Sunday, May 15, 2016

k (क) 4 (konDaa To kuTumb)






.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
konDaaकोंडा.n.husk. bran. chaff.धान्याच भूंस.(1) कुटलते साळींतून सूपांत॑ कोंडा पाखडून वेगळ॑ करणे एक सुलूभ काम न्हो. पह्जते अनुभव असलतरेच होईल॑ ! (2) कोंडाच सगडी/शेगडी मिळणे अप्रूप झालाहे. कित्येक ग्रामांत॑ विन्हा वेगळ॑ ठिकाणी ते मिळना. (3) जुने काळांत॑ आंधोळीला पह्जते उनु पाणी कोंडाच चूलांत॑ तावत होते. (4) कोंडाच अण्खीन एक उपयोग; तजांतून 'सिलिका' करतात॑.
koNDaaकोंडा.n.a short thick wooden logओंडा. कोडा. लांकडाच एक चूरकोंडका in sm.
koNDeकोंडे.n.a type of hair-do of women where hair is gathered into a bun shape above the neck. a chignon.बिछोडा. डोस्केच मागे बायके केंस गुंडाळून बांधाच एक विध॑.from Tamil.
koNDiकोंडि.n.bolt. latch.कडी. तापा (Tamil)वार॑ बडिवून उघडनास्क॑ असाम॑ म्हण्जे कवाडाच वर्च कोंडि घालूनटाकाम॑.कडी/खिळी in sm.
koneकोने.n.corner.कोना. मूले (tamil)कोन in sm.
konkaNasthhकोंकणस्थ.n.a sub-sect of Brahmins hailing from Konkan area.कोंकण प्रदेशाच ब्रह्मणांच एक उपवर्ग.
koNkeeकोणकी.pron.someone (unknown).कोणतरीं.तेनी काल देऊळांतून परतून येताना सोडलते ठिकाणी चप्ली दिसल॑ नाही. कोणकी चुकून घालींगून गेले. नंतर॑ वेगळ॑ वाट नाहीस्क॑ कोणाचकी चप्ली घालींगून घराला आले.
koNthareenकोणतरीं.pron.someone.कोणकी. कोणीं एक. कोणीएकते घरच लोके बाहेर जाताना कोणतरीं घरांत वेघनास्क॑ असाला कुत्राला उकलून सोडूनटाकून जातील॑. कोणीतरी in sm.
koNthareenकोणतरीं.pron.anyone.कोणीं एक. कोणीएकमला हे काम कराला उदंड कष्ट होईल॑. तुम्ही दोघ्यांत॑ कोणतरीं एकले मला सहाय्य कराला येतांतका ?कोणीतरी in sm.
koNthe~कोण्त॑.adj.which ?कोण्त ?(1) कोण्त॑ पुस्तक वाचत आहेस तू अत्ता ? (2) हे दोनांत॑ तुला अवडलते कोण्त॑ म्हणून सांगटलतर॑, ते मी वेगळ॑ काढून ठिवतों.कोणता/कोणचा in sm.
koNtheenekकोणतींएक.adj.any one(thing).कोण्तीं एक.कोणतींएक काम हातांत॑ काढलतर॑ ते नीट करूनटाकूनच तो वेगळ॑ कामाला जाईल॑.
kooDeकूडे.n.a cane basket.बेताच बुट्टि.from Tamil.
kooDuकूडु.n. nest.पक्षींच घर. पिंजरा.मृग वर्गांत॑ कूडु बांधणे फार अप्रूप असलतरीन, पक्षी वर्गांत॑ पोणावांटा पक्षीनीं कूडु बांधणे आहे.from Tamil.
kooDuकूडु.n.hive. मेधमाशा/घुंघुरडा असल॑ उडाच कीडांच घर.उंच-उंच बांधणींत॑ अम्हाला मावनाते ठामी घुंघुरडाच कूडु तोडून काढणे तेवढ॑ सुलूभाच काम न्हो.from Tamil.
kooDuकूडु.n.cage for domesticated or captured animals birds etc.वाढिवाच, नाहीतर, धरलते प्राणींला ठिवाच पिंजरा.मुंबैच पोवाईंत॑ धरलते एक पुलीला एक कूडांत॑ घालून पुन्हा र्राणांत॑ जाऊन सोडून आले.from Tamil.
koojaaकूजा.n.a vessel with a screw-lid used for carrying water etc.पाणी भरून टिवाच फिरिवून झांकाच झांकणीच एक पात्र. सुरही. सुरईजुने काळांत॑ लेंकर॑-बाळ समेत ट्रेनांत॑ जाताना वाटेंत॑ चोखोट पाणी मिळना म्हणून पाणीच कूजा काढींगून जाणे होत॑.खुजा in sm.
kooleeकूली.n.wages given to a labourer.कूलीकामाच पैसा. धर्मा.एक दिवसाच कामाला उण॑पक्षा तीनशे रुपे कूली देलतरेच ते काम कराला कोणतरीन येतील॑.
kooleeकूली.n.a labourer.कूलीवाला.1952 वर्षंत॑ हिमालयांतल॑ एवरेस्ट शिखर॑ वेघाला आलते इंग्ळीष संघाच नेतांकडे टेनसिंग नोर्गे स्पष्टहोऊन सांगटलते एक विषय कायम्हणजे, शेरपांच सहाय त्यांस॑ पह्जेम्हणजे कोण्त शेरपांलीं कूलीस्क॑ म्हणींगताने, हे होत॑.
kooraiकूरै.n.a tiled or thatched roof.कवलाच छप्पर. ओलेंत॑ (tamil) केलते छप्पर.from Tamil.
koorma~कूर्म.n.an avatar of Lord Vishnu.महाविष्णूच एक अवतार.
koorma~कूर्म.n.tortoise. turtle.कसव. कासव. आमे (tamil).
koorpकूर्प.adj.sharp.चूप.अम्च॑ घरच सुरी तेवढीन मोंड झालाहे. साणावाला आलतर॑ ते अग्गीन तला देऊन कूर्प करिवाम॑.चूप is from Kannada and कूर्प is from Telugu.
kooTuकूटु.n.a liquid preparation eaten with rice.भाताच बरोर कालिवून खायाच एक कालिवण॑.
kopकोप.n.anger.र्राग.
kopiShTकोपिष्ट.n.hot tempered.र्रागिष्ट.
kopoorकोंपूर.n.elbow.हाताच मध्यभागाच एक अवयव॑ते ल्हान लेंकरू खाले पडून कोंपूराच हड॑ मोडींगटला.कोपर in sm.
koraaकोरा.adj.unused. new.नव॑. उपयोग केल नाहीते. वापरनाते.
koraDa~कोरड॑.n.dryness (of throat).वाळक॑ (घसा).ल्हान क्लासाला पंतोजी म्हणून असणे एक उदंड कष्ट कामच॑. पूरा दिवस वरडून घसा कोरड॑ होते. मात्र नहो, मुशारापणीं/दर्मापणीं उणे अस्त॑.
koraDa~कोरड॑.adj.dishes without gravy. रस नसाच भाजी/पदार्थ.
koraNeकोरणे.vt.sculpting. to chisel a figure etc.कोरून प्रतिमा करणे.समुद्राच बाju महाबलिपुरमांत॑ धोंडांत॑ कोरून ठिवलते विग्रह अग्गीन अत्तापणीं पाह्याला सुंदर आहे.
korTकोर्ट.n.court.न्याय कचेरी. न्यायालय.
kosambariकोसंबरि.n.a type of salad with moong dal etc.मूंग दाळांत॑ केलते एक खायाच तोंडलावण॑ ;कोशिंबीर in sm.
kosuruकोसुरु.n. free extras given by seller.विकताना (मिळ्लते पैसेच पक्षा जास्ति) उगे द्याच सामन.from Tamil.
koTeकोटे .n.fort.कोटे(1) दक्षिण भारताच मराठा इतिहासांत॑ जिंजी कोटेच एक महत्व भाग आहे. इसवी 1677 पसून 1697 पर्यंतीं हे कोटे मराठांच अधिकारांत॑ होत॑. (2) इसवी 1714 वर्षी मुगळांच सेनापती साद-अद-उळ्ळा खान हेनी रजपुत योधा राजा तेज़ सिंह यांस॑ (तमिलांत॑ राजा देसिंग म्हणतात॑) युद्धांत॑ हरिवून जिंजी कोटे धरले (स्वाधीन केले).कोट/कोठ in sm. Note :- from Tamil.
koTHacha~कोठच॑.adj.belonging to which place ?कोठल॑. कोण्त ठिकाणाच॑ ?ल्हान असताना मला तपालाच स्टांप मिळिवाच "होबी" होत॑. तस मिळिवलते स्टांपांत॑ एक दोन अत्तापणीं कोठच॑ म्हणून (म्हणजे, कोण्त देशाच म्हणून) व्यक्तहोवून कळना. कुठचा in sm.
koTHala~कोठल॑.adj.belonging to which place ?कोठच॑. कोण्त ठिकाणाच॑ ?दोन दिवसापुढे सांखळी तुटींगून एक कुत्र अम्च घराला येवून पावल॑. ते कोठल॑ कुत्रकी कोणाला कळेल॑ !कुठला in sm.
koTHasoonकोठसून.adv.from where ? from which place ?कोठ असून ? कोठून ? कोण्त ठिकाणांतूं ?ते कुत्र कोठसून अलतेम्हणून हे पर्यंतीन कोणालीं कळना.
kothavaalchaavaDiकोतवालचावडि.n.police station.पोलीस स्टेषन/ठाणा.
koTHeकोठे.adv.where ?कोण्त ठाम ?कोठें/कुठे in sm.
koTHe-koTHeकोठे-कोठे.adv.where ever.कोण्त कोण्त ठामभरून वर्षापुढे सिनिमा थियेटरांत॑ अमुक-अमुक टिकट घेवून प्रत्येक कुर्सींत॑ बसाच सौकर्य न्होत॑. कोठे-कोठे ठाम मिळतेकी लोक॑ तिकडच बसत होते.कुठे कुठे/कोठे कोठे in sm.
kothhaLeeकोथळी.n.a large sack or a large bin or container (usually made of matting or wicker) for storing grains.धान्य दत्तन ठींगाच एक थोर पिशवी, नाही, बेताच एक थोर बुट्टि.
kothhambareeकोथंबरी.n.coriander leaves.कोथंबिरी. कोथंबीर. धनियाच रोप अथवा पाला.
kothhambeerकोथंबीर.n.coriander leaves.कोथंबिरी. कोथंबरी. धनियाच रोप अथवा पाला.
kothhambireeकोथंबिरी.n.coriander leaves.कोथंबरी. कोथंबीर. धनियाच रोप अथवा पाला.
koTHoonकोठून.adv.where from ?कोठसून. कोण्त ठामांतूनमी उदंड हुडकलोंतरीन ते पुस्तक मला मिळ्ल॑ नाही. तुला ते कोठून मिळ्ल॑ ?कुठून in sm.
koTHoonकोठून.adv.from what point or stage. whence ?कोठून.मला अत्ता अवसरांत॑ जामते आहे. तुला उद्या फोण करताना कोठून सोडलोंकी तिकडून नंतरच॑ अग्गीन सांगतों.
koTHoonkeeकोठूनकी.adv.from some (unknown) place.कोठसूनकी. कोण्तकी (कळनाते) ठिकानांतून.
koTHsoonkeeकोठसूनकी.adv.from some (unknown) place.कोठूनकी. कोण्तकी (कळनाते) ठिकानांतून.कोठसूनकी येऊन पावलते ते कुत्राला घरांत॑ ठींगणे बर॑ न्हो म्हणून कित्ती सांगटलतरीन मझ॑ लेंकर॑ ऐकाला तय्यार न्होते.
koththuकोत्तु.n.bunch. cluster.कोत्तु(1) मल्लि फूलाच/मोगराच फूलाच मोल उणे झाल॑ म्हणून तिन॑ तज एक मोट्ठ॑ कोत्तु केसांत खोयींगट्ली. (2) नाशीकाच जवळ जातानाच मांडवांत॑ द्राक्षे कोत्त-कोत्त लोंबाच पाव्हूया. usually while referring to flowers, fruits, leaves, sprigs etc. from Tamil.
koTiकोटि.n.crore.दहा दशलक्षथोड वर्षापुढे एक लक्ष (लाख) संपादलतर॑ ते एक थोर कार्य होत॑. पण, अत्ता कोटीच संपादन॑ करणार भरूनदन॑ आहेत॑.
koTTaaकोट्टा.n.a hard seed of a fruit.फलाच घट्टि बीं. गोट्टि. गोटा.from Tamil.
kovaaकोवा.n.a sweet preparation of milk thickened to a semi-solid state.खोवा. दूध घट्टि करून तय्यार कराच एक गुळ्चीट पदार्थखवा in sm.
kovakaaiकोवक्कायि.n.a type of vegetable.तोंडेकायि (kannada/tamil). तुंड्ली.from Tamil.
kovaLa~कोवळ॑.adj.tender. immature.निब्र नसलतेकोण्त॑ भाजीहीं कोवळ॑ असताना संपाकाला उपयोग केलतरेच खायाला बर॑ असेल॑. कोवळा in sm.
kovaLa~ lenkarooकोवळ॑ लेंकरू.n.just born infant child.अता अता उजलत॑ लेंकरू. कोवळ॑ लेंकरे रडाच ऐकाला बेष असत॑ तरीन, ते ऐकताना अम्हास मनांत कसकी वाटेल॑.
kovara~कोवर॑.n.dried copra.खोवर॑. खोबर॑. खोब्र॑. वाळलते नारळ॑.
koveeकोवी.n.hollowed cocoanut used as a vessel.नरवटीच पात्र.
koveeकोवी.n.semi-hard shell of a seed.पूरा घट्टि झालनाहीत॑ गोट्टि. आवक्कायि लोण्चे कराला अंबा चिरताना कोवीनीशी चिरणे आहे.
kovithaaकोविता.n.sickle.कोयता. पीक कापाच उपकरण. कोवितांत्सून कोवळ-नारळ॑ विकणार सुलभान वरल॑ भाग कापून अम्हाला नार्ळीच पाणी पीयाला देतो. तेच अम्ही घराला आणून एक कोवितांसून कापाला प्हायलतर ते मोट्ठ॑ समस्या/प्रश्न होईल. हात-पांयाला घाव पणीं लागुया.कोयता in SM.
kowpeenकौपीन.n.loin cloth.लंगोटि.
kowsthubhकौस्तुभ.n.name of a jewel worn by Lord Vishnu.महाविष्णूच एक आभरणाच नाव.
kowthukकौतुक.n.delight.आश्चर्याच संतोष.ल्हान लेंकरे खेळाच पाह्ताना मला उदंड कौतुक वाटते.
koyathaaकोयता.n.sickle.पीक कापाच उपकरण.
koyathaaकोयता.n.sickle.कोविता. पीक कापाच उपकरण. कोयतांत्सून कोवळ-नारळ॑ विकणार सुलभान वरल॑ भाग कापून अम्हाला नार्ळीच पाणी पीयाला देतो. तेच अम्ही घराला आणून एक कोयतांसून कापाला प्हायलतर ते मोट्ठ॑ समस्या/प्रश्न होईल. हात-पांयाला घाव पणीं लागुया.
krama~क्रम.n.regular order.बरोरल॑ स्थानांत॑/स्थितींत॑ असणे.गेल वर्ष जपानांत॑ झालते ट्सुनामीच नंतर॑ बाधा झालते लोकांस॑ सरकार भात-पाणी वितरण करताना ल्हान लेंकरपणीं क्रमांत॑ होटाकून ते घ्याच पाव्हून अम्च देशांत॑ अस॑ क्रमांत॑ लोक॑ होठाकतीलका म्हणून वाटून जात॑.
krama~क्रम.n.method.पद्धति. कराच रीति.कोण्त॑ काम हातांत॑ काढलतरीन, बरोरल॑ क्रम प्रकार केलतर॑ बेष असेल॑.
kramaankक्रमांक.n.numerical order.अंकाच क्रम. संख्याच क्रम.
krameNaaक्रमेणा.adv.gradually (step by step).सावकाश क्रम प्रकार.भारताच मध्य भागांत॑ माओ वादींच उपद्रव फार आहेतेला सरकाराकडून कराच विध-विध उपायाच परिणाम क्रमेणा कळल म्हणून वाटत॑.
krameNaaक्रमेणा.adv.in an orderly manner.क्रम प्रकार.
kridhaaकृधा.n.bushy sideburns. bushy whiskers. muttonchops.गालांत वाढिवाच जाड केंस.मी कॉळेजांत वाचाच काळांत, म्हण्जे सुमार चाळीस पन्नास वर्षाच पुढे, गालांत कृधा ठींगणेहीं "बेल-बोटम पॅन्टस" घालींगणेहीं एक थोर "फॅषन" होत॑.
krimeeकृमि.n.insect.किडा. अळा. पूची (tamil). क्रिमि. ते कुत्राच केंस तिकड-तिकड झडत आहे. तला कायकी कृमीच तंटा होत आहे वाटत॑.
krimeeकृमि.n.intestinal worms.पोटांतल॑ कृमि/पूचि.पोटांत॑ कृमीच तंटा होयनास्क॑ असाला ल्हान लेंकरांस॑ तम्हा-तम्हा एरंडेलाच तेल नाहीतर॑ तलाम्हणून असाच ओखद देणे आहे.
krimiक्रिमि.n.worm.कीडा. पूची (tamil). कृमि. अळा.क्रिमीच तंटामुळे अम्च गार्डनांत॑ रोजाफूलाच झाडाला तम्हा-तम्हा ओखद बडिवत असाम॑.
kripaaकृपा.n.divine grace.देवाच कारुण्य.देवाच कृपा नाहीस्क॑ कोण्त कामहीं अमच्यान कराला होईना.
kripaaकृपा n mercy. compassion.कारुण्य. दया.धर्माच नावांत॑ समुदायांत॑ उपद्रव पसरणांला थोडपणीं कृपा दाखिवताने.
kripaaकृपा nfavourableness. kind disposition.अनुकूलता.तृणमूल कांग्रसाच अध्यक्षांच कृपा नाहीस्क॑ पश्चिम बंगाळांत॑ कोणालीं काहीं कराला होयनाम्हणून वाटत॑.
kriShiकृषि.n.agriculture.शेतीच काम. जमीनांत॑ कराच काम.भारतांत॑ सुमार 75% (पंच्याहत्तर प्रतिशत) लोक॑ कृषीच कामांत॑ आहेत॑.
kriShNaक्रिष्ण.n.an avatar of Lord Vishnu.महाविष्णूच एक अवतारमहाविष्णूच दहा अवतारांत॑ (याच कल्की अवतार सोडून) शेवटीच अवतार श्री क्रिष्णाच अवतार होत॑.कृष्णा in sm
kriShNaक्रिष्ण.n.black.काळ॑.कृष्ण in sm.
kriShNaanjana~क्रिष्णांजन॑.n.deer hide used as a sitting mat by ascetics and for keeping puja items ritually pure.कृष्णांजन॑. किष्टांजन॑. सोवळेंत॑ बसाला उपयोग कराच हरणाच चर्म. पूजा सामान सोवळेंत॑ ठिवाला उपयोग कराच हरणाच चर्म.
kriShNaarpaNa~क्रिष्णार्पण॑.n.final oblation to Lord Krishna after a puja.पूजा केल नंतर श्रीक्रिष्णाला अर्पण कराच॑ ;कृष्णार्पण in sm.
kriShNaaShTamiक्रिष्णाष्टमि.n.festival celebrating the day of Lord Krishna's birth.श्रिक्रिष्ण उजलते दिवसाच पूजाच सण. जन्माष्टमि. गोकुलाष्टमि ;कृष्णाष्टमी in sm.
kriShNamaNiक्रिष्णमणि.n.black beads in the mangalasutra.मंगळसूत्रांतल॑ काळीपोती ;कृष्णमणी in sm.
kriShNapakShक्रिष्णपक्ष.n.fortnight of the lunar calendar leading to new moon.अमावस्याच पुढेच चौदा दिवस ;कृष्णपक्ष in sm.
kriShNathuLasiक्रिष्णतुळसि.n.a variety of light purple hued tulsi.बरीक जांबळ रंगाच एक प्रकारच तुळसि ;कृष्णतुळस in sm.
kristhudharma~क्रिस्तुधर्म.n.Christianity.क्रिस्तुधर्म.
krithakjnyaकृतज्ञ.adj.grateful.उपकार मिळ्लतेला मनाच तृप्ति होणे.
krithakjnyathaaकृतज्ञता.n.gratitude.उपकार मिळ्लतेला मनाच तृप्ति होणे. धन्यता.
kritheeकृती.n.an action.कृत्य. कार्य. काम
kritheeकृती.n.a (classical) musical composition. lyric.संगीताच कृती.महाराजा स्वाति तिरुनाळांच कृतींच राग फार सौम्य असामुळे ते ऐकाला मला उदंड अवडल॑.
krithrima~कृत्रिम.adj.artificial. not genuine.असल नसाच.चुम्मण वयेंत॑ तिज स्वभावीं वागणेहीं उदंड सरळ होत॑. पण, अत्ता ते पूरा बदलून फार कृत्रिम झालाहे.
krithya~कृत्य.adj.exact.कृत्य.अत्ताअग्गीन मी उदंड अवसरांत॑ आहें. तरीन, उद्या कृत्य होऊन साडे-चार घंटेला आलतर॑ मी तुला पाह्तों.
kriyaaक्रिया.n.an act.काम. कर्म. कृती.
kriyaapadक्रियापद॑.n. (gram)verb (gram).एक कृती, अनुभव, संभव अथवा स्थिती विषयीं सांगाच गोष्ट॑.आज पाष्टे पाऊस पडल॑, हे वाक्यांत॑ "पडल॑" हे गोष्टाला क्रीयापद॑ म्हणतों.
kriyaavisheShaNक्रियाविशेषण॑.n. (gram)adverb (gram).एक क्रियापदाविषयीं काहीतरीन विवर॑ द्याच गोष्ट॑.आज पाष्टे पाऊस जोरहोऊन पडल॑, हे वाक्यांत॑ "जोरहोऊन" हे गोष्टाला क्रीयाविशेषण॑ म्हणतों.
kroorक्रूर.adj.cruel.निर्दय.
krutheeकृती.n.a method.पद्धती. रीती.
kTaanukoTiकोटानुकोटि.n.numbers beyond count. millions and millions. billions and billions.मोजाला होयनातवढे मोट्ठ॑ संख्या.रात्रीच वेळ आकाशांत॑ एक मनुषाला नुस्त दोळेंत तीन हदार नक्षत्र दिसेल॑. तजपक्षा कोटानुकोटि नक्षत्र अम्च डोलेला अदृश्य होऊन हे ब्रह्मांडांत॑ आहे.
kubuddhiकुबुद्धि.n.evil mindedness.ओंगळ॑/वंगळ॑ मन्न॑.
kuchkaLeeकुचकळी.n.tickling sensation.किळी-किळी.ल्हान लेंकरांस जास्ती कुचकळी करल॑तर॑ श्वास धरेल म्हणून तस॑ करताने.कुचकुली in sm.
kuchukuchoo bolaNeकुचुकुचू-बोलणे.vt.talking in whispers. to talk in subdued tone.उणे शब्दांत॑ बोलणेनव वराड झालते पोर-पोरी वेगळ॑ म्हणून जाऊन कुचुकुचू बोलींगणे काहीं अतिशय नाही.कुचकुचणे in sm.
kuDikaaकुडिका.n.ear studs worn by men.दादिगे/दाद्ग्ये कानाला घालाच एक आभरण॑मझ॑ ल्हानपणांत॑ "क्ळास आठांत॑" वाचत असताना अम्च इतिहासाच पंतोजी (हेनी इषोबाच क्ळास पणीं काढत होते) कुडिका घालींगाच पाव्हून अम्हाला अग्गीन मष्किरी वाटत होत॑. कुडकी in sm.
kugraamकुग्राम.n.hamlet.ल्हान खेडे गांम॑.भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाल॑ तरीन भरून कुग्राम प्रदेशांत॑ अत्त पणीन पीयाच पाणीच व्यवस्था बरोर नाही.
kujaka~कुजक॑.adj.rotten. decayed.कुजून नासलतेदहा दिवसाच पुढे एक किलो सपोटा घेटलते विसरून आज ते उघडून पाह्ताना पूरा कुजून पडलोतत॑ पाह्यलों.कुजका/कुजकट in sm.
kujaNeकुजणे.vi.to rot. to decay.कुजून नासणे.फल-पंडूच कुजणे उणे करांव॑ म्हणजे फिड्जांत ठिवताना प्लास्टिक-कवराच आंत गुंडाळून ठिवताने.
kujivaNeकुजिवणे.vt.to let a thing rot.कुजून नासिवणे.नाटी-दारू करताना तजांत कुजिवल॑त॑ पंडू घालतील म्हणतात॑.कुजवणे/कुजविणे in sm.
kula~कुल.n.clan.कुल n clan. वंश.अमच॑ समयांत एक वराड निश्चय कराच पुढे नवरा नवरीच कुल, गोत्र, जातक हे अग्गीन बरोर आहेका म्हणून पाह्यला नंतरेच पुढच॑ काम करणे, पण अत्तच॑ काळांत पोर अणी पोपोरी ते अग्गीन पाह्यनास्क॑ वराड करींगतात॑.
kulaachaarकुलाचार.n.traditions of the family.कुटुंबांत॑ परंपरांतूं असाच आचार-विचार.कुलाचार, कुलसंप्रदाय हे अग्गीन अवगणना करलतर॑ तज परिणाम अत्ता कळना, पण पुढे जातां जातां अमच॑ लेंकराच वाग पाव्हून अम्हालाच वाईट वाटेल॑.
kuladevathaaकुलदेवता.n.family deity.कुलाच देवता.अम्च कुलदेवता बनशंकरीच नवरात्रि-उत्सव बादामींत॑ पौष्य (पौष) महिना शुक्लपक्ष अष्टमीला आरंभ होऊन पौर्णमीला संपते (वारते).
kuladharma~कुलधर्म.n.traditional values of the clan.परंपरांतून कुलांत॑ चालत असाच धर्म.एक नव॑ सूनाला घराला आणिवताना अमच॑ कुलधर्मा जोक्त॑ वागेलका तिन॑ म्हणून अमच॑ मनांत केम्हाहीं असत॑.
kulagurooकुलगुरू.n.family priest.कुटुंबाच पुरोहित.अम्ही अनंतशयनांत असजोरी अमच॑ कुलगुरू रामाचार अणी त्यंच काळाच नंतर॑ त्यंच लोंक पद्दु-आचारे हेनीच अग्गि सणवारालीन घराला येऊन पूजा अग्गीन करेत होतत॑.
kulamaryaadaaकुलमर्यादा.n.family decorum.कुलाच गौरव॑. कुलाच मान-मर्यादा.मला कळ्ळत॑ एक चोक्कोट कुटुंबांत॑ त्यंच एकच लोंक अवघडविणी होऊन त्यंच कुलमर्यादाला कित्ती अवगणना कराला होईलकी त अग्गीन करेत बसलसाच पाव्हून मला संकट वाटत॑.
kulaparamparaaकुलपरंपरा.n.family tradition.परंपरा परंपरांतून कुलांत॑ चालत असाच रीती. नव॑ सूनाला अमच॑ कुलपरंपरा कित्ती लोक्कुर शिकिवतों की, तेवढीन चोखोट॑.
kulasampradaayकुलसंप्रदाय.n.traditional customs or practices of the family.परंपरांतून कुलांत॑ चालत असाच आचार-विचार.पल्लमदारविणी होतत॑ ते कुटुंब अत्ता पैसाच कष्टांत तरपडत आहेत तरीन त्यंच कुलसंप्रदाय पूर्त दत्तन ठींगट्लाहेत॑.
kulfeeकुल्फी.n.a type of (Indian) ice-cream.एक हिंस॑ गुळ्चीट देशी पदार्थ. कुल्फीच बरोर पाह्ताना ऐस-क्रीम थोड मौ असेलतरीन, कुल्फींत॑ सायेच रूच प्रत्येक होऊन कळेल॑.
kumaarकुमार.n.youth.ल्हान पोर.विदेशाच खेळ-संखांच बरोर अमच॑ संघ तुल्य होऊन खेळांव॑ म्हणजे कुमार वये असतानाच बरोरल॑ अभ्यास देलतरेच होईल.
kumaareeकुमारी.n.young girl.ल्हान पोरी/पोरे.पोरींच जिम्नास्टिक्स खेळांत॑ प्रबल होंव॑ म्हणजे कुमारी असतानेच त्यांस चोखोट अभ्यास द्याला पह्जे.
kumaareeकुमारी.n.virgin.वराड झालनाहीते पोरी.मझ॑ सोयरीकांत एकली वाराड होईनास्क॑ तसेच कुमारी विणी राहूनगेली.
kumbha~कुंभ.n.zodiacal sign of Aquarius.राशीच एक चिन्ह.
kumbha~कुंभ.n.a pitcher. घागर.धातूच मडके.
kumbhaabhiSheka~कुंभाभिषेक.n.the Hindu religious ritual of bathing or consecrating god's idol.हिंदु संप्रदायाप्रकार देवाच विग्रहाला कराच एक अभिषेक॑.
kumbhaarकुंभार.n.potter.मातीच मडके अणि मातीच साधन करणार.
kumbhaareeNa~कुंभारीण.n.potter's wife. a female potter.कुंभाराच बाईल॑.
kumbhameLaaकुंभमेळा.n.a religious festival involving bathing in sacred river.हिंदु संप्रदाया प्रकार कराच तीर्थस्नानNote:- The Kumbh Mela celebrated every 4 years and the Ardh (half) Kumbh Mela, celebrated every six years, are held at Haridwar and Prayag-Varanasi. The Purna (complete) Kumbh takes place every twelve years at four places, Prayag-Varanasi, Haridwar, Ujjain and Nasik. The Maha (great) Kumbh Mela which comes after 12 'Purna Kumbh Melas', or 144 years, is held at Varanasi.
kumkumकुंकुम.n.vermilion coloured powder for placing in forehead or used in pooja.कुंकुमाच पूड. कुंकू.मझ॑ बहिणी (बहीण॑) चुम्मण॑ पोरीविणी असतान एक दिवस आजा तिज गाळांत॑ एक टपाटा घाटले, कां म्हणजे आंघोळी कारून आलांपिरी कपाळांत॑ कुंकुम लावली नाही म्हणून.
kuNabeeकुणबी.n.a farm hand. a peasant. an agricultural field hand. ryot.शेतीच काम करणार. जमीनांत काम करणार. नांगरणार.येतां येतां हे नव॑ काळांत शेतीच कां करिवाला कुणबी मिळणे फार कष्ट झालाहे.
kuNabeeNe~कुणबीण॑.n.a farm hand's or peasant's wife.कुणबीच बाईल॑.कुणबी लोके मात्र नोहो, कुणबीण लोके पणीन मिळणे कष्ट झालाहे, कारण, त्यांस पटणांत चोखोट चोखोट काम मिळत॑, हेच.
kunDकुंड.n.a pond. a pool.पाणीच एक ल्हान तडाग. ल्हान सरोवर. कुंठ.कुंड in sm.
kunDकुंड.n.a pit or hole in the ground.डोंबरा. डोंबूर. भोईंतल॑ कुळि (tamil). कुंठ.कुंड in sm.
kunDala~कुंडल॑.n.ear ornament.कानांत॑ घालाच आभरण॑.महाभारतांत॑ कुंतीपुत्र कर्णाला उजतानच आंगांत॑ कवचीं कानांत॑ कुंडलहीं होत॑.
kunDaleeकुंडली.n.horoscope.जातक.दक्षिण भारतांत॑ कुंडलीला जातक म्हणून सांगतात॑.
kunDaliniकुंडलिनि.n.a term in Yoga denoting an esoteric dormant potential force lying coiled like a serpent at the base of the human spine.योगशास्त्र प्रकार॑ मनुषांच॑ मागल॑ हडाच खालेपटीस सर्पाच आकारांत गुंडाळून निजून असाच गूढ शक्ति. कुण्डलिनि.
kunDeeकुंडी.n.an earthen flower-pot.फूलाच झाडाच तोट्टि (tamil).
kunkooकुंकू.n.vermilion coloured powder for placing in forehead or used in pooja.कुंकुमाच पूड. कुंकुम.
kunkooकुंकू.n.a spot of vermilion coloured dot placed in the forehead.कपाळांत॑ लावाच तंबड॑ रंगाच बिंदी. पोट्टु (tamil). चांद (tamil). (कपाळांतले) ठिमका.बायका पोरी कुंकू लावनास्क॑ अस्ताने म्हणून अम्च॑ संप्रदायांत आहे.
kunkumapooकुंकुमपू.n.saffron. dried saffron flowers.केसरीच फूल.खीरांत कुंकुमपू घाट्लतर खीराला चोखोट रंग, खम्मग वास हे दोनीं येते. झालतर ते उदंड माघ/मोल आहे ; ग्रमाच एक ल्हान डब्बाला दोनशे रुपे अस्ते.from Tamil.
kunTHकुंठ.n.a pond. a pool.पाणीच एक ल्हान तडाग. ल्हन सरोवर. कुंडशुद्ध॑ केलते पियाच पाणी सगळ॑ खेडेगामालीं देतों म्हणून एलक्षनाच वेळ एक एक राष्ट्रीय पक्षीं सांगतातविना एलक्षन जिंतलेवर खेडेकडे तेनी परतूनपणीं पाह्त नाहीते. अत्तापणीं भरून खेडेगामांत॑ पियाच पाणी कुंठांतूनच शेंदून आणाच॑.कुंड in sm.
kunTHकुंठ.n.a pit or hole in the ground.भोईंतल॑ डोंबूर. कुंडजुने काळांत॑ मैसूर संस्थानांत॑ (अत्तच॑ कर्नाटका राज्य) र्राणाच हत्तीला खेढ्ढा संप्रदायांत॑ धरत होत॑. पण, ट्रावनकोर संस्थानांत॑ (अत्त॑च केरळा रज्य) तलाम्हणून र्राणांत॑ कुंठ काढून हत्तीला धरत होते.कुंड in sm.
kunTH khaanDaNeकुंठ खांडणे.id.an idiom meaning "(a guest) determined to stay put"."दुसरेंच घरांत उजंड (उदंड) दिवसाला राह्याला निश्चय करणे", हे अर्थच एक शब्दालंकार. डेरा बडिवणे. The literal meaning being, "to dig up a pond (as an indication of ensuring long term source of water).
kunTHaach var raag kareengoon dhuvanaaska~ gelaa mhaNeकुंठाच व॑र राग करींगून धुवनास्क॑ गेला म्हणे.say.a saying meaning 'inaction on flimsy grounds'."अर्थ नाहीते कारण सांगून काईं करनास्क उगे बसणे", हे अर्थाच एक म्हण.The literal translation of this saying is " going away not bathing or cleaning oneself, after getting angry with the pond".
kunthhaNeकुंथ.imp.moan.मनाच आंतच स्वंकट भोगाच॑.
kunthhaNeकुंथणे.vt.to groan. to let out a sound while straining.श्रम भोगताना तोंडांतून शब्द येणे.कुढणे/कुंथणे in sm.
kunthhaNeकुंथणे.met.to fret and fume.कुंथणे.तो एक शुद्ध॑ शोंबेरी म्हणून अग्गिदनासीं कळेल॑. कित्ति ल्हान काम देलतरीन कुंथाला आरंभ करतो.
kuppaaकुप्पा.n. garbage.कचडा. केर. अम्च बीदींत॑ कोरपरेषनाच लोके घरोघर येऊन कुप्पा काढींगून जातात तरीन, अम्च शेदारल॑ (शेजारल॑) घरच लोके कित्ति सांगटलतरीन त्यंच घरच कुप्पा बीदींतेच भिरकावतील॑. from Tamil.
kuppaa kuppaaकुप्पा-कुप्पा.fig.a large quantity.मूटा-मूटा. भरून. उदंड॑. उजंड॑.दहा वर्ष एक कामपणीं नाहीस्क बसलते ते मनुषाला नंतर अदृष्ट बडिवले. कसकी गळ्फांत॑ जाऊन कुप्पा-कुप्पा पैसा संपादींगून आला.from Tamil.
kuppiकुप्पि.n.bottle.बोट्टलअत्ता दूध पोळितीन साषेटांत॑ येत॑. पुढे अग्गीन कुप्पींत॑ येत होत॑.कुपी in sm.
kuraDhaNeकुरढणे.vt.to crawl on one's buttocks.खुरडणे. टीरींत॑ र्रांगणेबीदीच कुत्राला कोणकी धोंडा बडिवून तज मागल॑ पांयाला थोर घाव लागलाहे. अत्ता तला पुढे जाम॑ म्हण्जे कुरढेत-कुरढेत जायालच होईल.खुरडणे in sm.
kuraDhaNeकुरढणे.fig.to be a slow coach. to be a laggard.हळ्ळु शिकणार."मी अठ्रा महीने पतोरी घरांत कुरढत होतों. तेवढीन हळ्ळु शिकलों" अस मझ आजी सांगतील॑.
kurala~कुरळ॑.adj.curled.गुंडाळून-वांकलते आकारांत॑ असाच॑.अत्तलीकडे केंस कुरळ॑ कराच साधन मिळते.कुरळा in sm.
kurala~kensकुरळेकेंस.n.curly hair.कुरळते केंस.बायका पोरींना उजळ काताड, कुरळेकेंस, मोठ डोळे अणी उंच वाढ हे सर्वीं असणे त्यंच अदृष्ट म्हणून सांगूया.
kuroopकुरूप.adj.ugly.पाह्याला बर॑ नसाच॑. विकार॑.हान्स क्रिस्टियन आन्डेरसन यांच॑ "द अग्ळि डकळिंग" खाणींत॑ शेवटी सुंदर झालते हंस॑, पिल्लू असताना उदंड कुरूप होत॑ म्हणून संकटांत॑ होत॑.
kurseeकुर्सी.n.chair.बसाला उपयोग कराच एक साधन.कित्येक सरकारी साळेंत॑ लेंकरांस॑ बसाला कुर्सी नाही म्हणून भोई व॑र बसिवतात॑.खुर्ची in sm.
kuruvaDyaaकुरुवड्या .n.sun-dried crispies made from rice flour, eaten after frying. ऊनांत वाळिवून तळून खायाच तांदूळाच पीठाच वडाम. वर्षा वर्षी मझ॑ अम्मा उन्हाळाच॑ पुढेच कुरुवड्या, कोह्ळवड्या असलते अग्गीन घालून अम्ही साळेच सुत्तींत घराला एक महिनेच सुट्टीला येऊन जाताना देऊन पाठिवतील॑.
kusareeकुसरी.n.tiny multi-coloured sugar balls.ल्हान-ल्हान रंग-रंगाच साखरेच बूद.अम्ही ल्हान असताना अमच॑ आजीम्मा अमच॑ दोस्केच व॑रून बोर-ओतताना भोईंत॑ पडलत॑ अग्गीन वेंचून काढाला मझ॑ भाऊ-भावंडेंच लक्ष्य पैसे-नाण्य पंडू हेज व॑र होत अणी मझ॑ लक्ष्य नुस्त कुसरीच व॑र होत॑ !used during Sankranti celebration for pouring over children’s heads along with coins and other goodies.
kushकुश.n.name of a sacred grass.पूजाला उपयोग कराच एक प्रकारच गवत.दर्भ, कुश अणी दुर्वा अस॑ तीन विधाच पुण्य गवत पूजा संप्रदायांत उपयोग करतात॑.
kusheeकुशी.n.happiness.संतोष. आनंद.ल्हान लेंकरांस॑ त्यांस॑ पह्जते मिळताना होयाच कुशीला निजहोवून शुद्ध कुशी म्हणून सांगूया.खुशी in sm.
kuShTकुष्ट.n.leprosy.एक प्रकारच महारोग. कुष्टरोग.कुष्टाच पहिलच चिन्ह आंगांत कोठतरीन काताडांत॑ पंढ्र रंग येईल॑ म्हणतात॑.
kuShTarogकुष्टरोग.n.leprosy.एक प्रकारच महारोग. कुष्ट.बरोरल॑ वेळांत॑ ओखद काढाला आरंभ केलतर॑ कुष्टरोग संपूर्णहोऊन बरोर होईल॑.
kuShTarogeeकुष्टरोगी.n.leprosy patient. leper.कुष्टरोग धरलते व्यक्ती.जुने काळांत कुष्टरोगी लोकांस अग्गीन गांवाच आंत सोडत होत नाहीत॑ अणी त्यांस म्हणून एक प्रत्येक टिकाण देऊन तिकडेच असास्क॑ व्यवस्था करत होते.
kuskaraNeकुस्करणे.vt.to crumple (a sheet/paper etc).(कापड/कागद) रगडून विकार करणेअवसरांत॑ ऑफीसाला जायाच वेळ मझ॑ बेष इस्त्रि करून ठिवलते अंगी कोणकी कुस्करूनटाकले.कुसकरणे in sm.
kuskaraNeकुस्करणे vigetting crumpled (a sheet/paper etc).(कापड/कागद) अपाप रगडून विकार होणे(1) इस्त्रि केलते फडकी घालींगून "आटोरिक्षांत" गेलतर॑ जाऊन पावजोरी ते कुस्करून जाते. (2) इस्त्रि केलते फडकी "हॅंगरांत" अडकिवून ठिवनास्क॑ एक कपाटांत उग॑ ठिवलतर॑ एक वरानंतर॑ ते अपाप कुस्करून जाते. कुसकरणे in sm.
kusthiकुस्ति.n.wrestling.मल्लयुद्ध.भारताला जुन॑ काळांतूनच कुस्तीच परंपरा आहेतरीन, ओळिंपिक खेळांत अत्तापर्यंतीन दोन कांसाच पदकेच मिळ्लाहे.
kuTaNeकुटणे.vt.to pound.कुटून चूर्ण करणे. कांडणे.हातांत॑ कुटून केलते तिखटमीठाला (तिखटचट्णीला) मिक्सींत॑ केलतेपक्षा रूच असते.
kuTeerकुटीर.n.hut.गोठा. कुडिल (tamil). झोपडी.राणाच आंत राह्याच आदिवासींच कुटीर सगळीन हत्ती ध्वंस करून नास करल॑ म्हणून त्यांस नव॑ घर बांधून देंव॑ म्हणून सरकाराला विपक्ष-दळाच नेता विधानसभांत॑ विनंती करले.
kuthra~कुत्र.n.dog. bitch.एक प्राणी.घर पाह्यींगाच कुत्राच वर्गांत॑ "अलसेषन" कुत्र उदंड चोखोट म्हणतात॑.कुत्रा for dog & कुत्री for bitch in sm, कुत्रे in sm means 'a small dog'/'puppy.'
kuthraach poonsaalaa laamb karivaalaa hoyeelkaa ?कुत्राच पूंसाला लांब करिवाला होईल का ?.say.a saying meaning "old habits die hard"."जुन॑ दंडक सोडणे कद्दीन होईनाच होईना", हे अर्थाच एक म्हण.
kuththakeकुत्तके.n. a contract for alienation of rights to the fruits, leaves and other produce of trees, plants etc.झाडाच पंडु, पान हे सगळींच वर द्याच व्यापाराच अधिकार॑.अम्च घरासमोरल॑ तीन कढीपत्ताच झाडीन मझ॑ आजी वर्षा-वर्षी कुत्तकेला देवूनटाकून, नंतर॑ संपाकाला कढीपत्ता पह्जे म्हणताना कोणालीन कळनास्क॑ तेच झाडांतून तोडून काढतहोते.from Tamil.
kuTumbकुटुंब.n.family.परिवार.स्वतंत्र भारताला एकच कुटुंब, म्हणजे, नेहरू परिवार तीन प्रधानमंत्री देलाहे.

No comments:

Post a Comment