतून यापतोरी/यापर्यंतीन कामावर हात ठिवताने म्हणून तला सांगशीलका ?
haath uchalaNeहात उचलणे.id.to threaten.दटावणे.
haathaakhaaleहाता खाले.adv.under the custody or control of.स्वाधीनांत॑ (असणे).
haathoDiहातोडि.n.hammer.लोक्कुंडाच/लोखुंडाच एक उपकरण॑.
haathraakhaNeहातराखणे.n.an item or money held for an emergency or as a stand-by.अत्यावश्याला पह्जते साधन॑ ठींगणे.मी पहिल॑-पहिल॑ घर सोडून नव उद्योगाला वेगळ॑ गामाला जाताना मझ बाप हातराखणाला असून्दे म्हणून हदार रुपे मझ पेटीच आंत॑ ठिवले.
haayहाय.n.relief.तंटांतून सुटणे. स्वस्थ.
haayshiहायशि.adv.feeling of relief or satisfaction.हाय होवून असणे. स्वस्थ वाटणेहायसे/हायसें वाटणें in sm.
haDa~हड॑.n.bone.अस्थिहाड in sm.
hadaarहदार.n.thousand.हजार. शंभर गुणा दहा. सहस्र.
haDapहडप.n.misappropriate. embezzle. swindle.गडप. पैसा गिळणे. कोण्त॑ व्यापार आरंभ केलतरीन अम्च पूर्त ध्यान तेजांत असाम॑. नाहीतर, अम्च ध्यान चुकलतर॑ खाले काम करणार याच पैसे पूराहीं हडप कराला पाह्तील॑.
haDapहडप.n.swallow.गिळणे. गडप.
haDapNeहडपणे.vt.to swallow.गिळणे. गडपणे.
haDapNeहडपणे.vt.to misappropriate.पैसा गिळणे. गडपणे.
hagNeहगणे.vt.to pass stools.जीर्ण झालते पदार्थ विसर्जन करणे. परसाकडे जाणे. हगवण in sm means 'dysentery'.
hajaama~हजाम॑.n.barber.केंस कापाचीं क्षौराचीं काम करणार.हजामाकडे जावून अलतर॑ स्नान करूनटाकून, जानव॑ बदिलिवूनटाकूनच देवपूजाला बसांव॑, अस॑ म्हणणे आहे.
hajaamathहजामत.n.barber's profession.हजामाच काम.
hajaamathहजामत.fig.a demeaning way of describing an (unproductive) act.प्रयोजन नाहीते कामाविषीं नीच रूपांत॑ सांगणे.
hajaarहजार.n.thousand.हदार. शंभर गुणा दहा. सहस्र.
hakka~हक्क॑.n.a right or claim on something.एकावर असाच अधिकार.
haLadहळद.n.turmeric.हळेद. हळदी.
haLadहळद.n.rhizome or tuber of turmeric plant.हळेद. हळदीच झाडाच गड्डे.
haLadeeहळदी.n.turmeric.हळेद. हळद.
haLadeeहळदी.n.rhizome or tuber of turmeric plant.हळद. हळेद. हळदीच झाडाच गड्डे.
haLadeekunkooहळदीकुंकू.n.a social get-together where married ladies are invited and given turmaric and kumkum.सवाष्णी बायकांला घराला बलावून हळदीं कुंकूईं द्याच पद्धत॑.
haLakandहळकंद.n.turmeric tuber.हळेदाच कंद. हळकुंड. हळेदाच गड्डे. हळदीच गड्डे.कंद means "tuber" or गड्डे.
haLakunDहळकुंड.n.turmeric tuber.हळकंद. हळेदाच कंद. हळेदाच गड्डे. हळदीच गड्डे.कंद means "tuber" or गड्डे.
haLedहळेद.n.turmeric.हळद. हळदी.
haLedहळेद.n.rhizome or tuber of turmeric plant.हळद. हळदी. हळदीच झाडाच गड्डे.
halivaNeहलिवणे.vt.to shake.असाच ठामातेच झटका देणे. होतते ठिकाणांतेच झटका देणे हालविणे/हलावणे/हलाविणे in sm.
halka~हलक॑.adj.feeble.उण॑ शक्तीच॑.हलका/हल्लक in sm.
halka~हलक॑.adj.of light weight.उण॑ वजनाच॑. जेड नाहीतेहलका/हल्लक in sm.
halka~हलक॑.adj.flimsy.पुसका. फुसका
haLLuहळ्ळु.adv.slowly.निदानांत॑. सावकाशउजव॑ पांयेंत॑ घाव लागल-ते-करतां मला हळ्ळु चालालेच होईल॑.हळू in sm.
haLLuहळ्ळु.adv.gently.सौम्य होऊन (1) तजकड॑ हळ्ळु विचारलतर॑ निज होऊन/खर॑ होऊन काय झाल॑ म्हणून कळींगुया. (2) र्रीण देलते पैसा तजकडू परतून मिळणे म्हणजे एवढ॑ हळ्ळु काईं होईना.हळू in sm.
haLLuहळ्ळु.adv.softly.शांत होऊन(1) कित्ति हळ्ळु बोलल॑ तरीन तला ऐकेल॑. (2) टीवीच शब्द थोड हळ्ळु करना तर॑ झोंपि जात असाच ते लेंकरू उठून बसेल॑.हळू in sm.
halNeहलणे.vi.to shake.असाच ठामांतेच झटका होणेहालणे in sm.
halNeहलणे.vi.to sway.असाच ठामांतेच हेपटीस-तेपटीस होणे.हालणे in sm.
halNeहलणे.fig.to get startled.आश्चर्याच झटका होणे. अल्लाडणे (tamil) ;हालणे in sm.
halvaaहलवा.n.a type of sweetmeat.एक गुळ्चीट पदार्थ.
hamaalहमाल.n.coolie. porter.कूलीच मनुष॑
hamaaliहमालि.n.wages paid to a coolie or porter.कूलि केलतेला द्याच पैसा.
hanDaaहंडा.n.a large metal vessel usually used for storing water.गंगाळ. घंगाळ. घंघाळ. पाणी ठिवाला उपयोग कराच एक मोट्ठ॑ पात्र.हंडा पाल्ते घालताने म्हणून सांगणे अहे.
hansa~हंस॑.n.swan.एक पक्षि. उत्तरा.
haraaहरा.n.Lord Siva.शंकर भगवानहर in sm.
haraNहरण.n.deer.एक मृग. मान (tamil).
haraN-shingहरण-शींग.n.antlers.हरणाच शींग.
haraTeहरटे.n.gossip. idle talk.अरटे. प्रत्येक विषय नाहीस्क॑ बोलणे गप्पा in sm.
haraTe baDivaNeहरटे-बडिवणे.vt.to gossip.अरटे बदिवणे. प्रत्येक विषय नाहीस्क॑ बोलाच॑गप्पा मारणे in sm.
harichandana~हरिचंदन॑.n.yellow sandal wood paste.पिवळ॑ रंगाच गंध/चंदन॑.
harijanहरिजन.n.a person of the depressed caste.दलित. उणे वर्गाच मनुष.
harikathhaaहरिकथा.n.a type of narrative folk entertainment.कथाप्रसंग॑. कथाकालक्षेप॑.
harivaNeहरिवणे.vt.to fail.निष्फल करिवणेहारवणे/हारविणे in sm.
harNeहरणे.vi.to fail.निष्फल होणे.
harNeहरणे.vi.to get defeated.पराजय होणे.
harpaNeहरपणे.vt & vi.to lose.हात सोडून जाणे. मिळनास्क॑ होणे.
harthaalहरताल.n.boycott. strike.नियम तोडून विरोध करणेहरताळ in sm.
hasthaakShara~हस्ताक्षर॑.n.handwriting.हाता वाटी लिव्हाच शैली.
haththaaहत्ता.n.spank.तळहातावाटे हळ्ळु मारणे हत in sm.
haththiहत्ति.n.elephant.गज. सोंड असाच एक मोट्ठ॑ मृग॑.
hathyaaहत्या.n.killing.मरिवणे.
haTTa~हट्ट॑.n.stubbornness.मनाला आलते सोडनास्क॑ असणे.
haTTa~हट्ट॑.n.insistence.होवूनेच सराम॑ अस॑ बसणे.
haTTavaadहट्टवाद.n.stubbornness.हट्टपण॑. मोंडपण॑.
haTTavaadiहट्टवादि.adj.stubborn (person).हट्ट करणार.
havaalaaहवाला.n.held on charge.कैद.
havaalaaहवाला.n.money transfer outside of legal routes.नियमाच विरुद्धांत॑ पैसा पाठिवणे.
havanहवन. n.oblation given to Gods through sacred fire.देवांस॑ होमकुंडांत॑ द्याच आहूती.
haveeहवी.n.an offering (like ghee) fit for oblation in the sacred fire.होमकुंडांत॑ घालाला योग्य असाच द्रव्य.
hayagreeva manDiहयग्रीवमंडि.n.name of a sweet dish.एक गुळ्चीट पदार्थाच नाव.
hayagreevaa हयग्रीवा.n.Hayagreeva, Lord Vishnu in the form of a horse. Hayavadana.हयवदना. घोडाच रूपांत॑ महाविष्णु.
hayavadanaaहयवदना.n.Hayavadana, Lord Vishnu in the form of a horse. Hayagreeva.घोडाच रूपांत॑ महाविष्णु. हयग्रीवा.
heहे.pron.this (applied to both animate and inanimate).ये. जवळ असाच एक साधनाला अथवा जीवीला उद्देश करून सांगाच सर्वनाम॑ (एकवचन॑ अणि बहुवचनांत॑).
he javaLa~हे जवळ॑.adv.recently.समीपांत॑. ये जवळ॑.सी.पी.ऐ.(माओ) पक्ष॑ पुन्हा-पुन्हा त्यंच स्वाधीना खाले असाच प्रदेशांत॑ र्रेलवे-ट्राकाला उडीऊन नाश कराच एक मोट्ठ॑ चिंताच विषय झालाहे. हे आफत्तांतून चुकिवाला हे जवळ॑ केंद्र सरकार र्रेलवेच अपाय उणे करिवाला साध्य होयाच एक उपकरण॑ उपयोग कराला निश्चय केलाहेत॑.
hee*हीं.conj.a conjunction indicating inclusiveness.ईं. नि.as in तेहीं (तेईं) meaning 'that also'.
hee*vहींव॑.n.cold. chill. हीम.हिंव in sm.
hee*vहींव॑. n.snow.हीम. हीमामुळे आकाशांतून पडाच पाणीच पंढ्र रंगाच घट्टि रूप.
heemहीम.n.cold. chill.हिंस॑. हींव॑ हिंव in sm.
heemहीम.n.snow.हींव॑. हीमामुळे आकाशांतून पडाच पाणीच पंढ्र रंगाच घट्टि रूपहिमालय पर्वताला नाव "हीम" अणी "आलय" हेजांतून आल॑.
heemaaLaaहीमाळा.n.winter days. winter season.हिंवाळा. हिमाळा. हीवाळा. हेमंत॑ ऋतु. हिंस काळाच ऋतु.हिवाळा in sm.
heevaaLaaहीवाळा.n.winter days. winter season.हिंवाळा. हिमाळा. हीमाळा. हेमंत॑ ऋतु. हिंस काळाच ऋतु.हिवाळा in sm.
hemaaहेमा.n.gold.सोन॑. स्वर्ण.
hemanthहेमंत.n.winter season.हिमाळाच/हिवाळाच ऋतु.
heneeहेनी.pron.these people.हे लोके (सर्वनाम॑, बहुवचन॑). यनी. येनी.
hepaTees the paTeesहेपटीस-तेपटीस.adj.mutual.अन्योन्य.
hevandaaहेवंदा.adv.this year.हे वर्षी. यंदा. यवंदा.घरच॑ अंबाच झाडांत॑ गेलंदा पक्षा हेवंदा फूल उदंड उणे सोडलाहे.
hevandaaहेवंदा.adv.this time. this occasion.हे दपा. यंदा. यवंदा.ते गांवाला जायाच वाट उदंड हाळ जालाहे. गेल महिना तिकडे गेलतम्हा मझ बंडी "पंक्चर" होऊनगेल॑/झाल॑. ते करतां हेवंदा मी तिकडे जाताना मझ स्वंत बंडींत जायनास्क॑ बस धरींगून गेलों.
hijaraaहिजरा.n.हिजरा sfs n eunuch.नपुंसक॑.
himaachalहिमाचल.n.Himalaya mountains.हिमाद्रि. हिमालया. हिमपर्वत॑.
himaadriहिमाद्रि.n.Himalaya mountains.हिमपर्वत॑. हिमाचल. हिमालया.
himaaLaaहिमाळा.n.winter days. winter season.हीमाळा. हिंवाळा. हीवाळा. हेमंत॑ ऋतु. हिंस काळाच ऋतु.उत्तर भारतांत॑ हिमाळाच समयांत॑ कापडाच पांघरविणेच बद्दिल कांबळेच पांघरिवण॑ पह्जते पडेल॑.हिवाळा in sm.
himaalayaaहिमालया.n.Himalaya mountains.हिमपर्वत॑. हिमाचल. हिमाद्रि.
himagiriहिमगिरि.n.the abode of Lord Siva, Mt.Kailas.कैलास पर्वत॑, शंकर भगवानाच स्थळ.
himaTaaहिमटा.adj.stingy. miserly. niggardly.कंजूस.
himaTapaNa~हिमटपण॑.n.stinginess. miserliness. tightfistedness.कंजूसपण॑.
himsa~हिंस॑.adj.that which is cold.हीम वाटाच॑. हीम असाच॑. हींव॑ वाटाच॑. हींव॑ असाच॑.
himsaaहिंसा.n.trouble.तंटा. उपद्रव.
himvaaLaaहिंवाळा.n.winter days. winter season.हिमाळा. हेमंत॑ ऋतु. हिंस काळाच ऋतुहिवाळा in sm.
himvaaLaaहिंवाळा.n.cold weather.हिमाळा. हिंस वातावरण॑ ;हिवाळा in sm.
hinDaNeहिंडणे.vt.to roam about. to wander.उगे फिरणे.
hindeeहिंदी.n.Hindi language.हिंदी भाषा.
hindooहिंदू .n.the hindu religion.हिंदू धर्म.
hindooहिंदू .adj.a person belonging to Hindu religion.हिंदू धर्माच मनुष.
hindusthaaneeहिंदुस्थानी .adj.related to Hindusthan.हिंदुस्थानाला संबंध झालते.
hindusthhaanहिंदुस्थान nIndia.भारत देश.
hindusthhaaneeहिंदुस्थानी .n.the Hindusthani language, a mixture of Hindi and Urdu.हिंदी अण्खी उर्दूच मिश्रभाषा.
hine~हिन॑.pron.this woman/girl.हे स्त्री/पोरी.
hingहिंग.n.asafoetida.एक मसालाच नाव
hing nighoon jaaNeहिंग निघून जाणे.id.to be drained out completely. to be rendered totally exhausted.पूरा पूरा नित्राण होणे. पूरा पूरा क्षीण होणे.
hiraDaaहिरडा.n.a dried nut used in Ayurvedic medicine.आयुर्वेदांत॑ उपयोग कराच एक वाळलते फल॑. हिरडा तोंडात॑ ठींगटलतर॑ खोंकळा नीट उणे होत॑.
hiraNeहिरणे.vt.to seize forcibly.बळांत॑ घेवून जाणे.
hiraNya~हिरण्य.n.gold.सोन॑. स्वर्ण.
hiraNyagarbha~हिरण्यगर्भ.n.the primordial golden egg in Hindu scriptures, attributed as the cause of the Universe.ब्रह्मांडाच उत्भवाला कारण॑ झालते सोनेच अंडा.
hirava~हिरव॑.n.green colour.हिर्व. एक रंगहिरवा in sm.
hirava~हिरव॑.adj.green coloured.हिर्व रंगाच॑. हिरव॑ रंगाच॑.
hirava~हिरव॑.adj.raw. unripe.हिर्व. कच्चा. पिकनाते.
hiravaTa~हिरवट॑.adj.(a person who is) rude, coarse, uncouth, inconsiderate etc and hence difficult to get along with.अवघड (मनुष).चोखोट "बोस" मिळाला देवून-ठिवलसाम॑. कित्तिकी दपा हिरवट मनुष "बोसास्क" येतात॑. काम कित्ति बेष केल तरीन तेनी चूक हुडुकतील॑.
hirva~हिर्व.n.green colour.हिरव॑. एक रंगहिरवा in sm.
hirva~हिर्व.adj.green coloured.हिरव॑ रंगाच॑. हिर्व रंगाच॑
hirva~हिर्व.adj.raw. unripe.हिरव॑. कच्चा. पिकनाते.
hiShobहिषोब.n.mathematics.इषोब. गणितशास्त्र(1) श्रीनिवास रामानुजन हिषोब शास्त्रांत॑ अपार बुधिवंत होते. (2) साळेंत वाचाच वेळी मला उजंड अवडलते विषय हिषोब होत॑.हिशेब/हिशोब in sm. इषोब is the under emphasized form of the correct हिषोब.
hiShobहिषोब.n.accounts.इषोब. पैसाच विषय. पैसा खर्च केलतीं पैसा आलतीं लिव्हून ठिवणेहिषोबाच गोळमाळ करून पैसा गिळला म्हणून हे जवळ॑ मझ॑ आफीसांत॑ एक थोर अधिकारीला कामांतून काढूनटाकले.हिशेब/हिशोब in sm. इषोब is the under emphasized form of the correct हिषोब.
hiShob naaheeska~हिषोब नाहीस्क॑.fig.unscrupulously.मर्यादा अवगणना करून. मला कळ्ळत॑ एकला चोखोट सरकारी उद्योगांत असताना हिषोब नाहीस्क॑ पसे हडप करून, नंतर॑ सांपिडींगटला. अता कांब मोजत आहे.
hiShobaachहिषोबाच.adj.measured. restrained.इषोबाच. आवश्याच तेवढेच. आवश्याजोक्ताच. नियंत्रणांतल॑.तेनि उजंड मानमर्यादाच मनुष मात्र नहो, बोलतांपणीं हिषोबांतेच बोलतील॑.इषोबाच is the under emphasized form of the correct हिषोबाच.
hiShobeeहिषोबी.n.an accoutant.इषोबी. हिषोब पाह्यींगणार.जुने काळांत थोर थोर घराच जमीनाच आदाय वगैरा पाह्यींगाला म्हणून तसलत॑ एक एक घरांतीन हिषोबी होते.
hoDaNeहोढणे.vt.to pull.ओढणे. बळ उपयोग करून स्वताकडे सरकिवणेओढणे in sm. होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
hoDaNeहोढणे.vt.to draw a picture or a line.ओढणे. चित्र काढणे. बावोली होढणे. रेखा काढणेओढणे in sm. होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
hoDaNeहोढणे vtto smoke a cigarette or beedi.ओढणे. सिगरेट अथवा बीडी पीणे/फुंकणेओढणे in sm. होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
hola~होल॑.pret.a preterite of the verb "होणे". over. done. झाल॑. "होणे" हे क्रीयापदाच॑ भूत काळ.this is a peculiarly DM usage, formed by the combination of होय and झाल॑.
hoLeeहोळी.n.name of a festival.एक सणाच नाव.
homa~होम.n.oblation into the sacred fire.आहूती. हवन.
homakunDहोमकुंड.n.a pit prepared for performing oblation in sacred fire.यज्ञकुंड.
hoNeहोणे.vi.to happen. to become. to come to pass.साध्य होणे.(1) मझ॑कडून घेटलते र्रीण एक महिनेच आंत वारिवतों अस॑ तो म्हणट्लाहे. मला कायकी ते होणे संदेहच. (2) ते दोन कुटुंबाच मध्ये मनस्थाप होवून उजंड दिवस झाल॑.
hoNeहोणे.vi.to be finished. to be ended.संपणे. वारणे.तो सांगाच पूरा लोक्कर काहीं होईल म्हणून मला वाटत नाही.
hoNeहोणे.vi.to be.होणे. तो सांगाच पूरा निज होणे साध्येच नाही.
hoo*हूं suffa suffix to certain words to imply applicability, source etc. eg. तूहूं (from or by you only), वरून (from the top), आंतून (from inside) दुसरेंकडून (from others) etc.हून. कित्येक गोष्टां बरोर जोडाच एक प्रत्यय (suffix ). (1) भरून दपा मझ॑ घराला ये म्हणून बलावलों तरीन तू परवा केल नाहीस॑. इत्तपर मी तुला बलावना. तूहून अलतर॑ ये. (2) दुसरें कडून सहाय विचाराच पक्षा तूच ते पुस्तक पेटीच आंतून बाहेर काढ॑.
hoTHaakaNeहोठाकणे.vt.to stand up.ओठाकणे. बसलत॑/निजलत॑ स्थितींतून उठणे1.the word ओठाकणे appears to be from ऊठ and ठाकणे and होठाकणे a phonetic variation of it. 2. होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे.
hoTHaakaNeहोठाकणे vtto halt.थांबणे. राखणे.एवढ॑ दिवस अम्च गामांत॑ एक्सप्रस ट्रैन कोण्तीन होठाकत होत नाही. हे महिना पसून दादर एक्सप्रस होठाकाला आरंभ झालाहे. होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे.
hoTHaakivaNeहोठाकिवणे.vt.to make a person stand or get up.ओठाकिवणे. बसलत॑/निजलत॑ स्थितींतून एक व्यक्तीला ओठाकिवणे.होठाकिवणे is the hyper emphasized form of the correct ओठाकिवणे.
hoya~होय.adv.yes.संम्मत दाखिवाला सांगाच गोष्ट॑. बर॑.
hrudaya~हृदय.n.heart.आंगांतल॑ एक मुख्य अवयव.
huDakaNeहुडकणे.vt.to search (for a lost thing). (हरपलतेला) हुडकणे.from Kannada
huDaNeहुडणे.vi.to fly.उडणे.
huDimaarNeहुडिमारणे.vt.to leap. to jump.उडिमारणे.
hunDiहुंडि.n.donation box in a temple.देऊळांत॑ भक्तलोके पैसेच संभावना द्याच/घालाच पेटी.
hushaarहुशार.adj.mentally sharp, alert, clever etc.मनाच षाणपणांत असण॑. नित्य योगाभ्यास करणारांस॑ रोगरागी जास्त येईना अणि तेनी बुद्धींत पणीं हुशार असतील॑.
hyder danDuहैदर-दंडु.fig.old useless fellow.प्रयोजन नाहीते म्हातारा.
hyder kaaLहैदर-काळ .fig.olden times.जुने काळ.
hyraaNहैराण.adj.distressed through fatigue or mental affliction.नित्राणा मुळे होयाच मनाच कष्ट॑.

No comments:

Post a Comment