Tuesday, April 1, 2014

p (प) 4 (piNNaak To prajaapathi)






.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
piNNaakपिण्णाक.n.oil cake.पेंड. तेल पूरा पिळून काढल॑ नंतर उरलते बींच शिष्ट. from Tamil.
pipalपिपळ.n.pipal tree.अश्वथ झाड
pireeपिरी.suff.a suffix implying 'there after'."झाल नंतर॑/झाल व॑र", हे अर्थ द्याच एक प्रत्यय (उदा: जेवलांपिरी, केलांपिरी etc.).this appears to be derived from the Tamil word "पिरकु", meaning "there after".
pisaNeपिसणे.vt.to grind to a powder.पीठ करणे.
pishaachपिशाच.n.devil. ghost. भूत.
pishveeपिशवी.n.cloth bag.कापडाच थैली.
pisthaaपिस्ता.n.pistachio.वाळिवून खायाच एक वर्गाच बीं.पिस्ता belongs to the cashew family.
pithraajutha~पित्राजुत.adj.ancestral.पूर्वजां कडून आलते.
pithruपितृ.n.departed ancestors.पूर्वज.
pithru devathaaपितृ-देवता.n.devathas in charge of departed souls.पितृ-आत्मांच देवता.
pithrukarma~पितृकर्म.n.religious duties towards one's ancestors.श्राद्ध॑.माय बापांच वार्षिक पितृकर्म चुकनास्क करणे अम्च कर्तव्य आहे.
pithrulokपितृलोक.n.the region of manes/ancestors.पितृ-आत्मांच/पूर्वजांच लोक.घरांत काहींतरीं चोखोट कार्य (वराड, मुंज अस॑) कराच पुढे नांदि बसिवतों. ते समय अम्हि पितृलोकांतून अम्च पितृना निमंत्रण देवून घरच कार्यक्रम बेष चालिवाला प्रार्थना करतों.
pithrupakSha~पितृपक्ष.n.the second fortnight of the month of Bhadrapada during which ceremonies are conducted for departed ancestors.भाद्रपद महिनाच कृष्णपक्षांत पितृ लोकांस कराच श्राद्ध संप्रदाय.
piththa~पित्त.n.bile.जेवण जीर्ण कराला सहाय कराच एक द्रव्य.
piththa~पित्त.n.a disorder due to improper digestion.बरोर जीर्ण होयना करतां याच एक दोष.
piththaashayपित्ताशय.n.liver.पित्त उत्पन्न कराच अवयव.
piTLeपिट्ळे.n.a sambhar like preparation.एक कालिवणे.पिठले in sm.
pittaLपित्तळ॑.n.brass.पिवळ॑ रंगाच एक मिश्रधातु.
pivLe~पिवळ॑.n.yellow colour.पिवळ॑ रंग.
pochaaपोचा.n.a dent (in a vessel etc).पोंचा. (पात्र/भांडि) चेंपून झालते विकार॑.
pochaNeपोचणे.vi.to reach.जावून पावणे.
pochivaNeपोचिवणे.vt.to convey (to another place).(दुसरेकडे) घेवून जाणे.पोचवणे/पोचविणे in sm.
poDiपोडि.n.a piece of cooked vegetable in sambhar, pitle etc.सांभार, पिट्ळे असल्ते कालिवणांतल॑ भाजीच चूर. फोडि.
pogaNeपोगणे.vt.to swim.पोवणे. पोहणे. नीचल करणे (Tamil).
pogaNeeपोगणी.n.swimming.पोवणी. पोहणी. नीचल (Tamil).
pohaaपोहा.n.beaten parched rice.भिजिवून कुटून चपटा केलते तांदूळ. पोहे.
pohaNeपोहणे.vt.to swim.पोगणे. पोवणे.
pohaNeeपोहणी.n.swimming.पोवणी. पोगणी.
poheपोहे.n.beaten parched rice.भिजिवून कुटून चपटा केलते तांदूळ. पोहा.
pokaLपोकळ॑.adj.hollow or loosely tied/packedपुसक॑
pokaLaaपोकळा.n.a leafy vegetable. एक विधात पाला. दक्षिणी मराठी लोकेंत॑ कित्येकदन॑ मोळैकीरेला पोकळा म्हणतात॑ अणी दुसर॑ कित्येकदन॑ अरैकीरेला पोकळा म्हणतात॑.
pokhaarपोखार.fig.lightly. slightly. not deep. superficially.व॑रून. जास्ति जोर नाहीस्क॑तला मोटर बैकांतून खाले पडून पोखार म्हणून घाव लागलाहे.पोखर/पोखार in sm.
pokhaarपोखार.n.a covered hollow cavity (in walls, trees etc, usually caused by the gnawing of insects, rodents etc.).अळा, कीडा असलते चावून झालते. (साधारण होऊन भिंत, झाड असल्यांत॑).
pokiriपोकिरि.n.scoundrel. scalawag. rascal. scamp.सोदा. from Tamil.
poLeeपोळी.n.a flat sweet preparation.लाटून कराच एक गुळ्चीट पदार्थ. पोळी in sm also means 'chapati'.
poLeengaNeपोळींगणे.vt.to get heated or scald on oneself.अपाप लासींगणे.
poLivaNeपोळिवणे.vt.to make very hot.फार ऊन करिवणे.
poLNeपोळणे.vi.to become very hot.एकदम ऊन होणे.
poLNeपोळणे.vi.to scald.लासणे.
pompaDaaपोंपडा.n.blisters.आंगावर याच पू/नित्तळ द्रव्य भरलते सूज॑/फोड॑.कडत पाणी आंगाव॑र पडून समच तज व॑र हिंस पाणी घाट्लतर॑ पोंपडा होईल. तज व॑र 'बर्णाल' असल॑ मल्लम लावलतर॑ पोंपाडा लोक्कर वाळून बर॑ होईल.
poNaavaanTaaपोणावांटा.n.mostly.अधिकपक्ष॑.Note :- (1) The word appears to be derived from पाउणे meaning 'three-fourths' and वांटा meaning 'share'. A similar uasage in Tamil is मुक्कालवाशी (मुक्काल+वाशी). (2) In sm पाऊणवांटा means "three fourths" and "the greater quantity, majority" (fig).
poNaavaanTaaपोणावांटा.n.a majority of. a large number of.असाचांत॑ जास्ति भाग.
ponchaaपोंचा.n.dent on a surface.तळावर झालते एक ल्हान टोंचा.अम्ही गेल रविवार पोंचा पडलते पात्र पूरा दुकानाला घेऊन जाऊन बरोर करींगून आलों.
ponchaNeपोंचणे.vt & vi.to reach.जावून पावणे. पोचणे.
ponchivaNeपोंचिवणे.vt.to convey (to another place).(दुसरेकडे) घेवून जाणे. पोचिवणे.पोचवणे/पोचविणे in sm.
poNNeech bhaathपोण्णीच-भात.n.a type of rice preparation with garnishings.फोड्णीच-भात. फोड्णी घालून केलते एक रीताच भात/पदार्थ.
poNNeech saambhaarपोणीच-सांभार.n.a type of sambhar.एक रीताच सांभार. फोड्णीच-सांभार.
poNNeech saarपोणीच-सार.n.a type of dilute rasam.गोड-सार. गोढ-सार. फोड्णीच-सार.
poNNiपोण्णि.n.garnishing with mustard, jeera etc in hot oil.फोड्णि. मोहरेहीं जीरेहीं तावलत॑ तेलांत॑ घालून संपाकाच पदार्थांत॑ घालाच॑. better फोड्णी, rather than the Tamilised version पोण्णि.
poo*पूं .n.pus.पिकलते फोडांतून याच पिवळ॑ रंगाच मळक द्रव्य.पू in sm.
poo*sपूंस.n.tail.प्राणींच एक अवयव.Note :- पुच्छ/शेपूट in sm. Though the Marathi word शेपूट was in use in earlier times in DM as शेंपूट, this seems to have fallen out of use and instead the word पूंस which has it's root in the Sanskrit पुच्छ has gained currency with DMs. The word पुच्छ is rarely used in SM. This is a rare case where SM has retained the old word, while DM has dropped it.
poo*s gunDaaLingoon basaNeपूंस गुंडाळिंगून बसणे.id.to sit quietly without creating any problem.तंटा/उपद्रव करनास्क॑ उगे बसणे.
poo*s laamb karNeपूंस लांब करणे.id.to create or start some unwanted trouble.आवश्य नाहीते तंटा आरंभ करणे.
poo*s laamb karNeपूंस लांब करणे.id.to show off as a smart alec (unnecessarily).(आवश्य नाहीस्क) षाणपण॑ दाखिवणे.
poo*s nakShathra~पूंसनक्षत्र.n.comet.धूमकेतु. शेंडीनक्षत्र.
poochiपूचि.n.a maggot or worm.किडा. अळा. कृमि.from Tamil.
poochiपूचि.n.an insect.पूचि. कीडा. कृमि.from Tamil.
poochiपूचि.n.intestinal worms.पोटाच पूचि/कृमि.from Tamil.
pooDपूड.n. powder.पुडि. पोडि. चूर्ण.
pooD puTaaNi.n.पूडफुटाणि.n.smithereens.चूर-चूर (होणे). चुक्कु-नूर. uisअर्सांत॑/"ग्ळासांत॑" केलते एक नव घडिगार मी घेऊन एक वार झाल नाही. तजपुढे ते खाले पडून पूडफुटाणि झाले.
pooD puTaaNi.n.पूडफुटाणि.n.(to be) lost for ever.सत्यनाश (होणे).दहा-पंध्रा वर्षा पुढे उदंड लोक "वी.अर.एस" घेऊन त्यंच हाती आलते पंध्रा-वीस लाख रुपे पाह्तांसून एकदम खुशी झाले. पण व्यापार करतों म्हणूनकी, अनाव्श्य खर्च करूनकी दोन-तीन वर्षांत ते पैसे पूडफुटाणि होऊन गेले. नंतर तेनी जेवालाच कष्टि भोगत होते.
poojaaपूजा.n.worship of Gods.देवाला कराच आराधना.
poojaa saamagriपूजासामग्रि.n.items used for performing puja.पूजा कराला उपयोग कराच साधन॑.
poojaagharपूजाघर.n.puja room in a house.देवघर. पूजाच खोलि.
poojaapaaTHपूजापाठ.n.reading of religious books.पूजापुस्तक॑ वाचणे. पारायण॑.
poojaapunaskaarपूजापुनस्कार.n.worship and the associated religious procedures.पूजा अण्खी पूजाला संबंध झालते कार्यक्रम.मझ काकाच घरांत नित्य साळिग्राम पूजा करुन तीर्थ घेटला नंतरच जेवतीले. अम्च घरांत॑ तस न्हो. सणाच दिवस मात्र अम्ही साळिग्रामाच पूजा करतों. वेगळ॑ साधारण दिवसांत अस्कीन देवाच दिवा लावून श्लोक॑ सांगणे विना, जास्ति पूजापुनस्काराच पद्धत नाही.पूजापुरस्कार in sm.
poojya~पूज्य.adj.respectful.आदरणीय.
poojya~पूज्य.n.the numeral zero.पूज्य संख्या. शून्य.
pooraaपूरा.adj.complete. full. पूर्ण. पूर्ती. पूर्त.पूरा काम करूनटाकून मला येऊन पा.
pooraaपूरा.adv.fully. completely. totally.संपूर्ण. पूर्ण.तुझ॑ जेबांत काय काय आहे की, ते पूरा दे मला.
pooraNपूरण.n.sweet stuffings in a sweet.पूरणपोळि, सोमाशा असल॑ पदार्थांत॑ भराच गुळ्चीट पदार्थ. पूर्ण.
pooraNpoLiपूरणपोळि.n.a sweet pancake like preparation.पूरण घालून केलते एक गुळ्चीट पदार्थ.
poorNपूर्ण.adj.full.भरलते.आज अम्च॑ घरांत पूर्ण कलश ठिऊन पूजा होत॑.
poorNपूर्ण.adv.fully.पूर्ण. आज त्रयोदशी. म्हणजे, चंद्र पूर्ण होयाला अण्कीन दोन दिवस आहे.
poorNपूर्ण.n.sweet fillings in a sweetmeat.पूरण. एक पदार्थाचांत॑ भराच गुळ्चीट पदार्थ.मैदाच पूर्णाच पक्षा खोब्रीच पूर्ण बर॑ असल॑.
poorNaahuthiपूर्णाहुति.n.final oblation to deities while performing a homa.होमाच शेवटि देवांला कराच अर्पण॑.
poorNchandra~पूर्णचंद्र.n.full moon.पौर्णमीच चंद्र.
poorNimaaपूर्णिमा.n.full moon.पौर्णमि. पौर्णिमा. पुनव. पुनवे. पुनेव.
poorthपूर्त.adv.exclusively.मात्र. केवळ.त्यांस॑ डयबीटीस आहे वाटते. कां म्हणजे गुळ्चीट पदार्थ पूर्त सोडून बाकि सग्ळीन (तेवढीन) खाल्ले.
poorthपूर्त.adv.only.मात्र. केवळ. (1) ते परीक्षा लिव्हाला शेवटी वीस लेंकरे उरल॑होते. त्यांत मझ॑ नातू पूर्त जिंतला. (2) अम्च घरांत काल॑ सत्यनारायण पूजा होत॑. बलावलते अग्गिदनीं आले तरीन, शेदारच॑ (शेजारच॑) लोके पूर्त आल॑ नाहीत॑.
poorthपूर्त.adv.in entirety to itself/oneself.पूर्त.तज मागे पडाच आवश्य नाही. तज पूर्त तो नीट वाचींगल॑.
poorthपूर्त.adv.entirely. totally. fully.संपूर्ण होवून.तो सांगाच पूर्त लटक॑ विना वेगळ॑ काहीं असना.
poorthपूर्त.adv.completed. readied.पूरा झालते. तू करत होतते काम पूर्त झालतर॑ इकड॑ येशीलका ?
poorva~पूर्व.adj.former. earlier.पुढे (झालत॑). प्राचीन.
poorva~पूर्व.n.east.सूर्य उदय होयाच दिशा/दिक्.
poorvaashramपूर्वाश्रम.n.any of the earlier stages in the four ashramas ordained in a man's life.ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ अणि सन्यास अस एक मनुषाच जीवनांतल॑ आश्रमांत अमुक आश्रमाच पुढे याच आश्रम॑.सन्यासाश्रम घ्याच पुढे श्री राघवेंद्रस्वामीच पूर्वाश्रम नाव "वेंकटनाथा" म्हणून होत॑.
poorvaja~पूर्वज.n.ancestor.पूर्वज.
poorvajanma~पूर्वजन्म.n.previous birth.पुढ॑च जन्म.
poorvakaalपूर्वकाल.n.ancient times.पुरातन काल.
poorvakaalपूर्वकाल.n.earlier times.जुने काल. अगाऊच काल.
poorvakarma~पूर्वकर्म.n.consequences of deeds done in the earlier lives.गेलते जन्मांत॑ केलते कार्यांच कर्म.
poorvasthhithiपूर्वस्थिति.n.former state. former condition.पुढ॑च स्थिति.
poorveecha~पूर्वीच॑.adj.former. earlier.पुढच॑.
poorveepasoonपूर्वीपसून.adv.earlier onwards.पुढ॑ पसून.पूर्वीपासून in sm.
poorveesaarkha~पूर्वीसारख॑.adv.like in the past.पुढ॑ कस होतकी तस॑.
poorvika~पूर्वीक.n.ancestry. lineage.वंश. कुल-गोत्र. मझ बापा म्हणाले "तज पूर्वीक काय, तज आजा, पणजा, अण्खीन किती थोर कामांत होते, हे सर्वीन कळणास्क॑ तू ओळरू नको/डोस्क नाहीस्क बोल नको/बोलूको".
pooT ambaaपूट अंबा.n.baby mangoes just appearing in trees.नव विणी झाडांत सुटलते ल्हान कोवळ॑ अंबा. ताकभाताच बरोर पूट अंबाच लोण्चे खायाला भरून रूच असेल. Note :- पूट करणें or घेणें in SM means "to estimate and purchase the coming crop of fruit-trees (esp. of the jack, mango, and tamarind). पूट देणें To sell the coming crop".
porपोर.n.a boy.दादिगा (दाद्ग्या) पोर.
poraaTika~पोराटिक॑.adj.childlike.लेंकरा सार्खल॑ (वागणे).मझ लोंकाच वय 35 वर्ष झाल तरीन तिने अत्तहीं पोराटिक॑ आहे.
poraaTikapaNa~पोराटिकपण॑.n.childhood pranks.ल्हान पोरांच चेष्टपण॑. 
porapaNa~पोरपण॑.n.boyhood.तरुणपण॑.
poreपोरे.n.children.लेंकरे.
poriपोरि.n.girl.बायको पोरि.
porvaDaaपोरवडा.n.a group of children.लेंकरांच एक गुंप॑.नित्य संध्याकाळि चार वाजतांसून मझ नातूच मित्र पोरवडा समोरल॑ मैदानांत येऊन 'फ़ुट्बाल' खेलतील. त्यंच मध्ये भांडिंगाच दृश्य पाह्याला तमाषा अस्ते.पोरोडा/पोरवडा in sm.
poTपोट.n.stomach.अंगाच एक अवयव. जेवण जीर्ण करिवाच अवयव.
poTपोट.n.pot belly.विकार रूपाच मोट्ठ॑ पोट. तोप्पे (Tamil).
poT bharNeपोट भरणे.id.to satisfy one's desire.मनाच तृप्त होणे.पांडवांच सत्यनाश झाला विना दुर्योधनाच पोट भरना म्हणून पूरा निश्चय झालावर तेनी एक महायुद्धाला तय्यारि आरंभ केले.
poT DhavaLNeपोट ढवळणे.n.(to have) loose bowels.ढाळणे.
poT sooLपोटसूळ.n.stomachache.पोट दुखणे.पोटशूळ in sm.
poT vaaLivaNeपोट वाळीवणे.fig.to remain hungry by ignoring other activities.वेगळ॑ कार्य करनास्क अनशी पोटांत॑ असणे.मझ माय वरडली "तस पोट वाळीवून कसाला काम करत आहेस॑. पोटाकरतांच न्होका अम्ही उद्योग कराचेच॑ ?" 
poTaach DhavaLe~पोटाच ढवळ॑.n.nausea.वांत यास्क॑ होणे.
poTaach vaaTपोटाच वाट.n.ways to take care of bare necessities of life. means for subsistance.काळ कांडणाला पह्जते वाट. कष्टि भोगून उपजीवन कराच वाट.
poTaalaa baDivaNeपोटाला बडिवणे.id.to deprive one of everything.दुसरेला एकदम नाश करणे.
potheeपोती.n.bead (of glass, gold, stone etc.).(काच, सोन॑ नाहीतर खडेच) मणीपोत in sm.
pothereपोतेरे.n.a wet mop.(घरच) भोई पुसाच ओल कापड.बकटांतल॑ पाणींत 20 सी.सी. फिनैल (फिनैल बोट्टलच झांकणींत॑ मावाच तेवढ॑) मिळिवून तजांत पोतेरे कापड बेष बुचकळून पिळून काढून सारिवाम॑ म्हणून कित्तीदपा सांगटलतरीन अम्च॑ कामवालि नित्य नुस्त पाणींतच भोंई सारिवते.
poTiपोटि.n.competition.दुसरेपक्षा षाणाम्हणून दाखिवाच॑.मझ॑ मित्र मझबरोर पोटि घालून शंभर गुंजी/गुंजा घाटला.from Tamil.
poTjaaLपोटजाळ.fig.jealousy. envy.असूया.मला भूटान-लोट्टरींत॑ एक कोटि बडिवल॑ म्हणून ऐकून शेदारल॑ घरचाला पोटजाळ झाल॑.
poTkharche~पोटखर्च.n.expenses for bare necessities.उपजीवनाला पह्जते खर्च.पोटखर्ची in sm.
poTlamपोट्लम.n.a small (paper) packet made impromptu.(कागदांत॑) तक्षण गूंडाळून बांधलते एक ल्हान पुडका. पुडा. पुडी. from Tamil. As against मूटा which is a larger impromptu package.
poTreपोट्रे.n.calf muscle.गुडिघाच खालच भागांतल॑ मांस॑अधीक चालनाते लोक असलास्क-असून उदंड पायरी वेघलतर त्यंच पोट्रे दुखल॑.पांयाच पोट्री in sm.
poTsheeपोटशी.n.a small cloth pouch that is tucked in at the waist by ladies.पोटाकडे खोवून ठिवाच ल्हान पिशवी. 
poTTuपोट्टु.n.dot (on the forehead).(कपाळांतल॑) ठिमका. कुंकू.from Tamil.
pouNeपौणे.n.three-fourths.पाउणे. एकाला पाव उणे. मुक्काल (Tamil) पाऊण in sm.
pouraaNika~पौराणिक.adj.related to Puranas.पुराणाला संबंध झालते.पौराणिक विषया व॑र मला जास्ति ज्ञान नाही तर पणीं, तज महत्व कित्ति म्हणाच मला कळल॑. 
pourNamiपौर्णमि.n.full moon day.पौर्णिमा. पूर्णिमा. पुनेव. पुनवे.
pourNimaaपौर्णिमा.n.full moon day.पौर्णमि. पूर्णिमा. पुनेव. पुनवे.
pousपौस.n.rain.मेघांतून/वांबांतून पडाच पाणी. पाऊस.
pousaaLaaपौसाळा.n.rainy season.पाऊसाच काळ॑. पावसाळा. पाऊसाळा.
pouSha~पौष.n.poushya month of the Hindu calendar.पौष्य महिना.
pouShya~पौष्य.n.poushya month of the Hindu calendar.पौष महिना.
povaNeपोवणे.vt.to swim.पोहणे. पोगणे.
povaNeeपोवणी.n.swimming.पोगणी. पोहणी.
praabalyaप्राबल्य.n.predominance.प्राधान होऊन असणे.
praacheenप्राचीन.adj.ancient.फार/उजंड/उदंड जुन॑.
praadhaanya~प्राधान्य.n.prominence. importance. priority.महत्व. मुख्यत्व. प्रधान स्थिती.
praakaarप्राकार.n.passage used for circumambulating in a temple.देऊळांत प्रदिक्षणा कराला असाच वाट.
praakRithप्राकृत.adj.natural.प्रकृतीला संबंध झालते. निसर्ग.
praakRithप्राकृत.adj.an unrefined version of Sanskrit.संस्कृत भाषाच अशुद्ध रूप॑.
praakRithप्राकृत.adj.an unrefined language.असंस्कृत भाषा.
praaNप्राण.fig.dear as life.(एकावर) फार इष्ट ठिवणे.मझ अण्णाला अंबा म्हण्जे प्राण॑. पण, ते खालतर त्यांस॑ आंग पूरा पोंपडा येईल म्हणून अंबा खातच नाहीत॑.
praaNप्राण.n.life.जीव.
praaNप्राण.n.soul.आत्मा.
praaN gheNeप्राण घेणे.id.to oppress. to harass badly.फार तंटा करणे. प्राण काढणे. प्राण खाणे. मनाला फार उब्बस करणे.
praaN kaaDhaNeप्राण काढणे.id.to oppress. to harass badly.फार तंटा करणे. प्राण खाणे. प्राण घेणे. मनाला फार उब्बस करणे. कित्येक लेंकरांस॑ दुकानांत बलाईंगून गेलतर॑ "हे घेऊनदे-ते घेऊनदे" म्हणून हट्ट करून प्राण काढूनटाकतील॑. दुकानांतून बाहेर येजोरि अम्हाला पुरे-पुरे होऊन जाईल.
praaN khaaNeप्राण खाणे.id.to oppress. to harass badly.फार तंटा करणे. प्राण काढणे. प्राण घेणे. मनाला फार उब्बस करणे.
praaN THivaNeप्राण ठिवणे.id.to set one's heart/mind on a thing.(एकावर) अत्यंत मोह ठिवणे.
praaNaarpaNa~प्राणार्पण॑.n.sacrificing life.प्राणत्याग.
praaNaayamप्राणायाम.n.regulated breathing done as a part of religious rites or yoga exercise.पूजाकार्यक्रम अथवा योगासनाला संबंध झालते श्वासाच नियंत्रण॑.
praaNamithra~प्राणमित्र.n.a friend as dear as life.गाढ मित्र. प्राणस्नेहित.अंबरनाथ (मुंबई) राहणार मझ एक प्राणमित्र दोन वर्षा पुढे एक थोर रोगांत॑ मेले. तेनी मेलते ऐकून उदंड दिवस पतोरी मला मनांत फार दुख॑ होते. 
praaNaprathiShTHaaप्राणप्रतिष्ठा.n.the rite of consecrating God's idol.विग्रहांत देवाला आवाहन॑ करणे.
praaNasankaTप्राणसंकट.n.extreme distress.मनाला फार संकट वाटणे.
praaNasnehitha~प्राणस्नेहित॑.n.a friend as dear as life.गाढ मित्र. प्राणमित्र.
praaNathyaagप्राणत्याग.n.self-immolation.आत्महत्या.
praaNeshप्राणेश.n.Lord Hanuman.प्राणदेव. श्री हनुमान. हनुमंत॑.
praaNiप्राणि.n.animate thing. एक जंतु. जीव असाच प्राणि.
praaNkhaavooप्राणखाऊ.adj.(that which or a person who) oppresses one to the limit.फार तंटा कराच॑.पाह्ताना अस्कीन तो मला रीण विचारत अस्तो. द्याला होयना म्हणून कित्तीदपा सांगटलतरीन मला सोडना म्हण्तो. तो एक प्राणखाऊ झालाहे.
praanthप्रांत.n.a region. a geographical area.एक प्रदेश.अम्च भारत देशाच लोक॑ बाहेर गामांत मिळल तर पणीं तेनी भारतांत कोण्त॑ प्रांताचे म्हणून विचारून कळींगतील॑ अणी एकच प्रांताचे असलतर॑ त्यंच मध्ये जास्ति येणे-जाणे करतील॑. हे अम्च लोकांच स्वभाव आहे.
praanthप्रांत.n.boundary or border of a region.एक प्रदेशाच भोंतलच सीमा.
praapthप्राप्त.adj.attained.मिळालते. मिळ्ळते.
praapthiप्राप्ति.adv.to attain. to obtain. मिळणे.
praaraabda~प्रराब्द.n.pre-ordained fate or destiny.कर्मफल॑.प्रारब्द in sm.
praarambhप्रारंभ.n.beginning.आरंभ.
praarthhanaaप्रार्थना.n.prayer.देवाला कराच विनंति.
praayप्राय.n.age.वय.
praayashchiththa~प्रायश्चित्त.n.atonement.पाप सुटाला कराच कार्य.
prabhaaप्रभा.n.luster. splendour.तेजस.
prabhaakarप्रभाकर.n.the sun.सूर्य.
prabhaavप्रभाव.n.glory.ऐश्वर्य.
prabhaavप्रभाव.n.power. might.शक्ति.
prabhaavaLiप्रभावळि.n.halo. radiance behind the head.डोस्केच मागल॑ शोभा. पीठ प्रभावळि.
prabhuप्रभु.n.lord. master.स्वामि.
prachaarप्रचार.n.currency.चालू.
prachaarप्रचार.n.prevalence.प्रसार. प्रसिद्ध॑.
prachaarप्रचार.n.propaganda.प्रचार.
pradakShiNaaप्रदक्षिणा.n.circumambulation from the left side, ie, with the central object always on right side.डावीकडून भोंताले चालून फिरणे. म्हणजे, प्रदक्षिणा कसाला करतों की, ते केम्हाहीं उजव॑कडे ठींगून.Note :- दक्षिण is South. With East as the cardinal direction (on account of Sun rise from there) for one facing East, दक्षिण will be on his right. Hence दक्षिण also means 'right'. In "प्रदक्षिणा" प्र means 'moving or going' and so "प्रदक्षिणा" means "moving with the central object always in the right side".
pradarshanप्रदर्शन॑.n.display.दाखिवणे.
pradarshanप्रदर्शन॑.n.exhibition. a fair.मेळा.
pradeshप्रदेश.n.a region.देशाच एक भाग. प्रांत.
pradhaanप्रधान.adj.principal.मुख्य.
pradhaanप्रधान.adj.important.मुख्य.
prajaaप्रजा.n.subjects of a country.राज्याच लोके.
prajaapathiप्रजापति.n.king.राजा.
prajaapathiप्रजापति.n.Lord Brahma.ब्रह्मदेव.

No comments:

Post a Comment