Sunday, May 15, 2016

aa (आ)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
aa*soo*आंसूं.n.tearडोळेंतूं याच पाणीते चुम्मणी पोरीला पाह. डोळेंतून/डोळेंसू आंसूं येत आहे. कायकी खोडी केलतेला/केलत्याला तिज माय॑ धटावलसेल॑.असूं/आसूं in sm
aabhaarआभार.n.thanksधन्यवाद. लटक॑ आरोपाच केसांतून चुकिवलत्याला तेनी त्यंच वकीलला उदंड आभार प्रकट केले.
aabharaNa~आभरण॑.n.ornamentsनग. नेग. माळ-मत्ता. सोनेच मोल दिवसों-दिवसा जास्ती होताहेम्हणून अत्ता "एक-ग्राम" सोनेच आभरण॑ फार प्रसिद्ध झालाहे.
aachaarआचार.n.conduct as per shastras.शास्त्राप्रकार वागणे. चोखोट आचारांत॑ वाढलते लेंकरे कद्दीं वंगळ॑ वाटेंत॑ जाईनात॑.
aachaarआचार.n.social behaviourसमूहांत॑ वागाच रीत॑भरूनदपा उंच वर्गांच लोकांच आचार ल्हान वर्गांच लोकांच विरुद्ध अस्ते. हेजमळे समुदायांत॑ विध-विध॑ प्रश्न होत अस्त॑. समुदायाच उद्धारण॑ प्रयत्न करणारांमध्ये हे एक मुख्य तर्क/विवाद आहे.
aachaar-vichaarआचार-विचार.n.social practices and usages(समुदायांत॑) वागाच रीत॑वेगळ॑-वेगळ॑ धर्म अणी वर्गांत॑ असणार॑ वेगळ॑-वेगळ॑ आचार-विचाराजोक्त आचरण करतात॑.
aachaareआचारे.n.priestपुरोहित(1) अम्च गांवांच(गामाच) देऊळांत॑ देवपूजा कराला एक नव॑ आचारेला नियुक्त कराला देऊळ चालिवाच समिति निश्चय केलहोत॑ तरीन सर्काराच धर्म-विभागाच मंत्रि ते सम्मत केले नाही अस आजच पत्रांत॑ वाचलों. (2) अत्तच काळांत आचारे लोक महीनाल॑ वीस-पंचवीस हदार रुपे संपादतात॑. तेन्हालपणीं अम्ही "प्रोफषणलस" म्हणूया. 
aachaaryaआचार्य.n.spiritual teacherगुरू"आचार्य", हे शब्दाच अर्थ "एक धर्म-गुरू" अस असलतरीन, समुदायाच बहुमानाला योग्य असाच व्यक्तींला पणीं "आचार्य" म्हणून सांगणे आहे
aachamana~आचमन॑.n.ritual of sipping small quantity of water thrice as a part of performing poojaपूजा करताना उद्धरणींतूं तीनदपा पाणी घोंटाल॑ लागीवून गिळाच पद्धत॑.आचमन करताना केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा माधवाय स्वाहा, अस॑ सांगणे आहे.
aacharaNe~आचरण॑.n.observanceआचरण॑धर्माच आचरण करणे एक मनुषाच मुख्य कर्तव्यांत एक आहे.
aaDआड.n.wellखांडून काढलते पाणीच गाढ कुंडसंपाकघराच मागे असाच भाजीपाला अणी फूलाच झाडाला दिवसोडि आडांतून/आडांत्सून पाणी शेंदून घालाच काम मझ डोस्केवर ढकळाला मझ भाऊंडे केलते खेव मला थोडपणीं अवडल॑ नाही.
aaDaanth ghaaTlathe dhonDaaआडांत घाटलते धोंडा.fig.a thing set aside irretrievably.हातांतून पूरा सोडूनटाकलते.
aadaayआदाय.n.incomeवरुमानमभरून जमीन-आस्त कुटुंबावाटे तला मिळ्ळ॑तरीन ते सग्ळीन वेगळ॑ लोकांच हाताखाले असाकरतां तला जास्ती आदाय काहीं येत नाही.
aaDambarआडंबर.n.ostentationपह्जते पक्षा/पह्जते बरीस जास्ती कराच अलंकारटी.वींत॑ हिंदि सीरियल पाह्ताना खाणीच पक्षा महत्व वेषाच आडंबराला देतात॑ अस वाटते.
aadarआदर॑.n. respect. regard. honour बहुमान॑भारताच प्रधानमंत्री श्री. मनमोहन सिंघाच सात्विक गुण॑ अणी विनय स्वभाव॑ हे दोनीं पाव्हून सगळ्यालीं त्यंचवर आदर होयाच काहीं अतिशय नाही.
aadarshआदर्श.n.an ideal. a modelएक उदाहरणास्क॑ असाच॑त्यंच वागणाच रीत॑ वेगळ॑ जनतंत्र कक्षींच नेतालोकांला एक चोखोट आदर्श आहे.
aadeshआदेश.n.instruction. a given mandateआज्ञाएक चूक काम करून स्वताचवर आरोप येनास्क॑ असाला कित्येकदन॑ त्यंच काम थोरळेंच आदेशाप्रकार केले म्हणून सांगणे आहे.
aadhaarआधार.n.basisआधारमझ विरुद्ध घाट्लते केसांत आधार काहीं नाही म्हणून कोर्टांत॑ ढकळूनटाकले.
aadhaarआधार.n.evidenceप्रमाणाच आधारमंगळ ग्रहांत॑ फार जुने काळांत॑ वाहाच पाणी होत॑ म्हणून तिकडून मिळ्ळते आधारांतून कळते.
aadhunikआधुनिक.adj.modern नव॑ काळाच॑. नवीन. अम्च देशाच युवलोके आधुनिक शास्त्रांत॑ फार षाणे/शाणे म्हणून नाव घेट्लाहेत॑.
aadhyaathmikआध्यात्मिक.adj.relating to the Supreme Spirit or to one's own spiritब्रह्मज्ञानाच विषयबौधधर्माच प्रचारणामळे लोकांमध्ये हिंदूधर्माच आचरण॑ फार उणे स्थितीला गेलस्ताना आदिशंकराचार्या हिंदूधर्माच आध्यात्मिकत्व आधार करून अद्वैतसिद्धांत॑ पुढे ठिवलतामळे हिंदूधर्म भारतांत॑ पुन्हा उंच स्थितीला आल॑.
aadiआदि.n.beginning. commencement.आरंभ. प्रारंभअम्ही थियेटराच आंत जाऊन बसाच पुढेच सिनिमा आरंभ झाल्होत॑. आदि काय झाल म्हणून शेवटोरी कळ्ळ॑च नाही.
aadiआदि.n.source.उद्भव ठिकाण जॉन स्पेक म्हणणार इसवी 1858 वर्षी आफ्रिकाच नैल नदीच आदि कोठ आहे म्हणून कळींगाच श्रमांत सार्थक झाले.
aadiआदि.adj.principal. chief.प्रमुख. मुख्य ऋग्वेदाला हिंदूधर्माच आदि ग्रंथ म्हणून सांगतों.
aadiआदि.adj.first.पह्यिलच॑. आद्य हिंदू धर्मांत॑ आदि मनुषाच नाव आहे मनु, अणी क्रिस्तु धर्मांत॑ आदि मनुषाच नाव आहे आदम.
aadithya~आदित्य.n.Sunसूर्य. भानु. रवि. मार्तांडआदित्य म्हणजे अदितिच पुत्र अस॑ ऋग्वेदांत आहे.
aadityavaarआदित्यवार.n.Sunday आयितवार. अयितवार. रविवार. भानुवार. आदित्य, रवि अणी भानु, हे तीनीं सूर्याच नाव आहे अणी आदित्याच अपभ्रष्ट रूप आहे "अयित" अथवा "आयित".
aadya~आद्य.n.first. initial पहिलच॑. प्रारंभाच॑काल॑ अम्ही श्रीमती एम.एस. सुब्बलक्ष्मीच कचेरी ऐकला गेल्होतों. तजांत॑ मला तेनि आद्य सांगीट्लते गाणे उदंड अवडल॑.
aadyanthआद्यंत.n.from beginning to endसंपूर्णतद्दी संध्याकाळी अम्हास वेगळ॑ एक ठिकाणी जामते होत॑तरीन कचेरी फार बेष होत॑ म्हणून अम्ही आद्यंत बसून ऐकलों.
aagama~आगम॑.n.laid out procedure as per shastras or traditionशास्त्र अथवा धर्म-संप्रदायाच विधान॑विनायक चतुर्थीच नंतर॑ दूसर॑ दिवसकी, पांचवां दिवसकी विसर्जन कराला बसीवलते ठिकाणींत्सून बाजूला सरीकवलतर॑ विसर्जन करलते आगम॑ होते. नंतर दोन-तीन दिवस थांबून चोखोट पाणींत विघरीवून ते पाणी तुळसीच झाडाला घालूया. अस करणे घाणके "हुस्सेनसागर लेकांत" घालाबरीस उत्तम॑.
aagrahआग्रह.n.persistance to attain (a desire etc.).गाढ अथवा हट्ट (इच्छा) तला संगीत अणी कला असल॑ कार्यांत॑ पूरा जीवन चालिवाम॑(चालिवांव॑) अस फार आग्रह होत॑तरीन उद्योगाच अणी कुटुंबाच जवाबदारी हे सर्व निर्बंधामळे ते आग्रह पूरा कराला झाल नाही.
aahaa ohoआहाओहो.n.an expression indicating an excellent performance. kudos.फार प्रमाद विषया विषीन सांगाच गोष्ट.साळेंत वाचताना मझ॑ षाणपण आहाओहो म्हणून सांगाला होईना तरीन, ते ते दिवसाच पाठ अस्कीन पूरा वाचून मनांत कराच विषयांत मला कोणीन चूक सांगाला नाही.
aahaarआहार.n.foodजेवणतळून कराच आहारापक्षा शिजिवून कराच आहार आंगाला चोखोट अस डॉक्टर म्हणतात॑.
aaheआहे.vi.a form of affirmation indicating presence. to be.असणे. प्रयाणाला जाताना हातराखणेला पैसा असना म्हणून भींगनाकांत॑. मझकडे आवश्याजोक्त॑ आहे.
aaherआहेर.n.giftस्नेहांत॑ अथवा आदरांत॑ द्याच साधन॑अम्चकडे उरलते साधन॑ आहेर म्हणून द्या पक्षा अम्हाला अवडलते साधन॑ आहेर म्हणून देलतर॑ तज महत्व वेगळेच.
aahlaadआह्लाद.n.delight.संतोष. आनंद.लेंकरांना त्यांस॑ इष्ट झालते बावोली/भावोली मिळताना होयाच आह्लाद एक शुद्ध आह्लाद म्हणूया.
aahutheeआहुती.n.oblation offered to gods with ghee through sacred fireहोमकुंडाच अग्नींत॑ होत्र देणे. होमकुंडांत द्याच आहुती अमुक अमुक देवाला अग्निदेव पोंचिवतात॑ अस॑ अम्ही विश्वास करतों.
aajआज.adv.todayहे दिवस. आजच दिवसगेल तीन दिवसापसून दीपावली पटाकीच शब्द भरून होत॑, पण आज अग्गीन शांत झालाहे.
aaj giLNe ujaa miLNaaआज गिळणे उजा मिळना.prov.what one has today may not be there tomorrow. a bird in hand is worth two in the bush.आज हातांत्सून सुटलतर॑ पुन्हा कद्दीन मिळना.
aaj-udyaaआज-उद्या.adv.in a day or two. shortly.आज नाहीतर उद्या. एकदोन दिवसांत॑. फार लोक्कुरच॑लोकसभाच मतदान काल॑ संपल॑ अणी आज-उद्या तज परिणाम कळल॑.
aaj-ujaaआज-उजा.adv.in a day or two. shortlyआज नाहीतर उजा. एकदोन दिवसांत॑. फार लोक्कुरच॑. एस.एस.एल.सी परीक्षाच परिणाम आज-उजा कळल॑ अस मझ लोंक तज मित्राला फोणांत॑ सांगत होत ते मी ऐकलों
aajaaआजा.n.grandfatherबापाच बाप अथवा मायेच बापचंद्रगुप्त मौर्य साम्राट अशोकाच आजा होते.
aajaanubaahuआजानुबाहु.adj.a great person having the required physical sign of having hands reach up to his knees. a great man.फार मोठ॑ मनुष. ओठाकताना गुडघा पतोरि हात लांब असाच मनुष"आजानुबाहु" हे शब्दाच अर्थ "ओठाकताना गुडिघापतोरी हात लांब असाच मनुष" अस असल तरीन, हे अर्थाच आधार काय हे कळाला मी करलते प्रयत्न पूरा व्यर्थ झाल॑ !
aajanma~आजन्म.adj.life longजन्मपूरा. आजीवतज वय जवळ-जवळ चाळीस वर्ष होत आहे तरीन वराडाच गोष्ट तज तोंडांतून येतच नाही. आजन्म ब्रह्मचारी म्हणूनच राहाच उद्धेश आहे वाटते.
aajeeआजी.n.grandmotherबापाच माय. मायाच मायमझ॑ अम्माच पटीसच॑ आजी बासष्टवां वर्षांत मरले अणी मझ॑ बापाच पटीसच॑ आजी त्यंच अठ्रावां वर्षांत मरले.
aajeevआजीव.adj.lifelongजन्मपूरा. आजन्महस्तिनापुरीच शंतनु महराजांच दुसर॑ वराडाला बाधा येताने म्हणून आजीव ब्रह्मचारी होऊन असतों म्हणून देववृत राजकुमार भीष्मप्रतिज्ञा काढलत्यामळे त्यांस भीष्माचार्य म्हणून नाव आल॑.
aajesaasaraaआजेसासरा.n.mother-in-law's father or father-in-law's father सासूचकी सासराचकी बाप.मझ॑ एक आजेसासराच (म्हणजे, मझ॑ सासराच बाप) नाव होत॑ क्रिष्णमूर्ति राव अणी अण्कीएक आजेसासराच (म्हणजे मझ॑ सासूच बाप) नाव होत॑ शेषगिरि राव.
aajesaasooआजेसासू.n.mother-in-law's mother or father-in-law's mother सासूचकी सासराचकी अम्मा मझ॑ एक आजेसासूच (म्हणजे, मझ॑ सासूच मायाच) नाव होत॑ नागम्मा अणी अण्कीएक आजेसासूच (म्हणजे, मझ॑ सासराच मायाच) नाव होत॑ नरसम्मा.
aajnyaaआज्ञा.n.order. commandनिर्देश. आज्ञापन॑आज्ञाच विरुद्ध काहि तरीन केलतर "कोर्टमारषल" होईल म्हणून सेनाच उद्योगांत॑ असणारांला कळेल॑
aajnyaapanआज्ञापन॑.n.ordering. directing. proclamation.निर्देश. आज्ञाजुने काळांत, म्हणजे जनतंत्र याच पुढे राजा महाराजांच काळांत आवश्याजोक्त॑ वेळा-वेळी आज्ञापन देऊन महाराजा राजभार करत होते.
aajnyaarthh आज्ञार्थ.n. imperative (gram)(व्याकरणांत॑) आज्ञा दाखिवाच गोष्ट॑
aajobaaआजोबा.n. a term of endearment for grandfatherबापाच बाप अथवा मायाच बापाला स्नेहादरांत॑ बलावाच रीत॑एक दिवस मझ नातूंडेंच मध्ये एक थोर भांडणे झाल॑. कायम्हणून विचारताना, मझ लोंकाच लेंकरां प्रकार मला "आजा" म्हणून बलावाम॑ अणी मझ लेंकीच लेंकरां प्रकार तस बलावणे चूक आहे, "आजोबा" अस बलावाम॑ हे विषयावर भांडणे होताहे म्हणून कळ्ळ॑ ! "आजा" अणी "आजोबा" हे दोनांची अर्थ एकच म्हणून मी सांगीट्ल नंतर भांडणे शांत झाल॑.
aajoobaajooआजूबाजू.n.in and around. nearbyजवळपासबस-स्टॅन्ड, रेल्वे-स्टेशन असलते ठामांत अग्गीन जाताना आजूबाजू काय होत आहे म्हणून गवन ठीवींगून असणे चोखोट, कां म्हणजे पॉकटमारणार लोके तिकड अग्गीन भरूनदन॑ असतील॑.
aajoobaajooआजूबाजू.n.neighbourhoodशेजार. शेदार.रिटैर होयाच पुढे एक ल्हान घर बांधांम॑(बाधांव॑) अस आशा करून अम्ही एक "प्लोट" पाह्याला गेलों. पाह्यलतर, ते एक विजन प्रदेशांत॑ होते ! आजूबाजू घर दुकान काहींनच न्होत॑ !
aakaankShaaआकांक्षा.n.expectation. yearning. deep desire.गाढ/मुम्मर इच्छात्यंच-त्यंच लेंकरे चोक्कट/चोखोट स्थितींत॑ असाम॑(असांव॑) म्हणून अस्कि माय-बापालीं आकांक्षा असणे सहजच॑. 
aakaarआकार.n.form, figure, shape. appearance. aspect.आकृती. रूप. जुने काळांत लंडनांतल॑ "टवर-ॲफ-लंडनांत॑" ते देशाच भरून प्रमुख लोकांच मृत्यु दंड झालाहे. अत्तापणीं रात्रीच वेळ तिकड॑ कित्येकांच भूताच आकार दिसते म्हणून सांगतात॑.
aakaashआकाश.n.skyआकाशआकाशाच नील रंगाच कारण सूर्यकिरण वायुमंडलाल लागून तजमळे होत॑ म्हणून डा. सी.वी.रामन हेनी विवरण देलाहेत॑.
aakaashgangaaआकाशगंगा.n.Milky way galaxyसूर्य अणी वेगळ॑ कोटानुकोटी नक्षत्रसमूहाच नाव॑. (1) "मिल्की-वे" नक्षत्रसमूहाला "आकाशगंगा" म्हणून सांगणे आहे. (2) हिंदू पुराणाप्रकार भगीरथ राजा उग्र तपस करून आकाशांतून गंगादेवीला भूलोकांत॑ उतरीवले. अमावस्या रात्री आकाशांत वृश्चिक राशीच बाजूंसून अम्हाला हे "आकाशगंगा" पाह्याला होईल॑.
aakaashvaaNeeआकाशवाणी.n.voice from the skyआकाशांत्सून याच गोष्टांच शब्द॑. अशरीरी.देवकी अणी वसुदेवांच वराड होऊन त्यांस रथांत॑ घेऊन जाताना "ह्यंच आठवां लोंक तुज मृत्यूला कारण होईल" अस एक आकाशवाणी ऐकून कंसाला भयंकर राग आल॑. तक्षणेच देवकीला वध कराला निश्चय करलातरीन, वसुदेवांच समाधानाच गोष्ट ऐकून ते वेळाला शांत झाला.
aakaashvaaNeeआकाशवाणी.n.name under which radio broadcast is done in Indiaभारताच रेडियो प्रक्षेपण संस्थाच नावपूरा देशांत॑ पहिलपसून/पुढेधरींगून असलते "आळ इंडिय रेडियो" हे नाव बदलिवून "आकाशवाणी" अस करलेतरीन तमिल-नाडांते अत्तापणीं तिकडून होयाच रेडियो प्रक्षेपणाला "आळ इंडिय रेडियो" असेच सांगतात॑.
aakarShaNआकर्षण॑.n.attractionइच्छा अथवा आग्रहामळे होयाच होढ/ओढसिनिमाच वेड आकर्षण॑ एवढे थोरळा झालांपिरी पणीं तला सोडल नाही.
aakarShaNashakthieeआकर्षणशक्ती.n.gravitional force. attractive force.एकाला स्वताकडे होढाला होयाच शक्तीचंद्र भूमीला प्रदक्षिणा कराला मुख्य कारण॑ भूमीच आकर्षणशक्ती मळे आहे.
aakramaNआक्रमण.n.invasion. attack.आक्रमण.मोहम्मद गज़नवी भारताच वर अठ्रादपा आक्रमण करला.
aakrutheeआकृती.n.shape. figureआकार. रूपकोटानुकोटी वर्षापुढे आफ़्रिका, आस्ट्रेलिया, भारत अणी अन्टार्टिका भूखण्डांच आकृती वेगळ॑ होत॑. ते वेळ हे चारीन "गोन्ड्वानालॅन्ड" अस एक महाभूखंडाच भाग होत॑.
aakShepआक्षेप.n.objectionविरोध. आक्षेपण॑(1) मला एवढे सामान उचलींगून याला होयना. तुम्हाला आक्षेप नाहीतर हे एक डब्बा/सामान तुम्ही आणतांत का ? (2) हे केळ॑ मी अर्ध सोलून ठिवलोंहें. तुम्हाला आक्षेप नाहीतर खांत॑. (3) मझ बरोर रिटैर झालते लोकांला मझ पक्षा जास्ती पेन्षन मिळाच पाहून/पाऊन मी पेन्षन अधिकारीला एक अर्जी देलों. पण, तेनी सरकाराच काहींएक आक्षेपण॑ सांगून मझ अर्जी संम्मत॑ केल॑ नाही
aakShepaNa~आक्षेपण॑.n.disallowing or declining.विसम्मत करणे.मझ बरोर रिटैर झालते लोकांला मझ पक्षा जास्ति पेन्षन मिळाच पाव्हून मी पेन्षन अधिकारीला एक अर्जी देलों. पण, तेनि सरकाराच काहींएक आक्षेपण॑ सांगून मझ अर्जी संम्मत॑ केल॑ नाहीत॑.
aala~आल॑.n.undried gingerअल॑. ओल॑/हिरव॑ सुंठेअजीर्णांतून अवस्था भोगताना आलाच रायत खाणे चोखोट म्हणतातआले in sm.
aala~ khaalathe maakaDaach thonDaaska~आल॑ खालते माकडाच तोंडास्क॑.say.an expression meaning "(caught with) a perplexing and confused expression while doing something which turned out to be totally unnecessary and unpalatable".थोडकीन आवश्य नाहीते काम करत असताना सांपडींगून मनाच गोंधळ दाखिवणे.
aalaapआलाप.n.tuning of voice in preparation to singingगाणे आरंभ करापुढे गाणेच योग्य प्रकार घसाच शब्द तयार करणेहिंदुस्थानी अणी कर्णाटक संगीत हे दोनाचीं मध्ये अलापानाच समयांत॑ फार व्यत्यास अस्ते.
aalaapआलाप.fig.whining on and on. indulging in endless complaining.सोडनास्क॑ आरोप करणे.तिला घरांत॑ निम्मतीच नाही म्हणून अस्गीदनालीं कळून असेल तरीन तिज आलाप(ना) ऐकाला कोणालीन इष्ट/समय/वेळ नाही.
aalasआलस.n.lazynessशोंबेरिपण॑ (Tamil)दुपारच वेळ झोंपी जाणे आलसाच पहिल॑च लक्षण॑ आहे अस ऐकल नंतर॑ मी ते दंडक सोडूनटाकलों !
aalayआलय.n.dwelling placeराह्याच ठिकाण. वास स्थळ.हिमाच आलय म्हणाकरतां ते परवताला हिमालया म्हणून नाव आल॑.
aalingana~आलिंगन॑.n.embraceभेटींगणे "मझ भाऊच तुल्य तू आहेस" अस सांगून श्रीराम हनुमंताला भेटींगून आलिंगन॑ कराच रूप अठींगलतर अमच॑ मनांत॑ हे दोघेंच वर असाच भक्ती जास्ती वाढते. भेटणे in sm means meeting & also embracing.
aalochanaaआलोचना.n.contemplationगाढ विचार॑एवढे दिवसाच मनस्तापाच नंतर मझ बरोर बोलाम॑ म्हणून सांगून पाठिवल त्याला फार संतोषच. पण केम्हा मिळूया म्हणून मी आलोचना केलांपिरी तुम्हाला कळिवतों. आलोचना in sm means 'criticism' , 'a review'.
aaloobonDaaआलूबोंडा.n.potato bondaउरळेगड्डेंत केलते बोंडामहाराष्ट्रांआलूबोंडाला बटाटा-वडा म्हण्तात॑
aaloogaDDeआलूगड्‍डे.n.potatoउरळेगड्‍डे. भोईच खाले मुळांत॑ वाढाच एक गड्डाआलूगड्‍डेच भाजी, आलूगड्‍डेच बोंडा, आलूगड्‍डेच उप्पेरी, आलूगड्‍डेच फ्रेंच-फ्रैस हे तेवढीन मला उदंड अवड॑ल.
aamanthraNa~आमंत्रण॑.n.invitationआवंतण॑. स्वागत चिट्टीशतरंजांत॑ विश्वांत॑ सर्वउंच स्थानांत॑ असणार॑ श्री. विश्वनाथन आनंदाला एक होनररि डॉक्टरेट देऊन मर्यादा कराला हैदरबाद विश्वविद्यापीठ आमंत्रण॑ पत्र त्यांस॑ पाठिवले. पण, केंद्र मानुषिक विकास मंत्रालयाच अधिकारींच मूर्खपणामळे ते होनररि डॉक्टरेट त्यास॑ द्याला झाल नाही.
aamboDeआंबोडे .n.a fried eatable made of dhalsदाळांतूं तळून केलते एक खायाच पदार्थअम्च घरांत॑ सणाच संपाक म्हण्जे आंबोडे नाहीस्क॑ असनाfrom Kannada.
aanandआनंद.n.happiness. joy संतोषअम्ही भारतांतून आलों, अम्हीपणीं हिंदूधर्म आचरण करतों, अस॑ इंदोनेश्याच बाली देशवासींकडे सांगताना त्यांस फार आनंद वाटाच पाह्यलों.
aandolanआंदोलन.n.a mass social agitationसमुदायांत॑ परिवर्तन होयाकरतां कराच एक सामूहिक कार्यक्रमस्वातंत्र्य समराच "स्वदेशी" आंदोलनाच समय महात्मा गांधि लोकांला चर्खाच प्रयोग कराला प्रेरणा केले
aaNeआणे.n.the coin Anna.अणे. ते काळांत चार आणेला दोन इड्ली मिळत होत, पण अत्ता तेच इड्लीला पंध्रा रुपे झालाहे.
aangआंग.n.bodyदेह. शरीरहीम्हाळांत॑ बाहेर जाताना आंग बरोर पांघरींगून जाणे चोखोट
aang dhooNeआंगधूणे.n. bathing. ablution.स्नान करणे. नाहणे. आंग धुवणे. अंघोळ करणे. अंघूळ करणे. आंघोळी करणे. आंघोळ करणे. आंघूळ करणे कित्येक मठाला जाऊन सोवळेच कार्यक्रमाला आंगधूणे कराला मला थोडक संकोच वाट॑ल, कां म्हणजे, आडांतून पाणी शेंदून तिकडेच उघड॑ ठिकाणी स्नान करामकी म्हणून.
aang dhuvaNeआंग धुवणे.n.bathing. ablutionस्नान करणे. नाहणे. आंगधूणे. अंघोळ करणे. अंघूळ करणे. आंघोळी करणे. आंघोळ करणे. आंघूळ करणेतीर्थक्षेत्राला जाणार कित्येकदन॑ तिकडल॑ नदींत आंगधुवून कापड धुवून वाळिवून सोवळेंत येऊन देवदर्शन करतील॑.
aang moDaaआंगमोडा.n.stretching the body to relaxआंगमोडाहायशि होढून आंगमोडा देत असताना मला गळाच एक पटीस लचक धरल॑.
aang utharNeआंग उतरणे.vi.to become emaciated.आरोग्य उणे होयामळे रोडे होणे. uisतीन चार वर्षाच नंतर॑ मझ॑ मित्राला पाह्ताना त्यंच आंग उतरून गेलत्यास्क॑ दिसले मला. वचारताना कळ्ळ॑, डयबीटस रोगामळे अस॑ झाल॑ म्हणून.
aangaalaa hoNeआंगाला-होणे.id.to be exhausted after feeling ill.आंगाला नित्राण हेणे.मी चार दिवस डिंगी (डिंगू) जेरांत निजून पडल्होतों. आजच॑ आंघोळी केलते. आंगाला होत नाही म्हणून काय काम करालीन सध्याला होईना.
aangaalaa yeNeआंगाला-येणे.id.to be possessed (by good or evil spirit).देव नाहीतर भूत आंगाला येणे.मसूरी रोग आलतर, देवी आंगाला आले अस सांगणे आहे.
aangarkhaaआंगरखा.n.shirt worn by men.अंगरका. अंगर्का. अंगीदादिगेंच आंग राखिवून ठिवाच वस्त्राला आंगरखा अथवा आंगराखा म्हणतात॑.
aanghoLआंघोळ.n.bathingआंघूळ. आंघोळी. अंघोळ. अंघूळ. स्नान. नाहणेखेडेगांवांच लोके आंघोळ कराला कुंड नाहीतर नदीला जाणे आहे
aanghoLeeआंघोळी.n.bathing.आंघूळ. आंघोळ. अंघोळ. अंघूळ. स्नान. नाहणे.टैफोय्ड जेरांत दहा दिवस निजल्होतता आजच आंघोळी करला.
aanghooLआंघूळ.n.bathingआंघोळ. आंघोळी. अंघोळ. अंघूळ. स्नान. नाहणेउनू पाणींत आंघूळ करींगून समेच फंकाच खाले ओठाकलतर॑ आंगाला चोखोट नहो म्हणतील॑.
aaNiआणि.n.nailमेख. खिळाfrom Tamil.
aaNNeआणणे.vt.to bringधेवून येणेतजकडून ते पुस्तक घेवून आणणे कित्ति कष्ट म्हणून मला कळल॑
aanthआंत॑.adv.inside (portion) आंतल॑ भाग आत in sm.
aanthaaDआंताड॑.n.intestine. gut. bowelपोटांतल॑ जीर्णाच अवयव हिरण्यकशिपूच आंतडी उग्रनरसिम्हदेव तज पोटांतून काढून ते राक्षसाला वध करताना भूलोकांत॑ प्रह्ळादाला विना दुसर॑ कोणालीन देवाला शांत कराला झाल नाहीअंतडे in sm.
aanthala~आंतल॑.adj.internal. that which is insideआंत॑ असाच॑तो एवढे दिवस मझकडे जास्ती बोलत होत नाही. एक वारापसून लाडी-गोडी बोलाला आरंभ केलाहे. आंतल॑ विषय काय म्हणून कळत नाही !
aanthoonआंतून.adv.from inside. from withinआंतल॑ भागांतूनसंपाकघरांतून चोखोट गोढसाराच (गोडसाराच) वास येत आहे !
aapathआपत.n.calamityदुर्घटना. विपत्त. आफतयुक्रेन देशाच चेर्णोबिल अणुशक्ति केद्रांत॑ झालते दुर्घटना रक्षा नियंत्रण चुकलतर होयाच आपताच एक उदाहरण॑ आहे
aaphathआफत.n.calamity दुर्घटना. विपत. आपतसी.पी.ऐ.(माओ) पक्ष॑ पुन्हा-पुन्हा त्यंच स्वाधीनाखाले असाच प्रदेशांत॑ रेल्वे-ट्राकाला उडीऊन नाश कराच एक मोठ॑ चिंताच विषय झालाहे. हे आफतांतून चुकिवाला अता-अता/समीपांत॑ केंद्र सरकार रेल्वेच अपाय उणे करिवाला उपयोग होयाच एक उपकरण॑ वापराला निश्चय केलाहेत॑.
aaraadhanaaआराधना.n.worship. prayerपूजातिरुपती श्री बालाजी देऊळांत॑ ब्रह्मोत्सव पूजा आराधना कराला निश्चय केलते रोक्कम, म्हणजे 25,000 रुपे दोन वर्षापुढेच बांधाम॑.
aaraadhanaaआराधना.n.an annual religious ceremony in memory of a saint who entered his brindavana either when he was alive or after demiseयतींच ब्रिंदावन प्रवेश केलत॑ दिवसाच वार्षिक पूजाश्री राघवेन्द्रस्वामींच आराधना प्रतिवर्ष श्रावण महिना क्रिष्णपक्षाच द्वितीया दिवस करतात॑. ते तीन दिवसाच कार्यक्रम अस्ते
aaraamआराम.n.rest. relaxation. comfort. easeसुख. स्वस्थ. हायशि असणेरिटैर झाल नंतर आराम होऊन बसूया म्हणींगलों, पण खरे सांगाम॑ म्हणजे मला अत्ता कसालीन वेळ नाही ! हायसे in sm means 'feeling of relief'.
aarambhआरंभ.n.the beginning. the startप्रारंभहे ब्रह्मांडाच आरंभ "बिग-बॅन्ग तियरि" प्रकार एक मोट्ठ॑ विस्फोटांतून झाल॑ अस शास्त्रज्ञ सांगतात॑
aaraNya~आरण्य.adj.relating to the wild or forest.विजन अथवा राणाला संबंध झालतेश्रीराम, सीतादेवी अण्खी लक्ष्मण हेन्च चौदा वर्षाच आरण्यवासांत॑ तेरा वर्ष झाल नंतरच सीतादेवीच अपहरणीं विमोचनीं झालते
aaratheeआरती.n.performing puja by waving sacred lamp in a circular motion in front of idols of godsदेवाला तूपाच, नाहीतर कर्पूरार्तीच पूजा करणेकित्येक लोक देवपूजाच आरतीला कर्पूरार्तीपक्षा कापूसाच (रुईच) वात लावून आरती करणेच श्रेष्ट म्हण्तात॑.
aarbhaaTआर्भाट॑.n.a tumultuous demonstrationआर्भाट॑अमेरिकांत॑ एक पांच वर्षाच पोरी तिला पह्जते मिळ्ळ॑ नाही म्हणून थोर आर्भाट केलते टी.वींत॑ दाखिवले.
aarogya~आरोग्य.n.healthरोग नाहीस्क॑ असणेपैसे किती असलतरीन आरोग्य नसलतर॑ मनुषाला सुख असना अस सांगणे निजचे/खरेच॑.
aarohaNआरोहण.n.climbing. ascending. mounting.वेघणे.तेन्ज़िंग नोरगे अणि न्यूज़िलंडाच सर. एड्मंड हिल्लरी एवरस्ट शिखराच आरोहण पहिले-पहिले इसवी 1952 मधे केले.
aarohaNआरोहण.n.ascending or mounting ceremonially.आसनांत वेधून बसणेइसवी 2015 वर्षाच मैसूर दस्सरा उत्सवाच वेळी ते राज्याच नव॑ राजाच सिंहासन आरोहणाच सण झाल॑.
aaropआरोप.n.accusationदोष सांगणेविनायक चतुर्थी दिवस चंद्राला पाह्यणारांवर चोर्टपणाच अरोप होईल अस सांगाच मागे एक खाणी आहे
aaropeeआरोपी.adj.the accusedआरोप झालते व्यक्तीन्यायालयांत॑ निर्णय होयापर्यंतीन एक आरोपीला दोषी म्हणून सांगताने म्हणून आहे.
aarya~आर्य.adj.noble. venerableश्रेष्ट मनुषथोर थोर माणसांला "आर्य" म्हणून बलावाच विना, नाव॑ सांगून बलावणे त्यांस अपमान कराच तुल्य म्हणून धारणा आहे.
aarya~आर्य.n.Aryansआर्यवंशाच लोक॑सुमार 2500 वर्षाच पुढे सिंधू नदीच आजू-बाजू मोहन-ज-दारो, हरप्पा असल॑ ठिकाणी विकास झालते संस्कृती आर्य वंशलोकांच न्हो, पण द्राविड वंशलोकांच आहे अस पुरावस्तू अन्वेषणा प्रकार सिद्धांत॑ झालाहे.
aasana~आसन॑.n.yoga postureयोगासन॑योगाच कित्येक आसन कराला आंग दोन तीन ठिकाणी वक्र केलतरच होईल म्हणून, ते मझान होईनाते काम म्हणून सोडूनटाकलों.
aasana~आसन॑.n. seatबसाच ठिकाणरामदूत हनुमंताला रावणासमोर बसाला आसन॑ देल नाही म्हणून तेनी त्यंच पूसांतसूनच रावणाच सिंहासनापक्षा/बरीस उंच आसन॑ करींगून बसले.
aashaaआशा.n.hopeमनाच आवश्य पूर्ति होईल म्हणाच आशा. अमेरिकाच जुने राष्ट्रपती बुषाच लोकनीतीच वर अनेक देशांच लोकांला फार संदेह होत॑. बारक ओबामा नव राष्ट्रपती झाल॑ नंतर॑ अमेरिकाच लोकनीतींत॑ इथपर व्यत्यास याच आशा आहे.
aashaaआशा.n.desire.इच्छाPUC परीक्षांत चोक्कोट मार्क्स घेटला तरीन नंतर॑ BE की MBBS की कराला मझ॑ लोंकाला इष्टेच होत नाही. नुस्त BA (History) कराम॑ म्हणून मझकड॑ उदंड विचारींगट्ला. शेवटी तज आशा प्रकारच होऊनदे म्हणून सोडूनटाकलों.
aashaa bhogaNeआशा भोगणे.vi.to get tempted.मोह येणे. थोर घराच नवरा म्हणून आशा भोगून मझ॑ मित्र एकले त्यंच लेंकीच वराड निश्चय केलेतरीन, नवराच घरच॑ लोके गुंडागिरी, चोर्ट कॉण्ट्राक्ट कामा वाटे सरकाराच पैसे गडप करणे असलत॑ कामांत अग्गीन आहेत म्हणून कळून वराड राह्ते करून टाकले.
aashaa daakhivaNeआशा दाखिवणे.vt.to tempt.मोह आणिवणे. वराडाच नंतर॑ सुख-सौकर्यांन राहूया म्हणून आशा दाखिवून भरून पैसावंत अरबी म्हातारे अमच॑ देशाला येऊन गरीब कुटुंबाच पोरींस वराड करींगून जायाच विषय मध्य मध्य वर्तमान पत्रांत येत असत॑ तरीन ते अन्याय होतेच असत॑.
aaShaaDhआषाढ.n.fourth month of the Hindu yearहिंदू पंचांगांत॑ चौथावां महिना. मलखेडा श्री जयतीर्थस्वामीच सहाशेंपन्नासवां पुण्यदिवस हे वर्ष आषाढ महिनेच शुक्लपक्ष पंचमी दिवसी झाल॑.
aashankaaआशंका.n.apprehension. misgiving. diffidence. doubtभेंमळे होयाच संशय"बोर-आडांत॑" पडलते ल्हान लेंकराला बाह्येर काढजोरी पूरा गांवांला फार आशंका वाटत होत॑
aashayआशय.n.principle. meaning. purport. मूल अर्थ. आंतल॑ अर्थकोंतीन एक नव विषयाच आशय कळींगट्लतर ते लोक्कर मनांत॑ दृढ होऊन राहील॑/घट्टि बसल॑
aashayआशय.n.intention. purpose. उद्देशईस्ट इंडिया कंपनी भारताला येताना त्यंच उद्धेश व्यापर होत॑. नंतर एक साम्रज्य हाताखाले करींगाला वाट पाह्यले. भारताच अनेक राजा, महाराजा अणी मुगळ साम्राट यांस ईस्ट इंडिया कंपनीच हे आशय कळींगाजोरी त्यंच राज्य सर्वीन/पूराहीं हातांतून सोडून गेल॑/नष्ट झाल॑.
aashcharye~आश्चर्य.n.astonishmentदंग. विस्मयचाळीस वर्षापुढे मनुष चंद्रग्रहाला जाऊन आलते अठींगताना आजपणीं अम्हाला आश्चर्य वाटते.
aasheervaadआशीर्वाद.n.blessingsअनुग्रहमझ॑ सौभाग्य मझ॑ षाणपणामळे काही नोहो. अस्कीन थोरळेंच आशीर्वाद॑.
aashrama~आश्रम॑.n.hermitageऋषीमुनींच वासस्थान॑लक्ष्मण सीतादेवीला राणांत सोडल॑तम्हा त्यांस वाल्मीकी मुनी त्यंच आश्रमाला बलाईंगून गेले.
aashrama~आश्रम॑.n.name of the four stages in a man's life.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ अणी सन्यास अस एक मनुषाच जीवनांतल॑ चार आश्रम॑.साधारण होऊन ब्रह्मचर्य, गृहस्थ हे दोन आश्रम होऊनच सरते तरीन वानप्रस्थ अणी सन्यास हे दोन आश्रम आचरण करणे अपरूपच॑.
aashraya~आश्रय.n.protectionरक्षा. संरक्षणात्यंच चोखोट उपदेश ऐकाला तयार नाहीते रावणाला सोडून विभीषणा श्रीरामाच आश्रयाला आले.
aashraya~आश्रय.n.dependence. supportआश्रयवय होतां-होतां आंगाच बळ उणे होणे सहजचतरीन, प्रत्येक कामालीं/कार्यालीं दुसरेंच आश्रयांत असणे अनेक लोकांस॑ अवडना/उणवता वाटते.
aashraya~आश्रय.n.asylum. refuge. shelterआश्रयश्रीलंकात॑ झालते युद्धामळे तिकडले अनेक तमिल लोक अम्च देशांत॑ आश्रय विचारून आले. पण, तिकडले युद्ध संपला नंतर॑ यथे आश्रय घेट्लते लोके परतून गेलते विषय कोण्त पत्रांतीं मी वाचलों नाही.
aashvaasआश्वास.n.assuranceवचन॑ (देणे/मिळणे).तुज एवढे दिवसाच वागणे पाह्यलतर॑ तुला विसंबाला मी तयार नाही. मला मझ॑ पैसा परतून मिळ॑ल अस॑ आश्वास मिळापर्यंतीन/मिळापतोरी मी तुला एक दंबडि पणीं रीण देईना.
aashvaasआश्वास.n. mental comfort. consolationमनाच समाधानमी सोसाच कष्टाला कायतरीन परिणाम आहेका म्हणून त्यंचकडे विचाराला जायाच पुढे तेनी तिकडे आहेतका म्हणून कळ्ळतर॑ मला आश्वास वाट॑ल.
aashvija~आश्विज.n.seventh month of the Saka year.आश्विन महिना. अश्विन महिना. हिंदू पंचांगांत॑ सातवां महिना. हे वर्षाच नरक चतुर्दशी सण आश्विज महिनेच कृष्णपक्ष चतुर्दशी दिवसी येते.
aashvinआश्विन.n.seventh month of the Saka year.आश्विज महिना. अश्विन महिना. हिंदू पंचांगांत॑ सातवां महिना.हे वर्षाच धन-त्रयोदशी सण आश्विन महिनेच कृष्णपक्ष त्रयोदशी दिवसी येते.
aaspathriआसपत्रि.n.hospitalआसपत्रिसरकारी आसपत्रींत॑ गरीब लोकांस॑ पैसाच खर्च नाहीस्क॑ ओखदीं डॉक्टरांच॑ (वैद्यांच॑) सेवाईं मिळेल म्हणून आहे, पण, वास्तव काय म्हण्जे भरून सरकारी आसपत्रींत॑ तिकड जाणार गरीबांकडूनपणीं पैस उप्पडतात॑.
aasthआस्त.n.wealthसंपत्त. धन. आस्तीमिळ्ळते आस्त पूरा पूड-पुठाणी करूनटाकून तो अत्ता देऊळ-बीदींत॑ भीक मागत बसलाहे.
aastheeआस्ती.n.wealthसंपत्त. धन. आस्तचार पांच पिढींतून आस्ती वांटा करनाते ते कुटुंबांत अत्ता ते विषय एक थोर अवघड स्थितींत येऊन बसलाहे.
aasthikआस्तिक.n.theist. one who believes in God or a Super Powerदेव/परमात्मा आहे अस विश्वास करणारआस्तिक लोकांस मस्करी करणे म्हणजे कित्येक नास्तिकवादींस कायकी संतोष वाटते.
aasthikavaadआस्तिकवाद॑.n.doctrine of theismआस्तिक तत्वज्ञान॑भारतास्क॑ एक जनतंत्र अणी निधर्म देशांत आस्तिकवादाला ठिकाण नाही म्हणणे चूक म्हणून कित्येक मूर्ख लोकांस कळत नाही.
aasvaadआस्वाद.n.relishing taste.अवडींगून स्वाद धेणे आस्वादांत॑ जेवत अस्ताना भरलते लोटा लवंडून/लंबडून पानांत॑ पूराईं पाणी सांडले.
aaTaaआटा.n.wheat flourगहूंच पीठ.अम्ही घरच॑ कामवालीकडे महिना-महिना दहा किलो गहूं गिरणीला देवूनपाठीवून आटा करीवून आणणे आहे
aaTHआठ.n.eightसाताच नंतरल॑ संख्यागेल एक वारांत कॅश्मीरांत आठ आतंगवादी लोकांस अम्च॑ सुरक्षासेना मारले.
aaTHaanguLआठांगुळ.n.a family ritual conducted when a lady is eight month pregnantगर्वाराच आठवां महिना कराच एक पद्धत॑अमेरिकांत राह्याच त्यंच लेंकीच आठांगुळ सणला जातों म्हणले तरीन त्यांस जायाला झालनाही म्हणून, नंतर॑ प्रसवाच समयांत गेले. अठांगळें/अठांगुळें/अठांगूळ in sm.
aathara~आतर॑.adj.impatient अवसर॑(1) उगे आतर भोग नको. आज सायंकाळि दुकानाला जाताना तुला पह्जते अग्गीन घेवून देतों. (2) आतर॑ भोग नाका. तीन महिनाचांत॑/महिनाच्यांत॑ मी तुम्च पैसा पूरा देऊनटाकतों. आतुर in sm.
aathara~आतर॑.adj.excitedआतर॑एरोप्लेन अत्ताच उतरलाहे. आतर॑ भोगनको. तुझ बाप लोक्कुरच प्लेनांतून बाहेर उतरतील॑
aathara~आतर॑.adj.eager. curiousउत्सुक॑तो थोड दिवसा पसून/दिवसांतून चिंतांत॑ बसलाहे. तला कायकी मनाच कष्ट झालाहे वाटते. काय एकालीन आतर॑ दाखिवत नाही
aathebaheeNe~आतेबहीण॑.n.paternal aunt's daughterअत्याच लेंकमला दोन आतेबहीण होत॑त्यांत एकली पंध्रा वर्षाच पुढे कॅन्सर रोगांत मरूनगेली.
aathebhaaooआतेभाऊ.n.paternal aunt's sonअत्याच लोंकमला पांच आतेभाऊ आहेत अणी त्यांत तीघदन॑ ऐ.ऐ.टी/ऐ.ऐ.एम केलाहेत॑.
aathmaaआत्मा.n.soulजीव. जीवात्मामोक्ष मिळापतोरी एक आत्मा पुन्हा-पुन्हा हे संसारांत॑ जन्म काढल॑, अस॑ हिंदू धर्म विश्वास करत॑.
aathmaarpaNआत्मार्पण॑.n.self-surrenderस्वता अर्पण॑ करणे. आत्मसमर्पण॑. भक्तिसिद्धांताच एक मुख्य उद्धेश देवाकडे आत्मार्पण करणे, हेच आहे.
aathmadahane~आत्मदहन॑.n.self immolationस्वता विस्तू घालींगून मरणे. विस्तूनीशी आत्महत्या करींगणेतमिलनाडाच राजनीतींत आत्मदहन करींगणारां विषीन तम्हा-तम्हा ऐकत असतों. तिकडल॑ लोकांस हे वेड स्वभाव कां आल॑की.
aathmahathyaaआत्महत्या.n.suicideस्वता प्राण काढणेदुसर॑ लोकयुद्धांत॑ सोवियट-रष्याच सैन्य जर्मनीच बर्ळिन नगरांत॑ प्रवेश करून थोडच वेळांत॑ अडोल्फ हिट्लर आत्महत्या करूनटाकला.
aathmanआत्मन्.n.the individual soulअंतरात्मामध्व-तत्वज्ञानांत म्हणलतेप्रकार पंचभेदांत॑ आत्मन् अणी ब्रह्मन् हे दोनीं वेगळ॑ वेगळ॑ म्हणून आहे.
aathmapathneeआत्मपत्नी.n.soulmate. wifeबाईल. पत्नी.कित्येक होम कराच वेळी अग्निकुंडांत आहुती देतम्हा यजमान अणी आत्मपत्नी हेनी दोघीन मिळून आहुती देमतेस्क॑ असत॑.
aathmasamarpaNआत्मसमर्पण.n. surrenderदुसरेंच अभय विचारींगून स्वता अर्पणा करींगणे.कुवैत युद्धांत॑ अमेरिका एक पूरा महिना प्ळेनांतून बॉम्ब घालून इराक्की सैन्याला ध्वंस॑ करले. तज नंतर इराक्की सैन्याच अवशिष्ट भाग दोन दिवसाचांत॑ आत्मसमर्पण करले.
aathmavishvaasआत्मविश्वास.n.self confidenceस्वंत सामर्थ्यांत असाच विश्वास.विश्व बॅडमिनटनात॑ दुसर॑ सर्वउत्तम स्थानांत॑ असाच सैना नेहवालाला तिज खेळावर फार आत्मविश्वास आहे.
aaTHshe*आठशें.adv.eight hundredशंबर गुणा आठद्वैत तत्वज्ञान प्रचार करलते श्री मध्वाचार्यांच जन्म इसवी 1238 वर्षी, म्हणजे आठशें वर्षाचीन पुढे उडुपीच जवळच॑ पाजकांत झाल॑.
aavaahanआवाहन.n.invocation of a deityपूजाच वेळी देवाला प्रार्थना करून सानिध्य करणे.पूजा आरंभ करताना देवाच आवाहन करून नंतरच वेगळ॑ काहीं करणे
aavakkaiआवक्काई.n.a type of mango picklesएक विधाच अंबाच लोणचेआवक्काई लोणचे करताना अंबाला गोट्टीनिशी चिरून घालणे आहेfrom Telugu.
aavaLNeआवळणे.vt.to press and tighten. होढून चेंपणे. ओढून चेंपणे.बेष आवाळून बांधून ठिवतात तरीन कापूसाच मंडींत गेलतर॑ रुईच धूळ आंग पूरा लागून श्वास कराला पणीन तंटा होयास्क॑ होऊनजात॑.
aavarthane~आवर्तन॑.n.repetitionपुन्हा-पुन्हा होणे. पुन्हाहीं-पुन्हाहीं होणेअजीर्णाच आवर्तन असलतर॑, दिवसोडि मंडि-सांभारभातीं फणसाच भाजीईं खायाच राह्त करून डॉक्टराला पाह्णे चोखोट !
aavashya~आवश्य.n.necessityपह्जते (1) आवश्य म्हणजे "पह्जते" अणी अवश्य म्हणजे अगत्य अस हे दोन शब्दांच अर्थांत॑ व्यत्यास आहे म्हणून कित्येकदनाला कळना. (2) सूर्याला प्रदक्षिणा कराच आठ ग्रहांत॑ भूमीला मात्र जीव उत्भव/संरक्षणा कराला आवश्याजोक्त वातावरण आहे. (3) "हे काम पूरा कराला काय-काय आवश्य आहेकी ते पूरा अम्च गांवांतच मिळ॑ल अणी तुम्ही तिकडून पाठीवून द्याच आवश्य नाही".
aaveshआवेश.n.possessed by God spiritदेव आंगावर येणेभद्रकाळी देऊळांत॑ गेलंदा झालते उत्सवाच वेळी देवीच आवेश आचारेच लोंकच आंगावर येऊन तेनी फार अट्टहास करून नंतर॑ मूर्च्छ येऊन पडले.
aaveshआवेश.n.possessed by spiritभूत आंगाला येणेभूत-पिशाचाच आवेश धरलत्यांस नामक्कल नामगिरी देऊळांत॑ बलाईंगून गेलतर बर॑ होईल म्हणतात॑.
aaveshआवेश.n.uncontrolled excitementनियंत्रण॑ कराला होयना तेवढ॑ उत्साहवीरेन्द्र शेहवाग खेळाच पाह्याला आलते लोकांच आवेश पाह्यलतर कोणालीन आश्चर्य वाटनास्क॑ असना.
aaviShkaarआविष्कार.n.manifestationप्रकटन. प्रदर्शनविग्रहांत॑ देवाच आविष्कार झाला नंतरच देऊळ पूजाला उघडतील म्हणून देऊळाच सेक्रटरि सांगट्ले.
aaviShkaraNआविष्करण.vi.manifesting. revealing.प्रकट होणे.अत्ता-अत्ताच अम्च गांवांत॑(गामांत॑) सिद्धिविनायक देऊळ जीर्णोद्धार॑ करून गणेषाच विग्रहाला पुनरप्रतिष्टापना केले. हे कार्यक्रमांत॑ शेवटीच भाग, म्हण्जे, विग्रहांत॑ देवाला आविष्करण करणे उरलाहे. याच भाद्रपदमास॑ विनायक चतुर्थीच पुढे हे होईल म्हणतात॑.
aayaaआया.n.female helper of low gradeसहाय करणारि (उण॑ स्थितीच).कुवैत, सौदि-अरेबिया, यु.ए.इ. असल॑ देशांत॑ भारत, श्रीलंका असल॑ देशांतून जायाच आया लोकांचबरोर तिकडल॑ लोक फार दुष्ट रीतींत॑ वागाच विषीन पत्रांत॑ तम्हा-तम्हा/मधे-मधे येत अस्ते.
aayaasआयास.n.exertion. toil. painsप्रयत्न. श्रम. कष्टपाप ! एवढे आयास घेऊन/करून विदेशांत॑ कष्टिभोगाच हे आयालोकांच गेत पाह्यलतर परितप वाटते.
aayojanआयोजन.n.plan. arrangements.भावी योजना.तीन महिनेच पुढे केंद्र सरकार जी.एस.टी करनियम आणिवले अणी तज पुढे गेल वर्ष काळ॑पैसे नियंत्रण कराला म्हणून नोट-बंध नियम आणिवले. हे दोन नियमामळे देशाच अर्थव्यवस्था मोस होयाच लक्षण आहे म्हणून ते सुधारिवाला बॅन्कांच सांपतिक स्थिती घट्टी करिवून व्यापार-व्यवसायाला प्रोत्साहन द्याच एक आयोजन समीपांत घोषणा केलाहेत॑.
aayudhआयुध॑.n. weaponयुधाच उपकरण॑पांडव अज्ञातवास आरंभ करापुढे त्यंच आयुध पूराहीं गांठोड बांधून एक आपटा-वृक्षाच (शमी-वृक्षाच) वर लोंबिऊन ठिवले. दुसरेंना ते गांठोड एक मृतदेह लोंबून असास्क॑ दिसून देत होत॑.
aayurvedआयुर्वेद॑.n.system of Indian medical treatment using herbal, plant and natural extracts देशी चिकित्सा विधी. uisआयुर्वेदाच ओखद (औषध) अणी चिकित्सा पद्धतीला अलोपतीच तेवढे शास्त्राच आधार नाहीतरीन कित्येक रोगाला ते फारच योग्य अस्ते.
aayuShआयुष.n.lifetimeजीवितकाळ(1) वंगळ॑की, चोखटकी वाट कोणत तरीन असूनदे, करोरपती (कोटीश्वर) होम॑ म्हणून तला मनांत उदंड आहे. पण हे आयुषांत तो कोटीश्वर होय़ाल जातनाही म्हणून मी लिव्हून देतों. (2) श्रीनिवास रामानुजन ह्यंच आयुष ल्हान होत॑ तरीन गणितशास्त्राला त्यंच संभावना फारच महत्व होत॑.आयुष्य in SM.
aayuSh homa~आयुषहोम॑.n.a homa praying for long and rewarding lifeश्रेष्ट जीवा करतां कराच एक होम॑उदंड दिवस त्यांस आंगाला बर नाहीस्क होते अणी घरांत वेगळ॑ कायकायकी प्रश्न पणीन होत॑, म्हणून अता समीपांत आयुष होम करीवले म्हणून ऐकलों.
aayuShmaanआयुष्मान.adj.a person who lives for a very long timeदीर्घायुष असणारथोरळेंस नमस्कार करताना त्यनी अम्हाला "आयुषमान भवा" म्हणून आशीर्वाद करणे आहे. म्हण्जे, अम्हाला दीर्घ आयूष होऊनदे म्हणून सांगतात॑.

No comments:

Post a Comment