Sunday, May 15, 2016

g (ग) 1 (gaa*v to girNee)




.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
gaa*vगांव.n.village.ग्राम. गाम.
gaa*vगांव.n.town. city.गाम. टौण (English). सिटी (English).
gaa*vगांव.n.native place.स्वंत स्थळ.
gaaDeeगाडी.n.vehicle.बंडि.
gaaDhगाढ.adj.sound. deep.अगाध॑. ते लेंकरु गाढ झोंपांतून दिडीरशी उठला वाटते. उठलकी नाही रडाला आरंभ केला.
gaaDhगाढ.adj.profound.अगाध॑.अत्तच॑ उत्तरादि मठाच स्वामीजीला वेदपाठांत॑ त्यांस गाढ ज्ञान आहे.
gaaDhगाढ.adj.deep.तीव्र. मुम्मर. गाढ तपस्या करून भस्मासुर॑ ब्रह्मदेवा कडून अपार शक्ति संपादला.
gaaDhavगाढव.n.ass. donkey.एक मृग.
gaaDhav charNeगाढव चरणे.id.to fritter away time in some worthless activity.प्रयोजन नाहीते काम करून वेळ हाळ करणे. गाढव हांकणे (id). कावळा हांकणे(id).पूर्त ध्यान देवून वाचाच काळी बरोर वाचनास्क गाढव चरलतर॑ शेवटी काम काहीं मिळनास्क भाताला कष्टि भोगामते पडेल॑.
gaaDhav haankNeगाढव हांकणे.id.to while away time doing worthless things.प्रयोजन नाहीते काम करून समय हाळ करणे. गाढव चरणे (id). कावळा हांकणे (id).
gaaDhavaach kaanaanth kinnara~गाढवाच कानांत किन्नर॑.fig.a metaphor implying "that which appeals only to an idiot".मुठ्ठाळाला मात्र अवडाच कार्य (एक शब्दालंकार).
gaaDhavaalaa kaLelkaa kaapooraach vaasa~गाढवाला कळेलका कापूराच वास॑.prov.a proverb meaning an idiot will not understand a fine and delicate thing."एक नाजूक कार्य मुठ्ठाळाला समजना" अस॑ सांगाच एक म्हण.The literal meaning being, "will a donkey ever know the smell of camphor ?"
gaahaN THivNeगाहण ठिवणे.vt.to pledge. to mortgage.अडमानम ठिवणे.मारवाडीकडे गाहण ठिवलते लोक॑ पोणावांटा ते वस्तु सोडून देमस्क पडते. कारण त्यंच व्याज फारच जास्त अस्ते. व्याज भरजोरी कर्ज घेटलते लोकाना देवदिसून जातेगाहण or गाहाण in sm.
gaalगाल.n.cheek.डोळेच खालच॑ भाग.
gaalaach gaara~गालाच गार॑.n.dimple in the chin.गालपोंचा बायकापोरीना गालाचगार॑/गालपोंचा पडलतर॑ त्यंच चांगळपण॑ अण्खीन जास्त होते.गालावरील खळी/गालगुच्चा in sm.
gaaliगालि.n.abuse.शिवा.the corresponding word for शिवा in sm is शिवी.
gaalponchaaगालपोंचा.n.dimple in the cheek.गालाच गार॑.गालपोंचा असणारी पोरी अद्रिष्टवंत असतील म्हणून सांगणे आहे. हे कित्ति खर॑, कित्ति लटक॑ म्हणून मला कळना.
gaamगाम.n.village.गांव. भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षाच वर झाल तरीन अत्ता पणीं भरून गामांत॑ शुद्ध केलते पीयाच पाणी मिळत नाही.
gaamगाम.n.town. city.गांव. पट्ण॑.
gaamगाम.n.native place.स्वंत स्थल.
gaambheerya~गांभीर्य.n.majesty.गंभीरता. गंभीरपण॑.
gaaNगाण.n.mortgage. pledge.पैसे रीण काढाला वस्तू दुसरेंस ओपिवणे गहाण in SM.
gaaN THivaNeगाण ठिवणे.vt.to mortgage. to pledge.पैसे रीण काढाला वस्तू दुसरेंस ओपिवणे ;गहाण ठेवणे in SM.
gaandaNeगांदणे.vt & vi.to harass. to torment. to put pressure.पीडा करणे. पीडा होणे. गांजणे.
gaandheगांधे.n.swelling or rashes of the skin at a number of places due to an insect bite or allergy.किडा चावून अथवा "अलर्जी मुळे" आंगांत॑ वेगळ॑-वेगळ॑ ठिकाणी याच सुजलते पोंपडा.कित्तिकी दपा ओखदाच "अलर्जी मुळे", नाहीतर॑ मेधमाशा/वेगळ जंतु चावणा मुळे आंगांत पूरा गांधे होते. म्हणजे, आंगावर उदंड ठिकाणी खाज होयाच तंबड॑ रंगाच सुजलते पोंपडा झालस्त.
gaaNeगाणे.n.song. music.संगीत. गीत. जुन॑ पटाच (सिनिमाच॑) गाणे आजच॑ दिवस पणीं लोकांना फार अवढते. गाणेच॑ गोष्टींत भरून अर्थ असामुळे असुया.
gaaNe saangaNaarगाणे सांगणार.n.musician.गाणे सांगणार॑.अगाऊच काळांत नाटकांत काम करणार / डाव घालणार (अभिनय करणार) स्वता म्हणून गाणे सांगतील॑. हे काळांत काय म्हणजे, गाणे सांगणार/गाणे सांगणारीणे पदराच मागे होठाकून गाण॑ सांगतात॑ अणी डाव घालणार त्यंच तोंड मात्र गाणेजोक्त हलीवतात॑.
gaanjaaगांजा.n.a type of addictive drug.एक नशाच पदार्थ.वर्षानुवर्ष युद्धांत॑ सांपडींगून असाच अफघानिस्थानांत॑ गांजाच क्रिषींतून तिकडल॑ तालीबान युद्धाच आयुध घ्याला पह्जते पैसा करतात.
gaanjaNeगांजणे.vt & vi.to harass. to torment. to put pressure.पीडा करणे. पीडा होणे. गांदणे.मी ऐकलते काय म्हण्जे, अमेरीकांतून येणार कित्येक नवरे, त्यंच वराड झालसलतर पणीं दूसर॑ वराड करींगतात. नंतर तथे गेलावर हे पोरीला नीट गांजताते. ते करतां लोक॑ विचारणा करूनच पोरींला बाहेर गामाला पाठीवाम॑.
gaanTHगांठ.n.a knot.घट्टि असाच गुंता/बांधग्रीक (यवन) इतिहासांत॑ "गोर्डियन नोट" अस॑ एक गांठ एकच कापांत॑ तोडून, अलक्सांडर महाराजा त्यंच शक्ति अणी शूरपण॑ दाखिवले.गाठ in sm.
gaanTHगांठ.n. a bag-purse. a money-bag.पैसाच ल्हान पिशवी.कित्ति संपाद्य असल॑ तरीन॑, कित्येक लोक॑ अधीक वेच करनास्क॑ पैसे गांठ घालून त्यंच बेंक बॅलन्स वाढाच पाह्त॑ संतुष्ट होतात॑.
gaanTHoda~गांठोड॑.n.a bundle.मूटाजुने काळांत॑ धोबीलोकांच गाढव धुवाच कापडाच गांठोड उचलींगून जायाव दृश्य सर्वसाधारण होत॑.गाठोडे in sm.
gaara~गार॑.n.a small dent.एक ल्हान पोंचा अथवा टोंचा.गार in SM.
gaara~गार॑.n.a hole or depression. a pit.खड्डा.
gaaraayaNa~गारायण॑.n.complaint. grievance.आरोप करणे.बॅन्कांत॑ उद्योगांत॑ असणारांस धर्मा अण्खी वेगळ॑ सौकर्य कित्ति देल तरीन प्रति दोन-तीन वर्षालीं त्यंच गारायण॑ घेऊन हरताल करताते.
gaavaTHeeगावठी.adj.rustic. rural.खेडेगांवाच.
gaayगाय.n.cow.गाई.
gaayathreeगायत्री.n.one of the vedic names of Sun. सूर्यभगवानाच एक नाव.
gaayathrijapa~गायत्रिजप॑.n.a brahmanic ritual of reciting the Gayathri Manthra.गायत्रि मंत्र जप करणे.
gaayathrimanthra~गायत्रिमंत्र.n.a prayer forming part of Sandhya Vandana.संध्या वंदनाच एक भाग. बायका गायत्रिमंत्र सांगताने अणी दादिगे पणीं आंघोळी करला नंतर संध्या कराच॑ बरोरच॑ गायत्रिजप कराम॑ म्हणून थोरळे सांगणे आहे.
gaayeeगाई.n.cow.गाय.हिंदुधर्मांत॑ गाईला एक महत्व स्थान आहे.
gaayeech goTHaaगाईचगोठा.n.cowshed.गाईला बांधून ठिवाच ठिकाण.स्विट्सरलान्डांत गाईचगोठा कित्ति निट अस्ते म्हण्जे, अम्ही पणीं तथे संसार करूया !
gadaaगदा.n.mace.जुने काळाच युधाच एक आयुध.महाभारतांत॑ दुर्योधना गदा प्रयोगांत॑ एक थोर योद्धा होते.
gadaadharगदाधर.adj.one who wields a mace.गदा उपयोग करणार.
gadaayuddha~गदायु.n.a fight between two warriors wielding maces.दोन गदाधारींच मध्ये होयाच युद्ध.
gaDadगडद.adj.dense.गडद.एकदपा अम्ही गडद राणावाटी जात असताना वाटाच मध्ये एक थोर हत्ति ओठाकल होत॑. एक घंटा झालांपिरी ते वाट सोडून सरकल॑.
gaDad andhaarगडद-अंधार.n.pitch dark.भयंकर अंधार.(1)एकदपा कारांत बाह्येरल॑ गामाला जाताना वाटेंत कार राहून गेल॑. रात्रि नौ घंटे असेल. बाह्येर गडद अंधार होत॑. कारण, ते ल्हान गामाला जायाच वाटेंत एक दिवापणीं न्होत॑. अम्ही देवाला नवसींगत होतों. दहा निमिष झाल असल॑, समोर एक लॉरि आल॑. तो राहत करून कायकी केला. समेच अम्च बंडी स्टार्ट झाल॑ अणी अम्ही कोठ जामकी तिकडे जाऊन पावलों. (2) मी ल्हान असतम्हा अम्ही एक खेडेगामांत॑ राह्त होतों. तिकडे बीदीच दिवापणीं न्होत॑. अमावस्याच रात्रि अम्च गावांत गडद अंधार असते म्हणून अम्हाला रात्रीच वेळी बाह्येर जायाला अम्च माय-बाप सोडत न्होते.
gaDapगडप.n.swallow.गिळणे. हडप.
gaDapगडप.n.misappropriate. embezzle. swindle.हडप. पैसा गिळणे.
gaDap karNeगडप करणे.vt.to swallow.गिळणे. हडपणे.
gaDap karNeगडप करणे.id.to embezzle. to swindle.हडप करणे. पैसा गिळणे. एमारिवून पैसा करणे. पैसा हडपणे. पैसा गडपणे. कोण्त॑ व्यापार आरंभ केलतरीन अम्च पूर्त ध्यान तजांत असाम॑. अम्च ध्यान चुकलतर॑ खाले काम करणार याच पैसे पूराहीं गडप कराला पाह्तील॑.
gaDapNeगडपणे.vt.to embezzle. to swindle.पैसा गिळणे. एमारिवून पैसा करणे. पैसा हडपणे.
gaDbaDगडबड.n.tumult. turmoil.अमक्कळ॑ (Tamil).मला कोण्त॑ थोर हॉस्पिटलांतीं जायाला अवडना. कां म्हणजे तिकडे सदाहीं गडबड अस्ते.
gaDbaDiगडबडि.haste. hurry.अवसर॑.थोर डॉक्टर्स सदाहीनच गडबडींत॑ असतात॑. रोगींच बरोर समाधानांत॑ बोलाला त्याना वेळ कोठ॑ मिळते ?
gaDDaaगड्डा.n.a hardened boil or swelling in one's body.आंगांत॑ याच घट्टि फोड.अम्च आंगांत॑ कोठे गड्डा आलतरीन ते औषध घालून पणीं उण॑ होयनातर॑ कॅन्सर म्हणून बदलाला संभव आहे. तजकरतां वेळाला 'स्क्रीनिंग' करींगणे चोक्क्ट॑.
gaDDaaगड्डा.n.a lump.घट्टि झालते भाग.
gaDDeगड्डे.n.tuber.भोईच खाले मूळांत॑ वाढाच गड्डे.डैबेटीस' असणारांना गड्डे खालत॑र त्यंच आंगांतल॑ बाधा जास्ति होईल म्हणून वैद्यांच (वैद्य लोकांच) अभिप्राय आहेगड्डा in sm.
gaDgaDaaगडगडा.n.thunder.पाऊसाच मेघाच/वांबाच गर्जना. घडघडा
gaDgaDaNeगडगडणे.vi.to thunder.पाऊसाच मेघाच/वांबाच गर्जना. घडघडणे.अधीक गडगडलतर॑ पाऊस येइना म्हणून सांगणे आहे. तसच अधीक बोलणार कामाळू असनाते.
gadhya~गद्य.n.prose.वाक्यांत॑ लिवलते लेख.
gahoo*गहूं.n.wheat. एक धान्य.आटा, मैदा, र्रवा अणी सूजि ते तेवढीन गहूंत्सून करतात॑.
gajगज.n.elephant.हत्ति.
gaj गज.n. one yard.वार. तीन फुट लांब. हे काळांत वराडाच वेळांतपणीं बायका नौ गजाच लुगड॑ नेसत नाहीते
gajaananगजानन.n.Lord Ganapati.गणपति. गणेश
gajakaampगजकांप.n.violent or uncontrollable shivering.नियंत्रण नाहीस्क कांपणे.
gajakaampगजकांप.fig.utter fearfulness.फार भींगणे.
gajaraajगजराज.n.a large dominating male elephant. alpha-male elephant. हत्तींच राजा/मुख्या.
gajavasthra~गजवस्त्र.n.a decorative item made of cotton, placed shoulder to shoulder on God's idol.देवाच विग्रहाला घालाच कापूसांत केलते अलंकाराच माळ॑. गजवस्त्र घेम॑ म्हणजे अम्ही बंग्ळूरांत॑ पेजावर-श्रींच पूर्णप्रज्ञ-विद्यापीठाच समोरल॑ दुकानांतूनच घेणे. तिकडल॑ गजवस्त्र शुद्ध रूईंतून केलसल॑ म्हणून अग्गिदनालीन थोर विश्वास आहे.
gajbijगजबिज.n.a mess. disorderly state.रंदा. रंधा. घंदरा-घोळा. तेरापेरा. कचां-पिचां (tamil).ल्हान लेंकर असाच घरांत सामान ठिवलते ठिकाणि असाला वाट नाही. घर गजबिजच असेल॑.गजबज in sm.
gajgajगजगज.n.the hustle and bustle (of a crowded place).(गुंपाच) हंगामा. गजबिज. चेनै उसमान रोडांत अणी तथे असाच लुगडाच, वस्ताच दुकानांत वर्ष पूराहीं गजगज असाच पाव्हून मझ लोंक (तम्हाच अमेरिकांसून आलहोता) म्हणट्ला "बापा हे दुकान-बीद पाह्यलतर॑ अस वाटते येथ॑ कायीन पैसेच उणे नाही, अण्कि भारत देश "रिसेषनांतून" बाहेर येऊन गेलाहे."
gaLaaगळा.n.throat. neck.कंठ. घसा.म्हातारपणांत (साठ वर्षा वरल॑ लोक॑) निजताना पत्तळ ऊंशि ठींगनातर॑ गळा लचकुया.
gaLaa kaapaNeगळा-कापणे (id)to bore. to harass.फार तंटा/उपद्रव करणे. प्राण-काढणे (met). (1) शेदारल॑ घरचा एथे येऊन गळा कापतो. तला वेगळ काम-धंदा नाही म्हणून वाटते. (2) अत्ता नव होऊन आलते आफीसर अम्हाला तवढेदनांच गळा कापाला म्हणून आलाहे वाटते. श्वास सोडाल होईनास्क॑ काम घेत आहे.गळेकापू/गळेकाटू(n) in sm.
galaaTaaगलाटा.n.ruckus. tumult.अमक्कळ॑ (tamil). आरभाट. वरडा-वरडि. हंगामा.from Tamil
gaLakaaगळका (fig)easy going. disorganized.व्यवस्था नाहीते. तेरा-पेरा असाच.शेदारल॑ घरच गळके लोके. त्यंच घर नीट ठींगनात॑. नित्य संपाक काय करतात॑ की नाही की, एकादाड अम्चकडे सामान (दूध, दहीं, भाजीपाला) विचारत असतात॑.from Tamil
gaLaNeगळणे.vi.to leak. to drip.निथळणे. (द्रव्य) गळून पडणे.घर बांधताना वरल॑ 'स्लाब' घालाच समय सिमेंट अणी 'वाटरप्रूफ केमिकल' मिळिवून घाटलतर पाऊसांत गळना.
gaLaNeगळणे.vi.to spill.(द्रव्य) ओतून पडणे.
gaLaNeeगळणी.n.a strainer. sieve.जरडी. अरिप्पु (Tamil).पंडूंत्सून रस पिळून काढून गळणींत घालून तेच पाणी पीयाच बरीस पूर्त रस पीणेच बर॑. कारण, गळणींत राह्यलते भागांत 'फ़ैबर' अणी 'वैटमिन्स' असत॑.
galeejगलीज.n.dirt.मळ॑.अम्च देशांत वाचलते लोक पणीं त्यंच घराच बाहेर कुप्पा टाकून गलीज कराच पाह्ताना संकट वाटते.
galliगल्लि.n.lane. alley.रूंद उणे असाच वाट. सांध॑. सांधि.हैदराबादांत कित्येक ठिकाणि दोन गज रुंदाच गल्लि पणीं आहे. तेथ आटोरिक्षा जायाला पणीं वाट असना.
gambheerगंभीर.adj.grave. majestic.गौरवांत असाच॑.चाळीस-पन्नास वर्षापुढ॑ पंतोजी अण्खीं डोक्टर असल॑ उद्योगांत असणार लोक॑ गंभीर म्हणून वागतील॑. असल॑ उद्योगांला समुदायांत गंभीरपणाच चिन्ह होत॑.
gambheerpaNeगंभीरपण॑.n.majesty.गंभीराच स्थिति. गांभीर्य.गांभीर्य in sm.
gaNa~गण॑.n.a group.एक गुंप॑.
gaNapathiगणपति.n.Lord Ganesh.गणेश.
gaNapathipoojaaगणपतिपूजा.n.a puja invoking Lord Ganapathi usually performed at the beginning of a programme.एक कार्यक्रम आरंभ कराच पुढे कराच गणेशाच पूजा.
gandhगंध.n.sandal paste.चंदनाच पेस्ट.आजच॑ दिवस पणीं अधिकारांत असणार लोक॑ गंधाच लांकूड (लांकड॑) विदेशाला विकून पैसे संपादतात म्हणून मला संदेह आहे.
gandhगंध.n.scent. perfume.चोक्कोट वासाच द्रव्य.
gandharaa-ghoLaaगंधरा-घोळा.adj.disorderly. haphazard.गजबिज. तेरा-पेरा.
gandharvगंधर्व.n.a class of celestial demi-gods.स्वर्गलोकांतल॑ एक वर्गाच उपदेवता लोक॑.
gaNeshगणेश.n.Lord Ganesh.गणपति.
gaNesh chathurthhiगणेश चतुर्थि.n.a festival or puja honouring Lord Ganesh performed during Bhadrapada month.भाद्रपद महिना कराच गणपतिपूजा. विनायक चतुर्थी. गणेशोत्सव॑.
gaNeshothsavगणेशोत्सव.n.a festival or puja honouring Lord Ganesh performed during Bhadrapada month.भाद्रपद महिनांत॑ कराच गणपतिपूजा.
gangaaगंगा.n.Ganges.गंगा नदि.
gangaa jalगंगाजल.n.Ganga water.गंगाच पाणि.
gangaa jalगंगाजल.n.Ganga water kept in small copper vessels in pooja room.देवघरांत॑ ल्हान तांबेंत॑ ठिवलसाच गंगा जल. घरांत गंगाजल ठींगाच पद्धते कस आरंभ झाल॑ अणी तज महत्व काय, हे मला कळना .कोणतरीन घरांत मरलतर॑ (वारलतर॑) त्यंच तोंडांत घाला करतां असुया वाटते.गंगाजळी in sm means 'a vessel for holding sacred water.
gangaa snaanगंगास्नान॑.n.the ritual bathing on Deepavali day.दीपावळीच दिवस कराच सणाच स्नान.अम्च घरांत दीपावळीच पहिलेच रात्रीच आंघोळीच पाणि ताविवाच हंडा बेष घासून तला हळद-कुंकू लावून, पाणि भरून ठिवणे आहे.
gangaaLगंगाळ.n.a large (brass) vessel for storing water.घंगाळ. घंघाळ. हंडा. पाणि धरून ठिवाच एक मोट्ठ॑ पात्र.
gangaavanगंगावन.n.artificial hair. an extra bunch of hair inter-plaited to a woman's plait or chignon.क्षौरी/क्षवरी. एक वयाच नंतर बायकांला केंस झड॑ल. तम्हा गंगावन मिळिवून वेणि/बिछोडा घालिंगतील॑.
gangothriगंगोत्रि.n.the place where Ganga emanates.गंगा नदि उद्भव होयाच ठिकाण.
ganjeeगंजी.n.rice-gruel.भातांतून कराच एक पत्तळ पदार्थभात शिजिवून ओतून काढलते गंजींत भरून पोषक असल॑ म्हणून ते पीणे आंगाला चोक्कोट॑.from Tamil.
ganjee veLaNeगंजी-वेळणे.vt.to strain excess water from cooked rice.शिजिवलते भातांतून जास्ति पाणि/वेळवणी निदान ओतून टाकणे.जुने काळांत॑ भात शिजिवल॑ नंतर॑ भांडीच तोंडावर कापड बांधून गंजी-वेळणे करत होते.
ganjee veLaNeगंजी-वेळणे.idto side track the issue.विषय बदलिवून श्रद्धा वेगळे कडे करिवणे.
ganTHगंठ॑.n.a calamity foretold in the horoscope.जातकाप्रकारच दुर्घटना.मझ जातकाप्रकार 65 वर्ष 9 महिनेला मला एक गंठ होत॑. मी गेल॑ नवेंबर 15 तेतीला (तारीखाला) आंगाला फार होयनास्क॑ झालों. नंतर पाह्यलतर॑ खर॑ म्हणून ते मझ जातकांतल॑ गंठाच वेळ होत॑.
gapchupगपचुप.adv. silently. quietly.शब्द नाहीस्क॑. चुपचाप. मुंक्यान॑.उदंड वेळ वरडा-वरडी करत होतते पोर तज बापाला पाह्लकी-नाही गपचुप होऊन गेला. गुपचुप in sm.
gapchupगपचुप.adv. unobtrusively.कोणालीन कळिवनास्क॑. अम्च एक मित्र गपचुप जमीन घेऊन नव॑ घर बांधले. हे विषय अम्हाला त्यंच घरप्रवेशाच आमंत्रण पत्र आलेवरच कळ्ळ॑. गुपचुप in sm.
gappaaगप्पा.n.gossip.हरटे (Tamil).
garadगरद.n.pressing necessity. need. exigency.गरज. आवश्य.(1) मला पाष्टे पसून पोटसूळ आहे तरीन, गरद नाही, हॉस्पिटलाला जानास्क॑ सांभाळाल होईल॑. (2) मला भूक लागत आहे तरीन, गरद नाही, खायाला अत्ता काहीं नको. (3) उद्या पाष्टे य़ेऊन पाह्याला होईनातरीन गरद नाही, सायंकाळी येऊन पाह मला.usually गरद/गरज is used along with ’नाही’, rather than in the positive sense.
garajगरज.n.pressing necessity. need. exigency.गरद. आवश्य.
garaLगरळ.n.white coloured spit of an infant soon after the feed.लेंकरांला दूध देला नंतर त्यंच तोंडांतून कित्येकदा याच पंढ्र रंगाच द्रव्य. एक वर्षाच आंत असाच लेंकरांना दूध पाह्जिवला नंतर॑ (थान देला नंतर॑) त्यंच पाठीमागे थापडून देऊन ढेंकारा आणिवलतर गरळ बाहेर येईना.
garbhगर्भ.n.fetus. an embryo.पोटांतल॑ जीव.
garbhaashaya~गर्भाशय.n.womb.गर्भकोश.
garbhagraha~गर्भग्रह.n.sanctum sanctorum in a temple.देऊळांत॑ देवाच विग्रह प्रतिष्टा केलते ठिकाण.दक्षिण भारतांत असाच देऊळांत साधारण म्हणून कोणालीन गर्भग्रहांत घूंसाला सो्डनात॑. पण, वेगळ॑ कित्येक ठिकाणि, भक्त लोकांना देवाच मूर्ती शिवून पूजा कराला पणीं सोडतील॑ म्हणून ऐकलोहें.
garbhakoshगर्भकोश.n.womb.गभाशय.
garbhapaathगर्भपात.n.abortion. miscarriage.गर्भ गळून पडणे. गर्भ नास होणे.
garbhavathiगर्भवति.n.pregnant woman.गर्भिणि. गर्वारीण॑.
garbhiNiगर्भिणि.n.pregnant woman..गर्वारीण॑. गर्भवति.
gareगरे.n.the edible fleshy part of a fruit.गरे. पंडूच खायाच भाग फणसांत दोन विध आहे. खाताना गरे जीव्हांत गुंडाळाच॑ अणी गुंडाळनाते.गरा/ गर in SM.
gareeगरी.n.the edible fleshy part of a fruit.गरे. फणसाच खायाच भाग.फणसांत दोन विध आहे. खाताना गरी जीव्हांत गुंडाळाच॑ अणी गुंडाळनाते.गरा/ गर in SM.
gareebगरीब.adj.poor.दरिद्र.अम्च सरकारांच प्रकार भारतांत 30% लोकच॑ गरीब आहेत॑ (दिवसाला 32 रुपेच आंत संपाद्य असणार). हे ऐकून कोणालीन हांसू एईल. कारण असाच माघाईला शंबर रुपे संपाद्य असलतरीन एक मनुषाला वांचाला होईना.
gargarगरगर.adj.crispy. crackling.गरगर.होटेलांत्सून आणाच मेदुवडा नीट गरगर असत॑. घरांत कराच तेवढ॑ बेष/बेश असत नाही. "सोडा" घाट्लतर॑ गरगर होईल म्हणून सांगतात॑.
garjanaaगर्जना.n.roar.घट्टि वरडणे.सिंहाच गर्जना दोन तीन किलोमीटर पर्यंतील ऐकल॑.
garsoLeeगरसोळी.n.a necklace with black-beads, gold-beads and cup shaped small gold pendant signifying marital status of a woman.मंगळसूत्र. मांगल्य सूत्र. वराड झालते बायकांच गळांतल॑ काळीपोती अणी सोनेच मणीच माळ॑.काळीपोती गरसोळीच एक मुख्य भाग आहे. Note:- (1) in SM गरसळी / गरसोळी / गळसरी / गळसर / गळेसर / गळेसरी is a necklace of four or more strands with glass and gold beads and does not particularly refer to मंगळसूत्र. In olden days it had पुतळी (an old gold coin valued at that time, cira 1850s, about four rupees) (2) गरसळी is a metathesised form of गळा and सरी(necklace), with ळ and र interchanging their positions. (3) गरसळी became गरसोळी of DM.
garuDगरुड.n.Lord Vishnu's vahana.महाविष्णूच पक्षिवाहनाच नाव.
garuDगरुड.n.eagle.एक थोर पक्षि.
garvगर्व.n.arrogance. haughtiness.दुरहंकार. झंभ.मनांत॑ गर्व आलतर॑ ते मनुषाला अधोगत लोक्कुरच येईल.
garvगर्व.n.pride.अभिमान.विश्वनाथन आनंद चतुरंगांत॑ विश्वांतच सर्व श्रेष्ट खेळणार म्हणून घोषणा झालते भारतांत॑ अम्ही सगळ्यांसीन एक गर्वाच विषय म्हणूनच सांगाम॑.
garvaarगर्वार.n.pregnancy. रर्भ धारण. गर्भ होणे. गर्वार झालांपिरी बायका रात्रीच वेळ जास्त मनुषांच येणे-जाणे नाहीत ठिकाणि जाताने म्हणणे आहे.गर्भार in sm.
garvaareeNa~गर्वारीण॑.n.pregnant lady.गर्भिणि. गर्भवति
garviShTगर्विष्ट.adj.arrogant.दुरहंकारिउण॑ वयेच/वयाच लोकांना व्यापारांत ऐश्वर्य आल॑ म्हणजे कित्येकदपा गर्विष्ट होतील॑.
gathiगति.n.destiny. end result or condition.गेत.
gathiगति.n.course. path. way.वाट.
gaTTaaगट्टा.n. bundle. bale.गांठोड. मूट्टा (Tamil). कित्येक आचारे लोक॑ मंतर सांगणाचपक्षा होम संपलावर पात्र, दाळ-तांदूळ, दक्षिणा असकीं गट्टा करणांत जास्ति ध्यान देतात॑.
gavaareeshengaaगवारीशेंगाcluster beans.एक रीतीच शेंगा. गवडिशेंगा. गोवारीशेंगा. गोर्धनशेंगा. गोवर्धनशेंगा. कोत्तवरनकाय (tamil).पोळत॑ भाताच बरोर गवरिशेंगाच पिट्ळेईं, तोळ्लावाला लाह्येंच वड्याईं असलतर जेवण॑ प्रमाद असेल॑ !
gavaDishengaaगवडिशेंगा.n.cluster beans.गेवडिशेंगा. एक रीतीच शेंगा. गवारीशेंगा. गोवारीशेंगा. गोर्धनशेंगा. गोवर्धनशेंगा. कोत्तवरनकाय (tamil).
gavanगवन.n.attention.ध्यान. लक्षा. लक्ष्य.वाचणेंत आवश्याजोक्त॑ गवन देत होत नाही तो. यंदा परीक्षांत हरलांपिरी पणीं करलते चूक ओपींगाला तय्यार नाहीस्क॑ आहे.from Tamil.
gavaraaगवरा.n.dried cake of cow dung used as a fuel.गोवरा. गोवर. गोवरी. चूल पेटिवाला उपयोग कराच वाळिवलते गयीच शेणखेड गामांत लांकड अणी गवरा जळीवून सगडींते/शेगडींते संपाक कराच फार स्वादिष्ट अस्ते, कारण हळू शिजीवणामुळे पदार्थाच रूच बदलत॑ नाही.गोवरी/गोंवरी/गोवर in sm.
gavathगवत.n.grass.तृण॑.कित्येक खेडे गामांत गायीला-म्हैशीला पह्जते गवत बरोर मिळिवून थोर ढीगारास्क बांधून ठिवलस्तात॑. तेच एक घरास्क दिसेल॑.
gaveShaNगवेषण.n.research.अन्वेषण.आकाशांत कस॑ नील रंग येत॑ म्हणून गवेषण करून घोषणा करलत्याला सर.सी. वी. रामनाला नोबल-पुरस्कार मिळ्ळ॑.
gavhllarगव्हल्लर.n.cowherd.गोल्लर. गाय पाहींगणार.गव्हल्लर लोक दूधांत पाणि मिळीवणे त्यंच कुलधर्म, अस तेवढदनीं म्हणींगतात॑.
gavsaNगवसण.n.pillow/mattress cover.ऊंशीला/अंथरूणाला धूळ लागून मळक॑ होयनास्क॑ असाला घालाच पिशवीस्क॑ असाच साधन॑. गौसण
gazalगजल.n.a genre of Hindustani music.एक प्रकारच हिन्दुस्थानि संगीत.गेल॑ वर्षि प्रसिद्ध गजल सांगणार जगजीत सिंह वारलते ऐकून (मेलते ऐकून) मला फार दुख॑ (खंत) वाटल॑.
geethaaगीता.n.Bhagawat Gita.भगवत गीता.
gela~गेल॑. v. preterite of the verb 'जाणे'. gone by.निघून गेल॑. 'जाणे', हे क्रीयापदाच भूतकाळ ;मी गेले सहा वर्षांत॑ मझ गांमाला गेलोंच/गेलच नाही.गेला in sm.
gela~गेल॑.v.preterite of the verb 'जाणे'. moved away.सरकून जाणे. 'जाणे', हे क्रीयापदाच भूतकाळरात्रिपूरा बीदींत॑ वरडत होतते कुत्र पाष्टे होयाच पुढे वेगळ॑ कोठकी गेल॑.गेला in sm.
gela~गेल॑.fig.lost on account of omission, slip-up etc.हातांतून चुकून गेल॑.अत्ता काय सांगूनीं प्रयोजन नाही. गेल॑ म्हणींगून उग॑ बसणेच चोक्कोट॑.गेला in sm.
gelandaaगेलंदा.adv.last year.गेल वर्ष.गेलंदा ऐ.ए.एस परीक्षा लिव्हून चोक्कोट "रॅन्क" आलनाही म्हणून मझ॑ लोंक पुन्हा हे वर्ष ते परीक्षा लिवाला निश्चय केला.
gelandaaगेलंदा.adv.last time.गेलंदपा. गेलंदफा. मागले वेळी.
gelandapaaगेलंदपा.adv.last time.गेलंदफा. गेलंदा. मागले वेळी.गेलंदपा बोर-आड खांडाला प्रयत्न करून पाणी आल॑ नाही म्हणून यंदा (यवंदा) मी सादा आड खांडाला निश्चय केलों.
gelandaphaaगेलंदफा.adv.last time.गेलंदपा. गेलंदा. मागले वेळी
geruगेरू.n.a red-ochre colour.कावि रंग. सन्यासी लोकांच वेष गेरू रंगाच असत॑.
geruगेरू.n.a red-ochre coloured paste/liquid used along with rangoli on festive occasions.सणाच दिवसी र्रांगोळीच बरोर उपयोग कराच एक तंबड॑ रंगाच घट्टी द्रव्य.सणाच॑ दिवसी लोक त्येंच उंब्राच पुढ॑ रांगोळी घालताना रांगोळीच पंढ्र॑ रेखाच बरोर॑ गेरूच॑ रेखाईं घालाच दंडक आहे. अस घालणामळ॑ घरांत विशेष आहे म्हणून लोकांना कळत॑.
gethगेत.n.destiny. end result or condition.गत. गती.अम्च देशांत॑ दिवसास्क॑ अनाचार वाढत आहे विना चोखोट काहीं होयास्क॑ दिसत नाही. अस॑ होत गेलतर॑ देशाच गेत काय होईल म्हणून कोणालीं सांगाला होईना.
gethगेत.n.course. path. way.गत. वाट. गती.गेल वर्ष मंगळग्रहाला पाठिवलते उपग्रहाच गेत बरोर इषोब करून निश्चय करनातेकरतां ते अत्ता मंगळग्रह वलांडून ऐ.एस.आर.ओच नियंत्रणांतून सुटून सूर्यमंडलाच बाहेर जात आहे.
gevaDishengaaगेवडिशेंगा.n.cluster beans.गवडिशेंगा. एक रीतीच शेंगा. गवारीशेंगा. गोवारीशेंगा. गोर्धनशेंगा. गोवर्धनशेंगा. कोत्तवरनकाय (tamil).
giDDa~गिड्ड॑.adj.short.उंच नाहीतेगिड्डा in sm.
giDDapaNa~गिड्डपण॑.n.small height.उण॑ उंच.शंबर वर्षाच पुढ॑ जप्पानांत लोक॑ गिड्ड॑-गिड्ड॑ होते. अम्च देशांत पणीं लोकांच उंच पांच फुट सहा इंचाच वर होतनहोत॑. आंगांत॑ प्रोटीन उण॑ झालत्यां मुळे गिड्डपण॑ होत म्हणून विवर कळ्ळावर आहारांत॑ प्रोटीन अधीक मिळिवाला आरंभ केले. तज नंतर लोकांच गिड्डपण॑ उण॑ होत आहे म्हणतात॑.
gighaaDगिघाड.n.vulture.एक मांसाहारी पक्षी.
gijbaDa~गिजबड॑.n.congested and cluttered.उणे ठामांत॑ व्यवस्था नाहीस्क असणे.अम्च घरांत "फ़रनीचर" जास्त असामुळे घर गिजबड वाटते. कित्येक सामान विकूनटाकल तर थोड विस्तार असास्क वाटेल॑.
giLaaleen naahee thhunkaaleen naaheeगिळालीन नाही थुंकालीन नाही. provs.to be caught in a predicament.काय करणे म्हणून कळनाते अवस्था.the literal meaning being, 'unable to either swallow or to spit out'.
gilli danDaaगिल्लि- दंडा.n.a game played with a short and a shorter stick.एक ल्हान अणी तजपक्षा ल्हान काटींत खेळाच एक खेळ.जिल्लि-दंडा खेळ्लतर॑ डोळेले गिल्लि लागून घाव होयाला साध्यता आहे.
giLNeगिळणे.vt.to swallow.गळांतूं (जेवण॑/पाणी) पोटाला उतरिवणे.जेर, पडसा-खोंकळा नाहीस्क असताना आहार गिळाला श्रम झाल तर॑, समच 'स्कॅन' काढून 'कॅन्सर' नाही म्हणून निश्चय करींगणे बर॑.
giLNeगिळणे.fig.to embezzle.एमारिवून पैसा करणेपटणाच बीद बरोर कराच कामांत॑ बंगळूर कोरपरेषनांत॑ काम करणार उद्योगी लोक बेष पैसा गिळले म्हणून भरून आरोप आहे.
ginDiगिंडि.n.a water vessel with a spout.नाक असाच एक पाणीच पात्र.
giriगिरि.n.a mountain peak.डोंगूराच शिखर. पर्वताच शिखर. डोंगर for 'mountain' in sm.
girNeeगिरणी.n.a mill.धान्य पूड कराच दुकान. फॅक्टरींत॑ तय्यार केलते आटा घ्याबद्दिल अम्ही गहूं घेऊन गिरणीला पाठिवून पूड करिवतों.
girNeeगिरणी.n.grinding stone or machineryचक्की. धान्य पूड कराच यंत्र॑.

No comments:

Post a Comment