Sunday, May 15, 2016

k (क) 3 (kaShanD To konaDe~)




.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
kaShanDकषंड.n.residue sticking on the inside bottom of a vessel (immediately) after cooking.कषंडी. खरड॑. चूलांतून उतरीवलते भांडीच बुडांत॑ चिकटून असाच पदार्थाच राड. तूप तावल नंतर भांडीच खाले उराच कषंडाच बरोर नंखर मीठ अणी करेपाक घालून भाजून खायाला बेष असेल॑.
kaShTकष्ट.n.difficulty.प्रयास.इषोबाच परीक्षांत॑ शेवटीच दोन प्रश्न उदंड कष्ट होत॑म्हणून सोडूनटाकलों.
kaShTa-naShTकष्ट-नष्ट.n.varied negative experiences in life. जीवनांतल॑ विध-विध कष्टाच अनुभव.लेंकरांस वाढिवताना त्यंच सुख-सौकर्य मात्र पाह्यींगून वाढिवलतर॑, नंतर॑ थोरळे होताना जीवनांत कष्ट-नष्टाच अनुभ नाही झालत्यामळे कित्येकदपा तेनी कष्टी भोगामत॑ पडूनजाऊया.
kaShTa-sukha~कष्ट-सुख.n.ups and downs in life.जीवनांतल॑ विध-विधाच अनुभव, चोक्कोटीन कष्टाचीन. कष्ट-नष्ट.जीवनांत कष्ट-नष्टाच बेष अनुभ झालत्यांस कसलत॑ अडचण आलतरीन सांभाळाच सामर्थ्य असेल॑.
kaShTakaaLकष्टकाळ.n.difficult times. bad times.दुरवस्था. विषमकाल॑.कष्टकाळ येताना मात्र देवाला अठींगापक्षा सदायीं देवाला स्मरण करणे चोखोट॑.
kaShTi bhgaNeकष्टि भोगणे.vi.to suffer.कष्ट अनुभव करणे.सोमाळियांतीन, सुडानांतीन देशाच आंतल॑ भांडा-भांडींत॑ लोक कष्टि भोगाच पाह्यलतर॑ मनाला फार संकट वाटते.
kasthooreeकस्तूरी.n.the fragrant musk from musk-deer. कस्तूरि हरणांतून मिळाच एक चोखोट गंधाच/वासाच वस्तु.कस्तूरी हरण हिमालय पर्वत प्रदेशांत॑ आसत॑.
kaTaakShकटाक्ष.n.side-wise glance.डोळेच कोनेंतूं पाह्णे.कोडी केलत॑ लेंकरूला शिवा देत असताना ते लेंकरू तज बापाच खर॑ भावना कळींगाला कटाक्ष दृष्टींतून कळींगून हांसाला आरंभ केला.
kaTaareeकटारी.n.dagger.एक ल्हान कत्तीच आयुध. (कत्ति - tamil for sword). खड्ग ;तो हत्यारोपांतून चुकींगाला मुख्य कारण काय होत॑ म्हणजे, न्यायालयांत तज विरुद्ध तर्क होत असताना साक्षीप्रमाण म्हणून वादीच वकील दाखिवलते कटारी वध कराला प्रयोग केलत॑ नहो म्हणून आरोपीच वकीलाला स्थापना कराला झाल॑, हेच॑.कटार in sm.
kaTdoraaकटदोरा.n.a twisted cord or twisted silver chain worn around the waist below the navel.कडदोरा. बोंबीच खाले, कटींत/कमरांत॑/मादांत॑/माजांत॑ बांधाच रुपेच दोरा. ल्हान लेंकरांला कटदोरा बांधताना कटीला घाव लागनास्क॑ पाह्यींगाम॑.(1) कटि+दोरा. (2) कडि+दोरा. (3) कड+दोरा. (4) कटि/कडि/कड/कट/कडे means "hip" or "flank". (5) This is usually worn by infants.
kaTeeकटी.n.flank of the hips.मादाच/माजाच बाजूच भाग. कडि. कडे. कड.दुकानबीदींत॑ चालून जात असताना ते म्हातारेला गाय डिवून कटीला घाव झाल॑.
kaTee gheNeकटी घेणे.vt.to carry (a child) on the side of the hips.लेंकरांला मादाच एकबाजूकडे उच्चलून घेणे. कडे घेणे. कडि घेणे.कटी घेऊन कटी घेऊन ते लेंकराला दंडक झालाहे म्हणून अता किती जवळ जाम॑ म्हणून असलतरीन अपाप चालना म्हणतो.कटि means side or flank of hips.
kathhaaकथा.n.story. tale.खाणी.इंदोनेश्या, कंबोडिया असलत॑ दक्षिण-पूर्व एश्याच देशांत चालिवाच रामयणाच कथा, भारताच रामायण कथाच बरोर पाह्ताना कित्येक ठिकाणी वेगळ॑ असत॑.
kathhaakaalakShepकथाकालक्षेप.n.a type of narrative folk entertainment.कथाप्रसंग॑. हरिकथा. तमिल-नाडांत॑ कथाकालक्षेप प्रचार होयाला मुख्य कारण तंजाऊर मराठी लोकांच संपर्कामुळे आहे, अस॑ सांगतात॑.
kathhaaprasanga~कथाप्रसंग॑.n.a type of narrative folk entertainment.हरिकथा. कथाकालक्षेप.विशाखा हरीच कथाप्रसंग ऐकलतर॑ वेगळ॑ कोण्तीन तजपक्षा बेष असना म्हणून अग्गिदनीं सांगतील॑, तेवढ॑ बेष असेल॑ ते.
kathhakकथक.n.a classical dance of Northern India.उत्तर भारताच एक नृत्य शैली.दक्षिण भारतांत भरतनाट्यम, कुच्चिपुडी, मोहिनिआटम, कथकळी अस॑ विध-विध रीतीच नृत्य आहे तरीन, उत्तर भारतांत॑ मुख्य होऊन कथक मात्रच आहे.
kathhakaLeeकथकळी.n.a classical dance of Kerala State.केरळ संस्थानाच एक नृत्य शैली.कथकळींत॑ नृत्य कराच कलाकार अभिनय-रस अणी मुद्राच भरून प्रयोग करतात तरीन, खाणीच विवरण पूरा मागे बसणार लोके सांगत असतात॑.
kaTHinकठिन.adj.difficult.कष्ट. प्रयास.हे वर्षाच एस.एस.एल.सी. परीक्षांत॑ इषोबाच परीक्षा थोड कठिन होत॑.कठीण in sm.
kaTHorकठोर.adj.hard hearted.उदंड॑ कठिन मनाच॑.रावणासुर पंडित होता तरीन कठोर अणी मूर्ख होता.
kaTHorकठोर.adj.cruel.उदंड॑ दुष्ट मनाच॑.मुस्लीम तीव्रवादि लोकांच मन्न॑ फार कठोर असत॑. थोडकपणीं दया-दाक्षण्य दाखिवनास्क॑ दुसरेंस मरिवणे त्यांस एक सर्वसाधारण विषयास्क॑ झालाहे.
kaTTaaकट्टा.n.sliced wood, ready to work on. wood other than what is used as fuel.कापलते/काटलते लांकड॑.(1) जुन॑ काळच एक मेज अम्च घरांत॑ आहे. तज वर्च भाग पूरा खजून गेल-ते-करतां ते रिपेरी कराला 4’ x 2 ½’ मापाच एक कट्टा सुताराला सांगून आणिवलों. (2) एक दहा पंध्रा वर्षाच पुढे पतोरी 'टीक' कट्टांतून कवाड, खिडकी, 'फर्नीचर' वगैरा करणे साधारण होत॑. पण, टीकाच माघ/मोल उदंड॑ जास्ति झालामुळे अत्ताअग्गीन प्लैवुडाच उपयोग सर्वसाधारण झालाहे.
kaTTu~कट्ट॑.n.decanted thin portion of dhal cooked in water.वरणाच नित्तल भागपोटाच तंटा असलतर॑ कट्टाच भातीन ताक भातीन मात्र खाणेच चोखोट॑.कट in sm.
kaTTu~कट्ट॑.n. a tied bunch (of any thing).बांधलते काहीं एक सधन॑. uis(1) तीन कट्ट॑ मोळकीरेला दुकानवाला पांच रुपे विचारला. (2) मी भाजीपाला घ्याला निघाच वेळ दोन कट्ट॑ कोत्तमल्लि पणीं आणाला मझ॑ बाईल मला सय केली.from Tamil.
kavaaDकवाड.n.door.दार.कवाड म्हाणाच एक जुने मराठी गोष्ट आहे अणी महाराष्ट्राच लोक कवाडाला दार म्हणून सांगतात॑.
kavaaDकवाड.n.shutter of window or door.खिडकी अथवा कवाडांत॑ झांकालीं उघडालीं होयाच व्यवस्था.वार॑-पाऊसांत॑ कवाड बडिवनास्क॑ असाला कोंडी घालून ठिवाम॑.
kavachकवच.n.armour vest.युधाला जाताना आंगाला रक्षा कराला उपयोग कराच लोखंडाच/लोहेंच साधन॑.सूर्य भगवानाच अनुग्रहामुळे उजतानाच कर्णाला आंगांत॑ कवच होत॑. ते कवच असापर्यंतीन कोणालीं कर्णाला वध कराला होयना म्हणून होत॑.
kavaDaaकवडा.n.cowrie.एक विधाच शंख. कवडी.दायकट्टम, पल्लांकुली असलते खेळ खेळताना कवडा वापरणे आहे.
kavaDeeकवडी.n.cowrie.एक विधाच शंख. कवडा.हे काळांत लेंकरे लूडो, स्नेक-अंड-लॅडर असलते खेळ खेळताना कवडीच बदल डैस वापरतात॑.
kavalकवल.n.roofing tile.ओडु (Tamil)पाऊस जास्ती पडाच समुद्राच कांठशीच प्रदेशांत कवलाच छताच घर भरून पाव्हूया. कौल in sm.
kavaLaNeकवळणे.vt.to seize with the mouth.तोंडांत्सून चावून काढणे. तोंडांत धरणे.घरच॑ मागे पटीसच आडाच बाजू सरप एक बेटकोळीला कवळून गिळाच पाह्यलों.
kavaLaNeकवळणे.vt.to stuff into the mouth.तोंडांत भरींगणे.अमेरिकांतेच उजलते अमच॑ लोकांच लेंकरे तिकड मिळाच "फास्ट-फुड" खाताना, दोन हातावाटे धरींगून तोंडांत कवळींगाच पाह्ताना मला राग पेटींगून येईल॑.
kaveeकवी.n.poet.कविता लिव्हणार. काव्य रचना करणार. महाकवी काळीदासाला संस्कृत भाषांत॑ सग्ळ्यांचीनपक्षा सर्व प्रथम कवी म्हणून मान्य करतों.
kaveeTHकवीठ.n.wood-apple fruit.एक विधाच फल. खवीट. (1) गणेश चतुर्थीच सणांत॑ देवाला कवीठाच नेवेद्य (नैवेद्य) करणे आहे. (2) कवीठाच पंडू बाह्येरून घट्टि असलतरीन आंतल॑ पदार्थ मृदू असेल॑ अणी तज बरोर गूळ मिळिवून पानक करणे आहे.कवठ in sm.
kavithaaकविता.n.poem.काव्य.भारताच स्वातंत्रसमराच वेळ तमिल-नाडाच सुब्र्हमण्य भारती ह्येनी लिव्हलते देशप्रेम कविता उदंड प्रसिद्ध झाल॑होत॑. असल॑ देशप्रेम कविता ते वेळी भारतांत॑ वेगळ॑ कोणीन लिव्हलोत नाही म्हणाच एक विशेष कार्य आहे.
kaykeeकायकी.pron.some (or a) thing not known.कळनाते (एक).
keddeechकेद्दीच॑.adv.at some earlier time.कित्तीकी दिवसाच पुढच॑.मी केम्हा अलों म्हणून तू अत्ता विचारतोसकी. केद्दीच॑ येऊन बसलसाच विषय तुला कळ्ल होत नाही म्हणून सांग.कधीच in sm.
keddeechकेद्दीच॑.adj.of what day ?कोण्त दिवसाच ?तू वाचत असाच न्यूस-पेपर केद्दीच॑ ? कधीचा in sm.
keddeenकेद्दीन.adv.at any time.केम्हा पह्जतरीन.मला पाह्याला केद्दीन तू येऊया.
keddeenकेद्दीन.adv.always (without fail).(चुकनास्क॑) केम्हीं.तो चुकनास्क॑ केद्दीन देवपूजा करणे आहे.
keddeethareenकेद्दीतरीं.adv.at some time or other. at some day or other.कोण्त॑ वेळांत॑ तरीन. कोण्त॑ दिवस तरीन.(1) केद्दीतरीन वेळ मिळताना मला येऊन पाह्शीलका ? (2) मी कंडिपहोऊन केद्दीतरीन एक दिवस ईजिप्टाच पिरमिड पाह्यीन.कधींतरीं in sm.
keddiकेद्दि.adv.on what day ? which day ?कोण्त॑ दिवस ?तू केद्दी येतोस म्हणून मला पुढच कळिवलतर॑ मी पूरा व्यवस्था करून ठिवतों.कधी in sm.
keddi-keddiकेद्दि-केद्दि.adv.sometimes. at times. now and then.तम्हा-तम्हा. कित्येक वेळ.(1) मझ॑ कंप्यूटर केद्दी-केद्दी अपाप राहून जात॑. (2) मझ॑ भाऊ वेडास्क॑ केद्दी-केद्दी वरडत असतो म्हणून तू अम्च घराला येईनास्क॑ असनको.कधी-कधी in sm.
keddi-keddiकेद्दि-केद्दि.adv.days as and when.कोण्त कोण्त दिवस होईलकी ते ते दिवस अग्गीन. तुला केद्दि-केद्दि वेळ मिळत की मला येऊन पाह्त ऐस॑.
keDeeकेडी.adj.rowdy. ruffian. rogue.गुंडा.बंगळूरांत मध्ये-मध्ये चोरटांच अक्रम जास्ती होताना अग्गीन पोलीसांच पुस्तकांत नाव असाच केडी लोकांस अग्गीन धरून किलुपांत घालणे आहे.the word केडी is from the English acronym K.D. standing for Known Depredator, used in Police records, nowadays known as "history sheeter".
keeकी.conj.an indicative expression (suffixed).सूचना कराच प्रत्यय.एक दिवस मी मझ॑ अलमारीच किलसात हरपूनटाकलों. नंतर॑ वेगळ॑ कसाचकी किलसातांत॑ उघडाला झाल॑.
keeकी.conj.or.हे नाहीतर॑ ते. अथवा.आज तो मला येऊन पाह्तों म्हणट्ला. पण तो येईलकी नाहीकी म्हणून मला संदेह आहे.
keeDaaकीडा.n.worm. maggot.किडा. किडू. कृमि. अळा. पूचि (tamil) अंबाच झाडाला फूल सोडतानाच औषध बडिवल॑ नाहीतर॑, पिकाच वेळी पंडूंत॑ कीडा याला साध्य आहे. किडा/कीड/किडू in sm.
keerthana~कीर्तन॑.n.religious musical narrative.देवाविषयीं सांगाच गाणे.दिवसोडी संध्याकाळी देवाच दिवा लावून समच एक-दोन कीर्तनाच "सी.डी." ऐकणे अम्च घरांत॑ एक दंडक झालाहे.
keertheeकीर्ती.n.fame. renown.प्रसिद्धी.नामक्कल देवीच अनुग्रहामळे इषोब-शास्त्रांत॑ थोर पांडित्य संपादलते श्रीनिवास रामानुजनाच कीर्ती लोकांला कळून याला केंब्रिड्ज यूणिवेरसिटीच प्रोफ़सर हार्डीच एक थोर भाग होत॑.
keerthimaanकीर्तिमान.adj.renowned. celebrated.प्रसिद्धी झालते.अणुशास्त्र विज्ञानी ॲल्बेर्ट ऐन्स्टीन त्यंच "थियरी ऑफ़ रिलेटिविटी" प्रस्थावना करताना जर्मनींत॑ पेटेन्ट-ऑफीसांत॑ "टेक्निकल-सहायक" म्हणून एक ल्हान पदवीच उद्योगांत होते. पण, "थियरी ऑफ़ रिलेटिविटी" प्रसिद्ध झाल॑ नंतर तेनी माहा कीर्तिमान झाले.
keLa~केळ॑.n.plantain. banana.केळीच पंडू. कच्चा केळ॑.जेवण॑ झालांपिरी केळ॑ खाल्लतर॑ जीर्णाला चोखोट म्हणतात॑.(2) नेद्रन केळेच चिपांतून भाजी करणे आहे.
keLeechpaanकेळीचपान.n.banana leaf.केळीच झाडाच पान.चोखोट गुळ्चीट पंडू होयाच झाडाच केळीचपान जेवाच उपयोलाम्हणून बाजारांत॑ विकणे नाही. जेवाच उपयोगालाम्हणून प्रत्येक वर्गाच झाड आहे.
keLeechphoolकेळीचफूल॑.n.plantain or banana flower head.केळीच झाडाच फूल.केळीचफूलाच अंभटभाजी अणी माठोडा खायाला बेष असत॑.
kemhaaकेम्हा.adv.when ?कोण्त॑ वेळ॑ ?मला पाह्याला तू केम्हा येशील॑ ?कधी/केव्हा in sm.
kemhaa-kemhaaकेम्हा-केम्हा.adv.as and when.कोण्त कोण्त वेळ॑ होईलकी ते ते वेळ॑तुम्हाला बरोर पाह्यींगाला कोणीं नाही म्हणून मला कळल॑. उगे भींगनाकांत॑. मला केम्हा-केम्हा वेळ मिळतेकी तुम्हाला येऊन पाह्त असतों.केव्हाकेव्हा in sm
kemhaachकेम्हाच.adv.some time back. a long time back.थोड वेळापुढे. उदंड वेळापुढे. कां तजकरतां तू इकड॑ राखून बसलाहेस॑ ? तो केम्हाच गेला.
kemhaaheenकेम्हाहीं.adv.always. at any time.केम्हीन. केम्हीं.भारताला केम्हाहीं कायतरीन उपद्रव देत असणेच पाकिस्थानाच उद्देश वाटत॑.
kemhaathareenकेम्हातरीं.adv.once-in-a while. rarely. sometimes.अप्रूपांत॑.मरुभूमींत॑ फार अप्रूपांतच पाऊस पडल॑. वर्षांत॑ केम्हातरीन तीन चार दिवस पडलतर॑ जास्ती म्हणूया.
kemheenकेम्हीन.adv.always. at any time.कधीन. केम्हाहीं. नार्ळीच झाडाच मट्टा केम्हीन कोणाच आंगावरीन पडना. तसच नारळ॑पणीं खाले पाव्हूनच पडेल॑ म्हणून सांगणे आहे.
kendre~केंद्र.n.centre.मध्यभाग.
kendre~केंद्र.n.focus.सूक्ष्म केंद्र.
kendre~केंद्र.n.headquarters.मुख्य स्थळ॑.
kensकेंस.n.hair.रोम॑तिरुपतींत॑ देवाला नवस करून देलते केंस तिकडल॑ अधिकारीलोक॑ विदेशाला पाठिवून देवस्थानला भरून पैसे करतात॑.केश in sm.
ker-kuppaaकेर-कुप्पा.n.rubbish. dirt.कुप्पा. कचडा.(1) केर-कुप्पा बरोर झाडाला होत नाही म्हणून कामवाली सांगट्ली. समच एक नव केरसोणी घ्याला तिला दुकानाला पाठिवलों. (2) घरांत केर-कुप्पा नाहीस्क पाह्यींगाम॑. ते असणे अम्च आरोग्याला चोखोट नहो, अणी वास्तूशास्त्रा प्रकारपणीं घराला होऊन येईना म्हणतील.
kersoNeeकेरसोणी.n.broom.झाडूअत्ताअग्गीन नाहणी शुद्ध कराला प्ळास्टिकाच केरसोणी विकाला आरंभ केलाहेत॑.केरसोणी or केरसुणी in sm.
kesaacha~केसाच॑.adj.belonging to which?कसाच॑. कसाच बरोर संबंध झालते ?मोडलते दोन बावोलीहीं चिकटिवून बरोर करताना केसाच चूर केसाबरोर चिकटिवाम॑ म्हणून बरोर पाव्हून जोडाम॑कशाचा in sm.
kesaalaaकेसाला.adv.what for ? why ?कां ? कसाला ?तो केसाला इकड॑ आला ?
kesarकेसर.n.saffron.केसरीच फूल॑. कुंमकुमपू. संपाकाच पदार्थाला चोखोट वास याला उपयोग कराच एक विशेष प्रकाराच वनस्पतिकष्मीरांतून मिळाच केसर फार चोखोट वर्गाच असलतरीन कित्येकदनांस॑ स्पैनांतून आणिवाच केसर घेणेम्हणजे ते एक थोर कार्य म्हणींगतात॑.केशर/केसर in sm.
kesareebhaathकेसरीभात.n.a sweet preparation made of rava with saffron etc.शिजिवलते र्रवांत॑ केसर घालून केलते एक गुळ्चीट पदार्थ.
kesareechphoolकेसरीच फूल॑.n. saffron flower.कुंमकुमपू. संपाकाच पदार्थाला चोखोट वास याला घालाच एक विशेष प्रकाराच वनस्पतिकेशर/केसर in sm.
kese~केस॑.adv.how.कोण्त॑ प्रकार॑ ? कस॑ ?कशी/कसा/कसे in sm.
kese~kese~केस॑केस॑.adv.in what which way/manner.कस॑कस॑. प्रत्येक-प्रत्येक (रीत)अर्धरात्रि उठून पाह्ताना लेंकरूच वर पांघरिवण॑ केस॑केस॑की गुंडाळून पडलसाच दिसल॑.कसाकसा in sm.
kethooकेतू.n.name of one of the navagraha planets of Hindu religion.नवग्रहांत॑ एक ग्रह.
kevaDaaकेवडा.n.screw pine flower. केवडाच फूल. केतकी. केतकीच फूल. ताळमपू (Tamil).केवडाचफुल असाच ठिकाणी सरप/सर्प येईल म्हणून सांगण आहे. हे कित्ती खरकी हे मला कळ्ना.
kevaDhe~केवढ॑.adv.how much ?कित्ती ?हे ब्रह्मांड॑ केवढ॑ थोर आहेम्हणून कोणालीं कळना.केवढा in sm.
kevalकेवल.adj.merely.मात्रकेवळ in sm.
kevalprayogee avyayकेवलप्रयोगी अव्यय.n.interjection (gram).अतिशय व्यक्त कराच गोष्ट॑.
khaDeeखडी.n.squirrel.कडीसेतू बंधनाच वेळी सहाय केल॑ म्हणून श्रीरामा खडीला थापडून देलत्यामळे तज पाठींत॑ तीन रेखा आल॑ म्हणून रामायणांत एक उप-कथा आहे. खार in sm.
kichchaDiकिच्चडि.n.a dish of cooked rice and pulse.तांदूळीं दाळीं मिळिवून शिजिवून कराच एक पदार्थ.किच्चडीच बरोर आलाच रायत॑ तोळ्लाईंगून (तोंडलावींगून) खायाला बेष असल॑.
kichchaDiकिच्चडि.fig.mixed up mess.गोंधळाच स्थिति.ते काम मझ॑पाड मीच करत असताना, मझकडून काढून तो हाळ करून ठिवला. अत्ता तेईं नाही येईं नाही म्हणून किच्चडि झालाहे.
kichkichकिचकिच.n.tickle.कुचकळी.ल्हान लेंकरांला किचकिच करून हांसिवलर॑ त्यंच हांसाच शब्द ऐकाला बेष असल॑.
kichkichकिचकिच.n.henpeck.कचकच. सळिवाच स्वभाव. किरकिरीबाईलीच किचकिच स्वभाव सोसाला होयनास्क॑ तो केम्हापाह्यलतरीन ऑफीसांतच बसलसतो.सलणे in sm means 'to rankle'.
kiDaaकिडा.n.worm. maggot.कीडा. कृमी. अळा.हे वर्ष पाऊसाळाच वेळी अमच॑ बागांत भरून किडा वेघून सगळ॑ फूलीन खाऊन सत्य नाश करूनटाकल॑.किडा/कीड/किडू in sm.
kiDaka~किडक॑.adj.worm eaten.कीडा खाल्लतेबाहेरसून पाह्याला अंबा किडके म्हणून दिसल॑ नाही तरीन, भरूनदपा गोट्टीच आंत॑ किडा असल॑.किडका in sm.
kiLee kiLeeकिळी-किळी.n.tickling sensation when someone touches a sensitive part of the body. कुचकळील्हान लेंकरांस॑ थोरळेंला किळी-किळी करणे म्हण्जे फार आनंद अस्ते. परतूं तेन्हाला थोरळे किळी-किळी कराला पाह्यलतर॑ पळून जातील॑.कुचकुली in sm.
killaaकिल्ला.n.fort.दुर्ग. उत्तर भारतांत॑ अनेक विदेश सैन्यांच आक्रमण झाल॑ म्हणून इतिहास वाचलत्यांस॑ कळेल॑. तसच, तिकडल॑ राज्यांमध्यहीं थोर थोर युद्ध झाल होत॑. हेज परिणामकी कायकी दक्षिण भारतापक्षा तिकड भरून मोट्ठ॑-मोट्ठ॑ किल्ला आहे.
kilsaathकिलसात.n.key.चावीअम्च लेंकीच वराडाच दिवसी नवरीला नेसिवामत॑ मुहूर्ताच लुगडे, मंगळसूत्र, तसेच वेगळ॑ सोनेच माळ-मत्ता अग्गीन ठिवल॑ होतते लोखंडाच पेटीच किलसात कोठकी हरपूनटाकून मझ॑ बाईल तय्या-तक्का नाचत होती. शेवटी, देवाच दयान॑ मुहूर्ताच नंखर पुढेच मिळून गेल॑.किल्ली or चावी in sm.
kilupकिलुप.n.lock.कवाड, पेटी असले साधन॑ दत्तन (जतन) ठिवाला उपयोग कराच एक साधन.गॉद्रेजाच किलुप उदंड चोखोट म्हणतात॑. पण, एक दिवस एकला नुस्त कांबांतून ते उघडून दाखिवलांपिरी मला तजवर असाच पातेरा पूरा गेल॑.कुलूप in sm.
kilupaanth ghaalaNeकिलुपांत॑ घालणे.vt.to imprison.जैलांत॑ घालणे.बांगळूरच पोलीस मद्य-मद्य गांवाच गुंडा लोकांस अग्गीन धरून किलुपांत॑ घालणे आहे.
kimbaDa~किंबड॑.adj.deaf.कान ऐकनाते अवस्था. किवड॑.कित्येक किंबड॑ लोके घट्टी बोलतील॑, कारण, त्यांस बरोर ऐकांव॑ म्हणजे दुसरे घट्टी बोलांव॑की, तसेच दुसरेंसीन म्हणींगून घट्टी बोलतील॑.
kimbaDaach kaanaanth kinnara~ vaajivalathaaska~किंबडाच कानांत किन्नर वाजिवलतास्क॑.say.a saying meaning, 'to indulge in a futile exercise of telling or advising a person who does not want to be advised'."ऐकाला तय्यार नाहीते मनुषाला उपदेश द्याच व्यर्थ काम", हे अर्थाच एक म्हण.The litteral meaning is 'playing music to a deaf person'.
kimbaDapaNeकिंबडपण॑.n.deafness.किंबडेच अवस्था.साठ वर्षाच वय होतांतरून उदंड लोकांस थोड किंबडपण॑ आरंभ होणे सहजच॑.
kiraathakकिरातक.adj.to be violent. to be cruel.क्रूरपणांत॑ असणे.कित्येक धर्माच लोके किरातकपणान॑ वागताते. हेज परिणाम॑/उदाहरण॑ अम्हाला भूलोकांत॑ अनेक ठिकाणी भयंकर नाश-नष्ट होयाच दिसते.
kiraNकिरण.n.a ray of light, of Sun or Moon. सूर्याच अथवा चंद्राच एक रश्मि.सूर्याच किरण एक प्रत्येक दिवस देवाच विग्रहाच व॑र पडाच अतिशय व्यवस्था कित्येक देऊळांत॑ आहे.
kireeTकिरीट.n.crown worn by royalty.मुकुट.ब्रिटनाच राज किरीटाच॑ मध्य॑ असाच॑ कोहिनूर वज्र गोळकोंडा प्रांतांतून मिळ्ळत॑ म्हणतात॑.
kirikiriकिरि-किरि.adj.irksome. troublesome.ल्हान-ल्हान उपद्रव द्याच॑.वराडाच घरांत॑ नवराच घरच॑ लोकांस अवंतरण॑ करताना कोणतरीन किरि-किरि लोक॑ असलतर॑ त्यांस सोडनास्क॑ प्रत्येकहोऊन पाह्यींगाम॑.
kirkaNeकिरकणे.vt. to scribble. to doodle.लक्ष्य नाहीस्क लिव्हणे/ओढणे/होढणे.लेंकरे भिंतिवर अस्गीन किरकतात म्हणून कितेकदन॑ त्यंच घराला येणार लेंकरांना द्याल करतां "'ड्राईंग षीट्स" घेऊन ठींगट्लासतात॑.from Tamil.
kirkireeकिरकिरी.n.irritating (behaviour). troublesome.तंटा कराच॑ (स्वभाव). किचकिच.सहा महिनापसून अम्च ऑफीसांत॑ मानेजराच स्थल॑ खालीहोऊन पडलहोत॑. शेवटी, येऊन पावलते मानेजर एक थोर किरकिरी मनुषास्क वाटत॑.
kisaNeकिसणे.vt.to grate. to scrape.किसून काढणे.नारळ किसणे म्हणजे मझ॑ बाईल भींगते, कारण किसताना बोटाला लागून घाव होईलका म्हणून तिला भें आहे.
kisaNeeकिसणी.n.grater. scraper. किसाला उपयोग कराच उपकरण॑.नारळ किसाच किसणी प्रयोग कराला तज दंडक असलत्यांसच होईल॑. तज दंडक नसणार ते वापरलतर॑ बोटाला घाव लागुया.
kishTaanjana~किष्टांजन॑.n.deer hide used as a sitting mat by ascetics and for keeping puja items ritually pure.क्रिष्णांजन॑. कृष्णांजन॑. सोवळेंत॑ बसाला उपयोग कराच हरणाच चर्म. पूजा सामान सोवळेंत॑ ठिवाला उपयोग कराच हरणाच चर्म.अमच॑ घरांत असाच किष्टांजनाच संपुष्ट सुमार दोनशें वर्षापसून अमच॑ कुटुंबात॑ आहे.
kismisकिसमिस.n.raisins. dried grapes without pips.खिसमिस. वाळलते द्राक्षे.साधारण म्हणून नित्य देवाच नैवेद्याला अम्ही किसमिस अणी खडेसाखरे ठिवतों.
kiththiकित्ति.adj.how many. how much.केवढ॑ कित्ति सांगटल॑ तरीन ऐकना म्हणतो, मला उगे सळिवत आहे.किती in sm.
kiththidapaaकित्तिदपा.adv.how many times ?केवढे दपा ? कित्तिदा ?जेवलांपिरी ताट विसलून ठिवाम॑ म्हणून कित्तिदपा सांगटलतरीन तो ऐकना. शेवटी, मीच बसून ते घांसाम॑.
kiththiekकित्तिएक.adj.some.कित्येक. कितेक.कित्तिएक लोकांस॑ नव॑ भाषा शिकणे फार सुलूभान होत॑.
kiththiekdapaaकित्तिएकदपा.adj.once in a while. some times.कित्येकदपा. एक वेळ. केम्हातरीं एकदपा. केम्हातरीं एकदा.(1) अम्च घाराच जवळ॑ रामा अणी लक्षमणा म्हणून पाह्याला एकसारख॑ असाच अवळी-जवळी अहेत॑. त्यंच मायेलापणीं हे दोघे मध्य कोण कोण आहेत म्हणून कित्येकदपा चुकून जाते. (2) कित्येकदपा विसरून जातों म्हणून मी दिवसास्क॑ मझ॑ डैरींत॑ तसल॑ विषय पूरा लिव्हून ठींगणे आहे.
kiththithareenकित्तितरीं.adj.several types or ways.भरून रीतीच॑.अत्ता अग्गीन उघडाच मोट्ठ॑ मोट्ठ॑ "माळांत॑" कित्तितरीं विध-विधाच साधन ठिवलाहेतकी, ते पाह्यलतरेच विसंबाला होईल॑.
kithyekकित्येक.adj.some.कित्तिएक. कितेक.पिकिवाला म्हणून गवतांत॑ गुंडाळून कित्ति दत्तन ठिवलतरीन कित्येक अंबा कुजून जात॑.
kithyekdapaaकित्येकदपा.adj.once in a while. some times.कित्तिएकदपा. एक वेळ. केम्हातरीं एकदपा. केम्हातरीं एकदा.तो पोर फार बुद्धिवंत॑ म्हणून मी ओपींगतों, पण परीक्षाला वाचामत॑ रीतींत॑ वाचल॑ नाहीतर॑ हरूनजावूया म्हणून मला कित्येकदपा वाटत॑.
kivaDa~किवड॑.adj.deaf.कान ऐकनाते अवस्था. किंबड॑किवड॑ लोके हाताच बोटांतूनच चिन्ह दाखिवून त्यंच मध्य बोलींगाच पाह्यलतर॑ अम्हाला ते एक गूढ भाषास्क॑ वाटते.किवडा in sm.
kivaDapaNa~किवडपण॑.n.deafness.किवड॑च अवस्था. किंबडपण॑.वय होतां होतां किवडपण॑ जास्ती होत जाताहे तरीन, ते ओपींगाला तय्यार नाहीस्क॑ बसलाहे तो.
kobeeकोबी.n.cabbage.कॅबेज.कीरे अंबटभाजि अणी कोबी अंबटभाजि हे दोनीं दक्षिणी देशस्थांला फार अवडाच कालवण आहे.
koDaaकोडा.n.a small thick wooden logकोंडा. ओंडा. लांकडाच एक चूरकोंडका in sm.
koDanjaNeकोडंजणे.vt.to flap suddenly with a jerk.कोडंजणे. झटका देणे.धुवलते कापड तांतांत॑ घालापुढे बेष कोडंजून घाटलतर॑ लोक्कुर वाळून मिळेल॑.from Tamil.
koDboLeकोडबोळे.n.a fried ring shaped snack.एक तळ्लते खायाच पदार्थ.from Kannada.
koDiकोडि.flag.गुढी. ध्वज॑. पताका.
koDisampangiकोडिसंपंगि.n.a creeper giving small greenish bell shaped flowers.ल्हान हिरव॑ रंगाच फूल सोडाच एक लता/वेल/वल्ली.from Tamil. कोडि in Tamil means 'creeper' and संपंगी is चंपक.
koDuकोडु.n.a hand drawn line.रेखा.from Tamil.
kohL-vaDaaकोह्ळ-वडा.n.a crispy made of udid dhal and ash-gourd.उडीदाच दाळांत॑ कोह्ळ घालून कराच एक वड्या. कोह्ळ-वडाच फोड्णीच सांभार खायाला उदंड रूच अस्त॑.
kohLa~कोह्ळ॑.n.ash gourd.एक प्रकारच पंढ्र॑ रंगाच भोंपळानुस्त फोड्णीच सांभारांत॑ कोह्ळ-वडा (म्हण्जे कोह्ळाच वडा) तळून घाटलर॑ फार रूच अस्ते.कोहळा/कोहाळा in sm.
koLaaeeकोळाई.n.water tap.नळ॑. पाणीच टॅप.गार्डनाच कोळाई दत्तन पाह्यींगनास्क॑ असलतर॑ बीदींद॑ येणार-जाणार कोण्तरीन ते चोरींगून जातील॑.from Tamil.
kolaaTTamकोलाट्टम.n. a dance using small sticks, normally performed by ladies. ल्हान काटीनिशी कराच बायकांच एक नृत्य.from Tamil.
koLakaTTeकोळकट्टे.n. a type of sweetmeat.मोदक॑.विनायक चतुर्थीला कोळकट्टेच नैवेद्य (नेवेद्य) करणे आहे.from Tamil.
koLaNeकोळणे.vt.to squeeze (tamarind/mango/fruits etc.) in a small quantity of water.थोड पाणींत॑ (चिंच/अंबा/पंढू असल॑) चेंपणे. uisसंपाक आरंभ करतानच चिंच कोळून ठिवलतर॑, नंतर॑ सार सांभार असल॑ कालिवण॑ करताना त्यांत॑ चिंचाच पाणी घालणे सुलूभ होईल॑.
koLasaaकोळसा.n.charcoal.लांकड॑ जळिवून कराच इंधन.सोवळेच संपाकाला कोळसाच सगडी (शेगडी) वापरणे आहे.
koLasaaकोळसा.n.coal.खनींतून खांडून काढाच एक इंधन.नैवेलीच खनींतून मिळाच कोळसा चोखोट वर्गाच न्हो म्हणतात॑.
koLeeकोळी.n.fisherman.मासोळी धरणार.
koLeeकोळी.n.name of the caste of traditional/hereditary fishermen.कोळी वर्ग.
koleevaalaaकूलीवाला.n.a labourer.कामवाला. कूली.येतां-येतां दर्मा कित्ति पह्जेतरीन द्याला तय्यार अस्तों तरीन कूलीवाले मिळणे फार श्रम झालाहे.
kolhaaकोल्हा.n.fox.कुत्राच सार्खल॑ एक मृग.
koLLIkaTTe ghevoon Doske khaajeengaNeकोळ्ळिकट्टे घेऊन डोस्के खाजींगणे.say.a saying meaning "inviting troubles or problems vluntarily".स्वता उपद्रव आणींगणे.The litteral meaning is 'to scratch one's head with a burning firewood'. कोळ्ळिकट्टे is Tamil word meaning 'burning firewood'.
koluकोलु.n.decorative displaying of dolls during the festival of Navarathri.नवरात्रि सणाच वेळी देवांच बावोलींला (भावोलींला) अलंकारांत॑ ठिवाच पद्धत॑.the dolls displayed include those of नारयणा, लक्ष्मी, ब्रह्मा, वायु, सरस्वती, भारती, शेषा, गरुडा, रुद्रा etc. from Tamil.
kolusकोलुस॑.n.foot chain with tinkling bells.कोलुस.from Tamil.
komaaLeeकोमाळी.n.clown.वेड॑ वेड॑ करणार.तज वेड॑ वेड॑ वागणे पाव्हून अग्गिदनीं तो एक कोमाळी म्हणून सांगतात॑.from Tamil.
komaLकोमळ.adj.tender. mild. delicate. soft.नाजूककोमल in sm.
komaTकोमट.adj.lukewarm.ऊन जास्ति नाहीते. बेच्चगे (kannada).उन्हाळांत॑ कोमट पाणींतपणीं मला स्नान कराला होइना. हिंस पाणीच पह्जे.
komaTaNeकोमटणे.vi.to feel nausea.वांत यास्क॑ वाटणे. उमटणे.
kombaDe~कोंबड॑.n.(domestic) fowl.घरांत॑ वाढिवाच एक पक्षि.दिवसोडी कोंबडेच एक मुट्टे खालतर॑ आंगाला चोखोट म्हणतात॑.कोंबडे, कोंबडा & कोंबडी for fowl, cock & hen in sm.
kompoorlaa laagalathe sukha~कोंपूराला लागलते सुख॑.id.an idiom meaning 'unnecessary efforts causing unwelcome results'.अनावश्य श्रम॑ करून आवश्य नाहीते परिणाम येणे’, हे अर्थाच एक श्ब्दालंकार.the literal meaning being, 'pleasure caused on getting hit on the elbow'.
koNकोण.pron.who ?कोण ?
konaaकोना.n.corner.कोने. मूले (tamil)कोन in sm.
koNaacha~कोणाच॑.pron.whose ?कोण्त मनुषाच॑ ?कुणाचे in sm.
koNaachkeeकोणाचकी.adj.somebody's.कोण्तकी मनुषाच॑.कोणाचकी गोष्ट ऐकींगून असाच चोखोट काम सोडूनटाकून बिसिनस कराला जातों म्हणून तिज दाल्ला बसलाहे.
konaDe~कोनड॑.n.a triangular recess or niche in a wall.भिंतींतल॑ त्रिकोण आकाराच एक ल्हान स्थल॑.’इलेकट्रिसिटी' याच पुढे घरांतल दिवा कोनडांत लावून ठिवत होते.

No comments:

Post a Comment