Tuesday, April 1, 2014

th (त) 2 (thayyaa thakkaa naachaNe To thyaagee)




.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
thayyaa thakkaa naachaNeतय्या-तक्का नाचणे.id.to hop around in confusion.मनाच गोंधळांत॑ तरपडणे.आवश्य नाहीस्क॑ तो तज शेदारल॑ घरचाकडे जमीनाच भांडणे आरंभ करला. कचेरींत केस हरला मात्र नहो, हातांत होतते जमीनाच अर्ध भाग पणीन सोडूनदेमते पडल॑. अत्ता काय करणे म्हणून तय्या-तक्का नाचत आहे.
thayyaarतय्यार.adj.ready.तयार.वराडाल जायाला वेळ झाल॑. अर्सा समोर ओठाकून (होठाकून) शृंगार केलते पुरे, लोक्कर तय्यार होऊन बाहेर उत्तर॑.
thayyaarतय्यार.adj.willing.संमत॑ केलते. संमत॑ असाच॑.मी दहा दिवसांत॑ चेन्नैला जाणार. मझ बरोर याला तय्यार असलतर॑ मला फोण करून कळिवतोसका ?
thayyaarतय्यार.adj.prepared state.तयार.घरच संपाक अण्कीन तय्यार झाल होतनाही म्हणून मी होटलांत॑ टिफन खावूनटाकून ओफीसाला गेलों.
thayyaarतय्यार.adj.completed.पूरा केलते. पूरा झालते.देऊळाच जीर्णोद्धारणाच काम तय्यार झाल॑ म्हणून नंतरल॑ कार्यक्रम॑, म्हण्जे, पुनर्प्रतिष्टापाना लोक्करच होईल.
thayyaarतय्यार.adj.made.निर्माण केलते. केलते. करलतेसुताराकडून मी अत्ता-अत्ता एक नव॑ कुर्सी तय्यार करीवलों.
thayyaareeतय्यारी.n.readiness.आरंभ कराला तय्यार असणे.
thayyaareeतय्यारी.n.willingness.संमत असणे.
thayyaareeतय्यारी.n.preparation.तयारी.
thayyaareeतय्यारी.n.completion.पूरा करणे.
theते.pron.that.दूर असाच एक साधनाला उद्देश करून सांगाच गोष्ट॑ (एकवचन॑).तिकड असाच ते पुस्तक मला आणून देतोसका ?applied to neuter gender, singular.
theते.pron.those.दूर असाच एकापक्षा जास्ति साधनांला उद्देश करून सांगाच गोष्ट॑ (बहुवचन॑).मागल॑ बीदींत असाच दाळ-तांदूळ दुकानला पाष्टे मी गेलसतम्हा चार किलो तांदूळ, एक किलो दाळ, एक लिटर चोक्कोट तेल अणी शंभर ग्राम हिंग एवढ्यालीन पैसे देऊनटाकून आलों. तू अत्ता तिकड जाताना ते अग्गीन आणशीलका ? applied to neuter gender, plural, along with अग्गीन/अस्कीन. .
the theते-ते.pron.each of those individual things.प्रती एकीन. एक-एक प्रश्नालीन तू अडव॑ येणे नोको, ते-ते विषय कसतरीन अपाप राहूनजाईल॑.applied to neuter gender, singular.
theDhaaतेढा.adj.crooked.वंकड॑. वक्र. आढा-तेढा.तजकडे वागताना थोड दत्तन असाम॑, कां म्हणजे, तज स्वभाव बर॑ नाही, तेढा मनुष तो.
theegheतीघे.adj.three people. तीन दन॑ (दण॑). तीन जन॑ (जण॑).दुपारच॑ जेवणाला होटलांत वेघताना उदंड वेळ झाल्होत॑, पण अम्ही तीघेच म्हणून पाव्हून होटलवाले जेवण वाढाला सम्मत करले. तिघे in sm .
theeLतीळ.n.sesame.संपाकाला उपयोग कराच एक बीं. तीळांतून काढाच तेलाला दक्षिणी मराठींत॑ चोक्कोट तेल म्हणून सांगतों.
theeLgooLतीळगूळ.n.a mixture of sesame and jaggery bits exchanged between families/individuals during Sankranthi festival. तीळीं गूळीं मिळिवून संक्रांति दिवस द्याच पदार्थ.मकर संक्रांतीच सणाच दिवसी लोकांस मिळताना "तीळगूळ घ्या, गोड गोड बोला" अस॑ सांगून तीळीन गूळीन देतों.
theenतीन.adj.three.दोनाच नंतरल॑ संख्या.कुंतीच लेंकरे तीन अणी माद्रीच लेंकरे दोन, अस॑ पांडव पांच दने आहेत॑.
theerthha~तीर्थ.n.holy water.देवाला अभिषेक केलते पाणी. तीर्थोदक. केसर, पचकर्पूर॑ (पचकापूर) हे अग्गीन घालून कराच अभिषेकाच तीर्थाला चोक्कोट वास असल॑.
theerthhaaDanतीर्थाडन.n.pilgrimage.तीर्थयात्रा.तीर्थाटन in sm.
theerthhakShethra~तीर्थक्षेत्र.n.temple visited during a pilgrimage.तीर्थयात्रांत॑ दर्शन कराच देऊळ. पुण्यक्षेत्र.अम्च॑ देशांत विनोदयात्रा कराच बरोर तीर्थक्षेत्र पणीन दर्शन कराच लोके भरून आहेत॑.
theerthhanklaraaतीर्थंकरा.n.the 24 revered ascetics in Jainism.जीन (जैन) धर्माच 24 मुख्य मुनी लोक॑.
theerthhaprasaadतीर्थप्रसाद.n.consecrated food given to devotees in a temple.भक्त लोकांस॑ देऊळांतून मिळाच प्रसाद.बंगळूरांत पेजावरश्रींच पूर्णप्रज्ञ विद्यापीठांत कित्ती भक्तजन आले तरीन त्यांस अग्गीन तीर्थप्रसाद मिळल॑.
theerthhasnaanतीर्थस्नान.n.Hindu religious ritual of bathing in a sacred river or a temple tank.हिंदु संप्रदाया प्रकार एक पुण्यनदींत॑, नाहीतर॑, देऊळाच पुष्करणींत॑ कराच स्नान.गंगा स्नानाच पक्षा थोर तीर्थस्नान भारतांत वेगळ॑ कोण्तीन नाही म्हणून विश्वास करणार भरूनदने आहेत॑.
theerthhayaathraaतीर्थयात्रा.n.pilgrimage.वेगळ॑ वेगळ॑ देवस्थान दर्शन कराला निघाच यात्रा. तीर्थाडन. हिमालय पर्वत वलांडून जामते कैलास-मानसरोवर तीर्थयात्रा करणार अग्गिदनीन केंद्र सरकाराच अनुमती घेऊनच सराम॑, कां म्हणजे ते पुण्यक्षेत्र चैनांत आहे.
theerthhodaka~तीर्थोदक.n.holy water.देवाला अभिषेक केलते पाणी. तीर्थ.
theesतीस.adj.thirty.एकोणतीसाच नंतरल॑ संख्या.तीस वर्षाच पुढे तीन लाखाला मिळत होतते धर अग्गीन अत्ता एक कोटी देलतरीन मिळणे कष्टच॑.
theevra~तीव्र.adj.profound. intense.गाढ. अगाध॑. मुम्मर.
thehateesतेहतीस.adj.thirty-three.बत्तीसाच नंतरच संख्या.बंगळूरांत अम्ही राह्याच गिरिनगरांतून बन्नेरघट्टा नॅशनल-पार्क कृत्य तेहतीस किलोमीटर दूर आहे.
thejasतेजस.n.luster.वैभवाच प्रकाश.स्वामी विवेकानंदाच तोंडांतल॑ तेजस पाह्तानाच अम्हास कळते तेनी एक महान मनुष म्हणून.
thejasveeतेजस्वी.adj.lustrous.वैभवाच प्रकाशाच॑.मध्वाचार्यांच चित्र पाह्तानच अम्हास कळते, तेनी एक तेजस्वी मनुष म्हणून.
thelतेल.n.oil.तैल.खायाच पदार्थ तेलांत तळाच पक्षा नुस्त भाजून खाल्लतर॑ आंगाला चोक्कोट म्हणतात॑.
theleeतेली.n.oilman.तेल विकणार. तेलवाला. बैल बांधलते भुवरांत तेल काढून घरो-घर येऊन तेल विकाच तेलींस हे काळांत दिसाल पणीन मिळना.
thelghaaNaaतेलघाणा.n.oil mill.तेल काढाच यंत्र.जुने काळांत तेल काढाला तेलघाणा अग्गीन होत तरीन, हे काळांत तसलते व्यवस्था फार अप्रूप झालाहे. तज बद्दिल थोर-थोर फाक्टरींत तेल उत्पत्ती करतात॑.
thelkaTतेलकट.adj.oily. greasy.तेलाच चिक्कट॑. (पदार्थांत॑) आवश्या पक्षा अधीक तेल असणे.होटेलांत॑ भाजी, पूरी, वडे, धिरडे वगैरा अधीक तेलकट असते. तेलकटाच पदार्थ खालतर॑ सुलुभांत॑ जीर्ण होयना म्हणून वय झालते अप्रूपांत॑ होटलाल जातील॑.
thelthavaaतेलतवा.n.frying pan.तेल तावून पदार्थ कराच भांडि. नोन-स्टिक तेलतवा वापराला सुलूभ असत॑ तरीन आंगाला ते चोक्कोट नहो म्हणून सांगतात॑.
thelwaalaaतेलवाला.n.oilman.तेली. तेल विकणार मनुष.सूपर-मार्कटांत की दुकानांत की जाऊन पॅकटांत मिळाच तेल घेणेमळे हे काळांत अग्गीन घरो-घर येऊन तेल विकाच तेलवाले दिसाल पणीन मिळना.
theneeतेनी.pron.those people (third person plural pronoun).त्यनी. ते लोक॑ (तीसर॑पुरुष बहुवचनाच सर्वनाम॑).Note:- applicable to both genders of humans, gender-wise and collectively ; but not to non-humans. For non-humans (and inanimates) ते is used sigularly, plurally, both gender-wise and collectively.
thenee theneeतेनी-तेनी.pron.each-for-himself individually.त्यंच-त्यंच पाड॑.Note :- (1) पाड in Tamil means 'unto itself'. (2) It is used in a singular sense. Where there are different groups of people, then each group is treated as an individual group.
theparyanthतेपर्यंत.adv.till then.ते वेळ पर्यंत. तम्हा पर्यंत. ते पतोरी.लोकसभा एलक्षनाच वोटिंग आजच संपले. तज परिणाम सोमवार कळल॑. तेपर्यंतीन अत्तच॑ सरकार पुन्हाहीन येईलका म्हणून सांगाला होईना.तोपर्यंत in sm.
theraaतेरा.adj.thirteen.बाराच नंतरच संख्या.त्यंच शिष्यांच बरोर क्रिस्तू शेवटल॑ जेवणे करताना तेरा लोके होते म्हणून क्रिस्तुधर्मांत॑ तेरा संख्याला अपशकुन म्हणून सांगतात॑.
theraaperaaतेरा-पेरा.n.helter-skelter. disorderly.गजबिज. घंदरा-घोळा. इकडे-तिकडे. अवंदर॑ (Kannada).नेसींगटलते कापड भोईवर तेरा-पेरा पडलसाच पाव्हून तज माय ते पूरा गुंडाळून व॑र काढून ठिवले.
theraavaaतेरावा.adj.thirteenth.तेरावां क्रमाच संख्या.तेरावा संख्या अपशकुनाच म्हणून साधारण होऊन होटलांत अग्गीन तेरावा संख्याच खोली असत नाही.
theramaaतेरमा.n.the third day after today.आज सोडून तीन दिवस नंतरल॑ दिवस. तेरमा दिवस. उद्या-नाही-तेरमा. तेरमाशी.भारताच प्रधान मंत्री मोदीजी आज इसरेलांत आहेत॑. तेरमा जर्मनींत॑ अस्तील॑.तेरवा in sm.
theramaaतेरमा.n.the third day before today.आज सोडून तीन दिवस मागल॑ दिवस. तेरमा दिवस. काल-नाही-तेरमा. तेरमाशी ;तेरमा आलते परीक्षाच रिसल्ट पाव्हून तला फार संतोष झाल॑, कां म्हणजे चोक्कोट मार्क घेऊन जिंतला म्हणून. तेरवा in sm.
theramaasheeतेरमाशी.n.the third day after today.आज सोडून तीन दिवस नंतरल॑ दिवस. तेरमा दिवसी. उद्या-नाही-तेरमा. तेरमा.उद्या तुला येऊन पाह्याला मला सौकर्य नाही, तेरमाशी आलतर॑ घरांत असशीलका ?
theramaasheeतेरमाशी.n.the third day before today.आज सोडून तीन दिवस मागल॑ दिवस. तेरमा दिवसी. काल-नाही-तेरमा. तेरमा.मी तेरमाशी तला हुडुकींगून गेलों तरीन पाह्याला झाल नाही.
thethheतेथे.adv.there.तथे. तत्त॑. तिकडे. ते ठिकाणी. ते ठामी.टीवींत अग्गीन पाह्ताना सगळ॑ विधांतीन चैना उदंड बेष वाढलते राज्यास्क॑ दिसते, पण, तेथे जाऊन पाह्यलतरच॑ निज काय म्हणून कळल॑. तिथे/तेथे in sm.
thethhe thethheतेथे-तेथे advin all those places respectively.तथे-तथे. तत्त॑-तत्त॑. तिकडे-तिकडे. अमुक-अमुक ठिकाणी.होळी सणाच दिवसी मझ॑ नव॑ पंढ्र अंगींत बीदींतल॑ पोरे रंग बडिवले. घराला येऊन बेष धुवलांपिरीपणीन रंग पूरा गेल नाही, तेथे-तेथे तंबड रंग अत्तापणीं आहे.
thevaDhe~तेवढ॑.adj.that much.एक कार्य, अथवा, एक वस्तु कित्ति आहे म्हणून सांगाच॑.अम्ही क्रिकेट मेट्च पाह्याला जायापुढ॑ स्टेडियमांत॑ फार गुंप असल॑ म्हणींगट्लों. पण, तिकड जाऊन पाह्यलावर गुंप तेवढ॑ काहीं न्होते म्हणून कळ्ल॑.तेवढा in sm.
thevaDhe~तेवढ॑.adj.so many. that many.सर्व.तेवढ॑दनीं तला उपदेश देलहोते तरीन, तो कोणालीं सांगनास्क॑ हे चूक काम केला.
thevaDheenतेवढीन.adv.all that. all those.ते सग्ळीन.जेऊन उठताना ताटांत काहीं उरिवताने, तेवढीन सावडून खाऊनटाकूनच उठाम॑.
theveesतेवीस.adj.twenty-three.बावीसाच नंतरच संख्या.बंगळूरांत अम्ही राह्याच गिरिनगरांतून बन्नेरघट्टा नॅशनल-पार्क तेवीस किलोमीटर दूर आहे म्हणून निघलों. पण ते तीस किलोमीटर दूर आहे म्हणून जाऊन पावतानाच कळ्ळ॑ !
thiDakaaतिडका.n.a sharp shooting pain.तीव्र वेदना. रुचाच सूळ संपाकाला भाजीपाला चिरत असताना चूप चुरी लागून झालते तिडका अण्कीन गेल॑ नाही.तिडक/तिडकी in sm.
thiDakaNeतिडकणे.vi.to have a sharp shooting pain.तीव्र वेदना होणे. रुचाच सूळ होणे.
thije~तिज॑.pron.her's.ते बायकोच॑. ते पोरीच॑.तिज॑ ते पुस्तक वाचूनटाकून मला देतोसका ?तिचा in sm.
thije~ thije~तिज॑-तिज॑.pron.belonging to each one of her respectively (used in second person singular).अमुक अमुक स्त्रींच॑/पोरींच॑.ते पोरींस कायतरीन कष्ट असलतर॑, ते कस समाळाम॑ म्हणून सांगून देशीलका ? तज नंतर॑ तिज॑-तिज॑ प्रश्न तिन॑-तिन॑ समाळींगाम॑.
thikaDache~तिकडच॑.adj.relating to that place.ते ठिकाणाच॑. ते ठामाच॑. तथेच॑. तत्तच॑.हे जवळ अम्ही बालीला जाऊन आलों. तिकडच॑ हिंदू धर्मांत॑ विग्रहपूजा नाही म्हणून पाव्हून मला आश्चर्य वाटले.
thikaDeतिकडे.adv.there.ते ठाम. तथे. तत्ते.मरुभूमींत राह्यणार लोके पाणीच खर्च फार श्रद्धांत कराम॑, कां म्हणजे, तिकडे पाऊस उदंड उणे पडते म्हणून.तिथे in sm.
thikaDe thikaDeतिकडे-तिकडे.adv.in all those places respectively.तथे-तथे. तत्ते तत्ते. अमुक-अमुक ठामी.मरुभूमींत तिकडे-तिकडे पाणीच व्यवस्था असत॑. तसलते ठिकाणाला "ओआसिस" म्हणतात॑.
thikaDoonतिकडून.adv.from there.तिकडसून. ते ठिकाणांतून. ते ठामांतून. तत्सून. तथून.अम्ही बालीला जाताना कोलालंपूरला जाऊन, तिकडून बालीला गेलों.
thikhaTतिखट.adj.spicy hot.तिक्कट. एक रीतीच रूच.
thikhaTchaTNeeतिखटचट्णी.n.a spicy hot powdered preparation.एक तिखट तोंडलावण॑ (तोळ्लावण॑). तिक्कटचट्णी. तिक्कटमीठ. तिखटमीठ.
thikhaTmeeTHतिखटमीठ.n.a spicy hot powdered preparation.एक तिखट तोंडलावण॑ (तोळ्लावण॑). तिखटचट्णि. तिक्कटचट्णि. तिक्कटमीठ.
thikkaTतिक्कट.adj.spicy hot.तिखट. एक रीतीच रूच.मिर्शिंगा अणी मिरे हे दोनीन तिक्कट असलतरीन ते दोनाचीन तिक्कट वेगळ॑ वेगळ॑ अस्त॑.
thikkaTchaTNeeतिक्कटचट्णी.n.a spicy hot powdered preparation.एक तिखट तोंडलावण॑ (तोळ्लावण॑). तिखटचट्णी. तिक्कटमीठ. तिखटमीठ. तिक्कटचट्णी, डांगर, अंबटभाजी असलते पदार्थ अग्गीन सगळ॑ दक्षिणी मराठी लोकांच घरांतीन सर्वसाधारण होऊन करणे आहे.
thikkaTmeeTHतिक्कटमीठ.n.a spicy hot powdered preparation.एक तिखट तोंडलावण॑ (तोळ्लावण॑). तिखटचट्णि. तिक्कटचट्णि. तिखटमीठ.वाळलते खोब्रेंत करलते तिक्कटमीठ हिरव॑ नारळींत करलते तिक्कटंईठाच बरीस जास्ती दिवस हाळ होईनास्क॑ असल॑.
thilakतिलक.n.a mark made on the forehead with sindhoor etc.कपाळांत॑ लावाच कुंकू. टिकाबायका पोरी कपाळांत तिलक लावनास्क॑ असताने म्हणून अम्च॑ संप्रदायांत आहे तरीन अत्ताच कळांत भरून पोरीनी ते परवा करनाक॑ हिंडत आहेत॑.टिलक in SM.
thinDaaTTamतिंडाट्टम.fig.vexatious and jittery situation.तरपडाच अवस्था/स्थिति.एक चोखोट/चोक्कोट उद्योगांत होतते ते मनुष आवश्य नाहीस्क॑ ते काम सोडूनटाकला. अत्ता उपजीवनाला थोर तिंडाट्टम झालाहे.from Tamil.
thine~तिन॑.pron.she (third person singular pronoun).एक बायकोला, नाहीतर॑, एक पोरीला उद्देशकरून सांगाच गोष्ट॑ (तीसर॑पुरुष एकवचन॑ सर्वनाम॑).तिन॑ काय सांगिट्ली ते मला कळ्ना. मला कळ्ळतेस्क॑ मी करत जातों.ती in sm.
thippaTतिप्पट.adj.three times. treble. tripple. three fold.तीन गुणा.सरकाराच नव॑ नियम प्रकार बाह्येरच देशांतून आणिवाच कित्येक साधनाला कर तिप्पट गुणा वाढाला जाते म्हणून ऐकलों.
thirangaaतिरंगा.n.triclour of India's national flag.भारताच कोडिच/गुढीच/झंडाच तीन रंग.भारताच तिरंगाला अपमान करणारांस बरोरल॑ शिक्षा द्याचविषीन सरकाराच नियम आहे.
thiraskaarतिरस्कार.vt. to refute disdainfully. तुच्छपणांत असंम्मत करणे. तुच्छपणांत विरोध करणे.कश्मीरांत होत असाच गलाटा तिकडल॑ लोकांच स्वातंत्र्य समर म्हणून पाकिस्थान सांगाच अम्च॑ सरकार तिरस्कार करलते बरोरच॑.
thiripathi kShavra~तिरुपति क्षवर॑.fig.a figure of speech meaning a job abandoned at half-way stage.अर्ध करून सोडलते काम. अर्धगच्चाच काम. अर्धम-पर्दाच काम. अर्धवटाच काम. uisतो केम्हाहीं असच॑. तला कायतरीन एक काम देलतर॑ तिरुपति क्षवर करून पळून जाईल. नंतर॑ वेगळ॑ कोणाल तरीन बलावून ते काम पूरा करिवामते पडते.
thisare~तिसर॑.adj.third.दुसरेच नंतरल॑ क्रम.अत्ता तीघदने खोलीच आंत वेघून आलेकी, त्यांत दोघदने कोण म्हणून मला कळल॑, पण तिसर॑ मनुष कोण म्हणून कळत नाही.तिसरा in sm.
thithheeतिथी.n.a day in the calender.पंचांगांत॑ एक दिवस.
thithheeतिथी.n.a day on which death ceremony is performed.श्राद्धाच दिवस.तिथी कराच दिवसाच पुढल॑ रात्री अणी तद्दीच रात्री, हे दोन वेळीन नुस्त पल्हार खातों.
thoतो.pron.he (third person singular pronoun).ते मनुष.(तीसर॑पुरुष एकवचन॑ सर्वनाम॑).तो मला अवमान कराला प्रयत्न करलतर॑ मी तला उगे सोडना.
thoDतोड.n.diamond ear stud.कानांत॑ घालाच वज्राच आभरण॑.ब्ळू जॅगर वज्रांत करलते तोड फार अप्रूप म्हणून तज मोल पणीन उदंड असते.
thoDaNeतोडणे.vt.to pluck.उप्पडून काडणे.गेल वार॑ अम्च॑ घरांतल॑ बागांत उगलते गुलाबीच फूल पाह्याला फार बेष होत॑. पण बीदींत जात होतते कोणकी एकली मझ॑ डोळेच समोरच ते तोडींगून गेली.
thoDaNeतोडणे.vt.to break.मोडणे. चूर करणे. चोक्कोट वासाच चंपकाच झाड अम्च॑ घरांत आहे तरीन, सगळे फूलीन व॑रच॑ फांटांत असाकरतां, फांटा तोडनास्क॑ ते अग्गीन तोडणे नंखर॑ प्रयासच॑.
thoDhaaतोढा.n.a thick pulling-rope used for lifting water from a well, canal etc. ओढा. आड, कालवा यांतून पाणी शेंदाला उपयोग कराच॑ चरांट. आडांतून पाणी शेंदाला बालदीला (बादलीला) बांधलते चरांटाच तोढा खजून खजून तुटाच स्थितीला आल-ते-करतां आज संध्याकाळीच पुढेच एक नव॑ चरांट घेयींगून येम म्हणून म्हणींगटलोंहें.1. properly ओढा. 2. from ओढणे.
thoDlaavaNeतोड्लावणे.n.side dish.तोळ्लावणे. तोंडलावणे. जेवणाला रूच द्याच पदार्थ.एकदा अम्ही कोडैकनालाला जाताना वाटेंत दिंडिगलांत एक होटलांत पाष्टेच पल्हार खाया करतां बंडी राह्ते करून उत्तरलों. तिकडे इड्ळीच बरोर खायाला नारळीच चट्णी, कांदाच चट्णी अणी मोळगापोडी-तेल अस॑ तीन विधाच तोंड्लावणे देला. see remark against "thoLlaavaNe"
tholतोल.n.weighing. weight.भार. वजन.अम्च॑ घरच॑ मागे असाच भाजी-पाला दुकानांत फूलकोबी कित्येकदपा तोल करून विकल॑, अणी कित्येकदपा तोल करनास्क॑ एक-एकाला एवढ॑-एवढ॑ मोल म्हणून सांगून विकल॑.
tholaaतोला.n.a unit of measure for weighing gold and silver.सोनेचीं रुपेचीं वजन कराच एक माप ;एक तोला सुमार साडे-अक्रा ग्राम वजन असत॑.तोळा in sm.
thoLlaavaNeतोळ्लावणे.n.side dish.तोड्लावणे. तोंडलावणे. जेवणाला रूच द्याच पदार्थ.पाष्टे टिफ़्फ़िनाला पोंगलाच॑ बरोर तोळ्लावींगाला 'सुंडेकायीच॑' गोज्जु असलतर कित्ति रूच असल॑ म्हणून ते खाणारांसच॑ कळल॑.तोंडीलावणे in sm. This DM word follows a Sanskrit rule, where, if ण्ड is followed by ल/ळ, then the ण्ड is dropped. Hence तोंड+लावणे becomes तोळ्लावणे.
tholNeतोलणे.vt.to weigh.भार कित्ति आहे हे पाह्णे. वजन पाह्णे.जांभळ फळ भयंकर मोल झालाहे-ते-करतान दुकानांतून ते घेताना तोलणे बरोर करतोका म्हणून बेष पाह्यींगाम॑.
thonDतोंड.n.face.मुख.तोंडाच सौदर्याच पक्षा मनाच सौदर्य बेष असाम॑.
thonDतोंड.n.mouth.मुखाच एक अवयव.केम्हा पाव्हो/पावो तोडांत बोट ठींगून असतो तो. पाह्ताना कंठाला वाटते मला.
thonD baandhaNeतोंड बांधणे.met.to gag.बोलाला सोडनास्क॑ उगे बसिवणे.
thonD daakhivaNeतोंड दाखिवणे.id.to face upto something (as if nothing has happened).धैर्यांनिशी समोर पाह्णे.मझ लेंकीच वराडांत॑ "रिसप्षनाला" कोणाचकी शिपारीशांत॑ गाणेच कचेरी एर्पाड केलोतों. पण, कचेरी केलत्या ते कार्यक्रम चित्रवध करून मझ॑ मान काढूनटाकला. मला नवराच घरच लोकांला तोंड दाखिवाला होयनास्क॑ झाल॑.
thonD ghaalNeतोंड घालणे.id.to interfere unnecessarily.आवश्य नाहीस्क मध्ये पडणे.बीदींत दोघदनेंच मध्ये थोर भांडा-भांडी होत असतना आवश्य नाहीस्क॑ तज मध्ये तोंड घाट्ला अणी तलाहीं बेष मार-पीट मिळ्ळ॑.
thonD kavaLaNeतोंड कवळणें.id.to put words into mouth.तोंडांत काडी ठिवणे. दुसरेच गोष्ट अण्कि एकला सांगिट्ला म्हणून करिवणे.मझपाड मी उगे बसल्होतों तरीन, झालते अवघड विषयाला अग्गीन मीच कारण म्हणून अग्गिदनालीन कळिवास्क॑ मझ॑ तोंड कवळूनटाकला तो.
thonD laamb karNeतोंड लांब करणे.met.to get peeved and show the displeasure.असंतोष दाखिवणे.अनावश्य काम करलतेला मी तला बेष शिवादेलों म्हणून अत्ता तो तोंड लांब करींगून बसलाहे.
thonD lhaan hoNeतोंड ल्हान होणे.met.to feel peevish. to cut a sorry figure.चूक केलते करतां लाज वाटणे.कोणाला पाह्यलतरीन परवा करनास्क॑ अहंकारांत हिंडत होत-ते मनुष, अत्ता तोंड ल्हान करींगून बसलाहे. विचारताना कळ्ळ॑, तज घरांतच॑ कोणीन तला परवा करत नाहीत म्हणाच विषय बाह्येर सग्ळ्यांसीन कळूनगेल॑त्यामळे म्हणून अस॑ झाल॑ म्हणून.
thonD paahth basaNeतोंड पाह्त बसणे.id.to keep staring like a dumb loutish person at someone. ढेंगास्क॑ दुसरेला पाह्त बसणे. विषय कळ्ळते मनुषास्क॑ तो पणीन पंडितांच बरोर चर्चा कराला गेला तरीन, नंतर॑ नुस्त तोंड पाह्त बसामते पडल॑.
thonD vaaLNeतोंड वाळणे.vi.to feel thirsty.जिव्हाळा होणे. तान होणे. दाह होणे.उन्हाळाच दिवसी केम्हाहीं तोंड वाळत असलतर॑ चाय पीलतर॑ ते उणे होईल.
thonD vankaD karNeतोंड वंकड करणे.met.to sneer.एळक्कार दाखिवणे. उणीवता दाखिवणे.कोणतरीन चोखोट उद्देशांत तला काहीं उपदेश देलतर॑ ते बरोरल॑ रीतांत स्वीकार कराला तला कळना. तोंड वंकड करींगून बसतो.
thonDaach maanDyaaतोंडाच मांड्या.fig.pointless utterances.एक कार्यालीं प्रयोजन नाहीत॑ बोली.थोर उदार मनाच मनुष म्हणून दाखींगाला भरून दान-धर्म कराच विषीन बोलतील तरीन लोकांस कळूनगेले, तेनी बोलाच अग्गीन नुस्त तोंडाच मांड्या म्हणून.
thonDaalaa aalatheतोंडाला आलते.fig.unthinking utterances.योचना करनास्क॑ कराच बोलणे.दुसरेंच मन्न दुखिवून बोलाच दंडक तला आहे म्हणून कळींगूनपणीन, मी तला पाह्याला गेलतम्हा कोण्तकी एक ल्हान विषय काढींगून तोंडाला आलते बोलाच ऐकून मला फार बेजार वाटल॑.
thonDaalaa baDivaklaaska~ bolNeतोंडाला बडिवलास्क॑ बोलणे.id.to retort rudely.अवमान करास्क॑ उत्तर देणे/बोलणे.कोण्त विषय झालतरीन तोंडाला बडिवलास्क॑ बोलतो म्हणून तजकडे बोलाला मला थोडकपणीन अवडना.
thonDaanth kaaDee THivaNeतोंडांत काडी ठिवणे.id.to put words into mouth.तोंड कवळणे. दुसरेंच गोष्ट अण्कि एकला सांगिट्ला म्हणून करिवणेअम्ही भाऊ-भावंडेंच मध्ये आलते मनथापाला अग्गीन अम्च॑ शेदारलाच कारण॑. केम्हा पाह्वो स्वंत बुद्धी नाहीते मझ॑ थक्टा भाऊच तोंडांत काडी ठिवून ठिवूनच तस झालते.
thonDeतोंडे.n.pot-belly. paunch. थोर झालते पोट. तोप्पे (Tamil). अमेरिकाला जावून उतरतांतरून तिकडल॑ कस्टंस अधिकारीच तोंडे पाव्हून मला हांसू हांसू आल॑. from Tamil.
thonDlaavaNeतोंडलावणे.n.side dish.तोळ्लावणे. तोड्लावणे. जेवणाला रूच द्याच पदार्थ.see remark against "thoLlaavaNe"
thonthara~तोंतर॑.n.stammer.तोतर॑. बोलताना शब्दाच अडचण होणे.तोंतरपण॑ कां येते, ते राह्ते कराला उपाय कायतरीन आहे का, हे दोन प्रश्नालीन बरोरल॑ उत्तर नाही.तोतर in sm.
thoNthoNaaतोणतोणा.n.a food preparation similar to कढी, but with lots of greens in it.पालक, नाहीतर॑, चवळीच पाला, नाहीतर, दंडाच पाला असलते घालून कराच कढी सार्खल॑ एक कालवण.तोणतोणांत कित्येकदन॑ तुरीच दाळ पणीन घालणे आहे. पण तोणतोणा वृताच संपाकाला केलतर॑, जिरे मिरे घालून (दाळ नाहीस्क॑) करतील॑.
thooतू.pron.you.दुसर॑ एक व्यक्तिला एकवचनांत॑ बलावाच रीति.अम्ही तिकडे जायाला जात नाही. तू पह्जेतर॑ जाईंगे.second person singular.
thookतूक.n.weighing.भार/वजन पाह्णे. तूकम घालणे.अम्च॑ घरांत काल आलते जुने पेपरवला बरोर तूक घाट्लाका म्हणून मला संदेह आहे, कां म्हणजे गेल महिना तेवढ॑च पेपर बारा किलो होत॑, पण यंदा दहा किलोच होत॑.
thookamतूकम.n.weight.वजन. भार.घरांत॑ येऊन जुन॑ पेपर घेणार लोकांकडे वागताना अम्ही दत्तन/जत्तन असाम॑. कां म्हणजे, तूकम करताना एमारिवाला पाह्तील॑.from Tamil.
thookam ghaalNeतूकम-घालणे.vt.to weigh.भार/वजन पाह्णे.from Tamil.
thookam ghaalNeतूकम-घालणे.id.to assess or to seize up (a person etc.).(एकाला) इषोबाच डोळेवाटी पाह्णे. एकाला पाव्हून तज स्वभाव इषोब करणे.अम्च॑ ऑफीसाला नव॑ होऊन आलते अधिकारी अग्गिदनासीन बरोर तूकम घालून पाह्यल नंतरच॑ कायतरीन जवाबदारी त्यांस देईल॑ म्हणून वाटते.from Tamil.
thoopतूप.n.ghee. clarrified butter.विघरिवून कढिवलते लोणि.साराला तूपाच फोड्णी घाट्लतर॑ घम्मशी (खम्मशी) वास येईल॑.
thoop keLe~तूपकेळ॑.n.guava fruit.पेरु. जाम. जांब.दक्षिणी मराठीच कित्येक लोके पेरूला तूपकेळ॑ म्हण्तात॑, पण अण्की कित्येकदने सीताफळाला तूपकेळ॑ म्हणतात॑.
thoop keLe~तूपकेळ॑.n.custard apple.सीताफळ. तूपकेळ॑ म्हणजे पेरूकी सीतफळकी, काय असलतरीन खायाला बेष गुळ्चिट असत॑ !
thoor daaLतूर दाळ.n.n a pulse. thoor dhal. तुरीच दाळ.दोन वर्षाच पुढे किलोला पन्नास रुपे होतते तूर दाळ अत्ता ऐंशी रुपेच व॑र विकत आहे.
thopतोप.n.gun. cannon.तोफ. युद्धाच एक उपकरण. बिजापूर किल्लांत असाच "मालीक-ए-मैदान" तोप भूलोकांतच सग्ळ्यांचीन पक्षा थोर तोप म्हणून सांगतात॑.
thophतोफ.n.gun. cannon.तोप. युद्धाच एक उपकरण.दुसर॑ लोक-युद्धांत सिंगपूराच व॑र जपानाच सेना आक्रमण करताना तिकडे होतते तोफ ब्रिटीषांस॑ बरोर युद्धाला आणिवाला झाल नाही, कारण, ते अग्गीन स्थिर होऊन समुद्राला पाव्हून ठिवल्होते अणी जपानाच सेना मागेपटीसून आक्रमण करले, हेमळेच.
thoppeतोप्पे.n.pot-belly. paunch.थोर झालते पोट. तोंडे (Tamil). थोर तोप्पे असणारांस लवून षूसाच लेस बांधाला पणीन कष्ट होईल॑. from Tamil.
thoraNतोरण.n.festoons of mango leaves, flowers etc. hung over doors.अंबाच पान, फूल असलते अलंकाराकरतां कवाडाच व॑र लोंबून घालाच.गणेश उत्सवाच वेळी तोरण बांधाला म्हणून विकाच अंबाच झाडाच पान भयंकर मोल असते म्हणून अम्ही तीन चार दिवसाच पुढेच ते घेऊन ठिवणे आहे.
thoththara~तोतर॑.adj.stammer.तोंतर॑. तोतरून बोलणार. बोलताना शब्द अडचण होऊन येणे. तोतरपण॑ कां येते, ते राह्ते कराला उपाय कायतरीन आहे का, हे दोन प्रश्नालीन बरोरल॑ उत्तर नाही.
thoTTiतोट्टि.n.an earthen flower-pot.कुंडि.मला बागाच काम कराला भरून अवडल तरीन, घरांत असाच बागांत दीडशे तोट्टि आहे-ते-करतां दिवसोडी पाणी घालून घालून देव दिसूनजात॑ मला !from Tamil.
thoTTiतोट्टि.n.a masonary tub (for storing water etc.).(पाणी धरून ठिवाच) सिमेंटाच टब.भट्टींत बरोर तय्यार झाल नाहीते वीट अग्गीन विघरूनदे म्हणून भिंत बांधाच पुढे ईट/वीट/विटकर अग्गीन पाणी भरलते तोट्टींत बेष बुचकळून भिजिवणे आहे.from Tamil.
thraasत्रास.n.vexation.मनाच कष्ट.
thraasत्रास.n.trouble.कष्ट. उपद्रव. तंटा.
thraathara~तरातर॑.adj.of different varieties.वेगळ-वेगळ दिनसाच (जिनसाच). तर॑-तर॑.
thrailokyaत्रैलोक्य.n.three worlds of Earth Heaven and Hell.भूमी, स्वर्ग, नरक॑, हे तीन लोक.
thrangaaतरंगा.n.wave.लाटा.तरंग/लाट in sm.
thrayodasheeत्रयोदशी.adj.thirteenth day of lunar month.एक पक्षाच तेरावां दिवस.
threchaaLeesत्रेचाळीस.adj.forty-three.बेचाळीसाच नंतरल॑ संख्या.
threpanत्रेपन.n.fiftythree.बावन्नाच नंतरल॑ संख्या.
thresaShTत्रेसष्ट.n.sixty-three.बासष्टाच नंतरल॑ संख्या.
threthaayga~त्रेतायुग.n.second of the four yugas.चार युगांत॑ दुसर॑ युग.वामन अवतार, परशुराम अवतार अणी श्रीराम अवतार अस॑ तीन अवतार महाविष्णू त्रेतायुगांत॑ काढले.
thrikaalत्रिकाल.n.morning noon and evening.पाष्टे, दुपार, सायंकाळी हे तीन वेळ.बाली देशांत॑ सगळ॑ साळेंतीन सकल विद्यार्थीनीं त्रिकाल संध्यावंदन करणे आहे मात्र नोहो, कित्येक टी.वी. अणी रेडियो स्टेशनांत पणीन त्रिकाल संध्याच प्रसार करणे आहे.
thrimoortheeत्रिमूर्ती.n.Hindu triumvirate of Brahma Vishnu and Siva.ब्रह्मा, विष्णू, महेश्वर.बाली देशांत॑ हिंदू धर्म आचरण करणार लोके ब्रह्मा, विष्णू शिव अस॑ तीन प्रत्येक प्रत्येक देवांच पूजा करत नाहीते, पण त्रिमूर्तीच पूजा करणे आहे.
thriNe~तृण॑.n.grass.गवत॑. गौत.पश्चिम बंगाळाच मुख्य मंत्री ममता बनर्जी त्यंच नव॑ पार्टी आरंभ करताना तला "तृणमूल कॉंग्रस" म्हणून नाव ठिवाला मुख्य कारण काय म्हणजे, त्यंच पार्टी साधरण लोकांच बरोर मिळून असून त्यंच कष्टाला अग्गीन समाधान द्याच उद्देश आहे म्हणून कळिवाला होत॑.
thriNe~तृण॑.fig.next to nothing.फार थोड. अल्प॑.कंप्यूटराच विषयीं तला एक तृणपणीं कळनातरीन फार कळ्लत्यास्क॑ करींगतो.
thriptha~तृप्त.adj.satisfied. satiated. contented.संतृप्त॑. संतुष्ट॑.पोट भरून जेऊन तृप्त होऊन बसलाहे तो अत्ता !
thriptheeतृप्ती.n.satisfaction. content. संतृप्त॑. संतोष.तृप्ती झाल नाहीतर॑ अण्कीन थोड खा कां.
thrishanku swarghत्रिशंकु स्वर्ग.fig.a figure of speech meaning "neither here nor there".इकडीन नाही तिकडीन नाही म्हणाच अवस्था.इकडल॑ चोखोट काम सोडूनटाकून तो गळ्फाला गेला. पण, सहा महिनांत॑ तिकडल॑ काम बरोर पडलनाही म्हणून वापस येऊनगेला. अत्ता एकडीन नाही तिकडीन नाही म्हणून त्रिशंकु स्वर्गांत॑ बसलाहे.
thrishoolत्रिशूल.n.trident.त्रिशूल आयुध. त्रिशूल महादेवाच आयुध म्हणून हिंदू धर्मांत॑ विश्वास करतात॑.
thritheeyaaतृतीया.adj.third.तीनाच क्रम संख्या.
thritheeyaaतृतीया.n.third day of lunar fortnight.चांद्रमान पक्षाच तिसर॑ दिवस.वैशाख महिनेच शुक्लपक्षाच तृतीया दिवसी याच अक्कतीजाच सणाला "अक्षय तृतीया" म्हणून पणीन सांगतात॑.
thriveNee sanghamत्रिवेणि संघम.n.confluence of Ganga Yamuna and Saraswati rivers.गंगा, यमुना, सरस्वती हे तीन नदीहीं मिळाच ठिकाण.
thryaahththarत्र्याहत्तर.n.seventy-three.बाहत्तराच नंतरल॑ संख्या.
thryaainsheeत्र्याऐंशी.n.eighty-three.ब्याऐंशीच नंतरल॑ संख्या.
thryaaNNavत्र्याण्णव.n.nintey-three.ब्याण्णवाच नंतरल॑ संख्या.
thuchcHa~तुच्छ.adj.contemptible.एळक्काराला लायक झालते. येतां येतां भारत अणी चैनाच मध्यल॑ व्यवहार फार मोस होत आहे. उदंड तुच्छ रीतींत चैना भारताकडे वागाच हेला एक मुख्य कारण आहे.एळक्कारम in Tamil means 'contempt' , 'ridicule'.
thuchcHa~तुच्छ.adj.negligible.उदंड/उजंड उणे असाच॑.
thuDivaNeतुडिवणे.vt.to kick.पांयें वाटि बडिवणे. लाता मारणे. पांयें लागिवणे.बीदींत जात होतते कोणकी एक पोर परीटाच गाढवाच मागे जाऊन तला सळिवत होता. दिडीरशी ते गाढव तज मागल॑ दोन पांयेहीं उचलून तुडिवलामळे पोराच गाळाच हड तुटल॑ अणी चार दांत पणीन तुटून पडल॑.तुडविणे in sm.
thuDivaNeतुडिवणे.vt.to step on.पांयें ठिवणे.भोईंत कागदाच चूर पडलसलतर॑ ते तुडिवताने म्हणून थोरळे सांगतील॑, कारण ते वाग्दीवीच (सरस्वतीच) तुल्य म्हणून.तुडविणे in sm.
thujha~तुझ॑.pron.your's.तुला संबंध असाच॑.चार दिवसा पसून हे पुस्तक मझ॑ घरांत पडलाहे. उद्या येताना पाह, तुझ॑ म्हणजे काढींगून जा. तुझा in sm.
thukaDaaतुकडा.n.a piece of a sweetmeat.टुकडा. गुळ्चीट पदार्थाच एक चूर. दीपावळी सणाच वेळी मैसूरपाक, बर्फी, दूधपेडा असलते तुकडाहीं खारासेव (कारासेव), मिक्स्चर वगैरा पदार्थीन अम्च॑ अम्मा घरांत करत होते. पण हे काळाच नव॑ पिढीच लोके ते अग्गीन दुकानांतून घेऊन खातात॑.
thulaaतुला.pron.for you.तुझ करतां. तुला म्हणून. सायनकाळी मी दुकानाला जाताना तुला कायतरीन पह्जे म्हणजे आणतों.
thulaaतुला.n.the zodiacal sign of Libra.एक नक्षत्र राशीच नाव.तुला राशीला संबंध झालते तीन नक्षत्र आहे, चित्ता (चित्रा), स्वाति अणी विशखा.तूळ in sm.
thulaaतुला.n.a weighing balance.भार/वजन पाह्याच साधन॑. घरोघर येऊन जुने पेपर घेणारांकडे हे काळांत "डिजिटल-तुला" असत॑ अणी त्यामळे बरोरल॑ वजन करतील म्हणून अम्ही म्हणींगताने, कां म्हणजे असलत॑ तुला पणीन उणे वजन दाखिवास्क॑ चोरटपण॑ कराला होईल.
thulaabhaarतुलाभार.n.weighing oneself against an item offered as oblation to God.नवस करून स्वंत भाराच तुल्य एक वस्तु देवाला अर्पणा करणे.गुरुवायूर श्रीक्रिष्ण क्षेत्रांत लेंकरांच तुलाभार कराला कद्दी पाव्हो भरून गुंप असते.
thuLaseeतुळसी.n.holy basil.एक ल्हान पवित्र झाड/झुडूप(1) पूजाला म्हणून तोडाच तुळसी पाणींत विसलताने, अस॑ सांगणे आहे. (2) पवित्रता अणी भक्तीच चिन्ह म्हणून तुळसी झाडाला हंदू धर्मांत एक श्रेष्ठ स्थान आहे.तुलसी/तुळस in sm.
thuLaseedaLa~तुळसीदळ॑.n.tulasi leaf.तुळसीच पाला/पान.दिवसोडी एक दोन तुळसीदळ पाणींत घालून पीलतर॑ आंगाला चोक्कोट म्हणतात॑.
thuLaseedaLa~तुळसीदळ॑.n.shoots and two leaves immediately below it in a tulasi plant.तुळसी झाडाच नव होऊन झालते पालाईं (अंकूरीं) तझ खाले असाच दोन पालाईं.देवपूजाच वेळी गंधोदक-तीर्थ करताना तज बरोर एक दोन तुळसीदळ पणीं घालणे आहे.
thuLaseekaaShTa~तुळसीकाष्ट.n.dried tulasi stems.वाळलते तुळसी पेड.देवपूजाला गंधोदक करताना तुळसीदळ मिळ्ळ नाहीतर॑ तुळसीकाष्ट तरीन घालूया.
thuLaseemaalaaतुळसीमाला.n.necklace made of tulsi beads.तुळसी मणींत॑ केलते माळ॑.दुकानांतून तुळसीमाला घेताना बरोर पाह्यींगून घेम॑, कां म्हणजे, ते तुळसीमणींतून केलतेचका, नाही वेगळ॑ कोण्तकीका म्हणून सांगाला होईना.
thuLaseemaNeeतुळसीमणी.n.beads made of dried tulasi stems.तुळसीकाष्टांत॑ केलते मणी.तुळसीमणीच माळ घालींगणे एक चोक्कोट चिन्ह म्हणून देवनिष्ठा कराच भरून दादिगे वापरतात॑.
thuLaseepoojaaतुळसीपूजा.n.pooja performed by ladies to tulasi.बायके तुळसीला कराच पूजा.दिवसोडी तुळसीपूजा कराच बायका घराला शोभा देतात॑.
thulya~तुल्य.adj.equal, comparable.अग्गि विधांतीन एकसारख॑ असाच॑."तू मझ॑ तुल्य" म्हणून सांगून हनुमानाला श्रीरामा भेटींगाच दृश्य अठींगट्लतर॑ अम्च॑ मनांत अत्यंत भक्तीच भाव येते.
thumche~तुम्च॑.pron.your's.तुमच॑. तुम्हाला संबंध झालते.बाह्येर पाऊस पडत आहे. मझ॑कडे एक छत्रीच आहे-ते-करतां तुम्ही तुम्च॑ छत्री आणींगांत॑.तुमचा in sm.
thumche~ thumche~तुम्च॑-तुम्च॑.pron. belonging to each one of you.तुम्च एकेक दनांचीं.तुम्च॑-तुम्च॑ विषय तुम्ही-तुम्ही पाह्यींगांत॑, मला ते अग्गीन पाह्याला वेळ नाही.plural third person (collective).
thumhaalaaतुम्हाला.pron.for you.तुम्चकडे म्हणून असाच॑.मी मझ॑पाड इकडेच बसतों. तुम्हाला काय पह्जेकी ते आणींगांत॑.
thumheeतुम्ही.pron.you all (in a plural sense). (second person plural pronoun).अनेक लोकांला उद्देश करून बलावाच रीती (दुसर॑पुरुष बहुवचनाच सर्वनाम॑).तुम्ही अग्गिदनीन इकडेच असांत॑. मी मात्र जाऊन येतों.
thumheeतुम्ही.pron.you (while addressing a person with respect).एकांस मर्यादान॑ बलावाच रीत॑.तुम्हाला आंगाला होईनातर॑ इकडेच बसांत॑. मी जाऊन ते आणतों.singular, second person.
thumhee thumheeतुम्ही-तुम्ही.pron.each one of you.तुम्ही एकेक दनीं.तुम्ही-तुम्ही तुम्च॑-तुम्च॑ काम करींगांत॑. मला हाताचान होईना.singular as well as plural, second person.
thuppaakkeeतुप्पाकी.n.a gun. a firearm.तोप. तोफ.दुसर॑ लोक-युद्धाच वेळी ऑटोमॅटिक-तुप्पाकी नहोत॑. म्हणजे, गोळी उडिवाला एक एक दपाहीं तुप्पाकीच ट्रिगर होढामते (ओढामते) होते. पण अत्तच॑ ए-के 47 तुप्पाकींत एकदपा ट्रिगर होढलतर॑ शंभरों-शंभर गोळी येईल॑.from Tamil.
thurangतुरंग.n.jail.तुरंगा. कारागृह. दंड मिळ्लत्यांस॑ बंध करून ठिवाच ठिकाण. बंधखाना. कैद. दक्षिण-आफ़्रिकाच नेता नेल्सन मंडेला सत्तावीस वर्ष तुरंगांत असलांपिरी बाह्येर येताना पूरा देशीन उत्साहाच आर्भाटांत त्यांस स्वागत करले.
thurangaaतुरंगा.n.jail.तुरंग. कारागृह. दंड मिळ्लत्यांस॑ बंध करून ठिवाच ठिकाण. बंधखाना. कैद.
thureech daaLतुरीच दाळ.n.a pulse. thoor dhal. तूर दाळ.सस्याहारी लोकांस आंगाला प्रोटीन मुख्य होऊन तुरीच दाळांतून मिळते.
thureech pooDतुरीचपूड.n.a mix of roasted and powdered grams and dhals for eating with cooked rice.भाताचपूड. भाताच बरोर कालिवून खायाच वेगळ॑-वेगळ॑ दाळाच भाजून पूड केलते पूड पदार्थ.दिवसोडी सार सांभार खाऊन, एक दिवस वेगळ॑ एक खाम॑ म्हणून वाटताना भातांत तुरीचपूडीन तेलीन मिळिवून खायाला बेष अस्त॑.
thuTakeतुटक॑.adj.broken.मोडक॑.हे जवळ अम्ही बालीला गेलतम्हा मझ॑ नातूच अर्सा पह्यिल दिवसच तुटल॑ अणी कसकी दोरानीशी बांधून एकमादरी बरोर करींगट्ला. नंतर॑ सात दिवसीन, म्हणजे बंगळूरला पर्तून यापर्यंतीन ते तुटक॑ अर्सा घालींगत होता. तुटका in sm.
thuTaNeतुटणे.vi.to snap.मोडून छेद होणे.कष्मीरांत गुलमार्गांत एक केबल-काराच तांत तुटून, ते खाले पडून एक कुटुंबाच चारदनीन मरूनगेलते समाचार पेपरांत वाचलों. typically a thread etc.
thuTaNeतुटणे.vi.to break into peices.मोडून छिन्नाभिन्न होणे. जपान राज्याच पुरातन मिंग राजवंशाच काळाच एक पोर्सलीन जाडी मझ॑कडे आहे. ते खाले पडून तुटताने म्हणून अर्सांत करलते "षो-केसांत" दत्तन करून ठिवलोहें.
thyaagत्याग.n.sacrifice.स्वंत उपयोगाला नोको म्हणून सोडून देणे.स्वार्थ लोकांस त्याग म्हणाच गोष्टाच अर्थ कळलका म्हणून संदेह आहे मला.
thyaagत्याग.n.resignation.काम सोडणे. उद्योग सोडणे. लांच घेतो म्हणून आरोप आलकीनी (आलकी नाही) कामांतून त्याग देऊन पळाला पाह्यलत्याला समेच धरून किलुपांत घालूनटाकले.
thyaagapathra~त्यागपत्र.n.resignation letter.काम सोडतों म्हणून लिव्हून द्याच पत्र.अत्ता-जवळ॑ बहुजन-समाजवादी कक्षीच अध्यक्ष मायावती राज्यसभांत त्यागपत्र देतें म्हणून घोषणा करतानच॑ उपराष्ट्रपती ते सम्मत करूनटाकले.
thyaageeत्यागी.n.one who has given up worldly matters.वैरागी.

No comments:

Post a Comment