Saturday, March 22, 2014

y (य)


.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
yaaया.n.come hither. आदरांत॑ (अम्च॑कडे) बलावणे. यावा. यांत॑. येंत॑.
yaagयाग.n.an elaborate religious ceremony. यज्ञ. होम॑.
yaagashaalaaयागशाला.n.enclosure where yaga is performed. याग कराच स्थल.
yajamaanयजमान.n.husband. दाल्ला. दल्ला.
yajamaanयजमान.n.owner. मालक.
yajamaaneena~यजमानीन॑.n.a female owner. स्त्री यजमान.हेरिटेज' दूधाच कंपनीच येजमानीन॑ श्रीमति भुवनेश्वरी (श्री चंद्रबाबु नायुडूच बाईल) आहे. तेनी नावाला मात्र न्हो, पण खर॑ म्हणून ते कंपनीच तेवढे कामीन सांभाळतात म्हणे. अस अम्च देशांत उदंड बाईका थोर-थोर कंपनीच यजमानीन॑ म्हणून आहेत॑.
yajamaaneena~यजमानीन॑.n.wife of the owner. यजमानाच॑ बाईल. अम्च घरच॑ जवळ असाच दाळ-तांदूळाच दुकानवाला नावाला मात्रच ते दुकानाच मालक म्हणून सर्वालीं कळल॑. रीणांत काहीं साधन अम्हि विचारलतर॑ "तुम्ही यजमानीनाला विचारा" अस॑ ते दुकानवालाच सांगतो !
yajnyaयज्ञ.n.an elaborate religious ceremony. याग. होम.
yajnyakunDयज्ञकुंड.n.a fire-pit for offering oblations. होमकुंड. आहूती सोडाच अग्निकुंड.
yajnyashaalaaयज्ञशाला.n.the place meant for performing yagnya. यज्ञाच ठिकाण.
yajnyopaveetha~यज्ञोपवीत.n.the sacred thread.जानव.
yajurveda~यजुर्वेद.n.the second of the four Vedas. चार वेदांत॑ दुसर॑ वेद.
yajurvedeeयजुर्वदी.n.a follower of Yajurveda.यजुर्वद संप्रदाय अनुसार करणार.
yakShयक्ष.n. a demi-god of very low status. ल्हान स्थितीच एक उपदेवता.
yakShiNeeयक्षिणी.n.female of the yaksha species.यक्ष वर्गाच बायको.
yamaयम.n.Lord Yama. God of Death.यमदेव. मृत्युदेव. कालदेव.
yamaयम.fig. extreme.फार. उजंड॑. अमच शेदारल घरच पोर यम तंटा करतो. तज बापाकड सांगून काय प्रयोजनीं झाल नाही.
yama baadhaaयमबाधा.fig.extreme pain. थोर दुखणे. मझ बाईलीला गुडघाच 'ऑपरेषन' झाला नंतर॑ दहा-पंध्रा दिवसाला यमबाधा झाल ; पांय सरकीवाला देव दिसून गेल॑.
yamadevयमधर्म.n.Lord Yama. यमदेव.
yamadoothयमदूत.n.messenger of Death sent by Yama to take away the life of the dying. मराच लोकांच॑ जीव काढाला यमदेव पाठिवाच॑ सेवक.
yamaganDamयमगंडम.n.a specified period of one and a half hours of each day during which any activity leads to failure or destruction of the end result. प्रत्येक दिवसाचीं दीड घंटेच अशुभ काळ. हे काळांत कराच काम व्यर्थ होईल म्हणून आहे.एक मुख्य कार्य कराच पुढ॑ राहुकाळकी, यमगंडकी असनास्क पाह्यींगण॑ बर॑.this period changes from day to day.
yamalokयमलोक.n.the domain of Lord Yama. यमपुरी.
yamalokयमलोक.n.the place where the souls of the dead depart to.मराच लोकांच॑ जीव पावाच ठिकाण.
yamapureeयमपुरी.n.the abode of Lord Yama.यमलोक.
yameeयमी.n.name of Lord Yama's sister. यमदेवाच बहिणीच नाव.
yameeNयमीण॑.fig.a derisive term to describe an incorrigible woman. अवघड स्वभावाच बायको.
yandaaयंदा.adv.this year. यंदपा. हे वर्षी. हेवंदा. यवंदा.घरच अंबाच झाडांत॑ गेलंदा पक्षा यंदा फूल उदंड उणे सोडलाहे/झालाहे.
yandaaयंदा.adv.this time. this occasion.यंदपा. हे दपा. हेवंदा. यवंदा.गांवाला जायाच वाट उदंड हाळ जालाहे. गेल महिना तिकडे गेलतम्हा मझ बंडी "पंक्चर" होऊनगेल॑/झाल॑. ते करतां यंदा मी तिकड जाताना मझ स्वंत बंडींत जायनास्क॑ बस धरींगून गेलों.
yaneeयनी.pron.these people.हे लोके (सर्वनाम॑, बहुवचन॑). येनी. हेनी.
yanthra~यंत्र.n.machine. उपकरण॑.
yanthra~यंत्र.n.an amulet of a copper plate engraved with tantric symbols worn on the body or hung at the entrance of a home to ward off evil.दृष्टि लागनास्क असाला, नाहीतर, भूत-प्रेत-पिशाचांच॑ उपद्रव होईनास्क असाला तंत्राच चिन्ह होढलते/ओढलते ताम्रेच पदक/टांक.हे आंगावर घालणे, नाहीतर, घराच उंबराव॑र ठिवणे आहे. घराला दृष्ट लागनास्क॑ असाला कित्येक लोक॑ घराच बाह्येर 'श्री श्क्ती' यंत्र अडकीवतात॑.
yashasveeयशस्वी.adj.meritorious.कीर्तिमान. यशवंत.
yashvanthयशवंत.adj.meritorious. कीर्तिमान. यशस्वी.
yatheeयती.n.an ascetic. संन्यासी.
yathhaaयथा.adv.ditto. तसलते.
yathhaa kaalयथाकाल.adv.appropriate time. योग्य वेळ.
yathhaa krama~यथाक्रम.adv. regular order. क्रमाप्रकार.
yathhaa paddhatheeयथापद्धती.adv.as usual. यथा प्रमाण॑.यथापद्धती/यथापद्धत in sm.
yathhaa paddhatheeयथापद्धती.adv.as per practice.दंडका प्रमाणे.
yathhaa prakaarयथाप्रकार.adv.as before. पुढ॑ सार्ख. व॑रच प्रकार.
yathhaa pratheeयथाप्रती.adv.as per original. पह्यिलचस्क॑.
yathhaarthhयथार्थ.adj.real.वास्तव॑.
yathhaarthhयथार्थ.adj.true. खर॑.
yathhaarthhयथार्थ.adj.proper. योग्य.
yathhaarthhathaaयथार्थता.n.truthfulness. खर॑पण॑.
yathhaashaasthraयथाशास्त्र.adv.as laid down in scriptures.शास्त्रा प्रकार.
yathhaashakthiयथाशक्ती.adv.as per one's ability.स्वंत॑ श्रमाजोक्त॑.
yathhaasthhitheeयथास्थिती.adv.original state.पह्यलच॑ स्थिती.
yathhaavidheeयथाविधी.adv.as per rules.शास्त्रा प्रमाण॑.
yathhale~यथेल॑.adj.relating to this side.हे पटीसच॑. एथेल॑. इकडच॑. इथेल॑. हे बाजूच॑.
yathhale~ thathhale~यथेल॑-तथेल॑.adj.of various places. इकडल॑ तिकडल॑. एथेल॑-तथेल॑. इकडच॑-तिकडच॑. इथेले-तथेल॑.
yathheयथे.adv.here. this side. in this place. हे ठिकाणी. एथे. इकडे. इथे.
yathhe thathheयथे-तथे.adv.hither and thither. एथे-तथे. इकडे-तिकडे. इथे-तथे.
yathhechcHa~यथेच्छ.adv.as per one's wish. to the satisfaction of one's wish. to heart's content.यथेष्ट. इष्ट प्रकार. मनाजोक्त॑.
yathheShTयथेष्ट.adv.as per one's wish. to the satisfaction of one's wish. to heart's content. यथेच्छ. इष्ट प्रकार. मनाजोक्त॑.संकोच भोगनाका. यथेष्ट जेवांत॑ !
yathheShTयथेष्ट.adv.plenty.भरून. उदंड. उजंड. (1) योचना करनाकांत॑. गुंजालाडू यथेष्ट आहे. अस्गिदनालीं चार-चार वाढाला पह्जे तेवढे आहे. (2) हे वर्ष पाऊस/पौस बेष झाल॑. नदींत॑ पाणी यथेष्ट गळत/वाहत आहे.
yathheShTयथेष्ट.adv.unreservedly.बाधा नाहीस्क॑. अडचण॑ नाहीस्क॑.तेनी एक फार उदार मनुष॑. दान धर्म यथेष्ट केलाहेत॑.
yathhochitha~यथोचित.adv.befittingly. योग्याजोक्त.
yathhoonयथून.adv.from here. एथून. इकडून. इथून.
yathraaयात्रा.n.a trip.(वेगळ॑ गावाला) जाण॑.
yathraaयात्रा.n.a pilgrimage. तीर्थाडन॑.तीर्थ यात्रा. तीर्थाडन॑.
yaththanयत्तन.n.effort. work. endeavour. प्रयत्न.मनुषाच यत्तन अर्ध, देवाच यत्तन अर्ध म्हणणे आहे. पण, मला वाटाच काय म्हण्जे मनुषाच यत्तन 99% अणी देवाच अनुग्रह 1% असाम॑. कारण, देव अम्हाला मनुषाच जन्म देलतेच एक थोर कार्य म्हणून सांगूया.
yavaDha~यवढ॑.adj.this much, so much (implying magnitude or quantity).येवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑.(1) तला पैसाच कष्ट आहे म्हणून उदंड दिवसा पसून मला कळ्ल॑ होत तरीन, यवढ॑ कष्ट होत म्हणून म्हणींगटळोंच नाही.(2) सद्याला मझकड॑ पैसा यवढ॑च आहे. अण्खीन जास्ती पह्जतर॑ नंतर॑ पाठिवून देतों.एवढा in sm.
yavaDha~यवढ॑.adj.this much, so much etc (implying multitude or number). येवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑आजच कार्यक्रमाला अम्ही दोनशे जण येतील म्हणून तज जोक्त पल्हाराच व्यवस्था केलोतों. पण, योचना केलत्यापक्षा पन्नास जण अधीक आलेतेकरतां सद्याला आलते यवढ॑ लोकांस॑ पल्हार वाढलांपिरी आवश्या प्रकार केवढ पह्जकी तेवढ॑ पल्हाराच व्यवस्थाला पुन्हाहीं सांगून पाठिवलों.एवढा in sm.
yavaDha~ thevaDha~यवढ॑-तेवढ॑.adj.approximately. roughly. जवळ-जवळ. एवढ॑-तेवढ॑.तुला ते पूरा कळनातरीन, तज विषयीं यवढ॑-तेवढ॑ तरीन कळ्लासलतर॑ अम्च काम कसतरीन चालिवुया म्हणून मला वाटत॑.
yavandaaयवंदा.adv.this year.हे वर्षी. हेवंदा. यंदा. गेलंदा बोर-आड खांडाला प्रयत्न करून पाणी आल॑ नाही म्हणून यवंदा मी सादा आड खांडाला निश्चय केलों.
yavandaaयवंदा.adv.this time.हे दपा. हेवंदा. यंदा. ते गांवाला जायाच वाट उदंड हाळ जालाहे. गेल महिना तिकड गेलतम्हा मझ बंडी "पंक्चर" होऊनगेल॑/झाल॑. ते करतां यवंदा मी तिकडे जाताना मझ स्वंत बंडींत जायनास्क॑ बस धरींगून गेलों.
yeये.pron.this (applied to both animate and inanimate).हे. जवळ असाच एक साधनाला, अथवा, जीवीला उद्देश करून सांगाच सर्वनाम॑ (एकवचन॑).
yeये.pron.these (applied to both animate and inanimate).हे. जवळ असाच एकापक्षा जास्ती साधनांला अथवा जीवींला उद्देश करून सांगाच सरवनाम॑ (बहुवचन॑).
yejavaLयेजवळ.adv.recently. समीपांत॑. हेजवळ॑. सी.पी.ऐ.(माओ) पक्ष॑ पुन्हा-पुन्हा त्यंच स्वाधीना खाले असाच प्रदेशांत॑ रेलवे-ट्राकाला उडीवून नाश कराच एक मोट्ठ॑ चिंताच विषय झालाहे. हे आफत्तांतून चुकिवाला येजवळ॑ केंद्र सरकार र्रेलवेच अपाय उणे करिवाला उपयोग होयाच एक उपकरण॑ उपयोग कराला निश्चय केलाहेत॑.
yeNaar jaaNaarयेणार-जाणार.pron.all and sundry (people).नियंत्रण॑ नाहीस्क॑ तेवढेदनीं
yeNeयेणे.vi.to come. वेगळ॑कडून इकडे येणे.
yeNe jaaNeयेणे-जाणे.n.to-and-fro visits.(दोघेकडूनीं) येतजात असणे.
yeNe jaaNeयेणे-जाणे.fig.keeping in touch. being on friendly terms.संपर्कांत॑ ठींगणे/असणे. uis ते संभवाच नंतर॑ त्यंच मधे येणे-जाणे असास्क मला वाटत नाही.ते संभवाच नंतर॑ त्यंच मधे येणे-जाणे असास्क मला वाटत नाही.
yeneeयेनी.pron.these people.हेनी. हे लोके (सर्वनाम॑, बहुवचन॑). यनी.
yethaan jaathaanयेतां-जातां.adv.while moving to and fro casually. उग॑ येत जात असताना. जातां-येतां मझ लेंक तिज उजलादिवसाला म्हणून एक डब्बा चॉक्लेट फ़्रिड्जांत॑ ठिवल होति. तिज भाऊ तिला कळ्नास्क॑ येतां-जातां 'फ़्रिड्ज' उघडून ते पूरा काढून खाऊनटाकला !येता-जाता in sm.
yethaan yethaanयेतां-येतां.adv.of late. हे समीपांत॑. हे जवळ॑. कित्तीदपा सांगटल तरीन तो सांगाच गोष्ट ऐकना. येतां-येतां तला पाह्यिलतर॑ मला पेटींगून येते.
yethheयेथे.adv.here.इकड॑. हे ठिकाणी. इथे. येथे/इथे in sm.
yethhoonयेथून.adv.from here.इकडून. इथून.
yevaa devaaयेवा-देवा.n.income and expenditure. receipts and payments. याचद्याच. पैसाच संपादण॑ईं खर्चीं.व्यापारकी, घरकी, बरोर चालिवाला अम्हाला येवादेवाचव॑र चक्कोट/चोखोट नियंत्रण असाम॑. प्रति वर्ष, अणी प्रति महिना एक 'बडजेट' घालून खर्चांत॑ अठोपण फार अवश्य आहे.
yevaa jaavaaयेवा-जावा.n.social intercourse. येणे-जाणे. जावा-येवा.वराडाच संमंधाचव॑र मनस्थाप झाल॑ नंतर॑, त्यंचमधे येवा-जावा नाही म्हणून मी ऐकलों.
yevaDhe~येवढ॑.adj.this much, so much (implying magnitude or quantity). यवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑. एवढा in sm.
yevaDhe~येवढ॑.adj.this much, so much etc. (implying multitude or number). यवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑.एवढा in sm.
yevaDhe~ thevaDhe~येवढ॑-तेवढ॑.adj.approximately. roughly. जवळ-जवळ. एवढ॑-तेवढ॑. तुला ते पूरा कळनातरीन, ते विषय यवढ॑-तेवढ॑ तरीन कळ्लासलतर॑, अम्च काम कसतरीन चालिवुया म्हणून मला वाटत॑.
yoयो.pron.this man. हे मनुष॑.
yochanaaयोचना.n.thought. विचार.मी सांगाच सांगणे झाल॑. बरोर योचना करून तू काय पह्जे तरीन करींग॑.
yochanaaयोचना.n.worrying thought. चिंता.गेलंदा मी मझ मित्राला पाह्ताना तेनी म्हण्ट्ले, "मझ लोंक बरोर वाचतनाही. तेच मला योचना झालाहे".
yoddhaaयोद्धा.n.warrior. a combatant. वीर॑. शूर॑.from युद्ध.
yogयोग.n.conjunction.मिळून येणे. संयोग॑.
yogयोग.n.good luck.भाग्य.
yogयोग.n.opportunity.अवसर.
yogaaयोगा.n.yoga exercises. योगा.
yogaabhyaasयोगाभ्यास.n.regular practice of yogic asanas. योगाच अभ्यास.नित्य योगाभ्यास करणारांस॑ रोगरागी जास्त येईना, अणी तेनी बुद्धींत पणीं हुशार असतील॑.
yogaasana~योगासन॑.n.yoga postures. योगाच आसन॑.
yogakShema~योगक्षेम॑.n.maintenance. उपजीव कराच॑.
yoganidraaयोगनिद्रा.n.a yogic posture of complete relaxation. संपूर्ण विश्रामाच एक योगासन॑. योगासन अणी प्राणायाम केलाव॑र, वीस निमिषाला योगनिद्रा करलतर॑ आंगांत एक विधाच हलकपणीं उत्साहपणीं येते.
yogeeयोगी.n. one with yogic powers. योगशक्ती असणार.
yogineeयोगिनी.n.a lady with yogic powers.बायको योगी.
yogya~योग्य.adj.suitable.लायक. ऐ.ऐ.टीला मिळाला योग्य होम॑ म्हण्जे, एक सुलुभ काम नोहो. अपार बुद्धीवंत असून पणीं रात्रीं-दिवसा वाचून तरच ते होईल॑.
yogya~योग्य.adj.deserving. worthy.लायक असाच॑.
yogya~योग्य.adj.proper. right. बरोरल॑.
yogya~योग्य.adj.qualified. लायक असाच॑.
yogyathaaयोग्यता.n.suitability. worthiness. eligibility.योग्यता. मझ मित्र संकटांत॑ बसलोते. विचारताना कळ्ल॑, त्यंच लोंकला ऐ.ऐ.टींत॑ मिळाला योग्यता झाल नाही म्हणून.
yojanaaयोजना.n.plan.उपाय.
yojanaaयोजना.n.scheme. एक कार्यक्रम कस करणे, हे व्यक्त होऊन कळिवाच॑.
yojanaaयोजना.n.a measure of length of roughly four miles.जवळ-जवळ चार मैलाच दूर.
youvanयौवन.n. youth.युव वयेच॑.
yuddhयुद्ध.n.a war. a battle.(दोन सैन्या मध्ये होयाच॑) युद्ध. रण.
yuddhabhoomeeयुद्धभूमी.n.battle field.रणभूमी. युद्धाच॑ मैदान.
yuga~युग.n.an an epoch. an age. एक फार मोट्ठ॑ काळ॑.
yuga~युग.n.one of the four yugas. कृत, त्रेता, द्वापर, अणी, कलि, हेजांत एक युग.
yuga~ yugaanthara~युग-युगांतर॑till the completion of several yugas, ie, almost in perpetuity.संपनातेएवढ॑ वेळाच समय.
yugaadiयुगादि.n.start of a new year. उगादि. गुढीपाडवा. गुडीपाडवा. here युग denotes a year.
yugaanthara~युगांतर॑.n.end of an epoch. end of an age. end of a very long period.युगाच अंत. उदंड लांब काळाच समय.
yuktha~युक्त.adj.proper. योग्य. उचित.
yuktheeयुक्ती.n.an idea. एक योचना. योजना.
yuktheeयुक्ती.n.a trick.उपाय॑.
yuva~युव.adj.young. youthful. तरुण वयाच॑.
yuvaraajaaयुवराजा.n.crown-prince. राजाच काळानंतर॑ राजा होणार राजकुमार.
yuvatheeयुवती.adj.a maiden. यौवन स्त्री.

No comments:

Post a Comment