Sunday, May 15, 2016

a (अ) 2 (amor-samor to arghya)


.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
amor-samorअमोर-समोर.adv.face-to-faceसमोर-समोर. सोमोर-सोमोरअम्च॑ मध्ये मनस्थाप उदंड दिवसापसून आहे. अण्कीन अस॑ असणे बरोर असना म्हणून अमोर-समोर बसून पूरा विषय बोलून व्यक्त करींगम्हणे.
amruthअमृत॑.n.celestial nectarअमृत॑. देवलोकाच श्रेष्ट पानीयनिरंतर वांचाला अम्ही कोणीं अमृत॑ पीवून आल नाही. तजमळे हे भूलोकांत॑ अम्च असणे-वागणे सर्वीं बरोरल॑ दृष्टींतून असाम॑.
amsha~अंश.n.a portion. a partभाग. चूरपांडवांला देशाच एक ल्हान अंश पणीं द्याला दुर्योधना तय्यार न्होता.
amuke~अमुक॑.adj.a particular (one)कोण्तीन एक. प्रत्येकमला तुम्ही दहा पंध्रा काम एकच वेळ सांगिट्लतर मनांत॑ गोंधळ होईल. मझकडून काम नीट करिवाच असलतर अमुक काम करा अस॑ सांगा.अमका/अमुक in sm.
amuke~ amuke~अमुक॑अमुक॑.adj.certain specified (things)प्रत्येक-प्रत्येक काढून सांगट्लतेउद्या घरांत॑ बनशंकरीच पूजा आहे. आज पाष्टे आचारे घराला येऊन पूजाला पह्जेते अमुक॑-अमुक॑ सामग्रींच विवर॑ एक कागदांत॑ लिव्हून देवून, ते सग्ळीन आज संध्याकाळीच पुढे तय्यार करून ठिवांत म्हणून सांगूंटाकून गेले.अमकातमका/अमुकतमुक in sm.
anaachaarअनाचार.n.inappropriate behaviourओंगळ॑(वंगळ॑) वागणेहे जवळ समुदायांत॑ अनाचार अणी अक्रम उदंड जास्ती झालाहे.
anaarasअनारस॑.n.a type of sweet preparationअपूप॑. अधिरसम. तांदूळाच पीठांतून केलते एक गुळ्चीट पदार्थअधिकमास दान करताना तेतीस अनारस पणीन देणे आहे.अनरसा in sm.
anaarundअनारुंद.adj.wastrel. profligate.अवघड. ल्हान वयेंत बाप-मायाच उपदेश अवगणना करत होता. अता अनारुंद म्हणून हिंडत पडलाहे.
anaathhअनाथ.adj.orphanedअम्मा-बाप नाहीते.त्यांस॑ लेंकरे न्होत म्हणून एक अनाथ पोरीला दत्त घेटले
anaathhअनाथ.adj.abandonedआश्रय नाहीतेबीदींत॑ असाच कुत्र, मांद्र असले अनाथ प्राणींला वाढिवाला एक नव संस्था आरंभ कराच योजना नगरपालिकाला आहे, अस॑ मुख्य मंत्री सांगिट्लते मी पत्रांत॑ वाचलों.
anaathhaalayअनाथालय.n.orphanageअनाथ लेंकरे राहाच ठिकाण. अनाथाश्रमएक एक पटणांतीन सरकार अनाथालय उघडलाहेत तरीन ते चालिवाच रीतींत अण्कीन भरून सुधार आणाम॑.
anaathhaashramअनाथाश्रम.n.orphanageअनाथ लेंकरे राहाच ठिकाण. अनाथालयबायका पोरींला म्हणून एक अनाथाश्रम अत्ता-अत्ता नव होऊन अम्च॑ गामांत उघडले.
anaavashya~अनावश्य.adj.unnecessaryआवश्य नाहीतेअम्च वकीलाच मनांत॑ तेनी थोर षाणे म्हणून होत॑. कोर्टांत॑ मझ केस वाद करताना अनावश्य बोलून केस हरलांपिरी त्यंच तोंड ल्हान झाले.अनावश्यक in sm.
anaavruShTeeअनावृष्टी.n.scanty or no rainfalls.पाऊस पडनास्क॑ असाच अवस्थागेल वर्ष पाऊसाळाच महिने पूरा संतत पाऊस पडल॑, पण हे वर्ष अनावृष्टी म्हणूनच सांगाम॑.
anaayaasअनायास॑.adj.effortlessकष्ट नाहीस्क॑. श्रम नाहीस्क॑. सुलूभ होऊन. रात्रीच वेळ चोराला घूंसलते घर एक पहलवानाच म्हणून चोर्टाला कळ्ळ॑ नाही. पहलवान तला अनायास॑ उचलून बाह्येर भिरकावले.
ananthअनंत.adj.endless. eternalअंत नाहीते. केम्हाहीं(केम्माईं) वारनाते. निरंतर॑.हे ब्रह्मांडाला परिधी नाही अणी ते अनंत आहे.
anantha chathurdasheeअनंतचतुर्दशी.n.ananthavratha. a pooja performed to propitiate Lord Vishnu as reclining in Anantha.अनंतव्रत. अनंतशयनरूपी महाविष्णूला कराच एक पूजा.भाद्रपद महिनाच शुक्लपक्ष चतुर्दशीला अनंतचतुर्दशी सण येत॑.
ananthaasanअनंतासन.n.a small pedestal kept inside a pooja mantap for placing God's idols.देवाच विग्रह ठिवाला म्हणून मंटपाच आंत ठिवाच एक ल्हान आसन.
ananthashayanaaअनंतशयना.n.Lord Vishnu. the Lord who reclines on Anantaअनंतशयनरूपी महाविष्णूश्रीरंगमांतल॑ श्रीरंगनाथाच देऊळ अणी तिरुवनंतपुरमांतल॑ श्री पद्मनाभस्वामीच देऊळ, हे दोन ठिकाणीन महाविष्णू अनंतशयन रूपांत आहे.
ananthavrathअनंतव्रत.n.anantha chathurdashee. a pooja performed to propitiate Lord Vishnuअनंतचतुर्दशी. अनंतशयनरूपी महाविष्णूला कराच एक पूजा.वर्षावर्षी अम्ही अनंतव्रत सण अम्च॑ घराच जवळ असाच श्री राघवेंद्रस्वामी मठांत जाऊन करतों.
anavanTHeeअनवंठी.n.chin. the lowest part of the faceतोंडाच खल्लच (खालच) भागएक थोर ट्रेन अपघातांतून चुकलए तरीन त्यंच अनवंठीला प्ळास्टिक सर्जरी करामते पडल॑.अनवठी in sm.
aNavarNeअणवरणे.vi.taken after. inheriting qualities of forefathers. chip of the old blockपूर्वजांच स्वभाव असणेते पोर तज आजाला अणवरलाहे. तज पुस्तक, कापड, खेळाच सामान सर्वीन बरोरल॑ ठिकाणी असाम॑ ; नाहीतर तला नाकावर र्राग येईल॑
anDaaअंड॑.n.eggमुट्टे (Tamil). कोंबडेच अंडा दिवसोडी एक एक खाल्लतर आंगाला चोखट म्हणतात॑.
andhaarअंधार.n.darknessउजाड नाहीस्क॑ असाच॑ स्थितीअत्ता-अस्कीन दिवसाला तीनदपा "पवर-कट" होताहे. रात्रीच वेळ अंधारांत॑ लेंकरांस॑ वाचाला उदंड॑ कष्ट होत म्हणून मी एक इनवर्टर घेट्लों
andhaLe~अंधळ॑.adj.blindडोळे दिसनाते(1) अम्च गांवांत॑ अंधळ॑ लेंकरांस॑ शिकिवाला एक साळे/शाळे उघडाच विषय बोलून तीन वर्षा नंतर॑ ते निज/खरे झाल॑. (2) मी ल्हान अस्ताना अम्च घराला एक अंधळ॑ भीकारी वारा-वार॑ येत होतते अत्तापणीं मझ सयेंत॑ आहे.
andhavishvaasअंधविश्वास.n.superstitionआधार नाहीस्क॑ कराच विश्वासमोठ॑ वाचणे-लिव्हणेच मनुष झालतरीन कित्येक विषयांत॑ तज अंधविश्वास पाह्ताना मला आश्चर्य वाटते.
Aneअणे.n.the coin Anna.आणे.ते काळांत चार अणेला दोन इड्ली मिळत होत, पण अत्ता तेच इड्लीला पंध्रा रुपे झालाहे.
aNeeअणी.conj.andअण्खी. अण्की. अण्खीनतपालांत॑ आज मला दोन कागद अणी एक पार्सल मिळ्ल॑
aneetheeअनीती.nagainst the laws. unlawfulन्यायाच विरुध. अन्यायएवढे दिवस दुसराना एमारिवून जीवन चालिवलते मनुषाला अनीतीच वाटांतून सुटिवून सुधाराला त्यंच घरच लोक केलते प्रयत्न व्यर्थ झाल नाही
anekअनेक.n.more than one. manyएकापक्षा जास्ती. भरूनअनेक वर्गाच लोक अणी अनेक रीतीच भाषा बोलणार, हे विषयांत॑ भारत देशापक्षा अधीक असाच देश भूलोकांत॑ वेगळ॑ कोण्तीन असना
anekअनेक.n.manyभरून. उदंड॑. उजंड. दंडकित्येक समुदायांत॑ कोणीं परदेशाला जाताना अनेक लोक येऊन तला एर्पोर्ट अथवा रेलवे स्टेषनांत॑ पाठिवून द्याच पाव्हूया.
angaaraaअंगारा.n.sacred residue of coal cinders after saligrama puja and offering of nevedya to Lord Narayana.साळिग्राम पूजा अणी नेवेद्य (नैवेद्य) झालनंतर॑ सगडींतल॑ कोळसा.मध्व संप्रदायाच दादिगे त्यंच आंगांत गोपीचंदन लावलते ठिकाणी अंगारा लावतात.the sacred cinder is applied wherever gopichandana has been applied on their body by Madhva brahmins.
angaNअंगण.n.court-yardघराच पुढच नाहीतर॑ मध्य भागांतल॑ मोकळ॑ ठिकाणसाधारण होऊन घरच॑ अंगणांत तुळसी-ब्रिन्दावन असत॑.
angapradakShiNaaअंगप्रदक्षिणा.n.circumambulation by rolling on the floor around the sanctum sanctorum of a temple in fulfillment of a vow. नवस करून देऊळाच गर्भगृहाच प्राकारांत॑ साष्टांग निजून प्रदक्षिणा करणे.तिरुपतींत मझीं म्हज॑ थोरळे भाऊचीं मुंज झालतम्हा अम्ही दोघीं देऊळाच गर्भग्रहाच (गर्भगुडीच) प्राकारांत॑ अंगप्रदक्षिणा करलों.
angarkaaअंगरका.n.shirtअंगर्का. अंगरखा. अंगी. दादिगे/दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत॑ नेसाच वस्त्रकेम्हीन मी पॅन्ट शिंपीकडून शिवून घेतों अणी अंगरका दुकानांतून रेडीमेडाच घेतों.
angarkaaअंगर्का.n.shirt.अंगरका. अंगरखा. अंगी. रेडीमेड अंगर्का घेताना केम्हाहीन मला थोडक॑ पाव्हून घेमतेस्क॑ अस्त॑, कां म्हणजे चाळीस अथवा बेचाळीस नंबराच अंगर्काच मला बरोर पडेल, पण दर कंपनीच चाळीस अणी बेचाळीस नंबरांत व्यत्यास अस्ते.
angarkhaaअंगरखा.n.shirtअंगर्का. अंगरका. अंगि. दादिगे/दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत॑ नेसाच वस्त्र अम्ही लेंकरे असताना दोनकी तीनकी गुंडी असाच अंगरखा डोस्के वरून घालास्क॑ शिवत होते. अत्ता हे काळाच अंगरखाला पांचकी सहाकी गुंडी असत॑ अणी ते पुढे पटीस उघड॑ असते म्हणून डोस्केच वरून घालाच आवश्य नसते. अंगरखा/अंगराखा in sm.
angavasthra~अंगवस्त्र.n.cloth covering torso of a man. upper clothअंगोस्त्र॑. अंगोस्तर॑. अंगूस्त्र॑. दाद्ग्ये आंगाच वरच भागांत पांघरिवून नेसाच कापड(1) पूजा, नाहीतर॑ काहीं शुभकार्य करताना दादिगे/दाद्ग्ये अंगवस्त्र अणी वेष्टी/धोती नेसूनच कराम॑ अस आहे. (2) केरळच देऊळांत॑ जाताना अंगी अणी पॅन्ट नेसाला सोडनात॑. तज बद्दिल वेष्टी अणी अंगवस्त्र नेसाम॑.
angeeअंगी.n.man's shirtअंगर्का. अंगरका. अंगरखा. दादिगे/दाद्ग्ये मादाच वरल॑ भागांत॑ नेसाच वस्त्रअनंतशयन श्री पद्मनाभास्वामी देवस्थानाच आंत जाम॑ म्हणजे दादिगे त्यंच अंगी उकलून धोती नेसींगून जाम॑.
angeekaarअंगीकार.n.espouse. acknowledge. admitसंमतऐक्य राष्ट्र संघटनाच (UNO) अंगीकार झाल नंतर अमेरिका इर्राक युद्ध आरंभ केले
anghoLeeअंघोळी.n.bathingपाणींत आंग धुवून शुद्ध करणे. अंघोळ. अंघूळ. आंघोळ. आंघूळखेडेगांवांच लोके अंघोळीला कुंड नाहीतर नदीला जाणे आहे.
anghooLअंघूळ.n.bathingपाणींत आंग धुवून शुद्ध करणे. अंघोळ. अंघोळी. आंघूळ. आंघोळ. स्नान. अंघूळ कराच खोलीला नाहणी म्हणतों.
angoosthra~अंगूस्त्र॑.n.cloth covering torso of a man. upper cloth.अंगवस्त्र. अंगोस्तर॑. अंगोस्त्र॑. दाद्ग्ये आंगाच वर पांघरून नेसाच कापड. दादिगे अनंतशयन श्री पद्मनाभस्वामी देवस्थानाच आंत वेघाम म्हणजे अंगी काडूनटामाम॑, पण ब्रह्मणांस॑ अंगूस्त्र घालाला सोडतील॑.
angosthara~अंगोस्तर॑.n.cloth covering torso of a man. upper cloth.अंगोस्त्र॑. अंगूस्त्र॑. अंगवस्त्र. दाद्ग्ये आंगाच वर पांघरून नेसाच कापड.बंगळूरांत पेजावरश्री यांच विद्यापीठांत असाच श्री राघवेन्द्रस्वामीला कनकाभिषेक कराच एकएकदनांसीन मंत्राक्षताच बरोर अंगोस्त्रर॑ सम्मानास्क॑ देतील॑.
angosthra~अंगोस्त्र॑.n.cloth covering torso of a man. upper cloth.अंगवस्त्र. अंगोस्तर॑. अंगूस्त्र॑. दाद्ग्ये आंगाच वर पांघरून नेसाच कापड. आंगावर अंगोस्त्र॑ नोको म्हणून अस्ताना कित्येकदन॑ ते काडून माद (माज) गुंडाळींगून बांदींगतील॑.
angoTHeeअंगोठी.n.finger ringमुदीसाधारण होऊन अंगोठी डाव॑ हातांतल॑ बोटांतेच घालतों.आंगठी in sm.
anguTHअंगुठ.n.thumb.हाताच मोठ्ठ बोट.श्स्त्र-विद्यांत अर्जुनाच बरीस कोणीन असताने म्हणून एकलव्याकडून तज अंगूठ कापून गुरुदक्षिणा म्हणून द्याला द्रोणाचार्या विचारले. आंगठा / अंगठा in SM.
anguTHअंगुठ.n.toe.पांयाच मोठ्ठ बोट. नियंत्रण नाहीस्क॑ होतते डयबीटिसामळे मझ॑ मायाच अंगूठा कापून काढूनटाकले. आंगठा / अंगठा in SM.
aNiअणि.conj.and.अण्खी. अण्की. अण्खीनतपालांत॑ आज मला दोन कागद अणि एक पार्सल मिळ्ल॑.आणि in sm.
anishchayअनिश्चय.n.uncertainty(मनाला) व्यक्त होवून कळनाते अवस्थातीन दिवसापसून मोठ॑ पाऊस पडत होततेकरतां एरपोर्ट झांकून आहे. एरोप्ळेनांच येणे-जाणे अनिश्चय झालाहे.
anjaleeअंजली.n.offering made with palms held together to form a cup.वाटीच आकारांत॑ दोन हातीं जोडून अर्पणा करणे.फूल दोन हातांतीन काढून अंजली द्याचाला पुष्पांजली म्हणतों.
anjeerअंजीर.n.figsएक फलाच नावअंजीर फळाच गुळचीट वाळतां वाळतां जास्ती होत जाईल॑.
ankअंक.n.a numerical figure. numeral(s) of a number.अंकअरबी-अंक म्हणून पश्चिम देशांत बारावां शतकांत प्रसिद्ध झालते संख्यामाला वास्तव होऊन भारतांत फार जुने काळांतच प्रयोगांत होत॑.
ankअंक.n.an act of a play or drama.नाटकाच भाग.नाटकांत एक-एक अंक आरंभ होतानहीं संपतानहीं वेदीच पर्दा घालणे अणी काढणे होत असत॑.
aNkeenअण्कीन.conj.additionally. still more.अणी. अण्कीं. अण्कि. अण्खीन. (1) तुला पोट भरल॑ नाही तर॑ अण्कीन थोड पोंगल खा. (2) अण्कीन फुंकलतर हे बलून फुटेल॑.(3) मला पाठ दुखताना अण्कीन एक ऊंशी डोस्केच खाले ठिवून/ठींगून निजलतर हायशी अस्ते.
aNkeenअण्कीन.conj.yet again.पुन्हा. अण्खीन. तुम्च कष्ट पूरा मी ऐकलों. अण्कीन मला तेच सांगूंनाका.
aNkeenअण्कीन.conj.till now.अत्ता पर्यंतीन. हे पर्यंतीन. हे पतोरी. अण्खीन. (1) मझ घरांतून मझ मित्र वापस (परतून) जाताना मोट्ठ॑ पौस (पाऊस) आरंभ झाल॑. ते करतां त्यांस मी मझ छत्रि देलों. अण्कीन तेनि ते मला परतून आणून देल नाहीते. (2) पांच निमिषांत॑ वापस येतों म्हणून गेलता अण्कीन आला नाही.
aNkiअण्कि.conj.and. अणी. अण्कीं. अण्कीन. अण्खीन. दुकानांतून मला चार सामान घ्याच होते. तांदूळ, तुरीचदाळे, केरसोणि अण्कि तेल.
anna~अन्न.n.cooked riceभात. शिजिवलते तांदूळभाताला अन्न म्हणून अण्कीन एक नाव आहेतरीन, साधारण बोलींत भात म्हणूनच अम्ही सांगतों.
aNNaaअण्णा.n.elder brotherवडील भाऊअम्ही भाऊ-भावंडेंत॑ मीच धक्टा. मला तीन अण्णा आहेत॑
aNNaaअण्णा.n.fatherबापाअम्च अण्णा ऑफीसांतून लोक्करच येतों म्हणटले, पण, एवढ॑ वेळ झाल॑तरीन अण्खीन आल॑ नाहीत॑
annadaanअन्नदान.n.food aid. food distributionअन्नाच दान करणे. जेवाच पदार्थ आवश्य अहेत॑ लोकांला वितरण करणेयंदा उत्तर प्रदेश अणी बीहारांत॑ पाऊसाळाच अतीवृष्टी होवून भयंकर प्रळय झाल॑. दोन संस्थानातीं अनेक ठिकाण पाणींत॑ बुडून खेडेगांवाच लोके तिकडे-तिकडे सांपडींगून दोन-तीन दिवस खायाला काहीं नाहीस्क॑ अवस्था भोगले. केंद्र सरकाराला सेनाच हेलिकोप्टर उपयोग करून त्यांस॑ अन्नदान करामते पडले.
annadaathaaअन्नदाता.n.benefactorदान-धर्म करणारतमिलनाडाच जुने मुख्य मंत्री एम.जी. रामचंद्रन सिनिमांत॑ अभिनय करत असाच वेळांतेच, म्हण्जे मुख्य मंत्री होयाच पुढेच, दरिद्र लोकांला फार सहाय करत होते. हेला एक कारण होते म्हणून विरोध पक्षाच लोक सांगतात. तेनी एक अन्नदाता आहेत म्हणून लोकांच मनाचांत॑ राह्यलतर॑ जनतंत्रांत॑ त्यांस॑ पुढे उपयोग होईल, हे करतां तेनि अस केले म्हणून सांगात.
annamuhoorthअन्नमुहूर्त.n.)ceremony marking feeding of rice to an infant for the first timeलेंकरांला पहिलंदा भात द्याच सण. अन्नप्राशनसाधारण होऊन अन्नमुहूर्त सण लेंकरे सहा अथवा सात महिने अस्ताना करणे आहे.
annapraashanअन्नप्राशन.n.ceremony marking feeding of rice to an infant for the first timeलेंकरांला पहिलंदा भात द्याच सण. अन्नमुहूर्त.अम्ही मुंबईंत असताना अम्च लेंकीच अन्नप्राशन जोगेश्वरींत असाच श्री राघवेन्द्रस्वामी मठांत करिवलों.
aNooअणू .n.atom.एक पदार्थाच एकदम ल्हानापक्षा ल्हान अंश. परमाणूब्रिटीष शास्त्रज्ञ जॉन डाल्टन, हेनीच पह्यिल॑ पह्यिल॑ अणू विषीन शास्त्रलोकाला कळिवलते.
anshanअनशन.n.fastingनिराहार असणे. उपवासआज एकादशी म्हणून पूरा दिवस अनशन करणार मी.
anshee-poTअनशी-पोट.n.empty stomachखालि पोटचार घंटेच वर अनशी-पोटांत॑ असलतर पोटांत॑ वायूच तंटा होऊया.
anthअंत.n.endअवसान॑
anthakaalअंतकाल.n.last days before deathमराच॑ पुढले समयदिव्यज्ञान असणारांस॑ त्यंच अंतकाल कळेल॑ म्हणून सांगतात॑.
anthakaalअंतकाल.n.last days शेवटलच थोड दिवसमुगळ साम्राज्याच अंतकाल झालनंतर॑ अम्च देशाच एक मोठ॑ भाग मराठांच स्वाधीनांत॑ आल॑.
anthakaraNeअंतकरण॑.n.deep seated compassionate feelingमनाचांतल॑ गाढ करुणाच विचारतो एक क्रूर मनुष. दूसरेंच विषीं तला अंतकरण॑ काहींनच नाही
antharaathmaaअंतरात्मा.n.internal soul. the sentient soulआंतले आत्मा. जीवात्माअंतरात्माचीं देहाचीं योग कस॑ कराच, हे रहस्य जुने काळापसून ऋषीनीं-मुनीनीं योगाभ्यासावाटे प्रसिद्ध केल्होते.
anthareekShअंतरीक्ष.n.atmosphereवायुमंडल एक ग्रहांत॑ जीव उद्भव॑/उत्पत्ति होयाला तज आवश्याप्रकारच अंतरीक्ष॑ अवश्य पह्जे.
antharjnyana~अंतर्ज्ञान.n.inner (spiritual) knowledgeदिव्यज्ञान॑अम्चांत॑ अंतर्ज्ञान॑ वाढिवणे, हे धर्माच एक प्रधान॑ उद्धेश आहे
antharpaTअंतरपट.n.the ceremonial curtain held between the bride and the groom before tying the mangalasutraगरसोळि बांधाच पुढे नवरा-नवरींच मध्य अडवे धराच पर्दागरसोळी बांधाच पुढे नवरा-नवरींच मध्य अडवे धराच पर्दा अंतरपाट in sm
anthharNeअंथरणे.vt.to spread a sheet, mat or bedding(निजाला अथवा भोईं वर बसाला) जमखाण, चांपा, अंथरूण हे पसरणेजानवासाच दिवस॑ लोकांस॑ बसाला जमखाण अंथरूण ठिवाला/अंथराला मी नवरीच घरचे लोकांस॑ सांगिट्लों.
anthharooNअंथरूण.n.mattress. bedनिजाला उपयोग कराच एक साधन॑. अण्थूण. लेप. नाहिली.वसति (वसती) जास्ती नाहीते लोकांच घरांत पाष्टे अग्गीन अंथरूण गुंडाळून एकपटीस ठिवतील॑ अणी रात्री निजाच वेळी ते काडून कोठ सौकर्य आहेकी तिकडे अंथरतील॑.
anthharooN - paangharooNअंथरूण-पांघरूण.n.a full set of bed with mattress, blanket, pillows etc. अण्थूणाचीं पांघरिवणाचीं पूरा व्यवस्थाअम्च घरांत चार लोकांस॑ निजाला अंथरूण-पांघरूण सदा अस्त॑.
aNthhooNअण्थूण.n.mattress. bedनिजाला उपयोग कराच एक साधन॑. अंथरूण. लेप. नाहिली.(1) मला उदंड॑ दिवसापसून मादसूळ होत॑. मझ जुन॑ अण्थूण काढूनटाकून एक चांपाच वर निजाला आरंभ केलानंतर ते सूळ अपाप राहून गेल॑. (2) मला उदंड दिवसा पसून माद सूळ होत॑. मझ जुने अण्थूण काढूनटाकून एक चांपाच वर निजाला आरंभ करलानंतर ते सूळ अपाप राहून गेल॑.
anthimअंतिम.adj.finalशेवटीच॑. शेवट्ल॑विनायक चतुर्थीच दिवसी गणेशाच विग्रहाला विसर्जन॑ कराच ते दिवसच अंतिम कार्यक्रम॑ आहे.
anthyakarmअंत्यकर्म.n.last ritesमरलानंतर कराच कर्महिंदू धर्माप्रकार देह सोडून परलोकाला जायाच आत्माच मोक्षाकरतां अम्ही कराच अंत्यकर्मांत॑ वैकुंठसमाराधना एक मुख्य भाग आहे.
anthyayaathraaअंत्ययात्रा.n.funeral tripअंतिमयात्रा. मरलनंतर स्मशानाला घेऊन जायाच यात्राविध-विध आचार-विचार अनुसरण॑ करणार लोक॑, मृतदेहाच अंत्ययात्रा त्यंच-त्यंच वर्गाच दंडकाप्रमाण करतील॑.
anubhavअनुभव.n.practical experienceवेगळ॑ वेगळ॑ वागाच रीत कळणेगेल॑ वार अम्च ऑफीसांत॑ कॉळेजांतून अत्ताच वाचणे संपिवून आलते एक नव मनुषाला नियुक्त केले. त्यांस॑ ऑफीस कामाच विषयांत एक अनुभवीन नाही.
anubhavअनुभव.n.to have and enjoy the possession or custody of (a thing)(एक वस्तू अथवा साधन) स्वता उपयोग करून परिचय घेणेतिज दाल्ला एक नव कार घेट्ळा. एवढे दिवस स्कूटराच अनुभव तिला होत॑. अत्ता कार्ताच अनुभव घेत आहे.
anubhaveeअनुभवी.adj.experiencedअनुभव असणारअम्च देशाच प्रधान मंत्री अर्थशास्त्रांत॑ थोर अनुभवी म्हणून सांगतात.
anudine~अनुदिन॑.n.every dayदिवसोडि. प्रति दिवस. दिवसों-दिवस॑. मझ ससरा अनुदिन॑ देवपूजा करनास्क॑ वेगळ॑ एक कामीन करनात॑
anugraha~अनुग्रह.n.blessingsआशिर्वाद॑अम्च लेंकरे चोखोट स्थितींत॑ अहेत म्हणजे, ते अम्च थोरळेंच आनुग्रह अणी आशीर्वादामळेच म्हणून सांगाम॑.
anukampaaअनुकंपा.n.compassionदया. कारुण्य. ल्हान वयांतूनच तिन॑ मूकप्राणींच वर अनुकंपा दाखिवत होती.
anukoolअनुकूल.adj.favourable. suitableयोग्यहे वर्षाच पावसाळा/पौसाळा/पाउसाळा क्रिषिधान्य उत्पादनाला अनुकूल असेल॑ म्हण्तात.
anukoolअनुकूल.adj.agreeableओपाला योग्य असाचतुम्हाला अनुकूल असलतर मला सहाय कराला होईलका ?
anukoolathaaअनुकूलता.n.favourable situation or conditionअनुकूल स्थितीहे परिस्थितींत॑ तुम्हाला पैसेच सहाय कराला होयना. पण, याच महिना अनुकूलता पाहून/पाऊन कायतरीन कराला पाह्तों
anumaanअनुमान.n. conjectureऊहकोर्टांत॑ अम्ही साक्षि देताना एक विषय स्वता कळ्लासलतरच बोलाम॑. उगेच अनुमान करून बोलल॑ तर नंतर ते गोष्ट अम्हालाच उपद्रव देऊया.
anumaanअनुमान.n. inferenceआधाराच वर काढाच निर्णयएक वस्तू घेताना प्रमाण-पत्र पूरा बरोर वाचनास्क॑ अनुमानाला येणे बर नहो.
anumatheeअनुमती.n.permission. approvalसंम्मत॑लोकतंत्राच पद्धत प्रकार देशांत॑ एक नव नियम आणिवाला विधानमंडलाच अनुमती आवश्य आहे.
anuraadhaaअनुराधा.n.name of a starएक नक्षत्राच नावनक्षत्र मंडलांत अनुराधा सत्रावां नक्षत्र आहे.
anuraagअनुराग.n.affectionस्नेहभाव॑तिला तो पोरावर उदंड प्रेम असलतरीन वेगळ॑ लोकां समोर तिज अनुराग दाखिवाला फार संकोच भोगती.
anusaarअनुसार.prep.in conformity with. in accordance with.(ते) प्रमाण॑.आस्ट्रेलियाच बरोर झालते क्रिकेट परंपरांत॑ भारताच खेळ फार उणाका होत॑. खेल आरंभ होयाच पुढे केलते योजनाच अनुसार खेळलासलतर॑ हे अवमान झालासना.
anusaraNa~अनुसरण॑.n.obedience.दुसरेंच इछाला संम्मत होऊन असणे.ल्हान वय पसूनच लेंकरांस॑ अनुसरण॑ शील॑ शिकिवलतर॑ थोरळे होताना त्यंच वागणे पाव्हून वेगळ॑ लोक त्यांस॑ मर्यादा देतील॑.
aNushaktheeअणुशक्ती.n.atomic power.अणूंतूं काढाच शक्ति.अण्खीन पुढे जातां-जातां देशाला अणुशक्तींतून "पवर" काढनास्क॑ वेगळ॑ वाट असना
anuShTHaanअनुष्ठान.n.religious ceremony. a ritual.पूजा पद्धती.स्मार्त संप्रदायाच बरोर पाह्ताना मध्व संप्रदायाच अनुष्ठान थोडक जास्ती आहे, अस॑ दिसते.
anuthaapअनुताप.n.remorse. repentanceखेद. संकट.अपराध केला नंतर नुस्त अनुताप दाखिवापक्षा काहीं उपयोगाच काम करून दाखिवलतर प्रयोजन होईल
anuvaadअनुवाद.n.translation.तर्जुमा. भाषांतर. महाकवी काळीदास यांस पुरातन भारताच सगळ्यांचीनपक्षा श्रेष्ठ कवी म्हणून सांगतात॑ अणी त्यंच नाटक-लेख अग्गीन अनेक भाषांत अनुवाद पणीन झालाहे.
anuyaayeeअनुयायी.n.a disciple (of a spiritual guru)शिष्यएक हिंदू धर्मस्थापनाच गुरुजीच अनुयायी होयाला अनेक वर्षाच वेद पठन॑ करलतरच होईल.
anuyaayeeअनुयायी.n.a follower (of a leader)नेताच मागे जाणारकित्येक राष्ट्रीय पक्षाच नेतालोकांच बरोर येणार अनुयायी लोक विपरीत तंटा कराच स्वभावाच असतात
anveShaNeअन्वेषण॑.n.searchहुडुकणेजैलांतून पळून गेलते कैदीच अन्वेषण सहा महोनेंत्सून चालत आहे तरीन, अता पतोरी पोलीसाला एक विवरीन मिळ्ळ॑ नाही.
anveShaNeअन्वेषण॑.n.inquiry. investigationविचारणाअम्च गांवाच(गामाच॑) तहशीलदार एक वर्ष सस्पंन्षनांत॑ होते. नंतर॑ झालते अन्वेषणांत॑ त्यंचवर केलते अपराध कोण्तीन खरे नहो म्हणून झाले.
anya~अन्य.adj.anotherवेगळ॑. दुसर॑अन्य देशाच लोक॑ अम्च देशांत॑ घूंसून समुदायांत॑ अक्रम, अस्वस्थता हे सग्ळ॑ पसराला सोडनास्क॑ पाह्यींगणे, सरकाराच जवाबदारी आहे.
anyaayअन्याय.n.injusticeअनीतीअन्याय काहीं होयना म्हणून पूरा विश्वास आलांपिरीच मी ते नव मंडळींत॑ मिळाला निश्चय करलते.
anyaayअन्याय.n.an illegal actन्यायनीतीच विरुद्धल॑ काम. अपराध पेट्रोळांत॑ केरोसीन मिळिवून विकाच अन्याय करणारांला एक दिवस पोलीस धरतील॑
anyaayअन्याय.n.an offence. a crime. improprietyअपराधबाजू घरच दंपती मध्ये थोर भांडा-भांडी होऊन तिजवर लटक॑ अपराध सांगून घरांतून बाहेर लोटलते एक अन्याय म्हणून लोके सांगतात.
anyaayअन्याय.fig.disproportionate to reason or law (in a negetive sense)साधारणापक्षा फार जास्ती.मझ नातू अन्याय तंटा करतो म्हणून मझ लोंक तला सदाहीं शिवा देत अस्तो
anyonya~अन्योन्य.adj.reciprocal. mutualएकालेक. परस्पर॑दीपावळीच दिवसी माखींगाच पुढे अम्हाला सर्वानीं मिळून आर्ती काढताना अम्मा सांगतील "तुम्ही भाऊ-भावंड मोट्ठ॑ झाल तर पणीं केम्हाईन अन्योन्यांत असाम॑".
anyonya~अन्योन्य.adj.mutually amicableएकालेक विरोध नाहीस्क असणेमत भेद नाहीस्क सर्वदनीं अन्योन्य म्हणून हे समाजांत असाम॑
apaapअपाप.adv.by oneselfस्वताघरांत॑ वाढिवलते मांद्राला/मांदराला दूर नव ठिकाणि सोडलतरीं ते अपाप परतून वागलते घराला येईल
apaapअपाप.adv.spontaneouslyस्वता(1) मी काल संध्याकाळी रेडियोच गाणे ऐकत असताना ते अपाप राहून गेले. (2) उन्हाळाच दिवस कित्येकदा राणांत॑ अपाप विस्तू पेटाच संभव आहे.
apaapअपाप.adv.automaticallyस्वतामझ कंप्यूटर दोन दिवसापसून हाळ झाल्होत॑. आज ते अपाप बर॑ झाले.
apaarअपार.adj.immeasurableभरून. उदंड॑. उजंड॑एक-एक आजा-आजीलीं त्यंच नातूंडे अपार बुद्धिवंत॑ आहेत, अस वाटाच सहजच॑
apaayअपाय.n.dangerहानीतिरुपति डोंगूरांतून परतून उतरताना अम्च बस्साच ब्रेक नासून गेले. बस हांकणाराच षाणपणामळे मोठ अपाय काहीं होयनास्क॑ चुकींगटलों.
apaayअपाय.n.damage. loss.नष्ट.चंद्राला पाठिवलत॑ "चंद्रयान-2" शून्याकाश वाहन चान्नांत उतरताना कायीन अपाय होईना म्हणून प्रार्थना कारूम्हणे.
apabhramshअपभ्रंश.n.corrupted word or languageमूळ रूपांतून वेगळ॑ होऊन विकार झालते शब्द, अथवा भाषा. तंजाऊर मराठी बोलणर लोके त्यंच भाषा लिव्हाच दंडक सोडूनटाकले अणी पुढच॑ एक एक पिढीलीन ते भाषाच लिपी कळाला अवसर मिळालनाहीतेमळे गोष्टाच उचारण अपभ्रंश होत गेले.
apabhraShTअपभ्रष्ट.adj.that which has become corrupted. degenerated. अपभ्रंश झालतेतंजावूर मराठी मराठीच एक अपभ्रष्ट रूप म्हणाच चूक आहे, कां म्हणजे, सोळावा सत्रावा शतकाच नंतर॑ तंजावूर मराठी एक वेगळ॑ गतींत पुढे गेल॑ अणी तमिल भाषाच संपर्कामळे तला आजच॑ रूप आल॑.
apaddhअबद्ध॑.n.blunderचूकब्रिटिष राज्याच ईस्ट-इंडिया कंपनीला मुगळ साम्राट जहांगीर भारतांत॑ व्यापर कराला अनुमति देलते एक अबद्ध झाल॑ म्हणून नंतरल॑ इतिहासांतून कळते
apaghaathअपघात.n.accidentअकस्मात झालते दुर्घटना. आपत. आफत.बीदींत॑ एक अपघात झालतर, ते मनुषाच जीव रक्षा करापक्षा लोक॑ तिकड नुस्त गुंपगुंडाळत तमाषा पाह्त असतील॑
apahaasअपहास.n.ridicule.मष्करी. मस्करी. परिहास. उपहास.वेगळांस पाह्यिलतर॑ अपहास करून बोलाच वंगळ॑/ओंगळ॑ दंडक तला आहे.
apaharaNअपहरण॑.n.abductionबलप्रयोग करून घेवून जाणेसीतादेवीला अपहरण कराला येताना रावण एक सन्यासीच वेष घालून आला
apaharaNअपहरण॑.n.stealingचोरणेचोर्टे लोकांस॑ एवढे धैर्य आलाहे म्हण्जे, पुढे मादिरी रात्रीचवेळ मात्र नहो, अत्ता पाष्टेच वेळपणीं अपहरण कराला आरंभ केलाहते.
apakaarअपकार.n.misdeedउपकाराच विरुद्ध. दुस्सहायतुझ॑ चुलतभाऊ एक अवघड म्हणून कळ्ळकी. उपकार करतों म्हणून सांगून केलते पूराहीं अपकारेच. मग॑ कां तला घराच आंत सोडलीस॑ ?
apakeertheeअपकीर्ती.n.infamy. ill reputeओंगळ/वंगळ॑ नावअम्च मानमर्यादा राखिवाम॑ म्हण्जे अम्च नावाला एक अपकीर्तीहीं येईनास्क॑ पाह्यींगाम॑.
apalpoTeeअपलपोटी.n.selfishस्वार्थ. स्वंत काम मात्र पाह्यींगणारतो एक अपलपोटी मनुष. तज काम कायतरीन असलतर मात्र लाडी-गोडी बोलाल एईल
apamaanअपमान.n.insult. disrespectअवमानअम्च आफ़ीसाच मानेजराला आवश्य नाहीस्क॑ दुसरेंना अपमान कराच स्वभाव आहे
apamaanअपमान.n.shameअवमानतिज वर आलते अपमान सोसाला होयनास्क॑ तिन॑ आत्महत्या कराला प्रयत्न करली.
apamaanअपमान.n.disgrace. humiliationअवमानदुसरेंना उगे-उगे अपमान करून बोलाच कोणालीं अवडना.
aparaadhअपराध.n.offence. crime.गुन्हा. अन्याय. दोष.पांडवांच विरुद्ध करलते अन्याय सग्ळीन अपराध म्हणून ओपींगाला दुर्योधन तय्यार न्होता.
aparaadheeअपराधी.adj.guilty चूक करलतेशिक्षा अनुभव कराच अपराधी प्रायश्चित्त करलतर पुढे समुदायाला एक उपयोगी होयाला साध्य आहे.
aparoopअपरूप.adj.rare. uncommon.अप्रूप. अपूर्व. असाधारण॑.अम्च॑ घराला अपरूप आले म्हणून त्यांस उदंड उपचार करलों.
apasavya~अपसव्य.n.right sideउजवेदेऊळांत प्रदक्षिणा करताना देवाच विग्रह अम्च॑ उजवे पटीस, म्हणजे अपसव्य असाम॑.
apasavya~अपसव्य.n.contrary to custom etcसाधरणाच विरुद्ध॑श्राद्ध करताना जानव भरूनदपा अपसव्य कराच्याला प्राचीनावीधी म्हणून सांगणे पणीन आहे.
apashakuna~अपशकुन॑.n.ill-omenव(ओं)गळ॑ शकुन॑एक चोखोट कामाला बाहेर जाताना तीघदन॑ मिळून घरांतून निघलतर ते एक अपशकुन आहे अस म्हणणे आहे
apasvara~अपस्वर॑.n.false noteचुकलते स्वरसंगीत कच्चेरी आरंभ कराच पुढे अपस्वर॑ होयनास्क॑ असाला सग्ळ॑ वाद्यहीं वाजीवून पाह्याच दंडक आहे.
apasvara~अपस्वर॑.fig.unpleasant utterance.अवघड गोष्ट॑.कोणीं एक चोखोट कार्य बोलताना मध्य पडून अपस्वरास्क॑ बोलाच वंगळ॑ स्वभाव तला आहे.
apavaadअपवाद.n.slanderलटक॑ आरोपस्यमंतकमणी चोरलते अपवादांतून चुकाला श्रीक्रिष्णाला कठिन श्रम करांमते पडले.
apekShaaअपेक्षा.n.an earnest request, desire or expectation.गाढ इच्छा, विनंती अथवा आग्रह.हे कैदीच केस कचेरींत॑ विचारणाला आलतम्हा कैदीच वकील जड्जाला कैदीला जाम्यांत सुटिवून द्याला अपेक्षा करले.
apekShaaअपेक्षा.n.an application for an employment, admission etc.अपेक्षा सरकाराच नव सूचना प्रकार कृषी विभागाच टैपिस्ट/स्टेनोग्राफराच उद्योगाला अपेक्षा-फ़ॉर्म पोंचिवाच शेवटीच दिवस अण्खीन तीस दिवस पुढे केलाहते.
apethra~अपेत्र.adj.unworthy (to be a recipient). (देणगीला) अयोग्य असणार. लायक नाहीते. नलायक दंपती लोकांस देणगी देताना बरोर पाव्हूनच देम॑, कां म्हणजे तेनी अपेत्र असलतर॑ अम्हाला पुण्यफल मिळना. अपात्र in sm.
apoopa~अपूप॑.n.a type of sweet preparationअनारस॑. अधिरसम. तांदूळाच पीठांतून केलते एक गुळ्चीट पदार्थअधिकमास दानाला तेतीस अपूप पणीन देणे आहे.
apoorNअपूर्ण.adj.incompleteपूरा झाल नाहीतेभारताच जनतंत्र कक्षींच मध्ये महिलांला विधान सभांत॑ कित्ति वांटा स्थिर होऊन द्याच, हे चर्चा अत्ता पतोरी अपूर्ण स्थितींतच आहे.
apoorvअपूर्व.adj.unprecedentedआत्ता पर्यंतीन/पतोरीन झाल नाहीतेमध्य भारताच रेवा राजसंस्थानाच राणांत॑ अपूर्व होऊन एक पंढ्र वाघाला पहिलंदा दिसल॑.
apoorvअपूर्व.adj.rare. uncommonसाधारण॑ नसाच॑. असाधारण॑अत्ता अनेक देशाच मृगशालेंत॑ पंढ्र वाग आहे. ते एक अपूर्व विषय नहो.
appachiअप्पचि.n.squeeze to flatness.चपटा करणे. सपाट करणे. चेंपून सपाट करणे. चेंचून सपाट करणेकित्येक लेंकरांस॑ नव टूत-पेस्ट हाती मिळूनगेलतर॑ समेच/सवेच ते अप्पचि कराला एक विधाच संतोष येत॑. (1) from Tamil. (2) चपटा of Tamil is सपाट of SM/DM
appeech kheerअप्पीच खीर.n.a type of sweet porridgeएक रीतीच खीर. अप्पि पायसमअप्पीच खीर अणी पापडाच खीर हे दोनां मध्ये थोडक व्यत्यास आहेतरीन साधारण होऊन एक म्हणींगट्लतर॑ अण्कीएक म्हणींगतात॑.
appi paayasamअप्पि पायसम.n.a type of sweet porridgeएक रीतीच खीर. अप्पीच खीरकोण्त थोर सण आलतरीन अम्च॑ अम्मा अप्पि पायसम अणी आंबोडे हे दोनीन करूनच सरतील॑.
appingaNeअप्पिंगणे.vt.to daub or smear nore that what is necessary.आवश्या पक्षा जास्ती लावींगणे.मझ॑ बहिणी चुम्मण पोरी अस्ताना अपाप शृंगार करींगते म्हणून तोंड पूरा पौडर अप्पिंगून येईल.
appoon-thappoonअप्पून-तप्पून.adv.inadvertently. unintentionally. not by design. by chance.चुकून-माकून. उद्देश नाहीस्क॑. योचना करनास्क॑.मला कळून तो वाचणेंत॑ शाणा (षाणा) काहीं नहो. कस की अप्पून-तप्पून परीक्षा जिंतला.from Tamil (अप्पि-तप्पि).
aprathyakShअप्रत्यक्ष॑.adj.invisibleदिसनास्क॑ होणेसाळेंत॑ एक जादूगराच कार्यक्रम दोन दिवसापुढे झाल॑. त्यांत॑ तेनि एक ल्हान पोरीला अम्च डोळे समोरच अप्रत्यक्ष॑ करीवले
aproopअप्रूप.adj.rare. uncommonअसाधारण॑. अपरूप. अपूर्व(1) जुने काळच अप्रूप झालते नाण्य अणी तपाल-स्टेंप हे काळांत मिळणे फार कष्ट झालाहे. (2) तेनी थोर मनुष. अम्च घराला येणे फार अप्रूप झालाहे.
apsaraaअप्सरा.n.a class of celestial courtesans. water nymphs.देवलोकाच सुंदरस्त्रीलोक॑.स्वर्गलोकाच अप्सरा मेनकाचीन विश्वामित्रऋषीचीन लेंक होऊन शकुंतला उजली.
araLoo-muraLooअरळू-मुरळू.adj.incoherence in speechबोलाच रीतींत॑ याच अव्यक्तपण॑वय होतां-होतां बोलाच अणी योचना कराच शक्ती उणे होऊन अरळू-मुरळूच अवस्थांत॑ पावणे साधारणच॑.
araNya~अरण्य.n.forestराण. वनअरण्य विभागांत मला कळ्ळते एक थोर अधिकारी आहेत॑.
arasaaअरसा.n.mirror.अर्सा. प्रतिबिंब/पडसावली दिसाच अरसा ;अरसा खाले पडून मोडलतर॑, ते एक अपशकुन म्हणून सांगतात॑.अरसा/आरसा/अरशी in sm.
arasaaअरसा.n.glass.नुस्त्॑ अर्साबीदींत थोर ॲक्सिडेंट होऊन तिकडे पूरा अरसाच चूर पडलाहे.काच in sm.
arasaaअरसा.n.spectacles.अर्सा. अयनक. उपनेत्र ;मी बाह्येर गामाला जाताना घालींगून असाच अरसा विना हातराखणेला अण्कीन एक अरसा काढींगून जाणे आहे.चष्मा in sm.
araTeअरटे.n.gossip. idle talkहरटे. प्रत्येक विषय नाहीस्क॑ बोलणेअम्च॑ शेदारल॑ घरचांस॑ तेन सून आहेत॑, ते तीघीन अरटे बडिवणेंत एकापक्षा एक उणे काहीं नाही ! from Tamil. गप्पा in sm.
araTe baDivaNeअरटे बडिवणे.vt.to gossipहरटे-बडिवणे. प्रत्येक विषय नाहीस्क॑ बोलाच॑ मझ एक मित्र आहे. तो अरटे बडिवाला आरंभ केलतर॑ संपिवनाच संपिवना ! from Tamil. गप्पा मारणे in sm.
arava~अरव॑.n.Tamilतमिल भाषामला अरव॑ बोलाला येत तरीन, वाचालीन लिव्हालीन कळना.
aravaaअरवा.adj.Tamil manतमिल मातृभाषाच मनुषगेल सहा महिने पसून अम्च॑ घरच॑ वरच॑ खोलींत डॉक्टर परीक्षाला बसणार एक पोर राह्यलाहे. तो एक अरवा.around 1700 A.D. the word अरवा meant "one who is not of us", ie, an outsider.
araveeNe~अरवीण॑.adj.Tamil womanतमिल मातृभाषाच बायकोदिवसोडी भाजीपाला विकाला एकली अम्च॑ घराला येईल॑. तिन॑ एक अरवीण॑.
aravindअरविंद.n.lotusकमळीच फूलराजीव अणी अरविंद हे दोनीन कमळीच फूलाच वेगळ॑ नाव आहे.
archanaaअर्चना.nworshipपूजाच एक भागअग्गि (अस्कि/सर्व) देऊळांतीं प्रत्येक-प्रत्येक कुटुंबाला स्वता देवाला अर्चना कराला सोडनात तरीन, अम्च नाव सांगून, म्हण्जे अम्च संकलपांत॑, पुरोहित देवाला अर्चना कराच व्यवस्था आहे.
ardhअर्ध.n.halfदोन पावअर्ध n half. दोन पाव. uis कित्येक राज्याच करनीती प्रकार आदायाच अर्ध भाग सरकार कर म्हणून वसूल करतील.
ardhagachcha~अर्धगछ॑.adv.half-doneअर्धंगछ॑. अर्धवट॑. अर्ध करून सोडणे. अर्धंपर्दकित्ती सांगीट्लतरीन अम्च कामवाली कापड बरोर धुवत न्होती. अर्धगछ॑ खळबळून घालणामळे सोपाच वास कापडांत॑ केम्हाहीं येत होते. सांगून-सांगून पुरे झाले. नंतर॑ अम्ही एक "वाषिंग मषीन" घेटलों.
ardhamgachcha~अर्धंगछ॑.adv.half-done.अर्धगछ॑. अर्धवट॑. अर्ध करून सोडणे. अर्धंपर्दपोणावांटा कंट्राक्टर लोकांस एक स्वभाव आहे, काय म्हणजे, कोण्त काम हातांत काढलतरीन अर्धंगछ॑ करून थोडक दिवसाला ते सोडूनटाकतील॑.
ardhampardअर्धमपर्द.adv.half-done. half-hearted (effort)अर्ध करून सोडलते. अर्धगछ॑. अर्धंगछ॑. अर्धवट॑तो यंदा परीक्षा बरोर केलनाही. अर्धंपर्द वाचलतर वेगळ॑ काय होईल ?
ardharaathreeअर्धरात्री.n.midnight.मध्यरात्रीअर्धरात्री अष्टमी रोहिणीच दिवस श्रीक्रिष्णाच जन्म झाल॑. अर्धरात्र in sm.
ardhavaTअर्धवट॑.adv. half or partially done in an imperfect mannerअर्ध केलते पणीं बरोर करनास्क॑ सोडणे. अर्धगछ॑. अर्धमपर्द (Kannada). एडवट॑ (Tamil). तिरुपतींत॑ नवसून केंस क्षवर॑ कराला हजामाच समोर बसलतर, तो अर्धवट॑ करून जायनास्क पाह्यींगाम॑. कारण, अम्हाला तसेच बसिवूनटाकून तो एक नव ग्राकीला हुडुकींगून गेलतर॑, तो वापस या पर्यंतीन तिकडच बसामते पडेल॑.
ardhavaTअर्धवट॑.adv. limbo. in between stageअर्धांत॑ सोडलतेटीवींत॑ कर्नाटकाच देऊळांच विषयीं एक चोखोट कार्यक्रम गेल महिना आरंभ केल्होते. पण ते अर्धवट स्थितींत॑, म्हण्जे, तीन दिवस दाखिवला नंतर॑, कसालकी सोडूनटाकले.
ardhaveDa~अर्धवेड॑.n.eccentricविचित्र वागणेमझ वर्लाला अर्धवेड॑ म्हणून निश्चय सांगूया, कारण चोक्कोट/चोखोट सरकारी उद्योग सोडूनटाकून अम्चस्क बनिया कंपनींत घूंसलाहे. ते पणीं उणे धर्मांत॑.
ardhchandra~अर्धचंद्र.n.half-moon. सप्तमीच चंद्रअर्धचंद्र पाह्याच पक्षा मला चंद्रकोर पाह्याला अवडल॑.
ardhkShavara~ अर्धक्षवर॑.fig.a job left half doneअर्ध करून सोडलत॑ काम/कार्य/विषय. हे कॉर्परेशन लोक॑ एक कामीं बरोर करनात॑. मझ घराच समोरल॑ बीदींत॑ डांबर घालाच काम अर्धक्षवर॑ करून घाट्लाहत॑.
ardhraathreeअर्धरात्री.n.midnightमध्यरात्रीअर्धरात्री अष्टमी रोहिणीच दिवस श्रीक्रिष्णाच जन्म झाल॑.
areअरे.interj.a manner of addresseing a person (in a condescending manner)एकलाला बलावाच रीति (थोड तुच्छांत॑).अरे, अत्ता बाह्येर गेलतर॑ केम्हा पर्तून येशील तू ?
areअरे !.interj.the exclamation, oh!.अय्यो (Tamil) अरे ! तू इकडे बसलाहेस का, मी पाह्यलोंच नाही की !
are reअरेरे.interj.a double emphasis of the exclamation अरे. (Tamil).अरेच॑ पुन्हस्पष्टपण॑. अरेरे, तू इकडे बसलाहेस का, मी पाह्यलोंच नाही की !
arghya~अर्घ्य.n.oblation (of water, milk etc) to Godsपूजाच पाणी अथवा दूध मंत्र सांगत उद्धरणींतूं हातावाटी अर्घ्य पात्राला (पेलांते/प्यालांते) सोडून देवाला स्मरण कराच पद्धत॑गोकुलाष्टमी सणांत॑ लिंबू अणी पैसाच नाण्यांत अर्घ्य सोडाच पद्धत॑ आहे.

No comments:

Post a Comment