Saturday, March 22, 2014

v (व) 2 (vaDyaa To vasudhaa)



.Words (using Phonetic Key)In DM scriptMeaning in EnglishMeanings, phonetic variations & morphes in DMIllustrative sentences using the wordRemarks & Notes
vaDyaaवड्या.n.a sun-dried and fried snack.ऊनांत॑ वाळिवून तळून खायच एक पदार्थ. वडा. संडिगे (Kannada). वडाम (Tamil). वत्तल (Tamil).
vahineeवहिनी.n.a term used for addressing husband's elder sister. दाल्लाच अक्का. वैह्नक.
vahineeवहिनी.n.a term used for addressing elder brother's wife. वडील भाऊच पत्नि.
vaibhavवैभव.n.grandeur. ऐश्वर्य.
vaideekवैदीक.n.pooja rituals.पूजाला संबंध झालते.
vaideekवैदीक.n.death ceremonies.श्राद्धाला संबंध झालते.
vaideekeeवैदीकी.n.practice of vedic rituals. वेद शास्त्र.तीस-चाळीस वर्षा पुढे वैदीकपण॑ मात्र करून वांचुनिकी करणे फार कष्ट होत॑. पण, अत्ता वैदीकींत॑ महिनाला वीस-पंच्वीस हदार रुपे सुलुभांत संपादाला होत॑.
vaiDoorya~वैडूर्य.n.a type of gem.एक रत्नाच नाव.
vaidya~वैद्य.n.a medical doctor.डॉक्टर.
vaidyaalaya~वैद्यालय.n.hospital.चिकित्सालय.
vaidyashaasthra~वैद्यशास्त्र.n.medical science. चिकित्सा शास्त्र.
vaidyavaaNeeवैद्यवाणी.n.medical shop.औषधाच॑/ओखदाच॑ दुकान. औषधवाणी. ओखदवाणी. वैद्य ( medical doctor/medication) + वाणी (merchant).
vaihnakवैह्नक.n.husband's elder sister.वहिनी. वैह्नक घराच बरोर असलतर॑ दाल्ला-बाईली मधे थोड मनस्ताप होयाला संभव अस्त॑.
vaijayantheeवैजयंती.n.black tulasi.कृष्णतुळसी.
vaijayantheemaalaaवैजयंतीमाला.n.a necklace of Lord Vishnu with five precious stones diamond, ruby, topaz, pearl and sapphire.महाविष्णूच वज्र, तंबड माणिक, पुष्कराज, मोती अण्खी इंद्रनीलाच माळ. 99% लोकांस॑ वैजयंतीमाला म्हण्जे अगाऊच सिनिमा नटीच सय येईल॑. मला पणीं हे शब्दाच अर्थ अस असल॑ म्हणून अत्ताच कळ्ल॑ ! these five precious stones are referred as arising from the five elements as follows ; diamond from आकाश or ether, ruby from अग्नि or fire, topaz from वायु or air, pearl from जल or water, sapphire from पृथ्वी or earth.
vaijnyaanikवैज्ञानिक.adj.scientific. विज्ञानाला संबंध झालते. शास्त्रीय.
vaijnyaanikवैज्ञानिक.n..a scientist. शास्त्रज्ञ.
vaikkaalवैक्काल.n.canal.कालवा. कालवाई. कालवायी. नदीच पाणी वेगळेकडे परतून सोडाला बांधलते व्यवस्था.वैक्काल is a metathesised or mispronounced form of कालवाई where वाई(वै) gets pronounced before का.
vaikunTHवैकुंठ.n.Vaikunth, the abode of Lord Vishnu.महाविष्णूच॑ निवासस्थळ॑. विष्णुलोक॑.
vaikunTHa samaaraadhanaaवैकुंठसमाराधना.n.a Hindu ceremony performed on the twelfth day after death.हिंदूधर्मा प्रकार मरून बारावां दिवसी कराच एक वैदिक पद्धत॑.
vaira~वैर॑.n.diamond.वज्र. from Tamil.
vairaageeवैरागी .n.an ascetic who has renounced the world.बैरागी. अवधूत सन्यासी.
vairaagyवैराग्य.n.renunciation.त्याग.
vaireeवैरी .n.enemy.शत्रु. रिपु.
vairipaNa~वैरिपण॑.n. enmity.विद्रोहपण॑. शत्रुपण॑.
vaishakhवैशाख.n.the second month in the Hindu calendar. हिंदू पंचांगांत॑ दुसर॑ महिना.
vaiShNavवैष्णव.adj.relating to Lord Vishnu.विष्णू्ला संबंध झालते.
vaiShNavवैष्णव.adj.a person who follows Vashnavism. वैष्णव संप्रदाय आचरण करणार.
vaishya~वैश्य.n.Vysya, one of the four castes. वर्णाश्रमांत॑ एक वर्ण.
vaitharaNeeवैतरणी.n.name of a mythical river crossed by departed souls.मेला नंतर॑ जीवात्मा वलांडून जायाच एक पुण्य नदीच नाव.
vajanवजन॑.n.weight.भार॑. जेड. जड॑.
vajraवज्र.n.diamond.वैर॑. वैरम (Tamil).
vajraayudha~वज्रायुध.n.Indira's weapon.देवेंद्राच आयुध.
vajrapathhya~वज्रपथ्य.n.a strict diet regimen.पूर्ण पथ्य.आयुरवेदिक चिकित्सा इंग्ळीष ओखदापक्षा आंगाला चोखोटच. पण, ते काढींगताना वज्रपथ्य असाम॑. नाहीतर॑, ते बरोर काम करना.
vakaalathवकालत.n.advocate's duties. वकीलाच काम.
vakaalathवकालत.n.advocate's office. वकीलाच कचेरि.
vakaalathnaamaaवकालतनामा.n.power of attorney in favour of an advicate. न्याय संबंध कार्य स्वंत होऊन करनास्क॑ वकीलाकडून करिवाला द्याच अधिकार॑.
vakeelवकील.n.advocate. legal pleader. न्यायतर्क करणार.
vakra buddhiवक्रबुद्धि.n.crooked mentality. pervert.वंकड॑ बुद्धि. दुष्ट बुद्धि.
vakra gathiवक्रगति.n.crooked ways. dishonest methods. कुबुद्धीच वागणे.
vakra~वक्र.adj.bent. crooked. वंकड॑.
vakra~वक्र.fig.dishonest.लबाडाच॑.
vakradriShTiवक्रदृष्टि.adj.squint-eyed.डोळे पाह्याच॑ रीती वंकडे-तिंकडे असाच॑. वंकड॑ दृष्टि.
vakradriShTiवक्रदृष्टि.fig.crooked or scheming way of looking at a thing.वक्रबुद्धींतून पाह्णे.
vakrathunDa~वक्रतुंड.n.Lord Ganapathi. गणपति.
valaaMDaNeवलांडणे.vt.to go across, circumventing.(कसालीं लागनास्क॑) फिरींगून जाणे ; ओलांडणें in sm.ओलांडणें in sm.
valaaMDaNeवलांडणे.vt.to pass over.व॑रून जाणे.ओलांडणें in sm.
vaLaNeवळणे.vi.to turn. to change the course.(जायाच वाट) वांकून जाणे.
vaLavaLaaवळवळा.n.slippery and writhing (on touch).(शिवताना) निसराच.हलवा खायाला मझ॑ नातूला अवडना. कां म्हण्जे, ते शिवताना वळवळा अस्त॑ म्हणून तो सांगतो.वळावळ/वळवळ in sm.
vaLavaLaaवळवळा.fig.indecisive.निश्चय काढनाते.तो मनुष उदंड वळवळा स्वभावाच॑. तो कोण्त॑ विषयांतीन लोक्कर निर्णय घेना, उग॑ ढकळत असल॑.वळावळ/वळवळ in sm.
valaya~वलय.n.a circular boundary.वृत्ताकाराच॑ परिधि.
valaya~वलय.n.circle.वृत्त.
vaLeeवळी.n.a line. a row.पंक्ती. कित्येक मठांत तीर्थप्रसाद वाढाच पुढे कोणालीन जेवाच ठिकाणी सोडनात॑. खिडकी वाटे लवून पाहलतर वळीन पान मांडलसाच पाव्हूया.
vallabhवल्लभ.n.one who is dear (man).प्रीय.
vallabhवल्लभ.n.husband.दाल्ला. पति.
vaLLIवळ्ळि.n.creeper. वेल. लता. वल्लि. कोडि (Tamil).
vaLukeवळुके.adj.bald-headed.टकळू. केंस झडलते डोस्के.from Tamil.
vamवाम.n.left.डाव॑. सव्य.
vamवाम.n.reverse. contrary.उपराट. उलटा. सव्य.
vambवंब.n.carrying tales. mischievous talk.छाडी. from Tamil. चहाडी in sm.
vamb bolNeवंब-बोलणे.vt.to indulge in mischievous talk. to carry tales.छाडी सांगणे.चहाडी सांगणे in sm.
vamsha~वंश.n.lineage. race. कुल.
vamshaja~वंशज.n.progeny.संतती.
vamshavRiddhiवंशवृद्धि.n.advancement of a family.वंश पुढे होणे. वंशवृद्धि करतां अम्च देशांत उदंड लोके पहिलच लेंकरु बायको नको म्हणून गर्भपात करींगतात. तजमळे उजाच लेंकरांच लिंग काय म्हणाच डॉक्टर लोके सांगताने अस॑ नियम सरकार केलहेत॑.
vamshavRikSha~वंशवृक्ष.n.family tree.वंशाच लोकेंच सोयरीकपण दाखिवाच एक लेख.
vana~वन.n.forest.राण.
vanadevathaaवनदेवता.n.a goddess of the forest.वनाच देवता.
vanamaalaaवनमाला.n.a garland of wild flowers. राणाच फूलाच माळ॑.
vanamaaleeवनमाली.n.Lord Krishna.श्रि क्रिष्णा.
vanamahothsavवनमहोत्सव.n.a social celebration for planting of trees.वृक्ष लावाच/रोवाच एक समाज उत्सव॑.
vanashankareeवनशंकरी.n.Goddess Vanashankari. Goddess Durga in her benign aspect.बनशंकरी. दुर्गादेवीच शांत रूप. शाकांबरी.
vanaspathiवनस्पति.n.a tree. a plant. वृक्ष. झाड.
vanavaasवनवास.n.dwelling in a forest.वनांत॑ राहणे.
vanavaasवनवास.n.banishment to forests. बहिष्कार करून वनाला पाठिवणे.
vanavaaseeवनवासी.n.forest dweller.राणांत॑ राहणे.
vanchanaaवंचना.n.cheating. deception.एमारिवणे. विश्वास तोडणे.
vandanaaवंदना.n.a salutation. नमस्कार.
vaNe~वण॑.n.pock marks on the face. freckles. तोंडांत॑ आलते व्रणाच चिन्ह.पाप, ते पोरीला तोंडाच व॑र वण आहे. चुमणपणांत॑ "देवी" आलहोत॑ वाटते.from the Sanskrit व्रण.
vaNe~वण॑.n.an infected wound. व्रण. पिकलते फोड. रण॑.
vaNeeवणी.suff.a word-suffix to mean "in like manner"."सारख॑/मादरी" हे अर्थ द्याच प्रत्यय. विणी. मिणी. मणी.उरळेगड्डेच भाजि करताना ते ल्हान-ल्हानवणी चिरून करलतर॑ रूच बेष असल॑.an example of inter-use of व and म, as well as the mispronunciation of व/वि and म/मि.
vangaLa~वंगळ॑.adj.bad. disgusting. loathsome. कंटाळा वाटाच॑. ओंगळ॑. वोंगळ॑.ओंगळ/वंगळ in sm.
vanithaaवनिता.n.woman. स्त्री. बायको.
vankaDa~वंकड॑.adj.bent. crooked. वांकून असाच॑.वाकडा in sm.
vankaDa~ thinkaDa~वंकड॑-तिंकड॑.adj. not alligned properly.अडव॑तिडव॑. अम्च घरच॑ भोंतालभिंते ("कांपौंड-वाल") वंकड॑-तिंकड॑ बांधलाहे. मेस्त्री काम बरोर केल नाही.
vankaDa~ thinkaDa~वंकड॑-तिंकड॑.fig. crooked. deceitful.लटक॑-लबाड॑. लटक॑-फुटक॑.
vankeeवंकी.n.an ornament worn by ladies in the upper arm. वांकी. बायके हाताच व॑रच भागांत॑ घालाच आभरण॑.वाकी/वांकी/वाक in sm.
vanthवंत.suff.a suffix attached to an abstract noun, signifying "possessor of a thing or an aspect". अव्यक्त नामाला जोडाच एक प्रत्यय. eg. भाग्यवंत, गुणवंत, बळवंत etc.
vanyamRiga~वन्यमृग.n.an animal of the forest. राणाच मृग.
varवर.adv.above.व॑र. वोर. (एकापक्षा) उंच ठिकाण.(1) आज आकाशांत मेघ साधारणा पक्षा व॑र दिसत॑. (2) ’लिफ्ट' व॑र जाऊन उदंड वेळ झाल॑. अम्हाला फार अवसर झाल ते करतां पडतोरे/पायरी वाटे तीसर॑ माडीला जाऊया.
varवर.adv.at a hight.व॑र(असाच). वोर (असाच).आज वारे उदंड बडिवत आहे. ते कवाड झांकून वर असाच कोंडी घालूनटाक. पूरा दिवस झांकूनच असूनदे.
varवर.adv.on top of. व॑र. वोर.ते मेजावर असाच पुस्तक आणून दे.
varवर.adv.in a superior rank, position etc.व॑र. वोर.(1) मझ॑ जामाईच आफीसांत॑ त्यंचपक्षा व॑र कोणीं नाहीते. तेनीच तिकडल॑ मुख्य आफीसर. (2) अम्च आफीसांत॑ वरचा/वरला सांगास्क कराला, म्हण्जे मस्का बडिवाला, उदंडदन आहेत॑.
varवर.prep.implying 'beyond time/extent'/'afterwards'. नंतर॑. व॑र. वोर.(1) दिवसोडि बरोर याच बस एवढ॑ पतोरी आल नाही. अण्कीन एक घंटा वर यथे राखून होठाकणे/ओठाकणे बरोर असना. 'टेक्सी' करींगुन जाणेच चखोट असल॑ म्हणून मला वाटते. (2) निज/वास्तव सांगाला तला मी भरून समय देलों. पण, तोंड उघडला नाही तो. हेज वर अण्कीन मी काय करू ? (3) वर्षावर झाल॑, मी मझ॑ स्वदेशाला जाऊन. (4) तो गेलावर मी पूरा सत्य तुला सांगतों. (5) सिनिमा झालावर अम्ही जेवाला एक होटलाला गेलों.implied in an abstract sense.
varवर.prep.implying 'depending on'.व॑र. वोर.देवावर भार घालून अम्ही अम्च मायाला हॉस्पिटलांत मिळिवलों. ते त्यंच शेवटल॑ प्रयाण असल॑ म्हणून अम्हाला कळ्ल॑ नाही.implied in an abstract sense.
varवर.prep.implying 'casting upon'.व॑र. वोर.तजवर आवश्य नाहीस्क॑ आरोप घाल नको.implied in an abstract sense.
varवर.prep.implying 'afterwards'.व॑र. वोर. (1) तो गेलावर मी पूरा सत्य तुला सांगतों. (2) सिनिमा झालावर अम्ही जेवाला एक होटलाला गेलों.implied in an abstract sense.
var khaale naachivaNeवर-खाले नाचिवणे idto make someone dance to your tunes.वेगळांच व॑र स्वाधीन ठिवून अम्ही सांगास्क॑ करिवणे.
var khaale paahNeवर-खाले पाह्णे.id.to be perplexed. भ्रम होणे.
var varवरवर.adv.repeatedly. पुन्हा-पुन्हा.
var varवरवर.adv.outwardly. superficially. overtly.वरून. बाहेर दिसास्क॑.
var varcha~वरवरच॑.adj.that which is visible superficially.नुस्त बाहेर दिसाच॑. वरून दिसाच॑.
vara~वर.n.bride groom.वराडाच नवरा.
vara~वर.n.boon.अनुग्रह.
vara~वर.n.blessing.आशिर्वाद.
varaaDवराड.n.marriage.विवाह. वऱ्हाड in sm. वऱ्हाड in sm also means "a wedding procession" or " a wedding assemblage".
varaaD vevवराड-वेव.n.wedding and related ceremonies or activities. वराडीन तल संबंध झालते अग्गीनीं.
varaaDgharवराडघर.n.a house where a wedding takes place. वराड चालिवाच घर/स्थळ॑.
varaahवराह.n.boar, the third incarnation of Maha Vishnu.महाविष्णुच तिसर॑ (वराहाच) अवतार.
varaahवराह.n.boar. डुक्कर॑.
varaandaaवरांदा.n.veranda.घराच पुढ॑ भागांतल॑ छत असाच उघड॑ ठिकाण.
varacha~वरच॑.adj.that which is above or on top.वर असाच. वरल॑.वरचा in sm.
varacha~वरच॑.adj.relating to the upper position.वरल॑ ठिकाणाला संबंध झालतेवरचा in sm.
varacha~वरच॑.adj.ditto as above.यथाप्रकार.मझ नातूला सांगिटलों "मी केलते पाव्हून वरच॑ प्रकार तेवढ॑ इषोबीं/हिषोबीं मला करून दाखिव".वरचा in sm.
varaDaaवरडा.n.shout.घट्टी बोलणे. थोर शब्दांत बोलणे. घसा थोर करणे.
varaDaa varaDeeवरडावरडी.n.acrimonious and raucous fight. shouting match. थोर शब्दांत वरडून भांडणे.
varadaanवरदान.n.granting of a boon.वर देणे.
varadakShiNaaवरदक्षिणा.n.dowry. वराडाच वेळ नवरीच पक्षाकडून नवराला मिळाच पैसा.
varaDaNeवरडणे.vt.to shout. घसा थोर करणे. तोंडांतून मोट्ठ॑ शब्द करणे.ओरडणे in sm.
varaNवरण.n.a preparation made of cooked dhal.दाळाच एक सप्पक कालवण॑.
varapaNe.वरपणे.vt.to slurp down liquidy food. पत्तळ पदार्थ शब्द करून गिळणे.
varbaDhNeवरबढणे.vt.to scratch.खाजिवणे. खाजींगणे.वरखडणें in sm.
varbaDhNeवरबढणे.vi.to be scratched by an animal or a sharp edge.एक प्राणीच नंख/दांत अथवा काहीं एक भाग लागून आंगाला वरून घाव होणे.मझ लेंकीच घरांत दोन मांदर॑ आहे. एकाच बरोर खेळत असताना असलास्क-असून ते मझ हात वरबढूनटाकले. चोखोट वेळ तला "ॲन्टी-रेबीस इनजेकषन" देलहोत॑. नाहीतर॑ मला एक थोर "इनजकषन" घालिंगांम्ते पडलासल॑.
varchevarवरचेवर.adv.again and again. off and on. पुन्हा-पुन्हा.वरच्यावर in sm.
vareekवरीक.adv.only. merely.solely. मात्र."मी लटक बोललों म्हणून वरीक सांग नको".
varga~वर्ग.n.class. category.वर्ग. विभाग.
varga~वर्ग.n.division.विभाग.
varga~वर्ग.n.tribe or caste.जात॑.
varga~वर्ग.n.section in a tome or book. ग्रंथाच/पुस्तकाच भाग. पुस्तकाच खंड.
varga~वर्ग.n.a particular variety.एक प्रत्येक गुणाच. दहा वर्षाच पुढ॑ पर्यंतीन चोखोट वर्गाच तांदूळ किलोला पंध्रा रुपेला मिळत होत॑. तेच अत्ता साठ रुपे झालाहे.
vargeeya~वर्गीय.adj.relating to a caste, class, type etc.एक प्रत्येक वर्गाला संबंध झालते.
varkaDe~वरकड॑.adj.the others. the remaining ones. the rest.बाकि राह्यलते. बाकि उरलते.मझ॑ बापा 'गुंटूर' सोडून चेन्नैला ट्रान्सफर होऊन जाताना अम्च सामान पाठिवाला एक लॉरी व्यवस्था केल्होते, अणी तो मनुषाकडे सांगिटले "थोर-थोर सामान अस्कीन लॉरींत घालूनटाक अणी वरकड॑ सामान अम्च वॅनांत आणींगतों" म्हणून.
varkharche~वरखर्च.n.out of pocket expenses. miscellaneous expenses. sundry expenses.व॑रखर्च. मुख्य खर्च सोडून (विना) कराच चिल्लर खर्च.ट्रेनांत अम्ही कोठ॑ गेलतरीन कूलीला, घरांतून स्टेषनाला जायाला-याला, टॅक्सीला, जेवणे-खाणेला, अस॑ वरखर्चाला उण॑पक्षा दोन हदार रुपे हातराखणे ठींगाम॑.
varla~वरल॑.adj.that which is above or on top. वर असाच. वरच॑.
varla~ khaadeeवरल॑ खादी.n.snacks. munchies etc.नुस्त रूचाला खायाच पदार्थ.पाष्टेच नाश्ता, दुपारीच जेवण॑ अण्की रात्रीच जेवण॑ हेजा मधे बिस्केट, चकली, कारळी-पेणा असल॑ वरल॑ खादी घेत असणे आरोग्याला चोखोट न्हो म्हणतात॑. तज बद्धल पंडू-फल खाणे चोखोट.
varlaaवरला.adj.person in a higher position.वरचा. वरिष्ठ मनुष.वरला अधिकारि आफीसाला सदाईं वेळाला आलतरविना खाले असणार कोणीं वेळाला येईनात॑. तज करतांच श्री राजगोपालाचारी मुख्यमंत्री म्हणून असताना तेनी त्यंच आफीसाला एक घंटा पुढे येत होते अणी तसच, संध्याकाळी एक-दोन घंटा उशीर होऊन आफीसांतसून निघत होते.
varlaavarवर्लावर॑.adv.peripherally. superficially.व॑रून.काम बरोर शिकाम म्हण्जे, शिकाच वेळी वर्लावर॑ काम पाह्यलतर॑ पुरना. शिकाच कमावर पूर्त ध्यान ठीवलतरच होईल.
varlavarवरलवर.adv.outwardly. superficially. overtly.नुस्त वरून. नुस्त बाहेर दिसास्क॑ मात्र.
varmeeShTHवर्मीष्ठ.adj.a selfish person whose speech is either probing or stinging.स्वंत कार्य मात्र पाह्यींगून टोंचून-टोंचून बोलाच एक मनुष. वाचलते अणी श्रम भोगणार लोके साधारणहोऊन वर्मीष्ठ असत नाहीत॑. षाणपण॑ अधीक नाहीस्क अणी कष्ठी भोगनास्क व॑र जायाला प्रयत्न करणारच साधारणहोऊन वर्मीष्ठ असाच.
varNa~वर्ण.n. colour.रंग.
varNa~वर्ण.n. caste. race.जाति.
varNaaShramवर्णाश्रम॑.n.the four castes (brahmana, kshatriya, vysya and sudra). ब्रह्मण॑, क्षत्रिया, वैश्या अणी शूद्रा असल॑ समुदायाच विभाग.
varNabhadवर्णभेद.n.racial discrimination. वर्णाच आधारांत॑ लोकास॑ वेगळ॑-वेगळ॑ ठिवणे.
varNanaaवर्णना.n. description.विवरणा.
varoonवरून advimplying 'from the upper part. from over. from above. from the top'. व॑रून.implying 'from the upper part. from over. from above. from the top'. व॑रून. uis दुपारा मी निजलासताना मझ पांयेवरून एक विंचु गेल॑.
varoonवरून.adv.implying 'from nearby or from the vicinity'. व॑रून. (1) अम्च गांवावरून एक नव रेलवे-लैन घालाल जातात म्हणून मी टी.वींत॑ ऐकलों. (2) मी सांगट्लास्क॑, कापड अटकिवून/लोंबिवून घालाला तो ते भिंतीवरून एक दोरा होढून/ओढून बांधला.used in an abstract sense.
varoonवरून.prep.implying "observation from premises to inferences". व॑रून.संपाकाच रूचावरून मला कळ्ले, हे मझ बाईलेच केली म्हणून.used in an abstract sense.
varopachaarवरोपचार.n.the ritual welcoming and extending courtesies to the bridegroom. वराडाच नवराला मर्यादा करणे.
varSha~वर्ष.n.year.बारा महिनाच काळ॑.
varSha~वर्ष.n.rains.पाऊस.
varShaabdeeवर्षाब्दी.n.completion of one year.एक वर्ष पूरा होणे.
varShaanvarShवर्षानवर्ष.adv.for years together.वर्षोंवर्ष.
varShaarambhवर्षारंभ.n.start of a new year.नव वर्षाच आरंभ॑. उगादि. युगादि.
varShaavarShवर्षावर्ष.adv.every year. प्रतिवर्ष. वर्षावर्षी. अम्च घराच जवळ असाच देवी क्षेत्रांत॑ वर्षावर्षी होयाच उत्सवाला मझ संभावाना चुकनास्क॑ मी देणे आहे.
varShabharवर्षभर.adv.throughout the tear.पूरा वर्ष.
varShakaalवर्षकाल.n.rainy season.वर्षकाळ. पावसाळा. पाऊसाळा. पौसाळा. वर्षऋतु.
varShaRithuवर्षऋतु.n.rainy season. वर्षकाल. पावसाळा. पाऊसाळा. पौसाळा.
varSho*varShवर्षोंवर्ष.adv.for years together. भरून वर्षाला. वर्षानवर्ष.कित्येक पोर॑/पोरी वर्षोंवर्ष 'सी.ए' परीक्षा लिव्हत असतात॑. तज पक्षा तेनी 'एम.बी.ए' केलतर॑ जिंतून कामाला येऊया.
varshvaasवरश्वास.n.heavy breathing. panting.दीर्घ श्वास. श्रमांत॑ श्वास सोडणे/करणे.मला अत्ता-अग्गीन थोड पळल तर वरश्वास येते. "कार्डिओला" विचारलतर "हे वयाला एवढेच. पळताने, नुस्त चाललतर पुरे" अस म्हणट्ले.
varthamaanवर्तमान.adj.current. अत्ता होत असाच॑. चालू असाच॑.
varthamaanवर्तमान.adj.prevalent. अत्ता होत असाच॑ (पद्धती).
varthamaanवर्तमान.adj.(grammar) present tense. (व्याकरण॑) सद्या होत असाच क्रिया विषयीं सांगाच क्रियापदाच काळ॑.
varthamaan kaaLवर्तमानकाळ.n.(grammar) present tense.वर्तमानकाळ॑ (व्याकरणांत॑).
varumaanamवरुमानम. n.income.पैसा मिळाच॑. आदाय. येव.from Tamil.
varuNaaवरुणा.n.one of the Gods in Rigveda.ऋग्वेदांत॑ एक देवाच नाव. वरुण in sm.
varuvanTaaवरुवंटा.n.a cylindrical grinding stone rolled over a flat stone (called "पाटा") for grinding small quantities of masala.वरवंटा. संपाकाच मसाला थोडच आवश्य असलतर उपयोग कराच घट्टी धोंडांत॑ केलते एक लांबोळ वाटाच उपकरणा॑. (हेला पाटाच वर लोळिवून वाटतों).Note :- (1) The word वरवंटा is derived from वर (top) and वाटणे (to grind). The bottom stone being flat, is called पाटा and the combination is पाटावरवंटा, ie, पाटा and वरवंटा.
varvanTaaवरवंटा.n.a cylindrical grinding stone rolled over a flat stone (called "पाटा") for grinding small quantities of masala. वरुवंटा. संपाकाच मसाला थोडच आवश्य असताना उपयोग कराच घट्टि धोंडांत॑ केलते एक लांबोळ वाटाच उपकरणा॑. हेला पाटाच वर लोटून वाटतों.Note :- (1) The word वरवंटा is derived from वर (top) and वाटणे (to grind). The bottom stone being flat, is called पाटा and the combination is पाटावरवंटा, ie, पाटा and वरवंटा.
vasaaDeवसाडे.n.misty or very thin drizzle. a spray. ओसाडे. बरीक शिंतोडे.अम्च घरच॑ खिडकीच वरल॑ छज्जाला रुंद उणे असामळे थोड वसाडे बडीवलतरीन आंत ओल॑ होते. खिडकी समच झांकांमते पडते.
vasanthवसंत.n.spring season.हिंवाळाच/हिमाळाच नंतरल॑ ऋतु.
vasantha panchamiवसंतपंचमि.n.the fifth day of the shuklapaksha of Magha month.माघ मासांतल॑ शुक्ळपक्षाच पंचमीच दिवस.
vasariवसरि.n.an open space in the central portion of a house.घराच मधल॑ ठामांतल॑ मोकळ॑ ठिकाण.जुन॑ काळाच घरांत मधे आंगण अस्त॑. तज एक पटीस वसरि अस्त॑, अण्खीएक पटीस संपाकघर, तिसर॑ पटीस निजाच खोलि, चौथे पटीस देवघर अस॑ "प्लान"/व्यवस्था केलास्तील॑.ओसरी in sm.
vasatheegRiha~वसतीगृह.n.hostel. dormitory. राह्याच व्यवस्था असाच एक समूह गृह॑. छत्र.
vasathiवसति.n. staying arrangements or facilities.राह्याच व्यवस्था.
vasha~वश॑.adj.rendered under control.स्वाधीन॑ केलते.
vasiShTaवसिष्ट.n.name of a gothra named after sage Vasishta. वसिष्टऋषींच नावा वर एक गोत्राच नाव.
vasiShTaवसिष्टा.n.name of an ancient sage. एक महाऋषीच नाव.
vasoolवसूल.n.receipts.मिळामते पैसे.
vasthवस्त.n.gold and silver ornaments.सोनेच रुपेच आभरण॑. नग॑. नेग. माळ-मत्ता. वस्था.
vasthhaaवस्था.n.gold and silver ornaments. वस्त. नग. आभरण॑. माळ-मत्ता. अम्च शेदारल॑ घरची बीदींत॑ बंडीवालाकडून भाजीपाला घ्याला बाहेर येतानपणीं भरून वस्था घालींगते. तिज घरचे भाग्यवंत लोक म्हणून धाकिवाला असूया वाटते.
vasthra~वस्त्र.n.cloth.कापड.
vasthra~वस्त्र.n.dress.शिवलते कापड॑.
vasthra~वस्त्र.n.a cotton garland like item used for decorating god's idol or picture.पूजाचवेळी देवाला अलंकार करिवाच कापूसांत॑ केलते मालाकाराच एक अलंकार साधन॑.
vasthraapaharaNवस्त्रापहरण.n.removal of clothes from a person forcibly.बळ उपयोग करून दुसरेंच कापड उक्कलणे.
vasthuवस्तु.n.an article.एक साधन॑.
vasuवसु.n.name of a demi-god invoked especially during death rites.श्राद्धाला संबंध झालते एक देवताच नाव.
vasudhaaवसुधा.n.the Earth.वसुंधरा. भूमी.

No comments:

Post a Comment