Tuesday, April 1, 2014

T (ट)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
Taakaaटाका.n.a small stitch.एक ल्हान शिवणे.अण्थूणाच कापूस इकड॑-तिकड॑ सरकून जायनास्क असाला मध्य-मध्य टाका घालणे आहे.
TaakaNeटाकणे.vt.to throw away. to discard.उपयोग नाही म्हणून दूर भिरकावणे. अम्ही ल्हान असताना/असतम्हा अम्च बाप-माय कोण्तेक वस्तुहीं जत्तन (दत्तन) ठींगाला शिकविलोते. पण, हे काळाच लिंकरे कायतरीन घेट्ले म्हणजे थोडच दिवस उपयोग करुन दूर टाकून टकतात.
TaakaNeटाकणे.vt.to let go. to abandon.सोडून टाकणे.तजकडे जास्ति बोलून प्रयोजन नाही. सोडूनटाक.
TaakaNeटाकणे.vt.to drop.खाले घालणे.कॉफीच लोटा पोळत आहे, खाले टाक नोको.
TaakaNeटाकणे.suff.used as a reinforcing verb of another verb, eg. करूनटाकणे, खाऊनटाकणे etc. akin to सोडणे in करसोडणे, खावूसोडणे etc.एक क्रीयापदाच शेवटि मिळिवाच अण्किएक क्रीयापद (पह्यिलच क्रीयापदाच अर्थाला अण्कीन शक्ति द्या करतां).the suffixing of verbs like टाकणे or सोडणे to another verb creates a complex verb.
TaaLakeटाळके.n.head.डोस्के. डोई. टळके.
TaaLaNeटाळणे.vt.to avoid. to prevent.चुकिवणे. निवारण करणे. टळणे.
TaaLeeटाळी.n.a clap.दोन तळहात मारतान होयाच शब्द. ताळ. ताळम (Tamil). (1) भाषण ऐकलावर टाळी मारालाम्हणून नेता लोक॑ गुंप-गुंप लोकांना पैसे देऊन बलाईंगून येतात॑. (2) "टाळी बाई टाळी, अम्मा केली पोळी, पोळील नाही तूप॑, बाळाल नाही भूक॑" अस॑ एक लेंकरांच गाणे आहे.
TaaLooटाळू.n.palate. roof of the mouth.तोंडाच आंतल॑ व॑रच भाग.जेवताना भातांत होतते एक ल्हान काठी तज टाळूला लागून घाव झाल॑.
TaaLooटाळू.n.front part of head, above the forehead.कपाळाच व॑रच भाग.ल्हान लेंकर॑ पह्यिल॑-पह्यिल॑ चालाला प्रारंभ करताना तडकून पडून कित्येकदपा त्यंच टाळूला बलकट घाव लागुया.
Taanchaaटांचा. n.heel.टांचा. पांयेंच एक भाग.फार वर्षा नंतर मी गेल महीना "टेन्निस" खेळाला पुन्हाहीं प्रारंभ केलों. पण, चार पांच दिवसापसून मझ टांचा एकदम दुखत आहे म्हणून मी अत्ता खेळणे सोडूनटाकलों. टांचा दुखणे लोक्कर राह्यील म्हणून वाटते.टाच/टांच in sm.
Taanchaa ghaalNeटांचा घालणे.vt.to do a spot stitching.टाका घालणे. शिंपि लोक॑ मषीनावर शिवाचपुढ॑ टांचा-घालाच कामाला ल्हान-ल्हान पोरांना ठींगट्लास्तात.
TaanchaNiटांचणि.n.a pin.सुंई. ऊशि (Tamil) टाचणी in sm.
Taangaaटांगा.n.horse carriage.घोडा बंडि.हे काळांतपणीं मुंबईच "मरीन ड्रैवावर" अयितवारी संध्याकाळी टांगा सवारी करुया ! ते टांगाला "विक्टोरिया" म्हणतात.
Taankटांक.n.a small gold/silver/copper sheet with an embossed image of Goddess.देविच रूप असाच सोने, रुपे अथवा तांबेच एक ल्हान पदक.(1) अम्च॑ घरांत वराड, लेंकरू उजणे असलते शुभ कार्य होताना अम्च॑ कुलदेवता बनशंकरी देवीच एक नव॑ टांक घेऊन तला पूजा करून संपुष्टाच बरोर ठिवणे आहे. (2) अम्च॑ घरच॑ देव-संपुष्टांत अम्च॑ पूर्वज जोडलते वीस-तीस बनशंकरी देवीच टांक आहे.
Taankटांक.n.an amulet or talisman got ready after propitiating a God or Goddess.देव, नाहितर॑, देवीच आवाहन केलते पदक. यंत्र.मघ्य-मध्य भूत येत म्हणून तिला एक मंत्रवादीकडे बलायींगून गेले. देवीच आवाहन केलते एक टांक चाळीस दिवसाला हातांत बांधून ठिवला ते मंत्रवादी.
TahalNeटहलणे.vt.to stroll or pace up and down.चालणेअम्च शेदारी/शेजारी असाच बागांत॑ कित्येकदन पाष्टे-सायनकाळी चुकनास्क टहलाल येतात॑. तवढ॑दनालीन त्यंच आरोग्यावर चिंता आहे वाटत॑.टहलणें/टेहेलणें/टेहलणें in sm, but appears to be out of fashion.
Takटक.n.a type stitching to reduce length of a dress.कापडाच लांब उणे कराच शिवणे. चाळीस पन्नास वर्षापुढे ल्हान पोरींला परकोर शिवणे म्हणजे, उण॑पक्ष दोन टक तरीन घालूनच शिवत होते. तेनी वाढतां-वाढतां टक उकलून परकोराच लांब जास्ति कराला सौकर्य होईल म्हणून अस॑ करत होते. from English.
Takkarटक्कर.n.clash. fight.भांडणे.त्यंच मध्ये कायकी टक्कर झालाहे वाटत॑. थोड दिवसापसून बोलणेच॑ सोडूनटाकलाहेत॑.
Takkarटक्कर.n.collision.एकालेक बडिवणे.
TakLooटकळू.adj.baldheaded.केंस झडलते डोस्के. वळुके (Tamil) मझ लोंक अमेरीकाला गेलानंतर टकळू झाला. तथे असणार फार लोकांस॑ केंस झडते म्हणून मी ऐकलों. कामाच "स्ट्रेस"/श्रम असुया.टकल्या in sm.
TaLakeटळके.n.head.डोस्के. डोई. टाळके.
TaLaNeटळणे.vt.to avoid. to prevent.चुकिवणे. निवारण करणे. टाळणे.
TambLerटंब्लर.n.a narrow cup, without handle, made of metal or glass used for drinking a liquid.लोटा.दक्षिण भारतांत लोक॑ अधीक टंब्लर उपयोग करतात॑. उत्तर भारतांत नुस्त पाणी/लस्सी असलते पीयाला लोटा (थोर टंब्लर म्हणूया) उपयोग करतात॑. चहा, दूध, कॉफीला तेनी कप-सॉसर (कप-बसी) वापरातत॑.from English.
Tapaalटपाल.n.mail. post.तपाल. डाक.
Teekaaटीका.n.commentary. elucidation.टिप्पणि. विवरण करणे.श्री मध्वाचार्यांच मूल-ग्रंथांच॑ टीका लिव्हलते श्री जयतीर्थ यांस॑ "टीकाचार्या" म्हणूनपणीं सांगतात॑.
Teereeटीरी.n.buttocks. पृष्ट. टिरी. ढुंग भोईंत पाणी पडलसाच तो पाह्यला नाही वाटते. वेगांत पळत येऊन निसरून टीरीव॑र पडला.टीर/टिरी in sm.
TengooLटेंगूळ.n.a fried snack.तळलते एक पदार्थ.नित्य दुपारी टेंगूळ खायाच अभ्यास/दंडक करींगटलतर॑ अम्च रंक्तांत॑ ’कोलेस्ट्रोल’ नीट वाढून ह्रुदयाचा रोग याला संभव आहे. from Kannada.
Tenkaaटेंका.n.support or prompt to lean against. टेंकाला उपयोग कराच वस्तु.(1) कित्येक झाडाला ते थोर होयापर्यंतीं टेंका देवून बांधामते असत॑. (2) अम्च॑ घरच॑ मागपटीसच भोंताले-भिंताला टेंका देऊन ठिवल्होतों तरीन यंदा आलते थोर पाऊसांत ते खाले पडून गेल॑.
TenkaNeटेंकणे.vt.to place on a support.खाले पडनास्क॑ असाला एकाचवर लागिवून ठिवणे.मी कोनेंत टेंकून ठिवलते केरसोणी अपाप निसरून पडल॑. टेकणें in sm.
TenkaNeटेंकणे.vi.to lean against.एकावर झुकून/वांकून असणे कोनेंत टेंकून होतते केरसोणी अपाप निसरून पडल॑.टेकणें in sm.
TenkaNeटेंकणे.fig.to repose or place (one's hopes or expectations). to rely upon.(एकावर) आधाराच आशा ठिवणे. आधार घेणे.अम्ही पैसेच सहाय कराला तय्यार आहोंम्हणून कळ्लतर॑ पुरे, कित्येक लोक अम्चवर पूरा टेंकाला पाह्तील॑.
Tikaavooटिकाऊ.adj.durable. lasting.फार काळ नाश होयनास्क॑ राहणे.टिकाऊ ‘फरनीचर’ पह्जम्हण्जे रोसवुड नाहीतर॑ बर्मा टीकांत्सून करलतरच होईल॑
Tikalaaटिकला.n.a spot. a mark.टिकली.
Tikaleeटिकली.n.a spot. a mark.टिकला.
TippaNiटिप्पणि.n.explanations by way of notes. elucidation. विवरण करून दाखिवणे. टीका.बंग्ळूरांत श्री. प्रभंजनाचार म्हणून एक थोर मध्व पंडित आहेत. तेनी कराच प्रवचन फार बेष असल॑, कां म्हणजे, एक-एक विषयीन बेष टिप्पणी करून अम्हास सजास्क॑ सांगतील॑.
Tireeटिरी.n.buttocks.पृष्ट. टीरी. ढुंगभोईंत पाणी पडलसाच तो पाह्यला नाही वाटते. वेगांत पळत येऊन निसरून टिरीव॑र पडला.टीर/टिरी in sm.
Tokareeटोकरी.n.a reed or wicker carry-basket lined with leather.काताड गुंडाळलते बेताच बुट्टि.कोठतरीन "पिकनिकाला" जाताना खायाच पदार्थ, पाणीच "बोट्ट्ल" हे सग्ळीन ठिवाला टोकरी उजंड सौकर्य असल॑.
ToLटोळ.n.grass-hopper. एक प्रकाराच किडा/कीडा.
Tonchaaटोंचा.n.a thick needle.एक घट्टि सूंई.टोचा in sm.
Tonchaaटोंचा.n.a dent.पोंचा.
Tonchaaटोंचा.n.a puncture. a pricked hole.टोंचून केलते ल्हान द्वार॑.
TonchaNeटोंचणे vito get pricked.रुचणे. फाटलते कापड शिवताना सूंईं बरोर धरनातर॑ बोटाला टोंचेल॑.
TonchaNeटोंचणे vito get pierced.टोंचणे. रुचणे. कान टोंचणे नोको म्हणून तिन॑ हट्ट करींगून बसलाहे.
TonchaNeटोंचणे vtto prick.टोंचणे. रुचिवणे. (1) तो उदंड चेष्टा कराच पोर म्हणून वाटत॑. तज भाऊच बलूणाला पह्जम्हणून टोंचून फुटिवला. (2) चप्लि घालनास्क॑ बाहेर गेलतम्हा मझ॑ पांयेंला कांटा टोंचल॑.
TonchaNeटोंचणे vtto pierce.टोंचणे. रुचिवणे. जुने कालांत॑ दादिगे पोरांस॑पणीं कान टोंचत होते.
Tonchoon bolNeटोंचून बोलणे.fig.to talk hurtingly.ऐकणारांच मन्न दुख करिवास्क बोलणे.बाजू घरचीकडे बोलाला मझ॑ बाईलीला अवडनाच अवडना, कां म्हणजे, तिन॑ टोंचून टोंचून बोलती म्हण॑.
Topiटोपि.n.cap.ऊन लागनास्क॑ असाला डोस्केच व॑र ठिवाच साधन॑. पह्यिले-पह्यिले महात्मा गांधी टोपि घालींगट्लोते तरीन, शेवटी त्यनी टोपि घालींगाच दंडक सोडूनटाकले. तरीन, ते टोपीला गांधी-टोपी म्हणाच नाव प्रसिद्ध झाल॑.
Topi ghaalNeटोपि घालणे.id.to cheat.नाम घालणे (met). एमारिवणे (from Tamil).तज बरोर मिळींगटलतर॑ बेष टोपि घालल॑ म्हणून कळींगूनपणीं मझ॑ मित्राच लोंक तज सहवास सोडाला तय्यर न्होता. असाच पैसे पूरा नाश झालांपिरी अत्ता रडत बसलाहे.
TukaDaaटुकडा.n.a piece of a sweetmeat.तुकडा. गुळ्चीट पदार्थाच एक चूर.त्यांस डयबीटिस आहे वाटते. जेवताना वाढलते एक टुकडा पणीन तोंडांत घालीगट्ल नाहीत॑.

No comments:

Post a Comment