Sunday, May 15, 2016

gh (घ)




.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
ghaa*sघांस.n.a mouthfull (morsel of food etc.).तोंडांत॑ भराच एवढे(भात/जेवाच पदार्थ). अम्च देशांत कितिकी लेंकर॑ एक घांस भात पणीं मिळनास्क भूकांत कष्टि भोगत आहेत॑. हे विषय अम्च लेंकरांना कळीवून जेवताना एक शीत पणीं टाकताने म्हणून तेना शिकिवाम॑.घास in sm. from ग्रास of Samskrth.
ghaa*saNeघांसणे.vt.to scrub.घासणे. मळक॑ रगडून काढणे.तेलतवाच॑ चिक्कटपण॑ जायाला "विम" घालून अम्ही लोक्कुंडाच "स्टील-उलांत॑" घांसतों. पण, कित्येकदा लोक्कुंडाच॑ चूर येथ-तेथ पडून संपाकाच पदार्थांच बरोर मिळनास्क॑ पाह्यींगाम॑.
ghaabarNeघाबरणे.vt.to get scared.भींगणे. भें वाटणे.बीदींत॑ पोलीस कोणालतरीं ओठाकिवून कायतरीन विचारणा केलतर॑ पोणावांटा लोक॑ घाबरतील॑ (भींगतील॑). तज कारण पोलीसाच वर कोणालीं पातेरा नाहीत्यामुळे आसूया.
ghaagara~घागर॑.n.a vessel for storing water.पाणी धरून ठिवाच एक मोट्ठ॑ पात्र. नळ नाहीते खेडेंत पांच-सहा बायका मिळून जवळ असलते कुंठ/ नदींत आंग दुहून, घागरींत पाणी धरींगून हांसत-बोलत घराला याच दृश्य पाह्याला बेष असत॑.
ghaalNeघालणे vtto put (atop, on, etc.).(एकाच वर) ठिवणे.हे फूलाच माळ ते विग्रहाच गळावर घालूनटाक.
ghaalNeघालणे vtto thrust into. to put into.आंत ठिवणे.(1) हे पुस्तक ते पेटीचांत॑ घालूनटाक. बाहेर ठिवलतर॑ धूळ बडिवून हाळ होईल॑. (2) उगे बोट नाकाचांत॑ घाल नको. पाहणारांस कंटाळा वाटेल॑.
ghaalNeघालणे vtto wear.नेसणे.आजच शिवींगून आणलते अंगी आजच घालून हाळ कर नको.
ghaalNeघालणे vtto set out or lay out.घालणे.(1) मला भूक लागत आहे. लोक्कर ताट घालशील का ? (2) मला उदंड झोंप येत आहे. लोक्कर अंथरूण घालशील का ?
ghaalNeघालणे vtto put on. to activate.घालणे.बसा पुढे टी.वीच॑ स्विट्च घालशीलका ?
ghaamघाम.n.sweat. perspiration.काताडांतून सुटाच पाणी.समुद्राच॑ कांठशी असाच सर्व गामांतीन घाम जास्त सुटेल॑. पण, तसलते ठिकाणी भूक नीट लागेल॑ अणी ते आंगाला चोखट म्हणून मी ऐकलोंहे.
ghaam suTaNeघाम सुटणे.vi.to sweat. to perspire.घाम सोडणे. घाम गळणे.
ghaaNघाण.adj.obnoxious. foul smelling.घोळ वासाच॑.बंगळूरांतून रात्रि निघाच ’चेन्नै एक्प्रेस’ बेसिन-ब्रिड्ज स्टेशनांत वेघतानच कूवम नदीच घाण वास बडिवाला आरंभ होईल॑. ते घाण वासांतूनच अम्हाला कळून जात॑, चेन्नै येऊन पावलों म्हणून !
ghaaNaaघाणा.n.oil mill.तेलाच चक्कि. तेलाच गिरणि.
ghaaNkaaघाणका.adj.an unhygienic man.आंग अशुद्ध असाच मनुष.बस्सांत॑ जात असताना मझ बाजू एक घाणका बसलोता.
ghaaNke~घाणक॑.adj.unhygienic smellअशुद्ध वासअम्च॑ समोर बसल॑होतत्या षूसांतून तज पांय बाहेर काढला-कि-नाही, घाणक॑ सॉक्साच वास कोणालीं सोसाला होयनास्क॑ अम्ही अग्गीन मिळून तला बेष शिवा देलों.
ghaanTघांट.n.bell.घंटा. घंटे. झांकट.
ghaasघास.n.hay. straw. dried harvested paddy stem.पीक काढल॑ नंतर कापून वाळिवलते तांदूळाच गौत. वैक्कोल (tamil).कागद उरपत्ते कराला घास पणीं एक "रामेटीरियलास्क"/आरंभ वस्तुस्क उपयोग होत॑.घास and गवत in sm means grass, as also hay or straw.
ghaasaNeघासणे.vt.to scrub.घांसणे. मळक॑ रगडून काढणे.
ghaaTघाट.n.mountain range.डोंगूराच पंक्ति. भारताच पश्चिमांत॑ असाच सह्याद्रि घाटाच पूर्वभागांत॑ पाउस उण॑ पडाला एक मुख्य कारण घाटाच उंचामुळे पाउसाच वांबाला (मेघाला) पूर्वीकडे याला होयनाते करतां आहे.
ghaaTघाट.n.a mountain pass. a break in a mountain range.डोंगूराच मध्ये असाच वाट. कोयंबतूरांतून गुरुवायूराला जायाच वाट सह्याद्रीच मध्ये असाच घाटावाटी जात॑. हे घाटांत॑ केरळ राज्याच पालघाट गांव आहे.
ghaaTघाट.n.steps leading to a river bank or a tank.नदि नाहीतर॑, कुंठाच बाजू उतराच पायरी (पडतोरे).वाराणसींत॑ गंगा नदीच कांठांत॑ भरून घाट असाच अम्हाला पाव्हूया.
ghaaTघाट.n.burning ghat, ie, the place where dead bodies are burnt.चिता धाट. स्मशान.
ghaaTघाट.n.oppressive feeling because of strong smell or thick fumes.घोळ वासामुळे अथवा घट्टि वाफामुळे होयाच तंटा.अमेरिकांत असणार गोर॑ लोकांना अम्च संपाक उदंड घाट वाटत॑. तम्हापणीं थोड लोक॑ रूच भोगून अम्च जेवण॑ जेवतात॑.
ghaaTघाण.n.stench.घोळ वास. वंगळ॑(ओंगळ॑) वास.चेन्नैंत कोठ गेलतरीन कूवम नदीच' घाण येत असते. तज कारण तेवढ॑ घराच मोरीच पाणीनीं ते नदींत जाऊन मिळाचकरतां आहे.
ghaavघाव.n.physical injury. wound.आंगाला काहीं लागून होयाच फोड.कित्येकदा 'आक्सिडेन्ट' होऊन खाले पडून बाहेर घाव लागनास्क असूया. पण, आंगांत (इंटरनल) घाव लागलासलतर॑ ते अण्खीं थोर समस्या होऊया.
ghaav laagaNeघाव लागणे.vi.to get wounded.घाव होणे.
ghaDeeघडी.n.a fold.मुजलून/मुदलून ठिवाच॑. इस्त्रि केलते फडकी घडीनीशी पेटींत ठींगून ट्रेनांत की / प्लेनांत की गेलतर॑ घडी पूर्त नासुन जाऊन पुन्हा इस्त्रि करामते पडते.
ghaDeeघडी.n.a period of twenty four minutes.चोवीस मिनिटाच काळ. घटका. घटिका.
ghaDee ghaalNeघडी घालणे.vt.to fold.मुजलणे. मुदलणे. अम्ही ल्हान असताना वाळलते फडकी काढून घडी-घालून (करून) कपाटांत ठिवाच काम मीच करत होतों.मुजलणे/मुदलणे appears to be an obsolete word in sm. दुमटणें in sm means 'to double over, to fold'.
ghaDee ghaDeeघडीघडी.adv.time and again. often times. frequently.पुन्हा-पुन्हाचुकून पणीं तज कडून काहीन घेऊन आणताने. वाचूनटाकून देतों म्हणून तज एक पुस्तक काढींगून आलों. तेवढ॑च, ते वाचून संपिवाजोरी पुस्तक परतून दे म्हणून घडी-घडी विचारून मझ॑ प्राण काढला.
ghaDee moDNeघडी-मोडणे.vt.to unfold.मुजलून असाच उघडणे.
ghaDghaDaaघडघडा.n.thunder.गडगडा. पाऊसाच मेघाच गर्जना. वांबाच गर्जना.
ghaDghaDNeघडघडणे.vito thunder.पाऊसाच मेघाच (वांबाच) गर्जना होणे. गडगडणे.अधीक घडघडलतर॑ पाऊस येइना म्हणून सांगणे आहे. तसच, अधीक बोलणार कामाळू असनात॑.
ghaDigaarघडिगार.n.clock. watch.वेळ दाखिवाच उपकरण॑.ते घडिगार बरोरल॑ वेळ दाखिवत नाही वाटते. दाहा मिनिट मागे दाखिवत आहे.घड्याळ in sm. from Hindusthani via Tamil.
ghammaga~घम्मग॑.adj.pleasant smell.खम्मग. चोखोट वास. घम-घम वास.(1) खीरांत कुंकुमपू (केसरीच फूल॑) घाट्लतर खिराला चोखोट रंगीं घम्मग वासीन येईल. (2) उन्हाळाच दिवसांत॑ चेन्नै/मदुरै पटीस गेलतर॑ बिदींत पणीं मोगराच फुलाच घम्मग वास बडीवेल॑.खमंग/घमघमाट in sm.
ghana~घन॑.n.heavy.भार. जेड.घन/घण in sm.
ghandraa ghoLaaघंदरा-घोळा.adj.disorderly. haphazard.गजबिज. तेरा-पेरा.
ghangaaLघंगाळ.n.a large (brass) vessel for storing water.गंगाळ. घंघाळ. हंडा. पाणी धरून ठिवाच एक मोट्ठ॑ पात्र.(1) अम्च जुने घरांत थोर थोर घंगाळ होते. अम्ही नव फ्लाटाला सरकताना ते तेवढीन गुजरीला विकलों. एक दोन तरीन उरिवलसल तर॑ ते "हालांत॑" "शो-पीस" म्हणून ठिवलासुया. (2) अगाऊच काळांत आडाच॑ पाणी शेंदून न्हाणींत एक थोर घंगाळांत॑ भरून ठिवून हंडाच चूल पेटिवून आंघोळीच पाणी तय्यर करत होते.
ghanghaaLघंघाळ.n.a large (brass) vessel for storing water.गंगाळ. घंगाळ. हंडा. पाणी धरून ठिवाच एक मोट्ठ॑ पात्र.थोर-थोर पट्णांत राह्याच हे काळाच नव॑ पिढीच लोकांस घंघाळाच आवश्य नाही. कां म्हण्जे, त्यंच ल्हान-ल्हान नाहणींत गंगाळ ठिवालापणीं ठिकाण असत नाही अणी नळींत केम्हाहीं पाणी येतपणीं असत॑.
ghanTaaघंटा.n.hour.साठ मिनिट.तुझ करतां मी एक घंटा इकडे वाटपाह्त होतों. पण, तू आल नाहीस म्हणून वापस निघून गेलों. singular, the plural being घंटे.
ghanTaanu ghanTaaघंटानु-घंटा.n.for hours together.घंटोन-घंटा.तुझ करतां घंटानु-घंटा तिकडेच राखून असच उद्देश नाही मला. मी तिकडे जाऊन पावतानच यास्क॑ असलतर॑ ये, होईनातर॑ येणच नोको
ghanTeघंटे.n.bell.घंटे. एक वाद्य. uisजुन॑ काळास्क॑ ट्रैन निघाच पुढे तीन दपा घंटे बडिवाच दंडक अत्ताअग्गीन रेल्वे स्टेषनांत॑ करत नाहीते.
ghanTeघंटे.n.time on the clock.घडिगारांतल॑ वेळ॑. घरच॑ बायको बाहेर हिंडत असल तर॑ घरांत असणार हेच सांगतील "घंटे झाल॑ आठ, भाताला नाही वाट ! "घडिगार in Tamil means clock, whereas it is घड्याळ in sm.
ghanTeघंटे.n.hours.साठ मिनिट. मी तीन घंटे तज करतां तिकडेच राखून बसलों तरीन तो आलाच नाही.
ghanTon ghanTaaघंटोन-घंटा.adv.for hours on.उदंड वेळ. घंटानु-घंटा.अत्तलीकडे तिरुपतींत 60 वर्षाच वर असणारांना दिवसाला तीन-चारदा महाद्वारांत्सूनच॑ दर्शनाला सोडतात॑. तजमुळे म्हातारे लोक॑ घंटोंन-घंटा 'क्यूंत' ओठाकाच/होठाकाच आवश्य पडत नाही.
gharघर.n.house.राहाच ठिकाण. आलय.
ghar karNeघर करणे.vt.to set up house.घरांत॑ कुटुंब चालिवणे.कोण्तेक मनुषालीन (प्राणीला/पक्षीला पणीं) स्वंत घर करणे म्हणाच॑ त्यंच जीवनाच॑ एक मुख्य लक्ष्य असते.
gharcha~घरच॑.adj.belonging to the house.घराला संबंध झालतेकित्येक लोक॑ कामवालांस पणीं त्येंच घरच॑ लोकांस्क॑ पाह्यींगतात॑.घरचा in sm.
ghardaarघरदार.n.the entire household.कुटुंब, घराच पूरा.
gharghoosघरघूस.n.a type of large rodent. bandicoot.एक प्रकाराच मोट्ठ॑ उंदीर.
gharghoosheeघरघूशी.fig.a home bird. an introvert. a person who is shy of company.दुसरेंकड जास्ति वागनाते मनुष.घरघूशी लोकांना बाहेर अधीक जाणे की, चार लोकां बरोर मिळणे की अवडना. असलते लोक॑ विकाच/"मार्केटिंग" लैनांत घूसताने. तेना एक "कंपूटर" देवून तज वाटे काय काम होत की ते करीवुया.
gharjaamaayeeघरजामाई.n.son-in-law staying in the house of in-laws.सासुरवाडींत॑ राह्याच जामाई नवरा हुडकणार लोकांला लेंक॑ विना वेगळ॑ लेंकर॑ कोणीं नाहीतर॑ घरजामाई होयाला कोण तय्यर आहेत की असलते नवराला पहिल॑ हुडकतील॑. हेच अगाऊच रीते होत॑.घरजावई in sm.
gharogharघरोघर.adv.each and every house.प्रति घरांतीन. प्रति घरालान. सन्यासाश्रम घेटलतर॑, त्यंच स्वंत वस्तु काहीं असताने. घरोघर जाऊन भीक मागूनच॑ जेवाम॑. हे काळांत अस॑ करणार लोक॑ फार उण॑ आहेत॑.घरीदारी in sm
gharpraveshघरप्रवेश.n.house warming ceremony.गृहप्रवेश. वास्तुपूजा. एक नव घरांत॑ राहाच पुढे कराच पूजा.
gharvasaaघरवसा.n.cobwebs.आठपांयेंच॑-पूची (कोष्ट/कोळी/अष्टपाद) घराच आंत॑ छता खाले बांधाच साधन॑अधीक दिवस/महीने एक खोली झांकून ठिवलतर॑ छताच खाले घरवसा बांधून असाला साध्य आहे. घरोसा/घेरोसा/घरंव/घरू/घेरू/जाळें/सुतेरा in sm.
ghasaaघसा.n.sound from the throat.गळांतून याच शब्द. वय झालतामुळे लता मंगेशकराच घसा बदल्लाहे. त्यांस त्यंच घसावर पूर्त नियंत्रण/अठोपण असास्क दिसत नाही.
ghasaaघसा.n.throat. gullet.गळा. चघळाला कष्ट असाच पदार्थ खाताना घसाला जाऊन सांपडींगनास्क॑ पाह्यींगाम॑.
ghasaa basNeघसा-बसणे.vi.to have a problem of being heard.गळांतून शब्द बाहेर येनास्क॑ होणे.गाण॑ सांगणार लोक॑ त्यंच घसा बसनास्क असला हिंस पाणी पीणे की हिंस पदार्थ खाणे की करनात॑.
ghasaa dharNeघसा-धरणे.vi.to have throat problem.घसाला होय़ाच तंटा. फ्रिड्जाच हिंस पाणी पीऊन दोन दिवसापसून मला घसा धरलाहे.
ghasaa phaaDNeघसा-फाडणे.fig.to shout or talk at the top of one's voice.मोट्ठ॑ शब्दांत॑ वरडून बोलणे.अम्ही कोणीं किवड॑ नोहो. कां तो घसा फाडून वरडतो ?
ghaTakaaघटका.n.a period of twenty four minutes.चोवीस मिनिटाच काळ. घटिका. घडी.
ghaTanaaघटना.n.incident. an happening.घटना. वृत्तांत. पाकिस्थानांतून आलते मुस्लीम तीव्रवदींच बरोर झालते घटनांत॑ अम्च॑ सैन्याच एकलेहीं चार तीव्रवादीहीं मरले म्हणून कळ्ळ॑.
ghaTanaaघटना.n.an episode in T.V.टी.वी-च॑ विषय भाग. टी.वींत॑ याच धारावाहीच एक भाग.
ghaTanaaघटना.n.an episode in T.V.टी.वी-च॑ विषय भाग. टी.वींत॑ याच धारावाहीच एक भाग.
ghaTanaadhaaraaघटनाधारा.n.serial episodes in T.V.टी.वींत॑ याच धारावाही.
ghaTHamघठम.n.an earthen pot used as a percussion musical accompaniment.संगीताच एक वाद्य.गाणेच कचेरी होत असताना घठम बडिवणार ते मघ्य-मध्य उचलून व॑र भिरकावून त्यंच षानपण॑ दाखिवतील॑ !
ghaTikaaघटिका.n.a period of twenty four minutes.चोवीस मिनिटाच काळ. घटका. घडी.उजंड दिवस मी म्हणींगट्लों घटिकाच अर्थ "डोळे बडीवाच॑ समयाच वेळ" म्हणून. पण, अत्ता कळ्ल॑, एक घटिका म्हणजे 24 निमिषाच वेळ म्हणून.
ghaTmuTघटमुट.adj.robust and healthy.घटमुट. बलाष्टिकमझ॑ मित्राच॑ बापाला 100 वर्ष संपलाहे तरीन, त्येनी अत्तपणीं घटमुट (घट्टीमुट्टी) आहेत॑. दिवसोडि पाष्टे (पाह्टे) एक घंटेच वाकिंग करूनटाकून 'हैकोर्टाला' जाऊन त्यंच वकीलाच काम करणेंत॑ त्यांस॑ थोडक पणीं श्रम होत नाही.घटमूट in sm.
ghaTmuTघटमुट.adj.sturdy. hardy.घटमुट.हेमध्ये बंगळूर कॉरपरेषन कित्येक बीदांच रुंद जास्ति कराम म्हणून घटमुट असाच झाड अग्गीन फाडून टाकाला निर्णय केलत्याच विरुद्ध॑ पट्णाच अग्गि रेसिडन्ट्स वेल्फ़ेर असोसियेषनीं मिळून एक थोर प्रकटन केले.
ghaTTiघट्टि.adj.firm.हलनास्क॑ असाचकुर्सीच एक पांय मोडून गेलाहे. ते बरोर करापतोरी एक मोट्ठ॑ दोरांत॑ घट्टि बांधून ठिवलतर॑ कोणीं कळनास्क॑ तजांत बसलतर॑ पडनाते.घट्ट in sm.
ghaTTiघट्टि.adj.compact.पक्का असाच. घटमुट असाच घर बांधताना पाया घट्टी असास्क॑ पाह्यींगाम॑.घट्ट in sm.
ghaTTiघट्टि.adj.thick (not dilute).नित्तळ नाहीतेघट्टि दूधांत॑ अधीक साय असणामुळ॑ ते पीणे अम्च आंगाला वायीट आहेतेकरतां पत्तळ दूध घेणच उत्तम॑. घट्ट in sm.
ghaTTiघट्टि.adj.strong.बळ असाच. बळकटईजिप्टांत॑ चार पांच हदार वर्ष पुढे बांधलते पिरमिड अत्तपणीं घट्टि आहे.घट्ट in sm.
ghaTTiघट्टि.adj.loud (noise).मोट्ठ॑ (शब्द).लेंकरू झोंपी जात आहे. तला घट्टि बोल नको म्हणून सांगशील का ?
gheNeघेणे.vt.to buy.पैसा देवून स्वंत करींगणे. "घरांत॑ थोडपणीं तांदूळ नाही. दुकान-बीदीला जावून मी दहा किलो तांदूळ घेऊन येतों".(1) in sm विकत घेणे means 'to buy' (2) in DM the word विकणे is used only in relation to 'selling' and never in relation to 'buying'.
gheNeघेणे.vt.to get.घेणे.तो अन्याय तंटा करत होता. दोन मार घेटला नंतर उगे बसला.
gheNeघेणे.vt.to accept.स्वीकार करणे. uisअम्च गामाच नव तहशीलदार लांच घेणार मनुष म्हणून सगळ्यांसीं कळेल॑.
gheNeघेणे.vt.to take in hand. to grasp.हातांत धरणे.मझ दोन हातीं दुखत आहे. थोड वेळाला तू हे पेटी मझकडून घेशील का ?
gheNeघेणे.vt.to take up.हाती घेणे.अत्ताच तझकडे भरून जवाबदारी आहे. ते पुरना म्हणून अत्ता तो एक नव काम हाती घेटलाहे.
gheNedeNeघेणेदेणे.n.transactions.हेपटीस-तेपटीस होयाच व्यापार. देणेघेणे.अम्च जातींत वराडांत घेणदेण जास्त नाही. पण, कम्मा-रेड्डी-गौडा-मार्वाडी असलते जातींत वराडांत घेणेदेणे म्हणाच कोटोन-कोटी रुपेच॑ व्यवहार आहे.
ghereeघेरी.n.giddiness. vertigo.डोस्के-फिरणे. चक्कर.2001 मार्चांत मला असलास्क-असून घेरी आलहोत॑. सायंकाळी पांच घंटेंतून रात्रि बारा घंटे पर्यंतीन अवस्था भोगलों. हॉस्पिटलांत॑ मिळिवून "हेपारीन ड्रिप्स" देलावर मझ डोस्के-फिरणे राहले.
ghevDaaघेवडा.n.beans.घेवडा शेंगा. एक भाजीपाला.
ghoDaaघोडा nhorse. mare. colt. filly. pony. एक प्राणी.एक प्राणिघोडाच॑ रेसांत पैसे घालणार कोणहीं जिंतून बाहेर आलते नाही. घाटलते पैसे पूर्त जाऊन कंगाल झालेवरेच॑ ते वेड॑ दंडक सुटेल॑.
ghoDaaघोडा.n.a tall stool.एक उंच स्टूळ (English).
ghoDaabanDiघोडाबंडि.n.horse carriage.जटका. टांगा.
ghoDaabanDiघोडाबंडि.n.horse carriage.जटका. टांगा.
ghoLघोळ.adj.disagreeable. unpleasant.कंटाळा वाटाच. ओंगळ॑. वंगळ॑.
ghoLघोळ.n.disorderly state of affairs or things.गोंधळाच अवस्था.गेल वार मोट्ठ॑ पाउस अलहोत-ते-दिवस अम्ही भाजीपाला घ्याला संतेला गेलों. संतेच ठिकाण एकदम घोळ होऊन पडलहोत-ते-करतां काहीं घेइनास्क॑ पर्तून येऊन गेलों.
ghoLघोळ.n.extreme botheration.थोर तंटा.
ghoL gheNeघोळ-घेणे.vt.to irritate or bother (by repeated arguments etc).फार उपद्रव करणे. पुन्हा-पुन्हा (तर्क करून) तंटा करणे(1) कित्तिदपा सांगटलतरीन तो ऐकना. मला पाह्तानाअग्गीन उगे आवश्य नाहीस्क तर्क करून मला घोळ-घेत अस्तो. (2) कोणाच घरांतरीं एक चखोट विषय झालते कळ्लतर॑, समच हिजरा लोक घोळ-घेऊन पैसे उप्पडाला येऊन ओठाकतात. घोळवणे/घोळविणे in sm.
ghonTघोंट.n.a gulp.गीळ. घोंटाउन्हाळाच दिवसी बाहेर बिदींत जाणारांना एक घोंट हिंस पाणी देलतर॑ त्येनी तृप्त भोगतील॑. पैसे असणार एक घोंट ताक पाणी देऊया. घोट in sm.
ghonTaaघोंटा.n.a gulp.एक गीळ. घोंटघोट in sm.
ghoo*saNeघूंसणे.vt.to push in.बळ उपयोग करून आंत वेघणे सिकंदराबादांत 'जेनरल बजारांत॑ तेवढ॑ विधाच सामान सवंगान॑ मिळ्लतर॑पणीं तेथ आंत घूसाला सर्व तीन फुटाच॑ सांधीच॑ आहे. तेमळे ते दुकानांत वेघणे थोड कष्टेच. घुसणे in sm. वेंघणे in sm means 'to climb' whereas वेघणे in DM means 'to climb' and 'to enter'.
ghoo*saNeघूंसणे.vt.to sneak in.कोणालीं कळनास्क॑ आंत वेघणे.अम्च सभांत॑ तंटा करलम्हणून तला सरकिवून ठिवाला अम्ही कित्ति प्रयत्न केलतरीन तो कसतरीन आंत घूंसून आवश्य नाहीते तर्क आरंभ करेल॑.
ghora~घोर.adj.fearsome.भयंकर. अघोर.हिरण्यकशिपूला हत्या कराला स्तंभाच आंतून प्रत्यक्ष झालते नरसिंह देवाच घोर रूप शांत कराला प्रह्ळादाला मात्र झाल॑.
ghora~घोर.adj.palpably deep or denseघोर.(1) नळ-दमयंतीच खाणींत॑ एक शापामुळे दमयंति एक घोर वनांत॑ सांपडींगून वाट चुकून फार तरपडले.(2) गंगाला आकाशांतून भूमीला आणिवाला भगीरथ महाराजा घोर तपस करामते पडल॑.
ghoraNeघोरणे.vi.to snore.घोरटे सोडणे.(1) साधारण म्हणून वय होतां-होतां घोरणे अधीक होईल. म्हातारे झोंपी जाताना जास्त घोरतील॑. (2) घोरणे उणे कराला नाकावर घालाच "प्लासटरास्क" अत्तलीकड विकतात॑.
ghoraTeघोरटे.n.snoring.झोंपी जाताना नाक/घसांतून याच मोट्ठ॑ श्वासाच शब्द. घुरका. घोरणेघोरटे उणे कराला नाकावर घालाच "प्लासटरास्क" अत्तलीकड विकतात॑.
ghoShaNaaघोषणा.n.announcement. proclamation.अग्गिदनालीं कळिवाला कराच वार्ता/समाचार.सीमाच॑' कार्यक्रम काय असलतरीन॑ अम्ही पंध्रा दिवसाच पुढेच तज घोषणा करतों. तरीन, जास्ति सदस्य येत नाहीते.
ghoTaaLaaघोटाळा.n.total mess or confusion.गोंधळ॑.
ghuDagaaघुडगा.n. knee.पांयांच एक अवयव (भाग). गुडघा. गुडिगा. गुडिघा. गुढगा. गुढिघा.
ghungarooघुंगरू.n.a foot adornment with small bells worn by dancers. नर्तकांच पायेंत॑ बांधाच ल्हान-ल्हान घंटेच एक आभरण.
ghunghurDaaघुंघुरडा.n.bumble bee.एक विधाच उडाच प्राणीघुंघुरडा डोळेजवळ येताना अम्हाला कोठ॑ टोंचतकी म्हणून भें वाटते. पण अम्ही तला काहीं करनास्क असलतर॑ तेहीं अम्हाला शिवनास्क उडून जाईल.घुंघुरदा/घूंगरट in sm.
ghurkaaघुरका.n.snoring.झोंपी जाताना अपाप याच श्वासाच मोठ॑ शब्द. घोरटे. घोरणेकित्येक लोक॑ घुरका सोडाला आरंभ केलतर॑ वेगळ॑ लोक॑ ते खोलींत॑ निजून झोंपीजायाला होयनाते-एवढ॑ शब्द करतील॑.
ghusaLNeघुसळणे.vt.to churn with a churning rod.रवींत॑ ढवळणे.दिवसास्क॑ मझ॑ बाईल दूधाच साये फिड्जांत काढून ठिवून, नंतर॑ एक दिवस तजांत थोडक॑ दहीं विरदणाला घालून, दुसर॑ दिवसी रवींत घुसळून लोणी करल॑.
ghusaLNeघुसळणे.vt.to churn.मंथन करणे.
ghusaLNeeघुसळणी.n.churning rod.रवी.
ghusivNeघुसिवणे.vt.to push or sneak something or someone in.दुसरेला आंत घुसिवणेमीनीं मझ॑ लोंकीं क्रिकट पाह्याला गेलते दिवसी भयंकर गुंप होत॑. मला आंत घूंसाला झाल नाही तरीन तिकड॑ कोणालाकी धरून मझ॑ लोंकाला स्टेडियमाच आंत घुसिवलों. घुसवणे/घुसविणे in sm.
ghyaaघ्या.interj.take this.हे घेंत॑. हे घ्या.कोणाला कर्ज अवश्य नाहीकी त्यंचकडे बॉन्क लोक॑ येऊन "कर्ज घ्या" म्हणून वर-वर घोळ घेतात.

No comments:

Post a Comment