Sunday, May 15, 2016

D (ड)


.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
Daagडाग.n.a stain. a spot.एक वस्तूच वर लागाच रंग.पंढ्र कापडाच व॑र कित्येक वनस्पतीच रस लागून होयाच डाग काय करल॑ तरीन (केलतरीन) जाईना. तज नंतर ते कापड पुसाच चिंदीस्कच उपयोग कराम॑ (करांव॑).
Daagडाग.n.a mole.उजतान पसून काताडांत॑ असाच काळ॑ रंगाच चिन्ह.
Daagडाग.n.freckles.तोंडाच काताडांत॑ याच ल्हान-ल्हान फोड.
DaagaNeडागणे.vt.to shoot with a fire-arm.तोफनीशी गोळी मारणे.(1) हे काळाच लेंकरे "वीडियो गेम्स" पाव्हून, तोफ/रिवाल्वर असल खेळाच-सामान घेतात॑ अणी ते ठींगून डागणे/मरिवणे असल खेळ खेळतात॑. थोरळे झालावर त्यांस॑ "अहिंसा" म्हणाच शब्दाच अर्थ पणीं कळनास्क होऊन जाऊया. (2) ते मनुषाच तोंड पाह्तानाच मला पेटिंगून येत॑. तेला डागाम म्हणून वाटते.डागणें in sm.
Daakडाक.n.post. mail.तपाल. कागद॑.ल्हान गामांत अत्तपणीं लोके डाकघराला जाऊन ’पोस्ट मास्टराच’ बरोर उगे कायतरीन बोलून त्यंच ’टैमपास’ करतात॑.
DaakbangLaaडाकबंगळा.n.government rest house.सरकाराच विश्राम घर.अम्च देशाच स्वातंत्र्याच पुढ॑ गोरेलोक बांधलते डाकबंगळा सत्तर वर्षाच नंतरपणीं घटमुट (घट्टी-मुट्टी) आहे.the word Dakbanglow has it's origin in the traveler's rest-house at the end of a each dak or post stage of the byegone era.
Daakuडाकु.n.dacoit.चोर्टा.
Daambarडांबर.n.coal tar used for road laying.बीद तय्यार कराला वापराच काळ॑ रंगाच॑ वस्तु.वर्षा-वर्षी पावसाळाच पुढ॑ बीद बरोर करतों म्हणून कॉरपरेषन कंट्राक्टर लोके तजवर नुस्त डांबर घालतात. एक थोर पाऊस आलकी ते पूरा नाशून जात॑.
Daambikडांभिक.n. & adj.hypocritical.डांभिक. डंभाचारि मनुष तज सहवास मी ठींगनाच ठींगना, कां म्हणजे, सांगाच एक कराच एक तसलते डांभिक मनुष तो. डांभीक/दांभिक/ढोंगी in sm.
Daanchडांच.n.mosquito.एक ल्हान उडाच प्राणिडांच चावनास्क असाला दिवसोडि आंगांत "ओडोमोस" लावींगणे चोक्कोट न्हो (नहो).डांस in sm.
Daangarडांगर.n.a gravy like side dish made from udid flour.उडिदाच पीटांत॑ केलते एक तोळ्लावण॑ (तोंडलावण॑) पदार्थ.डांगर देशस्थ मराठी लोकांच एक प्रसिद्ध कालवण (कालिवण) आहे.
Daavडाव.n.a game of dice.डावाच खेळ.
Daavडाव.n.a throw or roll of dice hoping for luck.भाग्य उद्देश करून डाव लोळिवणे.
Daavडाव.n.ploy. bluff.लबाड.तू मझकडे डाव घाल नको, असाच वास्तव सांग.
Daava~डाव॑.n.left side. उजव॑च उलटा भाग ब्रिटिष कोमनवेल्तांतल॑ देशांत अग्गीन बीदीच डाव॑ पटीसांतच बंडि पळिवाच॑. वेगळ॑ देशांत अग्गीन उजव पटीसांत॑ पळिवतात.डावा in sm.
Daavkhorडावखोर.n.gambler.डावखोर.
Daavkhoraaडावखोरा.n.a left-handed person.डाव॑ हातांत काम करणार.
Dabaraaडबरा.n.a medium sized barrel shaped, open mouthed vessel used mostly for boiling and/or storing drinking water.डवरा (Tamil). पाणी धरून ठिवणे, तावणे हे अग्गीन कराच उघड तोंडाच पात्र. तावाला म्हणून डबरांत मी पाणी धरून ठिवलते कोणकी लोटून सांडलाहेत॑. अत्ता पुन्हाहीं आडांतून पाणी शेंदून ते भरून ठिवाम॑.
Dabbaaडब्बा.n.a container.डब्बि.चक्ळि, टेंगूल असलते पदार्थ मौ (मऊ) होईनास्क असाम म्हणजे, एक डब्बाच आंत बेष झांकून ठिवलतर॑ पुरे.
Dabbiडब्बि.n.a container.डब्बा.लाह्येंच वड्या डब्बींत घालून बेष झांकून ठिवलतर॑ उदंड दिवस नास होईनास्क॑ असल॑.
DachakaNeडचकणे.vi.to get startled. to get terror struck.डचकणें.त्यांस॑ सोप्न पडताना की, काय की ल्हान लेंकरे झोंपींत डचकतील॑.
Damaarडमार.n.an onomatopoeia indicating a large noise.एक मोट्ठ॑ शब्द. शब्दाच गोष्ट. पाष्टे-पाष्टे पांच घंटेला संपाक घरांत॑ डमारशी एक शब्द ऐकोलों. जाऊन पाह्यलतर॑ विरदणाला (विरजणाला) ठिवलोतते दूधाच पात्र एक मांदर॑ खाले लोटून घाट्लते दिसले.from Tamil.
Damaruडमरू.n.a small hour-glass shaped drum held between fingers.बोटांत॑ धरून बडिवाच एक ल्हान ढोळ.तांडव कराच शिवाच हातांत डमरू पणीन असत॑.
Dambhaachaareeडंभाचारी.adj.ostentatious. showoff.असाच पक्षा जास्ती दाखिवणे/करींगणे. नव होऊन पैसे-कासांत॑ आलते लोके थोड डंभाचारीपण॑ दाखिवणे आहे. 
Dankडंक.n.vengeance. malice.डंक. बदला घ्याच स्वभावअम्च राष्ट्रमंत्रिमंडलांत कित्येक मंत्रीना ’आर.एस.एस’ लोकांवर॑ डंक आहे म्हणून मझ अभिप्राय. तजमुळ॑ कित्येक भ.ज.पा नेतांचवर काहींतरीं आरोप घालून त्यना ’सी.बी.ऐ’ वाटे अडकिवाला काय वाट आहे म्हणून पाह्त असतात॑.डंख in sm.
DankaaroTeeडंकारोटी.n.a fried poori like preparation made of rava mixed with curds and spices. रवाच बरोर दहीईं मसालाईं मिळिवून पाह्याला पूरी सारख॑ असाच एक तळलते पदार्थ. डंकारोटी खायाला वेगळ॑ तोळ्लावींगाच काहीं नोको, कां म्हणजे तजच रूच बेष असत॑.
DasNeडसणे.vt.to sting or to bite (by insects etc).सरप॑, विंचु, डांच असलते जंतु चावणे.विंचु डसलते ठिकाणी थोडक चुणा लावलतर॑ लोक्कुर बर॑ होईल म्हणतात॑.
Davaraaडवरा.n.a medium sized barrel shaped, open mouthed vessel used mostly for boiling and/or storing drinking water.डबरा. पीयाच पाणी तावालीं धरून ठिवालीं उपयोग कराच एक भांडि.पीयाच पाणी मिळणे कष्ट असाच प्रदेशांतल॑ लोकांच संपाकघरांत॑ एकाच वर एक डवरांत॑ पाणी धरून ठींगटलसाच पाव्हुया. from Tamil.
Davaraaडवरा.n.a small vessel being part of the coffee/tea drinking set of"डवरा-टंब्लर". चाय/कॉफि पीयाला उपयोग कराच एक ल्हान पात्राच जोडींतल॑ एक पात्र.पोणावांटा घरांत घराला आलते लोकांस मात्र, ते वेळ पूर्त, डवरा-टंब्लरांत कॉफि/चाय पीयाला देतील॑. घरच लोक नुस्त टंब्लरांतच कॉफि-चाय पीतील॑. पोळत असलतर ते फुंकत॑ पीतील.It is used for cooling the hot beverage, by pouring back and forth from the tumbler. From Tamil.
Davaraa TambLarडवरा-टंब्लर.n.a set of a small flat-bottomed open mouthed vessel and a tumbler used for drinking coffee or tea, usually made of steel or in olden days, of brass.लोटा-वाटि. चाय/कॉफि पीयाला उपयोग कराच एक ल्हान पात्राच जोडि. साधारणहोवून हे स्टीलाच असत॑, पण जुन॑ काळांत॑ हे पितळाच होत॑.कढत कढत कॉफि, डवरा-टंब्लरांत निवींगून पीलतर॑पणीं तज रूच तसच असेल॑.from Tamil & English.
Deraaडेरा.n.tent.डेरा.वीस तीस वर्षाच पुढे कुवैत, अबु-धाबी असलते देशांत॑ नुस्त डेरांत राहाच बदुईन अरबि लोक होते. अत्ता तिकड तेल उत्पन्न कराला आरंभ झाला नंतर ते गांम अग्गीन उजंड विकास झालाहे.
Deraaडेरा.n.camp.मुकाम. मुक्काम.टिपु सुल्तानाच सैन्य मलबार प्रांतांत डेरा बडिवलाहे म्हणून ऐकतानाच त्रावनकोर राज्यांत लोके फार भींगाला आरंभ केले.
Deraa baDivaNeडेरा बडिवणे.fig.to stay put for a long period, usually as an un-welcome guest.बलावनास्क॑ (आवंतन नाहीस्क) आलते अतिथि थोड दिवसाला एक ठिकाणि राहणे. मुकाम बडिवणे. कुंठ (कुंड) खांडणे. वर्षावर्षि साळेच सुट्टीच वेळि अम्च मामाच कुटुंब अम्च घरांत डेरा बडिवतील॑. याच महिनाच धर्मा या पतोरि वापस त्यंच गामाला जाईनात॑.
Dikkiडिक्कि.n.collision.एकालेक बडींगणे.हैदेरबाद एर्पोर्टांतून घराला जात अस्ताना मझ लेंकीच टॅक्सीला मागेसून एक मातीच लोरि डिक्कि बडिवल॑. देवाच दया, आंगाला एक चूरपणीं घाव लागल॑ नाही.
Dinkडिंक.n.gum.गोंद. क्विक-फ़िक्स डिंकांत॑ कागद मात्र न्हो (नहो) वेगळ॑ कोण्त वस्तूपणीं चिकटीवाला होईल.
DinklaaDooडिंकलाडू.n.a gummy medicinal ladu given to post natal mothers.बाळंतीणांला द्याच एक लेह्य.
DivaNeडिवणे.vi.to be hit or dashed by head by an cow, bull, buffalo etc.गाय, बैल, मैश असल॑ प्राणि डोस्केवाटि आंगाला बडिवणे.रोडांत चालून जाताना एक मैश/म्हैश मागेसून मझ आजीला डिवले. चोखोट वेळ॑, अधीक घाव झाल नाही.
Doboorडोबूर.n.a tiny hole. perforation.एक ल्हान द्वारआंघोळि कराच "षवराच" डोबूर ल्हान असलतर॑ पाणींत असाच खार/मीठामुळे ते झांकून पाणि बरोर पडाच राहणे सहजचडोबरा in sm.
DoLeडोळे.n.eye.डोळे मझप्रकार॑ अम्हाला देव देलते पांच इंद्रीयांत॑ डोळेच पहिलच स्थानांतल॑.डोळा in sm.
DoLe baDivaNeडोळे बडिवणे.vt.to wink mischievously.चेष्टपणांत॑ डोळे मारणे.मी ल्हान असताना अमच शेजारि एक पोरि होति. तिला येणार-जाणार पोरांस पाव्हून डोळे बडिवणेम्हण्जे मजा होत-होत॑.
DoLe maarNeडोळे मारणे.vt.to wink mischievously.चेष्टपणांत॑ डोळे-बडिवणे.कोण्त पोरींस पाह्यलतरीन डोळे माराच स्वभाव तला होत॑. पण, एक दिवस चार पोरी मिळून तला धरून ध्वंस केलांपिरी ते स्वभाव अपाप राहूनगेल॑.
DoLelaa paaNee ghaaleengoon asaNeडोळेला पाणी घालींगून असणे.fig.to keep a watchful eye.श्रद्धानीशी सांभाळणे. श्रद्धानीशी पालन करणे.
Doliडोलि.n.palanquin.डोळि. पालखी. पल्लक (Tamil).
Doliडोलि.n.hammock.कापडाच झोळि. डोळि.
DoLiडोळि.n.palanquin.डोळि. पालखी. पल्लक (Tamil). जुन॑ काळांत थोर पैसावंत लोकांच बायके अग्गीन डोळींतच सवारि करत होते.
DoLiडोळि.n.hammock.डोलि. कापडाच झोळि.अम्हि ल्हान असताना साळेच उन्हाळाच दोन-तीन महिनेच सुट्टीच वेळि दिवसोडि घर्च मागपटीसच अंबाच झाडाच खाले बांधलते डोळींतच काळकांडत होतों.
DombLeडोंबळे.n.head.डोस्के.said sarcastically.डोंबल/डोंबलें in sm.
Domboorडोंबूर.n.a breach. a gap.डोंबुरा. छेद.
Domboorडोंबूर.n.a hole.डोंबुरा. द्वार. ओटे (Tamil).
Domboorडोंबूर.n.a cavity.डोंबुरा.
Domburaaडोंबुरा.n.a breach. a gap.डोंबूर. छेद.
Domburaaडोंबुरा.n.a hole.डोंबूर. द्वार. ओटे (Tamil).
Domburaaडोंबुरा.n.a cavity.डोंबूर.
DoNaaडोणा.n.a small cup usually made of dried leaf, used in olden days for serving a liquidy side dish like kheer etc.दोण. दोण्णे (Kannada). जुने काळांत खीर वगैरा वाढाला वाळलते पानांत केलते एक ल्हान वाटि. खीर, ऐस-क्रीम वगैरा डोणेंत देणे आहे. अत्तलीकडे "प्लास्टिक" डोणा उपयोग होत आहे. तज बद्दल कागदाच दोणेला "प्लास्टिक" कोटिंग देऊन ("प्लास्टिक" लिंपलत॑) उपयोग करलतर उण॑ "प्लास्टिक" वेच होईल॑.दोण is the प्राकृत form of द्रोण, which in Samsrkth means 'a tub'.
Dongoorडोंगूर.n.mountain.पर्वत.भूलोकाच सगळच्यांपक्षा उंच डोंगूर हिमालया भारताच उत्तर भागांत आहे.डोंगर in sm.
Dongoorडोंगूर.n.hill.एक ल्हान पर्वत.बंग्ळूराच जवळ असाच "नंदी-हिल" डोंगूराला जाम॑ म्हणजे, शनिवार अणी अयितवार हे दोन दिवसीन जाताने. कां म्हणजे, ते दोन दिवसीन तिकड॑ भयंकर गुंप असल॑.डोंगर in sm.
DonkaavaNeडोंकावणे.vt.to peep. to peep into.गळा लांब करून पाह्णे. डोकावून पाह्णे"अगे, शेजारल॑ घरची अम्ही अस्कीन बसून बोलत असताना दोन-तीन दपा डोंकावली. तिला कायतरीं पह्जेकी कायकी, विचार॑". डोकावणे in sm.
Doskeडोस्के.n.head.डोई.अफघानिस्थानांतल॑ तालिबान लोक॑ अमेरिकाच पत्रकार डानियल पेर्ळ यांच डोस्के कापाच "वीडियो" प्रचार करून त्यंच दुष्ट अणि क्रूर स्वभाव पूरा भूलोकाला दाखिवले.
Doske baDeengaNeडोस्के बडींगणे.id.to bemoan out of frustration.निराशा दाखिवणे.दुर्भाग्यांत बुडून बसलोहें म्हणून डोस्के बडींगत होता मझ॑ मित्र. कायरे म्हणून विचारताना कळ्ळ॑, दहा-दहा रुपेच शंभर लोट्टरी टिकट घेऊनपणीं एकालीन काहीं मिळ्ल॑ नाही म्हणून !
Doske halivaNeडोस्के हलिवणे.id.to agree without thinking.योचना करनास्क॑ संम्मत करणे.काय सांगट्ल तरीन डोस्के हलिवतो. स्वंत बुद्धी नाही वाटते तला.
Doske kareengaNeडोस्के करींगणे.vt.to have a hair cut.डोस्केच केंस कापींगणे. हजामाकडे जाणे.अम्च॑ गामाला आलते नव॑ हजामकडे मझ॑ लोंकाला डोस्के-करींगाला पाठिवलों. पाप, उंदीर चावलत्यास्क॑ इकडे-तिकडे कापून सोडलते पाव्हून हांसामकी रडामकी राग करींगामकी कळ्ळ नाही.
Doske khaajeengaNeडोस्के खाजींगणे.id.to be puzzled.प्रश्न विचित्र होऊन दिसणे.तो एक कार्यालीं प्रयोजन नाहीते मनुष म्हणून मला तम्हाच कळल॑. कायतरीन काम कराला सांगटलतर॑ एकीं कळनास्क दोस्के खाजींगून होठाकल॑ (ओठाकल॑).
Doske khaajeengaNeडोस्के खाजींगणे.id.to display sheepish and subservient mentality.उणीवताच स्वभाव दाखिवणे.केलते चूक दूसरांस॑ कळूनगेले म्हणून अग्गिदनांचीं समोर तो दोस्के खाजींगून होठाकला (ओठाकणे).
Doske khaale hoTHaakNeडोस्के खाले होठाकणे.id.to put in all methods to attain results.सर्वत्र प्रयत्न करणे. डोस्के खाले ओठाकणे.तला वारसाच आस्त भरून होत॑. पण ते बरोर पाह्यींगनाते-करतां सगळीन कोण-कोणकी बडींगून गेले. अत्ता डोस्के खाले होठाकल तरीन तला ते काहीं मिळाल जात नाहि.
Doske khaale oTHaakNeडोस्के खाले ओठाकणे.id.to put in all methods to attain results.सर्वत्र प्रयत्न करणे. डोस्के खाले होठाकणे.डोस्के खाले ओठाकल तरीन तला ते काम मिळाला जात नाही. तज पक्षा षाणे लोके भरूनदन॑ आहेत॑.
Doske phiraNeडोस्के फिरणे.vi.to feel giddy.डोस्केच चक्कर होणे.डयबीटीस असणारांस॑ बरोरल॑ वेळी कायतरीन खाल्लनाहीतर॑ भूकामळे डोस्के फिराला आरंभ होईल॑.
Doske phiraNeडोस्के फिरणे.id.to become haughty.डोस्के फुगणे. दुरहंकारि होणे. मस्ति धरणे.असलास्क-असून तला कोठसूनकी भरून पैसा मिळ्ळ॑ म्हणून अता डोस्के फिराला आरंभ झालाहे. एवढ दिवस तज बरोर होतते लोकांस पाह्यलतर॑ पणीं फिरून पाह्याला तय्यार नाहीस्क॑ हिंडत आहे.
Doske phoDingaNeडोस्के फोडिंगणे.id.to worry no end. to break your head.फार योचना करणे.तो एवढ॑ दिवस अवघडास्क हिंडत होता. अत्ता ते अग्गीन सोडूनटाकून कस॑ चोक्कोट नाव घेणे म्हणून डोस्के फोडींगत योचना करत आहे.
Doske phugaNeडोस्के फुगणे.id.to become haughty.डोस्के फिरणे. दुरहंकारि होणे. मस्ति धरणे.थोड दिवसापसून तला काय झाल म्हणून कळत नाही. लोंकाला चोक्कोट काम मिळ्लत॑ असूयाकी कायकी, कोणाला पाह्यलतरीन उजंड गर्वांत अस्तो. तला डोस्के फुगलाहे.
Doske pichchingaNeडोस्के पिच्चिंगणे.id.to go crazy. to go nuts. become disgusted. become desperate. to be at one's wit's end.काय कराच म्हणून योचना करींगून मनाला फार तंटा वाटणे.त्यंच लेंकीला कित्ति सांगूनपणीं तिन॑ बाहेर गामाच नवराच पह्जे म्हणून बसलि आहे. तिज हट्ट पाव्हून तेना डोस्क पिच्चिंगास्क आहे म्हणत होते.
Doske sooLडोस्के सूळ.n.head ache.डोस्के दुखाच॑. डोस्केला होयाच/याच वेदना.कित्येकदपा पोटांतल॑ वायूमळेहीं डोस्के सूळ येऊया. थोडक॑ उणु पाणी पीलतर॑ ते बरोर होईल.
Doske sooLडोस्के सूळ.fig.a chronic problem.एक निरंतर॑ प्रश्न.रिकामांत बसल्होतते तला आश्वास द्या करतां कोणाला कोणाला पाह्यलतर॑ एक काम मिळल म्हणून मी सांगट्लों. अत्ता कसतरीन एक काम करून द्या म्हणून मझ॑ मागेच पडलाहे. बरोरल॑ डोस्के सूळ झालाहे तो मला.
Doske var basaNeडोस्के व॑र बसणे.id.to boss over. to dictate terms.दुसरेंच व॑र अधिकार दाखिवणे.कामवालांना ठिवलत ठिकाणि ठिवाम॑ म्हणून एक अभिप्राय आहे. कां म्हण्जे, अधिक प्रेमान॑ वागलतर॑ तेनि अम्च डोस्के वर बसतील॑.
Doske varoon jaaNeडोस्के वरून जाणे.id.to fail to understand. to be mystified.समजनास्क॑ असणे.मी एक ल्हान "जोक" सांगट्लों तला, पण तज तोंडांत हांसूच लक्षण पणीं नाही. मी सांगट्लते तज डोस्के वरून गेल॑ वाटते.
Doyeeडोई.n.head.डोस्के. डोंबळे.डोके/डोंबल in sm.
Dubakiडुबकि.n.a dip or plunge (in water).पाणींत॑ बुचकळणे.
Dukkara~डुक्कर॑.n.pig. sow.डुक्र॑. वराह.गलीज जास्ति असाच ठिकाणी डुक्कर॑ असल॑.डुक्कर in sm.
DukLiडुक्ळि.n.a nod (during a nap while sitting).(बसून झोंपि जाताना) डोस्के अपाप झुकून पडाचदुपारच जेवण झालांपिरि मला जाग॑ राहणे म्हणजे थोर कष्टच. ते वेळी कॉळेजांत॑ पह्यिलच पंक्तींत बसलसलतरीन मी डुक्ळि देत असन॑.डुकली/डुलकी in sm.
DukLiडुक्ळि.n.a very brief nap.एक ल्हान झोंप.दुपारा मला झोंप येईना. दोन निमिष डुक्ळि देलतर॑ पुरे, हायशी होऊनजाईन॑.
DukLi deNeडुक्ळि देणे.vt.to nod during a nap while sitting.बसून झोंपि जाताना डोस्के अपाप झुकून पडणे.
Dukra~डुक्र॑.n.pig. sow.डुक्कर॑. वराह.डुक्राच मांस खाणे इस्लाम धर्मांत निषेध म्हणून सांगतात॑.डुक्कर in sm.

No comments:

Post a Comment