Tuesday, April 1, 2014

p (प) 3 (paravaa To pinD pradaan)




.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
paravaaपरवा.n.minding.पर्वा.अम्च परिचय उजंड वर्षांतून आहे तरीन, काल बीदींत तो मला पाह्ताना परवा करनास्क॑ डोस्के ते पठीस करींगून गेला.
paravaaपरवा.n.caring (about). heed. (showing) concern.पर्वा. परवा करणे.
paravaa karNeपरवाकरणे.vt.to show concern. to be mindful.पर्वा करणे. दुसरेंच स्थितीवर चिंता करणे. श्रद्धांत॑ पाह्यींगणे.
paravaa naaheeपरवानाही.u."it is alright". "it is ok". "not bad". "never mind".चालेल.this usage is identical with the Tamil usage परवा इल्लै. The word परवा is common to many Indian languages.
pardaaपर्दा.n.a curtain.हेपटीस-तेपटीस दिसनासक॑ असाला अडवे बांधाच एक कापड.
pardaaपर्दा.n.a veil. बुर्खा.
pareekShaaपरीक्षा.n.examination.परीक्षण॑.
pareekShaNa~परीक्षण॑.n.examination.परीक्षा. परिशोधन॑.
pareeTपरीट.n.washerman.धोबि.
pareeTeeNe~परीटीण॑.n.washer woman. washerman's wife. कापड धुवणारी बायको.परटीण in sm.
parichayपरिचय.n.mutual introduction.एकालेक कळींगणे.
parichayपरिचय.n.acquaintance. एकालेक कळून असणार.
parichayपरिचय.n.familiarity through use, practice etc.वागून, नाही, अभ्यास करून कळ्ळते.
paridhiपरिधि.n.limit.सीमा.
parihaarपरिहार.n.remedy.उपाय.
parihaasपरिहास.n.ridicule.मष्किरि. अपहास. उपहास.
parikramaaपरिक्रमा.n.circumambulation in a temple.देऊळांतल॑ प्राकार. देऊळाच भोंताले प्रदिक्षणा कराला असाच वाट.परिक्रम in sm.
parimaLa~परिमळ॑.n.fragrance.चोखोट वास. सुगंध.
pariNaamपरिणाम.n.consequence. effect.परिणाम.
pariNaamपरिणाम.n.end result. product.शेवटि झालते फल॑.
pariNaamपरिणाम.n.conclusion.परिणाम.
pariNaamपरिणाम.n.change in condition, form, state etc.परिणाम.
paripaalanपरिपालन.n.taking care of. giving support.सुरक्षा देणे.अत्ता अम्च देशांत पोलीसाच परिपालन काहीं असास्क वाटत नाही. गुंडे लोकांच राज्य आहे. नेतालोक अणी गुंडे दोघीं मिळून सरकाराच जमीन-पैसे हडप करत आहेते. हे व्यवहार कोणतरीं बाहेर कळीवलतर॑ तेना मारूनटाकाला तेनी एक निमिषपणीं योचना करनात.
paripoorNa~परिपूर्ण.adj.in full measure.संपूर्ण.
parisanchanaaपरिसंचना.n.a ritual done before partaking of food.जेवाच पुढ॑ कराच एक पद्धत॑.
parisarपरिसर.n.environment. surroundings.भोंतालच॑ ठिकाण.
pariShadपरिषद.n.a conference. a congregation.सभा. मंडळ.
parishddha~परिशुद्ध.n.pure.पवित्र.
pariShkaraNa~परिष्करण॑.n.changing for the better.असाच स्थितींतून बदलिवून चोक्कोट करणे.
pariShkaraNa~परिष्करण॑.n.renovation.पुन्हा नव॑ करणे.
parishramपरिश्रम.n.effort.प्रयत्न.
paristhhithiपरिस्थिति.n.situation. condition.असाच स्थिति.
parivaarपरिवार.n.family members.कुटुंबांतल॑ लोक॑.
parivaarपरिवार.n.descendants.वंशज.
parivaarपरिवार.n.retinue. followers.सदा बरोर येणार लोक॑.
parivarthanपरिवर्तन.n.transformation. change in character, nature etc.असाच स्थितींतून व्यत्यास होणे.
parkorपरकोर.n.a long skirt worn by girls.माज अण्कि पांये दिसनास्क॑ पोरीलोके नेसाच एक वस्त्र.परकर in sm.
parkorपरकोर.n.petticoat.बायके नेसाच आंतल॑ एक वस्त्र.परकर in sm.
parkorपरकोर.n.the greenish stem by which brinjal hangs from the plant.वांगीच देठ.
parkor padarपरकोर पदर.n.a half-saree worn by girls.परकोर दावणि (Tamil).हे काळांत॑ सलवार-कमीज़ाच जास्ति उपयोगामुळे बायकापोरींच मध्ये परकोरपदर नेसाच दंडक फार उणे झालाहे.
paropakaarपरोपकार.n.philanthropy.उदारपण॑.
paropakaariपरोपकारि.adj.a person with a helping nature.दुसरेंला सहाय कराच मन्न असणार.
parthaNeपर्तणे.vt. to return.परतणे. वापस येणे. पर्तून(परतून) येणे.तो रेल्वे-स्टेषनाला जाऊन पावजोरी, ट्रेन निघून गेल होत॑. पर्तून घराला येऊन उद्या-नंतरच ट्रेनांत गेला.परतणे in sm.
parthaNeपर्तणे.vt.to turn back.परतणे. मागेपटीस फिरण॑.एक दिवस मी बीदींत॑ चालत अस्ताना पुढे एकले जातहोते. तेनी मझ मित्रका नाहीका म्हणून मला संशय होत. तरीं, त्यंच नाव हळू वरडून बलावलोंकी-नाही, तेनी समच पर्तून पाह्यले.परतणे in sm.
parthivaNeपर्तिवणे.vt.to reverse. to turn around.मागे-पुढे फिरिवणे. उलटा करणे. परतिवणे.(1) ते कागदाच मागे काय लिवलाहे म्हणून पर्तिवून पाह. (2) चूली वरच धिरडे फाटनास्क॑ बेष पर्तिवांव॑ म्हण्जे तवाच भोंताले आवश्या प्रकार तेल घालून, नंतरच पीठ घालुया. परतवणे/परतविणे in sm.
parthivaNeपर्तिवणे.vt.to turn upside down.परतिवणे. उलटा करणे. अम्च घरांत प्रति एक घंटेला पर्तिवून ठिवाच एक जुने काळच "हवर-ग्ळासाच" घडिगार होते.परतवणे/परतविणे in sm.
parthivaNeपर्तिवणे.vt.to flip through (a book etc.).परतिवणे. (पुस्तकच) पान पुढे-पुढे करणेफोटो-आल्बमाच एक-एक पानीं पर्तिवून-पर्तिवून पाहाचपक्षा, कंप्यूटरांत॑ स्लैड-षो पाहणे सुलुभ अस्ते ! परतवणे/परतविणे in sm.
parthivaNeपर्तिवणे.vt.पर्तिवणे vt to turn over. to flip over.परतिवणे.(1) धिरडेच पीठ तवांत चिकटून बरोर पर्तिवाला झाल नाही-ते-करतां आज पाष्टे मी केलते धिरड॑ करपून गेल॑. (2) चूली वरच धिरड॑ फाटनास्क॑ बेष पर्तिवांव॑ म्हण्जे तवाच भोंताले आवश्या प्रकार तेल घालून, नंतरच पीठ घालुया. परतवणे/परतविणे in sm.
parthoonपर्तून.adv.once again.पुन्हा. परतून. परतूनींपरत in sm.
parthoon paahynaaska~ asaNeपर्तून पाह्यनास्क॑ असणे.id.to ignore deliberately.पह्ज॑म्हणून अवगणना करणे.मोट्ठ॑ मनुष झालांपिरी तो तज जुने मित्रांस॑ पर्तून पाहाला पणीं तय्यार नाही म्हणून मी ऐकलों.
parthoon parthoonपर्तून पर्तून.adv.again and again. repeatedly.पुन्हा-पुन्हा. परतून परतून.परत-परत in sm.
parthoonee*पर्तूनीं.adv.again.पुन्हाईं. परतूनीं.
parva~पर्व.n.a section of an (epic) book.(पुराण) ग्रंथांत॑ एक भाग.
parvaaपर्वा.n.concern. care.परवा.
parvaa karNeपर्वाकरणे.vt.to show concern. to be mindful.परवा करणे. दुसरेंच स्थितीवर चिंता करणे. श्रद्धांत॑ पाह्यींगणे.
parvaa naaheeपर्वानाही.u."it is alright". "it is ok". "not bad". "never mind".चालेल.this usage is identical with the Tamil usage परवा इल्लै. The word परवा/पर्वा is common to many Indian languages.
parvathपर्वत.n.a mountain.एक मोट्ठ॑ डोंगूर.
paryaaya~पर्याय.n.a procedure (for effecting a ceremonial change).अधिकार बदलाला कराच एक व्यवस्था/कार्यक्रम.उडुपि श्रीक्रिष्णाच देऊळांत प्रति दोन वर्षाला पर्याय अस्ते. हेजमुळे ऊडुपींत असाच आठ मठाधिपतीलीं देऊळ चलिवाला अवसर/संदर्भ मिळते. श्री मध्वाचार्य त्यंच काळांतच केलते व्यवस्था हे.
paryanthपर्यंत.prep.till then.पतोरि. पर्यंतीन.
paryantheenपर्यंतीन.prep.till then.पतोरि. पर्यंत.
pasaaraaपसारा.n.spread out. scattered.पसरून असाच.एक दिवसी मझ खोलींत मी अफीसाच कागद, पुस्तक सर्वीं खाले घालून तेवढीन वेगळ-वेगळ 'सेट' करत अस्ताना मझ माय येऊन म्हण्ट्ले " हे काय पसारा करींगून बसलाहेस॑. ते-ते दिवसीच 'फ़ैल' करींगाला होयनाका ?"
pasaraNeपसरणे.vt.to spread (all over).विखुरणे.मताच (धर्माच) नावांत॑ समुदायांत॑ उपद्रव पसरणांला थोडपणीं दया दाखिवताने.
pasaraNeपसरणे.vi.to spread (all over).विखुरून असणे.समुद्रांत मिळाच ठिकाणि गोदावरि नदि सुमार दोन किलोमीटर पतोरी (पर्यंतीन) पसरून प्रवाह कराच दृश्य पाह्याला अतिशय असत॑.
pashchaathaapपश्चाताप॑.n.repentance. remorse.केलते कार्य चूक म्हणून संकट वाटणे.
pashchimपश्चिम.n.west.सूर्य अस्तमन होयाच दिक्.
pashuपशु.n.animal.मृग॑.
pashupathiपशुपति.n.Lord Siva.भगवान शंकर.
pasoonपसून.prep.a preposition implying "from (a place)"."(एक ठिकाण) सोडून पुढे" असलते अर्थ द्याच शब्दयोगि अव्यय ;पासून in sm.
paTपट.n.cinema film.चित्रपट. सिनिमा. पेट.हे काळांत॑ याच पटांतल॑ अश्लीलीं असभ्यहीं पाह्यलतर॑, तसलते पट एक कुटुंब पूरा बसून पा्ह्याला लायक नाहीते म्हणून सांगूया.
paTपट.n.framed picture.चित्र. पेट."डिजिटल फ्रेम" आल नंतर घरांत॑ भिंतीवर पट/पेट अडकिवणे उणे झालाहे.
paTपट.n.a sketch. a drawing.हातांत होडलते(ओढलते) चित्र. पेट. एकशे वर्ष पुढे राजा रवि वर्मा होडलते/ओढलते पट अत्तपणीं देशांत॑ उदंड प्रचारांत आहे.
paTपट.n.cinema film.चित्रपट. सिनिमा. पेट.हे काळांत॑ याच पटांतल॑ अश्लीलीं असभ्यहीं पाह्यलतर॑, तसलते पट एक कुटुंब पूरा बसून पा्ह्याला लायक नाहीते म्हणून सांगूया.
paTपट.n.framed picture.चित्र. पेट."डिजिटल फ्रेम" आल नंतर घरांत॑ भिंतीवर पट/पेट अडकिवणे उणे झालाहे.
paTपट.n.a sketch. a drawing.हातांत होढलते(ओढलते) चित्र. पेट.एकशे वर्ष पुढे राजा रवि वर्मा होडलते/ओढलते पट अत्तपणीं देशांत॑ उदंड प्रचारांत आहे.
paTaarपटार.n.a sound (created while slapping).(रपाटा होढताना/ओढताना/देताना होयाच) शब्द. फटार. पळार.
paTeesपटीस.adv.by the side.बाजु.
pathaakaaपताका.n.flag.ध्वज॑. गुढि. कोडि (Tamil).
paTHaaNपठाण.n.a person of Pathan tribe.पठाण वर्गाच एक मनुष॑/व्यक्ति.
paTHanपठन.n.reading.वाचणे.
pathangपतंग.n.kite.पट्टम (Tamil). दुसरे पोरे पतंग आकाशांत॑ उडिवताना तज दोरा कापाला कित्येक वक्र बुधीच पोरे प्रयत्न करतील॑. हे कामाला तेन्ही मांजाच दोरा प्रयोग करणे आहे.
pathhya~पथ्य.n.the regimen of diet.खाणे पीणेच बरोरल॑ व्यवस्था.
pathhya~पथ्य.n.restricted or special diet due to health reasons. आरोग्याला आवश्यप्रकार कराच/खायाच विशेष जेवण॑.तो येतां-येतां विपरीत फुगत आहे. पथ्याच जेवण॑ करून वजन उणे करींगणे तलाच चोक्कोट.
pathiपति.n.husband.दल्ला. दाल्ला.
pathivrthaaपतिव्रता.n.a dutiful and chaste wife.एक पवित्र पत्नि.
pathniपत्नि.n.wife.बाईल.
pathoriपतोरि.prep.till then.पर्यंत॑. पर्यंतीन.पावेतो in sm.
pathraavaLiपत्रावळि.n.dried leaves of a particular type stitched together to form a circular dining leaf.एक रीतीच वाळलते पानांत॑ शिवून केलते जेवाला उपयोग कराच पान.पत्रावळ in sm.
pathre~पत्र.n.postal letter. तपालाच कागद॑.
paththaaपत्ता.n.address.अड्रस. विलासम (Tamil). एक घर, दुकान अथवा कचेri कोण्त॑ ठिकाणी आहेम्हणून कळिवाच विवर॑.
paththaaपत्ता.n.leaf.पान.
paththaLपत्तळ.adj.thin and flat.बरीक हलक॑ चपटा.जुनेकाळांत॑ मिळतहोतते पात्र/भांडि अस्कीन घट्टि होते. अत्ता मिळाच नुस्त पत्तळ अस्ते.पातळ in sm.
paththaLपत्तळ.adj.watery. dilute.नित्तळ. पाणीस्क॑. पाणी सार्ख.आज दुपारा जेवलते होटलांत॑ जेवण॑ बरच होतनाही. सांभारीं सारीं पत्तळ होते. दाळ आवश्याजोक्त घाट्ल नाही वाटते. पातळ in sm.
paththaLपत्तळ.adj.faint.बरीक.क्रिष्णतुळसिच पान पत्तळ जांबळ॑ रंगाच अस्ते.
paTNiपट्णि.n.starvation. अनशे पोट.from Tamil.
paTT ghaalNeपट्ट घालणे.vt.to apply a medicinal paste (eg. of vibhuthi on the forehead for runny nose and of tamarind on any other limb for pain relief).मलम पट्टि बांधणे ( उदाहरण: पडसाला कपाळांत॑ विभूति लावणे अण्खी आंगाच वेगळकड॑ सूळ/सूज असलतर चिंचाच पट्टि बांधणे).मझ माय मला पडसा/खोंकळा असतम्हा/असताना वीभूतिच पट्ट घालतील. दूसर दिवसच नाकांसून पाणी गळणईं खोंकळाईं राहून जाते.
paTTaaपट्टा.n.cinnamon bark.संपाकाला उपयोग कराच एक वनस्पति. लवंगपट्टा.दालचिनी in sm. the लवंग in लवंगपट्टा does not refer to clove, which is also called just लवंग.
paTTaaपट्टा.n.a document evidencing ownership of land.जमीनाच वर अधिकार दाखिवाच एक पत्र.
paTTaaपट्टा.n.a waistband of gold worn by women.बायका मादांत बांधाच एक आभरण॑. ओड्याणम (Tamil/Telugu).एक सोनेच पट्टा वीस तोला वजन असत॑. तज मोल उणेपक्षा चार लाख रुपे तरीन होईल.
paTTaaपट्टा.n.a flat strip.एक लांब चपटा उण॑ रुंद आकाराच साधन॑. पट्टि.
paTTaabhiShekपट्टाभिषेक.n.coronation.राज्याभिषेक॑. राज्यभाराच पदवि देणे.
paTTaakiपट्टाकि.n.fire-crackers.पट्टास. फटाकि..
paTTaaNiपट्टाणि.n.sweet peas.एक भाजीपालाfrom Tamil. वाटाणा in sm.
paTTaapaTTiपट्टापट्टि.adj.criss-cross.अडवे-तिडवे ठिवलते पट्टि.
paTTaasपट्टास.n.fire-crackers.पट्टाकि. फटाका.
paTTamपट्टम.n.kite.पतंग.from Tamil.
paTTiपट्टि.n.a narrow flat strip.रुंद उणे, पण, लांब असाच एक पत्तळ वस्तु. पट्टा.
paTTna~पट्टण॑.n.city.नगर॑.
paTTna~पट्टण॑.n.Madras city. Chennai.मद्रास पट्टण॑. चेन्नै.
paTTraaNiपट्टराणि.n.queen consort. chief queen. राजाच मुख्य पत्नि.
pavaLaaपवळा.n.coral.एक रत्न. पवळी.पोवळा/पोवळीं/पोवळें in sm.
pavaLeeपवळी.n. coral. एक रत्न. पवळा.कित्येक नक्षत्राला पवळीच आभरण होऊन येईना म्हणून सांगण आहे, पण ते कित्ति खरे म्हणाच मला कळना.पोवळा/पोवळीं/पोवळें in sm.
pavanपवन.n.a unit of measure (equal to eight grams) for weighing gold and silver.सोन॑ अण्खी रुपेच वजन पाह्याच एक माप (आठ ग्रामाच तुल्याच॑). uisमध्यम वर्गाच लोक पणीं पंध्रा-वीस पवन सोनेच वस्था वराडांत घालतात॑. अत्तच मोलाला तेच तीन लाख रुपे होऊन जाते.from Tamil.
pavanपवन.n.Lord Hanuman's father's name.श्री हनुमानाच बापाच नाव.
pavithra~पवित्र.adj.holy.परिशुद्ध.
pavithra~पवित्र.n.holy darba grass twisted and worn in finger during a religious ritual.पूजाच वेळी बोटांत घालाच दर्भाच साधन॑.
peDपेड.n.trunk of a tree.झाडाच पेड. झाडाच घट्टि असाच भाग.
peDhaaपेढा.n.a sweet preparation made by condensing milk.दूधपेढा.
peeपी.imp.drink.द्रव्य गिळणे.
peeDaaपीडा.n.trouble. torment. distress.कष्ट. (मनाच) तंटा.त्यंच लेंक वेगळ॑ मताच/धर्माच एक पोराला वराड कराला निश्चय केली. ते वराडाच विरुद्ध॑ तिज माय-बाप सांगट्लते गोष्ट एकीन ऐकाला तिने तय्यार न्होती. शेवटी तिज माय-बाप "तिने काय पह्जतरीन करींगूनदे अम्च॑ पीडा वरलतर पुरे" अस सांगून उगे बसून गेले.generally the word पीडा is used in the context of mental torment.
peeDhe~पीढ.n.a raised platform for ceremonial or special occassions.थोड उंचांत बांधलते एक विशेष स्थळ॑.
peekपीक.n.a crop. a harvest.जमीनांतून काढाच धान्य, फल असल॑ पदार्थ.अतीवृष्टीमुळे दाळीच पीक तेवढीन हेमधे नासूनगेलाहे म्हणून कालेच मला कळ्ळ॑. सर्व दाळीच मोलीं पुन्हा वाढत आहे.
peekhorपीखोर.n.drunkard.पीकोर. दारू पीयाच दंडक सोडाल होयनाते मनुष.
peekorपीकोर.n.drunkard.पीखोर. दारू पीयाच दंडक सोडाल होयनाते मनुष.
peeLपीळ.n.a twist.मुरड॑.
peeNeपीणे.vt.to drink.द्रव्य गिळणे.
peeNeपीणे.fig.to consume liquor.दारू पीणे.
peeTHपीठ.n.flour.पूड केलत॑ धान्य/धान. धान्याच/धानाच चूर्ण.
peeTHपीठ.n.cooking batter.पाणींत कालिवून संपाकाला तय्यार केलते पीठ.
peeTHपीठ.n.an exalted location of a saint pontiff.एक मठाधिपतीच पुण्यस्थान.
peeTHपीठ.n.throne.सिंहासन.
peeTH prabhaavaLiपीठ-प्रभावळी.n.a circular decoration behind the head in a throne or पीठ.प्रभावळि.
peeThaadhipathiपीठाधिपति.n.pontiff of a Mutt.पीठाच मुख्य यति. मठाधिपति.
peethaambara~पीतांबर॑.n.yellow silk cloth.पिवळ॑ रंगाच रेशमाच कापड.
peeThaarohaNa~पीठारोहण॑.n.annointing as the pontiff of a Mutt.मठाच पीठाधिपति म्हणून घोषणा होण॑.
peeThaarohaNa~पीठारोहण॑.n.ascending the throne for coronation.सिंहासनांत बसून पट्टाभिषेक होणे.
peeTNeपीटणे.vt.to beat. to thrash.मारणे. मार-पीट करणे.
pelaaपेला.n.a small container used in puja.प्याला.
penDपेंड.n.oil cake.पिण्णाक (Tamil). बींतून तेल पूरा पिळून काढल॑ नंतर उरलते चक्का. पेंडे.
penDeपेंडे.n.oil cake.पिण्णाक (Tamil). बींतून तेल पूरा पिळून काढल॑ नंतर उरलते चक्का. पेंड.
peranDeपेरंडे.fig.a nagging person.मनाला उब्बस करणार॑. from Tamil, in which पेरंडे means "a cactus which causes itch on contact".
peruपेरु.n.guava fruit.पेरुच फळ॑. जाम. जांब.
peTपेट.n.cinema film.चित्रपट. सिनिमा. पट.
peTपेट.n.framed picture.चित्र. पट.
peTपेट.n.a sketch. a drawing.हातांत होढलते (ओढलते)चित्र. पट.
peTपेट.n.a blaze of fire.विस्तूच जाळ॑.
peTaaपेटा.n.a round cap.एक विधाच टोपि.फेटा in sm.
peTaaraaपेटारा.n.a rattan or reed basket with a lid.झांकणि असाच बेताच बुट्टि. टोकरी.पट्णाच 'मेरीना बीचांत॑' सुंडल विकणार॑ त्यंच सुंडल, भोंचणे, कडले हे सग्ळीन एक पेटारांत॑ ठींगून एकडे-तिकडे चालाच समुद्राच वार॑ खयाला जाणारांस पाव्हुया.
peTeपेटे.n.necklace.गळाच माळअत्तच मोलाला एक वज्राच पेटे घ्याला उण॑ पक्षा दोन/तीन लाख रुपे तरीन होईल. तस घेट्लतरीन घालिंगाला/घरांत ठिवाला भींगाम॑.पेटी in sm.
peTeengaNeपेटींगणे.vi.to ignite.(अपाप) जळणे.उन्हाळाच काळांत॑ डोंगूराच वर्च राण अपाप पेटींगणे भरून दपा अम्ही पाह्यलाहों.
peTeengoon yeNeपेटींगून येणे.id.to flare up in anger.उदंड राग करींगणे.कित्तिदपा सांगटलतरीन तो सांगाच गोष्ट ऐकना. येतां-येतां तला पाह्यिलतर॑ मला पेटींगून येते.
peTiपेटि.n.a trunk, either of metal or of wood.लोकुंडाचकी लांकडाचकी पेटि.
peTiपेटि.n.a card board packet or box.रट्टाच पेटि.
peTiपेटि.n.any small container like that of match-box, letter box, a box for keeping keys etc.ल्हान पेटि.
peTiपेटि.n.a large box.संदूक. थोर पेटि.
peTiपेटि.n.a rail carriage.रैल गाडीच पेटि.
peTi peTaaraaपेटी-पेटारा.n.bag and baggage. household goods packed in boxes and bamboo baskets.पेटींतीन बेताच बुट्टींतीन सांभालून ठिवलते घरच सामान. उत्तर-प्रदेशांतीन बीहारांतीन वर्षा-वषी याच जलप्रळयाच समय तिकडल॑ खेडेच लोके त्यंच पेटी-पेटारा उचलींगून गाम सोडून पळाच दृश्य पाह्यलतर॑ मनाला कष्ट वाटल॑.
peTivaNeपेटिवणे.vt.to set fire. to ignite.विस्तु लावणे.पेटवणे/पेटविणे in sm.
peTivaNeपेटिवणे.n.fuel. material used for setting fire.विस्तु पेटिवाला उपयोग होयाच वस्तु. इंधन॑.
pichchaNeपिच्चणे.vt.to tug apart. to tear apart. to pluck out. to open up.उप्पडणे.लोक॑ कष्टि भोगून चोखोट 'गिफ़्ट' काकदांत त्यंच-त्यंच आहेर 'पॅकिंग' करून आणतात॑. पण ते काढिंगणार माकडाच हाति फूलाच माळ मिळलतस्क॑ एक निमिषांत॑ ते पिच्चून उघडूनटाकतात॑. हे पाह्ताना एवढ॑ श्रम भोगून 'पॅकिंग' कराच आवश्य आहेका अस वाटून जात॑.from Tamil. पिचणें in sm means 'to crack, to split, to open out, to burst out' etc
pichkaaपिचका.adj.squeezed.चेंपलते. पिचक॑.
pichkaa pichkaaपिचका पिचका.adj.sticky.चिकटाच॑.कित्ति सांगट्लतरीन ऐकनास्क॑, ते लंकरू गोंदाच डब्बा उघडून डोस्केव॑र घालींगून केंस पूरा पिचका-पिचका करींगट्ला.
pichke~पिचक॑.adj.niggardly. insignificant. very small. slight.कंजूसपण॑.तो कसल॑ दुकानदार ! अम्ही तजकडे एक हदार रुपेच सामान घेट्लतरीन॑ पिचक॑ पन्नास रुपे उणे कराला खाले-व॑र पाह्तो !पिचका in sm means cracked, split, slit. In a figurative sense in sm it also means slight, feeble, flimsy etc.
pichke~पिचक॑.adj.squashed or crushed out of shape.चेंपून विकार झालते. पिचका.आज मला फार बेजार वाटल॑. कां म्हण्जे, पाष्टे मी मझ मोटर-कार मागे काढताना मागल॑ चक्र एक मांदराच वर वेघून तज दोन पांय पिचक॑ झाल॑. ते मांदर भंडीच चक्राच खाले लप्पून बसलते मला कळ्ळ॑ नाही.
piDaariपिडारि.fig.a figurative expression for a very ill kempt or unclean person.पाह्याला ओंगळ(वंगळ॑) अणी अशुद्ध आकाराच मनुषाला सांगाच एक गोष्ट.the expression पिडारि is from पिंडारि, a clan of freelancing plunderers of the 19th century.
piDheeपिढी.n.genealogical descent or succession.वंशच वारस.
piDheeपिढी.n.generation.पिढी.
piDheensoonपिढींसूं.adv.from generations. hereditarily.परंपरांसूं.ते घरचे कितिकी पिढींसू भाग्यवंत लोक॑. एक काळांत तेना एक हदार एकर जमीन होते.
pikalatheपिकलते.adj.ripe.पंडु झालते.
pikaNeपिकणे.vi.to ripen.पंडु होणे.
pikivaNeपिकिवणे.vt.to ripen.पिकिवून काढणे. ओरे घालून पिकिवणे. पिकवणे in sm.
piLaaपिळा.n.a woman's hair intertwined and twisted with a thin towel after a hairbath in order to dry it.आंघोळीच नंतर वाळा करतां चौकांत॑ गुंडाळलते केंस. हे काळांत "हेरड्रैयर" मिळ्ळ तर॑ पणीं बायका पिळा घालिंगतात॑. कारण, "ड्रैयरांतून" याच ऊब वार॑ केंस झडिवते म्हणून तेना वाटते.
pilluपिल्लु.n.newly born young one of an animal or bird.उजून जास्ति दिवस झाल नाहीते एक प्राणि.
piLNeपिळणे.vt.to twist and squeeze. to wring. गुंडाळून चेंपणे. मुरडून चेंपणे.पिवळा in sm.
piLoon kaaDhNeपिळून-काढणे.fig.to harass no end. take through the wringer.प्राण काढास्क॑ तंटा करणे.
pinDपिंड.n.rice ball offered as oblation to ancestors.पितृलोकांस॑ श्राद्धाच वेळ द्याच भाताच गोळा.
pinD pradaanपिंडप्रदान.n.offering of rice balls as oblation to ancestors.पितृलोकांस॑ श्राद्धाच वेळ भाताच गोळा देणे.

No comments:

Post a Comment