Sunday, May 15, 2016

kh (ख)





.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
khaadखाद.n.sumptuous food.तृप्त जेवण॑.
khaaDaaखाडा.n.herbal decoction.कषाय. काढा. आयुर्वेदाच ओखदाच खाडा कित्येकदपा कडू असलतरीन तला एक मादरी चोखोट वास असत॑.
khaadeeखादी.n.hand spun cotton cloth.हातांत॑ केलते कापूसाच॑ कापड.महात्मा गांधि सत्याग्रहाच कार्यक्रमांत॑ विदेशांत॑ केलते कापडाच बदिल खादीच कापड उपयोग कराला भारतवसींला प्रेरणा केले.
khaajखाज.n.itch.कंड.कंबळीपूचीच रोम अम्च आंगाला लागलतर॑ उदंड वेळ खाज होत असल॑.
khaajaNeखाजणे.vi.to itch.कंड होणे.कंबळिपूचीला शिवून झालते खाजणे सोसाला होयनास्क॑ ते लेंकरू रडाला आरंभ केला.
khaajivaNeखाजिवणे.vt.to scratch.खाजिवणे. खाजविणे/खाजवणे in sm.
khaakeeखाकी.n.brownish yellow or brownish green colour.पिवळ॑ रंगाच बरोरकी हिरव॑ रंगाच बरोरकी ब्रौण रंग मिळिवलते एक प्रकारच रंग.पोलीस अथवा सैन्यांच लोकांच "यूणिफोम" खाकी रंगाच कापडेंत असत॑.
khaaleखाले.adv.below. down. under.खालेट्रेनांत जातान मझ॑ नातू केम्हाहीं वरच॑ बेर्तांतच निजल॑. खाले असाच बेर्तांत निजना.खालीं/खाली in sm.
khaaleeखाली.adj.empty. vacant.काहीं नाहीते ठाम, अवस्था अस॑.डब्बांतल॑ लाडू पूरा तो खाल्ला. अत्ता ते डब्बा खाली आहे.
khaalee-basaNeखाली-बसणे.fig.to be unemployed. to be idle.काम नाहीस्क॑/करनास्क॑ उग॑ असणे. स्वस्थ बसणे. रिकाम बसणे. होतते चोखोट काम सोडूनटाकून अत्ता तो खाली बसलाहे.
khaalevara~खालेवर॑.adv.topsy-turvy. upside down.उळटाखालवर in sm. वर-खाले पाह्यणे (met) means "to be perplexed".
khaaloonखालून.adj.from below.खालेसून.प्रति वेळ पायरी (पडतोरे) उतरून खाले याला होयनाम्हणून मला कायतरीन पह्जेतम्हा ते सामान खालून वर भिरकावून दे अस॑ मी मझ॑ बाईलीला सांगणे आहे.
khaalpaTखालपट.adj.low lying or slopping (land).खालच॑ तळांतल॑. पळ्ळमांत॑ असाच (जमीन). एक पटीस पळ्ळम असाच॑ (जमीन).अम्च बिल्डिंग अम्च "एरियांतच" खालपट असाच ठिकाणंत आहे. तजमुळे थोर पाऊस/पौस आलतर पाऊसाच/पौसाच तेवढे पाणीईं अम्च घरापटीस एक नदीस्क येत असत॑. चोखोट वेळ एक थोर मोरी असामुळे पाणी पूरा तजांतसून जाते.
khaambखांब.n.a pillar. a post.स्थंभ.प्रहळादाचवर झालते र्रागांत॑ हिरण्यकशिपू तज राजवाडांतल॑ एक खांबाला गदांतसून जोरहोऊन बडिवून फाडताना तजांतसून नरसिंहदेव घोर रूपांत॑ प्रत्यक्ष झाले.
khaameeखामी.n.deficiency. damaged.उणे पडणे.(1) अम्च पोरीला काय खामी आहे म्हणून तेनी संबंध ओपिंगटले नाहीत॑, हे अम्ही त्यंचकडे अवश्य विचाराम॑. (2) मझ काकाला डोळेच खामी आहे. तजमुळे तेनी रात्रीच वेळ कोठीन जात नाहीते.
khaandaaखांदा.n.shoulder.गळाच खालच भाग.
khaanDaNeखांडणे.vt & vi.to dig (on a surface/ground).एक स्थलांत॑ कुंड काढणे. खोदणे.शंभर फूट खांडूनपणीं पाणी आल॑ नाही म्हणून आड खांडणे राहतेकराला सांगटलों.
khaanDaNeखांडणे.vt & vi.to hew.फाडणे.करनाटकाच बेळ्ळारी जिल्लांत॑ थोडपणीं नियंत्रण नाहीस्क लोकुंडाच (लोखंडाच) खनीच कामामळे पूरा जिल्ला खांडून सत्यनाश झालाहे.
khaaNeखाणे.vt.to eat.जेवण करणे.
khaaNeखाणे.met.to embezzle.एमारिवून पैसा करणे. पैसा खाणे. पैसा गिळणे."सरकाराच पैसेचकी, खावूनगेलतर जाऊनदे" अस कित्येक लोक म्हणींगतात. असच सोडूनटाकलतर खजाना खाली होईल अणी अम्च "टेक्सेस"/कर॑ वाढेत जाईल म्हणून तेन्हाला अर्थ होतनाही.
khaaNe-peeNeखाणे-पीणे.n.items for eating and drinking.खायाचीं पीयाचीं पदार्थ.ट्सुनामीच वेळ अम्ही रामेश्वरमांत॑ होतों. दोन दिवस खाणे-पीणे काहीं मिळनास्क कष्टि भोगलों.
khaaNe-peeNe karaNeखाणे-पीणे करणे.adv.to eat and drink. to consume food items.खायाच पदार्थ खाणे."तुम्ही खाणे-पीणे करींगून या पर्यंतीन मी इकडच अस्तों. पण, लोक्कुर येम॑".
khaaNeeखाणी.n.story.कथा"गोण वित द विंन्ड" हे सिनिमा तेच नावाच पुस्तकांत॑ सांगटलते खाणींतूं नंखरपणीं सरकनस्क॑ काढलतेकरतां पुस्तक वाचलतेयांस॑ सिनिमांतल॑ एक-एक दृश्यहीं पुस्तकांत॑ लिवलत्यास्कच वाटल॑.कहाणी in sm.
khaaNee-baDivaNeखाणी-बडिवणे.id.to bluff.लबाड सांगणे. तो मनुषाला थोडपणीं विसंबाला नाही. शुद्ध खाणी बडिवतो.
khaankखांक.n.arm pit.कांख कक्ष. हात आंगाला मिळाच स्थल॑.थोरळे बायका "स्लीवलेस" चोळी नेसींगून खांक दाखिवणे त्यंच वयाला अवमर्यादा केलास्क अस्ते.काख in sm.
khaaparखापर.n.slate tiles. tiles.ओडु॑ (tamil). घराच छप्पर घालाच एक साधन॑.
khaaparखापर.n.thick dried skin over a wound.वाळलते घावाच व॑र झालते जाड चर्म / काताड.उदंड दिवसाच नंतर॑ वाळून येत होतते घावाच खापर उकरून पुन्हाहीं व्रण करींगट्लाहे.खपली in SM.
khaarखार.n.salt.मीठ.खारा-लस्सी म्हणजे मीठ घाट्लते लस्सी म्हणून अर्थ. पण, मीठाच बूंदी अणी मीठाच सेवाला अम्ही साधरण होऊन कारा-बूंदी, कारा-सेव म्हणून सांगतों. मला विचारलतर॑ खारा-बूंदी, खारा-सेव म्हणून सांगाम॑.
khaaraaखारा.adj.saltish. savoury.मीठाच स्वाद.मला सादा लस्सीचपक्षा खारा-लस्सी अवडल॑.
khaaraabhaathखाराभात.n.a saltish snack made of rice or rava.काराभात. भातांत॑ अथवा र्रवांत॑ केलते एक मीठस्वादाच पदार्थ. काराभात.कित्येक होटलांत मिळाच खराभातालीं उप्पीटालीं एकच स्वाद अस्त॑.
khaaraalasseeखारालस्सी.n.saltish buttermilk.कारालस्सी. ताकांत॑ केलते पीयाच एक मीठस्वादाच पानीय.
khaaraasevखारासेव.n.a fried savoury made of channa flour.कारासेव. चणाच पीठांत॑ केलते एक मीठस्वादाच तळलते पदार्थ. कारासेव.खारासेवांतल॑ मिरेच स्वाद मला फार अवडल॑.
khaaraTखारट.adj.having excess salt.मीठाच स्वाद जास्ति असणे. आज अम्च घरच कालवण खारट आहे. संपाकीण॑ दोनदपा मीठ घालूनटाकली की कायकी !
khaavoon-jaaNeखावून-जाणे.vi.to (physically) waste away. to go down in health. to get emaciated.आंगाला बर॑ नाहीस्क॑ होऊन रोडे होणे. आंगाला क्षीण येणे.तज आंग खावून गेलास्क आहे. रोग "कंट्रोलांत"/नियंत्रणांत॑ ठिवला नाही वाटते.
khachaNeखचणे.vi.to collapse due to degradation.खजणे. झिजून पडणे. नदीच कांठांतल॑ खचून होतते पडतोरे बरोर प्हायनास्क॑ उतरतांतरून मी पांय चुकून पडलों.
khaDaaखडा.n.gem.खडे. रत्न.तो नौ खडाच मुदी घालींगटलसाच मी पाह्यलों.
khaDaaखडा.n.pebble.एक ल्हान धोंडा. खडे.
khaDaaखडा.n.खडा n a small lump or bit of.थोडच थोड. खडे.नरसिंह जयंती दिवसी मठांत॑ वाढलते मंडिसांभारभाताला एक खडा मीठ उण॑ होत॑.
khaDDaaखड्डा.n.a hole or depression. a pit.गार॑.
khaDeखडे.n.gem.खडा. रत्न.
khaDeखडे.n.pebble.एक ल्हान धोंडा. खडा.
khaDeखडे.n.a small lump or bit of.थोडच थोड. खडा.
khaDeeखडी.n.squirrel.कडी.
khaDesaakhareखडेसाखरे.n.lump sugar.खडेरूपाच घट्टि साखरेखडेसाखर खाल्लतर॑ गळांत॑ सांपडींगेल॑ म्हणून ल्हान लेंकरांस॑ ते खायाला मझ॑ बाईल सोडना.खडीसाखर in sm.
khaDga~खड्ग.n.dagger.उणे लांबाच तलवार.
khaDsaakhareखडसाखरे.n.lump sugar.खडेरूपाच घट्टि साखरे. खडेसाखरे.खडीसाखर in sm
khajaanaaखजाना.n.treasury.धनाच भंडारभारतांत॑ कोण्त राज्यांतीं एक नव सरकार येताना जुन॑ सरकार खजाना खाली करून ठिवलाहेत॑ म्हणून सांगणे सहजेच॑.खजिना in sm.
khajaanjiखजानजि.n.treasurer.खजानाच जवाबदारिच मनुष.
khajaNeखजणे.vi.to collapse due to degradation.खचणे. झिजून पडणे. नदीच कांठांतल॑ खजून होतते पडतोरे बरोर प्हायनास्क॑ उतरतांतरून मी पांय चुकून पडलों.
khalaasखलास.adj.finished. spent up.समाप्त होणे. संपणे. वारणे.
khaLbaLaNeखळबळणे.vt.to rinse (after washing clothes).कापड धुवला/धूला नंतर॑ पाणींत॑ बुचकळून शुद्ध करणे.कित्ति सांगिट्ल तरीन अम्च कामवाली कापड बरोर धुवत/धूत न्होती. अर्धगछ खळबळून घालणामळे सोपाच वास कापडांत॑ केम्हाहीं येत होत॑. सांगून-सांगून पुरे झाल॑. नंतर॑ वेगळ॑ गेत नाहीस्क॑ अम्ही एक "वाषिंग मषीन" घेटलों.
khammagखम्मग.adj.pleasant (smell, taste etc).चोखोट (वास, स्वाद). घम्मग.(1) घरांत खीर करत असताना खम्मग वास याच कारण वेळा उपयोग कराचमुळे. (2) उन्हाळाच काळांत॑ रात्रीच वेळ मझ खोलीच खिडकीवाटी याच मोगराच फूलाच खम्मग वास मला उदंड॑ अवडल॑.खमंग/घमघमाट in sm.
khanDखंड.n.itch.कंड. खाज.दोन दिवसांतसून मला घसाच खंड होतहोत॑. नंतर, मीठाच पाणी खुळखुळ (गुळु-गुळु) केलांपिरी थोडक उणे झाल॑.
khanDखंड nsection or division.भाग. विभाग.
khanDखंड nsection or division in a book.पुस्तकाच एक भग. कांड.
khanDखंड ncontinent.भूखंड.खंडन in sm.
khanDaadreeखंडाद्री.n.a medicinal paste made for administering to a recently delivered mothers.बाळंतीणांला खायाला द्याच जीर्णाच लेह्य.बाळंतीणाला खंडाद्री देलतर तिला जीर्ण शक्ति वाढते अणी वायूच उपद्रव उणे होते. ल्हान लेंक्रांलापणीं खंडाद्री देणे आहे.
khanDanaaखंडना.n.refutation. rebuttal.तर्क करून विरोध करणे.
khaniखनि.n.mine.विध-विध प्रकारच धातू भूमींतून खांडून काढाच ठिकाण.भारतांत॑ सोनेच खनि एकच-एक ठिकाणांतच आहे. ते आहे, कर्णाटकांतल॑ रायचूर जवळच हट्टी.
khanjiraaखंजिरा.n.a small percussion musical accompaniment.संगीताच कार्यक्रमांत॑ उपयोग कराच एक ल्हान वाद्य.खंजिरी in sm.
khanthखंत॑.n.regret. remorse.मनांतल॑ संकट. दुख.
khanth bhogaNeखंत-भोगणे.vt.to regret. to feel remorse.मनांत संकट/दुख वाटणे. मनांत वाईट वाटणे.
khapaleeखपली.n.thick dried skin over a wound.खापर. वाळलते घावाच व॑र झालते जाड चर्म / काताड.उदंड दिवसाच नंतर॑ वाळून येत होतते घावाच खपली उकरून पुन्हाहीं व्रण करींगट्लाहे.
khara~खर॑.adj.real. actual. true.वास्तव॑. सत्य. निज॑हॉळिवूड नटी मेरिलिन मण्रोच खर॑ नाव नोर्मा जीन मोर्टनसन म्हणून होत॑.खरा in sm.
kharaDखरड.n.residue sticking on the inside bottom of a vessel (immediately) after cooking.चूलांतून उतरीवलते भांडीच बुडांत॑ चिकटून असाच पदार्थाच राड. संपाकाच भांडींत बूड बसलते पदार्थ. कषंडी.मला तूपाच खरड, भांडींतल॑ भाजीच/उप्पीटाच खरड हे तेवढीन खायाला उदंड अवडल॑.
kharaDaNeखरडणे.vt.to scrape.चिकटलते उकरून काढणे.लोणी ताऊन तूप केलते तेलतवांतून खरडून काढाच पदार्थाला अम्ही "कषंडी" म्हणतों. ते सार भाताच बरोर कालिवून जेवलतर॑ प्रमाद रूच अस्त॑.
kharboojखरबूज़.n.musk melon.एक रीतीच फळ. दरबूज़.उन्हाळाच दिवसी खरबूज़ाच पानक पीलतर॑ आंगाला हिंस॑ वाटेल॑.
kharchखर्च.n.expenditure.पैसाच वेच.साळे उघडाच समय लेंकरांच पुस्तक घ्यालीं नव कापड शिवालीं खर्च जास्ति होईलम्हणून मी तलाम्हणून प्रतिवर्ष बारा महिनेच एक "रेकरिंग डेपोसिट अक्कौन्ट" बॉन्कांत॑ उघडणे आहे.
kharchखर्च.n.expend. use up.वापरून/उपयोग करून उणे होणे."मंडिसांभारभात जास्ति करनको म्हणून तुला मी तम्हाच सांगटलों. पाह, एवढ॑दनाच जेवण॑ झालांपिरीपणीं केलत्यांत॑ अर्ध खर्च होयनास्क॑ उरलाहे".
kharchvechखर्चवेच.n.expenditure in general. unspecified expenditure.वेच (अमुक कार्याला म्हणून नसाच॑).बाह्येरच गामाला जाताना खर्चवेचाला म्हणून प्रत्येक होऊन पैसे हातराखणेला ठींगणे चोक्कोट॑.
kharjoorखरजूर.n.dates.मरुभूमींत॑ वाढाच एक झाडाच फळ वाळलते खजूर पाहलतर॑ झुरळेस्क आहे म्हणून मझ॑ भाचा ते खायनाच खायना.खजूर in sm.
kharkaTखरकट॑.n.food left untasted in the main dish after eating a portion of it from another dish.भांडींत॑ उरलते उष्ट करनाते पदार्थ.हे काळाच पोरींस॑ खरकटाचीं उष्टेचीं व्यत्यासपणीं कळना.
kharkaTeeखरकटी.n.vessels used for cooking to be washed.संपाक केलांपिरी धुवामते भांडि.
khasखस.n.a type of grass whose fragrant roots are used for making screens to ward off summer heat.एक वर्गाच गौत (गवत). हेज मूळांतून कराच पर्दा उन्हाळांत॑ ऊन सांभाळाला उपयोग होते.
khaskhasaaखसखसा.n.poppy seeds (used in cooking).संपाकाला उपयोग कराच एक बींखसखसाच खीर पीलतर॑ मला घसाच कंड होईल॑.खसखस in sm.
khasthaTTeeखसतट्टी.n.screen made from khas roots.खसाच मूळांतून केलते तट्टी / पर्दा.मी गुलबर्गांत बॅकाच मॅनेजर म्हणून अस्ताना, ऊन्हाळाच चार महिनेहीं ऑफीसाच सगळ॑ खिड्कींतीन खस-तट्टी बांधून पाणी बडिवाच एर्पाड करूनटाकन॑. हेजमळे ऊन सांभाळणे मात्र नहो, दिवस पूरा काम करणार क्ळार्क /काष्यर असलते लोके ऑफीसांतच बस्तील॑ अणी तजमळे काम पणीन थोडक जास्ति होत होत॑ !
khathaa laagaNeखता-लागणे.vi.to rust.लोहेंच/लोखंडाच वर्च भागाला वार॑ पाणी लागून होयाच हानीसमुद्राच कांठशी असाच बिलडिंगांत/बांधणींत॑ खिड्कीच कांब, घरांतल लोखंडाच सामान पूर्त (कबोड, फ़्रिड्ज, ग्रैन्डर वगैरा) लोक्कर खता लागून नासते. गंजणे in sm.
khavaNeखवणे.vi.to cause allergic irritation/itching of the tongue/throat/skin etc due to contact with certain vegetables/leaves/cactus etc.कित्येक सूरण/पेरंडे/कवीठ हेजामळे कंड होणे कित्येक सूरण/पेरंडे/खवीट खायलतर तोंड/घसा खवल॑. ते एक विधाच "अलर्जी" म्हणूया.खवखवणे in sm.
khedखेद.n.regret. remorse.पश्चात्ताप. दुख॑.
kheDaaLooखेडाळू.adj.rustic (person, behaviour etc).खेडेगामाच॑ (मनुष, स्वभाव अस॑)"एम्यूसमेंट पार्कांत" येणार किती-किती खेडाळू लोक॑ ; चार-पांच वर्षाच पोरींना कोठ पह्जे तरीन मुताला बसिवतात॑.खेडूत/खेडाऊ/खेडोळ/खेडावळ/खेडाळ/खेडाळू/खेडवल/खेडवळ/खेडवाल/खेडवाळ in sm.
kheDeखेडे.n.village.ग्राम॑.अम्च देशाला स्वातंत्र मिळून साठ वर्षाच वर झालाहेतरीन अत्तापणीं पोणावांटा खेडेंत॑ शुद्ध केलते पीयाच पाणी मिळतनाही.
kheerखीर.n.a sweet thin porridge.एक गुळ्चीट पीयाच पदार्थ. पायसम.सणाच संपाक म्हण्जे खीर असूनच अस्त॑.
kheesaaखीसा.n.pocket.जेब.
kheLखेळ.n.game. play.खेळ. क्रीडा.
kheL-thamaaShaaखेळ-तमाषा.n.fun and frolic.मस्तीच खेळ.परीक्षाच वेळ येत आहे, खेळ-तमषा अग्गीन सरकिवून ठिवूनटाकून पुस्तक काढून वाचाला बैस अत्ता.
kheLivaNeखेळिवणे.vt.to make someone play.दूसरेंला खेळिवणे.खेळवणे/खेळविणे in sm.
kheLivaNeखेळिवणे.id.to make an ass of someone.वेगळांला बुद्दु करणे. तजबरोर बोलतानकी संपर्क ठींगतानकी दत्तन असाम॑. कां म्हण्जे, वेगळ्यांस॑ खेळिवाच स्वभाव तला आहे.
kheLkorखेळकोर.adj.playful.खेळ अणी विनोद स्वभावाच॑खेळकर in sm.
kheLNeखेळणे.vi.to play.खेळणे.दोन वर्षाचपुढे साय्ना नेहवाल बाडमिनटनांत॑ विश्वांत॑ दुसर॑ स्थानांत॑ होते. पण, गेल वर्षी ल्हान-ल्हान घावांमुळे त्यंच खेळण्यांत॑ थोड कम्मी पडले.
kheLNeखेळणे.n.toy.खेळाच सामग्री/सामान. बावोलि. भावोलि. कित्येक लेंकरांस॑ त्यंच खेलणे चूरपणीं मोडनास्क॑ दत्तन ठींगाच दंडक ल्हानपणांतूनच अस्त॑.
khepखेप॑.n.(this) time, occasion, instance, turn ,trip etc.हे वेळ. हे दपा. यंदा."हे खेप॑ मला पैसे द्याला सोड, अण्खीएक खेप॑ तू दे". (2) "हे खेप॑ अम्ही अमेरिकाला जाऊन सूनाच बाळांतपणे पाह्यींगतों, तुम्ही नंतर जांत॑"
khethखेत.n.farm.क्रिषि कराच भूमिखेत/शेत in sm.
khetheeखेती.n.agriculture.क्रिषि.खेती/शेती in sm.
khevखेव.n.a hidden scheme to cause mischief.लप्पून/गूढ होऊन कराच उपद्रव खोडीच उपाय॑.संपाकघराच मागच भाजीपाला अण्खी फूलाच झाडाला दिवसोडी आडांतून/आडांसून पाणी शेंदून घालाच काम मझ डोस्केवर ढकळाला मझ भाऊंडे केलते खेव मला थोडपणीं अवडल॑ नाही.
khiDkeeखिडकी.n.window.भिंतींत॑ वांरे-उजाड याला कराच एक व्यवस्था.(1) उजाड in DM means 'light' whereas it is उजेड in sm. (2) उजाड in sm means desolate, barren, uninhabited.
khiLaaखिळा.n.nail.आणि (tamil).भिंतींत॑ खिळा बडिवताना चुकून सुत्तील मझ॑ बोटाला नीट बडिवल॑ !
khiLeeखिळी.n.bolt. latch.कोंडी. तापा (tamil).रात्रीच वेळ खिडकीच खिळा कसकी उघडींगून चोर्टा घरांत॑ घूंसला.
khiLeeखिळी.n.a metal or wooden cross-bar for securing a door.कवाड दत्तन झांकून ठिवाला लोकुंडांतकी (लोखंडांतकी) लांकडांतकी केलते अडव॑-पट्टी.घरांत॑ चोर्टा पडलानंतर॑ अम्ही मागलेहीं पुढलेहीं कवाडाला लोहेच खिळी घाटलों.
khinDaarखिंडार॑.n.a small gap. a small crack.छेद.कित्येक ल्हान लेंकरे केम्हीन खिंडारांत॑ बोट घालतील॑. तथे किडू असाला संभव आहेतकरतां जाग्रतान॑ असाम॑.खिंडार in sm means "a large  breach, break, gap, or opening ; a lane or pass between fields" etc.
khisaaखिसा.n.a pocket in a shirt, pants etc.जेब. जोब.
khismisखिसमिस.n.raisins. dried grapes without pips.किसमिस. वाळलते द्राक्षे.साधारण म्हणून नित्य देवाच नैवेद्याला अम्ही खिसमिस अणी खडेसाखरे ठिवतों.
kho-khoखो-खो.n.name of a game.एक खेळाच नाव.
khobare~खोबर॑.n.dried copra.वाळलते नारळ॑. खोब्र॑. खोवर॑. कोवर॑. बुडबुडा.सोलनाते वाळलते नारळाच आंत॑ खोबर॑ "बुड-बुडा" अस॑ शब्द करा करतां तला "बुड-बुडा" म्हणूनपणीं सांगतों.
khobare~खोबर॑.n.coconut kernel.हिरव॑ नारळाच आंतल॑ पंढ्र॑ रंगाच पदार्थ. खोब्र॑. खोवर॑. कोवर॑इड्ळील्हीं सादा-दोसेल्हीं (धिरडेल्हीं) खोबरेच चट्णी तोळ्लावींगून (तोंडलाहींगून) खाल्लतर॑ बेष असल॑. खोबरे in sm.
khobre~खोब्र॑.n.dried copra.खोबर॑. खोवर॑. कोवर॑. वाळलते नारळ॑. बुडबुडा
khobre~खोब्र॑.n.coconut kernel.हिरव॑ नारळाच आंतल॑ पंढ्र॑ रंगाच पदार्थ. खोबर॑. कोवर॑
khoDeeखोडी.n.mischief. prank.चेष्टा. चिलमिष॑.साधारणहोवून बायका पोरींचपक्षा दादिगा पोरे जास्ति खोडी करतील॑.
khoDeekorखोडीकोर.adj.mischievous (person).सदा खोडी करणार.खोडकर in sm.
khojaaखोजा.n.eunuch.नपुंसक. दादिगांचीं बायकांचीं अवयव असाच लोके. अलि (tamil).
kholagaaखोलगा.n.a bin for storing grains.धान्य दत्तन ठींगाच थोर डब्बा.खोलगा ordinarily means a pit or a hollow or a cavity.
kholiखोलि.n.room.खोलि.गेल वार चेन्नैला एक वराडाला जाऊन अवस्था भोगून गेलों. वराडाच छत्रांत॑ मला मिळ्लते खोलींत॑ ए.सी. की फॅन की (फंका की) होत नाही, अणि तिकडल॑ विपरीत उन्हाळांत॑ तरपडून गेलों.
khonchaNeखोंचणे.vt.to pierce with a sharp end.टोंचणे.कोणावर केस चालतहोतकी तो एक दिवस न्यायादीशाला सूरी घेऊन खोंचूंटाकला अणी चुकून पळाला पाह्यला. झालतर तला धरले.
khonkaLaaखोंकळा.n.cough.घसांत होयाच उपद्रवामळे होयाच असुख. खोंकळा आलतर॑ दुसरेंस॑ तंटा होयनास्क॑ असाला अम्च तोंडासमोर एक रुमाल धरींगणे चोखोट॑.खोकला/खोखला in sm.
khonkaNeखोंकणे.vi.to cough.खोंकळा येणेओखद पीवूनपणीं खोंकणे राहीलनाहीतर॑ समच एक चोक्कोट डोक्टराचकड॑ (वैद्याचकड॑) जाऊन एक्स-रे काडींगणे चोखोट॑.खोकणे in sm.
khooNखूण.n.a mark of identity. बरोर कळींगाला सहाय कराच चिन्ह.
khoTaaखोटा.adj.counterfeit.नकली.सुमार पन्नास वर्षापुढे, म्हण्जे एकोणीसशे साठां मध्ये (1960 या मध्ये) कोयंबतूरांत झालते खोटा नोटाच खाणी ते काळाच एक थोर विशेष होत॑.
khovaaखोवा.n.a sweet preparation of milk thickened to a semi-solid state.कोवा. दूध घट्टि करून तय्यार कराच एक गुळ्चीट पदार्थ ;खवा in sm.
khovaNeखोवणे.vt.to insert. to tuck in.अटकिवून ठिवणे(1) तिज नणंदाला पाह्याला जायापुढे तिन॑ दोन मोळम फूल॑ घेऊन केसांत॑ खोयींगून गेली. (2) पूजाला बसाचपुढे कासोटा मागेपठीस बरोर खोयींगट्लाहेसका म्हणून पाह्यींगे.खोचणे/खोसणे in sm
khovareखोवर॑.n.dried copra.कोवर॑. खोबर॑. खोब्र॑. वाळलते नारळ॑. बुडबुडा.
khuLukhuLuखुळुखुळु.n.gargle.गुळु-गुळु. पोटांत॑ उतरिवनास्क॑ गळांत॑ पाणी लागिवणे.दोन दिवसांतसून मला घसाच कंड होतहोत॑. नंतर, मीठाच पाणी खुळुखुळ केलांपिरी थोडक॑ उण॑ झाल॑.
khuNaavaNeखुणावणे.vt.to indicate by a sign.खूण करून कळिवणे.दुकानांत मला एक 'डिसैनाच' रेशमाच लुगडे फार अवडल॑. मझकडे पैसे उणे पडल॑ म्हणून ते खुणावून वेगळ॑ ठिवाला सांगून आलें.
khunTeeखुंटी.n.a wooden peg (fixed to a wall) for hanging cloth, bags etc.कापड, पिशवी असलते अडकिवून लोंबिवाला भिंतींत॑ असाच एक कट्टाच साधन॑ल्हान ग्रामांत असणार त्यंच धोतर/धोती, लुगड॑, पेंन्ट-षर्ट तेवढीन भिंतीत॑ असाच एक खुंटींत अडकिवून ठिवतील॑.खुंटी/खुटी in sm.
khunTee varla~ kaavaLaaखुंटी व॑रल॑ कावळा.id.an idiom meaning "a person in a great hurry for everything"." अग्ग्यालीन (सग्ळ्यालीन) अवसर भोगाच मनुष", हे अर्थाच एक शब्दालंकार.The literal meaning being, "a crow on a peg".
khusheeखुशी.n.pleasure. delight.संतोष. आनंद.

No comments:

Post a Comment