Sunday, May 15, 2016

d (द) 2 (deerghasvar to dwitheeyaa)




.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
de*vदेंव॑.n.dew.देम॑. हीमामळे होयाच पाणीच ल्हान ल्हान बूंद. अणोदी सूर्य उदय होयाच पुढे जमीनांतून देंव॑ व॑र याच वेळ उदंड हिंस असेल॑.दव/दंव in sm.
de*vhaaLaaदेंव्हाळा.n.misty conditions.देमाच वातावरण. देम्हाळा.
dehदेह॑.n.body. आंग.समुद्र वलांडून लंकापुरीला जायाच पुढे हनुमंत त्यंच देह फार मोठ करले.
dekhanaaदेखना.n.not seen. vanished.डोळेला दिसनास्क॑ होणे.
dekhaNeदेखणे.vt.to see.प्हाणे.
dema~देम॑.n.dew.देंव॑. हीमामळे होयाच पाणीच ल्हान ल्हान बूंद;अरुणोदी सूर्य उदय होयाच पुढे जमीनांतून देम॑ व॑र याच वेळ उदंड हिंस॑ असल॑. दव/दंव in sm.
demhaaLaaदेम्हाळा.n.misty conditions.देमाच वातावरण. देंव्हाळा.
deNageeदेणगी.n.a reward or a gift to one who has rendered a service or any gratification. सेवा, नाहीतर॑, उपयोगाच काम केलत्यांस द्याच आहेर.जुने काळांत, म्हणजे अम्च॑ आजा, पणजाच काळांत घरच काम कराला भरून कामवालेहीं कामवालीहीं होते. त्यांस महिना महिना धर्मा द्याच बद्दिल देणगी देत होते.
deNeदेणे.vt.to give.देवूनठाकणे. अर्पणा करणे.कोणालातरीन, दान द्याच असलतर॑ मन्न उघडून पूरा संतोषांत देणेच चोखोट.
deNe gheNeदेणे-घेणे.n.financial dealings. पैसाच व्यवहार॑.ते भाऊ-भावंडे मध्ये कायकी मनस्थाप झालाहे वाटत॑. अत्ता त्यंच मध्ये देणे-घेणे काहीं नाही.
denTHदेंठ.n.stem or stalk by which the fruit or flower hangs from the plant. पंडु अथवा फूलाच देठ. देट. बिब्बाच फल म्हणून अम्हाला वाटच, खर होऊन तज देंठ आहे.
derदेर.n.husband's younger brother.दाल्लाच धकटा भाऊ. मझ॑ बहिणीला दोन देर आहेत्यांत एकले बंगळूरांतीन अण्कीएकले अमेरिकांतीन आहेत॑.दीर in sm.
deshदेश.n.country. nation. राज्य.अम्च॑ देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाल॑.
deshaabhimaaneeदेशाभिमानी.adj.a patriot. देशभक्ति असणार.भारताच स्वातंत्र समराच वेळी देशभक्ती आधार करून सुब्रमण्य भारती तमिलांत॑ भरून कविता लिव्हले. तेनी एक श्रेष्ट देशाभिमानी होते.
deshaabhmaanदेशाभिमान॑.n.patriotism.देशाच वर दाखिवाच अभिमान॑.स्वंत देशाच व॑र देशाभिमान नाहीते मनुष, स्वता तज व॑रच अभिमान नाहीते मनुष म्हणूनच सांगाम॑.
deshaachaarदेशाचार.n.customs and manners of a province.एक प्रांतात आचरण कराच पद्धती.भारतांत अनेक प्रांत आहे अणी एक एक प्रांतांतीन त्यंच त्यंच देशाचार असत॑.
deshabhakthदेशभक्त.n.patriotic.देशाच वर अभिमान असण॑.तमिल कवी सुब्रमण्य भारती एक थोर देशभक्ट होते.
deshabhaktheeदेशभक्ती.n.patriotism.देशाच वर असाच स्नेह. तमिल कवी सुब्रमण्य भारती लिव्हलते देशभक्ती कविता अग्गीन आज पणीन उदंड लोकप्रीय आहे.
deshadrohदेशद्रोह.n.treason.देशाला कराच॑ द्रोह.अम्च॑ देशाच वायुसेनाच शेवटल॑ अध्यक्षाच व॑र देशद्रोहाच आरोपाच केस अत्ता होत आहे.
deshadroheeदेशद्रोही.adj.traitor.देशाला द्रोह करणार॑.शेवटीच मुगल साम्राट बहदूर शाह ज़फर यांस 1857च स्वातंत्र्य समराच नंतर॑ देशद्रोही म्हणून आरोप घालून देशभ्रष्ट करूनटाकले.
deshasthha~देशस्थ॑.n.a sub-cast of Tanjore-Maharastrian Brahmins hailing originally from Desh region in Maharashtra.महाराष्ट्राच देश प्रांतांतून आलते तंजावूर-महाराष्ट्र ब्रह्मणांच एक उप-वर्ग.महाराष्ट्रांत मुख्य होऊन दोन विध ब्राह्मण आहेत॑, समुद्राच कांठ प्रदेशांत राह्याच कोकणस्थ अणी देश प्रदेशांत राह्याच देशस्थ.
deshasthhaaदेशस्था.adj.a person belonging to the desastha sub-cast of Tanjore Maharashtriansदेशस्था वर्गांतल॑ एक व्यक्ति.तंजाऊराच मराठालोक पणीन तेनी देशस्थ आहेत म्हणून सांगींगतात॑.
desheeदेशी.adj.relating specifically to a country. indigenous to a country. एक देशाला संबंध झालते. भारताच अणु-आयुधाच (ॲटम-बॉबाच) मागे देशी "टेक्नोलजि" आहे म्हणून ऐकताना अम्हाला फार गौरवीं अभिमानीं वाटते.
desheeदेशी.adj.native to a country. home-grown. indgenous.देशाच आंतच झालते. एक प्रदेशाला मिळालते. गेल पन्नास/शंभर वर्षापसून अलोपती चिकित्सा प्रसिद्ध झालाहे तरीन, कित्येक रोगांला अमचेच देशी पद्धतांतच, म्हण्जे, आयुर्वेद वैद्यांकड गेलतरच बोरोर होईल.
desheeदेशी.adj.ethnic.एक प्रत्येक देशाच संस्काराला जोडलते. वर्षा-वर्षी अम्ही अमेरिकांतल॑ अमच लोंकाच घराला येणे आहे. तिकडे वेगळ॑ सौकर्य तेवढीन आहेतरीन सणाला पह्जते सामग्री सगळीन देशी दुकानांत विना वेगळ॑ कोठीन मिळना.
deTदेट.n.stem or stalk by which the fruit or flower hangs from the plant. पंडु अथवा फूलाच देंठ. देठ.फणस झाडांतून कापून तीन चार दिवस झालका नाहीका म्हणून कळाम म्हणजे तज देट पाह्यलतर॑ पुरे. तीन चार दिवस झालाहे म्हणजे देट वाळून असल॑.
deTHदेठ.n.stem or stalk by which the fruit or flower hangs from the plant. पंडु अथवा फूलाच देंठ. देट.झाडांतून फणस कापून समेच देठाच व॑र कागद गुंडाळून बांधून ठिवनातर॑ तजांतून पंढ्र रंगाच चिकटाच रस गळून पडल॑.
devदेव.n.God. भगवान.हंदू धर्माच प्रकार देवाला प्रार्थना करलतरीन ते अग्गीन एकच देवाला जाऊन पावल॑.
dev dinDदेव दिंड.collo.religious inclinations.देव भक्तीच स्वभाव. देव दिंड भरून असाच एक ब्राह्मण कुटुंबाच पोरी एक तुर्कडा पोराच बरोर पळूनगेली म्हणून मी हे जवळ ऐकलों.
dev disaNeदेव दिसणे.id.to be driven to one's wits end.पुढे काय करालीं सुचनास्क॑ होणे.बंगळूरांत कोण्तहीं सरकार ऑफीसांत जाऊन अम्च॑ काम कराम॑ म्हणजीनीं लांच देऊनच सराम॑ अणी अम्च॑ काम संपजोरी देवदिसूनजाईल॑.
devaalaya~देवालय.n.temple.देऊळ. देवस्थान. मंदिर. जीन धर्म आचरण कराच लोकांच देवालयांतपणीन अम्च॑ हिंदू देवांच विग्रह अस्त॑, पण ते नुस्त उपदेवतांत स्थानांत अस्त॑.
devabhaaShaaदेवभाषा.n.Sanskrit. संस्कृत भाषा.
devabhaktheeदेवभक्ती.n.devotion to God.देवाच वर दाखिवाच भक्ती. वेगळ॑ कोण्त नाहीतरीन परवा नाही, पण देवभक्ती असलतर॑ पुरे म्हणून मझ॑ आजी सांगतील॑.
devadaaruदेवदारु.n.cedar tree. a type of coniferous tree.सूंईंच आकारांत असाच पानाच वृक्ष. हिमालया पर्वाताच खालच॑ प्रदेशांत देवदारू वृक्ष भारून पाह्याला मिळल॑.
devadaaseeदेवदासी.n.a temple dancer.देऊळांत॑ नृत्य कराच कुलांतल॑ स्त्री. सरकाराच नियमाप्रकार देवदासी संप्रदाय राह्ते करलाहेतरीन अत्तापणीन कर्नाटकाच कित्येक जिल्लांत हे अनाचार संप्रदाय प्रचारांत आहे.
devalokदेवलोक.n.heaven. स्वर्ग.देवलोकांत तज स्थानाला वेगळ॑ कोणतरीन येतीलका म्हणून देवेंद्राला केम्हाहीं भें होत॑.
devanaagareeदेवनागरी.n.name of Sanskrit script.संस्कृत लिपीच नाव॑.देव अणी नागरी हे दोन शब्द मिळून देवनागरी झाल॑.
devapoojaaदेवपूजा.n.worship of God by a householder.गृहस्थ कराच देवाच पूजा.मध्व संप्रदायाप्रकार देवपूजा करताना साळिग्राम अभिषेक करणे आहे.
devaprathiShTaaदेवप्रतिष्टा.n.consecration of God's idol.विग्रहांत देवाला आवहन करून प्रतिष्टा कराच॑.वेलूर पटणांत असाच जलकंडेशर देऊळांत असाच शिवलिंगाला तुर्कडांच आक्रमाच वेळी बाहेर काढून भिरकवले अणी सुमार चारशें वर्ष ते देऊळांत पूजा झाल नाही. नंतर॑ इसई 1981 मार्च महिना सोळा तारीखला जलकंडेशराच शिवलिंग पुन्हा देऊळाच आंत देवप्रतिष्टा करले.
devasamaaraadhanaaदेवसमाराधना.n.a religious rite performed before a wedding or thread ceremony. वराड, मुंज॑ हेज बरोर जोडलते एक पद्धती. पोणावांटादनीन देवसमाराधना घरांतच करूनटाकून वराड अथवा मुंज छत्रांत करतात॑.
devasthhaanदेवस्थान.n.temple.देऊळ. देवालय. मंदिर.अत्ता अग्गीन अमेरिकांत हिंदू देवस्थान भरून ठिकाणी आलत्यामळे अम्च॑ धार्मिक कार्यक्रम कायतरीन तिकडे करिवाला थोडकीन प्रयास नाही.
devathaaदेवता.n.Goddess. देवी.केरळ संस्थानांत भरून ठिकाणी, प्रत्येक होऊन ग्राम प्रदेशांत देवतांच देऊळ पाह्याला मिळल॑.normally a lesser god.
deveeदेवी.n. Goddess. स्त्री शक्तीदेवी. देवता.बादामींत असाच बनशंकरी देवीच अम्च॑ कुलदेवता.
deveeदेवी.n.small pox.वसूरी.एकदपा देवी आलत्यांस पुन्हा अण्कीएकदपा येईना.
devgharदेवघर.n.a room in a house where Gods are worshipped. पूजाच खोली. देवघर नीट लक्षण होऊन असलतर॑ घर पणीं लक्षण होऊन असल॑.
devkaarya~देवकार्य.n.activities connected with worship of God.देव निष्टा.मझ॑ सासरा पाष्टे देवकार्य करले विना वेगळ॑ काहीनच करनात॑.
devooLदेऊळ.n.temple. देवस्थान॑.अम्च॑ घराच जवळ वेंकटरमणाच॑, गणपतीच॑, आंजनेयाच॑, श्रीरामाच॑, ईश्वराच॑ अस पांच देऊळ आहे.
devoon THivalatheदेवून-ठिवलते.met.said of a person or a thing marked for good tidings or of good fortune etc.भाग्याच अनुग्रह असणे (अस अर्थ)तो एक देवून ठिवलते मनुष म्हणून सांगुया. कां म्हण्जे, तीन दपा काम गेलतरीन, समेच तला तीन नव-नव काम मिळ्ले !of Tamil origin (कुडुत्तु-वैततु).
devuDaaदेवुडा.n.God. देव.अरे देवुडा ! तू अस करशील म्हणून मझ॑ मनांत थोडकपणीन होत नाही.normally used as an exclamation corresponding to "Oh my God!"
diD-diDदिड-दिड.n.hurry-burry.दिडीर. दिड-दिडशी मला काय तरीन प्रश्न विचारल तर॑ एकदम मला उत्तर द्याला होईना.from Tamil.
diDeerदिडीर.n.immediate. sudden. तक्षण॑. शीघ्र.पाष्टे लोक्कुर-लोक्कुर ऑफीसाला पळामते लोके "एम.टी.आर"च॑ दिडीर इड्ळग॑, धिरडे, उप्पिट असलते पदार्थ केम्हाहीं घरांत ठीवींगून असतील॑. from Tamil.
diDeerasheeदिडीरशी.adv. immediately. urgently.दिड-दिडशी. तक्षणांत॑. शीघ्रांत॑. कोठतरीन वेगळ॑ गामाला दिडीरशी जाम॑ म्हणून असाच लोकांस ट्रेनांत टिकट मिळाला कष्ट होईल म्हणून भारतीय-रेल तत्काल टिकट विकतात॑.from Tamil.
digambarदिगंबर.n.Jain munis of a particular sect who do not wear any cloth. नावगेंत॑ असाच संप्रदायाच जीन मुनीं.हे एकवीसां शतकांतपणीं नावगेन (नागवेन) असणार दिगंबर जीन मुनी आहेत म्हणून योचना करलतर॑ आश्चर्य वाटते.
digbhrama~दिग्भ्रम.n.state of shock leading to not knowing where to turn to.भ्रम॑. कर्ज/रीण देलते पठान घरांत घूसाच पाव्हून मझ॑ मित्राला दिग्भ्रम होऊन आंग पूराहीन घामांत निथळाला आरंभ झाले. from दिक् and भ्रमण.
digvijayदिग्विजय.n.conquest of all world.भूलोक पूरा जिंतणे.पुरातन ग्रीसाच राजा अलक्सांडर दिग्विजय कराच श्रमांत त्यंच पूरा जीवन अर्पणा करले.
dikदिक्.n.direction.दिशा.सूर्यनमस्कार पूर्व दिक् पाव्हूनच करणे, कारण तिकडून सूर्य उदय होत॑ म्हणून.
dinasदिनस.n.variety of wares or commodities. जिनस. वेगळ॑-वेगळ॑ रीताच व्यापारच साधन॑.अम्च घराच जवळ उघडलते नव॑ कापडाच दुकानांत॑ भरून दिनसाच सारी आहे.जिन्नस in sm. An example of inter-use of द and ज in DM.
dinDदिंड.n.pith of a plant.दिंड.केळीच झाडाच आंतल भागाच दिंडांत॑ भरून नार असाकरतां ते डयबीटीसाला उदंड चोखोट म्हणतात.
dinDaaदिंडा.n.a narrow gateway.एक ल्हान दार.अंगणांत असाच तुळसी ब्रिन्दावनांत॑ अमच॑ अम्मा पूजा करताना अम्ही लेंकरे दिंडाच बाजूच॑ अडभिंताच व॑र बसून ते पाह्त असुवों.usually referred to a gateway to the अंगण in the house.
dinDaaदिंडा.fig. an expression for an uncouth person.एक हिरवट मनुष.मझ बाप वरडतील॑, "हळ्ळु पाव्हून काढींगून जा, तू काहीं दिंडा न्हो".
dirvaaNदिर्वाण.n.a small dish shaped lamp of brass or silver lit with a wick in front of God.देवाच समोर लावाच एक ल्हान वाताच दिवा. तूप-तेलाच मोल जास्ती होतां-होतां दिर्वाणाच आकार पणीं ल्हान होऊन येत आहे. अगाऊ रुपेच दिर्वाण लावणार अत्ता पित्तळाच/स्टीलाच लावतात॑. an iron one is lit for "Saneshwara".
disaNeदिसणे.vi.to be visible.दृष्टीला पडणे. डोळेवाटी पाह्याला होणे.दोन दिवसापसून असाच वांबाळामळे उद्याच सूर्य ग्रहण दिसणे संशयच॑.
dishaaदिशा.n.cardinal direction.दिक्.भारताच दक्षिण दिशांत कन्याकुमारी पसून अन्टार्टिका भूखंड पर्यंतीन हंदु महासागरांत॑ कोंण्त द्वीपीन नाही.
disoon-disanaaska~दिसून-दिसनास्क॑.u.(seemingly) unseen. (seemingly) undetected.लप्पून-चुपून. प्रत्यक्ष दिसनास्क॑. कोणालीन दाखिवनास्क॑. uisते पोर अण्खी पोरी दिसून-दिसनास्क॑ मिळत आहेत वाटते. कारण, वराडाच गोष्ट काढलतर॑ तो सांगतो "बापा, मी वर वाचाम॑. अत्ता काहीं अवसर नाही. दो-तीन वर्षा नंतर पाव्हुमणे".
divaaदिवा.n.lamp.उजाडाकर्तां लावाच दिवा. संध्याकाळी सूर्य अस्तमन होयाच पुढे देवघरांत दिवा लावून एक दोन श्लोक सांगाला अम्च॑ अम्मा शिकिवलते दंडक अत्त पर्यंतीन अम्ही सोडलों नाही.
divaaदिवा.n.light.उजाड॑.दिवा अस्ताना, म्हणजे, सूर्यास्तमन होयाच पुढे जाऊन येणे म्हणजे जा. अंधारांत मात्र पर्तून येनोको.
divaa laavaNeदिवा लावणे.vt.to light a lamp. to put on a light switch.समी लावणे. दिवा घालणे.दिवा लावलांपिरि सुईं(सूंईं) दोरा ओवताने, फडकी शिवताने अस॑ सांगणे आहे.
divaakarदिवाकरsun.सूर्य.
divaalदिवाल.adj.bankrupt.रीणांत बुडलते. दिवाळि झालते.असाच चोखट काम सोडूनटाकून बिसिनसांत उतरून पूरा बंडवाळीन हाळ करून अत्ता दिवाल होऊन बसलाहे तो.
divaaLeeदिवाळी .n.bankruptcy.रीणांत बुडलते अवस्था.अमेरिकाच अत्तच॑ प्रेसिडेन्ट तीन-चार दपा दिवाळीला अर्जी देलते मनुष म्हणून सांगतात॑.
divaanदिवान.n. prime minister of a kingdom.एक राज्याच प्रधानमंत्री/मुख्य अधिकारीमझ॑ आजाच आजा त्रावनकोर संस्थानांत दिवान म्हणून होते.
divalaavaNeदिवलावणे.n.a small shallow receptacle or container for an oil-lamp with wick.तेल अणी वाताच एक ल्हान पात्र अम्च॑ घरच॑ पूजा सामग्रींत दिवलावणे मात्र नहोत॑ म्हणून मझ॑ आजा एक दिवस त्यंच घरांतून ते आणून देले.
divasदिवस.n.a full day of 24 hours.चोवीस घंटेच एक पूरा दिवस.मझ॑ सासूबाई हॉस्पिटलांतून अम्च॑ घराला आलांपिरी अम्ही त्यास बरोर पाह्यींगाला म्हणून पूरा दिवसाला म्हणून एक नर्साला ठिवलों.
divasदिवस.n.day time from sun rise to sun set.सूर्य उदय होवून अस्तमन॑ होयापर्यंतले वेळ॑.मझ॑ सासूबाई हॉस्पिटलांतून अम्च॑ घराला आलांपिरी अम्ही त्यास बरोर पाह्यींगाला म्हणून दोन नर्सांस ठिवलों, एकले पूरा दिवसाला अणी अण्की एकले पूरा रात्रीला म्हणून.
divasदिवस.n.date.तारीख. महिनांत॑ एक प्रत्येक दिवसच क्रमांक.आज कोण्त दिवस, दहाका नाही अक्राका ?
divasaaदिवसा.decl.every day.प्रति दिवस. दिवसास्क॑.अम्च॑ घरच॑ बंडी पुसाला दिवसा येत होतते पोर एक दिवस मला विचारनास्क॑ बंडी काढींगून कोठकी फिराला गेला.
divasaa divaseeदिवसा-दिवसी.n.(through) each and every day.सोडनास्क॑ दरएक दिवसीं. सोडनास्क॑ एक-एक दिवसीं. दिवसास्क॑. दिवसा-दिवसी ते-ते दिवसाच पाठ शिकलतर॑ परीक्षाला वाचाला जास्ति श्रम होईना.
divasaalaaदिवसाला.decl.per day.प्रति दिवसाला. पोट बर॑ नाहीस्क असताना डोक्टर मला ओखदाच मात्रा लिव्हून देऊन, दिवसाला एक मात्रा दोन वाराला खायाला/गिळाला म्हण्ट्ले.
divasaan divasदिवसान-दिवस.n.for days together.सोडनास्क॑ भरून दिवस. दिवसोडी.दवसान-दिवस अम्च॑ घरच॑ समोरल॑ बागाला येत होतते माकडाच गुंप एक वारापसून कां आल नाही म्हणून विचारताना कळ्ळ॑, कॉरपरेशनाच माकड धरणार लोके तला अग्गीन धरींगून गेले म्हणून.
divasaaskदिवसास्क॑.decl.each an every day (without fail).दिवसा-दिवसी सोडनास्क॑. दिवसोडी.दिवसास्क॑ एक घंटे योगाभ्यास केलतर॑ आंगालीं मनालीं फार चोखोट म्हणून सांगतात.
divasbharदिवसभर.n.through the day.पूरा दिवस. अम्च गांमांतल॑ देऊळांत॑ वर्षा-वर्षी होयाच तीन दिवसाच उत्सवाला अम्च घरांतून एक दिवसाच पूजाच वेच चुकनास्क देण॑ आहे. ते दिवस घरच लोके तेवढदनीं दिवसभर देऊळांत राहून पूजाकार्यक्रम पूरा पाह्ण॑ आहे.
divasoDeeदिवसोडि.n.every day.दिवस सोडनास्क॑. प्रति दिवसीन.(1) अम्च घरांत जेवताना दिवसोडि तळलते पापड अस्ते. (2) अम्च घरांत॑ आलतर॑ काहितरीन मिळेल म्हणून कळींगून तो म्हातारा भीकारी दिवसोडि येत अस्तो.
divason divasदिवसों दिवस॑.n.(on a) day-by-day (basis).एक-एक दिवसास्क॑. दिवसोंदिवसी सामानाच मोल वाढत असामळे केलते कामाला तम्हा-तम्हा धर्मा घेणार कामवालांस॑ त्यंच कुठुंब सांभाळणे/चालिवणे फार कष्ट झालाहे.
divaTeeदिवटी.n.a torch of oiled cloth wound around one end of long stick.लांब काठीच अग्र भागांत॑ तेलांत भिजिवलते कापड गुंडाळलते दिवा.अगाऊच काळांत दिवटी वापरत होते तरीन, अत्ता अग्गीन तज बद्दिल पेट्रोमॅक्स दिवा वापरतात॑.from Tamil तीवेट्टी. In olden times this was used during night processions or pageants.
divatheeदिवती.n.a goddess worshipped on the sixth day of a childbirth.जिवती. लेंकरु उजून सहा दिवस होताना पूजा कराच देवीच नाव. 1.श्रावण महिनेंत प्रति शुक्रावारांतीन लेंकरांच क्षेमाकरतान दिवती देवीला पूजा करणे आहे. 2.दिवती पार्वतीदेवीच अंश म्हणून विश्वास आहे.the correct name of the Goddess is जिवती, but as one more example of inter-use of ज and द, दिवती also has gained currency in DM.
divatheeदिवती.n.a protective amulet or talisman tied around the neck of a six day old infant, after propitiating Goddess Divathee.जिवती. सहा दिवसाच लेंकरूच गळांत पूजा करून बांधाच दिवती देवीच टांक. दिवती गळांत अडकिवलते लेंकरास अपमृत्यु होईना म्हणून विश्वास करतात॑.
divatheepoojaaदिवतीपूजा.n.a pooja performed for propitiating Goddess Divathee on the sixth day of childbirth. जिवतीपूजा. लेंकरु उजून सहा दिवस होताना जिवतीदेवीला कराच एक पूजा. अम्च॑ घरांत दिवतिपूजा कराच दंडक नाही.
divya~दिव्य.adj.divine.दिव्य.हिंदू धर्म आचरण करणार लोके तुळसी झाड दिव्य झाड म्हणून सांगतात॑.
divyadriShTeeदिव्यदृष्टी.n.divine vision.श्रेष्ठज्ञानामुळे पुढे होयाच कळणे. ज्ञानदृष्टी.त्यंच दरिद्रपणांतून सुटालस कायतरीन सहाय मिळल म्हणून कुचेला श्रीक्रिष्णाला जाऊन पाह्यलेतरीन देवाला पाह्यलते संतोषांत तेनी काहीं विचारल नाही. पण कुचेलाच आग्रह श्रीक्रिष्णला त्यंच दिव्यदृष्टीमळे कळ्ळ॑.
divyadriShTeeदिव्यदृष्टी.n.occult power of seeing future events.ज्ञानदृष्टी.त्यांस दिव्यदृष्टी आहे म्हणून लोकांस भें दाखिवून स्वाधीनांत ठिवाच कपट-सन्यासीलोके अम्च॑ देशांत भरूनदन॑ आहेत॑.
divyajnyanदिव्यज्ञान.n.divine knowledge.दिव्यज्ञान॑. स्वामी विवेकानंदाच बाल्यकाळ नाव नरेंद्रनाथ दत्ता म्हणून होत॑ अणी तेनी रामक्रिष्ण परमहंसाला पह्यिलंदा मिळतानाच रामक्रिष्णाला त्यंच दिव्यज्ञानामळे कळून गेले, हे पोर एक थोर महान होईल म्हणून.
divyashaktheeदिव्यशक्ती.n.supernatural power.दिव्यशक्ती.श्री राघवेन्द्रस्वामी त्यंच दिव्यशक्ती भरून लोकांस दाखिवलाहेत॑. ह्यांत ईस्ट-इंद्या कंपनीच सर तोमस मंन्रो यांस दर्शन देलते विषय मद्रास फोर्ट सेन्ट जोर्जा इकडल॑ गज़ेटांत प्रसिद्ध झालते अम्हास कळल॑.
doDkeeदोड्की.n.ridge gourd.एक रीतच भाजी-पाला दोड्कींत विध-विध पदार्थ करताततरीन मला दोड्कीच चट्णीच फार अवडाच॑.दोडका in sm.
dogheदोघे.pron.two people.दोन लोके. दोघदन॑. दोघजण॑.स्कूटरांत नियमाच प्रकार दोघे बसूया म्हणून असलतरीम, भरूनदपा तीघे बसून जायाच मी पाह्यलाहें.
dogheenदोघीन.pron.both people.दोघे दनीं. दोन लोकीं.सिनिमाला जाऊयाका म्हणून मी ते दोघ्यांसीन विचारताना, पह्यिले येत नही म्हणून सांगून, नंतर॑ दोघीन येतों म्हणट्ले !
donदोन.n.two.एकाच नंतरल॑ संख्या.स्वातंत्राच नंतर॑ ब्रिटीश-इंद्या भारत अणी पाकिस्थान अस॑ दोन वेगळ॑ वेगळ॑ देश झाल॑.
donheenदोन्हीं.pron.(including) both of them.दोन्हीं भारताच राष्ट्रगीत अणी बंग्ळादेशाच राष्ट्रगीत, हे दोन्हीं रबींद्रनाथ ठागोर हेनीच लिव्हलते.दोन्ही in sm. used in relation to items and non-humans. When people are involved the word is दोघीं.
doNNeदोण्णे.n.a small cup usually made of dried leaf, used in olden days for serving a liquidy side dish like kheer etc.डोणा. दोण्णे (kannada). जुने काळांत खीर वगैरा वाढाला वाळलते पानांत केलते एक ल्हान वाटि. uisखीर, ऐस-क्रीम वगैरा दोणेंत देणे आहे. अत्तलीकडे "प्लास्टिक" दोण उपयोग होत आहे. तज बद्दल कागदाच दोणेला "प्लास्टिक" कोटिंग देऊन ("प्लास्टिक" लिंपलत॑) उपयोग करलतर उण॑ "प्लास्टिक" वेच होईल॑.दोण is the प्राकृत form of द्रोण, which in Samsrkth means 'a tub'.
donsheदोनशे.n.two hundred.शंभर गुणा दोन.मराठांच तंजाऊर राज इसई 1675 पसून 1855 पर्यंत होत॑, म्हणजे, दोनशे वर्षाचपक्षा वीस वर्ष उणे.
doodhदूध.n.milk. क्षीर॑.म्हैशीच दूधाच पक्षा गाईच दूध आंगाला चोखोट म्हणून ल्हान लेंकरांस ते देणे आहे.
doodh bhompaLaaदूधभोंपळा.n.bottle gourd. शोरेकाई (Tamil).चप्पातीच बरोर खायाला दूधभोंपळाच कोफ़्ता-करी बेष असल॑.
doodhkeLa~दूधकेळ॑.n.custard apple.सीताफळ. जास्ती पिकलत॑ दूधकेळेच चिप्पा इकड॑-तिकड॑ फुटून असते म्हणून खायाच पुढे ते बरोर धुवांव॑ (धुवाम॑).
doodhpedhaaदूधपेढा.n.a sweet preparation made of condensed milk. दूधांतूं केलते एक गुळ्चीट पदार्थ.धारवाड पटणांत मिळाच दूधपेढा "मिश्रा पेढा" भरून दुकानवाले करून विकाकरतां हेजांत कोण्त असली कोण्त नकली म्हणून कळींगणे कष्ट झालाहे.
doodhvaalaaदूधवाला.n.milkman. दूध विकणार॑.दिवसोडि अम्च घरांत दूध घालाच दूधवालाला अम्ही वारा-वार इषोब करून पैसे देऊनटाकतों.
doorदूर.adv.afar.दूर.बंगळूरांतून हैदराबाद किती दूर आहे ?
doordriShTeeदूरदृष्टी.n.foresight.पुढे होयाच कळणे. कोण्ततरीन एक प्रकल्प हाती काढलतर॑ ते कस पुढे प्रयोजन होईल म्हणून कळींगाच दूरदृष्टी असलतरच ते काम सार्थक होईल॑.
dooroonदूरून.adv.from far.दूर असून. दूर्सून. दूर ठामी कडून.एक घंटेच आंत मला येऊन पाह्तो म्हण्टला तरीन उदंड दूरून येमतेमळे बरोरल॑ वेळेला येईलकी नाहीकी म्हणून मला संशयच॑.
doothदूत.n.emissary. envoy.प्रतिनिधि.रामायणांत युद्ध आरंभ होयाच पुढे बालीच लोंक अंगदाला श्रीराम रावणाकडे त्यंच दूत म्हणून पाठिवले.
doraaदोरा.n.thread.दोरी.पतंग उडिवाला गोंदीन पूड करलते अर्साहीं मिळिवलते मांजा दोरा वापरणे आहे.
doraaदोरा.n.a type of amulet made of thread worn after performing certain poojas by Hindus. by women.कित्येक पूजा झालव॑र हातांत बांधाच दोराच कांकण. अनंतवृत करलानंतर॑ हातांत तंबड रंगाच दोरा बांधणे आहे.
doraleeदोरली.n.a veriety of greenish thorny brinjal, used in ritually pure cooking.सोवळेच संपाकांत याच एक विधाच वांगी. हिरव॑ रंग अणी कांटा असाच वांगी. दोर्ली.मी दोरलीच वांगी पाव्हून उदंड वर्ष झाल॑.
doreeदोरी.n. thread.दोरा.डोळे बरोर दिसनाते लोकांस सूंईंत॑ दोरी ओवून कापड शिवाला प्रयास होईल.
dorleeदोर्ली.n.a veriety of greenish thorny brinjal, used in ritually pure cooking.सोवळेच संपाकांत याच एक विधाच वांगी. हिरव॑ रंग अणी कांटा असाच वांगी. दोरली.दोर्ली अत्ता जस्ती मिळतनाहीतरीन, सोवळेला याच वादिराजगुल्ला म्हणून मंगळूरांतांतून याच अण्कीएक विधाच वांगी मिळते.
doShदोष.n.sin.पाप.अनावश्य होऊन दुसरेंस आरोप करलतर॑ अम्झाला दोष येईल.
doShदोष.n.blemish. imperfection.उणीवता.ते पोरीच जातकांत॑ कायकी दोष असाम॑. तज बरोर कोण्त पोराच जातकीं मिळून येत नाही.
doShaaropदोषारोप.n.false accusation.लटके आरोप.अनावश्य होऊन दुसरेंच व॑र दोषारोप सांगट्लतर॑ अम्झाला पाप मिळल॑.
doSheeदोषी.adj.guilty.दोष केलत्याला आरोप झालता.दोषी म्हणून मृत्युदंड मिळ्लते ते मनुष एक निरपराधी म्हणून नंतर कळ्ळ॑.
dowDivaNeदौडिवणे.vt.to chase away.भरड पळिवणे. दवडिवणे.लंगडा म्हणून लटक॑ सांगून देऊळाच समोर भीकमागत होतत्याला गावांच लोके तिकडून दौडिवूनटाकले.
dowDivaNeदौडिवणे.vt.to drive a vehicle etc.भंडी वगैरा पळिवणे. बंडी बेष दौडिवाला कळल म्हणून सांगून अम्च॑ घराला ड्रैवराच कामाला आलत्याला बंडी पळिवाच लैसन्स पणीन नाही म्हणून कळ्ळकीनाही बेष हाक्कामारून / शिवा देवून पर्तून पाठिवूनटाकलों.
draakSheद्राक्षे.n.grapes.एक गुळ्चीट फळ॑बीं नाहीते द्राक्षे बज़ारांत भरून आलांपिरी बीं असाच द्राक्षेच व्यापार फार उणे झालाहे.
draakSheद्राक्षे.n.khismis.वाळलत॑ द्राक्षे.देवपूजाच वेळी नेवेद्याला वेगळ॑ पंडू असलतरीन नसलतरीन नित्य अम्ही द्राक्षे ठिवतों.
dravद्रव.n.juice.रस॑.द्राक्षेच द्रव थोड दिवस तस्च ठिवलतर॑ ते अंबट होऊन दारू सार्ख होऊनजाईल॑.
dravद्रव.n.sap.कापलते वनस्पतींतून गळाच रस॑.कित्येक वनस्पतीच द्रव अम्च॑ आंगाला लागलतर॑ जळून फोड(व्रण) येईल.
dravद्रव.adj.liquidy.द्रवरूपाच पदार्थ.मेर्कुरी (पारा) एक धातू आहेतरीन, ते द्रव रूपांत असत॑.
driDha~दृढ.adj.firm.घट्टि. एक निर्णय काढलानंतर दृढ होऊन ते पालन करणे मुख्य.
driShTaanthदृष्टांत.n.example. उदाहरण॑.धर्म अणी सत्य कसं पालन कराच, हेला एक दृष्टांत पह्जे म्हणजे युधिष्टिराच जीवन पाह्यलतरं पुरे.
driShTeeदृष्टी.n.sight. डोळेवाटी दिसणे.पाष्टे उठलकी-नाही देवघरांत देवाच दृष्टी डोळेला पडणे चोखोट.
driShTee kaaDaNeदृष्टी काढणे.vt.to remove evil eye.ओवाळून दृष्टि परिहार करणे.लोकांच दृष्टी लागून वंगळ परिणाम होईनास्क असाला ल्हान लेंकरांस तम्हा-तम्हा दृष्टी काढणे आहे.
driShTee laagaNeदृष्टी लागणे.vi.to be afflicted with evil eye. अपशकुन लागणे.अम्च नातूच पह्यिलच उजलादिवसाला अग्गिदनांसीन बलावून बेष पार्टी करल॑ नंतर॑ आंग बरनाहीस्क झालत्याला कारण तला दृष्टी लागलतेमळेच म्हणून मझ॑ लेंक म्हणत होती.
driShTee laavaNeदृष्टी लावणे.vt.to apply a black mark (usually on the cheek of a child) as a preventive for evil eye.दृष्टि लागनास्क असाला (ल्हान लेंकरांच॑) गाळांत॑ काळ॑ डाग लावणे.ते लेंकराच गाळांत दृष्टी लावाला म्हणून एक माकडाच तोंड ओढून ठिवलते पाव्हून मला हांसू आल॑.
driShTee parihaarदृष्टी परिहार॑.fig.an object (usually ugly looking) used as a preventive for evil eye.दृष्टी लागनास्क असाला ठिवाच एक (विकार) रूप॑.कित्येकदन॑ घर नव होऊन बांधलांपिरी एक विकार विग्रहाला दृष्टी परिहारास्क॑ घरच॑ व॑र ठिवणे आहे.
driShTee parihaarदृष्टी परिहार॑.fig.a person or a thing which looks ugly.विकार रूपाच मनुष नाहीतर वस्तू.सिनिमांत मुख्य नायकाच बरोर दृष्टी परिहारास्क एक विनोद नटाला खाणींत कित्येकदपा मिळिवणे आहे.
drishya~दृश्य.n.that which is visible.दिसाचं. प्रकृति सौदर्य भरून असाच बाली द्वीपांत एक एक दृश्यहीं फार मनोहर आहे.
drohद्रोह.n.treachery.विश्वास तोडणे.भारताच इतिहासांत शत्रूंच बरोर मिळींगून स्वंत देशाला द्रोह करलते भरून खाणी आहे.
droheeद्रोही.adj.treacherous (person).द्रोह करणार.राम-रावण युद्ध आरंभ होयाच पुढे रावणाला सोडून श्रीरामाकडे आलते विभीषणा एक द्रोही होता म्हणून कित्येकदन सांगतात॑.
dubhaaSheeदुभाषी.n.translator. interpreter.एक भाषाच बोली वेगळ॑ भाषाला करणार॑.जुने काळांत एक भाषांतून अण्कीएक भाषाला भाषांतर कराच काम दुभाषी लोक करत होते, पण अत्तच कंप्यूटर युगांत॑ तत्समय अनेक भाषांत भाषांतर कराच व्यवस्था आहे. from दु and भाषा.
dukaanदुकान.n.shop.व्यापर कराच खोली.बंगळूरांत अम्च॑ घरांतून पांच निमिष दूरांतच॑ अम्हाला काय-काय पह्जेकी, ते अग्गीन विकाच भरून दुकान आहे.
dukaan beede~दुकानबीद॑.n.market street. market.दुकानांच बीद॑.ल्हान-ल्हान पटणांत असास्क॑ बंगळूरांत अम्च॑ घराच बाजू दुकानबीद म्हणून नाहीतरीन, अम्हाला आवश्य असाच सगळीन मिळाच भरून दुकान जवळच आहे.
dukaandaarदुकानदार.n.shopkeeper.दुकानवाला.संपाकाला पह्जेते विध-विध सामग्री अग्गीन एक कागदांत लिव्हून घरच॑ मागेपटीस असाच दाळ-तांदूळाच दुकानाला पाठिवून देलतर॑, दहा पंध्रा निमिषांत ते अग्गीन एक पोराकडे दुकानदार पाठिवूनटाकतील॑.
dukaanwaalaaदुकानवाला.n.shopkeeper.दुकानदार.भाजीपालाच व्यापार बरोर होतनाही म्हणून, ते बिसिनस राह्ते करून एक ल्हान होटल आरंभ कराला ते दुकानवाला निश्चय करला.
dukha~दुख.n.sadness.संकट.सोमालिया देशाच ल्हान लेंकरे भूकांत मराच पाह्ताना अम्हास फार दुख होत॑.
dukha~दुख.n.pain.वेदना.एकदपा मी ल्हान असताना पांयेच बोटांत झालते घाव पिकून उदंड दुख खाल॑ म्हणून तीन चार दिवस तरपडून गेलों.
dukhaNeदुखणे.vi.to pain.वेदना होणे.पिकलते घावाच दुखणे सोसाला होईनास्क॑ तीन चार दिवस तरपडून गेलों.
dukhivaNeदुखिवणे.vt.to inflict pain.वेदना आणिवणे.ते दुष्ट पोराला बीदीच कुत्रेला धोंडा भिरकावून दुखिवणे म्हण्जे कायकी संतोष वाटते.
dukhivaNeदुखिवणे.vt.to cause mental anguish.दुसरेंला मनाच संकट आणिवणे.दुसरेंच मन्न दुखिवास्क॑ अम्ही काहीं करताने.
dupaaraaदुपारा.n.noon. after noon.बारा वाजल नंतर पसून सध्याकाळाच पुढेच वेळ.दुपारा दोन बडिवताना येतों म्हणून सांगून तो येऊन पावताना संध्याकाळी सहा झाले.
dupaTTaaदुपट्टा.n.a cloth worn around the shoulder.खांदाच वरून नेसाच कापड. शेला. शल्या (Kannada). मोटरसैकलाच मागल॑ सीटांत बसून जातम्हा ते पोरीच दुपट्टा मागल॑ चक्रांत गुंडाळून खाले पडली. देवाच दया थोर आफत काहीं झाल नाही.
duppaTTदुप्पट.adj. & adv.double as much. दुगुणा. बस्साच टिकटाच मोल दुप्पट करले म्हणून विरोध कक्षीच लोके थोर गलाटा करून सहा बस जळिवूनटाकते.
duraachaarदुराचार.n.bad conduct. ओंगळ वागणे. वंगळ वागणे.सैरंध्रीच वेषांत विराट राजाच राजवाडांत राह्त होतते द्रौपदीच बरोर दुराचार करलतेमळे कीचकाला भीमसेना वध करले.
duraagrahदुराग्रह.n.evil desire.ओंगळ आग्रह॑. वंगळ आग्रह॑.दुराग्रहाच उदाहरण पाह्मे म्हणजे दुर्योदना पांडवांच बरोर कस॑ वागला म्हणून पाह्यलतर॑ पुरे.
duraagraheeदुराग्रही.adj.one with evil or improper desire.ओंगळ आग्रह असणार॑. वंगळ आग्रह असणार॑. दुराग्रही लोके दुसरेंच बरोर कस॑ वागतील म्हणून पाह्मे म्हणजे दुर्योदना पांडवांच बरोर कस॑ वागला म्हणून पाह्यलतर॑ पुरे.
duraashaaदुराशा.n.evil desire. दुष्ट आग्रह.भारताच स्वाधीनांत असाच कश्मीर त्यंच स्वाधीनांत करुया म्हणाच पाकिस्थानाच दुराशा कद्दीन सार्थक होईना.
durabhimaanदुरभिमान.n.false pride.दुरहंकार.दुरभिमान असणार लोकांस अम्ही त्यंच चोखोटाकरतां काहीं उपदेश देलतर॑पणीं ते अवगणना करूम्हणे म्हणून वाटल॑.
duradruShTदुरदृष्ट.n.bad luck. misfortune.दुर्भाग्य. खेळांत हरलतर॑ ते अम्च॑॑ दुरदृष्टामळे म्हणून सांगनास्क॑, जिंतलत्यांच षाणपणामळेच तस झाले म्हणून सांगणेच चोखोट॑.
duravasthhaaदुरवस्था.n.misfortune.दुर्भाग्याच स्थिती.दारिद्राच दुरवस्थांतून चुकाला कायतरीन वाट मिळल म्हणून गाढ विश्वास ठीवींगून कुचेला त्यंच बाल्यकाळ मित्र श्रीक्रिष्णाला पाह्याला गेले.
durbala~दुर्बल.adj.weak. infirm. शक्ति नाहीते.अठ्रावां शतकांत ब्रिटीष ईस्ट इंद्या कंपनी अम्च॑ देशाला येताना मुगल साम्राज्य दुर्बल स्थितींत होततेकरतां पूरा भारत लोक्कुरच त्यंच स्वाधीनांत कराला झाल॑.
durbhaagya~दुर्भाग्य.n.ill-luck.भाग्य नाहीस्क॑ असणे.कराच काम बरोर पाह्यींगून करलतर॑, निष्फल झालते काम अम्च॑ दुर्भाग्यामळे झाले म्हणून सांगाच आवश्य असना.
durbuddheeदुर्बुद्धी.n.evil thoughts. ओंगळ विचार.देवाच स्मरण केम्हाहीं अम्च॑ मनांत असलतर॑ आवश्य नाहीते दुर्बुद्धीला तिकडे ठिकाणच असना.
durdashaaदुर्दशा.n.misfortune.दुरवस्था.एक काळांत ते घरचे राजास्क॑ होते. अत्ता त्यंच दुरदशा, जेवाला कष्टि भोगतात॑. 
durgदुर्ग.n.fort.किल्ला. कोटे (Tamil). मुगळ साम्राज्याच बरोर युद्ध कराला म्हणून छत्रपती शिवाजी हेनी सह्याद्रि पर्वताच कित्येच डोंगूराच व॑र दुर्ग बांधले.
durgandhदुर्गंध.n.stench. घाण वास.पाऊसाळाच महिने आरंभ होयाच पुढे पटणांत असाच मोरी अग्गीन बरोर शुद्ध करनातर॑, नंतर॑ थोर पाऊस येताना परसाकडेच अणी तसच, वेगळ॑ घाणक॑ पाणी हे अग्गीन मिळून गाम पूरा दुर्गंध पसरल॑.
durghaTanaaदुर्घटना.n.mishap. आपत्त. अपघात.हे जवळ तीन चार रेल दुर्घटना झाल॑ म्हणून केंद्र रेल मंत्री त्यंच त्यागपत्र देले.
durguNदुर्गुण.n.vice.दुष्ट स्वभाव. दुष्ट गुण.त्यंच लेंकीला नवरा हुडुकताना पीखोर, नशाच स्वाधीनांत असणार असलते दुर्गुण असाच पोर मिळताने म्हणून भरून नवसींगटले.
durlakShaNदुर्लक्षण.n.ill-omen.ओंगळ लक्षण.घर सोडून बाह्येर उतरताना काळ॑ मांद्र अडवे आलतर॑ ते एक दुर्लक्षण म्हणून सांगणार लोके आहेत॑.
duruddeshदुरुद्देश.n.wrong intention. ओंगळ उद्देश. वंगळ उद्देश.दुरुद्देश ठीवींगून अम्ही काय कराला गेलतरीन एक दिवस तज परिणाम अम्हाला अनुभव करामते पडेलच पडेल॑.
durupadeshदुरुपदेश.n.evil advice.ओंगळ॑ उपदेश. वंगळ॑ उपदेश. अम्च॑ चोखोटच त्यंच मनांत आहे म्हणून लटक सांगून दुरुपदेश देणारांचकडून कित्ती दूर असतोंकी तेवढीन अम्हाला चोखोट॑.
durupayogदुरुपयोग.n.improper usage. ओंगळ उपयोग. वंगळ उपयोग.अम्हाला विसंबींगून असणारांच चोखोटपण॑ दुरुपयोग कद्दीन करतानेच करताने.
dusara~दुसर॑.adj.an alternate one. another one. a second one. वेगळ॑. अण्की एक आज पाष्टे दुकानांतून आणलते पुस्तकांत दहा पंध्रा पान होत नाही म्हणून समेच पर्तून जाऊन दुसर॑ एक पुस्तक घेईंगून आलों.दुसरा in sm.
dusara~दुसर॑.adj.second in number etc.दुसर॑ संख्याच॑.सिनिमा टिकट घ्याला ओठाकलते क्यूंत॑ कौन्टरांतून दुसर॑ असणारच मझ॑ लोंक.दुसरा in sm.
dusarandaaदुसरंदा.adv.a second time. once again.दुसर॑ वेळी. दुसरंदफा. दुसरंदपा. पुन्हामी सांगाच बरोर ऐकून घे, दुसरंदा सांगना.दुसर्यांदा in sm.
duShpariNaamदुष्परिणाम.n.adverse effect.वंगळ॑ परिणाम. ओंगळ॑ परिणाम.सूर्यग्रहण की चंद्रग्रहण की येताना संपाक करलते पदार्थाच भांडीच व॑र ग्रहणाच दुष्परिणाम येताने म्हणून दर्भाच चूर घालणे आहे.
duShTदुष्ट.adj.wicked.ओंगळ॑. वंगळ॑.वेगळ॑ लेंकरांस पाह्यलतर॑ चुमटणे, केंस धरून ओढणे, धोंडा भिरकावणे असलते चेष्टा अग्गीन करत होता म्हणून कोण्त मायेहीं ते दुष्ट पोराच बरोर खेळाला त्यंच लेंकरांला सोडत होत नाही.
duShTabuddheeदुष्टबुद्धी.n.evil mindedness.दुष्ट स्वभाव असणार॑. दुष्ट स्वभावाच॑.दुष्टबुद्धीच लोकांच बरोर सहवास ठीवींगट्लतर॑ अम्ही पणीन तसलते मनुषच म्हणून लोके म्हणींगतील॑.
duShTapaNa~दुष्टपण॑.n.wickedness.ओंगळ स्वभाव॑. वंगळ॑ स्वभाव.लेंकरे वाढताना त्यंच स्वभावांत कायतरीन दुष्टपणाच लक्षण दिसल॑की-नाही समेच ते बरोर करणे थोरळेंच जवाबदारी आहे.दुष्टपणा in sm.
dusthepaarदुस्तेपार.n.early morning. dawn. अरुणोदि.शेतीजमीनांत काम करणार कुणबी, नांगरणार असलतेनी अग्गीन दुस्तपारीच कामाला जमीनांत उतरतील॑.
dwaadasheeद्वादशी.n.twelfth day of each lunar fortnight.प्रत्येक पक्षांतल॑ बारावा दिवस.द्वा म्हणजे दोन अणी "दशी" म्हणजे दहावां, अस॑ द्वादशी म्हणजे बारावां म्हणून अर्थ.
dwaaparayuga~द्वापरयुग॑.n.the third of the four yugas.चार युगांत॑ तिसर॑ युग॑.कुरुक्षेत्र युद्धाच नौवां दिवस द्वापरयुग संपले म्हणून महाभारतांत आहे.
dwaarद्वार.n.hole.डोबुर.अम्च॑ समोरल॑ घरच॑ मांदर॑ केम्हाहीं त्यंच बाह्येरच॑ कवाडाच खाले असाच द्वार पाह्त बसलसेल, कां म्हणजे मध्य-मध्ये तजांतून उंदीर बाह्येर येईल म्हणून !
dwaarद्वार.n.an orifice. a two way hole.द्वार. तोड की, लोलक की घालनास्क॑ उजंड दिवस तसच सोडलतर॑ कानाच टोंचलते द्वार झांकूनजाईल.
dwaarद्वार.n.entrance.दार. आंत वेघाच वाट. जुने काळांत युद्धाच समय शत्रूसैन्याच हत्ती सुलुभान आंत वेघनास्क॑ असाला किल्लाच द्वार वंकडे-तिंकडे करून बांधत होते.
dwaarapaalakद्वारपालक.n.one who guards the gate.द्वार रक्षा करणार.जुने काळांत थोर-थोर लोकांच घराच बाह्येर द्वारपालक होत. अत्ता तज बद्दिल "सेक्यूरिटी गॅर्ड्स" बसलसतात॑.
dwaarapaalakद्वारपालक.n.stone carved statues positioned as door-keepers in a temple.देऊळात॑ वेघाच वाटी दोनबाजु असाच धोंडाच विग्रह॑ वैकुंठांत महाविष्णूच द्वारपालक म्हणून होतते जय-विजयांच शिलारूप विष्णूच देऊळांत पाह्याला मिळल॑.
dwaitha~द्वैत॑.n.the doctrine of dualism. देव अणी ब्रम्हांड हे दोनीन वेगळ॑-वेगळ॑ म्हणून विश्वास कराच तत्वज्ञान॑. द्वैत संप्रदाय आरंभ करलते श्री मध्वाचार्याच जन्म इसवी 1238 वर्ष उडुपीच जवळ पाजकांत झाले.the philosophy of dualism was founded by Shri. Madhwacharya.
dweepद्वीप.n.island.भोंताले चारपटीसीं पाणी असाच एक स्थल॑.भूलोकांतल॑ सगळ्याचीन पक्षा मोठ द्वीप मडगास्कर आफ्रिका भूखंडाच पूर्व भागांत आहे.
dwijद्विज.n.twice-born.दोनदा जन्म झालते.पह्यिले मायाच गर्भांतून जन्म होऊन, नंतर॑ मनुष्य समुदायाला हितकार्य कराला म्हणून दुसरंदा जन्म घेणार, हे आहे द्विज गोष्टाच अर्थ.
dwitheeyaaद्वितीया.n.second day of each lunar fortnight.प्रत्येक पक्षांतल॑ दुसर॑ दिवस.कस॑ तृतीयाला "तीज" म्हणून सांगतों की तस॑ द्वितीयाला "दूज" म्हणून सांगतात॑.



No comments:

Post a Comment