Sunday, May 15, 2016

a (अ) 3 (arji to ayyo-kuyyo)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
arhathaaअर्हता.n.eligibility.योग्यता.अठ्रा वर्षाच वये झालत्यांस अम्च॑ देशांत मतदान कराला अर्हता आहे.
arjeeअर्जी .n.petition. humble requestभव्यांत॑ विचारणे. विनयांत॑ विचारणेभ्रष्टाचारामळे उद्योगांतून काढूनटाकलते ऐ.ए.एस अधिकारी त्यंच वर केलते अन्वेषण बरोर होत नाही अस सांगून, पुन्हा एकदा अन्वेषण करून न्याय विचारत एक अर्जी त्यंच मोठ॑ अधिकारीला, म्हण्जे, चीफ़ सेक्रटरीला देले.
arjeeअर्जी .n.a legal plaintन्यायकचेरीला द्याच अर्जी अम्च वकील बरोर वाद केल नाही-ते-करतां केस हरले. हे कारण सांगून कचेरीच निर्णय पुन्हा विचारणा करिवाला मी वेगळ॑ वकीलावाटी एक अर्जी द्याला योचना करत आहें.
arkअर्क.n.a decoction of coffee.कॉफीच पूडांतून काढलते रस. कॉफीच काढा.चिकोरी मिळिवलतर॑ कॉफीच अर्क अण्कीन थोड घट्टि होईल.
arkअर्क.n.a herbal decoction.वनस्पतीच काढा.आयुर्वेद औषद (ओखद) तय्यार कराच ठिकाणाच जवळ जातानच वनस्पतीच अर्काच चोखट घम्मग वास कळूनजाईल॑.
arkअर्क.n.essential oil or essence extracted from certain plants.कित्येक वनस्पतीच द्रव्य रूपाच सत्त॑ (सत्व).वनिलाच अर्क मिळिवलते दर्बूजाच मिल्क-षेकांत नंखर॑ मीठ घालून पीयाला बेष असल॑.
arkअर्क.n.a plant belonging to the sollow-wort or milk-weed family, रुई. रुईच झाड (हे झाडाच पान रथसप्तमीच दिवस कराच सणाच स्नानाला येते). हिंदु संप्रदयांत अर्का एक विशेष झाड म्हणून आहे. हेज पान रथसप्तमीच दिवसी आंघोळिला उपयोग करतात. तसच अर्क झाडाच काठीच मध्य भागांतल॑ पंढ्र रंगाच "पित्तांतून" केलते देवाच विग्रह फार विशेष म्हणतातthe leaves of which are used in the ritual bath taken on Rathasaptami day
arpaNaaअर्पणा.n.dedicationअर्पणात्यंच बाप अकस्मात मरले म्हणून "विश्व कप" क्रिकट खेळ लंडनांत॑ चालत असताना सचीन टेंडूळकर मुंबैला जामते पडले. अंतिम संस्कार झाल नंतर वापस येऊन खेळलत॑ पहिलच खेळांतच मारलते सेन्चुरी त्यंच बापाच नावाला अर्पणा करले.
arsaaअर्सा.n.mirrorअरसा. प्रतिबिंब/पडसावलि दिसाच काचबंडी पळिवताना रोडांत मागे याच ट्राफ़िक बरोर पाह्याला काराच आंत अर्सा असत॑.अरसा/आरसा/अरशी in sm.
arsaaअर्सा.n.spectaclesअरसा. अयनक. उपनेत्र. बरोर वाचाला/दिसाला उपयोग कराच काचसाधारण होऊन चाळीस वर्षाच वय झालवर वाचालीन लिव्हालीन अर्सा पह्जेस्क॑ अस्त॑.चष्मा in sm.
arsaaअर्सा.n.plain glassअरसा. नुस्त काच.मी काल॑ बागांत चालाला गेलतम्हा तिकडे खेळत होतते एक लेंकराच पांयेंत अर्सा रुचूनवेघून सूळांत तरपडत असाच पाह्यलों.काच in sm.
arthhअर्थ.n.meaning. आशय॑शब्द अथवा पदाच अर्थ द्याच ग्रंथाला शब्दकोश अथवा निघंटू म्हण्तात
arthh hoNeअर्थ होणे.vi.to understandसमजणेमी बोलच तला अर्थ होत नाही वाटते.
arthh kareengaNeअर्थ करींगणे.vt.to get to understand. to make sense ofबरोर योचना करींगट्लापिरी समजींगणे मी कसाला अस॑ बोलतों म्हणून अर्थ करींगट्ला नंतर॑ मला उत्तर दे
arthhabhed alankaarअर्थभेद अलंकार.n.metaphor.एकाला उद्देश करून सांगताना तजवर संबंध नसाच वेगळ॑ गोष्ट प्रयोग करणे.शब्दालंकारांत अर्थभेद अलंकार पणीन एक.
arthhshaasthra~अर्थशास्त्र.n.economicsधन अणी व्यापर व्यवसायाच शास्त्रअम्च प्रधानमंत्री श्री. मनमोहन सिंग अर्थशास्त्रांत॑ थोर पंडित म्हणून सांगातात॑.
aruNअरुण.n. the divine personification of the pre-dawn reddish glow in the eastern horizon, announcing the rising of the Sun godअरुणोदी सूर्य उदय होयाच पुढे पूर्वदिकांत प्रत्यक्ष होयाच तंबड रंग. भारतांत पाष्टे अरुण प्रत्यक्ष होयाच पह्यिलच ठिकाण ते आहे म्हणून अरुणाचलप्रदेशाला ते नाव ठिवले. हे एक उपदेवता म्हणून संकल्प आहे.
aruNअरुण.n.charioteer of Sun godसूर्यदेवाच सारथीसूर्यदेवाच सात घोडाच रथ पळिवाच अरुण, कष्यप ऋषीचीन विनिताचीन लोंक म्हणून विश्वास आहे.
arundhatheeअरुंधती.n.name of a star in the constellation of Ursa Major.सप्तऋषी नक्षत्रसमूहांतल॑ एक नक्षत्राच नाव. सप्तऋषी नक्षत्रसमूहांतल॑ जोडीनक्षत्रांत एकाच नाव अरुंधती अणी दुसरेच नाव वसिष्ट आहे. अरुंधती and वसिष्ट corresponds to the binary stars of Alcor and Mizar of the constallation of Ursa Major, the Big Dipper. The specialty of this binary system is that both the stars revolve around each other, unlike a normal binary where one star revolves around the other. Thus the emphasis in the अरुंधती and वसिष्ट binary is the equal importance of each spouse in a wedlock.
arundhatheeअरुंधती.n.wife of Sage Vasishta.वसिष्टऋषीच पत्नी. (1) अरुंधती अणी वसिष्टऋषी हे दोघीन एक उत्तम जोडीच उदाहरण आहेत म्हणून वराड झालते दंपतींला अरुंधती नक्षत्र दाखिवणे आहे. (2) साधरणहोऊन जोडीनक्षत्रांत॑ एक नक्षत्र अण्कीएक नक्षत्राला प्रदक्षिणा करल॑, पण अरुंधती-वसिष्ट जोडीनक्षत्रांत दोन नक्षत्रहीं एकालेल प्रदक्षिणा करते म्हणून ते एक उत्तम जोडी म्हणून हिंदू संप्रदायांत विश्वास करतों.
aruNodaya~अरुणोदय.n.the time of sun riseसूर्योदयाच वेळशेतींत काम करणार कुणबी, नांगरणार असलतेनी अग्गीन अरुणोदयाच वेळी कामाला जातील॑.
aruNodiअरुणोदि.n.day-break. dawn. early in the morningअरुण उदय होयाच वेळ. दुस्तपारि.अरुणोदि उठून दंडक झालते लोकांला उशीर होऊन उठाच लोकांना पाह्यलतर उणीवता/चिरढे/एळक्कारम अस्ते
asa~अस॑.adv.in this manner. thus.हे प्रकारतू मझकडे अस॑ बोल नोको, मर्यादा देऊन बोल॑.असा/अशी in sm.
asa~अस॑.adj.of this type.हे मादरीच॑. असल॑. असलते. हे प्रकारच॑. मी दाखिवाच लुगडे सारख॑ मिळ्ळ॑ नाहीतरीन परवा नाही, अस॑ असाच कोण्त मिळतेकी ते आण.
asa~ thasa~अस॑-तस॑.adj.so-so. of nothing specialसुमार. साधारण॑ फार बेष आहे, नव॑ डिसैनाच आहे अस॑ म्हणून तिन॑ दीड लाख रुपे देऊन घेट्लते नव सोनेच माळ मला दाखिवली. मला कायकी ते अवडल॑ नाही, अस॑तस॑ आहे. असातसा in sm.
asa~ thasa~अस॑-तस॑.adv.by hook or by crook. somehow or the otherकसतरीं. कसकी. चुकून-माकूनतो वाचणांत॑ षाणा काहीं न्हो. अस॑-तस॑ एस.एस.एल.सी संपीवलतेच/जिंतलतेच एक थोर कार्य म्हणून सांगुया.असातसा in sm.
asaadhaaraNa~असाधारण॑.adj.rare. uncommon. extraordinaryउदंड अप्रूप. फार अप्रूपतो एक असाधारण बुद्धीवंत॑. तज पूरा वाचणे स्कोळर्षिपांतेच झाल॑
asaadhya~असाध्य.adj.that which is impossible to attain or getसाध्य होयनातेतू बरोर प्रयत्न केल नाहीतर॑ तुला ते काम मिळणे असाध्य होईल
asaamaanya~असामान्य.adj.extraordinaryफार विशेषाच॑. असाधारणइषोबशास्त्रांत॑ रामानुजन एक असामान्य मनुष होते
asabhya~असभ्य.n.indecent. vulgarअसभ्यपूरा रात्री घरच समोरल॑ बीदींत॑ दोन पीकोरांच (पीखोरांच) असभ्य गोष्ट ऐकून मला कंटाळा वाटल॑.
asabhya~ bhaaShaaअसभ्य भाषा.n.slangअसंस्कृत गोष्टअक्रावा शतकांत कश्मीर देशांत सोमदेवकवी संस्कृतांत कथासरितसागरा रचना करले. हे महाग्रंथांत असाच अनेक कथा सातवा शतकांत पैशाची म्हणाच एक असभ्य भाषांत गुणाध्या लिव्हलते बृहतकथांतून काढलते म्हणून पंडितलोक सांगतात.
asalअसल.adj. original. genuineमूल रूपाच. यथार्थ रूपाच॑. बाज़ारांत॑ नकलि ओखद विकणे सर्वसाधारण॑ झालाहे तेकरतां असलि ओखद विकाच दुकान कळींगून ठिवणे चोखोट॑.
asala~असल॑.adj.of this type or kind.हे मादरीच॑. हे प्रकारच॑. असलते यंदा तू घेईंगून आणलते अंबा बेष होत॑. इथपर असलतेच आण.
asala~ asala~असल॑-असल॑.adj.etcetera. etc. हेच सार्ख अण्खीन वेगळ॑-वेगळ॑मी सांगिट्लते तुला बरोर समजल नाहीतर॑ मी दाखिवाच लुगडे पाह अणी ते दुकानांत असल॑-असल॑ वेगळ॑ कित्ती असलतरीन आण.
asala~ thasala~असल॑-तसल॑.adj.of one type or the other.एक मादरीच, नाही अण्कीएक मादरीच॑. एक रीतीच, नाही अण्कीएक रीतीच॑. एक विधाच॑, नाही अण्कीएक विधाच॑. तू सिंगपूराला जाऊन येताना मी विचारलते मोबैल-फोणच आणाम॑, ते मिळ्ळ॑ नाही म्हणून असल॑-तसल॑ काहीं आण नोको.
asalaask asoonअसलास्क॑-असून (adv)without any prior hint. all of a suddenअकस्मात. पुढे काहीं कळिवनास्क॑. तला मनाच प्रश्न काहीं न्होत तरीन असलास्क॑-असून वेड॑ धरले अस मी ऐकलों
asamaadhaanअसमाधान॑.n.discontentसमाधान नसणेपैसेच वेड असणारांला ते कित्ती असलतरीन मनाला समाधान॑ असना, म्हण्जे सदा तेनि/त्यनि असमाधानांतच अस्तील॑.
asamaadhaanअसमाधान॑.n.displeasureसंतोष नसणेअम्ही समुदायांत॑ वागताना कित्येकदा अम्हाला इष्ट नाहीते काही तरीन होईलच॑. तसल॑ वेळ अम्च असमाधान॑ व्यक्त कराच पुढे बरोर योचना करणे चोखोट
asanaaskअसनास्क॑.adv. (as if) not existing or prevailingन असूनकाहीन असनास्क॑ अस्तानाच तो एवढे पैसवंत म्हणून सांगींगतो. खरेच असलतर काय करलकी ?
asaNeअसणे.vi.to beअसणे(1) एक गुंप होऊन बाह्येर गामाला जाताना त्यंच-त्यंच सामानाच वर गवन असणे चोखोट. (2) तुम्ही षाणे/शाणे असूया. पण, तो एक ढेंग म्हणून सांगून तला अवमान कराच आवश्य न्होत॑.
asaNeअसणे.vi.to existअसणेगुळ्चीट अंबाचांत॑ कीडा असणे साधरणच॑
asaNeअसणे.vi.to stay. to resideराहणेतुम्ही अम्च गांवांला(गामाला) येतांत॑ अस॑ मला कळ्ळ॑. कोठ॑ असतांत॑ म्हणून मला कळिवलतर॑ मी तुम्हाला येऊन पाह्तों.
asaNeअसणे.vi.to remain. to retain(बाकी) उरणे. (बाकी) ठिवणेआजच॑ खर्च सोडून, हातराखणाला पांचशे रुपे असणे चोखोट.
asaTअसट.adj.dilute. thinअस्सट. नित्तळडांगर कालिवताना बरोरल॑ घट्टी असनास्क॑ असट होऊनगेलतर॑ तज रूच हाळ होईल.
asaT bhaajeeअसटभाजी.n.gravy curryनित्तल भाजीअम्ही मुगळाई पदार्थ विकाच होटलाला जाताना दोन घट्टिभाजी अणी एक असटभाजी विचारून घेतों.
asathya~असत्य.n.falsehood. lieलटक॑असत्य बोलणारांस पाह्यलतर॑ मला अवडनाच अवडना.
asathya~असत्य.n.unrealमायाश्री मध्वाचार्यांच द्वैत॑ सिद्धांताप्रकार हे ब्रह्मांड॑ एक असत्य अथवा माया न्हो, पण ते एक सत्य आहे
asgeenअस्गीन.pron.everything. allअस्कीन. अग्गीन. सग्ळीन. पूराहींयंदा अम्च॑ घरच॑ अंबाच झाडांत सुमार दोनशें अंबा मिळ्ळ॑. त्यांत पोणावांटाहीं मठाला देऊनटाकून उरलते अस्गीन कापून लोणचे घालूनटाकलों. Please see remarks against असकीन.
ashleelअश्लील.adj.obsceneकामभोग असभ्यास्क दाखिवणेकित्येक टी.वी कार्यक्रम एवढे अश्लील अस्त॑ म्हण्जे, तसलते अस्कीन पूरा "सेन्सर" करणेच चोखोट
ashokअशोक.n.ashoka treeएक झाडाच नावलंकापुरींत रावणासुर सीतादेवीला अशोक वनांत कैद करून ठिवल्होता.
ashokअशोक.adj.cheerfulसंतोष. शोक नसणेअशोक हे शब्दाच अर्थ "शोक नाहीत॑" म्हणून कळनास्कच भरून लोक त्यंच लेंकरांच नाव अशोक म्हणून ठिवींगतात॑ !
ashrddhaaअश्रद्धा.n.inattentiveअलक्ष्य. श्रद्धा दाखिवनातेकोण्तीन एक विषय बरोर मनांत॑ अर्थ होम म्हणजे ते ऐकताना/वाचताना अश्रद्धांत॑ अस्ताने
aShTअष्ट.adj. eightआठहिंदू संप्रदायाच अनुसार आठ दिशा (दिक्) आहे अणी हे अष्ट दिशालीन दिक्पालक असतात.
aShTameeअष्टमी.n.eighth day of each lunar fortnightसप्रत्येक पक्षांतल॑ आठवां दिवसएक एक पक्षांतीन नवमीच पुढे अष्टमी येत॑.
ashubhअशुभ.adj.inauspiciousशुभ नाहीतेदुर्योधनाच जन्म एक अशुभ वेळांत॑ झाल॑ म्हणतात॑
ashubhअशुभ.adj.bad omenअशुभ चिन्ह. अशुभ शकुन॑घर सोडून बाहेर जाताना एक ब्राह्मण समोर आलतर ते एक अशुभ शकुन आहे अस म्हणणे आहे
ashuddhअशुद्ध.adj.pollutedशुद्ध नाहीते. मळक॑ नदींच बाजू असाच पट्णांचीं गांवांचीं मोरींत्सून याच मळक॑/घाणक॑ पाणी नदींत॑ मिळून देशाच सर्व नदीईं अशुद्ध झालाहे.
ashuddhअशुद्ध.adj.impureशुद्ध नाहीतेसोळावा शतक पर्यंतीन हे दोनाच मध्ये व्यत्यास काहीं न्होते तरीन, सत्रावा शतकाच नंतर॑ तंजाऊर मराठी अणी पुणे मराठी वेगळ॑ वेगळ॑ गतींत पुढे गेल॑. असूनीं, लोकांच मनांत तंजावूर मराठी पूणे मराठीच एक अशुद्ध रूप आहे अस एक चूक अभिप्राय आहे.
ashvअश्व.n.horseघोडाअश्व रूप हयग्रीव महाविष्णू श्री वादिराजतीर्थाकडून प्रसाद घेऊन खाल्ले म्हणून मध्व परंपराच लोके विश्वास करतात॑.
ashvagandhaaअश्वगंधा.n.a plant with medicinal propertiesएक औषधाच झाडाच नावअश्वगंधा झाडाच वाळिवलते मूळाच पूडांतून आयुर्वेद औषध (ओखद) करणे आहे.
ashvamedhअश्वमेध॑.n.horse-sacrificeघोडाला बलि देवून कराच एक यज्ञाच नावजुने काळांत भरतवर्षांत अश्वमेध यज्ञ प्राबल्यांत होते अणी महाभारत युद्धाच नंतर॑ पांडव हे यज्ञ करलते सांगिट्लाहे.
ashvathhअश्वथ.n.pipal treeपिपळ झाडहिंदू धर्म संप्रदायांत अशथ वृक्षाला एक महत्व स्थान आहे.
ashvineeअश्विनी.n.name of a starएक नक्षत्राच नावज्योतिषशास्त्रांतल॑ सत्तावीस नक्षत्रांत पहिलच नक्षत्र.
askeenअस्कीन.pron.everything. allअस्गीन. अग्गीन. सग्ळीन. पूराहीं. हे खोली अत्ताच खाली करून देम॑. आंत असाच सामान अस्कीन काढून बाहेर ठिवा. अस्कीन appears to be compound word of अस॑ and अग्गीन morphed to अस्कीन; अस॑+अग्गीन = अस्गीन or अस्कीन.
asoo*असूं.n.tear dropsआंसूं. डोळेंतून गळाच पाणी.(1) तीन दिवसापसून मझ॑ उजव॑ डोळे तंबड॑ होऊन असूं गळत आहे, डोळे-डॉक्टराला दाखिवालापणीन मला वेळ नाही. (2) अग्गिदनांसीन होयास्क॑ मझ॑ बहिणीला (बहीणाला) कांदा चिरताना डोळेंतून असूं येईना. अश्रू in sm.
asooyaaअसूया.n.envy. jealousyदुसरांच सुख॑, संतोष पाव्हून मनाला कष्ट वाटणे. पोटजाळदुसरेंला पाव्हून असूया वाटाचपक्षा, अम्हालीन संतोष, सुख॑ हे सग्ळीन बरोरल॑ वाटांत॑ कस मिळूया हे योचना कराच॑ एक सात्विक गुण आहे.
asoukarya~असौकर्य.adj.inconvenience(कराला) सौकर्य नसाच॑मला कोयंबत्तूरला अवसरान॑ जाम॑. मी गांवांत॑ नसताना मला एक दोन कागद येऊया. तुम्हाला असौकर्य नाहीतर ते घेऊन ठिवाला होईलका ?
aspaShTअस्पष्ट.adj.unclearस्पष्ट नाहीते. अव्यक्त. व्यक्त नाहीतेपरालिटिक स्ट्रोक झाल नंतर त्यंच बोली फार अस्पष्ट झालाहे
asthamana~अस्तमन॑.n.setting (of Sun, Moon or stars)(सूर्याच॑/चंद्राच॑/नक्षत्राच॑) अस्तमानबीदीच दिवा नसताना सूर्याच अस्तमन॑ झालांपिरी बाहेर हिंडणे अपाय आहेअस्तमान/अस्त in sm.
asthhiअस्थि.n.boneहड॑कोटानकोटी वर्षाच पुढे भूलोकांत जीवांत होतते डैनॅसरांच अस्थि मातीच आंत तेवढ॑ वर्षीन झांकून असून कालभेदामळे फॉसिल होत॑, अस॑ जीवशास्त्रज्ञ सांगतात॑.
asthhiअस्थि.n.residual bones and ashes after cremationशवसंस्कार करून उरलते चिताभस्म॑.शवसंस्काराच नंतर॑ स्मशानाला (श्मशानाला) जाऊन पुढच॑ कार्यक्रमाला अस्थि वेंचून काढणे आहे.
asthhivisarjanअस्थिविसर्जन.n.disposing of the remains of cremation ashes in sea or river.शवसंस्काराच नंतर॑ अस्थि समुद्र अथवा नदींत मिळिवणे.बंगळूरांत असणार लोक॑ साधरण होऊन श्रीरंगपटणांत कावेरी नदींत॑ अस्थिविसर्जन कराला जातात॑.
asthivaarअस्तिवार.n.foundationपायाघर अथवा एक बांधणी घट्टि असामम्हणजे तज अस्तिवार बरोर असाम॑
asthra~अस्त्र.n.arrowबाण॑. धनुषांतूं सोडाच आयुध.महाभारत, रामायण असलते पुराणांत ब्रह्मास्त्राला सगळ्याचीन पक्षा शक्तिशाली अस्त्र म्हणून सांगिट्लाहे.
asukhअसुख.n.(mental or physical) discomfort or distressआंगाच अथवा मनाच कष्ट(1) तुम्च कुटुंबाला एवढे दिवस फार कष्ट सोसामते पडलेम्हणून ऐकलों. तुम्ही अण्खी तुम्च कुटुंब हे असुखांतून लोक्कर सु्टलतर अम्ही अस्किदनालीन उदंड संतोष वाटेल॑.(2) चार दिवसापसून पंतोजि साळेला आल॑ नाहीते. विचारताना, तेनि असुख होऊन हॉसपिटलांत॑ आहेत म्हणून कळ्ले.
asurअसुर.n.demonराक्षसपह्यिल॑ पह्यिल॑, म्हणजे ऋगवेदाच काळाच आरंभांत असुर म्हणजे "देव" हे अर्थ होत॑. पण जातां जातां ते अर्थ बदलून "राक्षस" म्हणून झाले.
asvasthhअस्वस्थ.adj.restless. ill at easeअशांत॑तीन महिनापसून तला मनांत॑ गोंधळ होत असाच मी पाह्त आहें. मनाच अस्वस्थतामळे रात्री झोंप येत नाही म्हणून झोंपीच मात्रा घेत असाच काल पाह्तम्हा तो मला सांगिट्ला.
asvijaअस्विज॑.n.seventh month of Saka yearहिंदु पंचांगांत॑ सातवां महिनाहिंदू पंचांगांत॑ सातवां महिना. uis नवरात्रीच सण अस्विज महिनांत येत॑.
aTakaLaNeअटकळणे.vi.to stumble. to trip overपांय अडकून लंबडून (लवंडून) पडणेमझ बहिणी मैसूरांत बांधाच नव घर पाह्याला अम्ही गेल वार तिकडे गेल्होतों. घराच आंत वेघताना उंबरेंत बांधून ठिवलते अडव काठी पाह्यनास्क॑ मी अटकळून पडलों.अडकळणे/अडखळणे/अडखुळणे in sm.
aTakaNeअटकणे.vi.to get snagged (in a nail or hook etc.).(आणींत॑ वगैर॑) सांपडिंगणेवाळिवाच दोरींतून वाळलते कापड॑ काढताना कांबाच कोनेंत अटकून मझ एक अंगी फाटले. in a nail, hook etc. खिळांत वगैरा.
aTaNeअटणे.vt.to boil to a thick consistancy.अडणे. ताऊन उणे होणेदूधपेढा करताना दूधाच अटणे बरोर गवनांत ठीवींगाम॑, कां म्हणजे, जास्ती अटलतर॑ दूधपेढा करपून जाईल.
aTHavaNअठवण.n.remembrance. recollection.सयेंत होण॑.गेल वर्ष बालीला जाऊन आलास्की, तिकडे काय काय पाह्यलास म्हणून अठवण असलतर॑ तजव॑र एक ल्हान पुस्तक लिव्हशीलका तू ?
aTHavaNeअठवणे.vi.to come to mind. to remember. to recollectसयेंत याच॑ विषयगेल वर्ष बालीला जाऊन आलास्की, तिकडे काय काय पाह्यलास म्हणून तुझ मनांत अठवणे आलतर॑ तजव॑र एक ल्हान पुस्तक लिव्हशीलका तू ?
aTHeengaNeअठींगणे.vt.to recollect. to ruminateयोचना करणे. सुचींगणे. सये करींगणे(1) अमचेच चूकामुळे हातांतून पैसा गेलते विषय अठींगून प्रयोजन नाही. (2) दोन दिवसापुढे तिज नव बावोली हरपलापासून (पसून) अत्तापर्यंतीं ते ल्हान पोरी तेच अठींगून-अठींगून रडत आहे
aTHeengaNeअठींगणे.vi.to suggest to oneselfअपाप मनांत॑ सांगींगणेअम्च लोंक अमेरिकांत॑ वाचत आहे. अठींगलास्क॑ समच बांगळूराला पळून याला होयना
athhavaaअथवा.conj.or(हे) नाहीतर (ते)मझ घर चोखोट मोलांत॑ घ्याल एकले तय्यार होते. पण, विकामका अथवा विकणे नकोका म्हणून मी योचना करत आहें.
athiअति.adv.extremeउजंड. उदंड. दंड. फार. पैसाच मोह अति झाल तर जीवनांत॑ वेगळ॑ कसाच वरीन मन्न राहिना
athishayअतिशय.adj.wondrously excessiveफार विचित्राचराजा हरिशचंद्र सत्यनिष्टाचवर दाखिवलते अगाध साधना अतिशयच म्हणून सांगूया
athishayअतिशय.adj.amazing. fantasticअतिशयक्रिकेटांत॑ सचिन टेन्डूळकर मारलते रन्सीं तेनि मारलते सेंचुरीच संख्याईं पाहिलतर त्यंच प्रदर्शन॑ एक अतिशय कार्य म्हणून सांगणांत चूक काहीं नाही
athithheeअतिथी.n. guestघराला आलते लोकेअम्च घरांत॑ अतिथीला म्हणून एक प्रत्येक खोलि केम्हाईन तयार होऊन अस्ते.
athithheesewaaअतिथीसेवा.n.serving the guest.अतिथीला सेवा करणे.अतिथीसेवांत॑ अमच देश वेगळ॑ कोण्त॑ देशाचीं मागे नाही.
athivriShTeeअतिवृष्टी.n.delugeमोट्ठ॑ पाऊस. रिचिवाच पाऊसहे वर्ष डोंगूर प्रदेशांत॑ अतिवृष्टी होऊन नदीच पाणी गांवांच भोंताले असाच जमीन पूरा बुडिवले.
athivriShTeeअतिवृष्टी.fig.excess of a thing (beyond normal requirements).आवश्यापक्षा उदंड जास्ती (होणे).साधारण म्हणूनच मला दुसरेंला सहाय कराच बुद्ध नाहीतामुळे दुसरेपणीं मला सहाय कराला येत नाहीते. पण, कित्येकदा कोणतरीन मला सहाय कराला आरंभ करतानच॑ "तो एक शोंबेरि. एवढे केलते पुरे. अतिवृष्टी दाखिवाच आवश्य काहीं नाही" अस सांगतात.
athivriShTee - anaavriShTeeअतिवृष्टी-अनावृष्टी.fig.either too much or too littleउदंड जास्ती नाहीतर उदंड उणेफार लोक त्यंच जीवन बरोर चालत अस्तान देवाच पटाला नमस्कार पणीं करनाते. हेनीच कष्ट काळ आलतर, नित्य देऊळ-गोपूर म्हणून हिंडतील. असलते स्वभावाला अतिवृष्टी-अनावृष्टीच स्वभाव म्हणून सांगणे आहे.
aTHraaअठ्रा.n.eighteenसत्राच नंतरल॑ संख्याअठ्रा वर्षाच वये झालत्यांस अम्च॑ देशांत मतदान कराला अर्हता आहे.अठरा in sm.
athruptha~अतृप्त॑.adj.unsatisfied.तृप्त झाल नाहीते.गांवाला नव आलते सरकारी अधिकारीच वागणे अम्हाला अवडल नाही. अम्च अतृप्त त्यांस॑ कळिवाला जातों.
athruptheeअतृप्ती.n.dissatisfactionसंतोष झालनाहीते. असंतोष. असमाधान॑तज वागणे थोडकपणीन बरोर नाही म्हणून मझ॑ अतृप्ती स्पष्ट होऊन कळिवून पणीन तो सुधारला नाही.
aththaaअत्ता.adv.nowहे वेळ॑"मागच पुढेच॑ (नंतरच) विषय चर्चा करून प्रयोजन नाही. अत्ता काय करूया. हे सांगा."आता in sm.
aththaa aggeenअत्ता-अग्गीन.adv.nowadaysअत्ता-अस्गीन. अत्ता होत असाच काळअता अग्गीन जुने काळास्क॑ न्हो. चुकून पणीं कोणाविषीं काहीं बोलाल नाही
aththaa-atthaaअत्ता-अत्ता.adv.recently. just nowथोड दिवसाच/वेळा्च पुढ॑अम्च गांवांत॑ अत्ता-अत्ता नव होऊन आरंभ केलते बॅन्क कृषी अण्खी ल्हान उद्योगाला राण देतात अस मला कळ्ळे.
aththaa-atthaaअत्ता-अत्ता.adv.nowadaysअत्ताअग्गीन. अलीकडे थोड दिवसकाळ एवढे मोस॑ झालाहे, म्हण्जे, अत्ता-अत्ता कोणालीं विसंबाला नाही (पातेद्यालच नाही)
aththaachअत्ताच॑.adv.now itself. just nowअत्तास. समेच. सवेच. हे वेळांतेचते ल्हान पोरी हट्ट करून रडत बसल होती (बसल्होती). काय झाल॑ म्हणून विचारताना "मला ते बावोली अत्ताच पह्जे" अस कुंथत कुंथत सांगट्ली.
aththaasअत्तास॑.adv.now itself.हे वेळांतच. अत्ताच. समेच. सवेच. बेकरी दुकानांतून घेईंगून आणलते केक अत्तास खाऊन संपीव नोको, सायंकाळी अम्च॑ घराला येणार लोकां करतां आणून ठिवलोहें ते.
aththarअत्तर.n.a type of perfumeएक चोखोट वासाच द्रव्यअत्तर म्हणून अडनावाच एकले मझ॑ बरोर ऑफीसांत काम करत होते. विचारताना कळ्ळ॑, त्यंच पूर्वज अत्तर उत्पादन करून विकत होते अणी तजमळे त्यांस हे अडनाव आल॑ म्हणून.
aththasaalaaअत्तसाला.adv.for the time being.अत्तशाला. हे वेळेला मात्र. सध्याला. तुम्ही करत असाच काम अत्तसाला पुरे. राह्त॑ करा. नंतर पुन्हा आरंभ करूया.
aththashaalaaअत्तशाला.adv.for the time beingअत्तसाला. हे वेळेला मात्र. सध्याला. आवश्य नाहीस्क॑ पैसा वेच कर नोको. अत्तशाला पन्नास रुपे खर्च करलतर॑ पुरे.
athyaaअत्या.n.father's sisterबापाच बहीण॑. बापाच बहिणी मला दोन अत्यालोक आहेत. एक मझ बापापक्षा वडील, दुसरे त्यंचपक्षा धक्टेआत/आते/ आत्या in sm.
athyaagrha~अत्याग्रह॑.n.excessive desire. greedअति आग्रह॑. आवश्याचपक्षा जास्ती आग्रहमनाला नियंत्रण॑ नाहीस्क॑ एकाच वर अत्याग्रह दाखिवणे चोक्कोट नहो.
athyaavashya~अत्यावश्य.adj.essentialअति अवश्य. मुख्य होऊन पह्जते (पज्जते).अमेरिकाला जाताना "एरोप्ळेनांत॑" एक-एकदनालीं एक "सूटकेसांत॑" बावीस किलोच सामान मात्र घेऊन जायाला सोडतात॑. ते करतां "सूटकेसांत॑" अत्यावश्याच सामान मात्र काढींगून जाम॑.
athyanthअत्यंत॑.adj.exceedinglyदंड. उदंड॑. उजंड॑. फार. अपार. गांवाच लोक बोलाल गेलतर॑ हे नव अधिकारीला थोड पणीं क्षमा नाही. तेनी अत्यंत॑ रागिष्ट मनुष दिसतात॑.
athyutthama~अत्युत्तम॑.adj.perfect. idealफार योग्य असाच॑न्याय कचेरीच जड्ज निष्पक्ष स्वभावाच अत्युत्तम उदाहरणाच मनुष असाम॑
aTopaNeअटोपणे.vi.to contain.भाग होऊन असणे. हिंदू धर्माच सगळ॑ मूलशास्त्र ग्रंथहीं ॐ म्हणाच ओंकार नादांत अटोपून आहे म्हणून विश्वास.
aTopaNeअटोपणे.vt.to wind upसंपिवणेमुंजीच छत्रांतून तेवढीन अटोपींगून येताना दुपारा चार घंटे झाल॑आटोपणे/आटपणे/आठोपणे in sm.
aTopaNeअटोपणे.vt.to controlनियंत्रण॑ करणेवराडाच वेच दहा लाखांत अटोपुया म्हणून मला वाटते
aTopaNeअटोपणे.vt.to put up withसोसणेमी तीर्थ-प्रसाद घ्याला मठाला घेल्होतों. उदंड (उजंड) वेळ झाल॑. मला भूक अटोपींगाला झाल नाही.
aTopaNeअटोपणे.vt.to restrainनियंत्रणाच आंत॑ ठिवणेतो वेडाला उदंड आवेश येऊन कोणाल तरीन माराचपुढे कोण तरीन तला अटोपिवांत॑
aTTaaअट्टा.n.card board.जाड कागद. रट्ट.नाजूक साधन अट्टाच डब्बांत जोडून ठिवताना मध्ये मध्ये फेविकॉल ठिवून जोडलतर चोखोट.
aTTahaasअट्टहास.n.boisterous and uncontrolled behaviourउदंड॑ वरडत गलाटा करणेवेगळ॑ लेंकरांच अट्टहास पाह्ताना अम्च लोंक फारच साधू म्हणून सांगूया.
aTTahaasअट्टहास.n.violent laughterवेड॑ हांसणेजुने काळाच "मायाबज़ार" सिनिमांत॑ घटोत्कच सांगाच एक गाणे अत्तापणीं अठींगटलतर मनाला कुशी वाटते. ते गाणेंत॑ घटोत्कच कराच अट्टहास ऐकाला बेष/बेश अस्ते
avaDअवड.n.likeइष्ट. इच्छा(1) तुला तज बरोर जायाला अवडल तर जा, अवडल नाहीतर जाणे नको. (2) आज करलते खीर फार बेष/बेश होते. लेंकरे अस्कीन अवडींगून खाले.आवड in sm.
avaDaNeअवडणे.vi.to likeइष्ट वाटणे. इष्ट होणेइथपर (इत्तिपर) मला काय अवडते, हे पाव्हून एक प्रयोजनीं नाही. तुला काय अवडतेकी तेच करत जा.आवडणे in sm.
avadhoothअवधूत.n.one who has no earthly attachmentsवैरागि. बैरागि. भूलोकाच विषय सोडलते संतअवधूत संप्रदायांत शिरडी साई बाबा एक महान होते.
avadhooth (fig)अवधूत.adj.irresponsible personजवाबदारी सोडून बसलते व्यक्ती.तो अत्ता-अत्ता सन्यास घेटला अस ऐकून मला आश्चर्य काहीं झाल नाही. कुटुंबाच जवाबदारी सांभाळणे/समाळणे तला एक मोठ॑ प्रयास म्हणून अस्किदनालीन कळल॑. नुस्त अवधूतास्क॑ हिंडणेच तला इष्ट.
avagaNanaaअवगणना.n.disregard bordering on disrespectमर्यादा देनास्क॑ परवा करनास्क॑ असणेपाकिस्थानाच राष्ट्रपती तिकडल॑ प्रधान॑ नागरीक होऊनपणीन ते राज्याला संबंध झालते मुख्य निर्णय सग्ळीन तिकडल॑ सेनाप्रमुख, राष्ट्रपतीला अवगणना करून काढतात अस सर्वानीं कळ्ळतेच.
avagaNanaaअवगणना.n.neglectकाहीन करनास्क॑ सोडूनटाकणे. लेंकरांच वाचणे अवगणना करलतर तेनी थोरळे होताना चोखोट उद्योग मिळाला कष्टी भोगतील॑.
avaghaDअवघड.adj.wastrel. a lazy person who wastes time or moneyएक कासालीं प्रयोजन नाहीत मनुषल्हानपणांत तज बाप-माय तला बरोर पाह्यींगट्ले नाही-ते-करतां अत्ता तो एक अवघड झालाहे.
avaghaDअवघड.adj.boorish and illmanneredमूर्खपणाच॑मझ॑ घरच दुसर॑ माडी अत्ता-अत्ता खाली झालाहे. भाडेला अवघड मनुष कोणीं येताने अस मी देवाला दिवसोडि प्रार्थना करतोंहें.
avaghaDअवघड.adj.complicated and problematicगुंतागुंतीच॑ (प्रश्न॑) (1) त्रिणमूल कांग्रस पार्टी अणी पश्चिम बंगाळाच कम्यूणिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट) हे दोनीन "माओ" प्रश्नाच मध्ये पडून ते अण्खीन अवधड स्थितीला घेऊन गेलाहेत॑. (2) स्वातंत्र्य मिळाल नंतर॑ केंद्र सरकार "ट्रैबल", म्हण्जे, आदिवासींच सामूहिक उद्धार हेज वर ध्यान बरोर देल नाहीतेकारणामळे देशाच मध्य भागांत॑ कम्यूणिस्ट पार्टी (माओ) यांच प्रश्न एक अवधड स्थितींत॑ जावून पावलाहे.
avakaashअवकाश.n.scope or right to doअवकाशभारताच राष्ट्रपति देशाच प्रथम नागरीक झालतरीन विधानसभाच शिपारीश/संम्मत नाहीस्क॑ नव नियम कराच अवकाश त्यांस नाही.
avaLaaअवळा.n.gooseberry.अंबट रूचाच एक फळ अवळा, अल॑, पाला असलते पदार्थ अयितवार (आदित्यवार) संपाकांत मिळिवणे की खाणे की श्रेष्ट नहो अस॑ म्हणणे आहे.आवळा in sm.
avaLaa ghaaloon beL thoDaaNeअवळा घालून बेल तोडणे.prov."to use a small fish to catch a big fish". to take small initiatives to achieve big results.उणे श्रमांत॑ थोर काम हेणे.पाकिस्थानाला भारताच बरोर समोर-समोर युद्ध कराला शक्ती नाही म्हणून आतंगवादींला सोडून अम्हाला उपद्रव कराच, अवळा घालून बेल तोडाच सम म्हणूया.
avalakShaNa~अवलक्षण.adj.weird or queer lookingपाह्याला विकार असाच॑. विलक्षणहे काळाच कित्येक पोरी शृंगार करींगतें म्हणून कसकसकी वेष घालींगून, तसच, तोंडाला कायकायकी लावींगून अवलक्षण करींगतात॑.
avalakShaNa~अवलक्षण.adj.evil omenओंगळ॑ (वंगळ॑) लक्षणनव घरांत॑ वेघतानाच घरच॑ दिवा विजलते एक अवलक्षण म्हणून तिला वाटले. हेला महत्व काहीं नाही म्हणून कित्ति सांगिट्लतरीन तिन॑ ऐकाला तय्यार न्होती.
avaLee jaavaLeeअवळी-जावळी.adj.twinsएकेच प्रसवांतल॑ दोन लेंकरेएक दिवस एकच ठिकाणी एकसारख असाच तीन जोडी अवळी-जावळींस पाव्हून आश्चर्य वाटले मला. आवळाजावळा / जुळी-मुले in sm.
avamaanअवमान.n.insult. disrespectतुच्छ रीतीच वागणे. अपमान.(1) अम्चपक्षा ल्हान स्थितींत॑ असणारांला ते एकच कारणा करतां अवमान दाखिवणे चोखोट स्वभाव न्हो. (2) दुसरेंला अवमान दाखिवाच एक चोखोट स्वभाव न्हो म्हणून ल्हान वयेंतूनच लेंकरांला शिकिवाच अम्च जवाबदारी अणी धर्म पणीं आहे.
avamaanअवमान.n.shameअपमान. लाज. लज्जा.अम्च॑ जीवन अम्ही केम्हीन गौरवांत॑ चालीवलतर॑ अवमान भोगाच अवसर॑ कधीन येईना.
avamaanअवमान.n.disgrace. humiliationअपमान. पह्जतीमी तजकडे साधारणपणांत बोलत होतोंतरीन, तज मनांत मी तला अवमान करून बोललों म्हणून वाटले.
avandhara~अवंधर॑.adj.disorderly. untidy. cluttered. helter-skelterतेरा-पेरात्यंच घराच "प्लान" बराहे. तसच, त्यंच "फ़रनीचर" पणीं भेष आहे. झाल तरीन घर अवंदरांत॑/अवंदर होऊन ठींगट्लाहेत॑
avanthaNa~अवंतण॑.n.invitationआमंत्रण॑. भव्यांत॑ स्वागत करणे. स्वागत कराच चिट्टीशतरंजांत॑ विश्वांत॑ सर्वउंच स्थानांत॑ असणार॑ श्री. विश्वनाथन आनंदाला एक होनररि डोक्टरेट देऊन मर्यादा कराला हैदरबाद विश्वविद्यापीठ आवंतण॑ पत्र पाठिवले. पण, केंद्र मानुषिक विकास मंत्रालयाच अधिकारींच मूर्खपणामळे ते होनररि डॉक्टरेट त्यास॑ द्याला झाल नाही.आवंतणे/औंतण/औतण in sm.
avasaanअवसान॑.n.the endशेवटीच (भाग). रात्री उशीर झाल-ते-करतां अम्ही सिनिमाच शेवटी पतोरी राह्यलों नाही. खाणीच अवसान॑ दुसर दिवस विचारींगून कळींगट्लों.
avasara~अवसर॑.n.urgencyसमेच(सवेच) कराम॑ म्हणून वाटाच॑तू हे वाटे केम्हातरीन येताना मला एक नारळ, थोडक चिंच, एक किलो तुरीच दाळ अणी सहा काडीचपेटी हे अग्गीन घेईंगून याला होईलका ? अवसर काहीं नाही, तुला सौकर्य मिळताना पुरे !
avasara~अवसर॑.n.opportunityअनुकूल समय(1) तो एक षाणा/शाणा. अवसर पाव्हून तज काम करींगतो. (2) गेल सात आठ महिना पसून भारताच बरोर चैनाच व्यवहारांत॑ फार व्यत्यास आलाहे. भारताला अवमान कराला मिळाच अवसर कोण्तीन चैना सोडत नाही.
avasara~अवसर॑.n.busy. preoccupiedकामामुळे वेळ नाहीस्क॑ असणे(1) अत्ता आग्गीन मी उदंड अवसरांत॑ आहें. तरीन, उद्या कृत्य होऊन साडे-चार घंटेला आलतर॑ मी तुला पाह्तों.(2) उद्याहीं परमाहीं तुम्ही अवसरांत असतील म्हणजे मी उद्या-नाही-तेरमा येवून पाह्लतर॑ तुम्हाला सौकर्य असेलका ?
avasara~अवसर॑.n.occasionवेळ. समयमझ भाऊच लेंकीच वराड गेल महिना केले. तेच अवसरांत तिज भाऊच मुंज पणीं करूनटाकले
avasara~ bhogaNeअवसर॑ भोगणे.vt.to show impatience because of urgencyआतर दाखिवणे(1) ट्रैन निघाला अण्खीन उदंड वेळ आहे. स्टेषनाला अम्ही बरोरल॑ वेळालच जाऊन पावाला जातों. अवसर भोगनाकांत॑. (2) तुला ट्रैनाला वेळ झालम्हणून मला कळ्ल॑. अवसर भोगूको. मी तुला बरोरल॑ समयाच पुढे स्टेषनांत॑ सोडतों.
avasheShअवशेष.n.residueउरलते भाग(1) जपानाच हीरोषीमा अणी नागासाकी हे दोन पटणाच वर ॲटम-बॉम्ब पडून सर्वनाश झाल॑. अवशेष काहीं न्होत॑. (2) भोपालांत 1986 वर्ष झालते "गॅस ट्रेजडीच" अवशेष अत्तापणीं लोकांस कष्ट करीवत आहे.
avashiShTअवशिष्ट.adj.remainingबाकी असाच. उरलतेकुवैत युद्धांत॑ अमेरिका एक पूरा महिना प्ळेनांतून बॉम्ब घालून इर्राक्की सैन्याला ध्वंस॑ करले अणी तज नंतर इर्राक्की सैन्याच अवशिष्ट भाग दोन दिवसाचांत॑ आत्मसमर्पण करले.
avashya~अवश्य.adv.surely. certainlyअगत्य. कंडिप (Tamil). तुम्ही आले विना एक कामपणीन होणार नाही. अवश्य येम॑ (यावा).
avasthhaaअवस्था.n.state. conditionस्थितीवैरल जेरामुळे मझ मित्राला काल॑ हॅस्पिटलांत॑ मिळिवले. आज त्यंच अवस्था कळाला मी जाऊन पाह्मे.
avasthhaaअवस्था.n.enduring (difficulty).(कष्ट) भोगणेअम्च खेडेगांवांत॑ डांबराच पक्का बीद॑ नाही. प्रति वर्ष पाऊसाळाच समय पटणांतून सामान आणाच सग्ळ॑ बैलबंडीईं चिक्कोलांत॑ सांपडींगाच अवस्था पाह्याला होत नाही.
avathaarअवतार.n.God's incarnation in Earthदेव भूमींत॑ जन्म काढाच॑दहा अवतारांत॑ नौ झालाहे. शेवट्ल॑ अवतार, म्हाण्जे, कल्कि अवतार इथपर (इत्तिपर) होईल.
avathaarअवतार.fig.an unseemly dress or appearance.अवघड वेष-भूष.अम्ही लेंकरे कोणतरीन त्यांस अवडनाते वेष-भूष घालींगून बसलतर॑ अम्च॑ आजीम्मा सांगतील॑, "काय अवतार घालींगून बसलाहेस॑" म्हणून.
avatharaNeअवतरणे.vi.to incarnate.भूलोकांत॑ देव जन्म काढाच॑भूलोकांत॑ देवाच अवतरणे कां होते, हेज विषीन अर्जुनाला श्रीक्रिष्ण स्पष्ट होऊन गीतोपदेशांत॑ व्यक्त करले.
avayavअवयव.n.part of bodyदेहाच भाग. आंगाच भागवैद्यशास्त्र केवढ॑ सुधार झालाहे म्हणजे, हृदय, डोळे, मूत्राशय असलते अवयव नाश झालतरीन शस्त्रक्रीया करून दुसरेकडून ते अम्च॑ आंगाला जोडाला होईल.
aveLअवेळ.n. inappropriate timeअशुभ वेळ. योग्य नाहीते वेळ. कोण्ततरीन चोखोट काम कराम म्हण्जे, राहु काळास्क अवेळ काळांत करताने म्हणतील
avikaaree अविकारी.n.indeclinable (gram)(व्याकरण॑) विकार होयाला साध्य नाहीते गोष्ट॑. अव्यय
aviyalअवियल.n.a dish made from a variety of vegetablesविध-विध रीतीच भाजीपालांतून कराच एक पदार्थकेरलांत कोण्त होटलांत जेवाला गेलतरीन अवियल निश्चय होऊन मिळल॑.from Malayalam
avyaya~ अव्यय.n. (gram)indeclinable (gram)विकार होयाला साध्य नाहीते गोष्ट॑. अविकारि
ayanakअयनक.n.spectacles. reading glassesवाचाच अर्सा. उपनेत्रमी मझ पंध्रावां वय पसून अयनक वापरत/घालत आहें
ayithvaarअयितवार.n.Sundayआदित्यवार. रविवार. भानुवाररिटैर झाल॑ नंतर॑ एक एक दिवसीन अयितवारास्कच दिसते मला !आदित्य, रवी अणी भानू, हे तीनीं सूर्याच नाव आहे अणी आदित्याच अपभ्रष्ट रूप आहे "अयित" अथवा "आयित".
ayogya~अयोग्य.adj.improper. unbecoming. unworthyयोग्य नाहीतेभारताच महिला हॉकी संघाच कोचाच वागणे अयोग्य होते म्हणून सरकार त्यंच वर एक अन्वेषण आरंभ कराला निश्चय करलाहते.
ayogya~अयोग्य.adj.unsuitable. unfit. unqualifiedलायक नाहीते. नलायकनव होऊन नियुक्त झालते व्यवसाय विभागाच अधिकारी ते पदवीला/स्थानाला अयोग्य अहेत अस निश्चय करून तला कामांतून काडूनटाकले.
ayogyathaaअयोग्यता.n.unworthinessअयोग्यतानव होऊन नियुक्त झालते व्यवसाय विभागाच अधिकारीला ते विभागाच नियम काहीनच कळना अणी त्यंच अयोग्यता पाव्हून त्यंच खाले काम करणार अग्गिदनीन त्यंच वर थोडकपणीन मर्यादा दाखिवत नाहीत॑.
ayyayyo अय्यय्यो !.interj.a double emphasis of अय्यो.अय्योच पुन्हस्पष्टपण॑. अरेरे ! अय्यय्यो, कां तस करला ?from Tamil.
ayyoअय्यो !.interj.oh ! अरे !अय्यो ! मी तला ते काम कर नोको म्हण्ट्लोंकी, मग॑ कां करला ?from Tamil.
ayyo-kuyyoअय्यो-कुय्यो.interj.an expression indicating lazyness, reluctance or unwillingness to act.शोंबेरिपण॑, आळस, नाहीतर, काम कराला सम्मत नाही म्हणून दाखिवाच गोष्ट॑.ते काम कर रे म्हणून मी तला भरून दपा सांगामते पडले. नंतर॑ अय्यो-कुय्यो म्हणून कायकी अर्धगछ करून ठिवलाहे.from Tamil.

No comments:

Post a Comment