Tuesday, April 1, 2014

thh (थ)




.Words (using Phonetic KeyIn DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
thhaambaNeथांबणे.vt.to stay. to put up (in). to reside.राहणे. असणे.अम्च॑ गामाला तुम्ही आलाहेंत म्हणून मला कळ्ळ॑. कोठ थांबलाहेंत म्हणून कळिवलतर॑ मीच येऊन तुम्हाला पाह्तों.
thhaambaNeथांबणे.vt.to wait.राखणे.जुने काळांत थोर-थोर स्टेशनांत ट्रेन पंध्रा मिनिट तीस मिनिट थांबत होत॑, पण अत्ता अग्गीन पोणावांटा स्टेशनांतीन दोन दोन मिनिटच थांबते.
thhaambivaNeथांबिवणे.vt.to detain.राखिवणेमी बॅन्कांत रीजनल-मॅनेजर म्हणून काम करत अस्ताना एकदपा गुलबर्गाला गेल्होतों. पर्तून याच ट्रेन धराला स्टेशनाला येताना वेळ होऊनगेल॑ तरीन तिकडले स्टेशन-मास्टर ट्रेनाला पंध्रा मिनिट मझकरतां थांबिवून ठिवले. थांबवणे in sm.
thhaanथान.n.woman's breast.स्तन.बायकांस॑ थानाच कॅन्सर आलतरीन बरोरल॑ वेळी, म्हणजे कॅन्सर आल॑ म्हणून कळून समेच, ऑपरेशन करींगून, आवश्याजोक्त॑ ओखद घेवून डॉक्टराच निर्देश बरोर आचरण करलतर॑ आंग बरोर होईल.
thhaan deNeथान देणे.vt.to breast feed. to suckle.लेंकराला मायेच दूध देणे. ढोसणे. ढोंचणे. पाजिवणे.हे काळाच भरून नव॑ युवतीलोक॑ लेंकरांस थान देणे सोडून, दूधाच पंप प्रयोग करून दूध बाह्येर काढून बोट्टलांत घालून लेंकरांस देतात॑.
thhaapथाप.n.a gentle pat.ताप. तळहाता वाटि हळ्ळु मारणे.
thhaapaDNeथापडणे vtto pat gently.तापडणे. थापटणे. तळहात हळ्ळु लागिवणे. पळा-पळी खेळत अस्ताना खाले पडून घाव लागींगून मझ नातू रडत मझकडे आला. नंखर थापडून देलाव॑र रडणे राह्ते केला.
thhaapaDNeथापडणे.vt.to rub gently. to massage lightly.हळ्ळु चोळणे. हळ्ळु रगडणे.एक वारापसून मझ॑ पाठ लचक धरून होत॑. आज थोडक॑ अमृतांजन लावून थापडला नंतर॑ बर॑ झाल॑.
thhaapaTNeथापटणे.vt.to pat gently.तापडणे. थापडणे. तळहात हळ्ळु लागिवणे.
thhaaTaNeथाटणे.vt.to display with intention to impress.दुसरेंच प्रशंसाला म्हणून काढून दाखिवणे.
thhaaToon oTHaakaNeथाटून-ओठाकणे.vt.to draw oneself to full height.आंग वर होढून/ओढून ओठाकणे. थाटून-होठाकणे.पह्यिलेच सात फ़ुट उंच अणी भीमाकार आंग आहे तला. लोकांस भें दाखिवाकरतां थाटून ओठाकाच आवश्यच नाही तला.
thhaileeथैली.n.bag.पिशवी."एल.जी" हिंगाच हिरव॑ रंगाच थैली अम्च॑ ल्हानपणांत भरून प्रसिद्ध होत॑.
thhaLa~-thhaLa~थळ-थळ.adj.shining. lustrous.झळक.योग, प्राणायाम अणी ध्यान करणारांच तोंड केम्हीन थळ-थळ अस्ते.
thhembथेंब.n.drop of a liquid.द्रव्याच बिंदू. ठिमका.
thhingaaNaaथिंगाणा.n.jumping around boisterously.अट्टहास करून उडी मारणे.उन्हाळाच महिनेच सळेच सुट्टी येताना अम्ही लेंकरे अग्गिदनीन, म्हणजे चुलत भाऊ-भाऊंडे पणीन, आजा-आजीच घराला जाओं. तिकड॑ अम्च॑ थिंगाणा सोसाला होईनास्क॑ आजा-आजी कष्टि भोगतील॑.
thhoDथोड.adj.a little.थोडक॑बरोर तीन बडिवताना येतों म्हणून सांगट्ला तरीन तो अण्खीन आल नाही. थोड वेळ राहून पाह्मणे, येऊया.थोडा/थोडका in sm.
thhoD-thhoDथोड-थोड.adv.nearly.जवळ-जवळ॑. थोडक॑-थोडक॑.मझ॑ चुलतभाऊ पाह्याला थोड-थोड मझस्कच असेल॑.
thhoD-thhoDथोड-थोड.adv.little by little.थोडक॑-थोडक॑.पोळत-पोळत असाच कॉफी पीणे म्हणजे मला होईनाच होईना. थोड-थोड फुंकून निविवून पीलतरच होईल॑.
thhoDaka~थोडक॑.adj.a little.थोडबस्सांत जाताना एकलाकडे थोडक॑ सरकून बैस म्हणून सांगताना तो मला मारालाच येऊनगेला. थोडा/थोडका in sm.
thhoDaka~ thhoDaka~थोडक॑-थोडक॑.adv.nearly.थोड-थोड. जवळ-जवळ॑.एक दिवस मी ट्रेनाच टिकट घ्याला क्यूंत ओठाकलसताना कोणकी एक मनुष मला पाव्हून मी थोडक॑-थोडक॑ पाकिस्थानाच अध्यक्ष परवेज़ मुषरफास्क॑ आहें म्हणट्ला.
thhoDaka~ thhoDaka~थोडक॑-थोडक॑.adv.little by little.थोड-थोड.ते काम पूरा एकच दिवस काराम म्हणून काहीं नाही. एक-एक दिवसीन थोडक॑-थोडक॑ करलतरीन पुरे.
thhoDakyaantha~थोडक्यांत॑.adv.before/within a little while from now.थोड वेळाच आंत॑.आंगाला बर॑ नाही म्हणून डॉक्टराला पाह्याला म्हणून त्यंचकडे बसून एक घंटे झाल॑. मझ पक्षा पुढ॑ आंत गेलत्या थोडक्यांत बाहेर येईना म्हणून वाटते.
thhorथोर.adj.big. great.मोट्ठ॑.गेल महिना आलते थोर वारे-पाऊसांत अम्च॑ घरच॑ समोर होतते थोर झाड पडूनगेल॑.
thhoraaDथोराड.adj.very large. very stout. strapping.फार मोट्ठ॑. उदंड थोर.
thhorLaaथोरळा.adj.elder.वयेंत॑ मोट्ठ॑अम्च॑कडे अत्ता दोघदने बोलूनटाकून गेलेकी, त्यांत थोरळा कोण ?थोरला in sm.
thhorveepaNa~थोर्वीपण॑.n.feeling of superiority.मोट्ठ॑ मनूष अस वाटींगणे.त्यंच घरचे पूराहीं उदंड॑ वाचलतनी. पण, तेनीच षाणेम्हणून थोर्वीपण आहे. 
thhorveepaNa~थोर्वीपण॑.n.dignified (behaviour). nobility.गांभीर्य.तेनी एवढे थोर उद्योगांत असून पणीं सगळां कडीन थोर्वीपणांतच वागाच॑.
thhunkaaथुंका.n.spittle.लाळ.पायरीच कोनेंत पान खाऊन थुंकलते थुंका पडलसाच पाव्हून अम्च॑ सोसैटीच अधिकारीलोके तिकड अग्गीन देवाच पेट लोंबिवून घाट्ले तरीन ते परवा करनास्क॑ ते पेटाच आजू-बाजू पणीन लोके थुंकाला आरंभ करले.
thhunkaNeथुंकणे.vt.to spit.तोंडांतल॑ थुंका बाहेर थुंकणे.बसून असाच ठिकाणेंतच भोंताले थुंकत असाच लोकांस पाह्यलतर॑ कंटाळा येईल मला.

No comments:

Post a Comment