Sunday, May 15, 2016

o (ओ)





.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
o*vaaओंवा.n.the spice ajwain (carom seeds). ओमा.ओवा in sm.
oDhaaओढा.n.a thick pulling-rope used for lifting water from a well, canal etc. तोढा. आड, कालवा यांतून पाणी शेंदाला उपयोग कराच॑ चरांट.आडांतून पाणी शेंदाला बालदीला (बादलीला) बांधलते चरांटाच ओढा खजून खजून तुटाच स्थितीला आल-ते-करतां आज संध्याकाळीच पुढेच एक नव॑ चरांट घेयींगून येम म्हणून म्हणींगटलोंहें.1. from ओढणे, to pull. 2. sometimes incorrectly तोढा.
oDhaNeओढणे.vt.to pull. to drag.होढणे. बळ उपयोग करून स्वताकडे सरकिवणे.कोलकतांत॑ अत्तापणीं मनुष ओढींगून जायाच रिक्षा आहे. असलते लज्जाच विषय तिकडल॑ लोक॑ कस॑ सोसतात की !होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
oDhaNeओढणे.vt.to draw a picture or a line.होढणे. चित्र अथवा रेखा काढणे.शंभर वर्षापुढे राजा रवि वर्मा ओढलते चित्र अत्तापणीं प्रसिद्ध आहे.होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
oDhaNeओढणे.vt.to smoke a cigarette or beedi.होढणे. सिगरेट नाहीतर बीडि पीणे/फुंकणे.सिगरेट ओढलतर॑ लंग्साला कॅनसर येईल म्हणून कळींगूनिं ते दंडक सोडाला तय्यार नाहीते कित्येकदन आहेत॑.होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
oDuओडु॑.n.tile.कवल. खापर. छप्पर घालाच एक साधन॑.(1) जुने काळास्क॑ अत्ताअग्गीन छप्पराच व॑र ओडु॑ घालणे नाही. तज बद्दिल ओडाच आकारांतच तगिडांत॑ केलते साधन घालतात॑. (2) हे काळांत॑ पोणावांटा घराला कोण्क्रीटाच छप्पर घालतात तरीन, समुद्राच कांठशीच प्रदेशांतीं जास्ति पाऊसाच प्रदेशांतीं अत्तापणीं ओडाच छप्पर घालतात॑. Note :-from Tamil.
oDyaana~ओड्याण॑.n.ornamental waist belt for ladies made of gold.बायके मादाचवर बांधाच एक सोनेच आभरण॑. पट्टा. (1) जुने काळांत॑ ओड्याण घालणे बायकांला अलंकाराच विषय होते. (2) जुने काळाच फोटोंत विना अत्ता वेगळ॑ कोठीन बायका ओड्याण घालींगून असाच पाह्याला होईना.from Tamil.
ogaaLaNeओगाळणे.vt.to remove the spell from an evil-eye afflicted person.ओवाळणे. दृष्टि काढणे.दुसर॑ लोकांच दृष्टि लागताने म्हणून ल्हान लेंकरांला मद्य-मद्य ओगाळणे आहे.
oghaLaNeओघळणे.vt.to grind-off / chip-off / scrape off small quantities. (एक वस्तूंतून) घासून अथवा थोड-थोड चूर करून वेगळ॑ करणे.जायफळ/जाकाय आयुर्वेद औषदांत उपयोग करतात. ते ओघाळून थोड दुधांत मिळिवून पीलतर॑ आंगांतल॑ दुखणे उणे होईल॑. तजांत॑ "'स्टीरोयड" काहींतरीन असुयाकी म्हणून मला संदेह आहे.
ohaLaNeओहळणे.vi.to ooze.निथळणे. हळू गळणे.उदंड ल्हान लेंकरांच तोडांतून लाळ ओहळून त्यंच अंगी ओल॑ होयनास्क॑ असाला त्यंच गळांत॑ एक रुमाल/"बिब" बांदणे आहे.
ohaLe~ओहळ॑.n.oozing. trickling.हळ्ळु गळणे.
okhadओखद.n.medicine.औषध.आंगाला बर नाहीत असतम्हा अम्ही स्वता ओखद घ्यापक्षा डॉक्टराचकड॑ जावून ओखद घेणेच चोखोट.
okhadvaaNeeओखदवाणी.n.medical shop.ओखदाच दुकान. औषधवाणी. वैद्यवाणी. एवढ॑ दिवस अमच॑ खेडेंत॑ आयूर्वेद ओखद विकाच एक ओखदवाणी मात्र होत॑. अता अलोपती औषद विकाच एक दुकान नव॑ होऊन उघडल॑ आहे.ओखद (medicine) + वाणी (merchant).
ola~ओल॑.adj.wet.पाणींत॑ भिजलते. वाळनातेपाऊसांत॑ भिजींगून तो डोस्के ओल॑ करींगून आलाहे.ओला in sm.
ola~ओल॑.adj.freshly green.हिरव॑.ओले मिरशिंगा वाटून घाटलते पदार्थ खालतर॑ पोटाला होयनात्यांस॑ वाळक॑ मिरशिंगा घाटलते पदार्थ खाणे थोड बर वाटेल॑.ओला in sm.
oLaraNeओळरण॑.vt.to talk nonsense or gibberish.अर्थ नाहीस्क॑ बोलणे. व्यर्थबोली करणे.तो बोलाच तलाच कळतकी नाहीकी. अर्थ नाहीस्क॑ कायकी ओळरेत आहे.from Tamil.
oleओले.n.individual leaves in a coconut frond.नारळी झाडाच मट्टाच प्रत्येक-प्रत्येक पान.ओलेच बुट्टि करून विकून रोडावर संसार कराच दरिद्र लोकांकडे मोटर-कारांत येवून उतरणार कितिकी पैसावंत लोक बेरम कराच पाहलतर॑ अम्हाला मनांत॑ कष्ट वाटत॑.from Tamil.
omaaओमा.n.the spice ajwain (carom seeds). ओंवा. दुकानांत॑ मिळाच ओमपुडींत॑ थोडकपणीं ओमा घाटलासना.ओवा in sm.
omapuDeeओमपुडी.n.name of a fried snack containing ajwain (carom seeds). ओंवा/ओमा मिळिवून केलत॑ एक तळ्ळत॑ पदार्थ. सणाच संपाक म्हणजे मझ॑ अम्मा खोबरेच/नारळीच बर्फीहीं ओमपुडीहीं सोडनास्क॑ करतील॑.
onDaaओंडा.n.a small thikish wooden log.कोंडा. लांकडाच एक चूरकोंडका/ओंडा in sm.
ongaLa~ओंगळ॑.adj.bad. disgusting. loathsome.कंटाळा वाटाच॑. वोंगळ॑. वंगळ॑हे काळाच कित्येक टीवी कार्यक्रम॑ पाह्याला फार ओंगळ॑ अस्त॑. ओंगळ/वंगळ in sm.
onkaarओंकार.n.the primordial sound in Hinduism "Om".हिंदु धर्माच आदिशब्द ("ओं").
onkaaraaओंकारा.n.retching. vomoting. the feeling of nausea.वांति वाटणेओंकारा येनास्क॑ असाला घ्याच मात्रे गिळूनपणीं मला कित्येकदपा वांत॑ येईल॑.ओकारी/ओकारा in sm.
onkaNeओंकणे.vi.to vomit.वांति होणे.बसांन्तकी मोटर-कारांन्तकी डोंगूर प्रदेशांत॑ प्रयाण केलतर॑ मला ओंकणे येईल म्हणून सदा ओंकाराच मात्रे हाती ठींगून असेन॑.
onkaNeओंकणे.vt.to vomit.वांति करणे.होटलांत॑ कायकी खालत्यामुळे मी आज चारदपा ओंकणे केलों.
onTaaओंटा.n.a roofed platform on either side of the main threshold of a house.तिण्णै (Tamil). उंबराच बाहेरच दोन पठीसीं बसाला बांधलते ठिकाण(1) वर्षा-वर्षी मझ॑ आजा उगादि दिवसी घरच ओंटांत॑ गुढी बांधतील॑. (2) अम्च आजाच घरांत दूध धारकाढून द्याच दूधवाला तज गायीलीं वांसरूंलीं ओंटाच खांबांत॑ बांधत होता. ओटा in sm.
onTeeओंटी.n.the cavity formed by holding the end (padar)of a sari with two hands in order to receive ceremonial gifts.वानदान (वायनदान) घ्याला लुगड॑च पदर पसरून धराच॑ ओंटी/ओटी/ओटा in sm.
onTeeओंटी.n.lower portion of the abdomen.पोटाच खालेच भागओंटी/ओटी/ओटा in sm.
onTeeओंटी.n.rice/cereals, coconut, saree with blouse piece, turmeric, flowers, cash etc. used in the rite of ओंटीभरणे.ओंटी भराला उपयोग कराच धान्य/तांदूळ, नारळ॑, लुगड॑-चोळी, हळदी/हळेद, फूले अण्खी पैसाओंटी/ओटी/ओटा in sm.
onTee bharNeओंटीभरणे.n.the ritual of filling up the lap of a pregnant lady with rice/cereals, coconut, sari with blouse piece, turmeric, flowers, cash etc.to ensure happy delivery.एक गर्भिणीच/गरवारीणाच ओंटींत॑ धान्य/तांदूळ, नारळ॑, लुगड॑-चोळि, हळदी/हळेद, फूले अण्खी पैसा घालून आशिर्वाद कराच एक विध॑.
onTHओंठ.n.lip.ओंठ (1)येतां-येतां आजीलोक पणीं ओंठींत॑ लिप-स्टिक लावींगून हिंडतात॑ ! (2) अत्तच नव फॅषन काय म्हणजे पोरी ओंठावर एक ल्हान सोनेच फिरकी घालिंगणे. आंगात कोठ॑-कोठ॑ डोबूर करूयाकी तथे अस्कीन अस॑ घालिंगाला आरंभ झालाहे.ओठ in sm.
opaNeओपणे.vt.to accept.वोपणे. स्वीकार करणे.मी सांगाच तो ओपलाकी कायकी. तरीं, तजकडे अण्खीन एकदा बोलून पाह्तों.
opeengaNeओपींगणे.vt.to accept (responsibility) on oneself.वोपींगणे. (जवाबदारी) घेणे. तला कायतरीन तंटा/उपद्रव आलतर॑, तो अपाप तजांसूं चुकींगाम॑. तज जवाबदारी तू कसाला ओपींगतोस॑ ?
opeengaNeओपींगणे.vt.to agree. to accept.संम्मत करणे. वोपींगणे.ते चूक काम मीच केलों म्हणून ओपींगटलोंकी. कसाला उगे-उगे मला सळिवतोस॑ ?
opivaNeओपिवणे.vt.to hand over (responsibility or charge). to entrust or commit (with responsibility).वोपिवणे. दुसरेंकडे (जवाबदारि) देणे.एवढे वर्ष तो "गळ्फांत॑" असताना तज तीन लेंकरांचीं वाचिवाच/शिकिवाच जवाबदारी मी काढींगटलोतों. याच महिना तो वापस आलांपिरी जवाबदारि तला ओपिवाला जातों.ओपणे/वोपणे in sm
oppandamओप्पंदम.n.agreement.एकालेक ओपिंगणे. एकालेक संम्मत करींगणे. पाकिस्थानाच सरकारीं ते राज्याच कित्येक आतंगवादीनिं (तालीबानिं) गूढांत॑ ओप्पंदम केलाहेत॑ म्हणून सांगतात. Note :-from Tamil.
ore ghaalNeओरे घालणे.vt.to set fruits aside covered with hay etc for ripening.फळ गवतांत॑ गुंडाळून पिकिवाला ठिवणे.from Tamil.
osओस.adj.desolate (place). वोस. विजन॑ (स्थल॑). जन संपर्क नाहीते (ठिकाण). (काईं नाहीते) ठिकाण.सिटीच / पट्णाच बाहार असणे/राहणे एक विधांत आंगाला चोखोटच, कारण, तिकडल॑ वार॑-पाणी बेष अस्त. पण, रात्रीच वेळ उदंड ओस अस्त. तजमळे चोरटेंच भें आहे.ओस/ओसाड in sm.
os baDivalthe graamaanth gaaDhavech savaaShNeeओस बडिवलते ग्रामांत॑ गाढवेच सवाषणी.say.a saying which implies "only a worthless person will try to shine or strut around in a meaningless and pointless situation"."व्यर्थ परिस्थितींत॑ एकालीन प्रयोजन नाहीते मनुष षाणपण॑ दाखिवाला प्रयत्न करेल॑", हे अर्थाच एक म्हण.the nearest translation of the saying is "lady-donkey struts around in a desolate village".
osaaDeओसाडे.n.misty or very thin drizzle. a spray.बरीक शिंतोडे. वसाडे.अम्च घरच॑ खिडकीच वरल॑ छज्जाला रुंद उणे असामुळे थोड ओसाडे बडीवलतरीन आंत ओल॑ होत॑. खिडकी समच झांकांमत॑ पडत॑.
oTeओटे.n.a hole. द्वार. डोबूर.अम्च घर बांधाला पांयाच काम होत असताना तिकड॑ एक सरपाच पुत्तु होत॑. नंतर॑ तजांतल॑ सरप कोठकी एक ओटेंत घूसून गेल॑.
oTHaakaNeओठाकणे.vt.to stand up.होठाकणे. बसलते, नाहीतर निजलते स्थितींतून उठणे.साळेंत पंतोजि क्ळासाला वेघताना सगळ॑ विद्यार्थीनीं उठून ओठाकून त्यांस॑ नमस्कार करणे आहे.1.The word appears to be from ऊठ and टाकणे and होठाकणे a phonetic variation of it. 2.होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे.
oTHaakaNeओठाकणे.vt.to halt.होठाकणे . थांबणे. राखणे.एवढ॑ दिवस अम्च गामांत॑ एक्सप्रस ट्रैन कोण्तीन ओठाकतहोत नाही. हे महिना पसून चेन्नै-दादर एक्सप्रेस होठाकाला आरंभ झालाहे.होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे.
oTHaakivaNeओठाकिवणे.vt.to make a person or thing stand or get up.होठाकिवणे. बसलते, नाहीतर, निजलते स्थितींतून उठिवणे.होठाकिवणे is the hyper emphasized form of the correct ओठाकिवणे.
othaNeओतणे.vt.to pour out a liquid from a vessel.एक द्रव्याला भांडींतूं खाले सोडणे.साराच नित्तळ भागीं तज मंडीनिं/राडीं वेगळ॑ वेगळ॑ कराम म्हणजे, ढवळनास्क॑ ओतून काढलतर॑ होईल॑.
otheengaNeओतींगणे.vt.to pour out a liquid from a vessel.एक द्रव्याला भांडींतूं खाले सोडणे.
ovaaLaNeओवाळणे.vt.to remove the spell from an evil-eye afflicted person.दृष्टि काढणे. ओगाळणे.दुसर॑ लोकांच दृष्टि लागताने म्हणून ल्हान लेंकरांला मद्य-मद्य ओवाळणे आहे.
ovaaLaNeओवाळणे.vt.arathi done by two ladies for bestowing blessings to people (not to gods) with haldi-kumkum-akshata mixed with water in a brass/silver plate but without a lamp/camphor.हळदी-कुंकू अक्षताच पाणीच ताटांत॑ (विना दिवा) लोकांला आशीर्वाद कराच एक विधाच ओवाळणे.
ovaaLaNeeओवाळणी.n.cash gift given to ladies who perform the act of removing the spell cast by evil eye.ओवाळून दृष्टि काढाच बायकांस द्याच पैसा.
ovaLa~ओवळ॑.n.items not considered ritually clean for religious purposes.सोवळेला येईनाते. सोवळ॑ नाहीते.कित्येकदन॑ कर्पूर॑/कापूर ओवळ॑ म्हणून तज बद्दल वाताच दिवांतून देवाच आरती करणे आहे.ओवळा in sm.
ovaNeओवणे.vt.to string together.मोती, फूल असल्यांत॑ असाच ल्हान द्वारांतूं दोरा काढणे.पारिजात फूलांतून दोरा ओवून काढणे सुलूभ असते.
ovaNeओवणे.vt.to pass thread through a needle.सूईंच द्वारांतून दोरा काढणे.वय झालांपिरि डोळेच शक्ती उणे झालतेकरतां मला सूईंच द्वारावाटी दोरा ओवणे फार कष्ट झालाहे.
ovaNeओवणे.vt.to stitch.शिवणे.तांदूळकी वेगळ॑ धान्यकी भरलते गोणिचीला दत्तन/जत्तन ठींगाम॑ म्हणजे दाभणांत॑ बेष ओवून ठिवाम॑.

No comments:

Post a Comment