Tuesday, April 1, 2014

ph (फ)


.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
phaaDNeफाडणे.vt.to fell (a tree etc).(झाड) कापून घालणे.
phaaDNeफाडणे.vt.to demolish.पाडणे.मोट्ठ॑-मोट्ठ॑ पट्णांत॑ जमीनाच मोल उदंड वाढलांमुळे, जुने घर अस्कीन फाडून फ्लाट बांधून uis विकाच बिसिनस भरून लोक॑ करत आहेत॑.
phaaDNeफाडणे.vt.to split.लांब चूर करणे.
phaaDNeफाडणे.vt.to hew.व॑रून खांडणे.
phaaDNeफाडणे.vt.to dig.खांडणे.
phaalgune~फाल्गुन॑.n.name of a month in Hindu calendar.हिंदु पंचांगांतल॑ एक महिनाच नाव. फाल्गुण॑.
phaanTaaफांटा.n.a branch of a tree.पेडाच भागफांटा कापतों म्हणून "इलेक्ट्रिसिटी-वाले" झाडेच कापुनटाकतात॑. एक-एक झाड वीस-पंच्वीस वर्ष जुने म्हणून त्यांस॑ अर्थ होतनाही.फाटा/फांटा in sm.
phaapaNeeफापणी.n.eyelids.पांपणीकित्येक लोकाना एक वय नंतर त्यंच फापणी झांकलास्क अस्ते. ते एक विधाच "नरवस" रोग आहे. औषद/ओखद घेटलतर बर होईल.पापणी in sm.
phaarफार.adj.a lot. plenty.भरून. उदंड॑. उजंड. दंड॑.
phaaTkapaNeफाटकपण॑.fig.petty behaviour. slipshod behaviour. mean behaviour.अल्पपण॑. सोदापण॑.कसाला अम्ही फाटकपणाn वागाम॑, वेच जास्त झालतरीन एक चोखोट हॉलांत अम्च समारंभ ठींगूया. येणार सर्वाना एक ल्हान 'मेमेंटो' पणीं देऊया. 
phaaTkeफाटक॑.adj.torn.पाटक॑. पाटून असाच॑.
phaaTke thuTkeफाटक॑-तुटक॑.adj.ragged and broken. frayed and broken. that which has become junk.मोडक॑-तुटक॑. पाटक॑-तुटक॑.वास्तु प्रकार फाटके-तुटके सामान कोण्तीन घरांत असताने. ते तम्हा-तम्हा टाकाम॑.
phaaTNeफाटणे.vt.to tear.पाटणे.
phaDakiफडकि.n.shawl.आंगाच वर्च भाग हीम होयनास्क॑ असाला पांघरिवून नेसाच कापड.
phaDakiफडकि.n.stitched clothes in general (of male and female).शिवलत॑ कापड.दीपावळीला अम्हाला तेवढदनालीं नव फडकि घेम म्हण्जे उण॑पक्षा दहा हदार रुपे तरीन होईल.
phaDKe~फडक॑.n.a piece of torn cloth.पाटक॑. पाटक॑ (फाटक॑) कापड॑.मझ लोंक तेथसून वरडला "पंखा पुसाला एक फाटक॑ फडक॑ असलतर॑ द्या". 
phaDkoon paahNeफडकून-पाह्णे.vt.to have a cursory or careless glance.अलक्ष्य होऊन पाह्णे. अम्च घरांत भांडणे झाला नंतर मझ काका वरडत॑ बाहेर निघून जावून फार वर्ष झाल॑. एवढ॑ पतोरि (पर्यंतीन) घरापटीस फडकून पणीन पाह्ले नाहीते.
phajitiफजिति.n.disgrace. discomfiture. ignominy.पज्जत्ति. अपमान.
phakeerफकीर.n.fakir. a Muslim mendicant.मुस्लीम साधु.
phalफल.n.fruit.पंडु. फळ.
phalफल.n.consequence. result. effect.परिणाम.
phaLaaफळा.n.wooden plank. board.कट्टाच फळा. फळी.
phalaahaarफलाहार.n.snacks. light refreshments.उपहार. पलहार. फलहार. पलाहार. लघु-भोजन॑. लघु-भक्षण॑.फल+आहार.
phalaaNaaफलाणा.pron.a certain person. a so and so person. such and such a person.एक प्रत्येक व्यक्ति. अमुक व्यक्ति. मझ मित्र 'सी.बी.ऐंत॑' काम पाह्णार म्हण्ट्ले "सरकारि आफीसर तेवढदनीं पैसे खाणार म्हणून सांगिटलतर॑ मला काय कराला होईल ? फलाणा आफीसर लांच घेतो म्हणून स्पष्ट होऊन सांगिट्लतर॑, तला धराला एक वाट कराला होईल. हे विवर॑ मिळ्ळ॑ नाहीतर॑ काहीं कराला होईना".
phalahaarफलहार.n.snacks. light refreshments.उपहार. पलहार. पलाहार. फलाहार. लघु-भोजन॑. लघु-भक्षण॑. फल+आहार.
phalashruthiफलश्रुति.n.benefits or rewards accruing due of observance of shastras.शास्त्रानुसार जीवन करामुळे याच चोखोट फल.विष्णु सहस्रनाम॑, ललिता सहस्रनाम॑, नारायणीयम असल॑ देव स्तुति सांगताना/पारायण करताना, ते केलतर तज फलश्रुति काय मिळल म्हणून तजांतच शेवटि याच श्ळोकांत अस्ते.
phaLe~फळ॑.n.fruit.पंडु. फल.
phaLeeफळी.n.wooden plank. board.कट्टाच फळी. फळा.
phaLichफळिच.adj.dazzling brightness.झळक॑."प्राणायाम अणी योग" केल तर॑ अम्च तोंड, आंगाच काताड सर्वीं फळिचसी असल॑ म्हणून अनुभवी लोक सांगतात॑.
phalithफलित.n.that which has yielded profit or fruits of the effort.फल अथवा प्रयोजन झालते.तो जोत्स्य सांगिटलते तेवढ॑ परिहारहीं अम्ही केलों तरीन ते कोण्तीन फलित झाल नाही.
phallamफल्लम.n.money. wealth.पल्लम. धन. पैसा.फल्लम असणारांकडे पुन्हा व॑र-व॑र फल्लम येऊन पडत अस्ते.फल्लम, also called फलम was a small gold coin in use during historical times. The more commonly used word पल्लम (meaning money/wealth) appears to be a derivative of this.
phaNaalफणाल.n.collapse. bust.सत्यनाश.from Tamil.
phaNaalफणाल.n.bankrupt.दिवाल.from Tamil.
phaNaal hoNeफणाल होणे.vt.to collapse to bankruptcy. to go burst.सत्यनाश होणे. दिवाळि होणे.from Tamil.
phaNasफणस.n.jack fruit.पणस. एक फळाच नाव.
phaNe~फण॑.n.hood of a cobra.नाग सर्पाच॑ उगडलते डोस्के.फणा in sm.
phaNiफणि.n.a comb.पणि. केंस विंचराच साधन॑. विंचरणी ;फणी/कंगवा in sm.
phaTफट.n.a tear. a split.फाटून असाच॑. पाट.
phaTaakiफटाकि.n.fire cracker.पट्टाकि. पटाका.
phaTaarफटार.n.sharp/smart (jerk, jolt, slap, smack etc).पळार. झट.परीक्षाला वाचत असताना झोंपि जात असाच पाव्हून तज बाप तज डोस्केला फटारशि एक थाप देले.
phathwaaफतवा.n.a religious judgment given in Islam.इस्लाम धर्मांत द्याच निर्णय.
pheDNeफेडणे.vt.to get rid of. to doff. to untie. to loosen. to unfasten.(उकलून) दूर भिरकावणे. काढून टाकणे. अत्तलीकडे 'सिनिमा अवार्ड' प्रोग्रामांत बायका पोरी डान्साच नावांत रंगमंचावरेच फडकी फेडतात॑. पाह्याला कंटाळा अस्ते.the word is normally used in a derogatory sense.  
pheDNeफेडणे.vt.to fulfill a vow.नवस पूरा करणे.तिरुपतीला जाणार पोणावांटा लोक॑ नवसिंगालकी नवस फेडालकी जातात॑. नवसिंगटलते काम झालावर नवस फेडनास्क॑ असलतर॑ देव अम्हाला अवश्य सय करीवतो. 
pheDNeफेडणे.vt.to repay (a debt).रीण वारिवणे.
pheNeeफेणी.n.stringy lumps of a fried side dish usually made of rice flour.तळून खायाच एक मादरीच वडा.
phensफेंस.n.foam.नोरे (Tamil).मीठ पाणींत सोप/साबून घालून फडकी धुवलतर॑ फेंस येईना. फडकी पणीं बरोर धुवलासना.
pheraaफेरा.n.a walk or stroll on a close-looped path or walkway.फिरून याच वाटांत॑ चालाच॑.
pheraa ghaalNeफेरा घालणे.vt.to walk or stroll in a close-looped path or walkway.फिरून याच वाटांत॑ चालणे. अम्च घरा जवळ असाच पार्कांत॑/बागांत॑ एक फेरा म्हणजे पांचशे मीटर अस्ते. दहा फेरा घाटलतर पांच किलोमीटर होते. नित्य तेवढ॑ चाललतर॑ आंगाला उदंड चोखोट. 
phikarफिकर.n.concern.पर्वा करणे. अक्करे दाखिवणे.अम्च व॑र त्यास॑ फिकर असलतर॑ नव॑ ठिकाणि अम्हाला अस सोडुनटाकून जातीलका ?
phirivaNeफिरिवणे.vt.to rotate a thing.फिराला सोडणे.
phirivaNeफिरिवणे.fig.to take one for a ride. to mislead.एमारिवणे.
phirkeeफिरकी.n.the male-screw of a nose or ear stud or ornament.नथ/नेथ अथवा तोड/कानाच आभरण॑ दत्तन धरून ठिवाच साधन॑.अत्तच सोनेच मोल असाचाला एक फिरकी पणीं दोन-तीन हदार रुपे होईल.
phirNeफिरणे.vi.to rotate.एकेच ठामांतून सरकनास्क॑ फिरेत असणे.
phirNeफिरणे.vi.to walk around and come back again to the same spot.फिरून-फिरून आरंभ केलते ठिकाणीच येणे. एक नव ठिकाणि जायाच पुढ॑ बरोरल॑ 'अड्रेस' अण्खी खुण/'लांड्मार्क' विसरनास्क॑ अम्चकडे ठींगाम॑. नाहीतर॑ हुडकाच 'अड्रेस' मिळनास्क॑ फिरुन-फिरुन आलते ठामीच पुन्हा-पुन्हा गुंडाळणे होईल. 
phirNeफिरणे.vi.to take a stroll.नुस्त॑ चालाला जावून येणे.फिरवणे/फिरविणे in sm.
phiroonफिरुन.adv.(to go in a) roundabout (way). (to) skirt around. (to go or move) circuitously.वलांडून जाणे. फिरींगून जाणे.अत्ता 'वन-वे' झालावर त्यंच घराला जायाला भाजीपाला मारकेट अस्कीन फिरींगून जाम॑. वेगळ एक जवळच॑ वाट आहे, पण त्यांत॑ पूरा धोंडा-गुंडू असाकरतां 'आटोरिक्षावाले' ते वाटी येईनाते.
phoDफोड.n.an infected wound.पोड. व्रण॑ (रण॑) झालते फोड.
phoDeeफोडी.n.a piece of cooked vegetable in sambhar, pitle etc.सांभार, पिट्ळे असल्ते कालिवणांतल॑ भाजीच चूर
phoDke~फोडक॑.adj.split. broken.फुटलते. पुटलते.
phoDNeफोडणे.vt.to break.मोडणे. फुटणे.
phoDNeecha bhaathफोड्णीच-भात.n.a type of rice preparation.भातांत॑ फोड्णी घालून केलते एक पदार्थ. चित्रान्ना (Kannada).
phoDNeecha saambhaarफोड्णीच-सांभार.n.a type of sambhar.एक रीताच सांभार. पोणीच-सांभार.
phoDNeecha saarफोड्णीच-सार.n.a type of dilute rasam.गोड-सार. गोढ-सार. पोणीच-सार.
phoDNiफोड्णि.n.spluttered mustard, jeera etc in oil for garnishing.कडुगीं (मोहरईं) जीराईं तेलांत॑ तावून संपाकाच पदार्थांला घालाच.फोडणी in sm.
phool pathriफूल-पत्रि.n.flowers and leaves offered in a puja.पूजाला उपयोग कराच फूलीं पत्रीं.गणेश चतुर्थीला यथे मिळाच फूल-पत्री नुस्त राणांतून वेंचिंगून आलतास्क॑ अस्ते. पैसा देऊन कुप्पा घ्यास्क अस्ते ! 
phoole~फूल॑.n.flower.पुष्प.
phoolpaankhurooफूलपांखरूं.n.butterfly.चिटपांखरू. चित्तपांखरू.फुलाच झाड असाच ठिकाणि फूलपांखरूं अवश्य पाह्वूया. देवाच सृष्टि कित्ति प्रमाद म्हण्जे, ते फूलपांखरूंच 'डिसैन' अणी रंग वेगळ॑ कोठीन अम्हाला पाह्याला मिळना. पाह्णार दंग होऊन बसतील॑the word पांखरू is a rustic/archaic form of पक्षि and the word चिटपांखरू or चित्तपांखरू is a rustic/archaic form of चित्र+पक्षि.
phoolpaathra~फूलपात्र.n.a small utensil of a certain design used for puja items.पूजाला उपयोग कराच एक प्रत्येक आकाराच पात्र.अत्तच॑ काळांत नुस्त तूपाला-तेलाला फूलपात्र उपयोग करतात॑. बाकी सर्व पूजा सामग्रहीला 'प्लास्टिक' डब्बाच ठींगतात॑ ! 
phoolvaathफूलवात॑.n.a self standing type of cotton wick.खालच भाग थोड विस्थार असामुळे अपाप ओठाकलसाच कापूसाच वात॑. अम्च गामांत फूलवात॑ मिळनाकरतां बेंगळूराला जाताना अस्कीन अम्ही हे घेऊन आणतों.
phoToफोटो.n.photograph.कॅमरांत॑ काढाच पेट/पट.
phugaNeफुगणे.vi.to get bloated.आकार मोट्ठ॑ होणे.
phugaNeफुगणे.vi.to swell.सुजणे.
phugaNeफुगणे.vi.to put on weight.आंगाच भार॑/वजन जास्ति होणे.
phugivaNeफुगिवणे.vt.to inflate (by blowing etc.).(फुंगून) मोट्ठ करिवणे.फुगवणे/फुगविणे in sm.
phugivaNeफुगिवणे.fig.to pump up a person's ego.अहंभाव चढिवणे.
phulaac jhaaDफुलाच झाड.n.a flower plant.फूलाच झाड.अम्च शेदारल॑ पार्कांत/बागांत॑ विध-विध फुलाच झाड वाढिवताते. पाह्याला फार सुंदर असा करतां टळाला येणार सग्ळीं तोडिंगून जात अस्तात॑. 
phulaariफुलारि.n.a florist. flower vendor.फूलवाला. फूलवालि.हैदराबादांत फुलारि आणाच मोगराच फूल शुद्ध वास असत नाही, पण मोल मात्र फार जास्ति अस्ते.
phungeeफुंगी.n.a wind (musical) instrument.पुंगी. फुंकून वाजिवाच एक वाद्य.
phunkफुंक.imp.blow air from mouth.तोंडावाटे वार॑ भरिवणे.
phunkफुंक.imp.play a wind musical instrument.फुंगी वाजिवणे.
phunkaNeफुंकणे.vt.to blow with the mouth.तोंडा वाटी वार॑ घालणे.
phunkaNeफुंकणे.vt.to play a wind (musical) instrument by mouth.तोंडा वाटी फुंकी वाजिवणे.
phunkaNeफुंकणे.vt.to smoke cigarette, beedi etc.चुट्टा पीणे.
phunkaNeeफुंकणी.n.a blow pipe used for stocking fire in a stove which uses coal or wood as fuel. सगडीच॑/शेगडीच॑ विस्तूला वार॑ घालाच साधन॑.
phuTaaNeफुटाणे.n.dried and roasted chana.पुटाणे. वाळिवून भाजलते चणा.
phuTka~फुटक॑.adj.cracked. broken. burst.पुटक॑. फुटलते.
phuTka~फुटणे.vi.to break up.पुटणे. मोडणे. चूर-चूर होणे.
phuTka~फुटणे.vi.to crack. to snap.पुटणे. तुटणे.
phuTka~फुटणे.vi.to coagulate (milk) while boiling.पुटणे. (दूध) तावताना फुटणे.
phuTka~फुटणे.vi.to burst open (after swelling).पुटणे. सुजून फुटणे.
puskaaफुसका.adj.hollow.आंत खालि असाच॑. पोकळ॑.
puskaaफुसका.adj.enfeebled. flimsy. debilitated.हलक॑. बळ नाहीते.

No comments:

Post a Comment