Sunday, May 15, 2016

b (ब) 1 (baadaam to basaka)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
baadaamबादाम.n.almond (seed or tree)एक विधाच झाड. तज बीं "कॅलिफोर्णिया आल्मड्स" म्हणून गेल वर्ष अम्च देशांत तिकडून आणिवलते बादाम विकाला श्रम होत॑. पण, अत्ता तज विषीन कोठीन काईं ऐकतों नाही. अम्च देशाच बादामाच सार्ख रूच तला न्होत॑ म्हणून अम्च लोक॑ ते घेणे सोडून टाकले की काय की. बदाम in sm.
baadhaaबाधा.n.afflictionहिंसा होणेमझ॑ एक मित्राला चुम्मण वयेंतूनच आस्माच बाधा होत॑. पण, हैदराबादांत॑ जीव असाच ल्हान मासोळि गिळून आस्मा बरोर करणार वैद्याचकडे जाऊन ते चिकित्सा करलांपिरी आस्माच बाधांत्सून चुकींगट्ले.
baadhaaबाधा.n.possessed (by a spirit etc)आंगाला येणेभूत धरलते लोकांस॑ नामक्कल नामगिरि देऊळांत बलाईंगून गेलतर॑ ते बाधा राहून जाईल म्हणतात॑.
baadhaaबाधा.n. restrictionअडचण॑दोन तीन वर्षाच पुढे मला पोटाच असुख होत॑. भरून डॉक्टरांला दाखिवलों. जेवाच कित्येक पदार्थ नोको म्हणून बाधा घाट्ले विना वेगळ॑ काईं झाल नाही. नंतर॑ कळ्ळते एक आयुर्वेद वैद्य एक चूर्ण देले. पाष्टे अनशी पोटांत मेधीन लिंबूच रसीन ते चूर्णाच बरोर मिळिवून घ्याला सांगट्ले. एकच वारांत बोरोर होऊनगेलों अणी जेवणेंत होतते बाधा सग्ळीन ते वैद्य राह्ते केले.
baadhakबाधक.n. the one which affectsबाधा करिवाच॑तेनास॑ र्रीण देलते पैसे वेळाला परतून येईनातर॑ पणीं तजमळे मला सध्याला बाधक होयना. मझ॑ खर्चाला मी वेगळ॑ एर्पाड केलोंहें. 
baadleeबादली.n.bucket.बालदी. पाणी भरून ठिवाच भांडीबालडी/बालदी/बादली in sm.
baagबाग.n.garden. parkउद्यान
baagmaaleeबागमाली.n.a gardener.माली. बाग पाह्यींगणार.
baaherबाहेर.n.outsideआंत नाही, बाहेरच ठिकाण
baahergaavबाहेरगाव.n.outstationबाहेरगाम॑. स्वंत गावांतून दूर असाच एक गाव
baaheroonबाहेरून.adv.from the outside. externallyबाहेरसून. बाहेर असून.
baahersoonबाहेरसून.adv.from the outside. externallyबाहेरून
baajaaबाजा.n. music by a band setवाजंत्रींच कार्यक्रम॑तेवढ॑ वराडांतीन मिरिविणकीच बरोर मोट्ठ॑ बाजा अण्खी सिनिमाच डॉन्स अस्ते. हे अत्तच फॉषन झालाहे
baajaarबाजार.n.market. bazarदुकान बीद॑. विध विधाच दुकानाच ठिकाण
baajariबाजरि.n.maizeएक धान्य. बाजरादोन-तीन बाजरीच रोट्टि तूप लाऊन गूळाच बरोर खालतर॑ पोट भरून जाते. चार-पांच घंटेला भूक लागना !
baajooबाजू .n.a sideएक कडे
baajoobandबाजूबंद.n.a bracelet.हाताला बांधाच एक नग.
baajraaबाजरा.n.maizeएक धान्य. बाजरि
baakiबाकि.n.that which has been left outउरलते भाग. शिष्ट॑
baakiबाकि.n.balance change or cashउरलते रोक्कम
baala~बाल॑.n.a young childबाळ॑. ल्हान वयच लेंकरु
baaLa~बाळ॑.n.childबाल॑. लेंकरु
baalaajiबालाजि.n.Lord Srinivasaस्रीनिवासदेव
baaLantha~बाळंत॑.adj.give birth toप्रसवणे
baaLanthapaNa~बाळंतपण॑.n.delivery. child birthप्रसव
baaLantheeNa~बाळंतीण॑.adj.a woman who has recently given birth. lactating motherनव॑ होऊन प्रसवलते एक बायको
baaLapaNa~बाळपण॑.n.childhoodबाल्य
baalavaaDiबालवाडि.n.kindergarten. play-school for childrenल्हान लेंकरांच वाचण॑ आरंभ करापुढेच साळे
baaldeeबालदी.n.bucket.बादली. पाणी भरून ठिवाच भांडीबालडी/बालदी/बादली in sm.
baaLedinDबाळेदिंड.n.the internal white coloured stem of a plantain tree (a vegetable)केळीच-झाडाच आंतल॑ पंढ्र॑ रंगाच भाग (हेजांतून खायाच पदार्थ करतात)बाळेदिंड कापाला अनुभव असाम॑. कारण दोरा-दोरास्क॑ तजांतून चिकटाच नार येत अस्ते. हे नार बोटाला गुंडाळिंगनास्क॑ असाला कापाच पुढे हाताला तेल लावणे आहेfrom Kannada. दांडा in sm.
baalya~बाल्य.n.childhoodबाळपण॑
baambooबॅम्बू.n.bamboo. वेळू. गौताच वर्गाच एक उंच झाड
baandhaNeबांधणे.vt.to constructबांधणे
baandhaNeबांधणे.vt.to tie up.बांधून घालणे. बांधून बंदोबस्त करणे
baandhaNiबांधणि.n.building. a civil construction. a civil work.वास्तु. बांधोटि.
baandhoTiबांधोटि.n.a civil construction. a civil workवास्तु. बांधलते घर, बांधणि, भिंत असल॑ वास्तुबांधणी in sm.
baapबाप.n.fatherबापा. पिता
baapaaबापा.n.fatherबाप. पिता
baarबार.n.times(कित्ति) दा. दपा
baaraaबारा.n. twelveअक्राच नंतरल॑ संख्या
baaraavaa*बारावां.adj.twelfthअक्राच नंतरल॑ क्रम॑
baarasबारस॑.n.ceremony for naming a child on the twelfth day of it's birthउजून बारावां दिवस कराच लेंकरांच नामकरणच सणबाहेरल॑ गामांत उजलते लेंकरांना एक महिना पतोरी आंघोळि करून घालत नाहीते. तज मुळे बारस॑ कराला होत नाही. अण्खीएक काय म्हण्जे, तथे लेंकरू उजतांत्सून नाव ठिवामते पडते. हे सर्व कारणामळे कित्येक दन॑ एक महिना नंतर पुण्यावचन मात्र करतात॑. 
baarikबारीक.adj.thin. slim. slenderबरीक. पत्तळ॑दांडग॑ असणार बारीक होयाला भरून पैसे वेच करतात॑. अणी उपाशीहीं पडतात॑. तज बद्दल पहिला पसून खाणे-जेवणांत॑ थोड करार-कंडिप असलासलतर॑ नंतर श्रम भोगनास्क॑ असुया
baashingबाशिंग.n.a decorative thread with embellishments worn by the bride (and sometimes by the groom) around their foreheads during their weddingभाशिंग. वराडाच वेळि नवरा-नवरि त्यंच कपाळांत गुंडाळून बांधाच अलंकार केलते दोरा.
baasundiबासुंदि.n.a sweetmeat made from milkदूधांत॑ केलते एक गुळ्चीट पदार्थ
baaTaaबाटा.n.an extra payment. an allowanceभत्ता. धर्माच वर जस्ति द्याच पैसाThis is a morphed version of the Hindusthani word "वाटा", meaning share.
baavoliबावोलि.n.a toy.ल्हान लेंकरांच खेळाच साधन॑. भावोलि. बाहुली/भावली in sm.
baavoliबावोलि.n.a doll. a small statue. a puppetभावोलि बाहुली/भावली in sm.
baavoli hoDhaNeबावोलि होढणे.vt.to draw a picture.चित्र होढणे. पेट होढने. भावोलि होढणे.
baayeeबाई.n.a womanबायको. स्त्री
baayeelबाईल॑.n.wifeपत्नि. वराड केलते बायको
baayeeleech daasबाईलीचदास॑.n.henpecked husbandबाईलीच गोष्ट सुटनास्क॑ ऐकांमते पडाच दाल्ला/दल्लाकितिकी दादिगे बाईलींच चांगूलपण॑ पाहूनकी/पाऊनकी, त्यंच पैसे-कास पाहूनकी/पाऊनकी, नाहीतर त्यंच तोंडाला भींगूनकी, बाईलीचदास॑ होऊन जातात॑
baaykaanch veDa~बायकांच वेड॑.n.womanizerबायकांच वर वंगळ मोह असणारउदंड सरकारि आफीसर लोक अणी अम्च नेतालोक बायकांचवेड॑ असतात॑. हे मधे "न्यूसपेपरांत" पणीं असल लोकां वर एक लेख आलहोते
baaykoबायको.n. womanस्त्री. बाई.
baayko (gram)बायको.n. implies feminine gender in grammar (gram).व्याकरणांत॑ स्त्रीलिंग दाखिवाच शब्दगेल वार अम्च घर्च कुत्र पिल्लू घाटले/प्रसवले. त्यांत॑ दोन दादिगा कुत्रेईं दोन बायको कुत्रेईं होते
badakबदक.n.duckवात
badalबदल.prep.in lieu of. for or in exchange of. instead.बद्दल. बदलि. एकाच ठामि अण्खि एक.(1) साधारण म्हणून कोण्त्येक दुकानांतीं घेट्लते वस्तु बदलि कराला दुपारीच वेळेच जाऊया. पाष्ट॑ गेलतर॑ दुकानवालेंस अवडना. (2) काल घेट्लते हिरव॑ रंगाच लुगडेच बदल अत्ता तिला पिवळ॑ रंगाच पह्जे म्हणे !
badalaa-badaliबदलाबदलि.n.mix-up. swapअदलाबदलि. एकालेक बदलणे.सरकारि होसपिटलांत उजलते लेंकराना अदलाबदलि/ बदलाबदलि कराच विषय समाचार पत्रांत दंड दपा येऊन पणीं ते चेष्टा अत्ता पतोरि उणे झाल नाही. 
badalaNeबदलणे.vt.to exchange.बदलून काढणे/घेणे. वेगळ॑ बदलून काढणे.
badaliबदलि.n.a substituteएकाच ठिकाणि अण्खी एकलांच घेटले म्हणून उद्योगांतून काढूनटाकलते मनुषाच बदली अत्ता पर्यंतीन कोणीन आले नाही
badalivaNeबदलिवणे.vt.to change.बदलून काढणे/घेणे. बदलणे.मला रात्री एकच ठिकाणी निजल तरच झोंप येईल॑. ठिकाण बदलिवलतर॑ झोंप येईना.
baDathishengaaबडतिशेंगा.n.a type of beans.एक रीताच भाजी. बडतिशेंगाच सप्पक-पिट्ळेच रूच पडवलाच सप्पक-पिट्ळेच रूचाबरीस मला इष्ट॑.
baDavaaबडवा.fig.an abusive term for a person. शिवा द्याच एक शब्द(1) तो एक चोर्टा बडवा. तला अम्च घराच जवळपणीं याला सोडताने. (2) उदंड वर्षा पुढे एकदा मुंबईंत ट्रैन वेघत असताना एक बडवा अम्च बरोर ट्रैनांत वेघत होतते एक पोरीच पदर होडाला पाह्यिला. मीईं/मीनीं अण्खि एकलाईं मिळून तला दोन रपाटा देलों/होडलों.भडवा in sm. The actual meaning being "a pimp. वेश्यांच दलाल"
baDavaaबडवा.n.a pimpवेश्यांच दलाल भडवा in sm.
baDavaaबडवा.n.attender of a dancing girlनाचवालींच कामवाला/सेवक भडवा in sm.
baDbaDaaबडबडा.n.flutter in the mindमनाच तरपड॑क्रिकेट खेळाच शेवटी-शेवटी अम्च॑ देशाच टीम जिंतेलका नाहीका म्हणाच स्थिती येताना मझ॑ मन्न॑ बडबडा होईल॑.
baddalबद्दल.prep.in lieu ofएकाच ठामि अण्खीएक. बदल
baDDiबड्डि.n.interest on loan. व्याज
badhakalबधकल.n. ditchकुंडउमाट-बधकल असाच जमीन कित्येकदा चोखोट/उणे मोलाला मिळल॑उमाट-बधकल', a TM expression meaning "uneven ground".
badilबदिल.n.replyजवाब. उत्तर. अम्च बीदींत॑ कुत्रांच तंटा सोसाल होत नाही म्हणून कोरपोरषनाला कागद लिवून/लिहून दोन महिने झाल तरीन अण्खीन मला तिकडून बदिल काहीनच आलनाहीthis Hindustani expression appears to have come into DM via colloquial Tamil.
baDivaNeबडिवणे.vt.to hitमारणेबडवणे/बडविणे in sm means 'to thrash'. 'to cudgel'.
baDivaNeबडिवणे.vi.to get hitलागणेदुकानाला चालून जात असताना मझ मागेसून एक बंडी येवून मला बडिवले
baDivaNeबडिवणे.vi.to impact (favourably)(अदृष्ट) लागणेतो एक अदृष्ट केलते मनुष. भूटान लाट्टरींत॑ तला दोनदपा पन्नास/पन्नास लख बडिवल॑
baDivaNeबडिवणे.fig.to knock-off. to pilfer. to be afflicted unfavourablyबडिवणे(1) एकदपा बेंगळूरांत मझ लोंक रोडाच सिग्नलाकडे ओठाकून इकडे-तिकडे पाह्त असताना कोणकी तज "पर्स" बडीवूनटाकला. (2) अम्च घराला चोर्टा बडिवनास्क असाला इत्तपर एक चौकीदाराला ठिवला निश्चय केलों.
baDivoon saangaNeबडिवून सांगणे.fig.to say emphatically.जोर होऊन सांगणे.from Tamil usage अडिच्चु पेशरदु.
bahiN-bhaavanDeबहिण-भावंडे.n.brothers and sisters, collectivelyभाऊ-बहिण लोके. भावंडे
bahiNa~बहीण॑.n.sister.बहिणी. सहोदरि.
bahiNeeबहिणी.n.sister.बहीण॑. सहोदरि.
bahiraagiबहिरागि.n.a class of religious mendicantsबैरागि
bahiSHkaarबहिष्कार.n.banishmentसमाजांतून बाहरटाकणे
bahumaanबहुमान.n.respect. reverence. honour. regardआदर॑. मर्यादा
bahuvachana~बहुवचन॑.n.(gram) the plural numberअनेकवचन॑
bailबैल.n.bullवृषभ
bailबैल.n.bullockनपुंसक॑ केलते बैल
bailbanDiबैलबंडि.n.bullock-cartबैलाच बंडि
bairaagiबैरागि.n.a class of religious mendicants who renounce the world to practice austeritiesबहिरागि. वैरागि. इहलोकाला वैराग्य करून सन्यास काढलते संत
bajarangबजरंग.n.a body as strong and pure as diamondवज्रास्क॑ घट्टि अण्खी पवित्र असाच आंगवज्रास्क॑ घट्टि अणी पवित्र आंग असाकरतां हनुमानाला बजरंगबली म्हणून नाव आहे.
bajjiबज्जि.n.fried snack.एक तळलते पदार्थमिर्शिंगाच बज्जि, कांदाच बज्जि, उरळेगड्डेच बज्जी हे अग्गीन खायाला बेष रूच असलतरीन, इषोब नाहीस्क॑ भरून भरून खाल्लतर॑ आंगाला चोखोट नोहो.
bakaasurबकासुर॑.fig.a voracious eater. a glutton.इषोब नाहीस्क॑ खाणार.पानांत वाढलते भात बक-बका गिळाच पाव्हून तला अग्गिदनीं "बकासुरा" म्हणून मस्किरी करत होते.
bakapakSheeबकपक्षी.n.the bird heron or egret.एक रीतीच पक्षी. मासोळीला धरून खायाला म्हणून शेतीच जमीनांत होटाललसाच भरून बकपक्षींला तिकडे पाह्याला मिळल॑.
bakraaबक्रा.n.goat. ram. sheep. lamb. kid (both male and female)बकरामुसलमानांच बक्रीद सणाला म्हणून विकाकरतां बांधून ठिवलसाच बक्रा पाह्यलतर॑ अम्हास परिताप वाटेल॑. बकरा in sm
bakraaबक्रा.fig.a scapegoat. a person who is made to take the blame for others.दुसरेंच दुषकर्माला जवाबदारी होणार.सत्राजित राजाच भाऊ प्रसेननाला एक सिंह मरिवलेतरीन, ते दोष क्रिष्णाच व॑र घालून क्रिष्णाला बक्रा करिवलते खाणी अम्ही गणेशचतुर्थीच वेळी सांगणे आहे.
bakSheesबक्षीस.n.a reward given patronisinglyउदारांत॑ द्याच इनाम
baLa~बळ.n.strengthशक्ति. बल॑बल/बळ in sm.
balaaSHTika~बलाष्टिक.adj.strong. sturdyघटमुट. दांडग॑. शक्तिशाली कॉमन-वेल्थ गेम्सांत॑ आस्ट्रेलियाच हॉकी टीमांत खेळणार सर्वीं अम्च टीमांत खेळणारांपक्षा बलाष्टिक दिसले. खेळाच शेवटीपतोरी तेनि क्षीण झालतेस्क॑ दिसल॑ नाही. बलिष्ट in sm.
balaathkaarबलात्कार.n. rapeमानभंगअम्च देशांत बायका पोरी रात्रीच वेळ एकट हिंडणे अपाय झालाहे. कोण कोठ बलात्कार कराला प्रयत्न करतीलकी सांगाला होयना
balaavaNeबलावणे.vt.to call. to summonयाला सांगणे. याला निर्देश देणे. बोलावणेबोलवणे in sm.
balapa~बलप॑.n.slate pencil(साळेच) पाटांत॑ लिव्हाच "पेनसिल". बळप॑ मी चौथ क्लास पतोरि (पावेतोरि/पर्यंतीन) बलप उपयोग केलोहें. पण, अम्च लेंकरांना बलप म्हणजे काय म्हणूनच कळ्ना.
balapa~बलप॑.n.soapstoneमंडीच धोंडा. बळपाच धोंडाजुन॑ काळांत मंडि-सांभार-भात बलपांत केलते भांडीत करत होते. ते करतांच तला "मंडि-सांभार भात" म्हणून नाव आलते
baLapa~बळप॑ nslate pencil.बलप॑. (साळेच) पाटांत॑ लिव्हाच "पेनसिल".
baLavanthबळवंत॑.adj.strong personबळ असणार. बलशालि. बलवान
baliबलि.n.religious sacrificeधर्माच प्रकार॑ कराच त्याग/बलि
balidaanबलिदान॑.n.offering of sacrificeबली अर्पणा करणे
balipradipadaaबलिप्रतिपदा.n.the festival falling on the first lunar day during Deepavaliदीपावळि पाडवाच सण
baLkaTबळकट॑.adj.strong. firm. vehement. thumpingफार जोराचत्यंच घरच वराडांते जेवण॑ बळकट बेष होते. तेवढीन मिळून पन्नास विध पदार्थ होत॑
banashankariबनशंकरि.n.Goddess Banashankari. Goddess Durga in her benign aspectदुर्गादेवीच शांत रूप. शाकांबरि. वनशंकरि.
bandबंद.n.closedझांकलते
bandबंद.n.blockedपुढे जायाच वाट झांकणे
banDalबंडल.n.sham. bluffलबाड
banDavaaLबंडवाळ॑.n.financial capitalमूल रोक्कम
bandhबंध.n.a political call given for shut-downहर्ताल
bandhkhaanaaबंधखाना.n.jail.तुरंग. तुरंगा कारागृह. दंड मिळ्लत्यांस॑ बंध करून ठिवाच ठिकाण.
bandhuबंधु.n.relativesसोयरीक लोके
banDiबंडि.n.motor-carभंडि. मोटर-गाडि
banDiबंडि.n.a bullock or horse cart etc. भंडि. बैलबंडि/घोडाबंडि (असल॑).
banDivaalaaबंडिवाला.n.cart-manबंडि हांकणार॑/पळिवणार॑
bandobastबंदोबस्त.n.precautionsरक्षाच व्यवस्था
bangalaaबंगला.n.a bungalowबंग्ळा. महाल
bangLaaबंग्ळा.n.a bungalowबंगला. महाल
baNiyaaबणिया.n.name of a caste indulging in trade. Vysya casteवैश्य जात
baNiyaaबणिया.adj.a person belonging to the baniya casteवैश्य जातांतल॑ एक मनुष
baNiyaa बणिया.fig.a calculating personसगळीन इषोब घालून पाह्यणार
bara~बर॑.adj.good. proper. बरी काल संध्याकाळि पाह्यलते सिनिमा बर॑ होत॑. मला अवडल॑बरा in sm.
bara~बर॑.adj.okayबर॑
bara~बर॑.adj.passable. (of) moderate (qualities) बर॑
bara~बर॑.adj.not little, though not very muchबर॑ तुम्हाला पाव्हून बरेच दिवस झाल॑ म्हणून फोण केलों
bara~बर॑.adj.of proper welfare (health-wise etc)सौख्य॑तुम्हाला थोड दिवस आंगाला बर॑ होत नाही म्हणून ऐकोलों. अत्ता बर॑ आहेंतका
baraNiबरणि.n.porcelain jarजाडि
bareeबरी.adj.good. proper.बर॑. अम्ही गामाला जाऊन परतून याच दिवसी बंगळूरांत॑ बंध होत॑ अणी रेल्वे-स्टेशनांत टाक्सीकी ऑटोकी एकीन मिळ्ळ॑ नाही. बरी वेळ, अकस्मात अम्हाला कळ्ळत॑ एकले त्यंच टिकट बुक कराला स्टेशनाला अल्होते म्हणून परतून जाताना अम्हाला घरांत सोडूनटाकून गेले.
bareekबरीक.adj.thin. slenderबरीक रायत करताना वाळूक जाड होऊन कापाच पक्षा बरीक होऊन किसलतर॑ जास्ति रूच असत॑.बारीक in sm.
bareekबरीक.adj.fine (not coarse)बरीक. सूक्ष्मभाजलते कॉफीच बीं पूड करताना बरीक होऊन पूड केल॑ तर॑ डिकोक्ष्यन घट्टि होऊन पडेल॑.बारीक in sm.
bareesबरीस.n.over and above. in addition to.बेरीस. पक्षा.
barfeeबर्फी.n.a sweetmeat made of grated coconut, sugar etcकिसलते नारळीं साखरेईं घालून केलते एक गुळ्चीट पदार्थ/तुकडासणाच संपाक म्हणजे मझ॑ अम्मा खोब्रीच/नारळीच बर्फीईं ओमपुडीईं करूनच सरतील॑.
barobarबरोबर.prep.along with. together withसहित॑. बरोर
barobarबरोबर.adj.equal. alikeतुल्य. बरोर
barobarबरोबर.adj.exact. precise. accurateकृत्य. बरोर
barobarबरोबर.adj.properयोग्य. बरोर
barobarबरोबर.adj.fitबरोर
barobarबरोबर.adj.just and goodबरोर. न्यायाप्रकार योग्य
barobarबरोबर.adj.regular. orderlyबरोर
barobarबरोबर.adj.correct. rightबरोर. चूक नाहीते.
barorबरोर.adj.exact. precise. accurateकृत्य. बरोबर.बस्सांत कंडक्टराच कडून टिकट घेताना बरोरल॑ पैसा देयिनातर॑ तो चिल्लर परतून देयिना म्हणून मी जेबांत॑ केम्हाहीं चिल्लर ठींगनास्क॑ केद्दीन बाहेर उत्तरना.
barorबरोर.adj.properयोग्य. बरोबर(1) बरोर वाढिवलते लेंकरांकडे काहीतरीन एकदपा सांगटलतर पुरे, समेच ते करतील॑. (2) कंप्यूटर प्रोग्राम लिव्हताना ते बरोर आहेका म्हणून पाह्यींगनातर॑ नंतर॑ ते प्रोग्राम चालिवताना अम्ही उद्देश केलते प्रकार काम करना.
barorबरोर.adj.fitबरोबरतो एक अवघड मनुष. आवश्य नाहीस्क॑ अग्गिदनाकडीन भांडणार झालतरीन मनांत लागास्क॑ बरोरल॑ उत्तर देलतर॑ तोंड झांकींगून उग॑ बसेल॑
barorबरोर.adj.just and goodन्यायाप्रकार योग्यपारलमेंटांत॑ सरकार आणिवलते " रैट टु एजुकेषन " बिल कित्येक लोक सुप्रीम कोर्टांत॑ विरुद्ध॑ केले तरीन, शेवटि ते एक बरोरल॑ विषयेच॑ म्हणून निर्णय झालते एक चोखोट कार्य झाल॑.
barorबरोर.adj.regular. orderlyबरोबरतज वागणे बरोर नाही म्हणून मी तज सहवासच सोडूनटाकलों
barorबरोर.adj.correct. rightबरोबर. चूक नाहीतेहे वर्ष झालते "नॅषनल सयन्स ट‘टॅलन्ट सर्च एक्ज़ामिनेषन" यांत॑ मझ॑ नातूला भारतांत॑ पहिल॑ नंबराच "रॅन्क" आल॑. ते परीक्षांत॑ पूरा प्रश्नालीं बरोरल॑ उत्तर देवून तला शंभरांत॑ शंभर मार्क मिळ्ले.
barorबरोर.prep.along with. together withसहित॑. बरोबरहे वर्ष तुम्ही तंजाऊराला जाताना मी पणीं तुम्च बरोर येतों
baror karNeबरोर करणे.vt.to put in order. to rectifyनीट करणेयाच रविवार मी मझ॑ खोलि बरोर कराला जातों
baror paDNeबरोर-पडणे.vi.to be fit. to be suitableयोग्य असणेकोणालीं कळिवनास्क॑ अम्च॑ चुलतभाऊ वकीलाकड॑ जावून सांगिट्लते विषय मझ॑ भाऊंडे नंतर॑ ओपींगट्लेतरीं मला कायकी ते बरोर पडल॑ नाही
baror-barorबरोर-बरोर.adj.equal. alikeतुल्य. बरोबरगेलंदा भारताच क्रिकट टीम आस्ट्रेलियाला गेलतम्हा दोन टीमीं बरोर-बरोर असेल म्हणून अम्हाला वाटल॑. पण, झालते चार माचांत॑ चारांतीं अम्च टीम हरले.
basaka~बसक॑.adj.of a lower level in height. dwarfedउंच उणे असाच बसून-उठणे कष्ट होतहोत तरीन वीस वर्षा पुढे बसक॑ 'सोफ़ा' एक फ़ेषण झाल होत॑.   बसकट in sm. 

No comments:

Post a Comment