Tuesday, April 1, 2014

sh (श) 2 (shevagaa To shyaam)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
shevagaaशेवगा.n.drumstick.एक रीतीच भाजीपाला.
shevanthiशेवंति.n.marigold.पिवळ॑, नाहीतर॑, काषाय रंगाच एक फूलाच नाव.
shevaTeeशेवटी.n.thereafter. subsequently.नंतर.मी सांगाच पूरा सांगणे झाल॑. शेवटी तो काय केला, हे मला कळना.The word शेवटि is used by DMs more often to mean "thereafter or subsequently" than the original meaning "at the end".
shevaTeeशेवटी.n.the end.(एकाच॑) अंतहे पंक्तींत शेवटी बसलाहत मनुषाला सांभार वाडल॑ नाही वाटत॑.
shevaTee shevaTeeशेवटी शेवटी.adv.towards the end.शेवटि होतां-होतां.
shevaTeeche~शेवटीच॑.adj.of or belonging to the end.शेवटच॑. शेवटल॑ शेवटचा in sm.
shevaTle~शेवटल॑.adj.of or belonging to the end.शवेटीच॑.शेवट in sm.
shevaTorशेवटोर॑.adv.till the very end.शेवटोरि. शेवट पतोरि. शेवटी पर्यंतीन.
shevaToreeशेवटोरी.adv.till the very end.शेवटोर॑. शेवट पतोरि. शेवटीटि पर्यंतीन.
shiDivaNeशिडिवणे.vt.to irritate.चिडिवणे.चिडविणें/चिडवणे in sm.
shiDka~शिडक॑.adj.irritable.चिडणार. शिडका in sm.
shiDkaNeशिडकणे.vi.to become peevish. to whine.चिडकणे.
shiDkorशिडकोर.adj.peevish. irritable. hot-tempered.लोक्कर र्राग येणार. चिडकोर.
shiDNeशिडणे.vi.to get irritated.चिडणे.
shijaNeशिजणे.vi.to get cooked.सिजणे. शिजून तय्यार होणे.
shijivaNeशिजिवणे.vt.to cook.सिजिवणे. शिजिवून काढणे.
shikaNeशिकणे.vt.to learn.वाचणे-लिव्हणे कळींगणे. शिक्षण करणे
shikarNe~शिकरण॑.n.mashed bananas/mango with milk or curds and sugar.तावून घट्टि केलते दूधांत॑, नाहीतर, नुस्त॑ दहींत॑ साखरे मिळिवून, अंबा/केळ कोळून तय्यार कराच एक तोळ्लावण॑.चप्पाती बरोर अंबाच शिकरण॑ तोळ्लाविंगाला फार रूच अस्त॑.
shikharशिखर.n.mountain peak.डोंगूराच एकदम वर्च स्थल॑.
shikivaNeशिकिवणे.vt. to teach.शिकिवून देणे शिकवण in sm.
shikkaaशिक्का.n.seal. stamp.मुद्रा.
shikShaaशिक्षा.n.punishment.दंड.
shikShaaशिक्षा.n.teaching. educating.शिकिवणे. विद्याभ्यास करिवणे.
shikShakशिक्षक.n.teacher.पंतोजी.
shikShaNशिक्षण.n.education.विद्याभ्यास. वाचणे-लिव्हणे.
shilaaशिला.n.a stone.धोंडा.
shilaaशिला.n.a stone memorial.धोंडांत॑ केलते स्मारक॑.
shilaasthaapana~शिलास्थापन॑.n.foundation stone laying ceremony.एक नव वास्तु/बांधणीच काम आरंभ करा पुढे ते भूमींत॑ एक मुख्य धोंडाला स्थापना कराच सण॑.
shiLe~शिळ॑.n.stale food.जुने होऊन खायाला योग्य नाहीते पदार्थ. शिळा in sm.
shiLe~शिळ॑.adj.stale.जुने होवून नासलते. हाळ झालते ;शिळा in sm.
shilpशिल्प.n.a stone statue.धोंडांत॑ केलते विग्रह॑.
shilpakalaaशिल्पकला.n.handicraft.हातांत केलते कला वस्तु.
shilpashaastra~शिल्पशास्त्र.n.the science or art of sculpturing.शिल्पविद्या.
shilpavidyaaशिल्पविद्या.n.the science or art of sculpturing.शिल्पशास्त्र
shilpeeशिल्पी.n.an artisan who works on stone.धोंडांच शिल्पकला करणार.
shimbaDaNeशिंबडणें.vt.to blow nose. नाकांत्सून शिंबडा जोरान टाकणे. नाक शिंबडणे.
shimbDaaशिंबडा.n.mucus from the nose during an attack of common cold.पडसामुळे नाकांतून गळाच द्रव्य. शेंबूड.पडसा आलतर शिंबडा पुसिंगाला कागदाच 'टिश्यू' उपयोग करा पक्षा रूमाल उपयोग करणे चोखोट.
shimpशिंप.n.seashell.चिप्पि.अम्ही ल्हान अस्ताना अम्च घर समुद्राच जवळ होत॑. तम्हा नित्य संध्याकाळी समुद्राकडे जावून शिंप हुडुकून काढणे अम्च एक खेळ होत॑.
shimpaDNeशिंपडणे.vt.to sprinkle.शिंतडणे.
shimpeeशिंपी.n.tailor.दर्जी.
shimpeeशिंपी.n.a person belonging to the shimpi caste.शिंपी वर्गांत॑ मिळालते एक मनुष.
shingशिंग.n.horns.कित्येक मृगांच डोस्के वर असाच हडाच अवयव. कोंबु (Tamil).
shiNgaarNeशिणगारण॑.vt.to apply make-up. to indulge in (personal) beautification to make one attractive to others.दुसरेला आकर्ष कराला स्वताला सौदर्य करींगणे.अत्तच पोरींस॑ बाहर निघा पुढे शिणगार करींगाला एक-दीड घंटा वेळ पह्जे.शृंगारणे in sm.
shinkaNeशिंकणे.vi.to sneeze.पडसामुळे, नाहीतर॑, नाकाला उपद्रव होताना जोरांत॑ वार॑ बाहेर सोडणे.
shinkarNeशिंकरणे.vt.to blow nose to remove mucus from nostrils.शेंबूड बाहेर काढाला जोरांशी श्वासाच वार॑ बाहेर करिवणे.
shinthaDNeशिंतडणे.vt.to sprinkle.शिंपडणे.
shinthaDNeशिंतडणे.vi.to fall in drops. to sprinkle.शिंपडणे.
shinthoDeशिंतोडे.n.light drizzle of a few rain drops (from a few passing clouds).शिंपडून पडाच पाऊस. एक-दोन बूंदाच बरीक पाऊसशिंतोडे पडताना गांवाला निघताने म्हणून सांगणे आहे.शिंतोडा/शिंतडा in sm.
shipaarasheeशिपारशी.n.recommendation.उपयोग/लाभ होया करतां दुसरेंच श्रद्धाला आणिवणे.
shipaayeeशिपाई.n.a soldier.सिपाही. सेनाच शिपाई.हे काळच भांडणांत शिपाईंच शाहणपणा बरीस त्यंच शस्त्र कित्ति नव आहे म्हणाचेच जास्ति महत्व.
shipaayeeशिपाई.n. a police constable.सिपाही. पोलीसवाला.
shiraaशिरा.n.muscles.आंगांतल॑ मांस॑.
shiraaशिरा.n.arteries. veins.आंगांत॑ रक्त पळाच अवयव॑.मी ल्हान असताना मझ माय॑ सांगतील "शिरा थाटिंगून कशालरे वरडतोस॑" काय सांगामकी जवळ येऊन हळू सांगकां. अम्ही कोणहीं किंबड॑/किवड॑ झालों नाही".
shiraaशिरा.n.nerve.शिरा.
shiraaशिरा.n.guts. bowel.शिरा.
shiraaशिरा.n.veins or fiber of a leaf, plant etc.झाडाच, पानाच नार॑ (Tamil). अम्ही झाडाला घालाच पाणी/ पाऊसाच पाणी अणी तज बरोर असलते "एरुवू" झाडाच शिरावाटे फांटाला जाऊन पावत॑ अणी फांटासून पालाच शिरावाटे तेवढ॑ भागालीन पावत॑.
shirastedaarशिरस्तेदार.n.head clerk in a court of law.कचेरीच (न्यायालयाच/कोर्टाच) मुख्य गुमास्ता. such nomenclature is hardly used nowadays.
shiseशिसे.n.the metal lead.एक विधाच धातू. सीस.
shisech thappelशिसेच तप्पेल.n.a round cooking vessel made of lead.शिसेंत करलते गोळ आकाराच तप्पेल. सीसांत करलते गोळ आकाराच भांडि.(1) these vessels are normally used for making sar on account of the unique taste they impart to it. (2) शिसें / सीस is lead.
shiShTशिष्ट.adj.residual.बाकी असाच॑. उरलते. अवशिष्ट.
shiShTaachaarशिष्टाचार.n.social etiquette.संसारांत चोखोट वागणे.
shishuशिशु.n.child.लेंकरु.
shishuvihaarशिशुविहार.n.a kindergarten.ल्हान लेंकरांच खेळ-साळे.
shiShya~शिष्य.n.a disciple.गुरुजीच अनुयायी.
shiShya~शिष्य.n.student.विद्यार्थि.
shiShyagaNa~शिष्यगण॑.n.a group of disciples.शिष्य लोकांच गुंप.
shiththiशुत्ति.n.hammer.हतोडि.अम्च गामांत प्लंबर, इलेकट्रीषन हेनी अस्कीन कामाला येताना हात हलींगून येतात. पह्जते साधन एकहीं आणत नाहीते, "कट्टिंग प्लैर" आणलतर, शुत्ति आणनात. तेच ठींगून शुत्तीस्क॑ उपयोग करतील॑. हेनी केम्हा सुधरतीलकी ? from Tamil.
shiva~शिव.n.Lord Siva.महादेव.
shivaaशिवा.n.scolding.हाक्का मारणे.शिवी in sm.
shivaa deNeशिवादेणे.vt.to scold.हाक्का मारणे.
shivaa khaaNeशिवा खाणे.vi.to get scolded.शिवा मिळणे.
shivalingशिवलिंग.n.Shivaling, the linga form of Lord Siva.पूजा कराला उपयोग कराच शिवाच लिंगप्रतिमा.
shivaNeशिवणे.vt.to touch (with hand).(हातावाटी) लागिवणे. स्पर्श करणे.
shivaNeशिवणे.vt.to stitch.सूईं-दोरांत॑ कापडा शिवणे.
shivaNeशिवणे.vt.to do tailoring work.वस्त्र करणे.
shivaraathriशिवरात्रि.n.a religious ceremony for Lord Siva.महादेवाच एक मुख्य पूजाच सण.
shlokश्लोक ndevotional poem.भक्ति गाण॑.
shmashaanश्मशान.n.burning ghat.स्मशान. प्रेत जळिवाच ठिकाण. हे काळांत जास्ति-जास्ति लोक॑ प्रेत श्मशानांत॑ जळिवापक्षा इलेक्ट्रिक क्रिमटोरियमांत जळिवतात.
shmashaanश्मशान.n.cemetery. burial ground.स्मशान. प्रेताला भोईच आंत समाधि कराच ठिकाण.
shobhaaशोभा.n.splendour. lustre.कांति. वैभव.
shodaaशोदा.n.scamp. scoundrel. rouge.सोदा. लबाड मनुष.
shodapaNa~शोदापण॑.n.roguishness.सोदापण॑. लबाडपण॑.
shodhशोध.n.search. investigation. scrutiny.अन्वेषण. हुडकणे.सी.बी.ऐ वाले सरकाराच सूचना प्रकार चूक केलते लोकांच शोधना करतात॑, पण त्यंचमधेच कित्येकदन अक्रम करणार आहेत. त्यना कोण शोधतील॑ ?
shodhanशोधन.n.cleansing or refining (by straining thru' a sieve/cloth).(झरडींत, नाहीतर, फडकांत॑) शुद्ध करणे. श्रीखंड कराला दहीं एक पत्तळ कापडांत बांधून लोंबत सोडतील॑. तजांत्सून पाणी शोधून काढलावर ते फडकांत असाच घट्टि पदार्थ (चक्का) काढून तज बरोर साखरे, केसर वगैरा मिळिवून श्रीखंड करतील॑.
shok~शोक.n.grief. sorrow.दुख. संकट.
shok~ vichaarNeशोक विचारणे.vt.to offer condolences (on occasion of death).(मरण समय) संकट व्यक्त करणे.
shombereeशोंबेरी.adj.lazy.प्रयत्न कराला इष्ट नसणार. आळसी. from Tamil.
shomberipaNa~शोंबेरिपण॑.n.laziness.प्रयत्न कराला इष्ट नसणे. आळस. from Tamil.
shoodra~शूद्र.n.Sudra, the fourth caste in Hinduism.हिंदु धर्मांतल॑ एक वर्णाच नाव.
shoodra~शूद्र.adj.a person belonging to the Shudra caste.शूद्र जातीच एक मनुष.
shoodreene~शूद्रीण॑.n.a woman belonging to the Sudra caste.शूद्र वर्गांतल॑ एक बायको.
shoodreene~शूद्रीण॑.n.a maid-servant.कामवाली.
shoolशूल.n.spear.युद्धाच एक उपकरण॑.
shooLशूळ.n.pain.सूळ. वेदना. दुखणे.शूळ/शूल in sm.
shoolamशूलम.n.the inauspicious direction to be avoided for the first outbound journey of the day, from one’s home or temporary residence. दिशाशूलम. घरांत्सूनकी, सद्या राह्यलसाच ठिकाणांत्सूनकी निघाच दिशा. दिवसाच पह्यिलच॑ यात्रा हे दिशाला असणे अशुभ म्हणून आहे. this direction varies from day to day.
shoonya~शून्य.n.the numeral zero.पूज्य अंक. पूज्य संख्या.the earliest recorded date of "zero" has been identified as around the 3rd century AD recently (Sep 2017) by a research team in Oxford University by carbon dating the Sanskrit birch bark manuscript discovered in Bakhshali village in present day Pakisthan. The manuscript tells that the work was compiled by "a brahmin the son of Chajaka, for the use of Vasiṣṭha's son Hasika".
shoonya~शून्य.n.एकीहीं नाहीते ठिकाण.
shoonyaakaashशून्याकाश.n.inter-stellar space. outer space.नक्षत्रांच मध्द्यल॑ ठिकाण. अंतरीक्षाच बाहेरच ठिकाण.
shoora~शूर॑.adj.valiant.निर्भय. वीर॑.
shoorapaNa~शूरपण॑.n.valour.वीरपण॑.
shourya~शौर्य.n.courage. valour.शूरपण॑. कित्येकदपा शौर्य असाच बरीस विवेक असणच॑ चोखोट. उदाहरणाला रात्रीच वेळ जास्ति वागे नाहीते ठिकाणी कोणतरीं चूरी दाखिवून चोराला पाह्यलतर॑ ते समयाला तो विचाराच देवूनटाकून येणेच बर॑.
shraaddhश्राद्ध.n.annual death ceremony.वार्षिक॑. वर्षा-वर्षी कराच पित्रुकार्य.
shraavaNश्रावण.n.Shravana, the fifth month of the Hindu year.हिंदु पंचांकांत॑ पांचवां महिना.
shraavaNeeश्रावणी.n.the ceremony of changing the sacred thread annually.उपाकर्म. वर्षा-वर्षी जानव॑ बदलिवाच सण॑.(1) कोठ-कोठ रायर-मठ आहेकी तथे अस्कीन सर्व-श्रावणी चालिवतात॑. (2) मठाला जायाला वेळ नाहीते कित्येक लोक॑ घरांतच एक "वी-सी-डी" ठींगून श्रावणी करींगतात.
shraddhaaश्रद्धा.n.intense attention.गाढ निष्टा.
shrama~श्रम.n.effort. labour.परिष्रम.
shrama~श्रम.n.difficulty.कष्ट. आयास.
shramadaanश्रमदान.n.voluntary labour offered free.दुसरेंच उपकाराकरतां नपैसेला कराच काम.
shreeश्री.adj.a form of salutation for men, being the short form of Shreeman.दादिगेंच/दाद्ग्येंच नावाच पुढे लिव्हाच एक बहुमान॑ गोष्ट. "श्रीमानाच" एक ल्हान रूप.
shreeश्री.n.Goddess Lakshmi.लक्ष्मी देवी.
shreekaanthश्रीकांत.n.Lord Vishnu.महाविष्णु.
shreekhanDश्रीखंड.n.a sweet and sour dish made from curds, sugar and spices.दहींतून केलते एक अंबट-गुळ्चीट पदार्थ.अवसरांत॑ श्रीखंड पह्जतर॑ 'अमुल' कंपनीच श्रीखंड घेऊया. ते फारच स्वादिष्ट अस्ते.
shreemaanश्रीमान.adj.a term of respectful salutation addressed to men, meaning "one who is endowed with prosperity and wealth".दादिगेंच/दाद्ग्येंच नावाच पुढे लिव्हाच एक बहुमान॑ गोष्ट. हेज अर्थ आहे "ऐश्वर्यवान".
shreematheeश्रीमती.adj.a form of salutation addressed to women, meaning "one who is endowed with prosperity and wealth".बायकांच नावाच पुढे लिव्हाच एक बहुमान॑ गोष्ट. हेज अर्थ आहे "ऐश्वर्यवती".
shreShTHश्रेष्ठ.adj.reverential.आदरणीय.
shreShTHश्रेष्ठ.adj.best.उत्तम॑.
shRingaarशृंगार.n.romance.प्रीति भाव.
shRingaar shaasthra~शृंगारशास्त्र.n.science or art of love.काम शास्त्र.
shRingaareeशृंगारी.n.enchantress.कामिनी.
shubha vivaahशुभविवाह.n.an auspicious wedding.एक चोखोट वराड.
shubha~शुभ.adj.auspicious.मंगल॑.
shubha~शुभ.n.an item or event marking auspicious end of a programme.एक कार्यक्रमाच शेवटीच मंगल भाग.कोणीं मरून त्यंच अंत्य कार्यक्रम पूरा झालांपिरी शेवटीच दिवस कराच कार्यक्रमाला "शुभ॑" अस॑ सांगतात॑.
shubhaangiशुभांगी.n.a beautiful woman.एक सुंदर स्त्री. uisमझ बहिणीच एक मित्राच नाव शुभांगी. नावा जोक्त॑ पाह्याला पणीं तिन॑ फार सुंदर आहे.
shubhakaarya~शुभकार्य.n.auspicious function.देव पूजा, वराड, मुंज, आराधना, सण॑ असलते मनाला संतोष द्याच कार्य.
shubhalakShaNa~शुभलक्षण॑.n.auspicious aspect.चोखोट लक्षण॑.
shubhamशुभम.n.the last song in a kacheri.गाणेच कचेरींत॑ शेवटलते गाण॑.
shuchiशुचि.adj.clean.शुद्ध.
shuddhशुद्ध.adj.clean.शुचि असाच. शुचि झालते.
shuddhशुद्ध.adj.correct.चूक नाहीते.
shuddhशुद्ध.adj.pure.पवित्र.
shuddhशुद्ध.adj.unadulterated.उणे गुणाच मिळिवनाते.
shuddhaangशुद्धांग.adv.in the purest sense.शुद्ध विना वेगळ॑ कोण्तीन नाही म्हणाच अर्थ.पहिल॑ पहिल॑ तेनी डेल्हींत॑ असताना त्यांस हिन्दी शुद्धांग कळ्ळ॑होत नाहीतरीन, फार लोक्कुरेच हिन्दी बोलाला शिकींगटलेthis usage is generally made to indicate and in combination with "the utter absence of" a thing, sense, feelings etc.
shuddheekaraNशुद्धीकरण॑.n.ritual purification.धर्माच अनुसार पवित्र करणे.
shuddhodaka~शुद्धोदक.n.pure sacred water used in puja.पूजाला उपयोग कराच श्रेष्ठ पाणी.
shukla~शुक्ल.n.white.पंढ्र रंग.
shuklapakSha~शुक्लपक्ष.n.the white fortnight leading to the Full Moon.पौर्णमी पर्यंतल॑ चौदा दिवस.
shukra~शुक्र.n.the planet Venus.एक ग्रहाच नाव.
shukradashaaशुक्रदशा.n.fortunate times.भाग्याच काल.
shukravaarशुक्रवार.n.Friday.गुरुवाराच नंतरल॑ दिवस.शुक्रवार मीठ घ्याला चोक्कोट वार॑ म्हणून सांगणे आहे.
shuruशुरू.n.begin. start.आरंभ.
shushrooShaaशुश्रूषा.n.nursing. diligent and watchful waiting upon or service.सेवा.हॉस्पिटलांत॑ एक ॲपरेषन झालनंतर तिकडल॑ नर्स लोकांच शुश्रूषा पणीं चोखोट असलतर अम्हाला मनाच त्रूप्ति होईल॑
shvaasश्वास.n.breath.नाकावाटी आंत॑ काढाच वायु.
shvaas dharNeश्वास धरणे.n.breathlessness.श्वास कराला कष्ट होणे.
shvaas dharNeश्वास धरणे.vi.to hold breath.श्वास काढून आंतच ठींगणे.
shvaasochcHaasश्वासोच्छास.n.respiration.नाकावाटी वायू आंत॑ काढणेहीं बाहेर सोडणेहीं.
shyaamश्याम.adj.dark blue.गडद॑ नील॑.

No comments:

Post a Comment