Sunday, May 15, 2016

jh (झ)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
jhaaDझाड.n.tree. plant.वृक्ष.
jhaaDझाड.n.chandelier.दीपवृक्ष.
jhaaDaNeझाडणे.vt.to sweep.झाडू मारणे. केरसोणींतून कुप्पा काढणे.
jhaaDaNeझाडणे.fig.to scold vehemently. to give a dressing down.बेष शिवा देणे. बेष हाक्का मारणे. कामवाली समोर-समोर बोलली म्हणून आज मझ बाईल तिला नीट झाडली.
jhaaDaNeeझाडणी.n.a broom.झाडू. केरसोणि.
jhaaDee jhuDoopझाडी-झुडूप.n.a shrub.एक ल्हान झाडझाडी-झुडूप अधीक असाच ठिकाणी सरप असाल साध्य आहे. तेकरतां ल्हान लेंकरांना तेथ॑ हिंडाला सोडताने.झुडूप in sm.
jhaaDooझाडू.n.broom.केरसोणि. झाडणी.
jhaaDoovaalaaझाडूवाला.n.sweeper.झाडणार.
jhaalampireeझालांपिरी.adv.after completion.झाल॑ नंतर॑.
jhaalathapoorthझालतेपूर्त.adv.as far as possible. to the extent possible. to the extent accomplished.कित्ति होत की तेवढ॑.झालतेपूर्त जेवणे मधे पाणी पीनात असणे चोक्कोट.
jhaalathara~झालतर॑.adv.if possible.साध्य होईलतर॑.उजा (उद्या) तुज घराला याला होईलका म्हणून निश्चय होऊन सांगाला होईना. झालर॑न येतों.
jhaalathara~झालतर॑.conj.but. still. yet.तरीं.कोणावर केस चालतहोतकी तो एक दिवस न्यायादीशाला सूरी घेऊन खोंचूंटाकला अणी चुकून पळाला पाह्यला. झालतर तला धरले.
jhaampaDeझांपडे.n.onset of sleep induced by tiredness. stupor. drowsiness.सुस्तामुळे डोळे झांकणे.आजीला दिवस पूरा हिंडलतामुळे एकदम झांपड आल॑. त्यंचांन बसाला झालनाही. उपाशी निजूनगेले.
jhaankaNeझांकणे.vt.to put on a lid.झांकणी घालणे.झाकणे in sm.
jhaankaNeझांकणे.vt.to close.झांकून ठिवणे.झाकणे in sm.
jhaankaNeझांकणे.vt.to shut down.बंद करणे.
jhaankaNeeझांकणी.n.lid. cover.झांकाच साधन॑.
jhaankaTझांकट.n.a hand-held round and flat gong made of alloy of metals, beaten with a wooden mallet during puja at the time of 'आरती’. घांट. आरतीच वेळ वाजिवाव/बडिवाच मिश्रलोहेंच घांट.नवरात्रींत मझ बाप देवपूजा करताना मंगळारतीच वेळाला मीच झांकट बडीवणे. मझ भाऊलीं मलीं तजांत केम्हाहीं पोटी होतहोत॑.
jhaDaNeझडणे.vi.to wither. to waste.क्षीण होणे. वाळ्णे. रोडे होणे. यंदा अम्च॑ घरच॑ अंबाच झाड भरून फूल सोडलतरीन, पोणावांटा अग्गीन झडून पडल॑.
jhaDaNeझडणे.vi.to fall or shed continuously.संतत गळून पडणे.(1) पाऊस झडताना मातींतून याच वास मला अवडल॑. (2) हे काळांत भरून दादिग्यांस ल्हान वयंतच केंस झडाच पाह्तों. काय कारण म्हणून कळत नाही.
jhaDeebhootheeझडीभूती.n.roots of medicinal herbs.आयुर्वेद झाडाच मूळी.आयुर्वेद औषदांत अणी सिद्धा ओखदांत हिमालय पर्वतावर उगाच झडीभूती फार उपयोग करतात॑.
jhagaDaaझगडा.n.fight. clash.भांडाणे.
jhaLakझळक.n.glitter. dazzle.एकदम प्रकाश होणे.(1) कन्याकुमारीच समुद्राच जवळ मिळाच काळ॑-माति ठिवून रुपेच सामग्रि घांसलतर॑ ते बेष झळकेल॑. (2) "ब्ळू-जागर" वज्र झळकास्क॑ वेगळ॑ कोण्त वज्र्हीं झळकना म्हणून मझ॑ अम्मा सांगतील॑.
jhaLakaNeझळकणे.vi.to glitter. to dazzle.एकदम प्रकाश होणे.
jhanDaaझंडा.n.flag.गुढी. पताका. कोडि (tamil).
jhanjhaTझंझट.n.trouble.तंटा.
jharaDiझरडी.n.sieve.जरडिचाळणी in sm.
jharaTaNeझरटणे.vi.shrink. shrivel.आंकृति अथवा रूप ल्हान होणे. झरटून जाणे.(1) अम्हाला कळलते एक 65 वर्षाच बायको सहा महिने रोगांत निजून शेवटी मेले. मराच पुढे त्यनी पांच फुट चार इंच उंच होते. पण, मराच वेळ॑ आंग फार झरटून गिड्डे अण्खी बरीक होऊन गेलहोते. (2) कित्येकदनास॑ म्हातार वयेंतपणीं आंग झरटलते लक्षण काहीनच अस्त नाही. साठ वर्षा झालतर पणीं पोरास्क॑/पोरीस्क॑ दिसतील॑.
jhaTझट.adv.in a trice.एक क्षणांत. तक्षण॑. फार लोक्कर.
jhaTjhaTझट-झट.adv.hurriedly.फार लोक्कर.
jhaTkaaझटका.n.sudden jerk.दिडीरशी हलणे.
jhenDaaझेंडा.n.flag.कोडी (tamil).
jhijaNeझिजणे.vi.to wear out.उपयोग करून-करून कामाला योग्य नाहीस्क॑ होणे.
jhijivaNeझिजिवणे.vt.to wear away.उपयोग करून-करून योग्यनाहीस्क॑ करून ठिवणे.झिजवणे/झिजविणे in sm.
jhimkiझिम्कि.n.ear drops (ornament) worn by women.कानात॑ लोंबूनघालाच एक आभरण॑. लोलक. झुमकि.
jhimpareझिंपरे.adj.disheveled (hair).केंस विंचरणास्क॑ सोडणे.झिंपरे डोस्के ठींगून बाहेर जाणे बर॑ न्हो.झिपरी in sm.
jhmakiझुमकि.n.ear drops.झिम्कि. लोलक.
jhokaNeझोकणे.vt.to weigh.तोलणे. वजन पाह्णे.जोखणे in sm.
jhokaNeझोकणे.fig.to estimate or take the measure of a person.एक मनुषाच षाणपण॑ तूकम घालणे (tamil).
jhokeeझोकी.n.measured by weight.तोलून वजन करणे.किराणा अण्खी भाजी-पाला विकणार झोकींत दगा करतात॑. 5% पतोरी उणे असाला वाट आहे.जोखी in sm. झोका (n) in sm means "a swing. an oscillation".
jhoLeeझोळी.n.cloth hammock for infants. लेंकरांला झोंपी घालाला उपयोग कराच कापडेच झूला झोला in sm.
jhompझोंप.n.sleep.निद्र.झोप in sm.
jhomp moDaNeझोंप-मोडणे.vi.to have one's sleep broken.अर्ध झोंपांतून उठणे.काल॑ अर्ध रात्रि कोणकी थोर वरडा-वरडी करत अम्च "बिल्डिंगांत" आले वाटते. मझ झोंप मोडल॑ अणी तज नंतर॑ उदंड वेळ मला झोंप आल नाही.
jhompaaLooझोंपाळू.adj.a person prone to excessive sleep.साधारणापक्षा फार जास्त झोंपी जाणारअम्च देशांत कित्येक पट्णांत/सिटींत दुपारी एक घंटेला दुकान झांकतील॑. पुन्हा चार घंटेलाच उघडतील॑. असल॑ दुकानदारांना झोंपाळू लोके म्हणून सांगण काहीं चूक नाही म्हणून मला वाटते.झोंपाळू/झोपाळू/झोंप्या/झोंपाळ/झोंपाळ्या in sm.
jhompaaLooझोंपाळू figan extremely lazy person.फार आळसीच मनुष. तला तीन चार चोखट चोखट काम मिळ्ळतरीन, तजांतून तेवढीन काढूनटाकले. तो एक झोंपाळू म्हणून नंतर मला कळ्ळ॑.
jhompeejaaNeझोंपिजाणे.vi.to sleep.झोंपणे.
jhopaaLaaझोपाळा.n.an indoor swing with a large flat wooden plank, hung from the ceiling by four chains.चोपाळा. चोंपाळा. जोपाळा. घरच आंत॑ चार सांखळींतून छत्तांत्सून लोंबून घालाच लांब रुंद लांकडाच पालणा/ झूला.
jhopaDeeझोपडी.n.hut.गोठा.
jhopaDpaTTiझोपडपट्टि.n.slum.चेरी (tamil).
jhuDoopझुडूप.n.a bush. a shrub.एक ल्हान झाड.
jhukaNeझुकणे.vt.to stoop.डोस्के लवणे.
jhulaNeझुलणे.vt.to sway the body.आंग हलिवणे.(1) तो अण्खीन दोन "पेग" पणीं पीलसना, अत्ताच झुलत आहे. आज रात्रि कार कस सोडाला/पळिवाला जातोकी कळना ! (2) देऊळाच हत्ति हलत-झुलत चालून जायाच पाह्याला बेष अस्ते. (3) अम्च रोडांत एक सरकारी आफीस आहे. तथे काम करणार लोके हलींगून-झुलींगून अक्रा घंटेला येत असतात॑.
jhulaNeझुलणे.vt.to swing.झूलांत॑ खेळणे.अम्ही ल्हान अस्ताना उन्हाळाच समय साळेच/शाळेच दोन-तीन महिनाच सुट्टि आलकिनी समेच घरच मागले अंबाच झाडांत॑ एक झूला बांधून दिवस पूरा झुलणे करत होतों.
jhulaNeझुलणे.vt.to nod in sleep.झोंपांत॑ डुक्ळी देणे.रात्रि "टी.वी" पाह्त॑ मझ भाऊ झोंपांत॑ झुलत असतो. हळ्ळु उठीवून आंत जाऊन निजाला सांगिटलतर॑ तला र्राग येते.
jhuLookझुळूक.n.gentle breeze.मंद वार॑. सावकाश याच वार॑.चेन्नैंत अधीक उक्कडलतरीन सायंकाळीच वेळ समुद्राच कांठशी असाच सर्व ठामीं चोखोट झुळूक येईल अणी लोकांस॑ तिकडल॑ विपरीत ऊबांतून थोड चुकाला अवसर मिळते.
jhumझुम.n.the feeling of goose pimples on account of a great feeling.एक थोर विकाराच अनुभवामुळे होयाच मनाच स्थिती. रोमांचाच स्तिती."मझ भाऊच तुल्य तू आहेस" अस सांगून श्रीराम हनुमंताला भेटींगून आलिंगन कराच रूप अठींगट्लतर अम्च मनांत॑ हे दोघेंच वर असाच भक्तीच विकार॑ जास्ती वाढते. आंग पूरा झुमशी होत॑
jhuraLeझुरळे.n.cockroach.एक प्राणि. झुरळ.

No comments:

Post a Comment