Sunday, May 15, 2016

g (ग) 2 (gochakaa to guTTi)




.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
gochakaaगोचका.n.hiccup.उचका. उचकी. गुचकी. गोचका आल॑ तर॑ एक चूळ पाणी सात भाग करून गिळल तर॑ शांत होईल.
godaanगोदान.n.ritual gift of a cow.गाय दान देणे.माय / बाप वारून पांचवा महिने कराच श्राद्धाच बरोर एक ब्राह्मणाला गोदान देलतर॑ वारलते आत्माला वैतरणी नदी वलांडाच शक्ति मिळते म्हणून अमच॑ संप्रदाय सांगणे आहे.
goDDupiTLeगोड्डुपिट्ळे.n.a gravy like food preparation eaten with cooked rice.गोढ्ढुपिट्ळे. एक रीतीच कालिवण॑. गोड्डुपिट्ळेंत मणतक्काळि, नाहीतर॑, सुंडेकाय तळून घालणे आहे.
godhaDeeगोधडी.n.a thick saree with a rich lavish gold border.सोने-जरीच घट्टी लुगडे. in MM गोधडी means a mult-coloured quilt.
godhaDeeगोधडी.n.rich cloth worn by the wealthy.पैसावंत लोके नेसाच आडंभर कापड॑.
goDhDhupiTLeगोढ्ढुपिट्ळे.n.a gravy like food preparation eaten with cooked rice.एक रीतीच कालिवण॑. गोड्डुपिट्ळे.
goDhsaarगोढसार.n.a thin soup like food preparation eaten with cooked riceगोडसार.एक पत्तळ कालिवण॑.
goDsaarगोडसार.n.a thin soup like food preparation eaten with cooked rice.गोढसार. एक पत्तळ कालिवण॑.(1) दोन दिवस वराडाच॑ जेवण॑ जेवलतर॑ तिसर॑ दिवसी नुस्त गोडसार-भात असलतरे पुरे म्हणून मनाला वाटेल॑. (2) संपाकघरांतून चोखोट गोढसाराच वास येत आहे ! (3) दाळीच चट्णीच भाताच बरोर गोडसार तोळ्लावींगून खायला उदंड बेष असेल॑.
gohathyaaगोहत्या.n.cow slaughter.गाईला मरिवणे.
gojjuगोज्जु.n.a sweet and sour side dish.गुळ्चीट-अंबट रूचाच एक तोळ्लावणे (तोंड्लावण॑).पास्टे/पाष्टे/पाह्टे पल्हाराला पोंगलाच॑ बरोर तोंड्लाविंगाला 'सुंड्ड्क्काच॑' गोज्जु असल तर॑ कित्ति रूच॑ असेल॑ म्हणून ते खाणारांसच॑ कळेल॑.from Kannada.
gokarNa~गोकर्ण.n.a small vessel shaped like a cow's ear used for feeding infants.ल्हान लेंकरांला पाणी, ओखद असल॑ द्रव्य द्याला उपयोग कराच एक ल्हान वाटि. गायीच कानाच आकारांत अस्त॑ हे.अम्ही अम्च लेंकरांना गोकर्णांत औषद/ओखद देवून वाढिवलों तरीं, तेनी थोरळे होऊन त्यंच लेंकरांला 'ड्रोप्पर' वाटेच औषद देतात विना, गोकर्णांत द्याला ओपिंगना म्हणतात॑.
gokulगोकुल.n.the place where Lord Krishna grew up.श्रीक्रिष्ण वाढलते गांव.
gokulaaShTamiगोकुलाष्टमि.n.Lord Krishna's birth-day.क्रिष्णाष्टमि. जन्माष्टमि. श्रीक्रिष्णाच जन्म दिवस. श्रीक्रिष्ण उजलते दिवस. श्रावण महिनेच क्रिष्णपक्षाच अष्टमीच दिवस.गोकुलाष्टमी सणांत॑ लिंबू अण्खी पैसाच नाण्य अर्घ्य सोडाच पद्धती आहे
goLगोळ.n.sphere. गोलीच आकार. गोळाकार
goLaakaarगोळाकार.adj.spherically shaped.गोलीच आकार.भूलोक गोळाकार आहे-ते-करतां पूर्वांत॑ असाच भारताकड॑ जायाला पश्चिमाकडून गेलतर॑ होईल, अस॑ निश्चय करून पंध्रावां शतकांत॑ क्रिस्टफर कोलंबस पोर्तुगलांतून अट्लांटिक समुद्रावर पश्चिमाकड॑ निघले.
goliगोलि.n.small glass marbles.गोटि. ग्ळासांत॑ केलते गोळ आकाराच ल्हान गोळी.गोलि-सोडा बोट्टलाच आंत कस॑ गोलि घालतात, हे मला उदंड दिवसापसून उत्तर मिळनाते प्रश झालेहे.
goliगोलि.n.a game played with marbles.गोलिच खेल.भूमींत॑ तीन ल्हान डोंबूर काढून खेळाच गोलीच खेळ अत्तअग्गीन फार अपरूप झालाहे.
goLiगोळि.n.medicinal tablets. pills.ओखदाच मात्रे. ल्हान लेंकरे ओखदाच गोळि गिळताना गळांत॑ सांपडींगनास्क॑ पाह्यींगाम॑.
goLiगोळि.n.bullets.तोपाच (तोफाच) गोळि. डुक्राचीं गायीचीं मांसांतून काढलते तेल लावलते गोळि हिंदुधर्माचीं इस्लामाचीं विरुद्ध आहे म्हणून सिपाहीलोकांच मनांत॑ झालते विचार 1857 वर्षी ईस्ट इंदिया कंपनीच विरुद्ध॑ झालते स्वातंत्र युद्धाच एक मुख्य कारण होत॑.
gollarगोल्लर.n.cowherd.गाय पाह्यींगणार.
gollarगोल्लर.n.milkman.दूध धार काढणार.
golmaalगोलमाल.n.inappropriate acts bordering on frauds.लबाड काम.आफीसांत॑ कायकी गोलमाल काम करून तो सांपडींगट्ला. अत्ता चुकाला काय मार्ग आहे म्हणून वर-खाले पाह्त आहे.
golmaalगोलमाल.n.mess. confusion.गोंधळ॑.अम्च कार्यक्रमांत॑ तला मिळिवलतर॑ तेवढीन गोलमाल करूनटाकून जाईल म्हणून तम्हाच म्हणटलों. तसच झाल॑.
golusगोलुस.n.an anklet, normally of single or double ply.एक की दोन की पदराच घुंगरु.from Tamil.
gomaya~गोमय.n.cowdung.गायीच शेण.
gomoothra~गोमूत्र.n.cow's urine.गाईच मूत.गोमूत्राला कित्येक औषधाच गुण॑ आहे म्हणतात॑.
gomukha~गोमुख॑.n.a plate shaped like a cow's face used in puja.पूजाला उपयोग कराच गाईच तोंडाच रूपाच ताट.
gondगोंद.n.sticking gum.चिकटाच/चिकटिवाच पदार्थ. डिंक. दुकानांत॑ घ्याच गोंद दोन विधाच अस्त॑. प्ळास्टिक ट्यूबांत॑ भरलते द्रव्य अणी "गम-स्टिक".
gonDaaगोंडा.n.tassel. tuft. bunch.पुंज. पुंजका.भरत-नाट्य नृत्य करत असताना मझ॑ वेणीच अग्र भागांत बांधून होतते गोंडा उकलून पडूनगेल॑ !generally the tassel tied at the end of the plaited hair of a lady. uis
gondhaLगोंधळ.n.a boisterous song festival in praise of Goddess.मोट्ठ॑ वरडावर्डींतून सांगाच देवीस्तुतीच गाणे.तंजाऊर मराठी लोकां मध्ये अत्तपणीं कित्येक सणकार्यक्रमांत॑ गोंधळ सांगणे आहे
gondhaLगोंधळ.n.ruckus. bedlam.अमक्कळ॑ (tamil). uisदोन पक्षांच मध्ये थोर भांडाभांडीच गोंधळ झाल-ते-करतां, गेल महिनाच सभांत काय निर्णयईं काढाला झाल नाही.
goNiगोणी.n.gunny cloth. coarse cloth made of jute /hemp fibre.गोणीच कापडओल॑ पांये पुसींगाला म्हणून भरून लोके त्यंच घराच बाहेर अण्खीं नाण्हींच कवाडाच समोर गोणी मुदडून (मुजडून) घालणे आहे.गोणी/गोणा/गोणताट/गोणपट/गोणपाट in sm.
goNicheelaaगोणिचीला.n.gunny sack. packing sack made of jute/hemp fibre.गोणींत केलते एक मोट्ठ॑ पिशवीप्लास्टिक वोवन बेग्स' आला नंतर गोणिचीलाच उपयोग फार उण॑ झालाहे.गोण/गोणा/गोणी/गोणता in sm.
gooगू.n.excrement. stool. faeces.जीर्ण करून विसर्जन कराच साधन॑.not to be confused with शेण (dung) of herbivorous animals.
gooDगूढ.adj.secretive. mysterious.रहस्याच॑. गुप्त.
gooDगूढ.n.a secret.रहस्य.
goodannaaगूडन्ना.n.sweet pongal.गुळ्चीट पोन्गल.
goodannaaगुरु.n.guru. teacher.आचार्या. पंतोजी.
gooDuगूडु.n.nest.प्राणींच अथवा पक्षींच राह्याच ठिकाण.uis अमच॑ घरच॑ समोरल॑ झाडांत तीन कावळाच गूडु आहेfrom Tamil कूडु.
gooLगूळ.n.jaggery.साखरेच कच्चा रूप.साखर उत्पन्न करताना अम्च आरोग्याला बरोर पडनाते तीन-चार विधाच "केमिकल" उपयोग करतात॑. ते करताना साखरीच बरीस गूळ अम्च आरोग्याला चोक्खट/चोखोट म्हणतात॑.
goonगून.n.(body's) forward-bent posture. hunch-back.आंग पुढे वांकून असाच स्थिति.उदंड लोकांना 75-80 वर्षा नंतर गून पडत॑. तज कारण अम्च पाठींतल॑ मुख्य हड झिजून जाणे मळे म्हणून वैद्ध लोक सांगतात.from Tamil.
goon ghaaLNeगून-घालणे.vt.to hold the body in a forward-bent posture.आंग पुढे वांकिवणे.from Tamil.
gooniगूनि.n.a (natural) hunch-back. a person with a deformed back.स्थिर होऊन आंग पुढेपटीस वांकून असणार.from Tamil.
gopaalaaगोपाला.n.Lord Krishna.श्रीक्रिष्ण.
gopichandana~गोपीचंदन॑.n.yellowish clay paste used for caste marks.जाताच आधारा प्रकार आंगाला लावाच पिवळ॑ माती.मध्व संप्रदायाच लोक॑ कोण्त पूजा कराच पुढेहीं/पुढेनि गोपीचंदनाच मुद्रा अवश्य घालिंगतील॑.
gopikaaगोपिका.n.women folk of cowherds who were great Krishna bhaktas.श्री क्रिष्णाच वर गाढ भक्ती असाच गाय वाढिवणारांच बायके. गोप स्त्रीं.रामावताराच वेळी सहाय करलते अनेक वानरांसीन श्रीरामा देलते आशीर्वादामळे, द्वापरयुगांतल अवतारांत॑ तेनी अग्गीन श्रीकृष्णाच प्रीय सखींच रूपांत॑ गोपिका स्त्रींच जन्म काढून आले म्हणतात॑.
gopura~गोपुर॑.n.towering structure built over the entrances of temples.देऊळाच आंत॑ वेघाच वाटेच वर उंच होऊन बांधून असाच मोट्ठ॑ व्यवस्था. uisतमिलनाडांत॑ उजंड ठिकाणी देऊळांच मोट्ठ॑-मोट्ठ॑ गोपुर॑ पाह्याला मिळेल॑.
gora~गोर॑.adj.fair complexioned.गोर॑ काताडाचचांगुळपण॑ उण॑ असलतरीन परवा नाही, वराडाच पोर/पोरी गोर॑ असलतर॑, पाह्यणारांच डोळेला तेनी चांगळेच दिसतील॑. गोरा in sm.
goraaगोरा.n.a white man.गोर॑ काताडच लोकांच वंशाच मनुष.
goraaगोरा.adj.fair complexioned man.गोर॑ काताडाच मनुष.
goraa bhurkaaगोरा-भुरका.adj.very fair and pinkish complexion.गोर॑ काताडाच॑.तो नवरा गोरा-भुरका आहे. तोंड उघडजोरी तेवढदनीं तला "इंग्रेज़ी" म्हणींगतील॑. बोलाल आरंभ केलतर तज स्वच्छ मराठी ऐकून लोकांना खर॑ कळून जाईल॑.
gordhanshengaaगोर्धन शेंगा.n.cluster beans.गवारी शेंगा. गोवारी शेंगा. गोवर्धन शेंगा. कोत्तवरनकाय.
goreeगोरी.adj.fair complexioned woman.गोर॑ काताडाच बायको.
gorochana~गोरोचन॑.n.a traditional medicine prepared from cow's urine.गोमूत्रांतून केलते एक आयुर्वेद ओखद॑. आयुर्वेदा प्रकार गोरोचन अम्च॑ आंगाला फार चोक्कट. बाळंतीण॑ बायकांला हे देणे आहे.
goshaalaaगोशाला.n.a cow pen where a large number of cows are maintained. भरून गायाला संरक्षणा कराला म्हणून बांधलते गायीच गोठा.उडुपीच जवळ नीलावरांतीन कोडवूरांतीन श्री पेजावर मठाच ल्हान-स्वामीजी गायांला संरक्षणा कराला म्हणून दोन थोर गोशाला बांधलाहेत॑.
goShTगोष्ट.n.an utterance.बोली.तो मझकड॑ एक गोष्ट पणीं सांगनास्क॑ गेलते मला इष्ट झाल नाही.
goShTगोष्ट.n.word.गोष्टशब्द in sm.
goShTगोष्ट.n.language.भाषा.तो अरवा येत आहे. अम्ही बोलाच तला कळनास्क असाला अत्ता अम्च॑ गोष्टांतच बोलुम्हणे.
goShT deNeगोष्ट देणे.vt.to give assurance. to promise.वचन देणे.
goTaaगोटा.n.a hard seed of a fruit.फलाच घट्टि बीं. गोट्टि. कोट्टा.
goTeeगोटी.n.glass marbles used for playing 'marbles'.गोलि. मझ पोरपणांत गोटी उदंड खेळलोंहे. ते खेळणमुळे अम्च सूक्ष्म शक्ति ("ऐम") वाढते.
goTee mithra~गोटी-मित्र.n.bosom pal.गाढ मित्र. प्राण-मित्र. आत्म मित्र. रिलैन्स मधे एक थोर आफीसर मझ "गोटी मित्र" आहे.
gothगोत.n.gothra.गोत्र.archaic form of gothra.
gothगोत.n.a mixed thing.मिळून असाच.
goTHaaगोठा.n.cow shed.गाय बांधाच ठिकाण. गाईच गोठा. गोशाला.मझ बापाच घरच॑ गाईच गोठांत॑ होतते तीन चार गायालीन वांसरूलीं पाह्यिंगाला म्हणून एक पोराला तेनी ठींगट्लोते.
goTHaaगोठा.n.a thatched enclosure. a thached hut.छप्पराच झोपडी.
gothaach bhaajiगोताच भाजि.n.a preparation of mixed vegetables.वेगळ॑-वेगळ॑ भाजिपाला चिरून घालून केलते एक पदार्थ.prepared on the bogi festival before Sankranthi.
gothra~गोत्र.n.tribal lineage tracing to ancient Saints.गोत. जुने काळाच (म्हणजे वेद काळाच) श्रेष्ट महर्षींच नावच कुल. (1) वसिष्ट, कौंडिन्य, मैत्रावरुणा हे ऋषींच नावाच तीन गोत्रहीं एकच प्रवराच आहे. (2) एकच गोत्रांत॑ असणारांच मध्ये वराड होताने म्हणून आहे.
gothra~गोत्र.n.tribe.वर्ग. जात. गोत.
goTkarNeeगोटकर्णि.n.an indoor game with seeds.पल्लांकुळि (tamil).
goTTiगोट्टि.n.a hard seed of a fruit.फलाच घट्टि बीं. गोटा. कोट्टा.आवक्काय लोणच्याला गोट्टिनिशी अंबा चिरून घालणे आहे.
gouravगौरव.n.honour. respect.मर्यादा. आदर॑.विश्व क्रिकटांत॑ सग्ळ्यांचींपक्षा जास्ति रण केलतहेनी सचिन टेंडूळस्कर म्हणाच अम्च देशाला एक गौरवाच गोष्ट आहे.
gouriगौरि.n.Goddess Parvati.पार्वती देवि.
gousaNगौसण.n.pillow/mattress cover.गवसण. ऊंशीला/अंथरूणाला धूळ लागनास्क॑ असाला घालाच पिशवीस्क॑ असाच साधन॑गवसणी in sm.
govaareeshengaaगोवारीशेंगा.n.cluster beans.एक रीतीच शेंगा. गवारीशेंगा. गोवर्धनशेंगा. गोर्धनशेंगा. कोत्तवरनकाय (tamil). गोवारीशेंगाच भाजि थोड कडु असेल तरीन तज रूच मला उदंड अवडेल॑.
govaNeगोवणे.vt.to string together flowers, beads etc.फूल, पोती असलते दोरांत ओवणे.
govaraaगोवरा.n.dried cake of cow dung used as a fuel.गोवर. गोवरी. चूल पेटिवाला उपयोग कराच वाळिवलते गयीच शेणखेड गामांत लांकड अणी गोवरा जळीवून सगडींते/शेगडींते संपाक कराच फार स्वादिष्ट अस्ते, कारण हळू शिजीवणामुळे पदार्थाच रूच बदलत॑ नाही.गोवरी/गोंवरी/गोवर in sm.
govardhanshengaaगोवर्धन शेंगा.n.cluster beans.गवारीशेंगा. गोवारीशेंगा. गोर्धनशेंगा. कोत्तवरनकाय (tamil).
graakग्राक.n.customer.ग्राकि. घेणार. ग्राहक (Hindi).from Hindi ग्राहक & Tamil.
graakiग्राकि.n.ग्राकि (tamil/Hindi) n customer.ग्राक. घेणार. ग्राहक (Hindi).from Hindi ग्राहक & Tamil.
graama~ग्राम.n.village.खेडेगांव.अमेरिका, यूरोप असल॑ देशांतल॑ ग्राम अग्गीन स्वच्छ असेल॑. तिकडल॑ बीद॑, वार॑-पाणी हे सगळीं नीट असेल॑, अणी तिकड॑ भाग्यवंत लोक॑ थोर-थोर घर बांधिगट्लास्तील॑. हेज बरोर पाह्ताना अम्च देशाच ग्रामांच स्थिति फार मोस॑ म्हणूनच सांगाम॑.
graamadevathaaग्रामदेवता.n.goddess revered by a particular village.गांवाच देवी.
graamapradeshग्रामप्रदेश.n.rural areas.जनसौकर्याच अभिवृद्धी बरोर झाल नाहीत॑ ठिकाण.
graha~ग्रह.n.planet revolving around the Sun or a star.सूर्याला/ नक्षत्राला प्रदक्षिणा कराच एक गोळ मंडल.प्ळूटो एक ग्रह नहो म्हणून शास्त्रज्ञ निश्चय केल्यावर अत्ता सूर्यमंडलांत॑ नौ ग्रहांच बद्दिल आठ ग्रहच आहे अस॑ सांगतात॑.Note :- not to be confused with गृह meaning ' house/home'.
grahabaLa~ग्रहबळ॑.n.the support of one's astrological stars/planetary position.राशिबळ॑.(1) अम्च उद्योग बदलीवाच पुढे अम्च ग्रहबळ कस आहे म्हणून पाह्यिंगणे चोखोट. नाहीतर॑, असाच काम जाऊन बिदींत ओठाकांमते/होठाकांमते पडेल॑. (2) अम्च गृहमंत्रीच ग्रहबळ बेष आहे म्हणून कळत॑. थोर न्यायालयांत॑ पणीं त्येंचवर कित्ति 'एविडेन्स' देलतरीन त्येना काहीं कराला झाल॑ नाही.
grahachaarग्रहचार.n.malevolent astrological influence of planets.ग्रहाच स्वाधीना मुळे होयाच वंगळ॑ (ओंगळ॑) अवस्था.त्यांस काय ग्रहचार की, हात ठिवलते तेवढ॑ व्यापारांतीन फार नष्ट झाल॑.
grahaNa~ग्रहण.n.eclipse.भूमि, चंद्र, सूर्य हे तीनीं एकेच पंक्तींते येताना सूर्य अथवा चंद्र दिसनास्क॑ होयाच.पुरातन काळापसूनच अम्च॑ ऋषी-मुनी लोके सूर्यग्रहण अणी चंद्रग्रहण असलत्यांविषीन बरोर कळींगून होतत्यामळे प्रति वेळीन ग्रहण याच दिवस अणी समय बरोर सांगत होते.
grahaNa~ग्रहण.n.comprehension.समजणे. मनांत होणे.अम्च देशांत लेंकरांना पहिल॑ धरींगुन विषय ग्रहण कराच शक्ति बरीस अठवण करींगाच शक्ति वाढिवाला शिकून देतात॑.
grahashaanthiग्रहशांति.n.propitiation of planets.ग्रहांला कराच शांतिपूजा.not to be confused with गृहशांति, meaning 'ritual purification of house'.
granthhग्रंथ.n.an ancient tome.जुने काळांत॑ लिव्हलते महत्व विषयांच पुस्तक.अम्च॑ देशांत पुरातन काळांत॑ ताडपत्रांत (ताळिपत्रांत॑) लिव्हलते महत्वाच हजारों-हजार ग्रंथ बरोर पाह्यिंगना-ते-करतां नाश होत आहे, म्हणून ते अग्गीन "डिजिटैस" कराच श्रम अत्ता सर्काराकडूनीं, तसेच, वेगळ॑ संस्थां कडूनीं होत आहे.
granthhaalaya~ग्रंथालय॑.n.library.पुस्तकालय॑. वाचनालय॑. लोकांस वाचाकरतां ग्रंथ मिळिवून ठिवलते स्थापना.इतपर॑ तेवढ॑ देशांतीं 'इंटरनेट' ग्रंथालयच येणार. अगाउस्क॑ थोर 'बिलडिंग' (बांधणी) असना. तेवढ॑दनांसीं त्यंच कंपूटराच मूल्यान॑ कोण्त ग्रंथपणीं वाचाला होईल॑.
greeShma~ग्रीष्म.n.summer season.उन्हाळाच ऋतु/काळ॑.
grihगृह.n.house.घर.
grihaNiगृहणि.n.housewife. the lady of the house.घर चालिवणार स्त्री.
grihapraveshगृहप्रवेश.n.ceremony conducted before occupying a house.घरांत॑ राहाच पुढे कराच पूजा.गृहप्रवेशाच सणांत॑ एक गाईला घरांत॑ घूसिवून तज पूजा करणे आहे.
grihashaanthiगृहशांति.n.a ceremony conducted for the benediction of a home.वास्तुशांति.मझ॑ मित्राच कुटुंबांत॑ एक दोन ओंगळ (वंगळ॑) विषय झाल॑. घर वास्तु प्रकार नाही म्हणून, तेनी नंतर॑ एक गृहशांति केलांपिरी सग्ळीन बरोर झाल॑.
grihasthha~गृहस्थ.n.a family man.कुटुंब चालिवणार.
grihasthhaashramगृहस्थाश्रम.n.the second of the four 'ashramas' in a man's life.एक मनुषाच चार आश्रमांत दुसर॑ आश्रम॑.
guchakeeगुचकी.n.hiccup.गोचका. उचका. उचकी. चूळ भरींगून पाणी सात दपा थोडक थोडक॑ गिळलतर॑ गुचकी राह्यील म्हणतात॑.
guchcHaaगुच्छा.n.a bouquet. bunch of flowers.फूलाच गुच्छा.
gudaamगुदाम.n.warehouse.गोदाम. माल दत्तन ठिवाच एक मोट्ठ॑ खोलि.मझ मामाला पहिल॑-पहिल॑ बॅन्कांत॑ काम मिळताना त्यांस॑ एक गुदाम पाह्यींगाच (सांभाळाच) जवाबदारी देले. (म्हणजे गोडौण-कीपराच काम).
guDaghaaगुडघा.n.knee.पांयांच एक भाग. गुडिगा. गुडिघा. गुढगा. गुढिघा. घुडगा. हे काळांत 50 % लोकांना (प्रत्येक म्हणून बायकांस॑) 45-50 वर्षाच वय झाल तर॑ गुडघाच वेदना फार जास्त असत॑. पोणावांटा लोक॑ गुडघाच 'ओपरेषन' करींगतात॑.गुडघा in SM. Better गुडिघा.
guDeeगुडी.n.a decorated pole erected in front of the house on the lunar New Year's day.गुढी. गुडीपाडवाव सणाला घराच समोर बांधाच अलंकार केलते काठी.अगाऊच काळांत गुडीपाडवाच दिवसी मझ॑ आजा घरच॑ बाह्येर गुडी बांधत होते. पण, अत्ता अग्गीन मी देवघरांतच॑ मंदासनांतच॑ गुडी बांधूनटाकतों.
guDee paaDavaaगुडीपाडवा.n.festival of lunar New Year's day.चंद्रमान नव वर्षाच सण. गुढीपाडवा.
guDhagaaगुढगा.n. knee.पांयांच एक भाग.गुडघा. गुडिगा. गुडिघा. गुढिघा. घुडगा. गुडघा in SM. Better गुडिघा.
guDheeगुढी.n.a decorated pole erected in front of the house on lunar New Year's day.गुडी. चंद्रमान नव वर्षाच सणाला घराच समोर बांधाच अलंकार केलते काठी.अगाऊच काळांत गुडीपाडवाच दिवसी मझ॑ आजा घरच॑ बाह्येर गुडी बांधत होते. पण, अत्ता अग्गीन मी देवघरांतच॑ मंदासनांतच॑ गुढी बांधूनटाकतों.
guDhee paaDavaaगुढीपाडवा.n. festival of lunar New Year's day.चंद्रमान नव वर्षाच सण. गुडीपाडवा. गुढीपाडवाच दिवसी 'सीमा भवन', हैदराबादांत गुढी बसिवून, नव॑ पंचांग तज बरोर ठिवून एक पुरोहित तज पूजा करतील॑. नंतर पंचांगश्रवण (नव वर्षांत काय मुख्य चोखोट/वंगळ होयील की तज व्याख्यान) करतील॑.
guDhighaaगुढिघा.n.knee.पांयांच एक भाग. गुडघा. गुडिघा. गुढगा. गुढिघा. घुडगा. गुडघा in SM. Better गुडिघा.
guDigaaगुडिगा.n.knee.पांयांच एक भाग. गुडघा. गुडिघा. गुढगा. गुढिघा. घुडगा.गुडघा in SM. Better गुडिघा.
guDighaaगुडिघा.n.knee.पांयांच एक भाग. गुडघा. गुडिगा. गुढगा. गुढिघा. घुडगा. गुडघा in SM. Better गुडिघा.
guDuguDuगुडु-गुडु.n.noise resembling gudu-gudu.गुडु-गुडु शब्द.
guDuguDu paanDiगुडु-गुडु पांडि .n.name of a nomadic tribe.एक ठिकाणी स्थिर होऊन राह्यनास्क॑ इकड॑-तिकड॑ हिंडून फिराच एक वर्ग. बंजारा.from Tamil.
guhaaगुहा.n.cave.गुहा.विशाकपट्नमांत्सून दोनशे किलोमीटर दूर असाच "बोर्राकेव्स" गुहा एक पाह्याजोक्त ठिकाण आहे, अस॑ ऐकून मी अणी मझ बाईल थोड वर्षा पुढ॑ तेथ गेलहोतों.
gujareeगुजरी.n.scrap business.उपयोग नाहीते लोकुंडाच अथवा वेगळ॑ धातूच व्यापर.
gujareeगुजरी.n.a place where old second hand items are sold.उपयोग करून जुने झालते वस्तु विकाच ठिकाण.बांगळूरांत॑ पोणावांटा गुजरीच दुकान तुरकडेच चालिवतात॑.
gujgujगुजगुज.n.whispering to one another.बोलणेंत॑ दुसरेंला मिळिवनास्क॑ एकालेकांकडे उण॑ शब्दांत बोलणे. uisमझ॑ बहिणीच लोंकीं सूनीं कोण्त सोयरीकांच घरच सण, नाही, वेगळ॑ काईं कार्यक्रमाला गेलतरीन, वेगळ॑ दुसरेंकडे बलणे की हांसणे की करनास्क एक कोनेंत बसून गुजगुज बोलत असतील.
gujgujNeगुजगुजणे.vi & vt.to whisper.गुजगुज बोलणे.
gulaabगुलाब.n.rose flower.रोजाफूल॑.
gulaab jaamooNगुलाब जामूण.n.a type of sweet preparation.एक प्रकारच गुळचीट पदार्थ.गुलाब जामूण कराला पह्जते सामग्री पूरा मांडींगून बसापक्षा तजच तय्यार असाच पीठ घेऊन करणे सुलुभ असत॑.
gulaabiगुलाबि.adj.rosy. pink.गुलाबाच रंगाच॑.
guLcheeTगुळ्चीट.adj.sweet.साखरेच स्वाद. गुळ्मट.मधुमेघाच रोग (डयाबीटिस) असणारांना गुळचीट पदार्थ अधीक खाम॑ म्हणून वाटणे सहज असलतरीन, तसल॑ समयांत मन्न घट्टि करींगून (मन्न दृढ करींगून) खायनास्क असाम॑
guLigaaगुळिगा.n.a medicinal tablet. a pill. ओखदाच मात्रा.ल्हान लेंकरांस॑ गुळिगा गिळाला होयना म्हणून तेच ओखद गुळ्चीट लेह्य रूपांत॑ देणे आहे.
gulika kaalगुलिक काल.n.a specified period of one and a half hours of each day during which any activity leads to its repetition. प्रत्येक दिवसाचीं दीड घंटेच काळ. हे काळांत कराच काम पुन्हाहीं होईल म्हणून आहे. Note :- this period changes from day to day. It is an auspicious time for starting activities like building a house, acquiring an asset etc. But marriage should not be conducted during this period for obvious reasons. And a dead body should not be taken out of the house to the cremation ground during Gulika.
gulkandगुलकंद.n.rose petals cooked in thick sugar syrup.साखरेच पाकांत॑ शिजिवून तय्यार केलते रोजाफूलाच दळ॑. एड्वर्ड रोजाफूलाच गुलकंदाला तजच एक चोक्कोट वास अस्त॑.
guLmaTगुळमट॑.adj.sweetish.गुळ्चीट रूच॑.
guLmaTगुळ्मट.adj.sweet.साखरेच स्वाद. गुळ्चीट.
guLoombगुळूंब.n.a swelling (particularly on the forehead/head) due to an impact.(कपाळ अथवा डोस्केंत॑) घावामळे होयाच सूजल्हान लेंकरे चालाला शिकताना कित्येकदा मागेपठीस पडून सूळ सोसाला होईनास्क रडतील, अणी डोस्केला गुळूंब होईल. ते वेळाला रूमालांत "ऐस" गुंडाळून तज वर शेकलतर दुखणे समच उणे होईल.गुळुंब/गुळुंभ/गुळूम/गुळुंबा/गुल्म in sm.
guLu guLuगुळु-गुळु.n.gargle.पोटांत॑ उतरिवनास्क॑ गळांत॑ पाणी लागिवणेदोन दिवसांतसून मला घसाच कंड (खाज) होतहोत॑. नंतर, मीठाच पाणी गुळु-गुळु केलांपिरी थोडक॑ उण॑ झाल॑.खुळखुळ in sm.
guLu guLuगुळु-गुळु.n.gurgling noise.गुळु-गुळु शब्दअम्ही र्राणाच आंत चालून जात असताना बाजूच कोठकी एक नदीच गुळु-गुळु शब्द ऐकत होत॑
gumaasthaaगुमास्ता.n.clerk.क्ळार्क (English).रोबर्ट क्लैव पहिल॑-पहिल॑ भारताला येताना ईस्ट इंदिया कंपनींत॑ एक गुमास्ता होऊन आले, पण वापस इंगलंडाला जायाच वेळी भारताच गवर्णर-जेनरल म्हणून गेले.
gumpगुंप.n.crowd.भरून लोकां भीड॑.हैदराबादांत कोण्त प्रदर्शन/एक्सिबिषन असल तरीन कोठकींत्सून/कोठसूनकी गुंप येऊन जाते. बंडी पार्किंग कराला पणीं ठाम मिळत नाही.from Kannada
gumpगुंप.n.heap.ढीगारा. एकच ठिकाणी जोडून ठिवणे.कॉरपरेषनांतून अम्च बीद झाडाला याच मनुष वाळून पडलसाच पान पूरा एक गुंप करून ठिवूनटाकून जातो. नंतर॑ एक वार॑ बडिवताना ते अग्गीन पुन्हा इकडे-तिकडे उडून जात॑.from Kannada
gump-gunDaaLNeगुंप-गुंडाळणे.vt.to mill around.गुंप करणे.बीदींत॑ एक ॲक्सिडंन्ट (अपघात) झालतर, ते मनुषाला केवढ॑ लोक्कुर ॲस्पत्रीला बलाईंगून जाम॑ म्हणून पाह्यनास्क॑ लोक॑ तिकड नुस्त-गुंपगुंडाळत तमाषा पाह्त असतील॑.
guNa doSha~गुणदोष.n.merits and demerits. strength and weakness.(योग्यता निश्चय कराच) गुणेईं दोषीन.काय तरीन एक थोर कार्य नव॑ होऊन आरंभ कराच पुढे तज गुणदोष पाव्हून, ते अम्हाला बाधा कस॑ करेल॑, हे पाह्णे चोक्कोट॑.
guNa~गुण॑.n.virtue.चोखोट स्वभाव. चोखोटपण॑.मनुषाला वाचणे, चांगुलपण॑, ऐशवर्य हे सर्वाबरीस सात्व गुण॑ असणेच अधीक अवश्य. ते नाहीतर॑ वेगळ॑ सर्वीन व्यर्थच॑ म्हणून मझ अभिप्राय.
guNaaगुणा.n.multiplication.गुणना कराच क्रीया
guNaaगुणा.n.product of multiplication.एक संख्याला अण्खीएक संख्यांतून गुणा करून मिळाच संख्यागुणांक in sm.
guNavanthगुणवंत.adj.a person of excellent character.चोखोट स्वभाव असणार.
gunDaaगुंडा.n.a rowdy.समाज विरुद्ध मनुष. समाजांत दादागिरि करत हिंडाच मनुष. समाजाला दटावण करणार॑. बांगळूरच पोलीस मद्य-मद्य गांवाच गुंडा लोकांस अग्गीन धरून किलुपांत॑ घालणे आहे.
gunDaaLNeगुंडाळणे.vt.to wind around.गुंडाळणे.मझ॑ पांयेच हड मोडलतम्हा प्ळास्टर घालाच बद्दिल तज वर एक पट्टि नीट गुंडाळून सोडले.
gunDaaLNeगुंडाळणे.vi.to coil around.गुंडाळणे.एक दिवस अम्च घरच मागेपटीस नळीच खाले पाणी सोट्टेत असाठिकाणी एक सर्प गुंडाळून पडलसाच पाह्यलों.
gunDaaLNeगुंडाळणे. vt.to roll up.लोळिवून ठिवणे.अम्ही लेंकरे असतम्हा पलंगांत॑ निजाच बद्दिल खाले अंथरूणांत निजत होतों अणी पाष्टे उटल-की-नाही त्यंच-त्यंच अंथरूण तेनी-तेनी गुंडाळून वर ठिवत होतों.
gunDaaLNeगुंडाळणे. vt.to bundle up.मूटा बांधणे.नेसींगटलते कापड भोईच वर तेरा-पेरा पडलसाच पाव्हून तज माय ते पूरा गुंडाळून वर काढून ठिवले.
gunDaaLNeगुंडाळणे. vt.to wind up.संपिवणे. व्यापार फार मोस॑ होत म्हणून तीन-चार महिनेंतच॑ तेन्ही बिसिनस गुंडाळींगून गेले.
gunDaaLNeगुंडाळणे. fig.to hang around.एकच ठिकाणी हिंडत-फिरत असणे. जवळपासच फिरत असणे.(1) "तो कां इकडच गुंडाळत अस्तो. तला वेगळ॑ काम नाहीका ? (2) कोण्त क्षेत्राल गेलतरीन काम नाहीते ब्रोकर-लोक॑ कसतरीन पैसे उपडाम॑ म्हणून अम्च मागेच गुंडाळत असतील॑.
gunDaaLNeगुंडाळणे. fig.to embezzle.एमारिवून पैसा करणे (एमारिवणे-tamil).यंदा कोणाला अम्च वोट देम की कळत नाही. येणार लोक पूरा पैसा बेष गुंडाळींगून जातात.
gunDeeगुंडी.n.a metal vessel for cooking small quantities of food.गुंड. एक ल्हान भांडि. रात्रीच वेळ शीताच गुंडींत थोडक॑ पाणी घालून ठिवून, पुढ॑च दिवसी पाष्टे नंखर॑ मीठ घालून खाल्लतर॑ आंगाला चोक्कोट म्हणतात॑.
gunDiगुंडि.n.button.बटण (English). साठ-सत्तर वर्षाच पुढ॑ गुंडि घालाला अंगींत तला म्हणून नुस्त डोबूर होत॑. तजांतून सोनेच गुंडि वेगळ म्हणून घालत होतों. अत्तलीकड॑ घेतानच अंगींत 'प्लास्टिक' गुंडी शिवून असत॑.
gunDuगुंडु.n.a metal vessel for cooking small quantities of food.गुंडी. गुंडु-पात्र. एक ल्हान पात्र. एक ल्हान भांडि.
gundu paathra~गुंडु-पात्र.n.a metal vessel for cooking small quantities of food. गुंडी. गुंडु. एक ल्हान पात्र. एक ल्हान भांडि.
gunhaaगुन्हा.n.knavery. offence. transgression. fault.चूकाच खोडी. अपराध. अन्याय. दोष.
gunjaaगुंजा.n.small red seeds of the Red Sanders (Red Sandalwood) Tree. तंबड॑चंदन वृक्षाच बीं. रक्तचंदन वृक्षाच बीं केरळांत॑ ल्हान लेंकरूच रूपांत॑ असाच श्रीक्रिषणाच देऊळांत अग्गीन देवाला फार एष्ट होईल म्हणून गुंजाच संभावना द्याच पद्धत आहे. Note :-. Red Sanders or Red Sandalwood tree in not aromatic like the normal sandalwood tree. Being rare it is in the Endangered list and is very expensive because of great demand in China and East Asia for making aphrodisiac drugs and classical Chinese hardwood furniture. गुंज in sm.
gunjaaगुंजा nsmall red seeds with black eye of the Abrus precatorius creeper plant, also known as रत्ती in Hindi.रत्ती गुंजा वेलाच तंबड॑ बीं (काळ॑ बिंदु असाच॑).रत्ती वेलाच गुंजाच वजन फार कृत्य असते म्हणून जुनकाळांत॑ सोनार लोके सोनेच वजन त्यांत करत होते. गुंज in sm. (1) 96 ratti seeds weigh 1 tola. (2) this is a very poisonous seed and can be fatal if swallowed after chewing well.
gunjaaगुंजा.n.sit-ups while holding ears with fingers.गुंजि. बसकी. बस्की.(1) गुंजा घाट्लतर॑ अम्च बुद्ध वाढते म्हणून थोड दिवसा पुढे पेपरांत एक रिपोर्ट आल होत॑. तेईं, अम्च कान होडून-धरून गुंजी घाट्ल तर॑ अणखीं फार विशेष म्हणून लिवल होते.(2) मझ॑ मित्र मझ बरोर पोटी घालून शंभर गुंजी घाटला.
gunjaa laaDuगुंजालाडु.n.a ball shaped sweetmeat.बूंदीलाडु. एक प्रकारच गुळ्चीट लाडु.सुलुभ अस्त म्हणून सणाच संपाकी लोक गुंजालाडूच बरोर खाराबूंदी पणीं करणे आहे.
gunjiगुंजि.n.sit-ups.गुंजा. बसकी. बस्कि.
gunthaaगुंता.n.tangle of hair, rope etc.केंस, दोरा असलते लोक्कर उकलून काढाला होयनास्क॑ गुंतून असाच अवस्था.केंस लांब असलतर॑ सुलभान गुंता होवुया म्हणून की, नाही, साळे कॉळेजाला पाष्टे अवसरांत॑ जाताना वेणी घालींगाला उदंड वेळ होईल म्हणून की, उदंड बायकापोरी त्यंच केंस कापिंगून ’बोप’ करींगतात॑.
gunthaNeगुंतणे.vi.to get entangled.अडकणे. एकालेक सांपडिंगणे.ते पोरीला भरून केंस होत-ते-करतां वेणी घालाला केंस विंचरताना प्रति वेळीन फणी केंसांत गुंडाळून गुंतून जात होत॑ म्हणून शेवटी केंस "बोप" करूनटाकली.
gupchupगुपचुप.adv.stealthily. secretly. unobtrusively.कोणालीन कळिवनास्क॑. अम्च कार्यक्रम बेष चालताने म्हणून अम्च विरोधी पक्षांतून कोणकी कार्यक्रम चालत असतान गुपचुप आंत घूसलते विवर॑ अम्हाला मिळ्ल॑.
gupchupगुपचुप.adv.quietly. silently.शब्द नाहीस्क॑.अवमान सोसाला होइनास्क॑ तो गुपचुप उतरून बाहेर गेला.
guptha~गुप्त.adj.not prima facie seen. hidden.गूढ. व॑रून दिसनास्क असाच॑.गंगा, यमुना अणी सरस्वति हे तीन नदीईं वाराणसींत मिळाच स्थलाला ’त्रिवेणि-संघम’ म्हणतात. पण, सरस्वति नदीच प्रवाह वरून दिसना. भूमीच खालेसून गुप्त होऊन हे प्रवाह होत॑ अणी ते करतां हे नदीला ’गुप्त-गामिनी’ म्हणतात.
gurooगुरू.adj.long sound or note.लांब स्वर. दीर्घ स्वर. लघुच॑ विरुद्ध स्वर.
guruगुरु.n.the planet Jupiter.गुरु ग्रह. uisसूर्यमंडलांतल॑ आठ ग्रहांत॑ सगळ्यांचीन पक्षा मोठ्ट आहे गुरु-ग्रह.
guru dakShiNaaगुरुदक्षिणा.n.respectful offerings made to guru for having imparted knowledge.ज्ञानदान केलते गुरूला द्याच संभावना.जुने काळांत, म्हणजे ऐतिहासिक काळांत, विद्यादान व्यापार म्हणून न्होत॑ म्हणून गुरुकुलांतून वापस याच वेळी ब्रह्मचारी लोके गुरूला मर्यादा कराला त्यंच-त्यंच शकीजोक्त॑ गुरुदक्षिणा देत होते. पण, हे काळांत विद्याभ्यास नुस्त॑ एक व्यापारास्क॑ झालाहे अणी गुरुदक्षिणाच बद्दिल साळेच फीस भरूनटाकतात॑.
guru droha~गुरुद्रोह.n.treachery against guru.गुरूला कराच द्रोह. क्ळासांत॑ पंतोजी कष्टि भोगून शिकिवलांपिरि पणीं, परीक्षा लिवताना "कोपी" केल तर॑, ते एक नीच कार्य म्हणूनच सांगट्लतर॑ मात्र पुरना, ते एक गुरुद्रोह केलते समान॑ म्हणून सांगट्ल तर पणीं चूक असना.
gurukripaaगुरुकृपा.n.blessings of the guru.गुरूच आशिर्वाद.
gurukulगुरुकुल.n.hermitage where brahmacharis are educated.ब्रह्मचारींस॑ शिकिवाच आश्रम. अत्तलीकडे फार ठिकाणी वेगळ-वेगळ मठाच॑ अधिकारी गुरुकुल अण्की साधारण साळे हे दोन्हीं मिळिवून चालीवत आहेत॑. लेंकरांना गुरुकुलांत पास्टे (पाष्टे) वेद शिकिवितात॑, अणी दुपारी साधारण शिक्षा देतात॑.
guruprasaadगुरुप्रसाद.n.benediction or the gift of knowledge from a guru.गुरूच अनुग्रह.
guruthva~गुरुत्व.n.reverence for the guru. reverence to elders.गुरुला दाखिवाच मर्यादा. थोरळेंस दाखिवाच मर्यादा.अत्ताच काळाच कित्येक गुरूंच नीच रीतीच वागणे पाह्ताना त्यंच व॑रल॑ गुरुत्व उणे होत जाणेंत आश्चर्य काहीं नाही.
guruvaarगुरुवार.n.Thursday.बुधवाराच नंतर याच दिवस. बृहस्पतिवार. ब्रेस्तवार.
guTTiगुट्टि.n.a medicine given to infants.ल्हान लेंकरांस द्याच ओखद (औषद).

No comments:

Post a Comment